मिरजेत अफजलखानावरून दंगल

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
3 Sep 2009 - 2:07 am
गाभा: 

कालच मिरजेत गणपतीच्या मिरवणूकीच्या रस्त्यावर अफझलखान वधाचा प्रसंग दाखवणारी कमान बनवल्यामुळे समाजातील एक गट दुखावला (ओळखा पाहू कुठला गट असेल तो?) आणि मग दंगल, जाळपोळ, अश्रूधूर, कर्फ्यू वगैरे कार्यक्रम झाले.
इथे बातमी वाचायला मिळेल.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4965639.cms

मला वाटते की महाराष्ट्रात रहाणार्‍या मुस्लिम लोकांनी अफझलखानाला खलनायक मानले पाहिजे. हा देश शिवाजीला हिरो मानणार्‍यांचा आहे तसा अफझलखानाला हिरो मानणार्‍याचाही आहे असे सेक्युलर लोक म्हणतील पण ते मला पटत नाही.
तुमचे काय मत? अफझलखानाच्या वधाचे असे प्रदर्शन करणे काही मुस्लिमांच्या भावना दुखावतात म्हणून चुकीचे मानायचे काय?

प्रतिक्रिया

प्रभो's picture

3 Sep 2009 - 2:15 am | प्रभो

आवरा रे.........अशा वागण्याने कोणाचच भलं होत नाही...
५-६ वर्षांपूर्वी सोलापूरला नवरात्री नंतर अशीच दंगल झाली होती...४ दिवस संचारबंदी होती नंतर..

मिसळभोक्ता's picture

3 Sep 2009 - 3:31 am | मिसळभोक्ता

हा देश शिवाजीला हिरो मानणार्‍यांचा आहे तसा अफझलखानाला हिरो मानणार्‍याचाही आहे असे सेक्युलर लोक म्हणतील पण ते मला पटत नाही.

हा देश जनरल वैद्यांना हीरो मानणार्‍यांचा आहे, तसाच भिंद्रानवालेला हीरो मानणार्‍यांचा आहे.

कारसेवक, आणि मुलायमसिंग...

इंदिरा गांधी, बियंतसिंग..

राजीव गांधी, थनू...

-- मिसळभोक्ता

सुहास's picture

3 Sep 2009 - 6:07 am | सुहास

मग दंगल, जाळपोळ, अश्रूधूर, कर्फ्यू वगैरे कार्यक्रम झाले.

झाले की करवण्यात आले?

बाकी मिरजेचा गेल्या काही वर्षांचा इतिहास या बाबतीत लै बेकार आहे, म्हणा...! पण बाप्पा करो आणि हा प्रकार इथेच थांबो...!

--सुहास.

मिरजेत उरुसाच्या वेळेला संगीत महोत्सव असतो त्यात सगळे मान्यवर कलाकार हजेरी लावून जातात, अशा ठिकाणी धर्म आड येत नाही, असे असताना धार्मिक सलोखा टिकवणे इतके कठिण जाऊ नये.
पण काळाबरोबर गोष्टी बदलतात हे खरे.

(खिन्न)चतुरंग

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Sep 2009 - 1:02 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खरच चतुरंगांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही देखील मिरासाहेबाला मलिद्याचा(आपण सोळा सोमवारला करतो तसा कणकेचा चुर्मा)नैवैद्य घेउन जात होतो.बाबा म्हणायचे की तिथे पुजेच्या मानात चांभाराचा मान आधी असतो.इथे जातीविषयी बोलायचे नसुन हिंदुही मिरासाहेबाला मानतात हे सांगायचा हेतु.आम्ही तर त्या दर्ग्यातली वाळु आणायला नेहमी जायचो.(त्यामुळे साप येत नाहीत असा समज होता.)साधारण बारा,तेरा वर्षापुर्वी मिरज सोडले तेंव्हातर हळदीकुंकू घ्यायला पण मुसलमान बायका आमच्या घरी येत्.त्या कपाळाला कुंकू न लावता गळ्याला लावुन घेत असत्.आमच्या घरचा कडीलिंब घ्यायला येणारा बागवान त्याची धाकटी मुलगी रेश्मा आणी मी अगदी सारख्या दिसायचो त्यामुळे तो नेहमी आजीला म्हणायचा की "हमारी रेश्मा तुम रखो हम इसे ले जाते है"सांगायचा मुद्दा की, ते कोणी परके आहेत असं कधीच वाट्ले नाही.

sujay's picture

3 Sep 2009 - 7:26 am | sujay

अफजल खान वधाच चित्र लावल म्हणुन राग का यावा कुणाला?

