एक कोडे

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
30 Aug 2009 - 5:03 pm
गाभा: 

एक कोडे

आधुनिक मानवाच्या काही श्रद्धा मला नेहेमी कोड्यात टाकतात. याचे मला कधी हसू
येते तर कधी त्यांची कीव करावीशी वाटते. उदाहरणच सांगायचे झाले तर मानवाची इतर
प्राणी जगतापासून स्वत:ला वेगळे ठेवण्याची धडपड... आधुनिक मनुष्यप्राणी स्वत:ला
इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो. या श्रेष्ठत्वाचे तो अनेक त‍र्हांनी समर्थन
करतो. हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी अनेक भल्याबु‍र्‍या मार्गांचा अवलंब आजवर
त्याने केला आहे. माणसाचा 'विकास' पावलेला मेंदू हा या समर्थनाचा मुख्य आधार
आहे.

या विकास पावलेल्या मेंदूने प्रश्न सोडवले किती आणि निर्माण केले किती? असा जर
शोध घ्यायचा प्रयत्न केला तर प्रामाणिकपणे उत्तरे देणे अनेकांना कठीण जाईल.
उदाहरण जर घ्यायचे झाले तर धार्मिक तेढीचे घेता येईल. माणसाचा विकास पावलेला
मेंदू युद्ध, दहशतवाद, मूलतत्त्ववाद हे प्रश्न अजिबात हाताळू शकत नाही. आज
कुणालाही दुर्धर आजारांनी ग्रासलेले असले तर आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध
आहेत. पण ते वेळेवर मिळतील कि नाही याची खात्री देता येत नाही. आणि जर ते
मिळालेच तर ते उपचारच जीवावर उठतील का हे पण सांगता येणार नाही. मुंबईच्या
लोकल्सना बॉंब स्फ़ोटापासून कुणीही वाचवू शकत नाही किंवा एखाद्या विमानाचे अपहरण
होईल का हे पण कुणाला सांगता येणार नाही.

थोड्क्यात सांगायचे झाले तर आजवर सतावणा‍र्‍या प्रश्नांची जुजबी आणि तात्पुरती
उत्तरे सापडली की माणसाचा विकास पावलेला मेंदू सुखावतो. हे प्रश्न ज्यांना कधिच
सतावणार नाहीत अशा अलिप्तपणे जगणार्‍या मनुष्येतर प्राण्यांना मात्र तॊ हीन
लेखतो. कारण मला वाटत की माणसाचं मनुष्यत्त्व प्रश्न निर्माण करण्यात अडकलं
आहे. आता हेच बघा ना, मनुष्येतर प्राण्यांचे मूळ प्रश्न - आहार निद्रा मैथुन -
हे त्यांच्या मेंदूचा विकास न पावल्याने सीमित राहिले आहेत.

आता मला हे सांगा आपल्या अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणं हे लक्षण श्रेष्ठपणाचे
की भ्रष्टपणाचे? विकासाचे की अधोगतीचे?
या प्रश्नाचे उत्तर ठाउक असून दिले
नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुमच्याच पायाशी लोळू लागतील...

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2009 - 5:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबईच्या लोकल्सना बॉंब स्फ़ोटापासून कुणीही वाचवू शकत नाही किंवा एखाद्या विमानाचे अपहरण होईल का हे पण कुणाला सांगता येणार नाही.

ज्योतिषि ग्रहतार्‍यांचा अंदाजावरुन घटनांचे वेध घेतात म्हणे, तेव्हा ते काही सांगू शकतील असे मला वाटते.

आपल्या अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणं हे लक्षण श्रेष्ठपणाचे
की भ्रष्टपणाचे? विकासाचे की अधोगतीचे?

विकासाचे. विकासामुळेच ते प्रश्न निर्माण झाले आहेत.

-दिलीप बिरुटे

[अभिनेत्यांना शिक्षण,वाचन,लेखन आणि अभिनय कंपलसरी केला पाहिजे- प्रा.डॉ.]

युयुत्सु's picture

31 Aug 2009 - 9:15 am | युयुत्सु

ज्योतिषाला आपण तूर्त बाजूला ठेवूया. कारण ज्योतिषांची भाकीते सर्वजण गंभीरपणे घेत नाहीत. दूसरे म्हणजे एखाद्या घटनेचे स्थान अचूक पणे सांगता येण्याइतके ज्योतिष अजून प्रगत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2009 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>एखाद्या घटनेचे स्थान अचूक पणे सांगता येण्याइतके ज्योतिष अजून प्रगत नाही.

