बा. भ. बोरकर म्हणतात...

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in काथ्याकूट
26 Feb 2008 - 1:55 pm
गाभा: 

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे या मोल नाही फारसे... 
 
तुमचा ह्या गोष्टीवर थोडातरी विश्वास आहे का?
असल्यास -
गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का? 
किंवा 
आपण विवाहित असल्यास इतरांना हा बालहट्ट  सोडायला प्रवृत्त करणार का?

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

26 Feb 2008 - 2:13 pm | धमाल मुलगा

नक्कीच. १००% सहमत आहे मी."अरे काले है तो क्या हुआ, दिलवाले है" मध्ये आपला पूर्ण विश्वास आहे.अहो, र॑ग तेव्हढा गोरा, अन् मन काळ॑कुट्ट्...काय चाटायचय त्या र॑गाला?आणि मी अभिमानाने सा॑गू शकतो की माझ्या प्रेयसीने बा.भ.बोरकर न वाचतादेखिल हे आचरणात आणल॑ आहे. :)

सृष्टीलावण्या's picture

26 Feb 2008 - 2:27 pm | सृष्टीलावण्या

तुमच्या सारखा छान मुलगा विवाहित आहे हे वाचून हृदय भंगले...

धमाल मुलगा's picture

26 Feb 2008 - 2:45 pm | धमाल मुलगा

तुमच्या सारखा छान मुलगा विवाहित आहे हे वाचून हृदय भंगले... नाही...मी विवाहित नाही आहे...अजुन तरी! (अर्थात ते फक्त सोपस्कार म्हणूनआणि पति-पत्नी म्हणून जे काही स॑ब॑ध प्रस्थापित होतात त्या॑च्या अनुमती खातर म्हणायच॑ अस॑, अन्यथा इतर नैतिक गोष्टी॑मध्ये (शॉपि॑गच्या हमाल्या, तिच्याकडची बारशी-डोहाळजेवण॑ [इतरा॑ची], म॑गळागौर्‍या इ.इ.ला हजेरी लावण॑ ) विवाहित म्हणायला हरकत नाही )मी प्रेयसी म्हणालो हो ! अजून ४ महिने शिलकीत आहेत माझ्या, मजा करण्याचे आणि स्वात॑त्र्य उपभोगायचे...अत्ताच का मला "त्या" बिचार्‍या॑त वर्ग करता आहात? असो, कोणाला तरी माझ्याबद्दल अस॑ वाटल॑ ह्यातच सर्व काही आले.   क्षमा असावी सृष्टीलावण्यदेवी (नाव मस्त आहे, लग्नान॑तर बायकोच॑ नाव हेच ठेवाव॑ म्हणतो) , ह्या जन्मी नाही,  जमल्यासपुढीलजन्मी भेटू (तसे हो ! हि॑दी शिणेमात भेटतात तस॑)आपला,- ह्या जन्मी अन्अव्हेलेबल :)) ध मा ल.

मनस्वी's picture

26 Feb 2008 - 2:14 pm | मनस्वी

आहे ना विश्वास.
इतरांना दोन शब्द / स्वतःचे मत सांगू शकतो, पण या बाबतीत प्रवृत्त म्हणजे नक्की काय करायचं?
मनस्वी

सृष्टीलावण्या's picture

26 Feb 2008 - 2:32 pm | सृष्टीलावण्या

आपले मत  hammering करणे महत्त्वाचे आहे जसे कोक / पेप्सी रात्रंदिवस जाहिरातींचा मारा करून त्यांचे उत्पादन आपल्या गळी उतरवतात...

हा खरे तर वैयक्तिक प्रश्न आहे.कोणाला गोर्या मुलिशी लग्न करु नको असा अग्रह करणे कसे शक्य आहे?
पण आपण लोक उगाच गोर्या रंगाचा बौ करतो.
विं दा करन्दीकर म्हणतात.
आट्पाट नगरामधे नाही होत चोरी
हुशार मुले काळी आणि खुळी मुले गोरी......
पण आप्ल्या डोक्यातुन अजुन
गोरी गोरी  पान फुलासरखी छान ......हे काही जात नाही
खरे तर सावळ्या मुलिंचे डोळे छान दिसतात......
उदा: जयाप्रदा.. , शान्तिप्रिया.....

सृष्टीलावण्या's picture

26 Feb 2008 - 2:37 pm | सृष्टीलावण्या

 पण ह्या विषयावर लोकांशी बोला... कारण हा एक सामाजिक प्रश्न आहे... 
 