हा देश शिवाजीला हिरो मानणार्‍यांचा आहे तसा अफझलखानाला हिरो मानणार्‍याचाही आहे असे सेक्युलर लोक म्हणतील पण ते मला पटत नाही.

+१
असेच म्हणतो.
ज्याला महाराजां विषयी आदर नाहि त्याला महाराष्त्रात
रहायचा अधीकार नाही ,हे माझे मत आहे.

( शिवरायांचा भक्त) सुजय

विशाल कुलकर्णी's picture

3 Sep 2009 - 9:22 am | विशाल कुलकर्णी

अफजलखानाचा वध ही मुळात शिवाजी आणि अफजलखान यांच्यातली लढत नहतीच. ती लढत होती एक देशभक्त आणि एक आक्रमक यातली. पण एवढेच असते तर काही हरकत नव्हती. कारण हल्ला हे आक्रमकाचे कर्तव्यच असते.
पण हा सामना होता सुष्ट आणि दुष्ट यातील. शिवरायांनीही शत्रुप्रदेशातील अनेक भागांवर हल्ले केले, ते भाग जिंकले पण त्यांनी कधीही त्या भागातील मशिदींना नुकसान नाही पोचवले, तिथल्या आयाबहिणी नाही नासवल्या. अफजलखानाने नेमके हेच केले, इथली मंदीरे फोडली, श्रीमुर्ती तोडल्या, आयाबहिणी नासवल्या. त्यामुळे त्याला शासन होणे आवश्यक होते. त्यातुनही तो स्वराज्य नष्ट करायला आला होता. त्यामुळे तो एक पुर्ण खलनायकच होता.
त्यामुळे तो खलनायकच आहे.
दंगलीचा जाहीर निषेध !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अमोल केळकर's picture

3 Sep 2009 - 11:06 am | अमोल केळकर

चला विधानसभा निवडणूकीसाठी चांगला मुद्दा मिळाला. बघुया सांगली जिल्ह्यात याचा काही फायदा होतो का युतीला ते ?

(सांगलीकर मतदार ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विधानसभेची पुर्वतयारी सुरु आहे. बाकी असले प्रकार म्हणजे जनतेच्या विकासाला लाथ मारुन स्वतःचा विकास साधन्याचे योग्य माध्यम आहे.

जाणीवपुर्वक वाद निर्मान करणे आणि त्याला धर्माचे स्वरूप द्यायचे हा धन्दा आहे काही लोकान्चा. पेकाटात लाथ घाला अशा व्रुत्तीन्च्या.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

वि_जय's picture

3 Sep 2009 - 12:40 pm | वि_जय

मिरजेत अफजलखानावरून दंगल

यात नविन काय? अहो या राज्यकर्त्यांनी एकगठ्ठा मतांसाठी स्वत्;ची सुं*करवूनच घेतलीय, बर दंगलीत यांच्यातला एखादा चुकून मेला तर सोनियांपासून शरद पवारांपर्यंत आणि अमरसिहापासून मुलायमपर्यंत सांत्वनासाठी धावणार व लाखो रुपयांची मदत जाहीर करण्याची अहमहमीका लावणार..

केवळ त्यांच्या भावना दुखावतात म्हणून चौथीच्या पुस्तकातील अफझलखान वधाचा धडा वगळण्याचा विचार करणारयांच्या राज्यात काय अपेक्षा ठेवणार?.

एक खर.. अफजलखान मेल्यावर फाजलखान त्याच्या मढ्यासाठी रडला नसेल.. पण हे अजूनही अश्रू ढाळतायत...

शिवबाराजे.. तुमच चुक्याच...
का हो? का? वध केलात तुम्ही अफजलखानाचा??

नम्रता राणे's picture

3 Sep 2009 - 12:58 pm | नम्रता राणे

शिवबाराजे.. तुमच चुक्याच...
का हो? का? वध केलात तुम्ही अफजलखानाचा??

»

१००% टक्के सहमत...
(महाराज आम्हा पामरांना क्षमा करावी.)