एबर्टीनप्रणित तंत्राद्वारे कुंडलीचे विश्लेषन केले जाते म्हणजे काय केले जाते मग ?

-दिलीप बिरुटे

युयुत्सु's picture

2 Sep 2009 - 7:54 am | युयुत्सु

ते आमच्या चितनिकेत येऊन वाचावे... सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिथे मिळतील.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Aug 2009 - 5:54 pm | प्रकाश घाटपांडे

तर आजवर सतावणा‍र्‍या प्रश्नांची जुजबी आणि तात्पुरती
उत्तरे सापडली की माणसाचा विकास पावलेला मेंदू सुखावतो.

तर आजवर सतावणा‍र्‍या प्रश्नांची जुजबी आणि तात्पुरती
उत्तरे सापडली की माणसाचा विकास पावलेला मेंदू तात्पुरता सुखावतो.
ज्यावेळी प्रश्न संपतील त्यावेळी जग संपेल. प्रश्नांचे उत्तर मिळाले कि नवीन प्रश्न ही मालिका चालूच आहे.
survival is truth
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

30 Aug 2009 - 7:49 pm | युयुत्सु

माणसाच्या जाणिवा विकसित झाल्या नव्हत्या तेव्हा प्रश्न होते का? तेव्हा जग होते. तेव्हा प्रश्न संपतील तेव्हा जग संपेल हे विधान पटत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

30 Aug 2009 - 7:13 pm | कानडाऊ योगेशु

आधुनिक मनुष्यप्राणी स्वत:ला
इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो. या श्रेष्ठत्वाचे तो अनेक त‍र्हांनी समर्थन
करतो. हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी अनेक भल्याबु‍र्‍या मार्गांचा अवलंब आजवर
त्याने केला आहे.

माणसाच्या अधोगती वा प्रगतीचे कारण हे तो इतर प्राण्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न हे नसुन तो बाकी इतर माणसांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ ठरविण्याचा प्रयत्न करतो हे आहे.कधी वर्ण,कधी वंश कधी धर्म इ.इ.गोष्टींचा वापर करुन.जर येनकेनप्रकारेण स्वश्रेष्ठ्त्व झुगारण्याचे एक वैश्विक सामंजस्य प्रत्येक माणसात उतरले तर माझ्यामते कुणालाच काही चिंता करण्याचे कारण उरणार नाही..
.
.
इतके बोलुन वेताळ अदृष्य झाला आणि झाडाला उलटा लोंबकळु लागला.

JAGOMOHANPYARE's picture

31 Aug 2009 - 12:56 pm | JAGOMOHANPYARE

इतके बोलुन वेताळ अदृष्य झाला आणि झाडाला उलटा लोंबकळु लागला. :)

लोम्बकळता लोम्बकळता त्याने आपल्या डोक्यावरचा एक पान्ढर्‍या शुभ्र लाम्बलचक केस उपटला आणि त्याच्यापासून आता नवीन कोणता धागा तयार करायचा, या विचारात तो गढून गेला...

(क्रमशः)

मदनबाण's picture

30 Aug 2009 - 8:33 pm | मदनबाण

मनुष्येतर प्राण्यांचे मूळ प्रश्न - आहार निद्रा मैथुन -
हे त्यांच्या मेंदूचा विकास न पावल्याने सीमित राहिले आहेत.
असं म्हणाल तर मानवात मेंदू विकसीत होऊन मोठी क्रांती झालीय असं म्हणाव झाल्यास !!!
आहार :--- काय खायचं सोडलय माणसानं !!! (पैश्या पासुन मगरीच्या लोणच्या पर्यंत सर्व काही)
निद्रा:--- सगळं काही आहे आणि ते या तल्लख मेंदुच्या सहाय्यानेच कमावलेत...गादी खाली पैशांची बंडल टाकुन देखील ४ क्षणांची झोप मिळत नाही असे म्हणाणारे मेंदू विकसीत असणारे महामानव देखील आपल्याला याच ग्रहावर दिसतील !!!
मैथुन :--- या बाबतीत तर मौनच बरे !!!

कोण सुखी ? मेंदू विकसीत मानव का मेंदूचा विकास न पावल्याने सीमित राहिलेले प्राणी?

मुंबईच्या
लोकल्सना बॉंब स्फ़ोटापासून कुणीही वाचवू शकत नाही किंवा एखाद्या विमानाचे अपहरण
होईल का हे पण कुणाला सांगता येणार नाही.
छे !!! भगवान श्री कृष्णाचा जन्म कुठल्याही राजवाड्यात न होता कारागृहात झाला होता... का ???

