गाभा:
मी सप्तपदीवर केलेल्या लिखाणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यात लेखात एक वाक्य असे होते
"पुरूषाने त्याची नैसर्गिक जबाबदारी झटकली किंवा ती पुरी करण्यात तो कमी पडला तर तो मात्र समाजाच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या छी-थूला आणि प्रसंगी शिक्षेला पात्र ठरतो."
या संदर्भात आजच्या Times मध्ये आलेल्या एका बातमीचा दूवा - http://timesofindia.indiatimes.com/news/india/Punjab-Man-wants-to-sell-k...
"Woman to be protected at any cost" हे कायद्याचे मार्गदर्शक तत्त्व किती विकृत बनू शकते याचे हे नमुनेदार उदाहरण...
प्रतिक्रिया
27 Aug 2009 - 10:36 am | अवलिया
अरेच्या ! माझा प्रतिसाद कसा काय उडाला? असो.
युयुत्सुराव तुमचे लेख आले की फार बरे वाटते. काही तरी वैचारीक आणि गंभीर वाचायला मिळते. नाही तर आम्ही साले फोकलीचे टवाळखोर... कधी आम्हाला तुमच्यासारखे लिहिता येईल काय माहित.. !
असो, चर्चा वाचायला उत्सुक !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
27 Aug 2009 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार
जिथे तुमचा कौल प्रस्ताव मिपा व्यवस्थापनालाच झेपला नाही तिथे एका विद्वात्तापूर्ण बातमीचा प्रत्यक्ष परिचय कितपत झेपेल हाही मोठा प्रश्न आहे.
बाकी अवलिया काकांशी सहमत आहे. आणि हो "इथे येणारे ७०% मिपाकर हे अवैचारीक असुन ते निव्वळ हापिसात मिळणारे फुकटचे नेट वापरुन इथे टाईमपासला येतात" हे आमच्या 'साहित्यसम्राट' मित्राचे वाक्य अशावेळी हटकुन आठवते आणी हृदयाला चरे पाडते.
©º°¨¨°º© पॉर्कर ©º°¨¨°º©
आमचे राज्य
27 Aug 2009 - 3:03 pm | खडूस
युयुत्सु साहेब या बातमीबद्दल आपले मत जाणण्यास उत्सुक आहे
संपादकांना माझा प्रतिसाद अयोग्य वा अस्थानी वाटल्यास क्रुपया उडवावा .
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
27 Aug 2009 - 4:29 pm | युयुत्सु
या बातमी बद्दल मी एवढच म्हणेन की यात पुरुष दोषी आहे म्हणून ही 'बातमी' झाली. एखादी स्त्री १४ पुरूषांबरोबर राहत असती तर त्याची बातमी झाली असती का?
27 Aug 2009 - 5:06 pm | प्रसन्न केसकर
http://punemirror.in/index.aspx?Page=article§name=News%20-%20City&se...
आणि ही पण
http://www.punemirror.in/index.aspx?page=article§id=62&contentid=200...
27 Aug 2009 - 5:26 pm | युयुत्सु
दूसरी बातमी वाचता आली. अतिशय गुंतागुतीची केस आहे. युक्तीवाद कसा केला असेल हे महत्त्वाचे आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी लग्न null and void असा निर्णय कोर्टाने दिला आहे. valid लग्नाचा विच्छेद या केस मध्ये नाही. त्यामुले नव-याला फार त्रास होईल असे वाटत नाही.
27 Aug 2009 - 5:34 pm | युयुत्सु
दूसरी बातमी वाचता आली. अतिशय गुंतागुतीची केस आहे. युक्तीवाद कसा केला असेल हे महत्त्वाचे आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी लग्न null and void असा निर्णय कोर्टाने दिला आहे. valid लग्नाचा विच्छेद या केस मध्ये नाही. त्यामुले नव-याला फार त्रास होईल असे वाटत नाही.
27 Aug 2009 - 5:12 pm | खडूस
फक्त फरक एवढाच असता की तुम्हाला एक नवीन मुद्दा मिळाला असता सप्तपदी विरोधात काथ्याकूट करायला.
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
27 Aug 2009 - 3:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पैसे दिले की बायकोला मारण्याचं पापक्षालन होतं का? बायकोशी हिंसक पद्धतीने वागताना तिच्याबद्दल या माणसाला काहीच वाईट वाटलं नाही??
