गाभा:
प्रत्येकालाच आपल्या मातीबद्दल अभिमान असतो. आपली मराठी माती म्हणजे आपला महाराष्ट्र!
खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण... पुणे, जळगाव, मुंबई, नागपूर, सोलापूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक एक ना अनेक प्रदेश, शहरे अन् खेडी!
चला तर मग गप्पा मारू आपल्या मातीच्या गप्पा.. ज्या तुम्हाला माहित आहेत.. इतरांना माहित नसतील कदाचित! छोट्या खेड्याबद्दल असेल, निसर्गसौंदर्याबद्दल असेल, तिथल्या माणसांबद्दल असेल, अनुभवांबद्दल असेल.. अगदी काहीही.. जे तुमच्या मनात त्या गावाबद्दल कायमचं घर करून बसलंय........
प्रतिक्रिया
26 Feb 2008 - 3:38 pm | मनस्वी
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझारेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरीएकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरीभीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजाजय जय महाराष्ट्र माझा ...भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभाअस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभासह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजादरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझाकाळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणीपोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणीदारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजलादेशगौरवासाठी झिजलादिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
26 Feb 2008 - 4:56 pm | परीचा परा
अजून एक सुंदर महाराष्ट्र गीत ...
कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकरसंगीत - शंकरराव व्यासबहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥
गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशया ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥
विलम वैराग्य एक जागी नारती ??
जरी पटका भगवा झेंडाही डोलती
धर्म राजकारण एक समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनी कार्य साधती
पसरे या कीर्ति अशी विस्मया वहा ॥ २ ॥
गीत मराठ्यांचे श्रवणी, मुखी असो
स्फूर्ति रिती धृति ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडॊ सकारणी ही असे स्पृहा ॥ ३ ॥
{परीच्या प्रतिक्षेत} परा ....
27 Feb 2008 - 6:25 pm | प्रेमसाई
शाब्बास
27 Feb 2008 - 6:30 pm | विद्याधर३१
आज मराठी दिन साजरा होत आहे.
विषय वाचून ह्याच सन्दर्भात लिखाण आहे असे वाटले .......
(मराठीभक्त )विद्याधर
28 Feb 2008 - 7:52 am | विसोबा खेचर
चला तर मग गप्पा मारू आपल्या मातीच्या गप्पा.. ज्या तुम्हाला माहित आहेत.. इतरांना माहित नसतील कदाचित! छोट्या खेड्याबद्दल असेल, निसर्गसौंदर्याबद्दल असेल, तिथल्या माणसांबद्दल असेल, अनुभवांबद्दल असेल.. अगदी काहीही.. जे तुमच्या मनात त्या गावाबद्दल कायमचं घर करून बसलंय........
हम्म! ठीक आहे. सवडीसवडीने आमच्या कोकणाबद्दल आणि कोकणवासीयांबद्दल इथे लिहीन..
आपला,(हलकट कोकणी) तात्या.
28 Feb 2008 - 7:58 am | मीनल