विसोबा खेचर's picture

26 Feb 2008 - 2:46 pm | विसोबा खेचर

तुमचा ह्या गोष्टीवर थोडातरी विश्वास आहे का?
हो, माझा विश्वास आहे...
गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का? 
अ) एकतर याला 'बालहट्ट' म्हणणे चूक ठरेल. कारण बायको कशी हवी किंवा नवरा कसा हवा हे ठरवण्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. त्याला आपण बालहट्ट कसं काय म्हणता?
ब) बोरकरांचं म्हणणं मला पटलं म्हणून प्रत्येकाला ते पटेलच असं नाही किंवा पटायला हवं असंही नाही! मग जोडीदार कसा असावा हे ठरवताना जर बोरकरांच्या म्हणण्याचा विचार केला गेला नाही तर लगेच तो बालहट्ट कसा काय होतो??
गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का? आपण विवाहित असल्यास इतरांना हा बालहट्ट  सोडायला प्रवृत्त करणार का?
काय गरज पडली आहे मला? मी काय काळ्या लोकांचा दलाल आहे??
आणि आधी म्हटल्याप्रमाणे, याला 'बालहट्ट' हा शब्द वापरणे हेच मुळात माझ्या मते चूक ठरेल!
शिवाय दुसर्‍या कुणाला तू कशी बायको कर, किंवा कसा नवरा कर, किंवा गोरा नवरा कर, किंवा गोरी बायको कर असं सांगणे हेच माझ्या मते एखाद्याच्या किंवा एखादीच्या अत्यंत वैयक्तिक बाबीत नाक खुपसणे आहे. कारण कुणाशी लग्न करायचं किंवा कुणाशी लग्न करायचं नाही हा प्रत्येकाचा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याबाबत दुसर्‍या कुणी काही बोलणे हे व्यक्तिश: मला तरी असभ्यपणाचे किंवा आगाऊपणाचे लक्षण वाटते!
हा झाला एक भाग.
आणि दुसरं म्हणजे...
खरं पाहता, एक अर्थी एखाद्याला/एखादीला अनुक्रमे काळी बायको कर किंवा काळा नवरा कर असे सांगणे म्हणजे माझ्या मते करस्पॉन्डिंग लग्नेच्छु काळ्या व्यक्तिंचा, त्यांच्या स्वाभिमानाचा तो अप्रत्यक्षरित्या अपमानच आहे!
माझ्या माहितीप्रमाणे, जगातल्या समस्त काळ्या तरूण तरूणींनी,
"अरे आम्हीही लग्नाचे आहोत हो, तेव्हा/म्हणून, 'लोकांना काळ्या व्यक्तिशीच लग्न करायला सांगा हो म्हणजे आम्ही पण उजवले जाऊ!' "
असं सांगण्याचा आग्रह कुणालाही केलेला नाही! असा अधिकार त्यांनी कुणालाही देऊ केलेला नाही! निदान मला तरी नाही!
तात्या.

मनस्वी's picture

26 Feb 2008 - 3:42 pm | मनस्वी

माझे सगळ्यात आवडते गाणे
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरीआणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरीसावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरीआणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारीसावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरीआणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरीसावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतोआणि नजरेचा चंदर् पाहू केव्हा उगवतोसावळाच रंग तुझा करी जीवा बेचैनआणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान
 
गायिका - माणिक वर्मा
(सावळ्याची) मनस्वी

सृष्टीलावण्या's picture

26 Feb 2008 - 4:15 pm | सृष्टीलावण्या

सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातोअष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो


सावळा ग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो
उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो

सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतोत्याला पाहतां लाजून चंद्र आभाळी लोपतो

सावळा ग रामचंद्र चार भावांत खेळतो
हीरकांच्या मेळाव्यांत नीलमणी उजळतो

सावळा ग रामचंद्र करी भावंडांसी प्रीतथोराथोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत

सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन
माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण

सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषणत्याशी करिता संवाद झालो बोबडे आपण

सावळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर
वेद म्हणतां विप्रांचे येती बोबडे उच्चार

सावळा ग रामचंद्र कर पसरूनी धांवतोरात जागावतो बाई सारा प्रासाद जागतो

सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण
मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण

 
_______________________________
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरतेऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघतेत्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
विजुभाऊ's picture

26 Feb 2008 - 4:09 pm | विजुभाऊ

मोठी माणसे करतात तो बाल हट्ट कसा म्हणायचा....
मराठीत मोठहट्ट असा शब्द नाही.......
 बालविवाह ही प्रथा आता शिल्लक नाही..........
त्यामुळे कोणत्या बाळाला सान्गु की हा हट्ट सोड म्हणुन?:)
बाल नसलेला आणि पण हट्टी नसलेला 
विजुभाऊ
 

