गाभा:
नमस्कार मिसळखाऊ!
मी इथे नवीन आहे. मला खरडवहीत काही निरोप आले आहेत, जे मी आत्ताच पाहिले. तसे ते ईमेल मधून आले होते, आणि मी रिप्लाय देखिल केला होता. पण ती उत्तरे एका विवक्षित आयडीलाच गेली असण्याची शंका आहे.
दुस-याच्या खरडवहीत जाऊन उत्तर कसे द्यावे ह्याचे कृपया कोणी मार्गदर्शन करेल काय?
दुस-याच्या खरडवहीत गेल्यावर उत्तर लिहिण्यासाठी टेक्स्ट बॉक्स दिसत नाही.
पराकोटीच्या अडाणी प्रश्नाबद्दल माफी चाहतो. :-(
धन्यवाद!
प्रतिक्रिया
21 Sep 2009 - 11:31 am | अवलिया
कशाला तुमचा सुखाचा जीव धोक्यात घालताय?
खव वाचणे, उत्तर देणे, दुस-याच्या खव वाचणे, त्यावर तिस-याला काहीतरी लिहिणे हे गर्दपेक्षा भयानक व्यसन आहे. सुटता सुटत नाही. असो.
तात्या करतील तुम्हाला मदत !
(व्यसनी) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
21 Sep 2009 - 11:34 am | अभिजा
अवलिया, श्रावण धन्यवाद.
श्रावण तुमची खरड मिळाली. पण प्रतिसाद द्या वर क्लिक करून तुमच्या खरडवहीत गेलो तर टेक्स्ट बॉक्स दिसत नाही. हे मी आधीपण करून पहिले होते.
धन्यवाद.
21 Sep 2009 - 11:41 am | श्रावण मोडक
दिसते काही तरी. नीलकांत किंवा तात्या हेच आता मार्ग काढू शकतात. व्य. नि. लिहा. त्यांचेही येथे लक्ष असतेच. त्यांना आज वेळ मिळाला तर प्रश्न सुटेल हे नक्की!!!
21 Sep 2009 - 11:45 am | अभिजा
धन्यवाद, श्रावण! आजच तात्यांना मेल टाकतो! :-)
21 Sep 2009 - 12:19 pm | Nile
नविन लोकांना खरडीला उत्तर देण्याची सुविधा लगेच दिलि जात नाही असं तात्या मागे मला म्हणाले होते. होईल लवकर सुरु काळजी करु नका. बाकी अवलियांशी सहमत आहे.
कल्जी घेने. ;)
21 Sep 2009 - 3:43 pm | सखाराम_गटणे™
खेचरकाकांनी पाहीले करतील तुमची चालु सुविधा.
21 Sep 2009 - 4:06 pm | सुधीर काळे
धर्माधिकारीसाहेब,
हा प्रश्न विचारून आपण अनेकांचे आशिर्वाद/शुभेच्छा मिळवणार आहात.
इथल्याच एका गृहस्थांनी माझ्या खरडवहीत कुणी दुसर्याने लिहिलेला निरोप मी खोडला नाही म्हणून केवढा आक्रस्ताळेपणा केला होता हे फक्त आम्हा चौघांनाच माहीत आहे.
मलाही अजूनही "खव" हा प्रकार फारसा कळलेला नाही. लोक व्य. नि. का लिहीत नाहीत कुणास ठाऊक? खरं तर ही खरडवही फारशी कामाची नाही असेच मला वाटते.
तात्यासाहेब लवकरच मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे.
असो.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
21 Sep 2009 - 4:10 pm | सखाराम_गटणे™
खव म्हणजे जी खाजगी गोष्ट जी सगळ्यांनी पहावी अशी गोष्ट, पण अडचणीत येतात माझी खाजगी बाब म्हणुन सांगता येते.
थोडक्यात, काड्या टाकायचे उत्तम साधन
21 Sep 2009 - 9:36 pm | निमीत्त मात्र
चौथा कोण?
22 Sep 2009 - 10:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या खवमधे काय गोंधळ सुरू होता हे संपूर्ण खव-उचकपाचक संघाने पाहिलं आहे. असो.
मिटलेलं/मिटवलेलं भांडण उकरून काढून तुम्हाला काय आनंद होत आहे समजत नाही. नसेल वापरायची खव, तर नका वापरू ... स्वतःची खव बंद करण्याचीही सोय आहे ती वापरा. उगाच कशाला चव्हाट्यावर धुणी धुवायची?
अदिती
21 Sep 2009 - 5:21 pm | नंदू
मला देखिल हाच प्र श्न सतावतोय. वाविप्र मधून यावर मार्गदर्शनाच्या अपेक्षेत.
नंदू
21 Sep 2009 - 8:44 pm | sujay
मला देखील हाच प्रश्ण आहे, मी ह्या संर्दभात तात्याना ३-४ वेळा व्यनी करून पाहीला पण अजूनही हि सोय मला उपलब्ध नाही.
लवकरच ही सुवीधा उपलब्ध होईल ही आशा करतो.
सुजय
21 Sep 2009 - 11:58 pm | मी-सौरभ
तात्या, लिहा काहीतरि
सौरभ
22 Sep 2009 - 12:03 pm | अमित बेधुन्द मन...
तात्या सान्गा कि