त्याच्या किडनी विकण्याचा मला आनंद होत आहे अशातला भाग नाही पण सहानुभूती कोणाला आणि कधी दाखवायची यात तारतम्य बाळगावं, असं माझं एक अतिशय व्यक्तीगत मत आहे.
आधी तिची काळजी घेऊ शकला नाहीच ना तो नवरा? त्याला घरेलू मारहाणीच्या कलमाखाली दंड भरायला लागत आहे. युयुत्सुमहाराज, ही पार्श्वभूमी तुम्ही वाचली नाहीत का हेतुपुरस्सर दुर्लक्षित ठेवलीत?
खडूससाहेब, तुमच्याप्रमाणे मलाही तोच प्रश्न पडला आहे.
अदिती
27 Aug 2009 - 3:51 pm | श्रावण मोडक
मूळ मुद्यावर अदितीशी सहमत.
कायद्याच्या तत्त्वाची विकृती म्हणून जी दाखवली गेली आहे, ती विकृती वगैरे नाही. ते तत्व अगदी रास्त आहे आणि त्याचा आग्रह धरताना निघालेले आकडेही रास्तच आहेत.
एका क्षणासाठी, त्या माणसाची ऐपतच नाही हे गृहीत धरूया. मग न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काय? आता त्यातही थोडे मागे जाऊ. न्यायालयाने जे मासीक दंड केले आहेत, त्यामागे एक हिशेब असेलच. तो हिशेब आणि या माणसाचे मासीक उत्पन्न ठरवणारा हिशेब यांची तुलना कशी असेल?
प्रश्न येतो तो न्याय या तत्वाचा. या तत्वाचा ताळमेळ समाजाच्या सद्यस्थितीशी नसला तर जे होते त्याला अंमलबजावणीस नालायक न्याय म्हणतात.
27 Aug 2009 - 4:36 pm | युयुत्सु
एकतर्फी विचार करताय आपण... Domestic Violence Act खाली केस करायला Domestic Violence झाला असलाच पाहिजे असं नाही. भांडण instigate करुन Domestic Violence ची केस करायचे असंख्य बायकी उद्योग मला माहित आहेत.
27 Aug 2009 - 6:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा अच्छा, किडन्या पळवण्याचं नवं रॅकेट शोधून काढलं आहे तर तुम्ही! वेल डन, आय अॅम रिअली प्राऊड ऑफ यू!
अदिती
27 Aug 2009 - 3:46 pm | ऋषिकेश
हं !
असो.
आपणासारख्या युगप्रवर्तक वगैरे वगैरे विचारांच्या थोर व्यक्तींच्यापुढे काय बोलणार.. ?
चालु द्या पुन्हा तेच ते!
(कंटाळलेला)ऋषिकेश
28 Aug 2009 - 7:44 am | सहज
असेच म्हणतो.
-----------------------
ऋषिकेशच्या रेडीओवर गाणे - दिल ऐसा किसीने तेरा तोडा, बरबादी की तरफ ऐसा मोडा| एक भले मानुष को अमानुष बना के छोडा!
27 Aug 2009 - 3:48 pm | सखाराम_गटणे™
ह्यात मला सप्तपदी चा संबध कुथेही दिस्त नही. लेखकाने यातील संबध दाखवावा.
कोण्त्याही ल्ग्नात असे होउशकते
27 Aug 2009 - 4:46 pm | युयुत्सु
'सप्तपदी' वरील माझ्या मूळ लेखातील काही विधानांच्या संदर्भात आज वाचनात आलेली बातमी मला महत्त्वाची वाटली.
27 Aug 2009 - 4:25 pm | झकासराव
लग्नात सप्तपदी हा विधी केला नसल्यास काय??
माझ्या लग्नात नाही केलेला हा विधी?
मग मला कायदा लागु होत नाही का?
सप्तपदीवर हा बहुद्धा तिसरा लेख असेल.
असो.
27 Aug 2009 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार
अहो काय हो हे झकासरावकाका ? जा बाबा :(
हा लेख नाहिये काही, हा एक विद्वत्तापुर्ण काथ्याकुट आहे. लेख आणी काथ्याकुट काही फरक आहे का नाही ?
उगीच 'अवैचारीक मिपाकरांसारखे' बोलु नका बघा.