विसोबा खेचर's picture

26 Feb 2008 - 4:47 pm | विसोबा खेचर

अजून दोन मुद्दे..
पहिला मुद्दा...
बोरकरांनी,
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे या मोल नाही फारसे... 
असं म्हटलं आहे. म्हणजे बोरकरांना व्यक्तिच्या सावळे-गोमटेपणा पेक्षा त्या व्यक्तिचा प्रांजळपणा अधिक मोलाचा वाटतो! मग भले ती व्यक्ति सावळी असो वा गोमटी!
परंतु सृष्टीलावण्यांनी यातून फक्त सावळी माणसेच काय ती प्रांजळ असतात असा कुठेतरी सोयीस्कर किंवा चुकीचा अर्थ काढला आहे असे वाटते! बोरकरांच्याच काव्याचा हवाला द्यायचा म्हटलं तर मग तो गोमट्या मंडळींच्या बाबतीतही देता येईलच की! कारण गोमटी माणसं प्रांजळ नसतात, असं बोरकरांनी कुठेच म्हटल्याचं मला दिसलं नाही! :)
दुसरा मुद्दा -
वरील दोन ओळींनुसार (संपूर्ण कविता मी वाचली नाही,) बोरकरांना माणसामाणसातला प्रांजळपणा, निर्मळपणा अपेक्षित आहे असे दिसते. त्यामुळे सृष्टीलावण्यांना बोरकरांच्या ओळींचा अर्थ फक्त वधुवर निवडीपर्यंतच मर्यादित आहे किंवा कसे, असेही हा चर्चाविषय वाचून वाटले!
माझ्या मते ह्या दोन ओळीत वधुवर निवडीच्याही पलिकडे जाणारा एक व्यापक अर्थ भरला आहे, ज्यावर आपल्या सर्वांची मिळून नक्कीच एक सुंदर रसग्रहणात्मक चर्चा होऊ शकली असती. असे असताना बोरकरांच्या ओळींना, फक्त काळा-गोरा-वधु-वर इथपर्यंतच एक छोट्या किंवा संकुचित अर्थाच्या दावणीला का बांधले गेले आहे हेही कळले नाही! असो...
आपला,(कविता नीट समजून घेणारा) तात्या.

धमाल मुलगा's picture

26 Feb 2008 - 5:23 pm | धमाल मुलगा

जाऊद्या हो तात्याबा. सृष्टीलावण्यताई॑नी त्या॑च्या मनातल्या विचारा॑ना इथे मा॑डताना बहुधा आधाराकरिता त्या ओळी॑ची मदत घेतली असावी. ह्या ओळी॑मुळे होणारा गैरसमज सोडला तर त्या॑चा मुद्दा तसा विचार करण्याजोगा नाही का? माझ॑ अस॑ मुळीच म्हणण॑ नाही की काळे-सावळे तेव्हढे चा॑गले आणि गोरे ते वाईट, पण असे कितीतर जण आहेतच ना, ज्या॑नी केवळ र॑गावर जाऊन चा॑गली स्थळ॑ नाकारली? आणि त्याहून महत्त्वाच॑ म्हणजे आपल्याकड॑ ही जी काही "लग्नाचा बाजार" पद्धत आहे त्यात विवाहोत्सुक हे वस्तु असल्यासारखे त्या॑चा र॑ग, पोत इ.इ.गोष्टी॑ना  अवास्तव महत्त्व दिले जाते. आता कोणि म्हणेल, मी गोरा / गोरी आहे मग मला शोभणारा / री जोडीदार नको? अरे तो काय ब्लाऊजपीस आहे का साडीच्या र॑गाला म्याच व्हायला? मन॑,आवडी जुळल्या...बाssस की आणखी काय हव॑? सृष्टीलावण्यताई॑च्या म्हणण्याचा अर्थ मी तरी असा लावला की "र॑ग गोरा अथवा काळा, त्याला महत्त्व नाही, पण फक्त गोर्‍या र॑गाचा हट्ट अयोग्य वाटतो."गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का? ह्या वाक्यात गोरेपणा नसलेल्या व्यक्तीशीच लग्न करावे असा दूसर्‍या टोकाचा सूर मला तरी नाही जाणवला बॉ!आपण विवाहित असल्यास इतरांना हा बालहट्ट  सोडायला प्रवृत्त करणार का?आता हा ज्याचा त्याचा प्रश्न... मला तरी अस॑ वाटत॑ की सृष्टीलावण्यताई॑ना अस॑ म्हणायच॑ असाव॑ की "केवळ र॑ग गोरा नाही म्हणून योग्य त्या व्यक्तीला अव्हेरु नये."असो, आपण सर्वचजण माझ्याहून मोठे आहात...वयाने आणि विचारानेही. मी मुर्खाने कोणालाही काही शिकवण्याचा लहान तो॑डी मोठा घास घेणे योग्य नव्हे,आणि अजाणता तसे घडले असल्यास माफी असावी. जे वाटले ते बोलून मोकळा झालो (नेहमीप्रमाणे).  आता जर कोणाला जोडे मारायचे असतील तर टाळक॑ही पुढे करणे भाग आहे.असो,आपला- ना धड मिट्ट काळा, ना धड चिट्ट गोरा असा आगोचर त्रिश॑कूध मा ल.

मनस्वी's picture

26 Feb 2008 - 5:46 pm | मनस्वी

कित्ती कित्ती समजुतदार आहे आपला धमु!
- ना धड मिट्ट काळा, ना धड चिट्ट गोरा असा आगोचर त्रिश॑कूएकदम फिट्ट वर्णन!

मनस्वी's picture

26 Feb 2008 - 5:47 pm | मनस्वी

कित्ती कित्ती समजुतदार आहे आपला धमु!
- ना धड मिट्ट काळा, ना धड चिट्ट गोरा असा आगोचर त्रिश॑कूएकदम फिट्ट वर्णन!

