मराठीचे मारेकरी?

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in काथ्याकूट
23 Feb 2008 - 8:07 pm
गाभा: 

आजच्या लोकसत्तामधील 'परीसशब्द' या सदरात श्री. अविनाश बिनीवाले यांचे हे मौलिक विचार

"शास्त्रीयदृष्ट्या रंगांच्या कल्पना एकच असल्या तरी प्रत्येक समाजात तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नि त्यांच्या इतिहासामुळे रंगांच्या छटा वर्णन करण्याच्या पद्धती वेगळ्या होतात. उदाहरणार्थ हिरव्या रंगाच्या छटा सांगायच्या झाल्या तर मराठी भाषक त्याच्या पर्यावरणानुसार त्या सांगेल. तो (भोंगळपणे) म्हणेल की झाडासारखा हिरवा किंवा चटणीसारखा हिरवा. हिरव्या रंगाबद्दल बोलताना एखादा इंग्लिश माणूस स्वाभाविकपणे त्याच्या भोवतालच्या निसर्गानुसार नि सामाजिक परिस्थिनुसार सांगेल. हिरव्या रंगाच्या वर्णनात एक शब्द तो खूपदा वापरतो तो म्हणजे'बॉटल ग्रीन' नि हा शब्द आपल्याकडच्या कोणत्याच भाषेत नसतो. युरोपियनांच्या जीवनात वाईनच महत्व खूपच असत नि वाईन साठवण्यासाठी हिरव्या रंगाची बाटली उत्तम असल्यामुळे त्याच्या बघण्यात ती रोजच असते. त्यामुळे तो सहजपणे 'बॉटल ग्रीन म्हणतो"

हे वाचून मला पडलेले काही प्रश्नः

- हिरव्या रंगाला झाड वा चटणी हे तुलनारुप वा परिमाण मानणारा मराठी या महाशयांना भोंगळ का वाटावा? आणि युरोपातल्या जीवनात वाईनचे महत्त्व असते व वाईन हिरव्या बाटलीत ठेवतात सबब हिरव्या रंगाला बॉटल ग्रीन म्हणणारा इंग्लिश या महाशयांना महान का वाटावा?
- 'बॉटल ग्रीन' हा शब्द आपल्याकदच्या कोणत्याच भाषेत नसतो हे सांगुन लेखक महाशयांना काय म्हणायचे आहे? हा शब्द नसला तर भाषा मागास व अप्रगत असते असे तर त्यांना म्हणायचे नसावे?
- झाडे व चटणी यांचा रंग नेमका नसतो तर तो अनुक्रमे प्रत्येक झाड व करायची पद्धत याप्रमाणे बदलत असतो व म्हणून ती तुलना भोंगळ असे म्हणायचे असेल तर बाटल्यांमध्ये देखिल हिरव्या रंगाच्या असंख्य छटा असतात. शिवाय वाईन ठेवतात ती हिरवी बाटली असा संदर्भ असेल तर यांचा आदर्श असलेला इंग्लिश 'वाईन बॉटल ग्रीन' का म्हणत नाही?
- एकदा स्वतःच नमूद केले की रंगाचे वर्णन हे परिस्थितीनुसार होते; तर मग मराठी भाषकाला झाड वा चटणी चा संदर्भ दिला म्हणून भोंगळ हे विशेषण का?"

एकुण काय तर मराठीचा पाण उतारा मराठी माणसाने नाही करायचा तर कुणी करायचा? असे सज्जन मराठी असताना ते काम करण्याची वेळ अन्य भाषिकांवर येणारच नाही!
मिपाकरांना या विषयी काय वाटते?

