The Anatomy of Hope

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
3 Sep 2009 - 9:05 am
गाभा: 

सध्या मी जेरी ग्रुपमान या डॉक्टरने लिहिलेले The Anatomy of Hope हे पुस्तक
वाचत आहे. वाचत आहे अशासाठी म्हटले कारण पुस्तक अजुन वाचून संपवता आले नाही.
सुरुवातीची प्रकरणे वाचताना आधुनिक वैद्यकाबद्दल काही प्रश्न निर्माण झाले आणि
त्यामुळे कमालीची अस्वस्थता निर्माण झाली म्हणुन मी त्यातील The biology of
hope या प्रकरणावर उडी मारली.

या प्रकरणात मानवी आशेची चिरफाड करताना डॉ. ग्रुपमानने 'विश्वास आणि अपेक्षा'
(belief and expectations) हे दोन घटक आशेमागे लपलेले असतात असे म्हटले आहे.
आशावादी माणसाचा मेंदू काही विशिष्ट रसायने (Neurotransmitters) तयार करतो आणि
त्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया लवकर घडून येते, असे काहीसे स्पष्टीकरण त्याने
दिले आहे.

या इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो असा की विश्वास आणि अपेक्षा
मेंदूला बरे होण्याच्या प्रक्रियेसाठी जर उद्युक्त करत असतील तर बुद्धीवादी आणि
अंधश्रद्धावाल्यांचा थयथयाट कशासाठी चालू द्यायचा. आपल्या श्रद्धेच्या
चौकटीबाहेरचे कोणते उपाय स्वीकारायचे अथवा नाकारायचे हा ज्या त्या व्यक्तीचा
प्रश्न आहे. हे स्वातंत्र्य अंधश्रद्धानिर्मूलनवाले नाकारणार असतील तर
त्यांच्यात आणि तालिबान यांत फरक तो कोणता?

http://rajeev-upadhye.blogspot.com/2009/07/anatomy-of-hope.html

प्रतिक्रिया

दशानन's picture

3 Sep 2009 - 9:11 am | दशानन

>>थयथयाट कशासाठी चालू द्यायचा.

ह्म्म्म्म.

बरं बरं !

*********************

चला एक काम करु आपण !

तुम्ही माझा भुतकाळ व भविष्यकाळ सांगा... तुम्हाला जी जी माहीती हवी ती मी येथे देतो... ( बर्थ सर्टिफिकेट / ड्राईव्हिंग लायसेन्स , माझ्या उजव्या / डाव्या तळ हाताचा फोटो.. )

तुमची जी फी असे ती पण देऊ... व भविष्य / भुतकाळ योग्य वाटला तर डब्बल पण देऊ... !

+

ते थयथयाट करणा-याच्या विरुध्द आपण जी आघाडी उघडली आहे... त्याला फुल्लटू सपोर्ट पण देऊ.. + तुमच्या प्रत्येक धाग्यात / ब्लॉग वर.. हक्काचे चारपाच प्रतिसाद पण पाडू.. तुमच्या बाजूने ;)

बोला कबूल ??

युयुत्सु's picture

3 Sep 2009 - 9:36 am | युयुत्सु

पुण्यात असलात तर घरी येऊन भेटा. त्याअगोदर तुमच्या ज्योतिषाबद्दल अपेक्षा काय आहेत ते जाणून घ्याव्या लागतील. मला त्या अपेक्षा पूर्ण करता येणार नसतील तर मी पत्रिका बघायच्या फंदात पडत नाही. तशी स्पष्ट कल्पना देतो आणि ज्योतिषाच्या मर्यादा समजावून सांगतो.

देवदयेने महिन्याला अमुक इतक्या पत्रिकांचे target पूर्ण करायचे बंधन माझ्यावर अजून तरी नाही... ;)

दशानन's picture

3 Sep 2009 - 9:39 am | दशानन

मी पुण्यात नाही आहे... :|

दिल्लीला असतो...
ऑनलाइन देईन.. सर्व व हे सर्व मिपावाचकांच्या समोर व्हावे ही अपेक्षा.

माझ्या काही अपेक्षा नाही आहेत मला माझं भविष्य वाचायचे आहे पुर्ण एकवर्षाचे कमीत कमी !

६०-४० चा रेशो !
४० % जरी बरोबर आले तर वरील प्रतिसादाप्रमाणे सर्व काहि !

बोला !

युयुत्सु's picture

3 Sep 2009 - 9:49 am | युयुत्सु

"माझ्या काही अपेक्षा नाही" हे मला तितकेसे मान्य नाही. सुप्त अपेक्षा या असतातच, कारण ज्योतिषाच्या "अचूकते"विषयी ब-याच जणांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. The purpose of astrology is not to predict color and brand of underwear you used on a particular day.

आणि हो, मी "उपाय" सांगत नाही (आणि म्हणून बरेचजण मला खरा ज्योतिषी मानत नाहीत).

दशानन's picture

3 Sep 2009 - 9:50 am | दशानन

अपाय व उपाय माझे मी करेन... तुम्ही फक्त सांगा... !

मदनबाण's picture

3 Sep 2009 - 9:16 am | मदनबाण

त्यांच्यात आणि तालिबान यांत फरक तो कोणता?
अंधश्रद्धानिर्मूलनवाले असा क्रॅश कोर्स शिकवत नसणार...

संपादकांना हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास तो उडवुन टाकावा...माझ्याकडुन हरकत इल्ले... ;)
मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

पर्नल नेने मराठे's picture

3 Sep 2009 - 11:35 am | पर्नल नेने मराठे

मी चुकुन वाचले की
मदनबाण आणि तालिबान यांत फरक तो कोणता?
=)) ;)

चुचु

अवलिया's picture

3 Sep 2009 - 10:02 am | अवलिया

तुम्ही अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील भविष्यकथन करता का?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

युयुत्सु's picture

3 Sep 2009 - 10:08 am | युयुत्सु

मला माहित असलेल्या एका अमेरीकन ज्योतिषाने अर्थव्यवस्था केव्हा सुधारेल हे अचूक सांगितले होते. तो Finanancial Astrologer म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने ज्योतिषात Artificial Neural Netsचा वापर सुरु केला.

मी सद्य परिस्थिती विषयी वर्तवलेले भविष्य http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html इथे वाचायला मिळेल.

अवलिया's picture

3 Sep 2009 - 10:13 am | अवलिया

आपल्या त्या लेखातील काही भाग....

शनी-हर्षल प्रतियोगाचे नमुनेदार उदाहरण आहे. दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य हा शनी-हर्षल प्रतियोगाचा स्थायीभाव आहे. वर म्ह्टल्या प्रमाणे जवळजवळ दोन वर्षे हा प्रतियोग चालू राहील. खाली या योगाच्या तारखा आणि अंश दिले आहेत.

४ नोव्हे. २००८ १८-५७ सायन कन्या-मीन
५ फेब्रु. २०००९ २०-०० सायन कन्या-मीन
१५ सप्टे. २००९ २४-४२ सायन कन्या-मीन
२७ एप्रिल २०१० २८-४६ सायन कन्या-मीन
२६ जुलै २०१० ००-२५ मेष-तूळ

सायन कन्या-मीन राशींचे फार मोठे क्षेत्र या योगात सापडल्या मुळे समाजाचा फार मोठा वर्ग या योगाच्या तडाख्यात सापडणार आहे.

यानुसार सप्टेंबर वा आक्टोबर महिन्यात शेअरबाजार परत कोसळेल असे अनुमान काढु का ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

युयुत्सु's picture

3 Sep 2009 - 10:50 am | युयुत्सु

मला सप्टेंबर मध्ये बाजार खाली यायची शक्यता जास्त वाटते. किती खाली येईल ते मी सांगू शकणार नाही कारण तो माझा अभ्यास नाही. Alphee Lavoie चे Finanacial Trader सॉफ्ट्वेअर वापरून बरेच जण ते पण सांगतात.

अवलिया's picture

3 Sep 2009 - 10:55 am | अवलिया

सप्टेंबर मधे बाजार खाली आला (किंवा नंतर आला ) तर फेडच्या चुकीच्या पॉलीसीज जबाबदार की वरची युती ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

युयुत्सु's picture

3 Sep 2009 - 11:24 am | युयुत्सु

"बाजार खाली येणार" हा भाकिताच्या दृष्टीने core issue ठरतो. युरेनस (हर्षल) ने आणलेले अस्थैर्य हे unpredictable असते. हर्षल involve असताना नक्की कशामुळे ते सांगता येत नाही हे आधुनिक ज्योतिषातले मूलभूत प्रमेय आहे.

अवलिया's picture

3 Sep 2009 - 11:27 am | अवलिया

परफेक्ट! गुड लक :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

युयुत्सु's picture

3 Sep 2009 - 3:06 pm | युयुत्सु

बाय द वे

आपण भारतीय शेअर बाजाराविषयी बोलतोय हे मी गृहित धरले आहे. तसे नसल्यास समजावे ही विनंती...

अवलिया's picture

3 Sep 2009 - 6:13 pm | अवलिया

हल्ली अमेरिकेतील शेअरबाजारात राम नसल्याने अमेरिकन कंपन्या निफ्टी करेदी करतात असे ऐकले आहे. अधिक प्रकाश तात्या टाकतील.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

3 Sep 2009 - 6:16 pm | दशानन

४६५० ते ४७५० च्या भावाने एवढी खरेदी झालेली आहे... की ह्यांच्या भविष्यकथनामुळे जर मार्केट कोसळल्... तर FII त्यांच्या घरावर मोर्चा घेऊन येतील =))

* मार्केट पडणार नाही पडणार.. हे सांगण्यासाठी जोतिष्याची गरज नाही.. चार बातम्या बघून आमचा चहा-पाण्याचा पो-या देखील सांगतो आजकाल... बॉस.. आज गिरेगी ;)

अवलिया's picture

3 Sep 2009 - 6:21 pm | अवलिया

हा हा हा असे म्हणुन तु मला स्वदेस मधील एक सीनची आठवण करुन दिलीस... आभाळात पाहुन पाउस पडेल की नाही हे सांगणारा गांवकरी !

तुझा चहावाला पो-या मुळचा कुठला रे ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विजुभाऊ's picture

3 Sep 2009 - 10:24 am | विजुभाऊ

आपल्या श्रद्धेच्या चौकटीबाहेरचे कोणते उपाय स्वीकारायचे अथवा नाकारायचे हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे.
हे स्वातंत्र्य अंधश्रद्धानिर्मूलनवाले नाकारणार असतील तर
त्यांच्यात आणि तालिबान यांत फरक तो कोणता?

