गाभा:
नमस्कार मिपाकरांनो.
माझा फ्लॅट तयार झाला आणि बिल्डर कडून चाव्या घेण्याची वेळ आली :) <:P
आता फायनली बिल्डरकडून कोणती कागद पत्रे घ्यावी ह्याबद्दल कोणी जाणकार मंडळींकडून मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल.
मी पझेशन सर्टीफिकेट घेणारच आहे. त्याव्यतिरिक्त काय मागायचे ते सांगा.
धन्यवाद,
अनूप.
प्रतिक्रिया
25 Aug 2009 - 11:24 am | शैलेन्द्र
ओ सी म्हनजे ऑक्युपेशन सर्तीफिकेट आणि सी सी म्हणजे कंप्लीशन सर्टीफिकेट.
पण हे लगेच तयार असतिलच असे नाही. कदाचीत ते मिळायला वेळ लागु शकतो.
वीज मिटर नावावर आहे?
25 Aug 2009 - 11:34 am | पर्नल नेने मराठे
उपयुक्त धागा!!!
चुचु
25 Aug 2009 - 11:38 am | आशिष सुर्वे
फ्लॅट ज्या जागेवर बांधलेला आहे, त्या जागेला स्थानिक पालिकेची/महापालिकेची 'एन.ओ.सी' मिळाली आहे का ते अवश्य पहा
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
25 Aug 2009 - 11:56 am | शैलेन्द्र
एन ओ सी फ्लॅट घेण्याआधी पहायला हवी.
अजुन एक, जर मुळ प्लॅन बदलला असेल तर बदललेला अंतीम प्लॅन(अॅप्रुव्हड) मागुन घ्या. त्यात बिल्डरने जादा टी डी आर वापरला असेल तर तो त्याने विकत घेवुन सदर ईमारतीवर चढवलाय का ते पाहुन घ्या.
25 Aug 2009 - 11:19 pm | अनुप कोहळे
एन ओ सी आहे. रजीस्ट्रेशन च्या वेळेस ती सर्व कगदपत्रे होती.
वीज मिटर बघवे लागेल. प्लॅन बदललेला नाही.
25 Aug 2009 - 11:56 pm | विकि
तुम्ही वकीलाकडे(सीवील)जाऊन याबाबत थोडे पैसे मोजून योग्य मार्गदर्शन घ्या.आधीच तुमची माहीती अपुरी आहे.
आमच्या नावावावावर फ्लॅटट्ट काकाय काकाहीच नानाही,तुतूम्ही ततर भाभाग्यवान ठठरलात,निनीदान पापार्टी ततरी धाधा.
सध्या कमीने हा चित्रपट पाहून प्रभावित झालेला.
ढॅण्ट.. ढॅण..ढॅण्ट.. ढॅणढॅण्ट.. ढॅणढॅण्ट.. ढॅण
विकि
26 Aug 2009 - 2:38 am | अनुप कोहळे
अहो विकि साहेब,
आम्ही सध्या देशाबाहेर आहोत आणी घरील मंडळी ताबा(हुश्श.....कधीचा आठवत होतो हा शब्द) घेणार आहेत. ते वकील करतीलच. पण आपले इथे विचरून क्रॉस चेक केलेले बरे म्हणतो. कसे काय?
26 Aug 2009 - 5:25 am | पाषाणभेद
पार्टी तर हवीच. कधी बसायचे?
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
27 Aug 2009 - 4:48 pm | येडा अण्णा
लोन करणार असाल तर Nationalised Bank चेच होम लोन करा. कारण माझ्या अनुभवावरून तरी मला असे वाटतेय की Nationalised Bank सहसा सगळी कागद्पत्रे पूर्ण असल्याशिवाय होम लोन पास करत नाहीत. आणि तुमचा प्रोजेक्ट एकदम कायदेशीर आहे याची तुम्हाला खात्री मिळते.
27 Aug 2009 - 11:14 pm | शैलेन्द्र
त्यांच लोन वगैरे सगळ झालय, ते पझेशन घेताना लागणार्या पेपर बद्दल बोलतायेत.