Empathy ला मराठी पर्यायी शब्द

शिशिर's picture
शिशिर in काथ्याकूट
16 Sep 2009 - 8:02 pm
गाभा: 

मला Empathy ह्या इंग्रजी शब्दा ला मरठी पर्यायी शब्द हवा आहे.
इंग्रजी डिक्शनरी मधील अर्थ खालील प्रमाणे आहे.....
(१) The projection of one's own personality into the personality of another in order to understand the person better; ability to share in another's emotions, thoughts, or feelings .

(२) the projection of one's own personality into an object, with the attribution to the object of one's own emotions, responses, etc.

इंग्रजी मराठी online Dictionary मध्ये ह्याच अर्थ "कल्पनेने दुसर्‍याचा अंतरंगात शिरुन त्याचा भावना जाणून घेण्याची कुवत.
असा" आहे.

इंग्रजी हिन्दी online Dictionary मध्ये ह्याच अर्थ "समानुभूती "असा आहे. मराठीत हा अर्थ चालेल काय? दुसरा मराठीत किंवा संस्कृत मधील शब्द कुठला?

मि. पा. वरील सदस्य मदत करु शकतील काय?

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

16 Sep 2009 - 8:06 pm | श्रावण मोडक

परानुभूती असा एक शब्द वापरलेला वाचण्यात आल्याचे आठवते.

धनंजय's picture

16 Sep 2009 - 10:07 pm | धनंजय

"सहानुभूती" शब्दापेक्षा थोडा वेगळा अर्थ मिळतो - तेच हवे होते.

मिसळभोक्ता's picture

16 Sep 2009 - 10:41 pm | मिसळभोक्ता

एम्पाथीचा अर्थ इतरांच्या खरडवह्या चाळणे ?

-- मिसळभोक्ता

श्रावण मोडक's picture

16 Sep 2009 - 10:49 pm | श्रावण मोडक

हाहाहाहाहाहा...
वेल, नुसतंच खरडवह्या कशाला?

the projection of one's own personality into an object, with the attribution to the object of one's own emotions, responses, etc.

हा अर्थ पाहिला तर अशी अनेक आंतरजालीय प्रोजेक्शन्स डोळ्यांसमोर नाचली होती (संदर्भ प्रख्यात आहेत). त्यावेळी मात्र 'परा'नुभूती परवडली असं म्हणायची वेळ येतेच.

मिसळभोक्ता's picture

16 Sep 2009 - 11:03 pm | मिसळभोक्ता

हा अर्थ पाहिला तर अशी अनेक आंतरजालीय प्रोजेक्शन्स डोळ्यांसमोर नाचली होती (संदर्भ प्रख्यात आहेत).

मेलो! मेलो !!!

-- मिसळभोक्ता

विसोबा खेचर's picture

17 Sep 2009 - 11:56 pm | विसोबा खेचर

एम्पाथीचा अर्थ इतरांच्या खरडवह्या चाळणे ?

हा भिकार** मिसळभोक्ता जन्मात कधी सुधारायचा नाय! :)

तात्या.

सर्वाधिकार वापरून शिवी वापरली आहे, संपादकांनी कृपया ढवळाढवळ करू नये ही विनंती! :)

तात्या.

संपादनाचे अधिकार वापरुन शिवी संपादित केली आहे, मालकांनी कृपया संपादकांच्या कामात ढवळाढवळ करु नये ही विनंती! :)

संपादक

तत्सत's picture

17 Sep 2009 - 10:09 am | तत्सत

सहभावना?

mahalkshmi's picture

16 Sep 2009 - 9:05 pm | mahalkshmi

महालक्श्मी
http://spokensanskrit.de/index.php?script=HK&tinput=empathy&country_ID=&...

येथे पहा.

http://www.websters-online-dictionary.org/definition/empathy

हे पण पहा.
मराठीत पण 'करुणा' हा शब्द वापरला जातो.

पिवळा डांबिस's picture

16 Sep 2009 - 10:36 pm | पिवळा डांबिस

सॉरी!
वुई आर मराठी!!!
वुई आर नॉट फॅमिलियर विथ दॅट इमोशन!!!!

(बॅकग्राउंडला: राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा....)
:)
ह. घ्या...

विकास's picture

17 Sep 2009 - 5:33 pm | विकास

एकदम बरोब्बर!

प्रदीप's picture

17 Sep 2009 - 7:11 pm | प्रदीप

वुई आर मराठी!!!
वुई आर नॉट फॅमिलियर विथ दॅट इमोशन!!!!

अगदी असेच मी म्हणत होतो!!

JAGOMOHANPYARE's picture

17 Sep 2009 - 9:40 am | JAGOMOHANPYARE

सिम्पथी - सहानुभूती
एम्पथी - सह अनुभूती

हा शब्द डॉ. राजेन्द्र बर्वे यान्च्या काही लेखांमध्ये आणि पुस्तकांमध्ये आहे....... त्याला उदाहरण त्यानी कृष्ण- अर्जुनाचे दिले आहे... कृष्णाने अर्जुनाची अवस्था सह अनुभूतीने समजावून घेतली. त्यात पोकळ सहानुभूती नव्हती... म्हणून अर्जुनाचे नेमके अन्तरन्ग तो जाणू शकला...

सुकामेवा's picture

17 Sep 2009 - 4:26 pm | सुकामेवा

lift देणे याला शब्द हवा आहे.

चिंतामणराव's picture

17 Sep 2009 - 7:22 pm | चिंतामणराव

अनुकंपा कसा वाटतो?