आता मला हे सांगा आपल्या अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणं हे लक्षण श्रेष्ठपणाचे
की भ्रष्टपणाचे? विकासाचे की अधोगतीचे?
ह्म्म...डोक्यात केमिकल लोचा झाला की काय होत असेल बरं?आणि केमिकल लोचा होणे हे लक्षण कसले असेल विकासाचे की अधोगतीचे???

बाकी चालु ध्या...

(चला माझी मोबाईलवर सुडुको खेळण्याची वेळ झाली....);)
मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

एकलव्य's picture

30 Aug 2009 - 10:40 pm | एकलव्य

माणसाचा मेंदू गुंतागुंतीचा आहे त्यामुळे त्याचे "ज्ञान" होणे अवघडच!
पण आता असं बघा - जर हा मेंदू अगदी सोप्पा-सोप्पा असता तर मग तो इतक्या कमी क्षमतेचा असता की तेव्हाही आपल्याला स्वतःच्या मेंदूला समजावून घेता आलेच नसते. ;)

(गुगली) एकलव्य

नाना बेरके's picture

31 Aug 2009 - 11:36 am | नाना बेरके

पण आता असं बघा - जर हा मेंदू अगदी सोप्पा-सोप्पा असता तर मग तो इतक्या कमी क्षमतेचा असता की तेव्हाही आपल्याला स्वतःच्या मेंदूला समजावून घेता आलेच नसते.

अगदी बरोब्बर.

एकलव्या, एकवेळ कुत्र्याच्या तोंडात बाण मारून त्याचे बोंबलणे थांबवता येईल, पण सुपीक मेंदूमधून निघालेले आणि दुसर्‍याच्या मेंदूला झिणझिण्या आणणारे त्याच त्याच विषयावरचे विचार कसे थांबवता येतील ह्याचा विचार आता माझा मेंदू करु राह्यलाय.

JAGOMOHANPYARE's picture

31 Aug 2009 - 12:34 pm | JAGOMOHANPYARE

या प्रश्नाचे उत्तर ठाउक असून दिले
नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुमच्याच पायाशी लोळू लागतील...

तुमच्या आधीच्या धाग्यानी ते काम आधीच केलेले आहे.. :) आता शकलं व्हायला इतर अवयव चालत असतील तर घ्या तेही !

आपल्या अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणं हे लक्षण श्रेष्ठपणाचे
की भ्रष्टपणाचे? विकासाचे की अधोगतीचे?

चान्गला प्रश्न आहे... आस्तित्वाचे प्रश्न सीमीत असणे हे श्रेश्ठ आहे, असे मला वाटते... मी देखील गेली दोन वर्शे हाच विषय डोक्यात घेऊन आहे... सविस्तर लिहिन...

लिखाळ's picture

31 Aug 2009 - 3:42 pm | लिखाळ

प्रश्न मजेदार आहे. एकलव्याशी सहमत आहे.

आपण जगाचा एकात्मतेने विचार करतो आहोत (जागतिक पातळीवर वगैरे) असे वाटणे ही गेल्या काही वर्षांची 'फॅशन' असावी. आणि विकास आणि अधोगती या कल्पनासुद्धा यातूनच तयार झाल्या असाव्यात. अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणे हे जास्त सुखी असण्याचे लक्षण असावे असे वाटणे हे फक्त या तीरावरून तिकडे पाहणे असावे.

-- लिखाळ.
आम्ही पैशामागे पळत नाही. त्याला आम्ही दामटून खिशात भरून ठेवतो. ;)

मानवाची इतर प्राणी जगतापासून स्वत:ला वेगळे ठेवण्याची धडपड... आधुनिक मनुष्यप्राणी स्वत:ला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो. या श्रेष्ठत्वाचे तो अनेक त‍र्हांनी समर्थन करतो. हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी अनेक भल्याबु‍र्‍या मार्गांचा अवलंब आजवर त्याने केला आहे. माणसाचा 'विकास' पावलेला मेंदू हा या समर्थनाचा मुख्य आधार आहे.
------------------------------------------------
मानव हा अत्यंत श्रेष्ठ आहे, हा त्याचा सर्वात मोठा गैरसमज आहे, आणि तो लवकरच दुर होईल. मानव हा अत्यंत कृतघ्न, हरामखोर, नीच अशी प्रजाती आहे, जी स्वतःच्या हाताने स्वतःचा व पृथ्वीचा नाश करेल.
मानवाची श्रध्दा ही अजुन एक हास्यास्पद गोष्ट आहे. त्याची श्रध्दा ही दगडापाशी सुरु होऊन दगडापाशी संपते. पण त्याचा खरा देव हा तो स्वतःच असतो. तो जगतो तो फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या सो कॉल्ड तत्वांसाठी..
त्याला काही अपवाद नैसर्गिक नियमाप्रमाणे जन्म घेतात, काही प्रसिध्द पावतात, काही काळाच्या अंधारात हरवुन जातात.

या विकास पावलेल्या मेंदूने प्रश्न सोडवले किती आणि निर्माण केले किती?
-----------------------------------------------
मेंदुचा विकास झाला तर प्रश्न का निर्माण झाले?
विकास होताना सर्व प्रश्नांची ऊत्तरे मिळाली नाहीत तर तो विकास म्हणावा का? पृथ्वीवर खड्डा करुन खनिजे, वायु आणि काय काय शोधताना १ ट्रक उपयोगी माला पोटी ७० ट्रक निरुपयोगी (?, हो फक्त मानवाला, बाकी गेले खड्डयात) तयार होतो. मग विकास पावलेला मेंदु त्याची विल्हेवाट का नाही लाऊ शकत?
विकास म्हणजे नक्की काय? सध्या जे चालु आहे त्याला विकास म्हणायचा तर अधोगती म्हणजे काय?

उदाहरण जर घ्यायचे झाले तर धार्मिक तेढीचे घेता येईल. माणसाचा विकास पावलेला मेंदू युद्ध, दहशतवाद, मूलतत्त्ववाद हे प्रश्न अजिबात हाताळू शकत नाही.
------------------------------------------------
धर्म म्हणजे काय? तो कुणी सांगितला? माझा धर्म श्रेष्ठ त्याचा कनिष्ठ हे ठरविण्याचा अधिकार कुणाला? मेंदुचा विकास झाला की साधन-संप्पत्तीच्या सहाय्याने जीवन सुलभ करण्याच्या प्रयत्नात माणुस माऊसपण हरवुन बसला? विकास पावलेला मेंदू युद्ध, दहशतवाद, मूलतत्त्ववाद हे प्रश्न अजिबात हाताळू शकत नाही., असे का म्हणता, हे तर सर्वात सोपे प्रश्न आहेत. तुम्ही आधी बलवान व्हा आणि वाद घाला बघा कुणाची हिम्मत होते ती?

आज कुणालाही दुर्धर आजारांनी ग्रासलेले असले तर आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. पण ते वेळेवर मिळतील कि नाही याची खात्री देता येत नाही. आणि जर ते मिळालेच तर ते उपचारच जीवावर उठतील का हे पण सांगता येणार नाही.
---------------------------------------
मग तुमच्या विकासाचा उपयोग काय? तुम्ही स्वतःला विकसित आणि श्रेष्ठ कुठल्या आधारावर ठरवता?

मुंबईच्या लोकल्सना बॉंब स्फ़ोटापासून कुणीही वाचवू शकत नाही किंवा एखाद्या विमानाचे अपहरण होईल का हे पण कुणाला सांगता येणार नाही.
---------------------------------------------------
तुमच्या अंतर्गत ढील्या सुरक्षायंत्रणा, भ्रष्ट सरकार, बदल घडविण्यासाठी प्रेषिताची वाट बघत अखंड अत्याचार सहन करणारा भेकड आणि कालातंराने त्याच प्रेषिताचे पुतळे बनवुन धिंडवडे काढणारा निर्ल्लज्ज समाज या गोष्टी या सार्‍याचे मुळ आहे, असे तुम्हाला वाटत नाही?

आजवर सतावणा‍र्‍या प्रश्नांची जुजबी आणि तात्पुरती उत्तरे सापडली की माणसाचा विकास पावलेला मेंदू सुखावतो.
-------------------------------------------------
मग त्याला विकसित का म्हणायचा?

हे प्रश्न ज्यांना कधिच सतावणार नाहीत अशा अलिप्तपणे जगणार्‍या मनुष्येतर प्राण्यांना मात्र तॊ हीन लेखतो.
-------------------------------------------------
तो स्वतः एक प्राणि आहे, हे तो विसरत चाललाय, आता त्याचा बाप (निसर्ग म्हणा की आणखी काही) त्याला वठणीवर आणेलच. विध्वंस अटळ आहे.

