गाभा:
गुगलवर भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करत असताना हे सापडलं. पाहिल्यावर धक्काच बसला.
http://www.iloveindia.com/indian-heroes/bhimsen-joshi.html
अशा लोकांचं काय करायचं?
विशाल.
गुगलवर भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करत असताना हे सापडलं. पाहिल्यावर धक्काच बसला.
http://www.iloveindia.com/indian-heroes/bhimsen-joshi.html
अशा लोकांचं काय करायचं?
विशाल.
प्रतिक्रिया
14 Aug 2009 - 3:47 pm | अरुण वडुलेकर
तो दुवा पाहिला. ते छायाचित्र पाहून..
देव त्यांचे भले करो
एवढेच म्हणता येईल.
14 Aug 2009 - 3:48 pm | प्रशांत उदय मनोहर
हा घोळ त्यांना निदर्शनात आणून द्यावा. शक्य असल्यास त्यांना पं. भीमसेन जोशींचं प्रकाशचित्र उपलब्ध करून द्यावं. आणि कालांतराने भारतरत्न (व इतर अनेक) पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती त्यात देऊन संपादित करण्याची विनंती करावी.
त्या वेबसाईटमध्ये माहिती देताना सुरुवातीला टेम्पलेट दुसर्या प्रोफाईलवरून उचललं असणार आणि फोटो बदलायचा राहिला असेल.
- प्रशांत
14 Aug 2009 - 4:00 pm | विशाल कुलकर्णी
मी त्यांना मेल पाठवली आहे. पंडीतजींबद्दल शक्य ती सर्व माहीतीही दिली आहे. वर तुमचे डोके ठिकाणावर आहे का ? असा प्रश्नही विचारला आहे. बघु काय उत्तर देतात ते, उत्तर नाही दिले तरी चालेल फक्त तिथल्या पं. बिरजु महाराजांच्या फोटोऐवजी पंडीतजींचा फोटो लावला तरी भरुन पावेल.
सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!