मदनबाण's picture

3 Sep 2009 - 2:14 pm | मदनबाण

मला वाटते की महाराष्ट्रात रहाणार्‍या मुस्लिम लोकांनी अफझलखानाला खलनायक मानले पाहिजे.
हा.हा.हा.... अफझलखानाला संत मानणारी आणि त्याच्याकडे मन्नत मागणारी मंडळी सुद्धा एकदा टिव्हीवर दाखवली होती.
असो या दगाबाजाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला ते शस्त्र फार सुरेख आहे. :--
http://upload.wikimedia.org/wikipedia/en/c/cf/Wagh_nakhi_Tiger_Claws_Wea...
बाकी हे पण वाचा :--
http://www.indianexpress.com/oldStory/54755/
मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

धमाल मुलगा's picture

3 Sep 2009 - 4:07 pm | धमाल मुलगा

वल्लाह! क्या बात है|
हे काफर लोग आमच्या मरहुम खाँ अफजलबाबाची इतनी बेईज्जती करतात म्हणजे काय?

कोण तो एक सिवा...सह्याद्रीमें छुपनेवाला चुव्वा, उसने दगाबाजीसें अफजलबाबाचा कत्ल केला तर तो मोठा नामचिन झाला! पण अफजलबाबांनी इतने काफरोंका मजहब बदलायसाठी जो खौफ पैदा केला त्यानं काफर कम झाले तर त्यांची ही बेअदबी? ला हौल विलाकुवत!

अरे कर्मदरिद्री मरहट्ट्यांनो, ज्या अफजलखानानं आई तुळजाभवानीवर घण घातले..देखो ये हिम्मत, सगळ्यांच्या उरात धडकी भरवली त्याचा इतका अपमान करता? छे छे छे!!!
अरे, सजदे करो सजदे!!
=======================

बाकी, आचारसंहिता आणि अमुक अन तमुक अशी कारणं सांगितली जाताहेत म्हणे!
स्वराज्य नासवायला आलेल्या शत्रुला लोळवणार्‍या महाराजांचा हा देखावा लावायला कसली आलीये निवडणुक आयोगाची परवानगी? उद्या हे लोक काय आम्हाला राममंदीरात नमस्कार करायला जातानाही आयोगाची परवानगी आहे का ते विचारणार का?
आज अफजलखानावरुन वाद घालताहेत, उद्या कसाबला कोणी शिव्या घातल्या..त्याला शिक्षा व्हावी म्हणुन काही आंदोलन्/मोर्चा काढला तर त्यावरही हे 'खाल्ल्या ताटात हगणारे' दगडफेक करतील!!!!

बर्‍याचवेळा अल्पसंख्य समाजाला डिवचण्याचा प्रकार मिरवणुकवाल्यांकडुन होतो.म्हणजे गणपती किंवा इतर मिरवणूक मुद्दामून अल्पसंख्य भागातून न्यायची आणि जाता जाता दगड मारायचे. मग त्यांनी चिडून काही केले की मग 'अल्पसंख्य लोकानी मिरवणूकिवर दगड मारले' असे बोंबलायचे. असो.

@ श्री. अमित अभ्यंकर,
खरोखरच असं होतंय का हो? नाही, विथ ड्यु रिस्पेट टू युअर स्टेटमेंट & ओपिनियन, माझ्या आणि इतर मित्रांच्याही पाहण्यात ह्याच्या उलटी परिस्थिती आहे म्हणुन म्हणलं... बरेचसे वैयक्तिक अनुभवही आहेत ह्या विषयातले...म्हणुन विचारतोय.

अशा दंगली होतात त्याला कारण म्हणजे ह्या धेडगुजर्‍यांची मग्रुरी...फुक्काटची!!!
बरं गेलो आम्ही घेऊन सोकॉल्ड अप्लसंख्य भागातून मिरवणुक घेऊन...वाट वाकडी करुन तर नेलेली नसते ना? प्रशासन, पोलीस आणी मंडळं ह्यांच्या समन्वयानं दरवर्षी ज्या ठरलेल्या रस्त्यावरुन मिरवणुक नेतात तोच रस्ता असतो ना? की हा ठराविक भाग पाकीस्तानाकडं गहाण टाकलेला असतो?
दगडफेक होते कारण मिरवणुकीत नाचणारे भगवे झेंडे शेवाळालेल्या नजरांना सहन होत नाहीत!... दंगल होते कारण दररोज मदरशांमधून कानात भारत आणी हिंदूद्वेषाचं वीष ओतलं जातं....
----------------------------

जाऊ द्या...जिथं देशातले सर्वोच्च निर्णयकर्ते ह्यांच्यापुढे लोटांगणं घालतात...ह्यांच्या थुंक्या झेलतात तिथं तुम्ही आम्ही सामान्य नागरीक काय आणी किती कंठशोष करणार?

