बिटाच्या वड्या

रेवती's picture
रेवती in पाककृती
16 Sep 2009 - 7:12 am

साहित्य: लालबुंद बीटरूट्स, होल मिल्क, साखर, वेलदोड्यांची पूड.

कृती: बीटरूट्सची साले काढून ती किसणीवर बारीक किसून घ्यावीत.
जड बुडाच्या कढईत कीस वाटीने मोजून घ्यावा. जेवढा कीस त्याच्या अर्धे माप साखर व किसाच्या मापाएवढेच दूध घ्यावे.
एकत्र करून मध्यम आचेवर शिजण्यास ठेवावे. मधून मधून उलथण्याने हलवत रहावे. तळाला लागता कामा नये.
मिश्रण शिजून कढईचा तळ स्वच्छ दिसू लागेल, दूध आटून स्निग्धांश बाहेर आल्याने ते चकचकीतही दिसू लागेल.
त्यात वेलदोडापूड घालावी. पाव चमचा मिश्रण ताटलीत काढून घ्यावे. अर्ध्या मिनिटात त्याची गोळी वळता आली पाहिजे.
तसे झाल्यास ट्रे ला तुपाचा पुसट हात लावून हे मिश्रण सारखे पसरावे व लगेच वड्या पाडाव्यात.
थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.

*आठ मध्यम आकाराच्या बीटरूट्सच्या साधारण ४० वड्या होतात.
*किसताना बिटाची चव बघावी; किंचित गोडसर असल्यास साखर थोडी कमी घातली तरी चालते.
*दुधाऐवजी क्रीम वापरल्यास आटवण्याचा वेळ वाचतो.

रेवती

प्रतिक्रिया

सहज's picture

16 Sep 2009 - 7:33 am | सहज

बीटाचा हलवा /शिरा/वड्या/उत्तपे.... आता घाउक मधे बीट घ्यायला हरकत नाही. :-)

चित्रा's picture

16 Sep 2009 - 8:04 am | चित्रा

छान आहे.

आणि मी आतापर्यंत केवळ बिटाची कोशिंबीर करत होते - दही + साखर + कांदा घालून. आता बराच स्कोप आहे असे दिसते.

धन्यवाद.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Sep 2009 - 2:06 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मी पण बिटाची कोशिंबीर करते.कटलेटमध्येही घालते.पण गोड पदार्थ नव्हता केला कधी.आता करुन पाहीन्.वड्या फारच छान दिसताहेत.

लवंगी's picture

16 Sep 2009 - 8:08 am | लवंगी

छान दिसतोय

चकली's picture

16 Sep 2009 - 8:09 am | चकली

क्लास दिसतायत वड्या..

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

16 Sep 2009 - 8:29 am | प्राजु

सॉल्लीड रंग आला आहे.
एकदम भन्नाट!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

16 Sep 2009 - 8:51 am | दिपाली पाटिल

सुंदर दिसताहेत वड्या..पण बीटाची मळकट चव नाही लागत कां या वड्यांना??

दिपाली :)

दशानन's picture

16 Sep 2009 - 8:56 am | दशानन

बिटाच्या वड्यापण तयार करतात माहीत नव्हतं बॉ... आम्हाला तर सलाद मधील एक आयटम म्हणजे बिट येवढंच माहीत होतं..... :)

* ह्म्म्म परत किचन मध्ये डोकावून पहावे असे वाटत आहे.. पापकृती सोपी आहे.. नै :D

निमीत्त मात्र's picture

16 Sep 2009 - 10:10 am | निमीत्त मात्र

बिटाच्या वड्यापण तयार करतात माहीत नव्हतं बॉ.

मग तुम्हाला काय वाटलं बिटाच्या 'विड्या'?? म्हणूनच हा धागा पाहायला आलात की काय? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2009 - 10:13 am | बिपिन कार्यकर्ते

* ह्म्म्म परत किचन मध्ये डोकावून पहावे असे वाटत आहे.. पापकृती सोपी आहे.. नै

ओये राजे, पापकृती नाही हो... पाककृती!!!!!!!! तसंही तुम्ही किचनमधे जाऊ जो राडा घालणार ती पापकृतीच होईल बहुधा... ;)

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

16 Sep 2009 - 10:33 am | अवलिया

आणि जे काही तयार होईल त्याला "माती" म्हणावे की काय असा विचार मनात येवुन गेला.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गणपा's picture

16 Sep 2009 - 1:22 pm | गणपा

असेच म्हणतो, आज वर बीट केवळ सलाड आणि गाडीवर मिळणार्‍या सँडवीच मध्ये खाल्लय. बीटाच हा नवा अवतार लै आवडला.

-गण्या.

अवलिया's picture

16 Sep 2009 - 9:22 am | अवलिया

वा ! मस्त !!!
एकदम भन्नाट!

:)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसोबा खेचर's picture

16 Sep 2009 - 10:06 am | विसोबा खेचर

सुरेख फोटू...