धमाल मुलगा's picture

26 Feb 2008 - 6:01 pm | धमाल मुलगा

कित्ती कित्ती समजुतदार आहे आपला धमु!लाजलो बुवा! स्तुतीची सवय नाही हो ! आणि तीही दोन-दोनदा ???  आमच॑ आयुष्य आपल॑ "उठता लाथ-बसता बुक्की"  मधल॑. स्वगत : कोण आहे रे तिकडेss ? जरा आमच्या घरी सा॑गावा धाडा पाहू, "हल्ली आम्हाला समजुतदार गटात गणल॑ जाऊ लागल॑ आहे." च्यामारी हे वाचल॑ तर आमची म्हातारी धन्य धन्य होईल.- ना धड मिट्ट काळा, ना धड चिट्ट गोरा असा आगोचर त्रिश॑कूएकदम फिट्ट वर्णन! आयला ! आपण मला ओळखता की काय? ओ खर॑ सा॑गा ना..म्हणजे मला इथ॑ नीट वागायला नाहीतर तुमच्याशी मा॑डवली करायला बर॑. उगाच आमच॑ बि॑ग फुटायला नको. :))आपला- लाजलेला ना धड मिट्ट काळा, ना धड चिट्ट गोरा असा आगोचर त्रिश॑कू ध मा ल.

सृष्टीलावण्या's picture

26 Feb 2008 - 5:08 pm | सृष्टीलावण्या

आपण म्हणतां ते खरे की प्रांजळपणा हा कोणत्याही रंगाशी बांधील नाही पण मग देखणेपणा कुठल्याही रंगाशी बांधील कसा काय होऊ शकतो? 
माझ्या शिक्षिका म्हणत असत, "Beauty comes from within and not within a (Fairness Creme) tube". 
अर्थातच ह्या ओळी अनेक विषयाशी निगडित असतील पण मी त्याच्याशी संबंधित हा एक विषय निवडला. कारण मी स्वत: ऐकले आहे की तुम्हाला काय कळणार आम्हा काळ्या लोकांचे दु:ख... सगळ्यांना गोरीच बायको हवी असते, का आम्ही माणसे नाही काय? 
तेव्हापासून हा विषय माझ्या मनाला डाचत आहे... असो.
 
वधुवर निवडीच्या पलिकडे जाणारा आशय आपण लवकरच एका लेखाद्वारे आम्हा पामरांना समजावून सांगाल ही अपेक्षा. आतुरतेने आपल्या सारस्वताची वाट पाहणारी, 
आपली सखी, 
सृष्टीलावण्या.

आर्य's picture

26 Feb 2008 - 5:12 pm | आर्य

मी विसोबा खेचरांच्या मताशी १००% सहमत आहे.
'बालहट्ट' म्हणणे चूक ठरेल आणि  हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, (दलाली या शब्दा वर आक्षेप आसूशकेल....आपण याला शिफारस म्हणूया....पण तीही का करायची) 
मला ऐक कळत नाही, काळ्या रंगाच्या व्यक्तींनी न्युनगंड का बाळगावा.... आपल्या कडे ऐक ना अनेक चांगली ऊदाहरणे आहेतच की.....कृष्ण.....सावळा ग रामचंद्र.......(राम)..मेघवर्णम् शुभांगम्.......(विष्णु), मुषक वाहन, मोदक हस्त, श्यामल वर्ण, विलम्बित सुत्र...(गणपती)...इत्यादी
आणि देवलांनी तर सरळ सांगितलय - "सावळाच वर बरा गौर वधुला"  (संगीत शारदा)
शेवटी.....प्रत्येकाची आपली आपली आवड....
दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव ।तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम ॥
श्याम वर्ण (आर्य)

सृष्टीलावण्या's picture

26 Feb 2008 - 5:27 pm | सृष्टीलावण्या

बालिशपणाचा शारीरिक उंचीशी काही एक संबंध नसतो.. त्वचेचा वर्ण गोराच हवा हा बालिशपणाच होय... काही जणांची केवळ शारीरिक उंची वाढते पण त्या प्रमाणात बौद्धिक उंची वाढत नाही त्याचा हा परिणाम...
बाकी किती लोकांना देवल आणि त्यांची सुवचने माहित आहेत हा संशोधनाचाच विषय होईल कारण तसे असते तर आज जाहिरातींमध्ये लोकांनी "गोरा रंग" ही अपेक्षा व्यक्त केली नसती... 
मात्र तुमचे सुभाषित विषयानुरुप आणि व्याकरणदृष्ट्या योग्य आहे.

 सृष्टीलावण्यताई॑,
काळ्या लोकांना दु:ख करण्याचे कारण तरी काय? 
आणि शारीरिक उंचीचा मुद्दा अद्याप उपरोक्त उल्ले़खांकीत विषांयात आलेला नाही.  बालहट्ट  हा शब्द केवळ गोर्‍या र॑गाचा हट्ट या करीता आहे,  आणि त्यात ही आपण बौद्धिक उंची मोजून या विषयाला ऐक नविन "ऊंची "देऊ पह्त आहात. राहीला मुद्दा बालिशपणाचा - बालहट्ट आणि बालिशपणा यांत बराच फरक आहे....जो Childish childlike मध्ये आहे. "बालहट्ट, स्त्रिह्ट्ट, आणि राजहट्ट" हे प्रामुख्याने तिन प्रकारचे ह्ट्ट आहेत.
आपला
(ह्ट्टी आर्य)

सुधीर कांदळकर's picture

26 Feb 2008 - 9:49 pm | सुधीर कांदळकर

काळे दु:ख करतात? कोणी सांगितले? अजूनहि माझ्याकडे (४०-५० वर्षांच्या) तरुणी पहातात. कृष्ण सावळा होता. राम देखील सावळा होता. बोरिस बेकर काळुबाईच्याच प्रेमांत पडला. काळ्यांचीच ऐट असते राव. वर्ण आणि उमदेपणा या वेगळ्या गोष्टी आहेत. व्हिव्हिअन रिचर्डस् चा रुबाब पाहिला ना? तेव्हा तुमची मते बदला. आत्मविश्वास (किंबहुना गर्व) पाहिजे हे खरे.