(मिपाकरांनो, मला संपूर्ण सदराचा दुवा देणे शक्य झाले नाही व तसे न करता संपूर्णं लेखन इथे उतरविणे मिपाच्या धोरणाविरुद्ध असल्याने कृपया कुणालादुवा देणे शक्य असल्यास तो द्यावा ही विनंती तसेच दुवा प्रकट होताच हे लेखन काढून टाकावे ही प्रशासकांना विनंती. मात्र मराठीचा अपमान सहन न झाल्याने मी तात्काळ लेख देऊन धोरणाचा भंग केला आहे त्याबद्दल क्षमस्व)

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

23 Feb 2008 - 9:15 pm | सुधीर कांदळकर

....... गेला टिंब टिंब मध्ये. असे फक्त अशांनाच वाटते की ज्यांचा आत्मविश्वास कमी आहे आणि ज्यांना इंग्रजीत ज्याला इन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात तो आहे. आपण कोकणातील दिसत नाही. कोकणातील प्रत्येक माणूस स्वतःला सर्वज्ञ आणि सर्वश्रेष्ठ समजतो. त्याला असे कधीहि वाटणार नाही. मी स्वतः कोंकणातील असल्यामुळे कुसुमाग्रजांपुढे सर्व इंग्रजी नाटककारांना कमी योग्यतेचे मानतो. तो गुलामीचा जमाना गेला आता. खेळ, कला व क्रीडा यातील आपली शैली पश्चात्यांपेक्षा कितीतरी उजवी आहे. फक्त बरीच वर्षे राज्यकर्ते असल्यामुळे त्यांना विज्ञानादि क्षेत्रात प्रगति करण्याची जास्त संधी मिळाली. आणखी दहावीस वर्शांत पाश्चात्यांनाच कॉम्प्लेक्स येईल पाहा.
असा लेख कोणी लिहिला असल्यास तो अनुल्लेखाने मारावा किंवा शंभर जणांनी लेख लिहून त्याचे खंडन करावे.

आजानुकर्ण's picture

23 Feb 2008 - 9:56 pm | आजानुकर्ण

बिनीवाले साहेब उगवतीच्या राज्यात अशा काहीशा नावाचे एक सदर लोकप्रभा मध्ये लिहितात. काही महिन्यांपूर्वीच्या एका लेखात त्यांचे खाली आलेले वाक्य पहा.

"ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या भाषांचा आग्रह धरण्याऐवजी आता 'हिंदी' चा आग्रह धरला जातो. ते लोक हिंदी बोलण्यास अतिशय उत्सुक आहेत व स्वतःहून हिंदीत संभाषण करतात. यावरून मला सावरकरांचे 'जर भारताच्या अखंडतेसाठी वेळ पडली तर मी मराठी या माझ्या मातृभाषेचा त्याग करून कधीही हिंदीचा स्वीकार करीन' हे वाक्य आठवले."

या वाक्याचा दुवा लोकप्रभेच्या मागील अंकांमध्ये सहज सापडणे शक्य आहे. सध्या वेळ नसल्याने तो शोधत बसत नाही.

(स्मरणशील) आजानुकर्ण

मुक्तसुनीत's picture

23 Feb 2008 - 10:01 pm | मुक्तसुनीत

"महाराष्ट्रातील काही करंटे त्यांच्या स्वतःच्या भाषांचा आग्रह धरण्याऐवजी आता 'हिंदी' चा आणि इंग्रजीचा उदोउदो करतात. ते लोक मराठीचे श्राद्ध घालायला तयार आहेत व स्वतःहून हिंदीत संभाषण करतात. यावरून मला विसोबा खेचरांचे 'विसोबा म्हणे ऐशा नरा, मोजुनि मारावे पैजारा' हे वाक्य आठवले."

पिवळा डांबिस's picture

23 Feb 2008 - 10:01 pm | पिवळा डांबिस

हिरव्या रंगाला झाड वा चटणी हे तुलनारुप वा परिमाण मानणारा मराठी या महाशयांना भोंगळ का वाटावा?
मला वाटते श्री बिनिवाले यांनी "भोंगळ" हा चुकीचा शब्दप्रयोग केला असावा. मला वाटते त्यांना "सर्वसाधारणपणे" (जनरली या अर्थी) म्हणायचे असावे.

शास्त्रीयदृष्ट्या रंगांच्या कल्पना एकच असल्या तरी प्रत्येक समाजात तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नि त्यांच्या इतिहासामुळे रंगांच्या छटा वर्णन करण्याच्या पद्धती वेगळ्या होतात.
हे मात्रं अगदी खरं. माझाच एक अनुभव सांगतो, कॉलेजात असतांना आम्हाला रसायनशास्त्रात फ्लेम टेस्ट असायची. हल्ली असते की नाही ठावूक नाही, पण त्यामध्ये निरनिराळी संयुगे निळ्या ज्योतीमध्ये धरून त्या ज्योतीला येणार्‍या रंगानुसार त्या संयुगातील धातू ओळखायचा अशी ती टेस्ट होती. उदा. सोडियम = सोनेरी, पोटॅशिअम = जांभळा वगैरे.
त्यात बेरीयमचा (मला वाटतं) हिरवा रंग होता. आमच्या "हिमालया पब्लिकेशनच्या" तद्दन देशी लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकात हा रंग "ऍपल ग्रीन" म्हणून वर्णन केलेला होता. तोपर्यंत फक्त लाल, पिवळी सफरचंदे पहाण्यात आलेली असल्यामुळे ऍपल ग्रीन म्हणजे काय हे कोडेच होते. आपल्या सुविद्य, आदरणीय वगैरे देशी लेखकांनी कुठ्ल्यातरी पाश्चात्य पुस्तकाची (या बाबतीत आय. एल. फिनार या इंग्रज लेखकाच्या) कॉपी मारली आहे हे उघड होते. तरीसुद्धा ऍपल ग्रीन म्हणजे काय?
पुढे बर्‍याच वर्षांनी अमेरीकेत असतांना बाजारहाट करतांना अचानक हिरवी सफरचंदे दिसली. त्या हिरव्या रंगाची छटा इतकी हुबेहूब होती की आमच्या दोघांच्याही तोंडून "अरे, बेरीयमचा कलर!" असे उद्गार निघून गेले. तेंव्हा कळलं की ऍपल ग्रीन म्हणजे काय ते...

आपल्याकडेही अशा काही रंगछटा आहेतच की ज्यांना पाश्चात्य समानार्थी शब्द शोधणे अवघड आहे. उदा., अबोली, शेंदरी, बैंगणी, आमसुली वगैरे...:))

धनंजय's picture

24 Feb 2008 - 10:15 am | धनंजय

"भोंगळ" हा भोंगळ शब्द वगळता परिच्छेद गमतीदार वाटला. त्या शब्दाव्यतिरिक्त मराठीविरोधी वाटला नाही.

विसोबा खेचर's picture

24 Feb 2008 - 9:44 am | विसोबा खेचर

माझ्या मते बिनिवाल्यांच्या म्हणण्याला आपण फारशी किंमत देता कामा नये. परंतु त्याचबरोबर बिनिवाल्यांना कदाचित 'भोंगळपणे' ऐवजी 'ढोबळपणे' किंवा 'ढोबळमानाने' हे शब्द वापरयचे असतील असेही मला वाटते!

कांदळकर साहेबांचा प्रतिसाद आवडला...

(मराठी) तात्या.

आजानुबाहू  हे रामाचे वर्णन आहे त्याचा अर्थ गुड्घ्यापर्यंत हात असणारा( जानु=गुडघा/ बाहू= हात)
पण आजानुकर्ण याचा अर्थ काय होतो?
गुडघ्या पर्यंत हात ठीक आहेत्...पण  गुडघ्या पर्यंत कान्?(कर्ण)

मुक्तसुनीत's picture

25 Feb 2008 - 8:07 pm | मुक्तसुनीत

..हा "गाढव" या प्राण्याकरता संस्कृत भाषेतला शब्द असावा. ('लंबकर्ण' या शब्दाचा भाऊ.)

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2008 - 8:28 pm | llपुण्याचे पेशवेll

पण मग कुंभकर्णाचे नाव कुंभकर्ण कशावरून पडले होते?
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

25 Feb 2008 - 8:46 pm | विसोबा खेचर

या ठिकाणी कुठल्याही कर्णाबद्दल चर्चा न केली तर बरं होईल.
फारच विषयांतर होतंय!
असो..
तात्या.

शुचि's picture

10 Jun 2010 - 9:49 pm | शुचि

हा हा ..... मजा आली प्रतिक्रिया वाचून.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 12:32 am | शिल्पा ब

मराठी भाषा अमृताते पैजा जिंकणारी आहे असे खुद्द ज्ञानेश्वरांनी म्हंटलेले आहे तर बाकीच्या फुटाण्यांना काय किंमत द्यायची?

अवांतर : कान बाकि सोनारानेच टोचावे हो!!! :-)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/