'नव' निर्माण होण्यापुर्वीच

वि_जय's picture
वि_जय in काथ्याकूट
7 Sep 2009 - 1:03 pm
गाभा: 

प्रविण महाजन, श्वेता परुळेकर, आणी आता संजय घाडी, संजना घाडी
'नव' निर्माण होण्यापुर्वीच राजसाहेबांचे नवे नवे खंदे शिलेदार बाहेर पडतायत..
काय वाटत मिपाकरांना?
राजसाहेबांच काही चुकतय?

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2009 - 1:09 pm | प्रभाकर पेठकर

ज्यांना काढून टाकणे (काही कारणाने) शक्य नसते अशांसाठी त्यानी 'राजीनामा' द्यावा अशी परिस्थिती निर्माण केली जाते.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

ए.चंद्रशेखर's picture

7 Sep 2009 - 1:15 pm | ए.चंद्रशेखर

राजकारणी मंडळी आणि त्यांच्याबरोबर वावरणारे इतर यांनी कशाही व कुठेही कोलांट्या उड्या मारल्या तरी मिपाकर काय किंवा सर्वसामान्य काय यांना काहीही वाटत नाही
चंद्रशेखर

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Sep 2009 - 1:18 pm | बिपिन कार्यकर्ते

की प्रकाश महाजन? प्रविण महाजन सध्या जेलात आहेत. असो.

वि_जय यांना वि_नंति. एक ओळीचा धागा टाकण्याऐवजी त्यांनी स्वत:चे असे काही मत / भाष्य व्यक्त करणे आवश्यक आहे. अन्यथा हा धागा इथून उडू शकतो.

बिपिन कार्यकर्ते

प्रविण महाजन तुरुंगात आहे सध्या , बहुतेक....

बाकी चालु द्या ....

पाषाणभेद's picture

7 Sep 2009 - 1:36 pm | पाषाणभेद

हे जे घडतेय ते सत्तेचे राजकारण.
जसजशी निवडणूकीचा ज्वर चढेल तसतसे या प्रकारच्या बातम्या येतच राहतील.
राजकारणाचा विचार राजकारणी लोकांनी करावा, आपण आपले मत विचारपुर्वक ठरवावे.
-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

7 Sep 2009 - 2:07 pm | अमित बेधुन्द मन...

हिन्दवि स्वराज्य व्हावे हि तर श्रीन्चि इछा

जय भवानि जय शिवाजि

चिरोटा's picture

7 Sep 2009 - 2:11 pm | चिरोटा

काय वाटत मिपाकरांना?

शिवसेना कदाचीत बर्‍यापैकी प्रमाणात निवडुन येण्याची शक्यता दिसत आहे.उध्धव ठाकरे यांनी बोलावणे पाठ्वल्याशिवाय ह्या मंडळीनी स्वतःहून मनसे सोडण्याचा निर्णय घेतला नसणार.

राजसाहेबांच काही चुकतय?

ते काळच ठरवेल्. सध्यातरी मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक ह्या विभागातील मराठी मध्यमवर्गाला मनसेने आकर्षित केलेले दिसते.पण भारतात पक्ष चालवण्यासाठी कार्यकर्ते ,पैशाच्या थैल्या,राष्ट्रीय स्तरावर पाठींबा,काळा पैसा असलेल्या शेठजी लोकांचा पाठींबा अशा अनेक गोष्टी आवश्यक असतात.फक्त कार्यकर्ते असुन चालत नाही.शिवाय (मुद्दे योग्य आहेत हे ग्राह्य धरले तरी) भैय्या विरोधाच्या जोरावर्,मराठीच्या आग्रहावर मनसेचे राजकारण किती काळ टिकुन राहील हा प्रश्न आहे.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

सुहास's picture

8 Sep 2009 - 12:16 am | सुहास

हे लोक का बाहेर पडले तेही सांगा डिट्टेलमंदी...! म्हणजे आम्हाला पण कळेल ते का गेले ते...!

आणि धाग्याचा लाईन काऊंट पण वाढेल... ;-)

--सुहास

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

8 Sep 2009 - 12:21 pm | अमित बेधुन्द मन...

दोन्हि पष्यात जगावातप चालु असेल
इथले तिथे अनि तिथले इथे हेच् चालु राहनार

अखेर
हिन्दवि स्वराज्य व्हावे ही श्रीन्चि इछ्या

नम्रता राणे's picture

8 Sep 2009 - 2:19 pm | नम्रता राणे

संजय घाडींनीच सांगीतले कि मनसे चालतेय ती राज यांच्या दोन-तीन सहकार्‍यांच्या मार्गदर्शनावर... ते सुध्दा परप्रांतीय .

आता उर्वरीत मनसैनीकांनी राज यांच्या भोवतालच्या परप्रांतीय 'बडव्यांना" काय संबोधायचे?

स॑जय घाडीनी मनसेला रामराम ठोकल्याची बातमी सकाळमधे वाचली. त्या बातमीच्या शेवटी असा उल्लेख आहे कि ते स्वतः असे म्हणतात ' त्या॑ना दि॑डोशी मतदार स॑घातून निवदणूक लढवण्यास राज ठाकरे॑नी मनाई केली '.
याचा अर्थ काय घ्यावा हे सु़ज्ञा॑स सा॑गण्याची गरज नाही .