सगळॅच कुरवाळा तिच्यायला ह्यांच्या दाढ्या !!!

कोण तो एक सिवा...सह्याद्रीमें छुपनेवाला चुव्वा, उसने दगाबाजीसें अफजलबाबाचा कत्ल केला तर तो मोठा नामचिन झाला! पण अफजलबाबांनी इतने काफरोंका मजहब बदलायसाठी जो खौफ पैदा केला त्यानं काफर कम झाले तर त्यांची ही बेअदबी? ला हौल विलाकुवत!
अहो धर्माचा अंध चश्मा वापरणे सोडुन द्या. अफजल खानाचे कितीतरी सहकारी, सैन्य इतकेच काय तर त्याचा वकिल हे सुध्दा हिंदुच होते, ते कसे ? अफझल खानावर जातीय वादी धर्मांध असे आरोप करतांना त्याच्या वकिलाने केलेला पराक्रम सुद्धा तितक्याच मोठ्या मनाने सांगा. आयुष्यभर महाराजांवर वार करण्याची कुणाची छाती झाली नाही ते महान कार्य या हिंदु वकिलानेच अफझल वधाच्या वेळी केले हे पण सांगा.

केवळ हिंदु-मुस्लिम दंगे भडकावे अश्या हेतुने एकांगी वागु नका.

सत्य पुर्णपणे सांगा .... अर्धसत्य नको.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

धमाल मुलगा's picture

3 Sep 2009 - 5:12 pm | धमाल मुलगा

_/\_

म्हाराज, मराठीमध्ये एक 'उ प हा स' नावाचा प्रकार असतो ह्याची तुम्हाला माहिती आहे असं समजुन विनंती करतो की तो प्रतिसाद पुन्हा वाचावा :)

बाकी, एकांगी विचार करायला आणी सत्याचं अर्धसत्य, सत्यसदृश वायफळ बडबड हे प्रकार करायला आमच्याकडं मा म देशमुख किंवा कोकाट्यांइतकी संपन्न विद्वत्ता नाही हो!

बाकी, एकांगी विचार करायला आणी सत्याचं अर्धसत्य, सत्यसदृश वायफळ बडबड हे प्रकार करायला आमच्याकडं मा म देशमुख किंवा कोकाट्यांइतकी संपन्न विद्वत्ता नाही हो!

आमच्याकडे ही ब. मो. पुरंदरे, गजानन मेहेंदळे आदी महान(!) व्यक्तिंसारखी खोटा इतिहास केवळ द्वेषाच्या भावनेतुन मांडणे हेच एक्मेव कर्तुत्व सांगण्या इतकी संपन्न विद्वत्ता नाही हो!

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

निल७१३'s picture

5 Sep 2009 - 1:58 pm | निल७१३

इतिहास कोणी प्रसिध्द केला यापेक्शा तो लोकांसमोर आणला हे महत्वाचे. आपले पुर्वज काय करत होते ते माहित नसते पण कोणीतरी अभ्यास करुन दिलेल्या माहितीचा विरोध करणारांचा निषेध.

निल

रम्या's picture

4 Sep 2009 - 4:29 pm | रम्या

>>अहो धर्माचा अंध चश्मा वापरणे सोडुन द्या. अफजल खानाचे कितीतरी सहकारी, सैन्य इतकेच काय तर त्याचा वकिल हे सुध्दा हिंदुच होते, ते कसे ? अफझल खानावर जातीय वादी धर्मांध असे आरोप करतांना त्याच्या वकिलाने केलेला पराक्रम सुद्धा तितक्याच मोठ्या मनाने सांगा. आयुष्यभर महाराजांवर वार करण्याची कुणाची छाती झाली नाही ते महान कार्य या हिंदु वकिलानेच अफझल वधाच्या वेळी केले हे पण सांगा.
<<

मजकूर संपादित

अफजलखान वधाच्या वेळेस महाराजांवर एका हिंदूने हल्ला केला म्हणून दंगलीचं समर्थन!! वा! वा!!

आम्ही येथे पडीक असतो!

