गोविंदा आला रे आला | आता करू या गोपालकाला

क्रान्ति's picture
क्रान्ति in पाककृती
15 Aug 2009 - 9:33 pm

ज्वारीच्या लाह्या, साळीच्या [तांदळाच्या] लाह्या, पोहे, चुरमुरे थोड्या ताकात ओलसर होतील असे भिजवून घ्यावे, त्यात भिजवून ठेवलेली हरभर्‍याची दाळ घालावी, गाजर, काकडी, पेरू, सफरचंद अशा फळांच्या बारीक फोडी, डाळिंबाचे दाणे [ऐच्छिक] घालावे, लिंबाचे आणि आंब्याचे लोणचे घालावे, खोवलेला नारळ, मीठ, साखर चवीनुसार घालावे, हिरव्या मिरच्या वाटून घालाव्या, आलं बारीक चिरून किंवा खिसून घालावं. म्हणजे चांगली चव येते. अगदी बशा भरतेवेळी किंवा वाटप करायच्या वेळी वरून दही घालावे, सगळे पदार्थ चांगले मिसळावेत आणि हिंग, जिरे-मोहरी घालून तेलाची किंवा तुपाची फोडणी आवडीप्रमाणे द्यावी. फोडणीत हळद मात्र घालू नये. आता तयार होईल एकदम फर्मास गोपालकाला. इथे मेतकूट आणि भिजलेली दाळ टंकायचं विसरले होते. अनामिक आणि विजूभाऊ यांच्या प्रतिसादात वाचल्यावर लक्षात आलं. मोजमापात, प्रमाण बद्ध काहीही करायची सवय नसल्यामुळे काल्यात घालायच्या साहित्याची वजनं-मापं दिली नाहीत. सगळे पदार्थ "अंदाजपंचे धागोदरसे" घेतले आहेत.

From
From

प्रतिक्रिया

अनामिक's picture

15 Aug 2009 - 10:06 pm | अनामिक

"गोपालकाला गोड झाला... गोड झाला" असं काहीतरी गाणं होतं ते वरचं चित्र बघून आठवलं...

क्रान्ति तै... तोंडाला अगदी पाणी सुटलं गं!

-अनामिक

अवलिया's picture

15 Aug 2009 - 10:45 pm | अवलिया

मस्त... लै भारी ! :)

--अवलिया

रेवती's picture

16 Aug 2009 - 12:17 am | रेवती

कालच नैवेद्याला काला केला होता. भन्नाट चव लागते.
आता फोटू बघून तोंडाला पाणी सुटले. पुन्हा करायला हवा आता.

रेवती

विसोबा खेचर's picture

16 Aug 2009 - 12:45 am | विसोबा खेचर

मस्त! :)

तात्या.