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2009 - 10:15 am | बिपिन कार्यकर्ते

(अरे नीलकांत, एखादी लांऽऽऽब श्वास सोडण्याची स्मायली असली तर कर बाबा उपलब्ध)

बिपिन कार्यकर्ते

सुबक ठेंगणी's picture

16 Sep 2009 - 11:47 am | सुबक ठेंगणी

off-beet रेसिपी :)

नंदन's picture

16 Sep 2009 - 12:19 pm | नंदन

मी अनबीटेबल पाकृ असं लिहायला आलो होतो :).
पाककृती झकासच!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

16 Sep 2009 - 8:37 pm | चतुरंग

अगदी ऑफबीट पाकृ आहे.
आणि हो, वड्या मस्तच लागतात, मला विचारा ना! ;)

(टेस्टर)चतुरंग

दशानन's picture

16 Sep 2009 - 8:40 pm | दशानन

टेस्टर की गिनीपीग =))

संदीप चित्रे's picture

17 Sep 2009 - 2:31 am | संदीप चित्रे

न खाऊन तो सांगतोय कुणाला ;)
-----
च्यायला बीटाच्या वड्याही करतात माहिती नव्हतं रेवती.
वड्या दिसतायत मस्त पण असे टेम्प्टिंग दार्थ खाल्याशिवाय आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही :)

रेवती's picture

17 Sep 2009 - 3:30 am | रेवती

कधीही घेउन ये सगळ्यांना. वड्यांची चव घेउन प्रतिक्रिया दे म्हणजे झालं! :)

रेवती

शाल्मली's picture

16 Sep 2009 - 12:20 pm | शाल्मली

व्वा!
मस्त दिसताहेत बिटाच्या वड्या!

माझी आई करते नेहमी बिटाच्या वड्या. थोड्या वेगळ्या पद्धतीने-त्यात नारळ, खवा वगैरे घालते. त्याही फार मस्त लागतात.
त्या लाल वड्यांवर काजूची अर्धी पाकळी लावली की त्या अजूनच छान दिसतात. :)

ह्या सोप्या वाटताहेत करायला. करुन बघीन..

--शाल्मली.

प्रभाकर पेठकर's picture

16 Sep 2009 - 12:27 pm | प्रभाकर पेठकर

साखर वर्ज्य आहे. फोटोवरच समाधान मानून आहे.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

रेवती's picture

17 Sep 2009 - 3:34 am | रेवती

आपण फारच संयमित प्रतिक्रिया दिलीत.
माझ्या वडिलांनाही गोड वर्ज्य असल्याने त्यांना वाईट वाटले त्यांनी वड्यांना 'बिटाच्या विटा' असे नाव दिले आहे.

रेवती

सचीन जी's picture

16 Sep 2009 - 1:39 pm | सचीन जी

>> बिटाच्या वड्या

हम्म्म! मी गडबडीत 'बिटाच्या विड्या ' असं वाचलं!
म्हणलं भलताच भन्नाट प्रकार दिसतोय!
पुर्ण वाचल्यावर खुलासा झाला!
छान दिसत आहेत! लागतात कश्या ......

सचीन जी!

स्मिता श्रीपाद's picture

16 Sep 2009 - 1:45 pm | स्मिता श्रीपाद

खुप सुंदर गं...
फार मस्त दिसत आहेत्.. नक्की करुन पाहीन...

स्वाती राजेश's picture

16 Sep 2009 - 2:04 pm | स्वाती राजेश

रंग मस्त आला आहे वड्यांना...
रेसिपी छान आणि सोपी आहे...
करून पाहायला पाहीजे...

मदनबाण's picture

16 Sep 2009 - 2:17 pm | मदनबाण

व्वा... भारी प्रकार दिसतोय !!! :)
बिटाच्या वड्या सुद्धा होऊ शकतात असा कधी विचार सुद्धा मनात आला नव्हता. एक वेगळीच पाकृ वाचायला मिळाली. :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

http://www.timesnow.tv/videoshow/4327416.cms

समंजस's picture

16 Sep 2009 - 2:18 pm | समंजस

वडया सुंदर दिसत आहेत!!!
वडया, कुठल्याही का असेनात, मला प्रिय आहेत :)

एका नवीन वडी ची पाकृ दिल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद!!

रेवती's picture

16 Sep 2009 - 7:50 pm | रेवती

धन्यवाद मंडळी!
काही दिवसांपूर्वी बिटाच्या पाकृ मिपावर आल्याने मलाही वड्यांची पाकृ द्यावीशी वाटली. वड्या चवीला मस्तच लागतात. बिटाची स्पेश्शल मळकट चव नंतर येत नाही. हा पदार्थ करायला जरा जास्त वेळ लागतो, मात्र त्या कष्टांचे फळही मिळते.:) गाजराच्या वड्याही अश्याच प्रकारे कराव्यात. दिवाळीच्या फराळात रंगीत वड्या उठावदार दिसतात.

रेवती

स्वाती२'s picture

17 Sep 2009 - 2:23 am | स्वाती२

वड्या मस्त दिसतायत. लो फॅट इवॅपोरेटेड दूध वापरून करुन बघेन.

समिधा's picture

17 Sep 2009 - 3:25 am | समिधा

खुपच सुंदर दिसतायत.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मीनल's picture

17 Sep 2009 - 6:14 am | मीनल

करून पहायला हव.
मीनल.

सोनम's picture

18 Sep 2009 - 12:50 pm | सोनम

अजून बिटाच्या पाककृती येऊ द्या.
बिटाचा शिरा नाही करुन पाहिला :( तर बिटाच्या वड्या ही आल्या..
छान आहे.. :)
अजून बिटाची काय काय पाककृती करतात :?

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"