अरे कर्मदरिद्री मरहट्ट्यांनो, ज्या अफजलखानानं आई तुळजाभवानीवर घण घातले..देखो ये हिम्मत, सगळ्यांच्या उरात धडकी भरवली त्याचा इतका अपमान करता? छे छे छे!!!
अरे, सजदे करो सजदे!!

आई तुळजाभवानीचे मंदिर आणि मुर्तीमंत रूप आजही तसेच्या तसे आहे. छ. शिवराय यांनी खेळलेल्या युद्ध् नितीनुसार ती अफवा पसरविण्यात आलि होती. ज्यायोगे अफझल खानाचे हिंदु सहकारी बिथरतील अन त्याविरोधात उभे राहतील. परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. त्याच्याशी इमान राखणारे महाराजांवर वार करायला उभे ठाकले हे सर्व श्रुत आहे.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

धमाल मुलगा's picture

3 Sep 2009 - 6:05 pm | धमाल मुलगा

आमच्याकडे ही ब. मो. पुरंदरे, गजानन मेहेंदळे आदी महान(!) व्यक्तिंसारखी खोटा इतिहास केवळ द्वेषाच्या भावनेतुन इतिहास मांडणे हेच एक्मेव कर्तुत्व सांगण्या इतकी संपन्न विद्वत्ता नाही हो!

फु ट लो!!!!

एकुणातच..... चालुद्या!!!!!

>>दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.<<
हे बाकी फार्फार्फार्फार्र महत्वाचं बरं का! ;)

असो,
ह्या धाग्यावरचा हा आमचा शेवटचा प्रतिसाद!!!
बाकी चालुद्या :D

बरं बाबा तुझी ईस्टमनकलर, आमची भगवी !
च्यायल्या, ह्या असल्या लोकांना आधी हाणायला पाहिजे ! X(

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

निमीत्त मात्र's picture

4 Sep 2009 - 9:00 pm | निमीत्त मात्र

हो ना गुजरात मधे हाणले तसे! ह्यांना मोदीच पाहिजे.

विशाल कुलकर्णी's picture

15 Sep 2009 - 10:28 am | विशाल कुलकर्णी

हिरव्यांना हाणायला अनेक मोदी तयार होतात हो. पण पांढर्‍या बुरख्याखाली लपलेल्यांना कोण हाणणार? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2009 - 4:16 pm | बिपिन कार्यकर्ते

खरं खोटं माहित नाही, म्हणजे, नक्की काय घडलं त्याची नक्की माहिती नाही. पण काहीही कारण असले तरी अफजलखानवधाचा देखावा हा कोणाच्याही भावना दुखावणारा विषय होऊच कसा शकतो? त्याने केलेले अत्याचार हे एक ऐतिहासिक सत्य आहे (म्हणजे आज पर्यंत तरी, उद्या कोणी तसे नव्हते हे सिद्ध केले तर भाग वेगळा), शिवाय त्याचा झालेला वध हेही एक ऐतिहासिक सत्य आहे, त्याच्या वधानंतर खुद्द त्याचा वध करणार्‍या राजांनी त्याचा यथोचित सन्मान करून दफन केले हेही एक सत्य आहे. इतके सगळे असताना जर का भावना वगैरे दुखावत असतील तर मात्र हे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे.

बिपिन कार्यकर्ते

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

4 Sep 2009 - 11:38 am | अमित बेधुन्द मन...

हा देश शिवाजीला हिरो मानणार्‍यांचा आहे

त्या दगाबाज अफझल खानाच वध दाखवने यात गैर ते काय
ते एक सत्य आहे आनि त्याचा स्विकार करावाच लागेल

जय भवानि जय शिवाजि

योगी९००'s picture

4 Sep 2009 - 1:32 pm | योगी९००

मला आठवते, की मी एकदा प्रतापगडला गेलो असता, तेथे अफझल खानाच्या थडग्याबाहेर उभा होतो.

बाहेर एक मुस्लिम बाई आपल्या मुलाला सांगत होती, " महान संत(?) अफझलखानाचा त्या शिवाजीने फसवून खुन केला".

मी मध्येच तोंड घालून त्यांना खरे सांगायचा प्रयत्न केला आणि त्या बाईच्या चेहर्यावर "इस्लाम खतरे में " चे भाव उमटले आणि ती लगबगीने तेथून निघून गेली.