©º°¨¨°º© पै. परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
27 Aug 2009 - 5:08 pm | सूहास (not verified)
युयुत्सु महाराज....लग्नविधी नसतात वाटत भाद्रपदात..असो..ह्याच्यापेक्षा चांगल लिहु शकत नाही मी...
आपल्या सप्तपदीविषयी भावना समजाहेत...पण आपण "पुरुषप्रधान सस्कृंती " त पुरुषांचीच बाजु मांडत आहात....आपले विचार मला पहिल्यापासुन एकांगी वाटत आहेत.....
बाकी आपल्याला " मिस्टर अॅण्ड मिसेस राउत" ची सिडी गिफ्ट करावीशी वाटते...
सू हा स...
27 Aug 2009 - 7:03 pm | युयुत्सु
कायदे एकांगी आहेत, कायद्याचा गैरवापर पण एकांगी म्हणून साहजिक् माझे विचार पण एकांगी झाले असावेत...
27 Aug 2009 - 7:26 pm | सूहास (not verified)
<<<कायदे एकांगी आहेत, कायद्याचा गैरवापर पण एकांगी म्हणून साहजिक् माझे विचार पण एकांगी झाले असावेत...>>>
खर तर झाले असावेत असे न लिहिता...झाले आहेत असे लिहीले असते तर बरे वाटले असते...मान्य आहे की पुरुषांवर आपण म्हणता त्याप्रमाणे प्रयोग झाले आहेत...पण त्याची जी टक्केवारी आहे ती "चार-चार लेख" लिहीण्याईतपत लक्षणीय नाही, हे आपल्या ही लक्षात आले असेल.(जबरदस्ती ने आपले मत पटवुन देताय असे वाटतेय).परंतु, अॅट द सेम टाईम ,जे प्रयोग,अत्याचार स्त्रियांवर होतात, ते ईतके आहेत की ..चारशे लेखही कमी पडतील....त्यात आपण जे बघताय ती आहे आकडेवारी...ज्याच्यावर शाळेत शर्टाच्या बाहीने नाक पुसणार शेबंड पोरग पण विश्वास ठेवणार नाही..... आपण स्वता पुरुष आहोत म्हणुन त्या सत्याकडे पाठ फिरवु शकत नाही...
बाकी आपली मर्जी.ह्या धाग्यावर माझा हा शेवटचा प्रतिसाद..
उद्या आपण " जिल्हा कलेक्टर कचेरी" समोर "सप्तपदी रोको आंदोलना" अतंर्गत "जाहीर ऊपोषणाला" बसलात तर मलाच काय कुठल्याही मिपाकराला आर्श्चय वाटणार नाही....
सू हा स...
27 Aug 2009 - 7:39 pm | नीधप
उद्या आपण " जिल्हा कलेक्टर कचेरी" समोर "सप्तपदी रोको आंदोलना" अतंर्गत "जाहीर ऊपोषणाला" बसलात तर मलाच काय कुठल्याही मिपाकराला आर्श्चय वाटणार नाही....<<
सहमत. आणि कुणी तिकडे लक्षही देणार नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
27 Aug 2009 - 7:56 pm | युयुत्सु
अंगाशी आले की सर्वजण लक्ष देतात. विद्या बाळांसारखी स्त्रीवादी मंड्ळी कायद्याचा गैरवापर होत आहे हे आता मान्य करतात..
27 Aug 2009 - 8:03 pm | नीधप
माझ्या अंगाशी काही येणार नाहीये. मी कशाचाही गैरवापर करत नाहीये. आणि तुमच्यासारखे एकांगी विचार घेऊन opposite gender ला बडवण्याचा उद्योगही करत नाहीये. तुम्ही उपोषणाला बसल्याने माझ्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाहीये. तुमचं उपोषणामधे काय होतं यात मला काहीही घेणंदेणं नाहीये.
आणि माझ्या अंदाजाप्रमाणे बहुतांशी मिपाकरांच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे.
तुमचं चालूद्या...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
27 Aug 2009 - 6:16 pm | वेताळ
मिपाकरांचे खुप हाल झाले आहेत. ह्यावर कोणता कायदा आहे काय?असेल तर माहिती द्या.
आपला कृपाभिलाषी
वेताळ
27 Aug 2009 - 7:48 pm | युयुत्सु
टक्केवारीचा विषय काढलात म्हणून सांगतो. National crime bearau of India च्या वेब-स्थळावर ही टक्केवारी अधिकृतपणे बघायला मिळेल. यात आत्महत्यांचे जे आकडे आहेत त्यात 'विवाहित पुरुष', 'विवाहित स्त्रीयां'च्या पेक्षा जास्त आत्महत्या करतात असे लक्षात येईल.
