भरकटलेली चर्चा

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
5 Sep 2009 - 11:46 pm
गाभा: 

भरकटलेली चर्चा .

वाचक हो,
माझा नाडीग्रंथावरील लेखनाचा मूळ हेतू भाग 6 मधे बोध अंधश्रद्धा पुस्तकाची निर्मिती कशी व का झाली हे नोंदवायचा होता. त्यात एक माहिती म्हणून त्यातील मलपृष्ठवरील अवतरणे उद्धृत केली होती. मी कोणाला तेंव्हा किंवा आत्ता आव्हान दिलेले नव्हते व आज ही देत नाही. त्यामुळे आजून कच्चा किंवा खडूस किंवा अन्य कोणालाही नाडी भविष्य पहायचे असेल तर त्यांना सोईच्या नाडी केंद्रात जाऊन जरूर पहावे. जसे अन्य असंख्य लोक पाहतात. त्यांनी त्यांची वही व कॅसेट मिळवून व नाडी पट्टीचा फोटो उपलब्ध करून त्यातील मजकुरची चिकित्सा करून निश्कर्ष काढावा व तो लोकांसमोर मांडावा. नाडी भविष्य न पाहता कोणी चर्चा करीन म्हटले तर ते अशास्त्रीय व तर्काला धरून नाही इतकेच माझे म्हणणे आधीपासून होते, आजही आहे.
या उप्पर धनंजय यांनी नाडी पट्टीत शशिकांत हे नाव कसे लिहिलेले आहे. याचे प्रात्यक्षिक असे म्हणून माझ्या नावाच्या उल्लेखाला फोटोतून वाचून -एक तमिळ भाषा समजणारा म्हणून - लिखाणाला दुजोरा दिला आहे. मात्र त्यांना त्या नावांच्या उल्लेखाशिवाय मागील पुढील संदर्भ सांगितले जाणे अपेक्षित आहे. ते या पटलावरील तज्ञांनी सादर केले तर फोटोमधील शशिकांत या नावाशिवाय अन्य नावांचे व इतर माहितीचा खुलासा होईल असे वाटते. तरी माझी तमिळ जाणकार लोकांना विनंती आहे की त्यांनी पुढाकार घेऊन त्या फोटोतील अन्य मजकुराचा खुलासा करावा. तो संपुर्ण फोटो स्कॅन करून, वही व कॅसेट मी त्यांना द्यायला आनंदाने तयार आहे. असे शोधकार्य व्हावे हीच माझी आजवरची इच्छा आहे. ती आज या माध्यामाद्वारे संपन्न होईल अशी आशा वाटते.
तसे झाले तर मला पुढील भागांचे लिखाण करायला हुरुप येईल.

प्रतिक्रिया

दशानन's picture

6 Sep 2009 - 1:18 pm | दशानन

तुमच्या मताशी मी सहमत आहे.

तुमचे पुस्तक कुठे वाचायला मिळेल पुर्ण :?

>>धनंजय यांनी नाडी पट्टीत शशिकांत हे नाव कसे लिहिलेले आहे. याचे प्रात्यक्षिक असे म्हणून माझ्या नावाच्या उल्लेखाला

माझ्या नावाची पण पट्टी असेल का तेथे ?
मला पण माझे नाडीभविष्य बघायचे आहे.

अवलिया's picture

6 Sep 2009 - 1:25 pm | अवलिया

मी राजेशी सहमत आहे.
माझ्या नावाची पण पट्टी असेल का?
माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का?
पण उत्तरे मिळाल्यावर माझे जीवन सुसह्य होईल की अधिक अडचणीचे होईल?
ते जावु द्या उद्याला मार्केट काय राहील, रेंज काय राहिल ? आणि रात्री बारमधे उडवायला पैसे असतील का ? एवढेच प्रश्न असलेल्या मला नाडीचा काही उपयोग होईल?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

JAGOMOHANPYARE's picture

6 Sep 2009 - 1:27 pm | JAGOMOHANPYARE

भरकटलेली चर्चा... >>>>>>>>>

विन्ग कमान्डर महोदय, ..... चर्चाच काय हल्ली विमाने, हेलिकॉप्टर्स आणि रॉकेट्स सुद्धा भरकटतात... :)

एक शन्का आहे.... शशिकन्त नावाची हजारो माणसे असणार....... नेमका हाच तो हे पट्टी बघून कसे कळते?

