स्वगत
"बाबा तू येना... बाबा तू ये. मला तू हवाय""
इतकेच म्हणते ही फोनवर. दुसरे काहीच नाही! काय करावे. मन हेलकावतय. जाण्याची इच्छा तर खूप आहे. पण कसे जमवावे...
इतके दिवस झालेत. इतके म्हणजे किती, तर ती बोबड्या बोलां नंतर चक्क व्यवस्थित बोलू लागलीय.अरे मग त्यात काय? एका आठवड्यात होते ही प्रोसेस.फक्त प्रोसेस? आठवड्यात होणारी एक प्रोसेस्?किती काही आहे त्यात... वाक्य बोलण्यामध्ये सकारण स्प्ष्टीकरण पण येते. मग ते साधेसे बोल विरून जातात् नि उरतात शब्दांचे बुडबुडे. त्यापेक्षा ते बोबडे पण खरे खुरे बोलच बरे.
छे!! नकोच हे लॉजिक मला.
जाण्या आधी चा किस्सा, मुगाच्या डाळीच्या वरन झाले डबा खालीच होता. मी आपले उचलला डबा लावून टाकले झाकण आणी दिला ठेवून वर. अचानक तीने मोट्ठे भोकाड पसरले. "माझा कासवदादा...."""कोणते कासव? कसे कासव"परत डब्याकडे बोट दाखवून -
"माझा कासवदादा.... "
"अगं ती डाळ आहे. कासव नाही काही!"माझे मट्ठ मोठ्या माणसांचे लॉजिक. "नाई... माझा कासवदादा.... कासवदादा... कासवदादा... कासवदादा""शेवटी कशीबशी समजूत निघाली आणी रडून रडून झोपली. मलाही कळलेच नाही की हीला कासवदादाची इतकी का आठवण.
दुसर्या दिवशी सकाळी डाळ फडताळातून खाली आल्यावर आधी त्यावर तीने झडप घातली आणी डाळीत हात. मी "अगं अगं" म्हणे पर्यंत हातात चक्क एक् छोटंसं हिरवं कासव! तीने डब्यात जपून ठेवलेलं!!
मी आव्वाक्!
-निनाद
प्रतिक्रिया
26 Feb 2008 - 7:51 am | प्राजु
किती काही आहे त्यात... वाक्य बोलण्यामध्ये सकारण स्प्ष्टीकरण पण येते. मग ते साधेसे बोल विरून जातात् नि उरतात शब्दांचे बुडबुडे. त्यापेक्षा ते बोबडे पण खरे खुरे बोलच बरे.
हे वाचून मी अंतर्मुख झाले. माझ्या मुलाची तो ९-१० महिन्याचा असताना "बात्लाफात्ला...काकाल्काअब्दाला" हे असे बोल ऐकून त्याला मला किती सांगू आणि किती नको असं झालेलं असायचं.. मला मात्र एक अक्षर कळायचं नाही. अजूनही ते बोल आठ्वले की मन त्या इवल्या आठवणीत रमतं. इवल्याच म्हणायला हव्यात ना त्या आठवणी किती अत्यल्प काळासाठी असतात ते क्षण..
- (सर्वव्यापी)प्राजु
26 Feb 2008 - 10:10 am | आनंदयात्री
लेकीच्या आठवणीत रमलात !!
26 Feb 2008 - 12:17 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या पुतण्याने त्याच्या वडिलांना (माझ्या भावाला) सांगितलं, 'आपण ते तिथे जातो नं....'भाऊ: 'कुठे? कुठे जातो आपण?'पुतण्या: ' अहो तिथे नाही का 'गंडलगुल्ली' आहे?....'
आता हे 'गंडलगुल्ली' प्रकरण काय आहे हे कळायला दोन दिवस गेले. मेंदूचा भुगा झाला. त्यालाही एक्स्प्लेन करता येईना, आम्हालाही समजेना. शेवटी आम्ही नाद सोडला.
दोन दिवसांनी एक लहान मुलांचे सचित्र पुस्तक चाळताना तो अचानक ओरडला, 'बाबा, गंडलगुल्ली' आम्ही ते चित्र पाहिलं आणि हसतच सुटलो.....
ती होती 'घसरगुंडी' (बागेतली).
28 May 2011 - 6:17 am | गोगोल
.
26 May 2011 - 10:22 am | मुलूखावेगळी
छान लिहिलेय.
निरागस :)
26 May 2011 - 9:28 pm | पैसा
आवडलं!