कारण मला वाटत की माणसाचं मनुष्यत्त्व प्रश्न निर्माण करण्यात अडकलं आहे.
-------------------------------------------------
मनुष्यत्व किती शिल्लक आहे, हाच विचाराचा मुद्दा आहे.

आता हेच बघा ना, मनुष्येतर प्राण्यांचे मूळ प्रश्न - आहार निद्रा मैथुन -
हे त्यांच्या मेंदूचा विकास न पावल्याने सीमित राहिले आहेत.
------------------------------------------------
असे तुम्हाला वाटत असेल, तर अवघड आहे. हजारो जाती मध्ये उत्क्रांती होत होती, आहे आणि राहील. एखादी जाती मानवाला सापडली म्हणजे ती नविन आहे असे होत नाही, तिचे बीज कुठल्यातरी दुसर्‍या जातीतुन आलेले असते. सोपे उदा. डासांचे घ्या.

आता मला हे सांगा आपल्या अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणं हे लक्षण श्रेष्ठपणाचे की भ्रष्टपणाचे? विकासाचे की अधोगतीचे?
----------------------------------------------------
हे ठरविण्याचा अधिकार मानवांना दिला कोणी? कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे तुम्ही-आम्ही कोण ठरविणार. ज्या दिवशी मेलेला जीव जीवंत करता आला त्या दिवशी बघु. मृत्यु (शरीर काम करणे थांबले अगदी कुणाचेही) हेच अंतीम सत्य. मग अस्तीत्वाचा प्रश्न आला कोठे?

मृत्यु पर्यंत आणि नंतर :$ :$ :$ :$ :$ मौनम् सर्वार्थ साधनम् ||

JAGOMOHANPYARE's picture

2 Sep 2009 - 1:14 pm | JAGOMOHANPYARE

सुन्दर....... सविस्तर लिहिण्याचे माझे श्रम वाचवलेत.......:)

८४ लक्ष योनी मध्ये मनुष्य श्रेष्ठ ही भ्रामक कल्पना आहे............ माणुस सोडून उरलेले सगळेजण निसर्गचक्राप्रमाणे जगतात..... आम्ब्याच्या झाडाला तू आम्ब्याचे झाड म्हणून सान्गावे लागत नाही......... माणसाला मात्र कोहं कोहं हा प्रश्न सुटत नाही......... अर्धे आयुष्य सम्पते ते जाणण्यात...........

उत्क्रान्तीच्या काळात काही काळ माणूस निसर्गाबरोबरच जगला....... नन्तर हळू हळू तो निसर्गापासून दूर होत गेला.... त्याचे जगणे बदलले.... आणि अध्यात्मिक द्रूश्ट्या तो हळू हळू खालावत गेला........... या अधोगतीलाच आपल्या धर्माने सत्य-त्रेता-द्वापार-कलि असे सम्बोधले आहे............. ही अधोगती फक्त माणसालाच आहे......... दहा हजार वर्षापूर्वीचा कावळा व आजचा कावळा यात फरक नाही..... कारण त्याना ही अधोगती नाही.......... ते आजही तसेच आहेत..... खड्य्यात पडलोय आपण..........

ती एकतानता परत मिळवणे, खड्ड्यातून पुन्हा वर येणे... यासाठी यच्च्यावत धर्म आणि उपासना..... हे वेदात स्पष्ट पणे दिसते........ वेदातील प्रार्थना या समुहासाठी ( तोही केवळ माणुस नव्हे.... यच्च यावत) आहेत... आपण निसर्गातील अन्न साखळीचा भाग आहोत, याचे भान ठेऊन लिहिलेल्या........ म्हणूनच अग्नी, पर्जन्य इन्द्र, वरूण या अमुर्त देवतान्ची त्याच अमुर्त रुपात उपासना आहे......... देव माणसासारखाच दिसावा हा अट्टाहास त्यात नाही..... आणि मेल्यानन्तर मोक्ष, स्वर्ग, आत्मा अशाही कल्पना नाहीत.. स्रूष्टीचा अन्श, सद्गती अशा कल्पना आहेत.. पण त्या आत्मा- परमात्मा, पाप- पुण्य अशा भीती दायक शब्दात नाहीत.........

मला वेदापर्यन्त नेले इन्शुरन्स या विषयाने........ ... वेळ मिळाल्यावर इथेच सम्पादीत करून लिहिन..........

अमोल केळकर's picture

2 Sep 2009 - 1:24 pm | अमोल केळकर

चांगली चर्चा. खूप छान माहिती मिळत आहे.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा