संत्र्याचा मुरांबा (Orange Marmalade)

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
2 Sep 2009 - 12:03 pm

टिव्ही (foodnetwork) बघता बघता मिळालेली पाकृ....रंग फारच सुंदर येतो या मुरांब्याचा...

साहित्यः

४ मोठी संत्री (मी अमेरिकन नेवल ऑरेंजेस घेतली होती.), मार्मालेडसाठी संत्री आणि लिंबु सालासकटच घ्यावीत, जर सालांचा कडवटपणा नसेल आवडत तर संत्री हलक्या हाताने वरवरचा नारंगी भाग बारिक किसणीने किसुन घ्या, पांढरा भाग घेऊ नये, तोच भाग जास्त कडवट असतो, मग तीच संत्री सोलुन वापरा आणि किसलेली नारंगी साल ही वापरा.पण सालींची चवही छान येते.
२ लिंबं
अडिच-तीन कप साखर(गोड जसं हवं तशी कमी-जास्त घालु शकता.)
अडिच कप पाणी

कृती:

संत्री , लिंबाचे उभे चार भाग करुन पातळ काप करुन घ्या. जेव्हढे पातळ तेव्हढे छान...
आता एका जाड बुडाच्या पातेल्यात हे काप आणि पाणी घालुन एक दणदणीत वाफ येईपर्यंत अंदाजे १०-१५ मि. शिजवा. मधुन-मधुन हलवत राहणे खुप महत्त्वाचे आहे.
आता हे मिश्रण आंचेवरुन काढुन बाजुला ठेवा आणि त्यात साखर विरघळेपर्यंत मिसळा.
आता झाकण ठेवुन हे मिश्रण रात्रभर तसंच ठेवुन द्या.
आता सकाळी मिश्रण परत अगदी कमी आंचेवर झाकण न ठेवता एक ते दीड तास शिजवत ठेवा....
मिश्रण जर फार पातळ असेल तर परत शिजवत ठेवा आणि जर आधीच घट्ट वाटत असेल तर आंच बंद करुन बाजूला ठेवा, हे बर्‍याचदा संत्री-लिंबांवर अवलंबून असतं.
मुरांबा कच्चा ठेवु नये नाहीतर लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि जास्त झाला तरी ही फार चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे शेवटच्या १/२ तासात मिश्रण सारखे हलवत रहावे आणि आंचपण मोठी ठेवू नये. जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडा संत्र्याचा रस टाकावा.
बनवुन झाला की हवाबंद डब्यात भरुन बाहेर किंवा फ्रिज मधे ठेवा. मी बाहेरच ठेवला आहे अजुन तरी खराब नाही झालाय पण खात्री नसेल तर फ्रिज मधेच ठेवावा. ४ संत्र्यांचा मुरांबापण खुप होतो.मी अतिउत्साहाने ४ संत्री घेतले होते.. :D
सकाळी-सकाळी टोस्टवर थोडे बटर आणि हा मुरांबा खुप छान लागतो....

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

2 Sep 2009 - 12:07 pm | महेश हतोळकर

आजच प्रिंट काढून बायकोला देतो. पोरगा खूष होईल.

धन्यवाद!

टारझन's picture

2 Sep 2009 - 8:57 pm | टारझन

लाळग्रंथी अंमळ सक्रिय झाल्यानं आंबटलो .. लय भारी खाद्यप्रकार गं दिपाली !!
जियो .. .. . ...

आणि हो .. मी ही आता ह्याची प्रिंट काढून आमच्या शेजारच्या आंटींना देणार .. वॉचमन खुष होईल ;)

- टी

दशानन's picture

2 Sep 2009 - 12:14 pm | दशानन

अरे ये.. तुला कोणी माझी सुपारी दिली आहे काय :?

=))

लै भारी फोटु व कृती !

पर्नल नेने मराठे's picture

2 Sep 2009 - 12:21 pm | पर्नल नेने मराठे

मस्त्च =P~
चुचु

स्मिता श्रीपाद's picture

2 Sep 2009 - 12:40 pm | स्मिता श्रीपाद

वा मस्त फोटु...
अगदी डोळ्याला सुखावणारा...
ती केशरी फुलं काय मस्त दिसतायत :-)

आणि पाकॄ पण छान आहे..

रेवती's picture

2 Sep 2009 - 12:54 pm | रेवती

वा!!
संत्र्याचा आणि लिंबाचा स्वाद मस्तच!
नक्की करून बघणार!
फोटू छान आलाय.

रेवती

चित्रा's picture

2 Sep 2009 - 7:58 pm | चित्रा

करून नक्कीच बघणार.

सूहास's picture

3 Sep 2009 - 8:27 pm | सूहास (not verified)

दि.पा.च्या पाकृ म्हणजे..एकदम टंग टिझींग..

सू हा स...

मदनबाण's picture

2 Sep 2009 - 12:55 pm | मदनबाण

व्वा... :)

(बेलफळाचा मोरंबा खाणारा)
मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

सहज's picture

2 Sep 2009 - 1:04 pm | सहज

भारी लै भारी!

नंदन's picture

2 Sep 2009 - 1:15 pm | नंदन

पाककृती आणि फोटू लै भारी.
बे एरियात कट्टा भरवा हो लौकर :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

JAGOMOHANPYARE's picture

2 Sep 2009 - 1:19 pm | JAGOMOHANPYARE

सन्त्रा लिम्बाचे ४ फोडी करुन काप करा.. हे जरा समजले नाही.... साली सकटच का ?

अजुन कच्चाच आहे's picture

2 Sep 2009 - 3:48 pm | अजुन कच्चाच आहे

हेच म्हन्तो.
संत्री सोलून व लिंब सालासकट घ्यावी काय?
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2009 - 1:38 pm | स्वाती दिनेश

क्लास दिसतो आहे रंग आणि मार्मालाडंही..
स्वाती

अजुन कच्चाच आहे's picture

2 Sep 2009 - 3:53 pm | अजुन कच्चाच आहे

झकास!
फोटू पाह्यल्याबरोब्बर नाकात वास दर्वळल्यासारख झाल.

....चला काही नाष्ट्यांची झकास सोय झाली.

.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

चतुरंग's picture

2 Sep 2009 - 4:01 pm | चतुरंग

संत्र-लिंबांबा आवडला! :) धन्यवाद दीपालीताई!
फोटू एकदम झक्कास, थोडे आउट ऑफ फोकस आलेत पण इतका जबरी पदार्थ समोर असताना ते सहाजीक आहे! ;), खायचं सोडून फोटू कोण काढेल?

(खुद के साथ बातां : लवकरच मिळेल असं वाटतंय ना रंगा! :W)

(चातक)चतुरंग

प्राजु's picture

2 Sep 2009 - 8:35 pm | प्राजु

२१/२-३ साखर आणि २१/२ पाणी. याचा अर्थ काय?
पावणे बावीस कप साखर का? आणि साडे एकवीस कप पाणी असा का?
पाकृ. मात्र भन्नाट!
करून ठेव.. येतेच आहे खायला. ;)
http://praaju.blogspot.com/

अश्विनीका's picture

2 Sep 2009 - 8:56 pm | अश्विनीका

फारच छान रेसिपी. करुन बघेन नक्की.

>>पावणे बावीस कप साखर का? आणि साडे एकवीस कप पाणी असा का?

मला वाटते ते अडीच ते ३ कप साखर आणि अडिच कप पाणी असे असावे. दिपाली खुलासा करेलच.
- अश्विनी

दिपाली पाटिल's picture

2 Sep 2009 - 9:18 pm | दिपाली पाटिल

पाकृ संपादित केलेली आहे.. :P प्राजुताई कधीही ये खायला मार्मालेड, तयारच आहे....:)

दिपाली :)

प्राजु's picture

2 Sep 2009 - 9:26 pm | प्राजु

नक्कीच येईन. :)
अगं पण संत्री आणि लिंब सालीसकट घ्यायची का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

2 Sep 2009 - 9:31 pm | दिपाली पाटिल

>> अगं पण संत्री आणि लिंब सालीसकट घ्यायची का?
हो, अगदी मस्त झिंग येते टेस्ट मधे...पण मुलांना कितपत ती कडवटसर चव आवडेल ते सांगता नाही येणार , मग त्यासाठी संत्र- लिंबाच्या सालींचा वरवरचा म्हणजे फक्त रंगित भाग घ्यायचा (Orange and Lemon Zest)आणि सोलुन वापरायचे.. खरी चव आणि तो छान संत्र्याचा वास त्या सालींमधल्या ऑईल्समुळे येतो.

दिपाली :)

प्राजु's picture

2 Sep 2009 - 9:40 pm | प्राजु

धन्यवाद डिप्स!! :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

2 Sep 2009 - 9:35 pm | क्रान्ति

आवडली पाकृ. फोटो खूपच खास.

:) क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

महेश काळे's picture

7 Sep 2009 - 11:17 am | महेश काळे

फोटो खुपच छान अहे...

मी माझा ..महेश

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2009 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर

पाकृ तशी सोपी दिसते आहे. करून पाहिली पाहिजे.(मला खायला परवानगी नसली म्हणून काय झालं, बायको आणि मुलगा खाईल नं.)

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

विसोबा खेचर's picture

8 Sep 2009 - 2:59 pm | विसोबा खेचर

लै भारी....

प्रयत्न करुन पाहिला..

१ ला प्रयत्न संत्र्याच्या साली किसुन टाकल्यामुळे अयशस्वी .जरा जास्तच कडू झाला आहे, कदाचित अमेरिकन नेवल ऑरेंजेस नसल्यामुळे

तरी आई सांगत होती की संत्र्याच्या साली नको टाकुस पण नाही , आईच ऐकलं नाही त्यामुळे आईने मदती करीता नकार दिला(भांडीपण मलाच घसावी लागली.)

मग मी स्वतःच्या मनला समजावलं की संत्र्याच्या सालीत औषधी गुणधर्म असतात, कधी कधी कडु खाणे आरोग्याकरता हितकारक असते त्यामुळे जरी मुरांबा कडु झाला तरी तो खाल्लाच पाहिजे (दुसरं कोणी खायला तयारच नाही आहे)

२रा प्रयत्न संत्र्याच्या साली न टाकता करुन पाहिला आणि तो १०० % यशस्वी झाला.

कोणी मला सांगेल का, संत्र्याच्या सालीत कोणते औषधी गुणधर्म असतात????

दिपाली पाटिल's picture

14 Oct 2009 - 3:57 am | दिपाली पाटिल

प्रयत्न करुन पाहिला..
१ ला प्रयत्न संत्र्याच्या साली किसुन टाकल्यामुळे अयशस्वी .जरा जास्तच कडू झाला आहे, कदाचित अमेरिकन नेवल ऑरेंजेस नसल्यामुळे
तरी आई सांगत होती की संत्र्याच्या साली नको टाकुस पण नाही , आईच ऐकलं नाही त्यामुळे आईने मदती करीता नकार दिला(भांडीपण मलाच घसावी लागली.)
मग मी स्वतःच्या मनला समजावलं की संत्र्याच्या सालीत औषधी गुणधर्म असतात, कधी कधी कडु खाणे आरोग्याकरता हितकारक असते त्यामुळे जरी मुरांबा कडु झाला तरी तो खाल्लाच पाहिजे (दुसरं कोणी खायला तयारच नाही आहे)
२रा प्रयत्न संत्र्याच्या साली न टाकता करुन पाहिला आणि तो १०० % यशस्वी झाला.
कोणी मला सांगेल का, संत्र्याच्या सालीत कोणते औषधी गुणधर्म असतात????

>> गुणधर्म असे काही माहीत नाहीत पण संत्र्याचं सालाच्या अगदी वरवरचा फक्त नारंगी भाग घ्यावा...त्यातल्या तेलातच खरी चव आणि सुगंध असतो...
कडु जॅम तसाच मुरत ठेवुन द्या थोड्या दिवसांनी त्याचा कडुपणा निघुन जाइल.... :)

दिपाली :)