आता मला सांगा, एखाद्या विवाहित स्त्रीने आत्महत्या केली तर तीच्या नव-याचे हाल कुत्रे खाणार नाही, पण मुळातच संख्येने जिथे विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करत आहेत त्यात त्यांच्या बायकांचे contribution किती प्रमाणात पुढे येते?
27 Aug 2009 - 8:57 pm | नितिन थत्ते
विवाहित स्त्रिया सामान्यपणे 'स्टोव्ह पेटवताना साडीचा पदर पेटून' जळतात. आत्महत्या करण्याची वेळ येत नाही.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
28 Aug 2009 - 9:20 am | महेश हतोळकर
'विवाहित पुरुष', 'विवाहित स्त्रीयां'च्या पेक्षा जास्त आत्महत्या करतात असे लक्षात येईल.
या विवाहीत पुरुषांमधले कर्ज बाजारी शेतकरी किती असतील ओ?
27 Aug 2009 - 8:09 pm | नीधप
स्त्रियांच्या विरोधातला किती घरगुती अत्याचार खरोखर नोंदवला जातो? किती स्त्रिया सासरच्यांनी मारलं असतानाही मृत्यूपूर्व जबानीमधे सासरच्यांचा काही दोष नाही असं सांगून निघून जातात?
शिक्षण झालेलं असतानाही आमच्या घरच्या बायका बाहेर पडत नाहीत म्हणत किती बायकांना सामाजिक जीवन आणि करीअर हे दोन्ही नाकारले जाते?
टक्केवारी केवळ नोंदवलेल्या केसेसचीच असते आणि न नोंदवल्या गेलेल्या किंवा स्पष्ट छळाची केस दिसत असूनही व्हिक्टिमने जबानी न दिल्यामुळे अपघात म्हणून नोंदवल्या गेलेल्या कैक केसेस आहेत.
तुम्ही ते नाकारालच कारण डोळ्यांवर कातडं ओढून तुम्ही एकाच बाजूने ओरड करताय पण म्हणून ही वस्तुस्थिती नाहीशी होत नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
27 Aug 2009 - 9:37 pm | युयुत्सु
गेल्या पिढीपर्यंत हे खरं होतं. आता बोलायचे झाले तर... माझ्यापुढे प्रश्नच आहे.
27 Aug 2009 - 11:47 pm | नीधप
माझ्यापुढे माझ्या वर्गातल्या मैत्रिणींची उदाहरणं आहेत.
आणि मी अजूनतरी गेल्या पिढीतली नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
28 Aug 2009 - 12:06 am | बिपिन कार्यकर्ते
सहमत. आपण भेटलो तेव्हा तरूण पिढीचीच वाटली होतीस. :D ... असो. तू म्हणतेस ते खरंय. पिढीवगैरे वर काहीच अवलंबून नसतं. ही मनोवृत्ती आहे आणि ती स्थलकालनिरपेक्ष आहे.
बिपिन कार्यकर्ते
27 Aug 2009 - 8:20 pm | वेताळ
हे मला पण मान्य आहे.माझ्या एका निरपराध मित्राला ते सहन देखिल करावे लागले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांचे देखिल त्याबाबत मत युयुत्सु ह्याच्या मताप्रमाणेच आहे.पण मला वाटते कायद्याचा स्वःताच्या फायद्यासाठी वापर करण्यात पुरुष स्त्रीयांच्या पुढे आहेत.
वेताळ
27 Aug 2009 - 8:47 pm | प्रकाश घाटपांडे
पुरुषप्रधान संस्कृती आहे हे तरी मान्य आहे का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
27 Aug 2009 - 9:04 pm | युयुत्सु
संस्कृती पुरूषप्रधान आहे असे मी तरी म्हणणार नाही.. ती मध्ये कुठेतरी लोंबकळत आहे.
28 Aug 2009 - 9:04 am | नीधप
संस्कृती पुरूषप्रधान आहे असे मी तरी म्हणणार नाही.. <<
ओह आत्ता तुमचा प्रॉब्लेम लक्षात आला.