सृष्टीलावण्या's picture

27 Feb 2008 - 7:39 am | सृष्टीलावण्या

> > काळ्या लोकांना दु:ख करण्याचे कारण तरी काय? 
दु:ख हा समजावण्याचा विषय नसून जाणून घ्यायचा विषय आहे (वेदना जाणावयाला जागवू संवेदना). 
संवेदना जागवा वेदना कळतील....
_______________________________
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे....
मी तुम्हाला एकवेळ समजावले तरी असते पण उजळ रंगामुळे मला स्वत:ला कधीच ह्या अनुभवांतून जावे लागले नाही त्यामुळे मी तुम्हाला काय सांगणार.... 
TDH (Tall, dark, handsome) विवाहेच्छुकाच्या शोधात असलेली... सृष्टीलावण्या

व्यंकट's picture

27 Feb 2008 - 10:42 am | व्यंकट

TDH (Tall, dark, handsome) विवाहेच्छुकाच्या शोधात असलेली... सृष्टीलावण्या
तथास्तू (हा आशीर्वाद नसून शुभकामना आहेत.)

चतुरंग's picture

27 Feb 2008 - 8:53 pm | चतुरंग

तुझी अवस्था 'कळा ज्या लागल्या जीवा' अशी झाली आहे.समजूत मी घालणार नाही कारण त्याचा फारसा उपयोग नसतो, ते ज्याचे त्यालाच सहावे लागते.
पण मी एक नक्की सांगू शकतो की अशा कळांमुळे तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस, तोच तुला तुझे इप्सित साध्य करुन देण्यास मदत करेल.
शुभेच्छा!
चतुरंग

व्यंकट's picture

26 Feb 2008 - 8:38 pm | व्यंकट

गोरी मुलगी नको असा माझा हट्ट होता, तो मी आता सोडतो. :)
 

विसोबा खेचर's picture

26 Feb 2008 - 8:44 pm | विसोबा खेचर

गोरी मुलगी नको असा माझा हट्ट होता, तो मी आता सोडतो. :)
हा हा हा! व्यंकट, तू म्हण्जे अगदीच मजेशीर आहेस बुवा! :)
आपला,(सावळा) तात्या.
 

मुक्तसुनीत's picture

26 Feb 2008 - 10:44 pm | मुक्तसुनीत

हजारो वर्षांपासून रंग, रूप या गोष्टीना सोशल ऍक्सेप्टन्स् चे (मराठी शब्द ?? सामाजिक मान्यता हा शब्द काहीसा अपुरा वाटतो)  मूल्य चिकटलेले आहे आणि ते अगदी भरभक्कम आहे.  अनेक शतकांपासून चालत आलेल्या या साचेबद्ध कल्पनाना तडा तेव्हाच बसेल , जेव्हा जास्तजास्त लोकाना  , "ब्युटी इज ओन्ली स्कीन्-डीप " या  इंग्रजी वाक्याचा अर्थ समजेल. देव या संकल्पनेबरोबरच सौंदर्य या कल्पनेचाही अर्थ प्रवाही बनत आहे. ज्याना हा प्रवाह समजला नाही त्यांचा , त्याबाबीपुरता विकास थांबला आहे असे समजायला हवे.