तुमचे पहिले वाक्य योग्य आहे. त्याच्याशी एकदम सहमत आहे.
पण प्रश्न असा आहे की हे उपाय जेंव्हा लादले जातात तेंव्हा ते उपाय लादणाराना काय म्हणायचे?
हे असे उपाय मानसीकरीत्या किंवा अक्षरशः शारीरीक रीत्या बळजबरी करून प्रसंगी मारहाण करुनही लादले जातात त्यावेळेस काय करायचे.
तालीबानशी तुलना करायचीच तर तुम्ही दिलेली ती उपमा अतीशय योग्य आहे.
लहान लहान बालकांचे उत्तमप्रकारे ब्रेनवॉशिंग ब्रेन प्रोग्रामिंग करुन त्याना मुजाहिदीन बनवले जाते तेंव्हा आपल्याला जे शिकवले गेले ते योग्यच आहे असा त्यांचा ठाम विष्वास असतो.
स्वातंत्र्य प्रत्येक प्रकारचे असते. ते इतरांवर अत्याचार करण्याचे असते तसेच अत्याचार करुनघेण्याचेही असू शकते.
आपल्या अंधश्रद्धा/श्रद्धा इतरांवर लादण्याचेही स्वातंत्र्य असते.
इतरांच्या थोबाडीत देण्याचेही स्वातंत्र्य असते
पण हे जसे आपल्याला स्वातंत्र्य असते तसेच ते इतराना सुद्धा असते.
आपली समाज रचना ज्या पद्धतीने बनली आहे त्या रचनेत कोणी एक सांगतो म्हणून ( बाबा वाक्यं प्रमाणं) अशा गोष्टींची चलती होत गेली.
विज्ञान तुम्हाला चिकित्सक बनवते. चिकित्सेचे स्वातंत्र्य नाकारणे हे सुद्धा तालिबानी विचारांचेच द्योतक आहे.
तालीबानी ( किंवा त्यांचा वापर करून घेणारे) हे लहान मुलाना त्यांचे ब्रेनवॉशिंग करून त्याना एकांगी माहिती सांगून स्वतःचा फायदा करून घेतात त्याना असे ब्रेनवॉशिंग करण्याचे स्वातंत्र्य आहे
पण असे स्वातंत्र्य कोणी घेत असेल तर त्या विरुद्ध जनजागृती करण्याला /त्याचा विरोध करण्याला जर थयथयाट म्हणत असाल तर ते कितपत योग्य आहे?
मग "तालीबानी नक्की कोण" ठरते?
तिसरा मुद्दा : भगताचे उत्पन्नाचे साधन हिरावले जाते म्हणून त्याला आदिवासीना लुबाडण्यापासून थांबवायचे नाही?
( हे वाक्य "डाकूच्या पोटावर पाय येईल म्हणून त्याला त्याचा व्यवसाय करायला परवाने द्यावेत" अशा अर्थाने ही घेता येईल)

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

युयुत्सु's picture

3 Sep 2009 - 11:02 am | युयुत्सु

चिकित्सेचे स्वातंत्र्य नाकारणे हे सुद्धा तालिबानी विचारांचेच द्योतक आहे.

आधुनिक ज्योतिषी चिकित्सेचे स्वातंत्र्य नाकारतात असे मला तरी वाटत नाही (Atleast I feel so after understanding their views). चिकित्सा ही एकतर्फी झाली तर त्या खोडसाळ पणाच जास्त दिसतो. ती उभयपक्षाना मान्य होईल अशा रीतीनेच झाली पाहिजे.

नुकतीच (गेल्या वर्षी) अनिसने ज्योतिषाच्या चाचणी जी धूळ उडविली त्यात मी नारळीकरांना ज्योतिषाच्या चिकित्से विषयी open letter लिहिले होते. मला त्याचे आजतागायत उत्तर मिळालेले नाही. हे पत्र येथे वाचा...
http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/05/blog-post.html
या वैज्ञानिकतेला काय म्हणायचे?

अवलिया's picture

3 Sep 2009 - 11:04 am | अवलिया

नारळीकर कोण?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुधीर काळे's picture

4 Sep 2009 - 10:41 am | सुधीर काळे

उपाध्येसाहेब,
का उतरलात पुन्हा नारळीकरांवर? आपल्याला सतत इतक्या मोठ्या माणसाचा इतका दुस्वास का वाटतो कळत नाही!
कांही चांगलं बोलता येत नसेल तर कमीत कमी कांहीं वाईट तरी बोलायचे टाळा!
नाहीं म्हटले तरी महाराष्ट्रीय शास्त्रज्ञ असे किती आहेत?
मिसळपाववरील बाकीच्या सभासदांसाठी सांगतो की नारळीकर हे हॉइल-नारळीकर सिद्धांताचे जनक असून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

युयुत्सु's picture

4 Sep 2009 - 11:39 am | युयुत्सु

या चर्चेत मी नारळीकरांबद्दल वाईट काहीही बोललो नाही. मी फक्त एवढेच म्हटले की त्यांच्याकडून मी पाठवलेल्या पत्राला काहीही प्रतिसाद नाही. आपल्याला नारळीकर जेवढे मोठे वाटतात तेवढे मला वाटत नाहीत, त्याला माझी कारणे असू शकतात.