लग्न झाले, दुसरे लग्न झाले, धर्म बदलला, गम्मत म्हणून बदलले अशा कारणानी जर नाव बदलले तर नेमके कुठले नाव बघतात ? एखादा माणूस नन्तर नाव बदलणार असेल तर तेही आधीच्या पट्टीत दिसायला हवे.. ते दिसते का ?

दशानन's picture

6 Sep 2009 - 1:31 pm | दशानन

हाच हाच हाच... मुद्दा माझा पण होता... पण विचार केला कमांडर साहेबांच्याकडे काही उत्तर असेल त्यांच्याकडे :)

अवलिया's picture

6 Sep 2009 - 1:34 pm | अवलिया

हेच मी म्हटले होते, पण माझा प्रतिसादच कुणीतरी उडवला.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

6 Sep 2009 - 1:35 pm | दशानन

नाडी शोध घ्या... कळेल प्रतिसाद कुठे गेला आहे...

टारझन's picture

6 Sep 2009 - 2:12 pm | टारझन

"प्रतिसाद उडवल्या जाईल" असे मी एका पट्टीवर वाचले होते नाना !

-(पट्टीप्रेमी) टारोबा रुलर

अवलिया's picture

6 Sep 2009 - 2:18 pm | अवलिया

अरे फक्त 'नाना' असे असेल...
"प्रतिसाद उडवले जातील" हे सांगुन फार काही चमत्कार सांगितला नाहीस तु ! ;)

--टारंजय
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

6 Sep 2009 - 2:24 pm | टारझन

हे सांगुन फार काही चमत्कार सांगितला नाहीस तु

हेच तर मला सांगायचं आहे !!

विनायक प्रभू's picture

6 Sep 2009 - 1:35 pm | विनायक प्रभू

तुमचा प्रतिसाद उडवला जाईल ह्याचीपण नाडीपट्टित नोंद आहे हे लक्षात घ्या.

अवलिया's picture

6 Sep 2009 - 1:39 pm | अवलिया

काय सांगता? आणि माझ्या एक आड एक उडणा-या लेखांप्रमाणे काही नाड्या उडलेल्या असतील तर ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

6 Sep 2009 - 1:41 pm | दशानन

नक्कीच !

JAGOMOHANPYARE's picture

6 Sep 2009 - 1:45 pm | JAGOMOHANPYARE

..आता नाडी म्हटली की ती उडणारच की !! बघा मनगट तपासून......... :)

अवलिया's picture

6 Sep 2009 - 1:56 pm | अवलिया

मनगट कोणाचे तपासायचे ? आणि कसे ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

JAGOMOHANPYARE's picture

6 Sep 2009 - 2:02 pm | JAGOMOHANPYARE

उडणारी नाडी हे माणूस जिवन्त असल्याचे लक्षण आहे...

दशानन's picture

6 Sep 2009 - 1:45 pm | दशानन

प्रभु ...

तुमची नाडी पण तेथेच सापडेल काय :?

माझा एका महाजालीय मित्राची पण नाडी हवी आहे .... बेचारा आजकाल धागे काढत बसतो आहे... त्याच्या भविष्यात काय लिहले आहे हे पहाणे आहे.... नाही तर बिचारा धागे काढता काढता स्वतःच धागा होऊन बसेल !

अवलिया's picture

6 Sep 2009 - 1:49 pm | अवलिया

मास्तरची नाडी मिळेल न मिळेल पण नाडा बरेच ठिकाणी मिळेल.

बाकी आमच्या पण एका मित्राची नाडी पहायची आहे, पण त्याचे बाकी काही डिटेल्स माझ्याकडे नाहियेत.. फक्त तो कुठे आहे हे माःित आहे. कसे करता येईल?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

JAGOMOHANPYARE's picture

6 Sep 2009 - 1:59 pm | JAGOMOHANPYARE

एक धागा नाडीचा
शम्भर धागे राशीन्चे
जरतारी हे वस्त्र 'मिपावा' तुझिया आयुष्याचे...

मुकी अन्गडी पाककृतीन्ची
रन्गीत वसने काथ्याकुटीची
जीर्ण खरड मग उरे शेवटी लेणे आठवणीन्चे !