वर काही सदस्य म्हणतात की "गोरा/गोरी"च जोडीदार म्हणून आवडणे हे वैयक्तिक आहे. हे तर खरेच. पण या आवडणे-न आवडणे याची आकडेवारी आपल्याला समाजाच्या मानसाचा वेध करू देते. याला व्यापारी महत्त्वही आहे. असलेली कांती उठावदार दिसावी, अशा प्रकारची   मलमे, साबण, बहुधा विकता येणार नाहीत, अशा उत्पादकाचे समभाग विकत घेण्यात तोटा आहे. आहे त्यापेक्षा गोरी कांती  होण्यासाठी सौंदर्यप्रसाधने विकण्यात फायदा आहे, आणि अशा उत्पादकाचे समभाग विकत घेण्यात फायदा आहे. हा मुद्दा वैयक्तिक नाही. वर्णव्यवस्थेला "वर्ण"व्यवस्था हे नाव पूर्णपणे योगायोगाने नसावे. मुळात  अर्थ वेगळा असला तरीही आता, "अमुक-तमुक जातीतली गोरीघारी", वगैरे  बोलणे अधूनमधून ऐकू येते. तसे प्रत्येक जातीत गोरे/सावळे लोक दिसतात.  परंतु त्यातल्या त्यात ब्रह्मदेवाच्या डोक्यापासून ते पायांपर्यंतच्या* उतरंडीने  सरासरी (ऍव्हरेज) रंग सावळ्याकडे जातो, असे असावे. पुन्हा प्रत्येक जातीत गोरे, काळे व्यक्ती दिसतातच. पण कमी अधिक प्रमाणात.काही व्यापारी मुद्दे न्यायाच्या दृष्टीने विचारात येतात. समाजात अनेक  पुरुषांना त्यातल्या त्यात गोर्‍या स्त्रिया आवडत असतील, तर अधिक पैसे  मिळवणार्‍या नट्या गोर्‍या अधिक असतील, जे की कलाकारी कौशल्यावर  अवलंबणार नाही. अशा प्रकारे व्यक्तींची आवडनिवड समाजातल्या न्यायाशी  निगडित होऊ शकते. असो. माझ्या वैयक्तिक आवडीनिवडी वेगळ्या असल्याकारणाने मला ही चर्चा  सांख्यिकीच्या दृष्टीने, तटस्थपणे वाचता येते. तुमचे चालू द्या...*ही पुराणातली कथा आहे, माझे मत नव्हे. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने  मानवांचा वंश मुळात एकाच स्रोतातून आलेला आहे. एकेक जातीचे नाव  घेण्यापेक्षा त्या पौराणिक संदर्भाचा उपयोग केला.

आनंद घारे's picture

26 Feb 2008 - 11:10 pm | आनंद घारे

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, 
फक्त देखणा चेहराच प्रांजलाचा आरसा असू शकतो कां? सर्वसामान्य किंवा अगदी कुरूप व्यक्ती प्रांजल असूच शकत नाही कां?
सावळे की गोमटे या मोल नाही फारसे... 
मान्य आहे. गोर्‍या लोकांच्या जगात नाओमी कॅम्पबेलला सर्वाधिक मूल्य मिळत होते.

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, 
ह्याचा 'बाकीबाब' ना अपेक्षित अर्थ असा -
जे प्रांजळ आहेत तेच चेहरे देखणे आहेत - म्हणजे लौकिकार्थाने ते देखणे नसले तरी ते मला तसे भासतात कारण ते प्रांजळ आहेत! निसर्गाचे देणे माणूस त्याच्या प्रांजळपणाने आणि आंतरिक सौंदर्याने किती मोठे करतो त्यावर त्याची महत्ता ठरते, बाह्यरुपावर नाही!!
चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

26 Feb 2008 - 11:44 pm | प्रभाकर पेठकर

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे,  ह्याचा अर्थ ज्या ज्या चेहर्‍यांवरून त्या व्यक्तीच्या प्रांजळ स्वभावाचे नितळ दर्शन होते ते ते सर्व चेहरे 'देखणे' होत. (रंगाला महत्त्व नाही.)कुठल्याही व्यक्तीचे मुल्यमापन करताना त्या त्या व्यक्तीच्या प्रांजळपणाला, प्रामाणिकपणाला महत्त्व द्यावे. त्या व्यक्तीचे सौंदर्य, रंग ह्या गोष्टी दुय्यम आहेत.
हे आम्ही बोरकर न वाचताच (अनुभवातून) अंगिकारलेले तत्त्व आहे. आणि आमच्या मुलाच्या मनात तसेच कधी प्रसंग पडल्यास सर्व उपस्थितांच्या मनात हेच ठसविण्याचा प्रयत्न करतो. 
वरील वचनात, काळे-गोरे असा भेदभाव नसून प्रामाणिक आणि अप्रामाणिक, सच्चे आणि खोटारडे असा भेद केलेला आहे.
सामाजिक स्वास्थाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास बोरकरांच्या काव्यपंक्तितील भावार्थाचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार प्रत्येकाने केला पाहिजे.

प्राजु's picture

27 Feb 2008 - 12:17 am | प्राजु

तात्यांशी सहमत आहे मी. आपला जोडिदार कसा असावा आणि कसा असू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
आणि माझ्या बघण्यात तरी, बाकी लाख गुण चांगले असताना केवळ मुलगा/मुलगी  काळा/काळी आहे म्हणून त्यांचे लग्न ठरत नाही असे आलेले नाही. निसर्गाने जे दिले आहे त्याचा सन्मान करावा जे दिले नाही ते का नाही म्हणून रडत बसण्यात काय अर्थ आहे?
आणि प्रभाकर पंतांच्या म्हणण्याप्रमाणे..  वरील वचनात, काळे-गोरे असा भेदभाव नसून प्रामाणिक आणि अप्रामाणिक, सच्चे आणि खोटारडे असा भेद केलेला आहे. .. हेच खरे. नाहीतर सृष्टी ताई, माझ्या "मिपा- कुरण" या कवितेच्या प्रतिसादात आपण मला "प्रांजळा" म्हंटल्याचे आठवते. आपण मला न पाहता केवळ लेखना वरून "प्रांजळा" म्हंटलेत, पण जर मला पाहिले असते तर मी काळी नाही म्हणून मी प्रांजळा नाही असे तुमचे मत झाले असते का?
- (सर्वव्यापी)प्राजु

सृष्टीलावण्या's picture

27 Feb 2008 - 6:54 am | सृष्टीलावण्या

अहो, प्रांजळपणा आणि रंग यांचा काहीएक संबंध नसून प्रांजळपणा आणि देखणेपणा यांचा थेट संबंध आहे आणि प्रांजळपणा ही प्रवृत्ती आहे जी मनाच्या निरागसतेतून येते. 

