कवितासंग्रह

वडापाव's picture
वडापाव in काथ्याकूट
26 Feb 2008 - 6:38 pm
गाभा: 

आजपर्यंत आपल्या आयुष्यात अनेक काव्ये आली, त्यांनी आपल्या मनावर आपली छाप पाडली. त्यांना आपण चाली लावल्या. विडंबने केली गेली. चला तर मग... आपल्या ऐकीवात आलेली किंवा स्वरचित काव्ये येथे मांडूनएक कवितांचा संग्रह करुया. म्हणजे ज्या कविता अस्तित्वात असूनही कोणाकडून ऐकल्या अथवा वाचल्यागेल्या नसतील, त्या त्यांस येथे येऊन वाचता येतील.मी सुरुवात करतो.
लायब्ररीबाहेरचा पिंपळ असाच,
प्रत्येक संध्याकाळी सळसळून हसतो,
पुस्तकांत तुझ्या आठवणींची जपून पिंपळपानं,
जाळीत त्यांच्या स्वतःला मी गुंतवून टाकतो.

भेलकांडलेल्या पुस्तकांच्या गर्दीत,
विचारांची पानं फडफडत असतात,
काना,मात्रा,वेलांट्यांचं राहत नाही बंधन,
भास तुझेच शब्दाशब्दांत गप्पा मारत बसतात.

झिपऱ्या सावरणाऱ्या माडाच्या कुशीत,
तुझ्यामाझ्या हस्तरेषा नकळत मिसळून जातात,
ओल्या वाळूच्या मिठीतून अलगद स्वतःला सोडवत,
लाटाच आपल्या श्वासांची साक्ष बनून राहतात.

प्रत्येक ओळ लिहून संपल्यावर वाटतं,
शब्दसफर मुकी माझी इथेच आता थांबूदे,
मनाजोगती मांडामांड झाली एकदा अवसानाची,
की सगळं सगळं पुन्हा...अजून एकदाच सांगूदे.

किनऱ्यावरच्या त्या स्वप्नांची का परत उजळणी करायची,
छे! आता वास्तवाचा नवा ऋतूही अनुभवायला हवा,
आयुष्याच्या या वळणावर टाकताना पुढली पावलं,
हात तुझा असाच सतत हाती हवा.

नवे ऋतू, नवी स्वप्नं,
नव्याच दुनियेत आता बागडायचंय,
नवे चटके, नवे काटे,
अश्रूंनाही आता एकत्रच लपवायचंय.

सावली तुझीच पुढ्यात,
कायम माझ्या राहूदे,
अजून फक्त एकदाच बहुतेक हेच सांगायचं आहे,
आरशात जेव्हा बघशील,
दिसेल माझीच प्रतिमा,
श्वासाश्वासात तुझ्या आता असं नांदायचं आहे.

प्रतिक्रिया

तात्या विन्चू's picture

27 Feb 2008 - 12:13 pm | तात्या विन्चू

एक सन्दीप खरे यान्चे मुक्तकाव्य असेल मनात घर करुन राहीलेले आहे (याला नक्की मुक्तकाव्य म्हणतात की मराठी शेर म्हणतात याबाबत मी पुर्णतः अनभिज्ञ आहे. तसेच शब्दही पुर्णतः लक्शात नसल्याने कदाचित यमक न जुळण्याचाही सम्भव आहे, त्या बाबत दिलगीर आहे)
मी माझा काळीज फेकल, तु ते झेलायचा प्रयत्न केलास, पण सुटल....
आणी आवाज आला खळकन,
तुही तुझा काळीज फेकल, मी ते झेलायचा प्रयत्न केलास, पण सुटल.......
आणी आवाज आला खणकन,
खळकन फुटल म्हणुन काय झाल, खणकन आवाज नाही आला म्हणून काय झाल,
निदान आमच्या काळजाला गन्ज तरी लागत नाही......
 
