मट्णाचे लोणचे

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
11 Sep 2009 - 2:12 pm

फोटो नाही म्हणून रेसिपी वाचू नये...असे करू नये...
आता तुम्ही रेसिपी करून फोटो टाकावा ही अपेक्षा. :)

साहित्य:
१/२ किलो मटण
५ टे.स्पून सुके खोबरे
२ टे.स्पून तीळ
१ टे.स्पून खसखस
१/४ टी.स्पून हळद
२ टी.स्पून मीठ
१ टे.स्पून गरम मसाला
१ टे.स्पून तिखट (मिरची पूड)
१/४ टी.स्पून आलं पेस्ट
१/४ टी.स्पून लसूण पेस्ट
अर्धी जुडी कोथिंबीर
तेल
१ लिंबू

कृती:
१.हळद, मीठ व अगदी थोडे पाणी घालून मटण शिजवून घ्यावे.
२.खोबरे, तीळ व खसखस कोरडेच भाजून घ्यावे.
३.हाताने खोबरे कुस्करून घ्यावे, तीळ खसखस बारीक कुटावे.
४.भाजलेले खोबरे, तीळ, खसखस, गरम मसाला, तिखट, हळद, मीठ, आले-लसणाची पेस्ट, कोथिंबीर हे सर्व घालून चांगले मिक्स करावे.
५.मटण शिजल्यावर ते काढून घेऊन, कढईत थोडे तेल घालून थोडे थोडे मटण घालून तळून घ्यावे.
६.नंतर तळलेले मटण आणि वरील सर्व मसाला घालून त्यावर लिंबू पिळावे. वरून कोथिंबीर घालावी.

मी अजूनी ही रेसिपी केली नाही, माझ्या एका कोल्हापूरच्या मैत्रिणीने सांगितली आहे....

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 Sep 2009 - 2:16 pm | अवलिया

मी अजूनी ही रेसिपी केली नाही, माझ्या एका कोल्हापूरच्या मैत्रिणीने सांगितली आहे....

फोटो नाही म्हणून रेसिपी वाचू नये...असे करू नये...
आता तुम्ही रेसिपी करून फोटो टाकावा ही अपेक्षा.

तुम्ही रेसेपी करुन पहा ..... आम्ही फटुग्राफर पाठवतो.. ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विंजिनेर's picture

11 Sep 2009 - 2:21 pm | विंजिनेर

तुम्ही रेसेपी करुन पहा ..... आम्ही फटुग्राफर पाठवतो.. !

करेक्शन...
"तुम्ही रेसेपी करून ठेवा... आम्ही फटुग्राफर म्हणून येतो :)"

शैलेन्द्र's picture

11 Sep 2009 - 2:21 pm | शैलेन्द्र

अहो, लोणच घालायला मटण शिल्लक राहीले पाहीजे ना?

Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.

चिरोटा's picture

11 Sep 2009 - 2:27 pm | चिरोटा

मटणाची हाडे काढून खूप बारीक तुकडे करावे लागतील्.खिम्याचे मटण वापरले तर बरे असे वाटते.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

काजुकतली's picture

11 Sep 2009 - 3:08 pm | काजुकतली

स्वाती, रेसिपीबद्दल धन्यवाद, पण काही गोष्टी कळाल्या नाहीत.. ४ मधला मसाला आणि ६ मधले मटण यांना तेलात परत थोडे परतावे काय? कारण ४ मध्ये आले लसुन पेस्ट आहे, आणि ती कच्चीच राहिली तर चांगली लागणार नाही....

स्वाती राजेश's picture

11 Sep 2009 - 3:53 pm | स्वाती राजेश

तुझे बरोबर आहे.
मग सुके मटण सारखे,पेस्ट थोड्या तेलात परतून मगच मिक्स करावी.

मितालि's picture

11 Sep 2009 - 4:26 pm | मितालि

इथे चिकन लोणच्याची रेसिपि पहा..
http://www.youtube.com/watch?v=SDKDgErDXhE

दिपाली पाटिल's picture

11 Sep 2009 - 9:28 pm | दिपाली पाटिल

चिकनचं लोणचं मी याच पाकृने बनवलं होतं...छान लागतं तसंच मटणाचंही छानच लागत असावं...

दिपाली :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2009 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मट्णाचे लोणचे ?
फोटो पाहिजे होता. चखण्यासाठी हे लोणचे कामाचे असले पाहिजे. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलकांत's picture

11 Sep 2009 - 5:30 pm | नीलकांत

काय ताई निदान मटनाचं लोणचं पहायला तरी मिळेल असं वाटलं होतं. :(

कुणी तरी फोटो टाका रे !

- नीलकांत

विसोबा खेचर's picture

11 Sep 2009 - 10:32 pm | विसोबा खेचर

फोटू?

शाहरुख's picture

12 Sep 2009 - 12:55 am | शाहरुख

मटणाचं लोणचं ??

हा पदार्थ मी फक्त पाचकट विनोदांतच ऐकायचो आत्तापर्यंत !!

काजुकतली's picture

12 Sep 2009 - 11:04 am | काजुकतली

मग तुम्ही कोल्हापुरपर्यंत पोचलाच नाहीत अजुन असे म्हणावे लागेल. तिकडे भारी फेमस आहे मटणाचे लोणचे....

शाहरुख's picture

12 Sep 2009 - 11:35 am | शाहरुख

अहो, आम्ही आमच्या 'प्रवासाची' सुरूवातच कोल्हापूरातुन केलीय :-)

काजुकतली's picture

12 Sep 2009 - 3:56 pm | काजुकतली

प्रवासास सुरवात केली आणि मुळ ठिकाणी परत वळूनही पाहिले नाही??

असो, मी लोकराज्यचा नविन अंक नुकताच वाचला, त्यात ह्या मटणावर एक लेख होता, सोबत फोटोही होता. फोटो पाहुन एकदम खावेसे वाटले, पण कृतीचे काय?? मग घेतली धाव इकडे. स्वातीने लगेच कृती कळवलीही. आता करुन पाहिन रविवारी...

खादाड's picture

12 Sep 2009 - 8:02 pm | खादाड

हे लोणच टीकाउ आहे का ?

कोल्हापुरी राजा's picture

13 Sep 2009 - 8:49 pm | कोल्हापुरी राजा

सुन्दर पाकक्रिया आहे. मी करुन बघीतली.