विसोबा खेचर's picture

27 Feb 2008 - 7:15 am | विसोबा खेचर

मग यात काळ्या-गोर्‍याचा प्रश्न आलाच कुठे जो आपण मूळ चर्चेत उपस्थित केला आहे?
तात्या.

सृष्टीलावण्या's picture

27 Feb 2008 - 7:24 am | सृष्टीलावण्या

काळे -गोरे हा संबंध लोक देखणेपणाशी लावतात पण कविला म्हणायचे आहे की तेच चेहरे देखणे जे मनाने प्रांजळ असतात. म्हणून माझे म्हणणे असे की वधुवर निवडीत त्वचेच्या ऐवजी मनाचे सौंदर्य पहा.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2008 - 7:38 am | विसोबा खेचर

गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का? 
हे आपल्याच चर्चाप्रस्तावातील वाक्य आहे ना?
यात आपण 'त्वचेऐवजी मनाचे सौंदर्य पाहा' असं कुठे म्हटलं आहे?
आणि आपल्याला 'त्वचेऐवजी मनाचे सौंदर्य पाहा' असंच जर म्हणायचं असतं तर आपण,
गोरी (किंवा काळी) बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का? 
असं म्हणायलं हवं होतं असं वाटतं!
परंतु आपला प्रस्ताव केवळ सावळ्या किंवा कृष्णवर्णी मंडळींकरताच धार्जिणा आहे असं एकंदरीत वाटतं! गोरीपान माणसं मनानं प्रांजळ किंवा सुंदर नसतात(च) हे आपल्याला कुणी सांगितलं?
आणि तसं नसेल तर वधुवर निवडीकरता केवळ काळ्यासावळ्यांच विचार करा, नव्हे तर तस प्रचारही करा असं आपण का बरं म्हटलं आहे?
तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Feb 2008 - 4:18 am | llपुण्याचे पेशवेll

मला तर गोर्‍या आणि काळ्या,सावळ्या,गव्हाळ(म्हणजे नक्की काय माहीत नाही पण आमची आई म्हणते 'अमकी अमकी गव्हाळ वर्णाची अहे') सगळ्याच वर्णाच्या मुली आवडतात.
एखादी काळीसावळी आणि पाणीदार डोळे असलेली मुलगी पण मनाला भावते किंवा गोरी घारी पण तितकीच मनाला भावते.
:) :)
 
पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2008 - 7:19 am | पिवळा डांबिस

एखादी काळीसावळी आणि पाणीदार डोळे असलेली मुलगी पण मनाला भावते किंवा गोरी घारी पण तितकीच मनाला भावते.
याला म्हणतात रसिक (किंवा वासू!) :)) ह. घ्या.
अहो जोंधळ्याची सफेद भाकरी आणि बाजरीची काळसर भाकरी दोन्ही आवडू शकतात की!  गूळ तुपाबरोबर जोंधळ्याची भाकरी आणि मिरचीच्या ठेच्याबरोबर शाळूची भाकरी!  आता आपल्याला आयुष्यात गूळ-तूप खायचं की मिरचीचा ठेचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं!!! :)))
 

विसोबा खेचर's picture

27 Feb 2008 - 7:28 am | विसोबा खेचर

डांबिसा, सुंदर प्रतिसाद रे..
एखादी काळीसावळी आणि पाणीदार डोळे असलेली मुलगी पण मनाला भावते किंवा गोरी घारी पण तितकीच मनाला भावते.
मिराशीबुवांशीही सहमत..
आम्ही कुणाच्याच बाबतीत वर्णाचा भेदभाव करत नाही.
मुलींच्या बाबतीत तर नाहीच नाही! मनात भरल्याशी कारण! :)
आपला,(बाईबाटलीतला) तात्या.

आर्य's picture

27 Feb 2008 - 9:56 am | आर्य

"मुलींच्या बाबतीत तर नाहीच नाही! मनात भरल्याशी कारण! " - हे  मात्र पटलं आपल्याल.
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे या मोल नाही फारसे
आपण विवाहित असल्यास इतरांना हा बालहट्ट  सोडायला प्रवृत्त करणार का? -  ह्यामुद्दया पासुन आपण जरा लांब गेलोय आसं वाटतयं
(श्याम वर्ण) आर्य

एक's picture

27 Feb 2008 - 11:08 am | एक

ब्युटी लाइज इन दी आईज ऑफ बियरहोल्डर.
ज्यांना ज्यांना स्व:ताच्या रुपाबद्द्ल कॉम्प्लेक्स आहे त्यांनी पुढच्या "कांदेपोहे" प्रोग्रॅमला "बियर आणि विंग्ज" ठेवावेत. हि नम्र विनंती..
(ह्.घ्या.) किंवा हा. (हायनेकिन) घ्या.
 

विजुभाऊ's picture

27 Feb 2008 - 12:45 pm | विजुभाऊ

आयुष्यात गूळ-तूप खायचं की मिरचीचा ठेचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं!!! :)))   मस्त....
People who say " beauty is not just skin dip".............
Do u often say " oh what a beautiful pancrea she has got....."after seeeing a good looking फटाकडी girl........?

आयुष्यात गूळ-तूप खायचं की मिरचीचा ठेचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं!!! :)))  
मला वाटते त्यात्या ने साइट चे नाव त्यासाठीच "मिसळ्पाव "ठेवले असावे....त्यात मिर्ची,चिन्च ,गुळ हे सगळेच असते :)

धोंडोपंत's picture

27 Feb 2008 - 1:35 pm | धोंडोपंत

आम्हाला स्त्रियांच्या गोरेपणाचे आणि घारेपणाचे आत्यंतिक आकर्षण आहे.  यात कुणाला दुखावण्याचा उद्देश वगैरे नाही. पण आम्ही आमची मते बाळगतो.आपला,(चिकित्सक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आनंद घारे's picture

27 Feb 2008 - 2:27 pm | आनंद घारे

प्रांजणपणाने येते वगैरे कविवर्यांना दिसत असेल कारण 'जे न देखे रवी ते सुद्धा देखे कवी'. पण आम्हा पामरांना साध्या चर्मचक्षूंनी बाह्य रूप सुद्धा नीट दिसत नाही, त्यासाठी चष्मा लावावा लागतो. मग अंतरीचा देखणेपणा कसा आणि केंव्हा पाहणार?
अलीकडे टीव्हीवर दा़खवण्यात येत असलेल्या मालिकांमध्ये तर सगळ्या खलनायिका एकीहून एक देखण्या दिसतात. त्यांच्यातला दुष्टावा बाहेर निघेपर्यंत त्यांचे अनेक भाग झालेले असतात.
 

धमाल मुलगा's picture

27 Feb 2008 - 2:36 pm | धमाल मुलगा

....खलनायिका एकीहून एक देखण्या दिसतात. त्यांच्यातला दुष्टावा बाहेर निघेपर्यंत त्यांचे अनेक भाग झालेले असतात.ऑss?? अनेक भाग? खलनायिका॑चे? :p-वात्रट ध मा ल.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2008 - 2:36 pm | विसोबा खेचर

अलीकडे टीव्हीवर दा़खवण्यात येत असलेल्या मालिकांमध्ये तर सगळ्या खलनायिका एकीहून एक देखण्या दिसतात. त्यांच्यातला दुष्टावा बाहेर निघेपर्यंत त्यांचे अनेक भाग झालेले असतात.
हा हा हा! :)

राजमुद्रा's picture

27 Feb 2008 - 3:02 pm | राजमुद्रा

हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अहो काळ्या मुली जश्या जगात आहेत तशीच काळी मुले सुध्दा आहेतच की. आपण का काळजी करतोय त्याच्या लग्नाची. माझं प्रामाणिक मत आहे, आपल्याला शोभणार्‍या व्यक्तीशी लग्न करावं. आपण स्वतः काळे आणि जोडीदार मात्र गोरा असं केलं तर जोडिदारापूढे आपण जास्तच काळे दिसतो. म्हणून शेवटपर्यंत सुखात(दिसण्याच्या बाबतीत न भांडता) राहायच असेल तर स्वतःला साजेसा जोडीदार निवडावा. स्वतः काळे असाल तर गोर्‍याचा हव्यास धरू नये आणि स्वतः गोरे असाल तर काळ्याचा हव्यास धरू नये.
राजमुद्रा :)

विसोबा खेचर's picture

27 Feb 2008 - 4:42 pm | विसोबा खेचर

स्वतःला साजेसा जोडीदार निवडावा. स्वतः काळे असाल तर गोर्‍याचा हव्यास धरू नये आणि स्वतः गोरे असाल तर काळ्याचा हव्यास धरू नये.
सहमत आहे..
तात्या.

प्राजु's picture

27 Feb 2008 - 8:38 pm | प्राजु

स्वतःला साजेसा जोडिदारच निवडावा....उगाच लोकांनी म्हणायला नको नंतर "माकडाच्या गळ्यात मोत्यांची माळ!" :))
- (सर्वव्यापी)प्राजु

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Feb 2008 - 9:13 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो कशाला लोकांचे ऐका??? लोक काय पोसणार आहेत आपल्याला लग्नानंतर ?
आपल्या जोडीदाराच्या दिसण्याचा आणि असण्याचा एकदा नव्हे दहादा विचार करावा आणि घालावी ती बेडी बिनधास्त.. शेवटी लग्नानंतर जो स्वतःला 'ऍडजस्ट' करू शकतो तो यशस्वी होतो असे म्हणतात. मग एखादी मोत्याची माळ माकडाच्या गळ्यात ऍडजस्ट झाली तर बोंबलू द्यावे लोकांना ..शेवटी नशिबवान माकडावर दुनिया जळणारच ना!
पुण्याचे पेशवे