आपला,
ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

बेसनलाडू's picture

27 Feb 2008 - 12:55 pm | बेसनलाडू

वडापाव यांनी दिलेली "लायब्ररीबाहेरचा पिंपळ ..." ही कविता माझी स्वतःची आहे. बालपणी ;) छंदबद्ध रचना, गझला करीत नसे, तेव्हाचा काळ :)
रचनाकालः ऑगस्ट-ऑक्टोबर २००४ च्या आसपास
स्थळः आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ग्रंथालय
प्रसंगः जी आर ई परीक्षेचा अभ्यास करताना लक्ष भरकटून बाहेरच्या पिंपळाची सळसळ, आसपासच्या पुस्तकांच्या राशी इ. पाहत सुचलेली/लिहिली गेलेली कविता.
हीच कविता मनोगत, ऑर्कुटवरील काव्यांजली समुदाय आणि माझ्या जालनिशीवर (http://khoopkaahee.blogspot.com/) याआधी प्रसिद्ध झाली आहे. येथे पुन्हा पाहून या जुन्या रचनेचा पुन्हा आनंद लुटता आला.
धन्यवाद वडापाव. बाकी या कवितेची तुमच्यावर छाप वगैरे पडली याचा आश्चर्ययुक्त आनंद वाटतो :)
(आभारी)बेसनलाडू

वडापाव's picture

27 Feb 2008 - 4:55 pm | वडापाव

बेलाराव, आपण तर छुपे रुस्तमच निघालात.आपल्या इतर काव्यांच्या प्रतीक्षेतआपला नम्र,
वडापाव

सर्किट's picture

29 Feb 2008 - 12:15 pm | सर्किट (not verified)

बालपणी तू छान कविता करायचास, बे. ला. ;-)आवडली !- सर्किट

वडापाव's picture

28 Feb 2008 - 6:58 pm | वडापाव

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल               

वडापाव's picture

29 Feb 2008 - 2:53 pm | वडापाव

सायकळच्या चाकात
ओढणी अडकून राहिली
तिच्या चेहर्यावरची
काळजी मीही पाहिली

म्हणाली नाही ती की
मदत हवी म्हणून
मीच गेलो विचारायला
मदत हवी का म्हणून?

खूपच घट्ट अडकून बसली होती
ती त्या चाकात
माझ्याकडे पाहून
हसत होती गालात

ओठ च नव्हते बोलत नुसते
डोळेही सांगत होते
ओढनिचे शरीरही
माझ्या स्पर्शाने थरथरत होते

हळूवार हातांनी तिला
बाहेर त्यातून काढले
तिनेही हसत हसत
माझे आभार मानले

परत जेव्हा ती तिच्या
खांद्यावर ओढली गेली
माझ्या स्पर्शाचा अनुभव तीही
तिला देत गेली

अचानक या प्रसंगातून
बाहेर मी पडलो
सोडून तिला जाताना
मनातल्या मनात राडलो

नाव विचारायचे
तर राहूनच गेले
मनातले विचार ओळखून
तिनेच ते सांगितले

याच तर प्रसंगातून
प्रेम आमचे बहरले
आंब्याचे झाडही
पावसाळ्यात मोहरले

अजूनही तिची ओढणी
स्पर्श माझा मागत असते
वेळेचे भान ठेवून
तीही तिची साथ सोडत असत(काव्यप्रेमी)
वडापाव

बुध्दू बैल's picture

29 Feb 2008 - 3:01 pm | बुध्दू बैल

डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

धनाधीश's picture

29 Feb 2008 - 3:18 pm | धनाधीश

ती बसली आहे माझ्या शेजारी
बोलतचं आहे ,बोलतचं आहे
निरर्थक ,अर्थपुर्ण
थोडं अंतर राखून !
हळूहळू डोळे पेंगायला लागलेत
तिचे अन् माझेही.
पण मी कसा झोपू?
या छोट्याश्या घडीतील एक क्षणही
मला तिच्यापासून दूर व्हायचं नाहीये.

पण ती झोपलीच-
माझ्या छातीवर डोकं ठेवून.
राखून ठेवलेलं अंतर कधी गळून पडलं
कळलंच नाही.
पण आत्तच या हृदयाला काय झालं?
किती जोरात धडधडतंय!
वेड्या हृदया,थांब ना जरासा!
ती उठेल नं तुझ्या आवाजानं,
अन् पुन्हा बडबडत राहील
थोडं अंतर राखून!