जरी टन्कशी असला धागा
ऑफिस मधुनी जाशी नन्गा
धाग्यांसाठी करिशी नाटक साताठ तासान्चे !

या धाग्याना विणतो कोण ?
एक सारखी नसती दोन!
कुणा न दिसले त्रिखन्डात या बोर्ड टन्कणार्‍यान्चे !

दशानन's picture

6 Sep 2009 - 2:00 pm | दशानन

वा ! वा !

काय सुंदर कविता आहे... पण कवितेची नाडी तपासली आहे का तुम्ही :?

अवलिया's picture

6 Sep 2009 - 2:04 pm | अवलिया

हेच मी पण विचारणार होतो.. तु आधी विचारलेस.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अवलिया's picture

6 Sep 2009 - 2:01 pm | अवलिया

=)) जबरदस्त !!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अजुन कच्चाच आहे's picture

6 Sep 2009 - 2:54 pm | अजुन कच्चाच आहे

क्या चौका लगाया जामोप्यारे
झकासच !

.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

अजुन कच्चाच आहे's picture

6 Sep 2009 - 3:10 pm | अजुन कच्चाच आहे

मला या प्रतिसादाची अपेक्षा होतीच.

ओकसाहेब ही चक्क माघार झाली हो.
आपल्या सर्व धागावरील लिखाणावरून असे वाटत होते कि काहीही झाले तरी तुम्हाला नाडीग्रंथाचे खरेपण लोकांपर्यंत पोचवायचय.
पण नाही, तुम्हाला ते सारे संदीग्धच ठेवायचय तर.
(इतके खुलेपणाने सारे झाले तर सगळे बिंग बाहेर पडेल ना!)
.................
अजून कच्चाच आहे.
(भरकटलेली चर्चा कुठवर जाणार ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

त्यासाठी पुरुषाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व ३०० रुपये जमा करावे लागतात. स्त्रींयाकरिता डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व ३०० रुपये फी पडेल.पहिल्या खेपेत तुमची ताडपट्टी खात्रीने मिळणार नाही.त्यामुळे नाव नोंदवल्यावर १५ ते २० दिवसात तुमची पट्टी तामिळनाडुहुन मागवण्यात येते व तिचे वाचन तुमच्या समोर करुन त्याचे ध्वनीमुद्रिका तुम्हाला दिली जाते.
वेताळ

अवलिया's picture

6 Sep 2009 - 6:23 pm | अवलिया

वेगवेगळ्या केंद्रावर वेगवेगळी फी लागते, आणि कधी कधी ३ ते ६ महीने पण लागतात.

हा प्रतिसाद फालतु आहे की नाही याचा खुलासा अमित अभ्यंकर करतील.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अजुन कच्चाच आहे's picture

6 Sep 2009 - 6:36 pm | अजुन कच्चाच आहे

नुसतीच चर्चा चाललेय.

चला की सारे वादी-प्रतिवादी लोकहो घेऊन टाकूयात अनुभव.

(अपेक्षीत प्रतिसादः तुम्ही तुमचा घ्या की अनुभव, आम्ही कुठे म्हटलय तुमच्या मदतीला येऊ अस?)
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

विन्ग कमान्डर महोदय, ..... चर्चाच काय हल्ली विमाने, हेलिकॉप्टर्स आणि रॉकेट्स सुद्धा भरकटतात... Smile

एक शन्का आहे.... शशिकन्त नावाची हजारो माणसे असणार....... नेमका हाच तो हे पट्टी बघून कसे कळते?

लग्न झाले, दुसरे लग्न झाले, धर्म बदलला, गम्मत म्हणून बदलले अशा कारणानी जर नाव बदलले तर नेमके कुठले नाव बघतात ? एखादा माणूस नन्तर नाव बदलणार असेल तर तेही आधीच्या पट्टीत दिसायला हवे.. ते दिसते का ?
--------------

एक धागा नाडीचा
शम्भर धागे राशीन्चे
जरतारी हे वस्त्र 'मिपावा' तुझिया आयुष्याचे...

या धाग्याना विणतो कोण ?
एक सारखी नसती दोन!
कुणा न दिसले त्रिखन्डात या बोर्ड टन्कणार्‍यान्चे !

"एक धागा नाडीचा" यावर 29 प्रतिसाद अपेक्षित नव्हते. असो.
"या धाग्यांच्या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन" ... खरे आहे.
'शशिकांत' नावाचे अनेक लोक असणार त्यापैकी ती पट्टी माझीच कशावरून ठरणार? असे न होण्यासाठी पट्टीत व्यक्तीच्या आई-वडिलांची नावे, पति वा पत्नीचे नावे, जन्मदिनांक, जन्मकालाची ग्रहपरिस्थिती, शिक्षण व सध्याची नोकरी वा व्यवसायाची माहिती भावा-बहिणींची, अपत्यांची संख्या असे अनेक दुवे त्यापट्टीत लिहिलेले असतात. त्यासर्वांवरून विशिष्ठ ताडपट्टी आपली आहे किंवा नाही याचा पडताळा घेता येतो.
म्हणून तुम्ही म्हणता तसे या नाडीपट्टीला आपल्या जन्माच्याही आधीपासून लिहितो कोण? असा प्रश्न पडतो.असो.
मात्र या अनुभवायच्या गोष्टी आहेत. मी किती सांगितले तरी त्या थापाच वाटणार, कोणाचाही विश्वास बसणार नाही, जसा माझाही एका काळी नव्हता.
मासला म्हणून मी फक्त माझ्या नावाचा उल्लेख असलेला भाग पुरावा म्हणून येथे सादर केला होता. आता चिकित्सा करणाऱ्यांनी आपापल्या पट्टीचा शोध घेताना त्यात अशीच माहिती कुठे व कशी लिहिलेली आहे ते दाखवण्यास नाड़ीवाचकाला सांगितले तर तो ते नाडपट्टीतून व त्या शिवाय दिल्या जाणाऱ्या वही,कॅसेट मधून शोधता येते. आता इतका पुरावा आपण न मागता दिला जातो. त्याची चिकित्सा करणे आपल्या हातात आहे.
---------

नाडी केंद्रात ताडपट्टी फुकट बघितली जात नाही.

नाडीग्रंथातील विवक्षित पट्टी ग्राहकाने त्यातील माहिती 100 टक्के बरोबर आहे असे समाधानाने म्हटले की मग त्या ताडपट्टीतील मजकून सावकाशपणे वाचून वही उतरवला जातो. हे काम बऱ्याचदा केंद्राची जागा अपुरी असेल तर ग्राहकासमोरच केले जाते. त्यामुळे ज्या पट्टीतून माहिती जुळली त्याच पट्टीतील मजकूर वहीत उतरवला जात आहे किंवा नाही याची खात्री आपणांस आपसुकच घडते. त्यानंतर त्या त्या केंद्राने ठरवलेली बिदागी ते पुजारूम मधील थाळीत ठेवायला सांगतात. त्याआधी फी पट्टी सापडली नाही तरी आगाऊ घेतली जात नाही. अनेकदा त्या केंद्रातील पट्ट्यांचा साठा संपूनही एखाद्याची विशिष्ठ पट्टी सापडली नाही तर त्याला नंतर काही काळानंतर बोलावले जाते. त्यामधेही त्याची पट्टी खात्रीने सापडेलच अशी हमी नाडी केंद्रवाले देऊ शकत नाहीत.
------

ओकसाहेब ही चक्क माघार झाली हो.

मी आपले भविष्य पहा असा सल्ला दिला. मी आपल्यासारख्यांना नेतो वा नाडीच्या खरेपणाचा अनुभव आणण्यासाठी पुढाकार घेतला कुठे होता म्हणून मी माघार घेतली? उलट मी अनेकदा आपापले अनुभव घ्या व बोला असे सुचवत आहे. त्यासाठी आपणांस पुढाकार घेणे अपेक्षित आहे. आता इतके झाल्यावरही आपण वा अन्य किती लोक खरोखर जातील कोणास ठाऊक. ते पाहून आल्यावर आपल्या पट्टीतील माहितीची वही व कॅसेट आणि फोटोसह केलेली चिकित्सा आम्हाला वाचायला आवडेल. मात्र नाडी केंद्रावाल्यांचा खोटेपणा उघडा करण्याच्या नादात पुर्वग्रहामुळे आपण आपल्याला सचोटीपासून ढळू देऊ नये ही विनंती.

शशिकांत