आत्ता तुम्हीच सांगा की बाळकडू जर असे मिळत असेल तर मोठेपणी तो मुलगा आपल्या महाराजांविषयी काय विचार करत असेल ?

आपला,
(देशभक्त आ़णि शिवभक्त) खादाडमाऊ

भोचक's picture

4 Sep 2009 - 7:05 pm | भोचक

कठीण आहे बुवा.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

अविनाशकुलकर्णी's picture

6 Sep 2009 - 12:16 am | अविनाशकुलकर्णी

क्रियेविणा वाचाळता व्यर्थ आहे..
षंढांच्या निषेधाला शुन्य किंमत आहे
जय जय रघुविर समर्थ....

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Sep 2009 - 4:46 pm | llपुण्याचे पेशवेll

या दंगलीचे व्हीडीओ इथे पाहता येतील... असो.
यानंतर 'आणि माझा संयम सुटला' असा लेख टाकायला हरकत नाही.

पुण्याचे पेशवे
मोनॅको पॉवर्ड प्रतिसाद.
Since 1984

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2009 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल धन्यू. पण मंडळातील एकाच पदाधिकारी किंवा भक्तांना ठोकण्याचे कारण काय ?
जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन आणखी काही ?

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Sep 2009 - 2:11 pm | llपुण्याचे पेशवेll

जरा नीट पाहीलेत व्हीडीओ मधे तर मंडपात शिरलेले बरेच गोल टोपी वाले होते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

हुप्प्या's picture

7 Sep 2009 - 3:14 am | हुप्प्या

मिरजेतील हे प्रकरण आणखी चिघळले आहे असे वाटते. सरकारने संचारबंदी लागू केली आणि त्या स्मशानशांततेत सरकारी यंत्रणा वापरून मूर्ती विसर्जित केल्या. तमाम हिंदुत्त्ववादी एकांगी कारवाईचा आरोप करत आहेत.
कुठलाही राज्यकर्ता शिवाजी हा आमचा हिरो आहे आणि अफझलखान खलनायक आहे सबब तो अफझलखानाचा देखावा योग्य होता असे म्हणत नाही आहे.
आज अफझलखानवधावर बंदी घालतील उद्या शिवाजीचे नाव घ्यायलाही बंदी घालतील. लांगूलचालनाची इतकी नीच सीमा मुगलाईत वा आदिलशाहीतही झाली नसेल.
बाकी शिवधर्म व संभाजी ब्रिगेडचे आगलावे लोक आता काय सूत कातत आहेत काय? का कुनी बामन मानूस यात गुंतलेला नाही म्हणून त्यापासून अलिप्त रहात आहेत?
मुस्लिम व्होट बँकेची इतकी काळजी पण हिंदू व्होट बॅकेची का नाही? शिवसेनेला दोनचार सिटा जास्तीच्या मिळतील इतकाच ह्या प्रकरणाचा फायदा म्हणायचा का?
ठाकर्‍यांचा सामनामधला अग्रलेख वाचा.
http://www.saamna.com/2009/Sept/07/agralekh.htm

असे वाटते की हा एकच एकांडा शिलेदार शिल्लक आहे जो अफझलखानाविरुद्ध इतक्या निर्भयपणे गर्जना करु शकतो.

सुहास's picture

7 Sep 2009 - 7:02 am | सुहास

"आणखी चिघळले?" नाही.. "आणखी चिघळवले.."

खरेतर "अफझलखानाचा वध" हा मुद्दा तसा दंगलीचा नव्हताच.. पण पोलिस आणि प्रशासनाच्या बेजबाबदारीने ही दंगल होत आहे.. कमानीला प्रथम पोलिसांनी परवानगी दिली, नंतर काय झाले कुणास ठाऊक, परवानगी नाकारली, आणि नंतर परत परवानगी दिली..! हा एकंदर प्रकारच दंगल कुणीतरी मुद्दाम भडकवणार होते याची साक्ष देतो..

नंतरच्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ल्याच्या प्रकाराने तर कळसच गाठला आणि प्रकरण चिघळले..! आता गेल्या २-३ दिवसांपासून दोन नंबर धंदेवाले (ज्यांचे सर्वच राजकीय पक्ष "मित्र" आहेत) यात सक्रिय झालेत आणि मोठ्या प्रमाणात हत्यारे रस्त्यावर दिसतायत.

-- सुहास