लोंबकळू द्या की मधे. कुणी एक प्रधान नसलेली संस्कृती काय वाईट आहे?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
27 Aug 2009 - 9:18 pm | sujay
११० कोटींच्या देशात कायद्याचा दुरुपयोग करणारे थोडे असायचेच, आणी त्यात स्त्रिया व पुरुष दोन्ही आले, पण म्हणुन कायदे एकांगी आहेत असा विचारच चुकीचा आहे.
कायदे एकांगी करायला आपले संविधानकर्ते मुर्ख नक्कीच नव्हते.
उद्या आपण " जिल्हा कलेक्टर कचेरी" समोर "सप्तपदी रोको आंदोलना" अतंर्गत "जाहीर ऊपोषणाला" बसलात तर मलाच काय कुठल्याही मिपाकराला आर्श्चय वाटणार नाही....<<
+१
सुजय
27 Aug 2009 - 9:40 pm | चतुरंग
बातमी ही फारच त्रोटक आहे. नेमके काय झाले असल्याने जजने असा निर्णय दिलाय तो तपशील माहीत नाही. तरीही तात्पुरते असे धरुन चालूयात की त्या नवर्यावर अन्याय होतोय.
आता मला सांगा स्त्रियांवर अन्याय किती वर्ष होतोय? आणी मी फक्त भारताचीच बाब म्हणत नाहीये. अमेरिकेतही डोमेस्टिक व्हायोलन्सची आकडेवारी बघा (दुवे देत नाही, नुसते 'डोमेस्टिक व्हायोलन्स' असं गुगललंत तरी अनेक दुवे दिसतील :(.) स्त्री-पुरुष समानतेचा पायंडा पाडणार्या अमेरिकेतही ही आकडेवारी अस्वस्थ करुन जाते!
आपल्याकडची तर बातच सोडा.
दुसरं असं की गेल्या २५ एक वर्षांपासून आपल्याकडे स्त्रियांनी उच्च शिक्षण घेऊन बाहेरचं मोठं जग बघणं, प्रोफेशनल लोकात वावरणं, आपल्यातल्या गुणांना वाव देऊन कर्तृत्व गाजवणं, देश/परदेश हिंडणं हे हळूहळू होत चाललं आहे.
जगात काय चालतं? काय चूक काय बरोबर? ह्याची त्यांची स्वतःची मतं तयार व्हायला लागली आहेत. आपल्या नजिकच्या परिसरातच नव्हे तर जगातल्या बातम्या ऐकू, दिसू लागलेल्या आहेत. आजूबाजूला घडणार्या अन्यायाने एकप्रकारची असुरक्षितता त्यांच्या मनात लहानपाणापासूनच घर करुन असते, त्याबद्दल त्या लहान असतना आवाज करु शकत नाहीत पण एकदाका स्वावलंबन आलं की आपण कोणाचे मिंधे नाही, विनाकारण बळी जाण्याचे कारण नाही हे समजतं आणी उसळून त्या उभ्या रहातात. वर्षानुवर्षे होत आलेल्या अन्यायाचा, पुरुषप्रधान दडपशाहीचा राग असा बाहेर निघणार हे सहाजीक आहे.
दडपलं गेलेलं फ्रस्ट्रेशन हे कुठल्याही स्वरुपात बाहेर निघतं ही सर्वसामान्य मानसिकता आहे. आणि ह्या वणव्यात सुक्याबरोबर ओलंही जळणार!
तुम्ही मोठ्या व्हा, शिका, नोकर्या करा हा मेसेज आई-वडिलांनीच दिलेला असतो. आणी नुसतं तेवढंच न होता त्या इतरही बाबतीत सबल होतात हे अपरिहार्य आहे नव्हे ते तसेच व्हायला हवे. अशा सक्षम स्त्रियांनी मान खाली घालून घरात निमूट अन्याय सहन करावेत अशी जर अपेक्षा असेल तर ती हास्यास्पद ठरेल!
स्त्रियांकडून गैरफायदा घेतला जात नाही असे अजिबात नाही तसेही होते आहे. नवीन कायदा आता बाजूने आहे तर गळचेपी करतेच असेही होत असणार ह्यातही शंका नाहीये. पण त्यावर उपाय हाच आहे की पुरुषांना आता लग्नासाठी वेगळी तयारी करावी लागेल. नुसतं घरी आणी बाहेर सारखेच काम करुन भागणार नाही. एकूण स्त्रियांना कमी लेखायची मानसिकता जी आहे तीत बदल करावा लागेल.
