थाई प्रॉन्स करी

अडाणि's picture
अडाणि in पाककृती
11 Aug 2009 - 10:06 pm

सोपी पध्धत : ओळखीतल्या (किंवा अनोळखी पण चालेल ) 'थाई' कुकला बोलवा. त्याला प्रॉन्स करायला सांगा !!! झाली की थाई प्रॉन्स 'करी'
.
.
.
आता थोडी अवघड पध्धत : करायला तशी खुप सोप्पी आहे पण जिन्नसांची तयारी करून ठेववी लागते.
जिन्नसः
तेल - २ मोठे चमचे
कांदा - १ मध्यम आकाराचा
ढोबळि मिरची - १ (छोट्या आकाराची - मोठि असेल तर अर्धीच घ्या)
कडीपत्ता - दोन-चार पाकळ्या
कोथिंबीर - दहा काड्या
लसून - २ मोठ्या पाकळ्या
आले - अर्धा चमचा (किसलेले)
साखर - १ चमचा
लिंबू - १
नारळाचे दुध - १ कप
थाई रेड करी सॉस - ३ ते ४ चमचे (उस गावला हा ट्रेडर जो मधे चांगला मिळतो )
आणि..... अर्धा किलो प्रॉन्स (जर सोललेले आणि डी-व्हेन्ड असतील तर पाव किलो पण पुरे...)

तर मंडळी सगळे सामान (वर दिलेले) जमवले कि कामाला लागा. नेहमीप्रमाणे कांदा चौकोनी कापून घेणे. कोथिंबीरीची पाने काधून देठाचा चांगला भाग बारीक चिरून घ्या. (त्यामूळे देठ वाया जात नाहीत आणि परतताना मस्त वास येतो ) लसून उभा चिरून घ्या. (किंवा बारीक किसणिने किसला तरी चालेल) तसेच ढोबळी मिरची ही चौकोनी चिरून घ्या. हि झाली बेसीक तयारी -

त्याच बरोबर नारळाचे दुध आणि थाई रेड करी सॉस काढून ठेवा -

आता सर्वात महत्वाचे! प्रॉन्स स्वच्छ करून घ्या. आवडत असेल तर शेपूट आणि डोक्यचे कवच ठेवा पण मधला धागा काढायला मात्र विसरू नका... आम्ही मात्र वेळ वाचवण्या साठी स्वच्छ केलेले प्रॉन्स आणलेत डायरेक्ट बाजारातून...

आता मुख्य काम! खोलगट कढाई किंवा मोठे पातेले (शक्यतो जाड बुडाचे चांगले) घ्या, तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात लसून (उभा कापलेला) तळायला टा़का. अर्ध्या मिनीटात कांदा, आले, कडीपत्ता आणि कोथिंबीरीचे चिरलेले देठ टाका. कांदा परतून घ्या (अगदी लाल करायची गरज नाही) मग त्यात नारळाचे दुध आणि थाई रेड करी सॉस टाकून परतून घ्या. (जास्त तिखट पाहीजे असेल तर एखादा चमचा सॉस जास्त टाका) एक उकळी आल्यावर त्यात ढोबळी मिरची आणि साखर, मिठ टाकून झाकण लावा (जेणेकरून आतल्या वाफेवर लवकर शिजेल. झाकण टाकायच्या आधी पुरेसे पाणी आहे का बघा, कमी असल्यास थोडे पाणी टाका)

मिरची शिजल्यावर (साधारण ६ - ८ मिनीटे) त्यात प्रॉन्स आणि लिंबू रस टाकून २ मिनीटे शिजवून घ्या. (प्रॉन्स ऑलरेडी शिजवलेले असल्याने जास्त वेळ शिजवू नयेत, कच्चे आणलेले असतील तर १०-१२ मिनीटे शिजवावेत...)

चमचमीत स्पाईसी थाई प्रॉन्स करी तयार...

गरम गरम भाता बरोबर हाणा !!!

- मुळ रेसेपी

प्रतिक्रिया

टारझन's picture

11 Aug 2009 - 10:20 pm | टारझन

कोळंबी =)) =)) =))
मेलो .... तात्या .... कोळंबीची करी ... =)) =))
कट्टा आठवला

- हिणकस टार्‍या

प्राजु's picture

11 Aug 2009 - 10:32 pm | प्राजु

अहो श्रावण आहे ना!! :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवलिया's picture

11 Aug 2009 - 10:59 pm | अवलिया

वा!
फटु पाहुन मजा आली, श्रावणामुळे नाईलाज आहे... :)

--अवलिया

दिपाली पाटिल's picture

11 Aug 2009 - 11:45 pm | दिपाली पाटिल

प्रॉन्स करि मस्त दिसतेय पण श्रावण आहे ना.

दिपाली :)

विसोबा खेचर's picture

12 Aug 2009 - 12:05 am | विसोबा खेचर

हम्म! खाल्ली पायजेल एकदा.. :)

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय?
नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

स्वाती२'s picture

12 Aug 2009 - 2:18 am | स्वाती२

मस्त दिसतेय करी. मी Mae Ploy ची रेड/ग्रीन करी पेस्ट वापरते आणि थोडं फिश सॉस घालते. त्यामुळे आलं, लसूण, कोथिंबिर च झंजट नाही. याच पद्धतीने बोनलेस चिकन वापरुन चिकन करी पण छान होते.

संदीप चित्रे's picture

12 Aug 2009 - 2:24 am | संदीप चित्रे

श्रावण बिवण सब झूठ आहे :)

चित्रादेव's picture

12 Aug 2009 - 5:30 am | चित्रादेव

अहो रेड का नाही दिसत हि? रेड करी म्हटले ना?

आम्हाला काय रंगाशी मतलब नाय, चवीशी मतलब आहे.

अडाणि's picture

12 Aug 2009 - 6:05 am | अडाणि

सॉस चे नाव तसे आहे, करी चे नाही...

असो, चव फार सुंदर लागते करून बघा...
-
अफाट जगातील एक अडाणि.