इन्कम टॅक्स समन्स..मदत/सल्ला हवा आहे.

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in काथ्याकूट
24 Aug 2009 - 2:23 pm
गाभा: 

मी काही वर्षांपूर्वी(२००६ पर्यंत) डोंबिवलीला राहत होतो आणि मी माझ्या पॅन कार्डवर तिथलाच पत्ता आहे.

२००६ पर्यंत इन्कम टॅक्स मी नियमित पणे कल्याणच्या ऑफिसात भरत होतो.

२००६ पासुन मी बेंगलोर मध्ये आहे आणि त्यानंतरचा इन्कम टॅक्स मी सी.ए. करवी बेन्गलोर ओफिसातच भरत आलेलो आहे.(नक्की कुठे ते सी.ए च जाणे पण माझ्या कडे आय.टी.आर पावत्या आहेत.)

परंतु काल मला डोंबिवलीहुन फोन आला की माझ्या नावे इन्कम टॅक्सचे समन्स आलेले आहे आणि मला २७ ऑगस्ट ला इन्कम टॅक्स ऑफिसात २००६-२००९ दरम्यानचे फॉर्म १६,आय.टी.आर,सॅलरी डिटेल्स घेवुन हजर राहायला सांगितले आहे.(ते पत्र बेंगलोरच्या पत्त्यावर पाठवायला सांगितले आहे.अजुन मिळाले नाही.मिळाल्यावर त्यातील डिटेल्स कळवेन.)

इथल्या सहकार्यांना विचारल्यावर असे कळाले की मी पॅन कार्डावर पत्ता अपडेट न केल्याने असे झाले आहे.

मी पहीला टॅक्स जिथे भरला त्या इन्कम टॅक्स वॉर्ड ऑफिसरला २००६-२००९ पर्यंत माझ्या पॅनकार्डसंबंधी काहीच हालचाल (टॅक्स भरणे) न दिसल्याने त्याने असे समन्स बजावले असेल.

मला काहीच कळेनासे झाले आहे.

ह्यावर कुणी काही मदत करु शकेल का? अथवा सल्ला देवु शकेल का?

(२७ ऑगस्ट ला मुंबईत येणे सध्यातरी अशक्य दिसत आहे.)

-(चिंतीत) योगेश

प्रतिक्रिया

ए.चंद्रशेखर's picture

24 Aug 2009 - 3:28 pm | ए.चंद्रशेखर

घाबरू नका. काळजी करू नका.
सध्या एक पत्र रजिस्टर्ड ए. डी ने डोंबिवलीच्या तुमच्या आय.टी.ओ. ला पाठवून द्या. त्यात तुम्ही २००९ पर्यतचे रिटर्नच्या अ‍ॅकनॉलेजमेंट्सच्या कॉपी जोडा. व पुढची तारीख मागून घ्या.
त्या तारखेपर्यंत डोंबिवलीचा टॅक्स कन्सल्टंट गाठून पुढची तारीख अटेड करायला सांगा.
चंद्रशेखर

वेदश्री's picture

24 Aug 2009 - 7:41 pm | वेदश्री

योगेश,

मला वाटते की आपल्याला समन्स नाही तर केवळ 'कारणे दाखवा' नोटीस आली असावी. आपण दरवर्षी रिटर्न भरल्याचे पुरेसे पुरावे देऊ शकला नाहीत अथवा खूप वेळा नोटीसा पाठवूनही कसले उत्तर दिले नाहीत तरच समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे.

कल्याणच्या ऑफिसकडे जरी तुमचे रिटर्न दाखल झाले नसले तरी पॅन नंबर वरून तुमच्या टॅक्स भरल्याची माहिती त्यांच्याकडे असणारच कारण पॅन नंबर अख्ख्या भारतात कुठेही गेल्यास बदलत नाही. तो योग्य भरला गेलाय की नाही इतकेच त्यांना तपासायचे असावे, त्यामुळे त्यात घाबरण्यासारखे काही नाही. पॅन कार्डवरचा पत्ता बदलून घेऊन योग्य त्या आयटीओला रिटर्न भरणे किंवा तो न बदलता रिटर्न कुठेही तयार करून घेतले तरी कल्याण आयटीओला सुपूर्त करणे, या दोन्हीपैकी एक काहितरी करायला हवे होते. परंतु रिटर्न भरणे हा अतिमहत्त्वाचा मुद्दा जर पाळला गेला असेल तर हा मुद्दा बराचसा गौण ठरेल. 'नकळत टेक्निकल चूक झाली, माफ करा. इथून पुढे योग्य ती अंमलबजावणी करून घेतो.' इतके म्हटल्याने काम होईल.

आपण म्हणता त्याप्रमाणे जर आपल्याकडे २००६-२००९ मधले सर्व आयटी रिटर्न भरल्याचे पुरावे अर्थातच अ‍ॅकनॉलेजमेंट्स असल्या तर त्याची फोटोकॉपी पत्त्याबद्दलच्या विस्तृत खुलास्यासोबत कल्याणच्या आयटीओला रजिस्टर्ड पोस्टने पाठवून द्या. याच पत्रात सद्ध्याची नोकरी बँगलोरला असल्याने मुंबईला येण्यातली असमर्थता व्यक्त करून तुमची फाईल बँगलोरला ट्रान्सफर करता येईल का हेही विचारून घ्यावे. ह्या पत्राची एक प्रत स्वतःकडे जपून ठेवा. हे पत्र पोस्टात टाकल्याबद्दल पोस्टमास्तरकडून अ‍ॅकनॉलेजमेंट मिळवता आली तर खूपच बरे जेणेकरून तुम्ही उत्तर पाठवले होते ह्याचा तुमच्याकडे पुरावा राहिल. यावर त्यांच्याकडून काय होते ते पुढे कळेलच.

नोटीसा या आपल्या आपण सहज हाताळू शकतो त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट नेमायची अजिबात जरूर नाही असे माझे मत आहे. शेवटी टॅक्स कन्सल्टंट याबाबत तुमच्याकडून माहिती घेऊन तीच तशीच्या तशी आयटीओला सुपूर्त करण्याचेच काम करेल.. त्याहून वेगळे असे काहीच नाही.

जर भरलेल्या रिटर्नमध्ये काही दोष/अपूर्णता असेल तर त्या-त्या वर्षाचे रिटर्न भरण्यासाठी दिलेल्या फीमध्ये अशा नोटिसा संभाळणे हीदेखील सुविधा अंतर्भूत असेल तर या गोष्टी तुमच्या बँगलोरच्या सीएने विनामूल्य सोडवून द्यायला हव्या. तसे नसल्यास सांगितल्या गेलेल्या दोष वा अपूर्णतेबाबत त्याला माहिती विचारून ती विश्वासातल्या एखाद्या टॅक्स कन्सल्टंट अथवा सीएला देऊन पुढची कार्यवाही पहायला सांगणे योग्य राहिल.

नाना बेरके's picture

25 Aug 2009 - 10:21 am | नाना बेरके

इन्कम टॅक्सवाले पोलीस कधी झाले ?

अहो योगेश, ती नोटीस असेल. काही घाबरून जाऊ नका.

नोटीसा या आपल्या आपण सहज हाताळू शकतो त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट नेमायची अजिबात जरूर नाही असे माझे मत आहे. शेवटी टॅक्स कन्सल्टंट याबाबत तुमच्याकडून माहिती घेऊन तीच तशीच्या तशी आयटीओला सुपूर्त करण्याचेच काम करेल.. त्याहून वेगळे असे काहीच नाही.

- हे अगदी खरे आहे. वेदश्रीनी सुचविल्याप्रमाणेच करा. तेच योग्य आहे.

कानडाऊ योगेशु's picture

25 Aug 2009 - 12:14 pm | कानडाऊ योगेशु

सर्वांचेच धन्यवाद.तुम्हा सर्वांच्या उत्तरांनी जीवात जीव आला भौ..#:S
(नोटीसीबद्द्ल फोनवर कळल्यापासुन झोपेमध्ये सारखे गज दिसु लागले होते. :S )
मिसळपावच्या व्यापकतेबद्दलही खात्री पटली.
(काव्य-शास्त्र-विनोदा पलीकडेही मिपाची व्याप्ती आहे.)

>>इन्कम टॅक्स मी सी.ए. करवी बेन्गलोर ओफिसातच भरत आलेलो आहे.

सी. ए. ने आय.टी.आर पावत्या बरोबर कर भरणा केल्याचे बँकेचे चलन नाही दिले का ?

कानडाऊ योगेशु's picture

25 Aug 2009 - 5:27 pm | कानडाऊ योगेशु

कंपनीला वर्षाच्या सुरवातीलाच गुंतवणकीसंबंधी डिक्लेरेशन द्यावे लागते आणि त्यानुसार कंपनी पगारातुन टी.डी.एस कापते.त्यामुळे टी.डी.एस व्यतिरिक्त जादा कर भरायची आवश्यकता नसावी असे वाटते.
फॉर्म-१६ मध्ये टी.डी.एस भरल्यासंबंधीत सर्व अक्नॉलेज्मेंट्स आहेत.

वेदश्री's picture

25 Aug 2009 - 8:38 pm | वेदश्री

>कंपनीला वर्षाच्या सुरवातीलाच गुंतवणकीसंबंधी डिक्लेरेशन द्यावे लागते आणि त्यानुसार कंपनी पगारातुन टी.डी.एस कापते.त्यामुळे टी.डी.एस व्यतिरिक्त जादा कर भरायची आवश्यकता नसावी असे वाटते.

पगाराव्यतिरिक्त तुमचे जर काही उत्पन्न असेल (जसे की घरभाडे, शेअर खरेदीविक्रीतून झालेला नफा, वगैरे) तर त्यासाठी टीडीएस कापणे हे तुमच्या एम्प्लॉयरचे काम नाही त्यामुळे ते तुम्ही स्वतः तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमधून सरकारला दाखवून त्यावर योग्य तो टॅक्स भरणे जरुरी असते.

तसेच काही बाबतीत एम्प्लॉयरने ठरवलेल्या काळात जर पूर्ण गुंतवणूक झाली नसेल (म्हणजे डिसेंबर/जानेवारीत अख्ख्या वर्षाच्या १ लाख गुंतवणुकीच्या पावत्या मागितल्या आणि आपले मुख्य हप्ते फेब्रुवारी/मार्चमधले असल्यास) तर जास्तीचा टीडीएस कापला जातो, जो रिफंड स्वरूपात परत मिळवण्यासाठी त्या गुंतवणुकी रिटर्नमध्ये भरायच्या असतात. शेअरबाजार, स्थावर मालमत्तेतली गुंतवणूक यात तोटा झालेला असल्यासही तो रिटर्नमध्येच नोंदवून त्याकरता टॅक्समधून वजावट करण्यासाठी रिटर्न भरणे जरूरी असते.

ढोबळ मानाने या सर्व गोष्टी जर नसतील तर उपरोल्लिखित स्टेटमेंट करणे योग्य आहे असे वाटते.