भाजप नक्की कोणता ?

हरकाम्या's picture
हरकाम्या in काथ्याकूट
20 Aug 2009 - 10:18 pm
गाभा: 

सध्या भाजपचे विचारमंथन चालु आहे.त्यात भाजपला लोकसभा निवडणुकीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची कारणे शोधण्याचे काम चालु आहे.एकीकडे वसुंधरा राजे आपले शक्तीप्रदर्शन करतायत तर ज्येष्ठ नेते श्री. जसवंतसिंह यांनी पुस्तक लिहिलेले आहे.
त्यावर वेगवेगळे नेते आपाअपली मते देत आहेत.. भाजप अध्यक्ष यांनाही जसवंतसिंह यांनी जिनांविषयी लिहिलेले आवडलेले नाही.
खुद्द भाजपच्या नेत्यांनाही जसवंतसिहांची जिनांविषयीची मते पटलेली नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी तर जसवंतसिंहाना घरचा आहेर दिलेला
आहे. याच्या आधी भाजपचे नेते श्री. अडवाणी यांनी ते पाकिस्तानच्या दौर्यावर असताना व जिनांच्या कबरीवर फुले वाहताना जिनांना
' प्रशस्तिपत्रक " दिले होते.त्यावेळी सुध्धा असेच काहुर माजलेले होते.
एकुणच काय तर भाजपच्या काही नेत्यांना जिनांविषयी प्रेमाचा उमाळा आलेला दिसतोय.
या उमाळ्यातुन हे दोघे नेते काय साधु पाहतात हे समजत नाही.मलातर यावरुन या पक्षाला काय झाले आहे तेच समजत नाही.
या सर्व प्रकारावरुन या पक्षाला " भंजाळलेल्या जनांचा पक्ष " का "भरकटलेल्या जनांचा " पक्ष म्हणावे हेच समजत नाही.
आणि हा असला " भंजाळलेला " आणि "भरकटलेला " पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत लोकांसमोर काय घेउन जाणार?
आपल्याला काय वाटते? या पक्षाला ही नांवे " सार्थ "वाटतात काय.

प्रतिक्रिया

shekhar's picture

21 Aug 2009 - 10:58 am | shekhar

भाजप हा वृध्दांचा पक्ष राहिलेला आहे. भाजपने दुसर्‍या युवा फळीला तयार होऊ दिलेच नाही. किंबहुना दुसर्‍या फळीच्या निर्मितीत मोडताच घातलेला आहे. स्वतःची खुर्ची आणि महत्व यांमध्ये जे आले त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणे हे या म्हातार्‍या नेत्यांचे काम. यांतून जर वेळ मिळाला तर हे काही पक्षकार्य किंवा समाजकार्य करणार.
जे गुण नेत्यांमधे ते कार्यकर्त्यांमधे येणारच.
एकुणच पक्षाला काहीच दिशा राहिलेली नाही. काही वैचारिक बैठक असेल अशी पूर्वी अंधुक आशा होती. आताचे हे नाटक पाहिल्यावर ही आशाही मावळली आहे.

- शेखर काळे.

प्रदीप's picture

21 Aug 2009 - 12:25 pm | प्रदीप

१०० % असेच म्हणतो.

विशाल कुलकर्णी's picture

21 Aug 2009 - 1:02 pm | विशाल कुलकर्णी

"साठी बुद्धी नाठी" अशी एक म्हण आहे आपल्याकडे आणि भाजपामध्ये सगळे या कॅटेगरीतलेच लोक राहीलेत बहुदा! दुर्दैव आपले दुसरे काय? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

तर्री's picture

21 Aug 2009 - 6:51 pm | तर्री

भा.ज. पा ला शिव्या देणे अगदी सोपे आहे .
माझ्या मते भा.ज.प हा भारतीय मध्यम वर्गाच्या अपेक्षांच्या ओझ्या खाली दबून गेला आहे.
पुढच्या पिढी कडे आपला देश सुरक्षीत हस्तांतरीत करयचा असेल , तर हिंदुत्व / भा.ज.पा. ला पर्याय नाही.

जसवंत सिंह / ऊमा भारती / मदनलाल /गोविंदाच्यार्य / कल्याणसिंग / बांगारू लक्ष्म्ण / बलराज मधोक्......हे नेते सोडून जाणे हे काही भूष्ण नाही . पण म्हणून तेवढ्याने पक्ष भंजाळलेला " आणि "भरकटलेला " असे म्हणणे ही योग्य वाटत नाही.

इतर पक्षांचे ( बहूतेक पक्ष "घराणेशाही" ने असथीत्वात / वैचरीक बैठ्क यथातथाच) काय ? तेथे सगळे आलबेल आहे का ?
पद्मसिंग पाटील / नारायण राणे / गोविंद राव आदीक/ पप्पु यादव / मायावतीजी / यांचे काय ?
भा.ज.पा / जनसंघ / संघा वर टीका करणे हे त्यांच्या कडे "आपुल्कीच्या भावनेने पहाणे असे मी मानतो. काँग्रेस ला नाही हो कोणी शिव्या देत कारण अपेक्षा शून्य.

नितिन थत्ते's picture

21 Aug 2009 - 8:44 pm | नितिन थत्ते

>>>काँग्रेस ला नाही हो कोणी शिव्या देत.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

काँग्रेसला पूर्वी लोक लय शिव्या द्यायचे कारण एक 'वेगळा' पक्ष आहे अशी लोकांना आशा होती. पण या वेगळ्या पक्षाला पायल्यावर लोकांना 'ते आधीचेच बरे' असे वाटून लोक शिव्या देत नसावेत बहुधा.

असो. मिपावरचे धागे खंगाळले तर ७०-७५% टक्के धागे कॉ-राकॉ ला शिव्या देणारेच आढळ्तील. (त्यासाठी वाघाच्या पिंजर्‍यातले मंत्र्याचे फोटोसुद्धा चालतात.)

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

तर्री's picture

21 Aug 2009 - 9:01 pm | तर्री

नितिन जी ,
मान्य आपले म्हणणे , पण वायपयींच्या भा.ज.पा.पाच वर्षांच्या सत्ते मधे "वेगळे" पण आढळे का ?