सुधीर काळे's picture

4 Sep 2009 - 12:22 pm | सुधीर काळे

राजीवजी,
मला त्याची कल्पना आहे. पण अशा पब्लिक फोरमवर कशाला बोलायचे? त्यांच्या 'शेपटा'बद्दल कशाला लिहायचे? त्या शेपटाने आपल्या Biology of Hopeवरच्या मुख्य लेखाला काय उपयोग झाला? आणि Biology of Hope कुठे, 'भापूं'नी लिहिल्याप्रमाणे त्यात ज्योतिष्यशास्त्र कुठून घुसले आणि आता नारळीकरांचे शेपूट कशाला आले त्यात?
मला नारळीकर जितके मोठे वाटतात तेवढे ते तुम्हाला वाटत नसतील. पण मोठे तर आहेतच! आणि त्यांचा असा अपमान करण्याइतके छोटे तर नाहींतच.
मराठी लोकांची मराठी लोकांनीच अशी लाज उघड्यावर का काढायची? चांद्रयान भरकटले, पण केरळीय लोक बोलले का 'इस्रो'च्या बॉसविरुद्ध? मग आपणच असे नतद्रष्ट का?
याचा जरा शांतचित्ताने विचार केल्यास माझ्यासारख्यांवर उपकार होतील.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2009 - 3:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्टेडी स्टेट थिअरी ही फ्रेड हॉयल, थॉमस गोल्ड आणि हर्मन बाँडी यांनी मांडली. पुढे त्यांच्याबरोबर जेफ्री बरब्रिज आणि प्रा. नारळीकर यांनी काम केलं.
खगोलीय जगतामधे बरेचसे कॉस्मॉलॉजिस्ट, सूडो-कॉस्मॉलॉजिस्ट आणि अ‍ॅस्ट्रॉनॉमर्स स्टेडी-स्टेट थिअरी मान्य करत नाहीत. जेव्हा कधी माझ्या कामामधे कॉस्मॉलॉजी वापरण्याची वेळ येते तेव्हा मी मराठी माणसाचा हात आहे म्हणून स्टेडी स्टेट वापरत नाही. आज आयुकामधे किती (कमी) लोकं स्टेडी स्टेटवर काम करतात हा संशोधनाचा विषय ठरेल (खरंतर ठरणार नाहीच).

मूळ मुद्दा, 'आशेच्या' लेखात नारळीकरांना ओढूनताणून का घुसवायचं, पटला. पण "चांद्रयान भरकटले, पण केरळीय लोक बोलले का 'इस्रो'च्या बॉसविरुद्ध? मग आपणच असे नतद्रष्ट का?" हे वाक्य फारच हास्यास्पद वाटलं. त्यातून चांद्रयान फक्त एका केरळी माणसाच्या प्रयत्नातून बनलं असा काहीसा अर्थ या वाक्यातून ध्वनित होत आहे; आणि हा विचार अतिशय चुकीचा आहे.

हौशी मराठी किंवा भारतीय खगोलाभ्यासकांनीही बिगबँगबद्दल पुस्तकं न वाचता, फक्त मराठी किंवा भारतीय माणसाची म्हणून स्टेडी-स्टेटचाच उदोउदो करायचा का??

कुणाचाही दुस्वास का, माणूस मोठा असो वा लहान?

अदिती

युयुत्सु's picture

4 Sep 2009 - 4:08 pm | युयुत्सु

'आशेच्या' लेखात नारळीकरांना ओढूनताणून का घुसवायचं,

मूळ लेखात नारळीकरांना कुठेही आणलेलं नाही. नंतर वर जो चिकित्सेचा प्रश्न निर्माण झाला त्यात नारळीकर आले कारण त्यांचा त्यासाठी पुढाकार होता.

-------------------------------------------------------------
भारतात वाचन कौशल्य सुधारायची नितांत गरज निर्माण झाली आहे.

सुधीर काळे's picture

4 Sep 2009 - 4:16 pm | सुधीर काळे

अदिती,
१. ते आईन्स्टाईन नसतील पण असं "शेपटाला धरून" म्हणण्याइतके छोटेही नाहींत. मोठ्या माणसाना कशाला नावे ठेवायची? तेही त्यांचे नाव घुसडून लेखकाचा लेख कुठल्याही दृष्टीने समृद्ध झाला नसतान??
२. जर इस्रोचे बॉस मराठी असते तर मराठी लोकांनी त्याला चावून खाल्ले असते यात शंका नाहीं. पण हे माझे मत आहे, तुला मान्य नसेल तर सोडून दे.
३. त्यांच्या शोधाबद्दल शेरा मारण्याइतके माझे त्या विषयात वाचन नाहीं. पण जेंव्हा त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह हा शोध लावला त्यावेळी तरी त्याची खूप चर्चा झाली व मी त्याबद्दलचा वृत्तांत टाईम या नियतकालिकात वाचला होता. त्यात नारळीकरांचं खूप कौतुकही झालं होतं. त्याला बरीच वर्षे झाली व आता कदाचित या विषयावर नवीन शोध झाले असतील जे नारळीकरांची थेअरी खोडून काढत असतील. पण म्हणून त्यांची टर उडवायची?
४. <<मूळ मुद्दा, 'आशेच्या' लेखात नारळीकरांना ओढूनताणून का घुसवायचं, पटला.>> धन्यवाद.
मुख्य मुद्दा हाच होता, इथच नव्हे पण आणखी एका फोरमवर जिथे मी आणि युयुत्सु सभासद आहोत तिथेही ते हाच प्रकार करत असतात. पण चव्हाट्यावर त्यांचा सारखा अपमान करणे चूक आहे असे माझे ठाम मत आहे.
५. <<हौशी मराठी किंवा भारतीय खगोलाभ्यासकांनीही बिगबँगबद्दल पुस्तकं न वाचता, फक्त मराठी किंवा भारतीय माणसाची म्हणून स्टेडी-स्टेटचाच उदोउदो करायचा का??>> असं मी कुठंच म्हणत नाहीं कारण तो विषय मला कळत नाहीं. हे वाक्य तू का लिहिलंस तेही कळलं नाही.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

युयुत्सु's picture

4 Sep 2009 - 3:58 pm | युयुत्सु

पण अशा पब्लिक फोरमवर कशाला बोलायचे?

