पावस प्रवास मार्गदर्शन..

बाळ्कोबा's picture
बाळ्कोबा in काथ्याकूट
14 Sep 2009 - 10:36 pm
गाभा: 

सर्वांना नमस्कार,
रत्नागिरी जिल्ह्यातील पावस क्षेत्री प्रवासाचा बेत आखत आहे, परंतु नेमका कोणता मार्ग अधिक रास्त होईल ह्याबद्दल जास्त माहीत नाही. बरोबर वय ५०+ वा ५५+ वयाच्या व्यक्ती आहेत. वाहन स्वतःचे असणार आहे. थेट रत्नागिरी ला मुक्कामाला जायचे आहे.

धन्यवाद..
(प्रतिक्रियार्थी)बाळकोबा

प्रतिक्रिया

टारझन's picture

14 Sep 2009 - 10:56 pm | टारझन

कोकण रेल्वे मधे गाडी टाकायची ... आणि आरामात पोचायचं ...

-(प्रवास प्रेमी) टारोबा ट्रॅव्हलर

बाळ्कोबा's picture

14 Sep 2009 - 11:06 pm | बाळ्कोबा

एक तपशिल विसरलो,
पुण्यातून जायचं आहे. आणि स्वतःच्या गाडीतूनच रस्त्याने जायचंय...

(पुणेरी) बाळकोबा

krishnakumarpradhan's picture

15 Sep 2009 - 4:12 am | krishnakumarpradhan

महोदय,
आपल्यकडे गाडी आहे,मायक्रो. नोटबुक बरोबर घ्या व गूगल सर्च मध्ये रत्नागिरि विभागात शोधा. देशी उत्पादनावर विश्वास असेल तर एल्.जी कंपनी कडे विचारणा करा.नाहीच तर केसरि कडे माहितिसाठी जा.

बाळ्कोबा's picture

16 Sep 2009 - 10:09 am | बाळ्कोबा

ते सर्व झाले करून. गूगल तुम्हाला रस्ता कसा आहे ते सांगत नाही. मला गूगल कोलाड मार्गे सांगत आहे जायला. कारण टेक्निकली सगळ्यात जवळचा रस्ता आहे. पण तिथे पोचायलाच तीन घाट आहेत त्याचा काय?
तरीही प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

केशवराव's picture

15 Sep 2009 - 1:52 am | केशवराव

१] पुण्याहून पौड रोड वरुन थेट निजामपूर मार्गे माणगावला उतरायचे,
आता आपण ' मुंबई - गोवा ' मार्गावर आलो आहोत. सरळ हात खंबा, रत्नागिरी , पावस.
२] पुणे - कोल्हापूर - पन्हाळ गड करीत कोकणात उतरायचे. नाणिज मार्गे आपण पाली [ सुधागड नव्हे] येथे येतो. तिथून एक तर ६ कि.मि. उजवीकडे येऊन हात खंबा गाठायचे .पुढे रत्नागिरी - पावस. नाहितर पाली वरून लांज्याकडे जायचे . साधरण ४/५ कि.मि. वर उजवीकडे पावस फाटा लागतो. तिथून सुमारे २० कि.मि. पावस्.पण हा रस्ता अरुंद आहे. मी दरवर्शी याच मार्गाने जातो. कारण, वाटेत माझे 'चांदोर ' हे गाव आहे.

अमोल केळकर's picture

15 Sep 2009 - 9:27 am | अमोल केळकर

पुणे - कोल्हापूर - रत्नागिरी - पावस हा मार्ग उत्तम.
पुणे - कोल्हापूर ( जास्ती जास्त ५ तास - विश्रांती थांबा गृहीत धरुन )
कोल्हापूर रत्नागिरी ( ३.५ तास )
रत्नागिरी - पावस - ३० मिनिटे
वयस्कर व्यक्ती सोबत असल्याने याच मार्गाने गेलेले उत्तम.
कोकण मार्गे गेल्यास जास्त घाट लागत असल्याने त्रास आणि वेळ ज्यास्त लागण्याची शक्यता.
आपला प्रवास सुखाचा होवो हीच स्वरुपानंदांचरणी प्रार्थना

अमोल केळकर
(स्वरुपानंद भक्त )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

15 Sep 2009 - 10:35 am | अमित बेधुन्द मन...

जर पुणे - कोल्हापूर - रत्नागिरी - पावस हा प्रवास करनार असाल तर
कोल्हापूर - रत्नागिरी रोडवर राजापुर म्हनुन गाव येते तिथुन डायरेक्ट
पावस रस्ता आहे सधारण ८५ किलोमिटर ,म्हनजे रत्नागिरिला जावे लागणार नाहि
कोल्हापूर-राजापुर - पुर्णगड- पावस

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2009 - 2:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रस्ता माहित नाही, पण आल्यावर पावसचे फोटू दाखवा.

(सार्वजनिक वाहतूकीवर पूर्ण भरवसा ठेवणारी) अदिती

सुनिल पाटकर's picture

15 Sep 2009 - 4:10 pm | सुनिल पाटकर

पुण्याहून तम्हाणी घाट मार्गे निजामपूर मार्गे माणगावला यावे तेथुन
मुंबई - गोवा ' मार्गावरावरुन रत्नागिरी व पावसला जाता येते, पावसलाही काही चांगली होटेल आहेत.

शैलेन्द्र's picture

15 Sep 2009 - 5:37 pm | शैलेन्द्र

अजुन एक चांगला रस्ता, पुणे- सातारा- कोयना- कुम्भार्ली घाट- चिपळुन- रत्नागीरी- पावस.

जातच आहात तर जवळच्याच अडीवर्‍याच्या देवीलाही जावुन या.

Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.

सूहास's picture

15 Sep 2009 - 7:56 pm | सूहास (not verified)

सू हा स...

बाळ्कोबा's picture

16 Sep 2009 - 10:04 am | बाळ्कोबा

सर्व सार्थक (निरर्थक च्या उलटं) प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!!

आपला नम्र