एक उदाहरण देतो -परवाच मायबोलीवर समिता शहा ह्या इन्व्हेस्टमेंट बँकरची मुलाखत वाचली. त्या आणी त्यांचे पती दोघेही अतिशय व्यस्त असतात त्यांच्या मुलाखतीतली ही वाक्ये -
---------------
तुमचे पती आणि तुम्ही एकाच क्षेत्रातले. दोघांचाही पदभारांचा प्रवास समांतर झाला ?
नाही. माझा जास्त लवकर झाला. कुठल्याही पुरुषाला स्वीकारायला किंचित जड जाणारच. त्यालाही. साहजिक आहे. आम्ही दोघंही प्रचंड व्यस्त असतो. कधी महिनोनमहिने शनिवार-रविवारशिवाय भेट होत नाही. हे या व्यवसायात अध्याहृतच आहे.
ते घरातलं काही पाहतात ?
नाही. घरातील सर्व मी पाहते, तेही स्टाफच्याच मदतीने.
--------------------------
आजच्या प्रोफेशनल जगात धडाडीने वावरणार्या एका कर्तृत्ववान स्त्रीलाही तशाच प्रोफेशनल पतीकडून थोडी असूया सहन करावी लागतेच ह्यावर जास्त भाष्य करण्याची जरुरी नसावी असे वाटते! :)
शिवाय त्या घरातलंही बघतात स्टाफच्या मदतीने का होईना. त्या संसारात जास्त काँट्रिब्यूशन देतात असं माझं वैयक्तिक मत ही मुलाखत वाचल्यावर झालं. शक्य झाल्यास ही मुलाखत आवर्जून वाचा.
तर असो. मूळ मुद्दा हा वैचारिक जडणघडणीतला आहे. वर्षानुवर्षांची स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता बदलणे हे एकदोन वर्षात शक्य नाही दोनेक पिढ्या त्यासाठी खर्ची पडणार तोवर ज्यांना उपोषण करायचं आहे त्यांना शुभेच्छा! :)
चतुरंग
27 Aug 2009 - 11:49 pm | नीधप
संपूर्ण सहमत!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
27 Aug 2009 - 9:54 pm | धनंजय
संस्कृती पुरुषप्रधान असणे-नसणेच जर शंकाग्रस्त आहे, तर वाद-संवाद करण्यासाठी कुठली मूलभूत गृहीतके आहेत, त्यापुढे काही पटण्यापटण्यासाठी काय प्रमाणे मान्य असतील हे आधी ठरवण्यापासून सुरुवात करावी लागेल.
कठिण प्रकार आहे. वर काही प्रतिसादक प्रयत्न करत आहेत, हे स्तुत्य आहे. चालू द्या.
पण युयुत्सु यांनी वादाची मुळे किती खोल आहेत हे जाणावे, आणि अशा मुळातल्या गृहीतकांचा शोध घ्यावा, ती स्पष्ट करावीत, असे वाटते.
(युयुत्सु यांचा बर्ट्रांड रसल विषयी अभ्यास दांडगा आहे. बर्ट्रांड रसल हा विशेषतः लॉजिशियन-तर्कशास्त्रज्ञही होता. त्याचे तर्कशास्त्र आणि ज्ञानशास्त्र [एपिस्टेमॉलॉजी] विषयक लेखन सुद्धा युयुत्सु यांनी अभ्यासले असेलच. युयुत्सु यांनी या "सप्तपदी" विषयाच्या अनुषंगाने दिलेल्या बातम्यांमधून काही निष्कर्ष निघत नाहीत, असे दिसत आहे - कारण त्याच बातमीचा वेगवेगळा अर्थ लावला जातो आहे. अशा प्रकारच्या निष्फळ चर्चांमध्ये गृहीतके आणि प्रमाण-सिद्धांत वेगवेगळे असतात हे युयुत्सु यांच्या लक्षात आतापर्यंत आले असेल. तर ती गृहीतके आणि प्रमाण-सिद्धांत स्पष्ट करून त्यांना अपेक्षित असलेला संवाद साध्य होईल.)
28 Aug 2009 - 10:51 am | युयुत्सु
"निष्कर्ष निघत नाहीत" असं कसं म्हणता? लोकशिक्षण किती कठीण आहे हे या चर्चांतून सिद्ध होत आहे.