नारळीकर आणि मंडळी हस्तीदंती मनो-यात बसून समाजाचे प्रश्न प्रत्यक्ष सोडविण्या पेक्षा उंटावरून शेळ्या हाकतात ते मला पसंत नाही.

ज्योतिष्यशास्त्र कुठून घुसले

या चर्चासूत्राची सूक्ष्म तपासणी आपण केलीत तर आपल्या ते सहज लक्षात येईल.

आणि त्यांचा असा अपमान करण्याइतके छोटे तर नाहींतच.

असा उठसूठ कुणाचा अपमान होत असेल तर ती व्यक्ती नक्कीच मोठी नाही.

पण केरळीय लोक बोलले का 'इस्रो'च्या बॉसविरुद्ध?

माहित नाही. पण कलामांना Physics मधले काय कळ्तं हा प्रश्न काही 'जाणते' लोक विचारत आहेत असं कानावर आले आहे.

सुधीर काळे's picture

4 Sep 2009 - 4:18 pm | सुधीर काळे

मला तुमचे उत्तर लक्ष देण्यासारखे वाटत नाहीं.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

युयुत्सु's picture

4 Sep 2009 - 4:26 pm | युयुत्सु

तुम्हाला लक्ष देण्यासारखे वाटले नाही म्हणून माझा अपमान बिपमान झाला नाही बरं का? :W तुमच्या प्रतिसादांची मला आता सवय झालेली आहे... :)

झकास. संवय होणे सहाजीक आहे कारण माझ्यासारखे असे प्रशंसक बरेच असतील म्हणा! नाहीं तरी निरर्थक उत्तरांकडे कोण लक्ष देतो?
तुम्ही मराठी गृहस्थ असल्याने तुमचा अपमान करायचाच नव्हता. तेंव्हा अपमान कसा होईल? तक्रार होती की तुम्ही का अपमान करताय प्रत्येक फोरमवरून ऊठसूठ श्री नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाचा? आणि तोही ओढून-ताणून बादरायणी संबंध जोडून!
सूर्याकडे बघून थुंकू नये.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

दशानन's picture

5 Sep 2009 - 8:56 am | दशानन

अहो !

कशाला उगाच त्रास करुन घेता तुम्हि...

सोडा... प्रतिक्रिया देण बंद करणे हा सर्वात चांगला उपाय !

;)

सुधीर काळे's picture

5 Sep 2009 - 10:24 am | सुधीर काळे

खरं आहे, राजे! सूचनेबद्दल आभार. आतापासून प्रतिसाद बंद.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

JAGOMOHANPYARE's picture

8 Sep 2009 - 11:48 am | JAGOMOHANPYARE

मी फक्त एवढेच म्हटले की त्यांच्याकडून मी पाठवलेल्या पत्राला काहीही प्रतिसाद नाही.>>>>>>>>>>>>>>>>>

मी माधुरी दिक्षित ला पत्र लिहिले आणि तिने उत्तर दिले नाही, तर मी तिची माजोरडी म्हणून निन्दा करु शकतो का ? :(

आपला मोठेपणा सिद्ध करायला आपल्याला नारळीकरान्चे सर्टिफिकेट लागते... त्याना मात्र आपल्या ( म्हणजे तुमच्या) सर्टिफिकेटची गरज नाही, यातच सगळे काही आले की ! :)

युयुत्सु's picture

8 Sep 2009 - 2:48 pm | युयुत्सु

माझा मोठेपणा सिद्ध करायला मी नारळीकरांना पत्र लिहीले नव्हते. आणि त्यांच्या कडे कसलेही सर्टीफिकेट मागायला मी गेलो नाही. त्यानी जी नसती उठाठेव आरंभली होती त्याला प्रतिसाद दिला. कृपया निरर्थक statements करु नका.

युयुत्सु's picture

3 Sep 2009 - 11:12 am | युयुत्सु

नारळीकरांचे शेपटाला धरुन ज्योतिषाच्या चाचणीची वृत्तपत्रात जाहिरात केली गेली होती...

अवलिया's picture

3 Sep 2009 - 11:17 am | अवलिया

त्यांना कुणी दिला अधिकार ?
गणित हे शास्त्र आहे का हो ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

3 Sep 2009 - 11:29 am | प्रभो

१० वी पर्यंत गणित हा वेगळा विषय होता....शास्त्रात भौतिक, रसायन आणी जिवशास्त्र होते...पुढचा महित नाय... :)

विश्वास आणि अपेक्षा महत्त्वपूर्ण आहेत.

परंतु विश्वास आणि चांगल्या अपेक्षा जागवायच्या अनेक पद्धती आहेत. त्यासाठी नेमका किती खर्च योग्य आहे, हा प्रश्न येथे उद्भवतो. खर्चाच्या दृष्टीने प्राथमिकतेची यादी लावावी लागते. त्यासाठी काही विचार करावाच लागतो. तो विचार करणे म्हणजेच श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्यात फरक करणे होय.

उदाहरणार्थ : पत्रिकेतला मंगळ जुळला तर वधूवरांची भावी सुखाबद्दलची अपेक्षा बलवान होते. एवीतेवी लग्न ठरलेच आहे, तर त्याबद्दल अधिक विश्वास वाटणे कधीही चांगले. मग पत्रिका बघून "ठरल्याप्रमाणे करा" म्हणणार्‍याला काही चिरीमिरी देण्यास काहीच हरकत नाही. "तुझ्या तोंडात साखर पडो" म्हणून खरेच मिठाई देण्यास काहीच हरकत नाही. (मिठाईबरोबर शंभर रुपये द्यावेत की लाख - हे गिर्‍हाइकाने ठरवायचे आहे.) ही फायद्याची बाजू.

पण ठरायला आलेले लग्न जर मंगळ न जुळण्याने मोडणार असेल, समजा. किंवा लग्न होईल पण वधूवरांना थोडा अविश्वास वाटणार असेल, म्हणा. तर तो तोटा आहे. अशा परिस्थितीत अविश्वासामुळे न्यूरोट्रान्मिटर बिघडले तर ते विकतचे दुखणे टाळण्यासारखे आहे. हे दुखणे घ्यायचेच तर नेमके किती किमतीला विकत घ्यावे? शंभराला घ्यावे की लाखाला?

आता "व्यक्तिगत" असण्याबद्दल. वधूपक्षाने "व्यक्तीचा प्रश्न" म्हणून पत्रिकेवरून लग्न मोडले, तर वरपक्षाचेही हवे असून-नसून लग्न मोडलेच जाते. मग हा प्रश्न "व्यक्तीचा" कसा राहिला?

थोडक्यात ज्या गोष्टींना बाजारभाव असतो, त्यांच्यापैकी फारच थोड्या गोष्टी खरोखर व्यक्तीच्या अंतर्गत सीमित असतात. अशा परिस्थितीत जमेल तितका वस्तुनिष्ठ विचार करावा लागतो. किंवा विचारांचा जो भाग वस्तुनिष्ठ नाही, त्याबाबत ज्यांचा-ज्यांचा का खर्च होणार असतो, त्या सर्वांची जाणूनबुजून अनुमती लागते.

अर्थव्यवस्था ही मुक्त असली तरी त्यावर विक्रेता-गिर्‍हाइकांना समसमान माहिती असण्याचे बंधन असते. या बंधनाशिवाय व्यवहार मुक्त होतच नाही. फायद्यातोट्याबद्दल माहिती पसरली तर झाडफूंकवाला-भानामतीपीडित, किंवा ज्योतिषी-जातक यांच्यामधील व्यवहार अधिक स्वायत्त होऊ शकतात. अशा माहितीप्रसाराला "स्वातंत्र्य हिरावणे" असे लेखकाने कसे काय म्हटले आहे, ते मला कळले नाही. मग पुढची तालिबानाची उपमा समजणे तर दूरच राहिले.

युयुत्सु's picture

4 Sep 2009 - 9:10 am | युयुत्सु

सहसा शहाणे लोक पत्रिका जुळत असेल तर लग्नाचा प्रस्ताव पुढे नेतात. आपण म्हणता तशी वेळ संख्येने फार कमी येते.

"एकमेकांबद्दल विश्वास, प्रेम, सहजीवनाची आकांक्षा असणे ही प्राथमिक पायरी असावी," हे तुम्ही शहाण्या लोकांच्या विवाहासाठी गृहीतक मानत नाहीत.

मग हे असले शहाणे लोक असे दु:ख सांगतात : "विवाह समारंभात एकमेकांना दिलेल्या वचनांना अर्थ नाही." त्याचे आश्चर्य वाटत नाही.

गृहीतक कळले की बाकी वाद कळतो : आता तुमचे गृहीतक कळले आहे, (शहाणे लोक पत्रिका बघून मग सप्तपदी चालतात) आणि तुमचा बाकीचा वाद त्या गृहीतकाशी सुसंगत वाटतो आहे.

अर्थात याचे तुमचा उपदेश असा, की शहाण्यांनी सप्तपदीतली वचने देऊ घेऊ नयेत. पत्रिका बघणार्‍या शहाण्यांनी वचने देऊ-घेऊ नयेत याबद्दल मी तुमच्याशी सहमत आहे.

आता तुमच्या-माझ्या "शहाणपणा" शब्दाच्या व्याख्या मात्र वेगवेगळ्या आहेत. (व्याख्या सुद्धा एका प्रकारे गृहीतकेच असतात). मिसळपावावरच्या विवाहेच्छुक शहाण्यांनी प्रेम, विश्वास संपादन करावा, आणि सप्तपदीच्या वचने जरूर द्यावीत-घ्यावीत असे मला वाटते.

बघा! गृहीतके आणि व्याख्या समजल्या की तुमचा वाद पूर्ण मान्य करायला कोणीही तयार होईल.

माझी भूमिका ब-याच जणाना समजली नाही असं आता लक्षात येत आहे. आणि आपले हे "एकमेकांबद्दल विश्वास, प्रेम, सहजीवनाची आकांक्षा असणे ही प्राथमिक पायरी असावी, हे तुम्ही मानत नाही" हे विधान तर चक्क आरोप आहे.

माझा मूळ मुद्दा असा आहे -

१. शहाण्या लोकानी लग्नाचा प्रस्ताव पुढे नेल्यावर (पत्रिका बघून अथवा न बघून ) योग्य कायद्याखाली लग्न करावे. म्हणजे arranged marraige असेल तर Special Marraieg Act आणि परिचयोत्तर विवाह असेल तर हिंदू विवाह कायदा (सप्तपदी इ.). याचे कारण असे -

आपण म्हणता त्या प्राथमिक पायरीवर ("एकमेकांबद्दल विश्वास, प्रेम, सहजीवनाची आकांक्षा ") स्त्रीला पाउल टाकता आले नाही तर तीला काहीही किंमत मोजावी लागत नाही. ४९८-अ खाली खोटी केस करून तीला घट्स्फोट मिळवता येतो. पण या प्राथमिक पायरीवर पुरूषाने पाउल टाकले नाही तर कायदा त्याची जबरदस्त किंमत पुरुषाला मोजायला लावतो.

विवाह वचनांना अर्थ अशासाठी नाही कारण ती वचने न पाळली गेली नाहीत तर दोघांना समान penalty नाही.

पुरुषांनी स्त्री मुक्तीच्या काळ्या बाजूचा बोध घ्यावा आणि त्याचे भान ठेवून बोहल्यावर चढावे एवढेच मला सांगायचे आहे.

नितिन थत्ते's picture

7 Sep 2009 - 10:33 pm | नितिन थत्ते

तुमची स्त्रीमुक्तीविषयक मते (मिपावरील) लोकांना पटत नाहीत याचे कारण बहुधा अशी (खोट्या खटल्यांची) अ‍ॅबरेशन गृहीत धरून सुद्धा एकूण समाजव्यवस्था स्त्रियांच्यासाठी भयंकर अन्यायकारक आहे या वस्तुस्थितीची त्यांना जाणीव आहे.

कुणातरी मिपाकराच्या मित्राने हा अनुभव घेतला असूनही बहुधा वरील मताशी तो मिपाकरही सहमत होईल.

४९८-अ चा सरसकट गैरवापर होतो हा तुमचा दावाही कुठल्याच वस्तुस्थितीवर टिकणारा नाही.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

पुरुषांनी त्यांची वेदना व्यक्त करणे हे जो पर्यंत unmanly समजले जाईल तो पर्यंतच तुम्ही करता त्या युक्तीवादाचे अस्तित्व असेल. पुरुषाना आपल्यावर अन्याय झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग पण थोडे आहेत.

परंतु अनेक वृत्तपत्रे आता या पुरूषांच्या वेदनेची दखल घेतात ही स्वागतार्ह बाब आहे.

४९८-अ चा सरसकट गैरवापर होतो हा तुमचा दावाही कुठल्याच वस्तुस्थितीवर टिकणारा नाही.

yahoo वर Save Indian Family आणि My Nation हे दोन मदतगट ४९८-अ पीडितांसाठी कार्यरत आहेत. तिथे गेलात तर प्रत्यक्ष वस्तूस्थितीची कल्पना येईल.

जोपर्यंत झळ बसत नाही तोपर्यंत समस्या नाकारायची आणि मग पुरेशी किंमत मोजून शहाणे व्हायचे ही भारतीयांची प्रवृत्ती आहे. तुमची मते त्या मनोवृत्तीची निदर्शक आहेत. मला त्याचे नवल नाही.

पुरुषांनी त्यांची वेदना व्यक्त करणे हे जो पर्यंत unmanly समजले जाईल तो पर्यंतच तुम्ही करता त्या युक्तीवादाचे अस्तित्व असेल. पुरुषाना आपल्यावर अन्याय झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग पण थोडे आहेत.

परंतु अनेक वृत्तपत्रे आता या पुरूषांच्या वेदनेची दखल घेतात ही स्वागतार्ह बाब आहे.

४९८-अ चा सरसकट गैरवापर होतो हा तुमचा दावाही कुठल्याच वस्तुस्थितीवर टिकणारा नाही.

yahoo वर Save Indian Family आणि My Nation हे दोन मदतगट ४९८-अ पीडितांसाठी कार्यरत आहेत. तिथे गेलात तर प्रत्यक्ष वस्तूस्थितीची कल्पना येईल.

जोपर्यंत झळ बसत नाही तोपर्यंत समस्या नाकारायची आणि मग पुरेशी किंमत मोजून शहाणे व्हायचे ही भारतीयांची प्रवृत्ती आहे. तुमची मते त्या मनोवृत्तीची निदर्शक आहेत. मला त्याचे नवल नाही.

रामपुरी's picture

4 Sep 2009 - 2:41 am | रामपुरी

जो लेख उघडतो तो एकतर ज्योतिषाबद्दल असतो नाहीतर नाडीबद्दल. या ज्योतिष आणि नाडीवाल्याना वेगळा विभाग का काढून देत नाही? म्हणजे प्रश्न मिटला. काय घालायचा तो घाला गोंधळ तिकडे... त्या विंग कमांडरना तर एक वेगळी साईट्च लागेल. असो. बराच वेळ फुकट गेला हा प्रतिसाद टंकताना. नाडी आणि ज्योतिषाची एवढी लायकी नाही.

युयुत्सु तुम्ही 'वड्याचे तेल वांग्यावर' अशी पाककृती का नाही टाकत सरळ ??

जेरी ग्रुपमान तुम्हारा चुक्याच... हे पुस्तक नसते लिहिलेस तर बरे झाले असते यार!

टुकुल's picture

4 Sep 2009 - 3:43 am | टुकुल

झालेत बहु आणी होतीलही बहु, पर या सम हा...

वैतागलेला,
टुकुल.

पारंबीचा भापू's picture

4 Sep 2009 - 7:56 am | पारंबीचा भापू

१) इथे युयुत्सूंनी Anatomy of Hope मधील Biology of Hope या धड्याबद्दल लिहिले असतांना सगळे मिसळखाऊ "यकायक" भविष्यावर का तुटून पडले?
२) Biology of Hope मध्ये उल्लेखलेले "आशेने बरे होऊ शकणारे आजार" psycho-somatic असतील तर बरे होऊ शकतील. पण स्पाँडेलायटीस, अपेंडिसायटिस किंवा क्षयरोग Biology of Hopeने बरे होतील असे वाटत नाही! युयुत्सूंनी याचा उलगडा करावा.
(आशावादी माणसाचा मेंदू काही विशिष्ट रसायने (Neurotransmitters) तयार करतो आणि त्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया लवकर घडून येते, असे काहीसे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.)
भापू

सहज's picture

4 Sep 2009 - 8:15 am | सहज

>सगळे मिसळखाऊ "यकायक" भविष्यावर का तुटून पडले?

कारण असे असु शकते की ... युयुत्सु रावांचा एक सुचित प्रतिवाद असा असेल की तुम्हा लोकांचा भविष्यावर नाही ना विश्वास नका ठेवू पण असे काही लोक असतील ज्यांना ज्योतिष पाहून भविष्याबद्दल एक नवी आशा मिळून ते खुश रहात असतील तर राहू द्या (पक्षी: ज्योतिषाचा धंदा चालू दे ना.)

एक अंदाज हा... ;-)

बाकी चालू द्या. ज्योतिष धंदा इतक्यात अजिबात मरणार नाही. मला ज्योतिषांच्या त्या ग्रहतारे ज्ञानाचे,अभ्यासाचे, त्या आधारे काही स्वभाववर्णनाचे कौतुक वाटते. खरे खोटे किंवा त्याचा अतिरेक वाटेल असा वापर किंवा पाठपुरावा पटत नाही. यश-अपयश जीवनाचा भाग आहेत व अनेक मार्गाने काही गोष्टी साध्य होतात तर काही नाही.

आत्मविश्वास / सकारात्मक दृष्टिकोन व प्रयत्नांची जोड असेल तर बरेचदा यश मिळते हा अनुभव आहे.

देवाशप्पथ खरं सांगतो. हे पुस्तक मला पूर्ण वाचवले नाही (त्याची कारणे वेगळी आहेत आणि मी त्या बद्द्ल इथे बोलू इच्छित नाही). डॉ. ग्रुपमान हा Oncologist म्हणजे कॅन्सरतज्ञ आहे. त्यामूळे पुस्तकातली सर्व उदा कॅन्सरग्रस्तांची आहेत. त्याला एक अपवाद डॉ. ग्रुपमानचा स्वतःचा - त्याला ruptured lumbar disc चा त्रास झाला. तो लिहितो -

Personal experience opened my mind. For some nineteen years after failed spine surgery, I lived in a labyrinth of relapsing pain and debility. Then through a series of chance circumstances I found an exit. I felt I had been given back my life. I recognized that only hope could have made my recovery possible.

...

As a scientist I distrusted my own experience and set out on personal journey to discover whether energizing feeling of hope can in fact contribute to recovery. I found that there is an authentic biology of hope.

पुढे एके ठिकाणी तो म्हणतो - I had learnt from George that every patient has right to hope, despite long odds, and it was my role to help nurture that hope.

मी डॉक्टर नसल्याने एवढेच भाष्य आपल्या प्रश्नावर करू शकतो.

आत्मविश्वास / सकारात्मक दृष्टिकोन हा व्यक्तीचा मूळ स्वभाव हा भोवतालची परिस्थिती या दोन्हीवर अवलंबून आहे.

गीते मधला पुढील श्लोक आपल्याला ठाऊक असेलच...

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं|
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पंचमम् ||

शैलेन्द्र's picture

5 Sep 2009 - 6:10 pm | शैलेन्द्र

शास्त्र कशाला म्हणतात? जी गोष्ट स्थलकाल निरपेक्षपणे वारंवार वर्तवता येते त्याला... ज्योतिष या निकषावर कोठेही बसत नाही. मुळात ज्योतीषशास्त्राला नैसर्गीक शास्त्रांचा आधार नाही. स्वत:च मांडलेल्या गृहीतकांवर स्वत:च निष्कर्ष चघळत बसणे याला मी तरी शास्त्र मानत नाही.

Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.

युयुत्सु's picture

5 Sep 2009 - 6:31 pm | युयुत्सु

ज्योतिषाला शास्त्र म्हटले नाही म्हणून माझे काहीही बिघडत नाही आणि ज्योतिषाची उपयुक्तता पण कमी होत नाही. तो मूळ लेखाचा विषय पण नाही.

विजुभाऊ's picture

7 Sep 2009 - 3:33 pm | विजुभाऊ

मिपावरचया सर्वात जास्त तारांकीत( चांदण्यांकीत) धाग्यांपैकी हा एक आहे हे नि:संशय.
या धाग्यात मूळ विषयापेक्षा इतर;असे संदर्भीत नसलेले बरेच अवांतर प्रतिसाद आहेत

सबब या धाग्याला अवांतरश्री असे जाहीर करावे.

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे