मिसळपावच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.
लहानपणापासून स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण आपण साजरे होताना पाहत असतो. शाळांमध्ये जेवढ्या उत्साहात हे सण साजरे होतात, तेवढे कॉलेज, विद्यापीठ किंवा ऑफ़िसांमधून साजरे होताना दिसत नाही. मी कॉलेजात गेलो होतो तेव्हा आठवतंय - मी, माझा वर्गमित्र आणि आणखी १५-२० विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कॉलेजातले काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून साधारणपणे ५०-६० लोकंच वेळेवर उपस्थित असत. काही शिक्षक उशीरा का होईना? पण निदान हजेरी तरी लावून जात. पुणे विद्यापीठात एम्.एस्.सी. करत असताना सकाळी लवकर उठून झेंडावंदनासाठी मेन बिल्डिंगपाशी गेलो तेव्हा तर फारच निराशा झाली. सायन्स आणि आर्ट्सच्या विभागांची संख्या विपुल असल्यामुळे दिसायला गर्दी बरीच होती. पण आमच्या रसायनशास्त्र विभागातून विद्यार्थी, शिक्षक मिळून दोन हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच मंडळी हजर होती. राष्ट्रगीत झाल्यानंतर चहा प्यायला मात्र सर्वजण हजर!
नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये मात्र उत्साहवर्धक चित्र होतं. एन्.सी.एल्. मेनगेटपाशी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण, राष्ट्रगीत होतं आणि त्यानंतर संशोधन-विद्यार्थ्यांच्या गोल्डन ज्युबिली होस्टेलमध्ये डायरेक्टसह अनेक वैज्ञानिक आणि कर्मचारी ९ वाजताच्या ध्वजारोहणासाठी हजेरी लावायचे. डायरेक्टर येणार असल्यामुळे आठवडाभर आधीपासून होस्टेल स्वच्छ करणं, सजवणं इत्यादि कामं तिथले संशोधनाचे विद्यार्थी करतात.
इथे बिट्स, पिलाणीमध्ये आज स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि देशभक्तिपर गीतांचं गायन झालं. विद्यार्थ्यांची उपस्थिती तशी बेताचीच होती, पण टीचिंग आणि नॉनटीचिंग स्टाफ़मधले जवळजवळ सर्वजण उपस्थित होते (आठवडाभरात सुमारे पन्नासएक लोकांशी तोंडओळख झाली, त्यातले जवळजवळ सर्वजण उपस्थित होते. तेही सहकुटुंब).
आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६२ वर्षे झाली. त्यात काय कमावलं, काय गमावलं, भविष्यात काय करायला हवं, यावर अनेक थोरामोठ्यांनी अनेकदा विचारमंथन केलेलं आहे. आज भारताला गरज आहे ती भारतीय माणसाने भारतीय माणसासाठी वेळ देण्याची. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर बिट्स पिलाणीचे व्हाईस चान्सेलर, कम्युनिटी वेलफ़ेअर डिपार्टमेंटच्या चीफ या लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीजवळ येऊन हस्तांदोलन, नमस्कार करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात भाषणबाजी करण्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचं आहे. नाही का?
प्रतिक्रिया
15 Aug 2009 - 10:53 am | अवलिया
मिसळपावच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.
--अवलिया
15 Aug 2009 - 11:03 am | शाहरुख
आमच्याही सर्व भारतीयांना भरपूर शुभेच्छा !!
शाळेत असताना फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आमच्या गणवेषाला कडक ईस्त्री असायची...झकास वाटायचे तेंव्हा..कार्यक्रम झाल्यावर एक पेढा मिळायचा :-)
- झेंडावंदनाला आवर्जून जाणारा शाहरुख
15 Aug 2009 - 11:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाविद्यालयात फार मोजकेच विद्यार्थी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात याच्याशी सहमत आहे. फक्त राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित राहतात, तेही आजच्या दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या एका कार्यक्रमात भर पडणार असते. परिसर स्वच्छतेचे फोटो काढायचे असतात म्हणून... संस्थाचालकांबरोबर आलेले पाहूणे आणि संस्थाचालक यांच्या भाषणाबरोबर प्राचार्यांचे समन्वयाचे भाषण संपले की, केव्हा एकदा आम्ही महाविद्यालयातून बाहेर पडू असे आम्हाला आजच्या दिवशी होते. [ हे जर का माझ्या संस्थाचालकांनी वाचले तर माझी काही खैर नाही. ]असो,
मिसळपाव परिवाराच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा !!!
-दिलीप बिरुटे
15 Aug 2009 - 12:20 pm | सहज
मिसळपाव परिवाराच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा !!!
15 Aug 2009 - 11:17 am | टुकुल
मिपाकरांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.
भारतीय,
टुकुल.
15 Aug 2009 - 11:28 am | घाटावरचे भट
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
- भटोबा
15 Aug 2009 - 12:17 pm | योगी९००
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा!!
खादाडमाऊ
15 Aug 2009 - 1:11 pm | प्रमोद देव
खरंच,स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला नेमके काय करायचे असते?
मलाही हाच प्रश्न पडतो. झेंडावंदन वगैरे शाळेत असेपर्यंतच होते. त्यानंतर कुठेच नाही घडले.
पण मी माझ्यापरीने तो प्रश्न सोडवला. गेली जवळ जवळ तीस-पस्तीस वर्षे(एखाद-दुसरा अपवाद वगळता) दर १५ ऑगस्टला जाऊन राष्ट्र सेवादलाच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करतो....बस्स. इतकेच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतो....बाकी सगळा आनंदी आनंदच आहे.
आजही आत्ताच रक्तदान करून आलो. :)
15 Aug 2009 - 2:08 pm | आशिष सुर्वे
रंगल्या दशदिशा आज तिरंग्यात
ध्वज जेव्हा गगनी फडकला..
जय हिंद चा घोष निनादता
हिंदमातेचरणी माथा अमुचा झुकला..
जय हिंद!
======================
मजहब कई है यहां
कभी हिंदू, कभी मुस्लिम,
कभी इसाई, कभी सरदार है..
आंख ना कोई उठाना हमपे
भारतमां के लिए हम 'एक' है,
तैयार है!!
जय हिंद!
15 Aug 2009 - 5:56 pm | अनामिक
सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा!!
-अनामिक
15 Aug 2009 - 8:38 pm | पिवळा डांबिस
मिसळपावच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.
-पिडांकाका