मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

मिसळपाव वर वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांपैकी हा एक महत्वाचा प्रश्न आहे.
सरळ मिसळपाव वर फोटो चढवण्याची सोय नाहिये. त्या ऐवजी इतर फोटोहोस्ट करणार्‍या साईटवर तो फोटो आधी चढवावा व नंतर त्या फोटोचा पत्ता ( path)  येथील संपादकामधील फोटोचे बटन दाबल्यावर आलेल्या चौकटीत द्या.

Photo Upload


फोटो जोडल्या जाईल.

फोटो होस्ट करण्यासाठी याहूची फ्लिकर (http://www.flickr.com)
 किंवा
गुगलचे पिकासा (http://picasa.google.com )  या सेवांचा वापर करावा.
अन्य भरपूर संकेतस्थळे आहेत जी ह्या सुविधा पुरवतात.
मात्र फ्लिकर साठी तुमचा याहूचा ईमेल पत्ता दिल्याने सदस्य होता येत
आणि पिकासाला जीमेलचा पत्ता चालतो.



मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

मला हाच प्रश्न पडला होता. आता प्रश्न सुटला......


 

आभारी.

सरपंच साहेब,


     ह्या माहिती बद्दल आभारी आहे.


     -------- केशवराव.

मदत हवी आहे...

सरपंच ,
याहूच्या फ्लिकरवर (http://www.flickr.com) फोटो टाकलेत, पण दिसत नाही .काय कारण असावं? दुवा दिला तर तो चालतोय, पण मिपावर फोटो दिसत नाही.
-गणपा

खरड्वही वरचा फोटो

मी पिकासा वापरुन खरड वहिच्या वर फोटो टाकायचा प्रयत्न केला पण फोटो दिसत नाही... खरड्वही उघडली की फोटोचा आयकॉन दिसतो पण फोटो दिसत नाही. उपाय सांगा

पिकासाचा फोटो असा चढ्वाल

पिकासामधे फोटो निवड केल्यावर ऊजव्या अंगाला
Link to this Photo >>HTML to embed in website हा पर्याय शोधावा .
ती युआरएल सरळ कॉपी-पेस्ट करावी...
त्यात तुम्ही फोटो ची साईझ पण मेंशन करू शकता... त्या आकाराचे चित्र मिपा वर दिसेल.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

आरे पण, इथे

आरे पण, इथे सम्पादकामध्ये फोटोच बटण कुठ आहे??
मला काही सापडत नाही बर.. कोणीतरी कृपया मदत करावी..

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

डावीकडून दहावं!

अ, अ, पासून सरळ मोजत गेलात की दहावं बटण फोटूचं! Smile

आपला,
(छायाचित्रकार) तात्या.

आणि खरडवहीच्या वर फोटू कसा टाकायचा...

च्यामारी... आम्ही स्वता जाल विकासक (तेच ते वेब डेवलपर हो...) असुन आम्हाला सापडून नाय र्हायलं...

ते इमेज होस्टींग वगैरे लफडी आम्हाला माहीती आहेत... त्याच्यापुढ्चं आम्हाला कुणी सांगेल का ?

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

हम्म!

अरे नीलकांता, आमचे सतीशराव काय म्हणाताहेत तेवढं बघ रे प्लीज!

तात्या.

असे करू शकता.

आधी जे छायाचित्र इथे चिकटवायचे आहे ते पिकासा अथवा फ्लिकर मध्ये साठवायला हवे.
नंतर त्या छायाचित्रावर उजवी टिचकी मारून जे उभ्या खिडकीत पर्याय दिसतील त्यातल्या सर्वात खालच्या "पॉपर्टी" ह्या पर्यायावर डावी टिचकी मारा.
त्यानंतर जी चौकट दिसेल त्यातील "ऍड्रेस(युआरएल)"ची नक्कल करून घ्या.इथल्या "इन्सर्ट/एडिट इमेजच्या चित्रावर टिचकी मारल्यावर जी चौकट उघडेल त्यात चिकटवा आणि "ओके" करा.
त्यानंतर पूर्वपरीक्षण करून पाहा. ते चित्र इथे चिकटवलेले दिसेल. उदा. खाली एक चित्र दिलेय जे ह्याच पद्धतीने इथे चिकटवलेय.

ह्याच पद्धतीने महाजालावर इतरत्र असलेली कोणतीही छायाचित्रे आपण इथे सहजपणे चढवू शकतो.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

खरडवहीवर फोटो किंवा संदेश

खरडवहीवर फोटो किंवा संदेश टाकण्यासाठी तुम्हाला माझे खाते मधे जाऊन संपादन मधे जावं लागेल तेथे ह्या संपादनाचा पर्याय आहे.

नीलकांत