सर्व सामान्य लोक वाचतात तेव्हा त्यांना "हवं ते" किंवा सोयीचे तेव्हढेच वाचतात. मी माझ्या लिखाणात काळाचे चाक उलटे फिरवा असं कुठेही लिहीलेले नाही. मी फक्त पुरूषांवर होणा-या अन्याया बद्द्ल लिहिले आहे (आपल्याला हवं असलेलं मूळ गृहितक). लोकांना ते पचत नाही कारण पुरूषांवर अन्याय होतो हे उघड बोलणे fasionable नाही. अन्याय फक्त स्त्रीवर होतो, या गोड गैरसमजूतीमधूऩ समाजाची जी मानसिकता तयार झाली आहे त्यातून अशा प्रतिक्रिया पुढे येतात.
28 Aug 2009 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरूषांवर अन्याय होतो हे उघड बोलणे fasionable नाही. अन्याय फक्त स्त्रीवर होतो, या गोड गैरसमजूतीमधूऩ समाजाची जी मानसिकता तयार झाली आहे त्यातून अशा प्रतिक्रिया पुढे येतात.
हम्म, चर्चा प्रस्ताव, प्रतिसाद, माहितीपूर्ण आणि मजेशीर आहेत.
चालू द्या......!
-दिलीप बिरुटे
(सप्तपदीचा धसका घेतलेला)
28 Aug 2009 - 3:20 pm | युयुत्सु
दूसरं असं की एखाद्या परिषदेसाठी शोध-निबंधाच्या स्टाईलमध्ये जर मी लिहिलं तर ते किती जणांपर्यंत पोहोचेल असाही प्रश्न आहेच.
28 Aug 2009 - 3:25 pm | नीधप
तुमच्यामते इथे आम्ही सगळी मूर्ख आहोत आणि तुम्हीच एकटे काय ते महान इत्यादी आहात तर तुम्ही तुमच्यासारख्याच महान लोकांच्या सायटीवर का जात नाही हो?
कशाला मूर्खांच्यात वेळ घालवताय?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
28 Aug 2009 - 3:27 pm | अवलिया
नीरजा ताईंशी सहमत आहे.
युयुत्सुराव वाचकांचा अपमान करण्याचे काहीही कारण नाही. वाचक जर तुम्ही लिहिलेले समजु शकत नसतील, तर हा तुमच्या लेखनाचा दोष आहे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Aug 2009 - 3:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण सगळे मिपाकर असलेच आहोत हे त्यांना अजून झेपत नसेल! ;-)
अदिती
28 Aug 2009 - 8:47 am | विसोबा खेचर
अत्यंत गहन वैचारिक असा हा काथ्याकूट आमच्या आवाक्याबाहेरचा!
चालू द्या..
तात्या.
28 Aug 2009 - 10:32 am | सखाराम_गटणे™
युयुत्सु यांचे धागे बर्याचा दिवसांपासुन मी वाचात आहे. त्यांना जो मुद्दा म्हणायचा आहे तो खचितच वेगळा आहे.
युयुत्सु म्हणतात तीतका हा प्रश्न गंभीर आहे का? अशा प्रकाराणांची टक्केवारी किती? ते टक्केवारी दुर्लक्ष करण्याइतकी कमी आहे की खरोखरच मोठी आहे??
युयुत्सु यांनी विदा उपलब्ध करुन द्यावा. म्ह्णजे त्या विदा च्या आधरावर अधिक चर्चा करता येईल. फक्त अशा निराधार विधानांनी काहीही निषपन्न होणार नाही..
त्यांच्या १० धाग्यात जे काम होणार नाही ते, विदाच्या सहायाने होउ शकते.
28 Aug 2009 - 11:09 am | युयुत्सु
पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पत्नीसह तिघांना सक्तमजुरी
http://beta.esakal.com/2009/08/27000830/pune-husband-suicide.html
या बातमी तील महत्त्वाचे वाक्य ज्याच्या कडे सोयिस्कर पणे दूर्लक्ष होईल ते असे आहे - "उलट आरोपींनी विक्रम आणि त्याच्या घरातील लोकांविरुद्ध पोलिसांकडे छळाची तक्रार केली. पोटगीसाठी दावा दाखल केला. हा मानसिक छळ सहन न झाल्याने विक्रमने आत्महत्या केली, अशी तक्रार त्यांचे भाऊ नारायण कांबळे"
विवाहित पुरूषांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त असून ही एकच केस पुढे आली...
इति नीधप
पतींवर होणारे अत्याचार किती नोंदले जातात?
28 Aug 2009 - 11:27 am | नीधप
बर मग आता काय ठरवायचंय तुम्हाला?
स्त्रियांना संरक्षण देणारे सगळे कायदे मूर्ख आहेत आणि ते काढून टाकले पाहीजेत. सगळ्या कायद्यांच्यात फक्त पुरूषांनाच संरक्षण आणि प्राधान्य असलं पाहीजे. असं हवंय ना तुम्हाला?
एक काम करा हे इथे बोंबलून काही फायदा नाही आम्ही सामान्य माणसं आहोत. तुम्ही आपले संसदेच्या समोर किंवा अजून जिथे कुठे कायदे बदलण्यासाठी जाता येते तिथे जाऊन बोंबला. आमच्या डोक्याला का कल्हई करताय?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
28 Aug 2009 - 12:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझ्या बोलण्यातला उपहासही दुर्लक्षित राहिला आहे, नीधप!!
अदिती
28 Aug 2009 - 12:18 pm | नीधप
तेही अपेक्षितच होते.. :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
28 Aug 2009 - 11:35 am | युयुत्सु
चला उशीरा का होईना कुठे तरी उजाडू लागले आहे. हे ही नसे थोडके. कदाचित हा स्त्री शिक्षणाचा परिणाम असावा! :))
28 Aug 2009 - 2:10 pm | वेताळ
युयुत्सुचे म्हनणे नीट समजुन घेतले तर राग येण्याचे कारण नाही.सर्वसाधारण विवाहा संदर्भात कायदे बनवताना त्यात स्त्रींयावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे ,तो दुर करण्याकरिता स्त्रीयाना झुकते माप देणारे कायदे घटनेत बनवले गेले आहेत.परंतु आजच्या काळात स्त्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन सर्व क्षेत्रात उतरताना दिसत आहे. त्यामुळे जरादेखिल नवरा किंवा त्याच्या घरातुन त्रास झाला तर, स्त्रीया कायद्याचा आधार घेवुन आपल्या नवर्याला व त्याच्या नातेवाईकाना त्रास देताना सगळी कडे सर्रास आढळतात.ह्याला पायबंद बसणे गरजेचे आहे.
असाच गोष्टीसाठी दुर्बल दलितांचे रक्षण होण्यासाठी सरकारने अस्ट्रॉसिटी कायदा तयार केला आहे. आजकाल त्या कायद्याचा महाराष्ट्रात किती धसका घेतला गेला आहे हे आपण सर्व जाणता आहातच. त्यामुळे कायदे हे एकाद्याच्या हक्काचे जसे रक्षण करतात तसे ते दुसर्यावर अन्याय देखिल करत असतात.त्यामुळे कायद्याचा गैरवापर टाळण्याचे काम न्यायालये व सरकार ह्या दोघानी मिळुन केले पाहिजे.
वेताळ
28 Aug 2009 - 2:19 pm | सखाराम_गटणे™
>>युयुत्सुचे म्हनणे नीट समजुन घेतले तर राग येण्याचे कारण नाही.
+१
28 Aug 2009 - 2:26 pm | पक्या
>>परंतु आजच्या काळात स्त्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन सर्व क्षेत्रात उतरताना दिसत आहे.
हा हा हा. खरयं की काय?
युयुत्सुराव , तुम्ही तुम्हाला आलेल्या प्रतिसादातिल काही शब्दच पकडून त्यावर प्रतिसाद देत आहात. बर्याच मुद्यांना / प्रश्नांना सोयिस्कर रित्या टाळत आहात.
त्यामुळे तुमचे विचारही एकांगी च वाटत आहेत.
28 Aug 2009 - 3:03 pm | युयुत्सु
या प्रश्नाचे उत्तर या अगोदर आलेले आहे... पुनरावृत्ती करत नाही.
30 Aug 2009 - 10:52 am | JAGOMOHANPYARE
युयुत्सु, त्या सकाळ मधील लेखान्चे दुवे द्या.. साखरपुडा सावधान की असेच काही तरी नाव होते...
30 Aug 2009 - 11:29 am | युयुत्सु
ते लेख access करता आले नाहीत. साईट चा काहीतरी problem आहे.