हे असे का?

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
16 Sep 2009 - 9:47 pm
गाभा: 

काही दिवसांपुर्वी एका रेडीओ स्टेशनवर एक नाटीका चालू होती ती ऐकत होतो.

सर्व पात्रे स्त्रीया होत्या व मुख्य पात्राला (समाज सेविकेच्या भूमिकेत) एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेली सापडते. ती त्या खेड्यातल्या स्त्रीयांशी बोलत असते.

मुख्य पात्र: (अशा आशयाचे विधान होते)- "मला एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेल्या अवस्थेत सापडली आहे. पहा किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे, तिला पदरात घ्यायला आहे का तुमच्यापैकी तयार?"

त्यातील "किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे" ह्या संदर्भाने मी संतापलो. ती बालिका कोणीतरी पदरात घ्यावी ह्यासाठी तिचे वर्णन जसे केले जात होते जणू काही, एखादीला कणव यायचीच असती तर ती अशा वर्णनाशिवाय आली नसती का?

जे आज जाहिरातीतून, हिंदी-मराठी गाणी, इतर माध्यमातून सारखे बिंबवले जाते तेच एका नाटीकेतूनही बिंबवले जात होते. काळ्या/सावळ्या रंगाच्या व्यक्तिंच्या मनावर ह्याचा जो परिणाम सतत होत असेल त्याचा काहीही विचार ह्यात केला जात नाही.

साबणाच्या जाहिरातीतून, क्रिम, ई सौदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीतून हेच सतत समोर येत असते- काळे आहात ना, मग गोरे व्हा! आमचे हे साबण वापरा- हे बघा त्यात कोरफड टाकलीये, गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, पपई टाकलीये, लिंबाचा रस आहे, दुध आहे, (हळुहळू फणसापर्यंत पोहोचतील)!

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

17 Sep 2009 - 2:06 am | पाषाणभेद

आपले म्हणणे योग्य आहे, पण लहान मुल शक्यतो गोरे, गोंडस असते. नाटकात, सिनेमात असे गोरे मुल, नायक, नायिकाच दाखवतात.
रेडीओवर आपण बघू न शकत असल्याने असे संवाद येवू शकतात. तेथे पाणी पिण्याचा आवाज, दरवाजा उघडल्याचा आवाज इ. 'येत' असतात. रेडिओच्या नाटिकांत तर मोबाईल रिंगटोनच्या जमान्यात त्यांचा टेलीफोन अजूनही 'ट्रिंग..ट्रिंग.. ' असाच वाजतो. असो.

राहता राहिला गोरा रंग. नितळ काळ्या रंगाच्या व्यक्तिपण छानच दिसतात. जाहिराती, सिनेमेवाल्यांना धंदा करायचा असल्याने ते गोर्‍या रंगावरच भर देतात. समाजात मात्र हेच योग्य आहे असे समजले जाते ते अयोग्य आहे.

कधीकधी गोरा वर्ण म्हणजे हिमोग्लोबीनची कमतरताही असू शकते.
लग्नाळूंनी याची काळजी घ्यावी.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

अमृतांजन's picture

17 Sep 2009 - 5:39 am | अमृतांजन

"समाजात मात्र हेच योग्य आहे असे समजले जाते ते अयोग्य आहे"- पाषाणभेदा, धन्यु- तुमच्या सहमतीबद्दल.

Beauty is in the eye of the beholder!

Nile's picture

17 Sep 2009 - 3:09 am | Nile

काही दिवसांपुर्वी एका रेडीओ स्टेशनवर एक नाटीका चालू होती ती ऐकत होतो.

नको ते धंदे करायला सांगितलंय कुणी तुम्हाला?

अमृतांजन's picture

17 Sep 2009 - 4:54 am | अमृतांजन

नको ते धंदे करायला सांगितलंय कुणी तुम्हाला?

खूपच चांगला प्रश्न आहे. त्याला उत्तरही आहे. पण ते वरील मुळ मुद्द्याला धरुन नाही व त्यामुळे विषयाला फाटे फुटतील.

नि३'s picture

17 Sep 2009 - 5:32 am | नि३

खुप मोठा प्रश्न विचारला राव...
गोर्यांना मह्त्व जास्त का?? वारंवार अशे केल्याने काळ्या लोंकाच्या मनावर काय परीणाम होतो...
खुप मोठा प्रश्न आहे हा.......

हे जगच बनावटी च आहे रे मित्रा ...फसव आहे....बेगडी आहे..
असो लिहण्यासारखे भरपुर आहे पण सध्या ईथेच थांबतो..
माझ्या आतापर्यंतच्या अनुभव आहे कि,

There are only three thing matters in this world..

1> Money
2> Sex
3> outward apperiance

Think for a while on this you will mostly agree with me

---नि३.

अवलिया's picture

17 Sep 2009 - 9:37 am | अवलिया

"मला एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेल्या अवस्थेत सापडली आहे. पहा किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे, तिला पदरात घ्यायला आहे का तुमच्यापैकी तयार?"

कुणा गो-या माणसाचे पाप असावे म्हणुन ती गोरी असावी. बाकी गो-या माणसांना तो कसाही असला तरी सुंदर म्हटलेच पाहीजे असा प्रघात आहे.

(काळाकुळकुळीत) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Sep 2009 - 10:11 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे.
(काळाबेंद्रा)पावलिया

माझ्या एका मित्राचे एका काळ्यासावळ्या मुलीवर प्रेम होते. तशी दोघांच्याही घरची परिस्थिती चांगली होती. त्याला कोणी विचारले "कशी काय काळी मुलगी पसंत केलीस रे?" , तर तो उत्तर देई " फक्त रंगाकडे काय बघता लेकानो बाकीच्या गोष्टी (?) पण बघा की. तसाही रंग काही अंगाला लागत नाही". उत्तर पटले मला ते. :)
-(रंगीबिरंगी)
पेशवे

अमृतांजन's picture

17 Sep 2009 - 10:43 am | अमृतांजन

कुणा गो-या माणसाचे पाप असावे म्हणुन ती गोरी असावी

असेलही. पण त्यात तुम्ही गृहीत धरताय की, पाप म्हणजे ते "माणसाचेच" आणि ते ही "गोर्या".

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2009 - 11:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

असेलही. पण त्यात तुम्ही गृहीत धरताय की, पाप म्हणजे ते "माणसाचेच" आणि ते ही "गोर्या".

माणसाचंच असणार ना, कुत्र्या-मांजरांमधे अजून पाप-पुण्याच्या संकल्पना नाहीत.

(ना गोरी, ना काळी - भारतीय) अदिती

पर्नल नेने मराठे's picture

17 Sep 2009 - 11:34 am | पर्नल नेने मराठे

बाकी गो-या माणसांना तो कसाही असला तरी सुंदर म्हटलेच पाहीजे असा प्रघात आहे.

;) आहेच मुळी

(गोरिपान) चुचु

चतुरंग's picture

17 Sep 2009 - 11:52 am | चतुरंग

गोर्‍या माणसांना कसाही असला तरी सुंदर म्हणावं असा प्रघात नाहीये.
असा अनाठायी आरोप करुन तुम्ही गोर्‍या लोकांच्या तोंडाला काळं का म्हणून फासताय? :? ;)

(गोरागुळगुळीत)चतुरंग

अवलिया's picture

17 Sep 2009 - 11:54 am | अवलिया

आता आम्ही काळे जर फासलेच आहे तर तुम्ही "गोरे" राहिलेच नाही.. "काळे " झाले.. त्यामुळे तुम्ही आता आमच्या पार्टीत... ;)

(घोडे खरेदीदार) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

चिरोटा's picture

17 Sep 2009 - 10:08 am | चिरोटा

अशा जाहिरातींतून आपल्या समाजातील लोकांची मानसिकता दिसते.वधु वर जाहिरातींमध्ये 'सावळी वधु/वरास प्राधान्य' असे वाचलय कधी?दिल्ली सारख्या शहरांमध्ये नायजेरियन्/आफ्रिकन लोकांना racism ला तोंड द्यावे लागते.मुंबईत मी लोकलमध्येही हा प्रकार पाहिला आहे. पण युरोपियन्/गोरी माणसे दिसली की 'मी ह्यांचासारखा का नाही?' हे भाव लोकांच्या चेहर्‍यावर दिसतात.पारंपारिकद्रुष्ट्या आपला समाज racist आहेच.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अमृतांजन's picture

17 Sep 2009 - 10:41 am | अमृतांजन

पारंपारिकद्रुष्ट्या आपला समाज racist आहेच

एक फार मोठे सत्य तुम्ही मांडल्याबद्दल धन्यु.

एकदा नेहरु स्टेडीयमवर क्रिकेटच्या म्याचला गेलो असतांना आलेला हा अनुभव- मुंबईच्या एका प्रसिद्ध खेळाडूला लोकांनी "ए काळ्या" अशा हाका मारुन बेजार केले होते.

छोटा डॉन's picture

17 Sep 2009 - 10:45 am | छोटा डॉन

गल्लत होते आहे साहेब,

त्याला "काळ्या" नव्हे तर "मंकी" म्हणुन चिडवल्याचे आठवते, निदान ऑफिशियल नोंद तरी तशीच आहे.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

JAGOMOHANPYARE's picture

17 Sep 2009 - 10:47 am | JAGOMOHANPYARE

यात गैर काय आहे? अनाथाश्रमाच्या त्या बाईला त्या मुलीला पालक मिळवायचे होते, म्हणून ती तसे म्हणाली..... जर मुलगी सावळी असती तेन्हाही ती म्ह्णाली असती... पहा सावली असली तरी तिचे डोळे किती सुन्दर आहेत...... यात रेसिजम वगैरे काही नाही.......निव्वळ जाहीरात कौशल्याचा भाग....... आणि चार काळ्याना वाईट वाटते, म्हणून सगळ्या दुनियेनं सार्वजनिक ठिकाणी पान्ढर्‍याला चान्गलं म्हणायचं सोडायचं का ?

अमृतांजन's picture

17 Sep 2009 - 10:51 am | अमृतांजन

म्हणून सगळ्या दुनियेनं सार्वजनिक ठिकाणी पान्ढर्‍याला चान्गलं म्हणायचं सोडायचं का ?

अजिबात सोडू नये. तेच काळ्याच्या बाबतीतही करावे.