घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार व शाळकरी मुले

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
11 Aug 2009 - 9:59 pm
गाभा: 

वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे स्वाईन फ्ल्यु सर्व भारतात पसरला आहे हे स्पष्ट दिसत आहे. मी स्वतः बराच वेळ निर्निराळ्या वेब साईट्सवर संघटीत अशी अद्ययावत माहीती मिळते का हे पाहीले पण सगळी माहीती तुटक/जुनी-नवी अशी आहे. त्यामुळे मला जे येथे मांडायचे होते ती आकडेवारी मांडता आली नाही.

इलेक्शन च्या प्री-पोल/एक्झिट पोलची आकडेवारी ज्या पद्ध्तीने मांडली जाते (किंवा किचकट माहीती विश्लेषण करणारे तज्ञ जशी शेअर मार्केटची आकडेवारी मांडतात) तशीच माहीती गोळा करणे अत्यावश्यक आहे.

कदाचित खालीलप्रमाणे माहीती-विष्लेषण केल्यास पॅनिक कमी होऊ शकेल-

डाटा पॉइंटस-(उदाहरणार्थ)-
१. एकुण संशयित रुग्ण
२. एकुण घोषित रुग्ण
२.१ घोषित रुग्ण: वय
२.२ घोषित रुग्ण: लिंग
३. घोषित रुग्ण: शाळकरी मुले
४. घोषित रुग्ण: इतर
५. घोषित रुग्ण: प्रवासाचा पुर्वेतिहास
६. घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार दिवसेंगणिक
७. घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शहरानुसार
८. घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार वयानुसार
९. घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शाळकरी मुले

घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार वरील प्रमाणे पाहणे अशा डाटा पॉईंटस वरुन शक्य होईल का?. ह्यावरुन जर असे दिसत असेल की, आता रेशो अधिक जोर दाखवत आहे (जो वरकरणी दिसत आहेच) तर खालील प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते पाहणे-

अ) घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शाळकरी मुले: ह्या रेशोची वाढ शाळा बंद करेपर्यंत अधिक होती व नंतर कमी झाली का?. म्हण्जेच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे.

ब) घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शाळकरी मुले: ह्या रेशोची वाढ "एकुण घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण" रेशोच्या कितीपट आहे? ती वाढत आहे का? कमी होत आहे का?

क) "एकुण घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण" हा रेशो वाढत चालला असेल तर शाळा सुरु करणे धोकादायक आहे का?

ड) "एकुण घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण" हा रेशो पीकवर जात असेल तर पुर्वीच्या "घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार शाळकरी मुले" रेशोवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?

अशी शंका असेल तर शाळा अधिक काळ बंद करावी की नाही, ह्याचा विचार ईन्फॉर्म्ड डिसीजन असेल. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तर किती पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार होतील ही शंकाच आहे. मुलांना घरी ठेवून घेतले तर त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून काय उपाययोजना करता येईल हे पहाणे योग्य ठरावे. ही एक सामाजिक आपत्ती असल्यामुळे गंभीर परिणाम होऊ नयेत म्हणून ह्यावर्षीच्या अभ्यासक्रमात योग्य ती काटछाट केली तरी चालू शकेल का?

अनुभवी डॉक्टर्स व अनुभवी संख्याशास्त्रज्ञ जर एकत्र आले तर अधिक चांगली माहीती लोकांना देता येईल असे वाटते. लोकनेत्यांना त्याची मदतच होईल. असे अगोदरच करत असावेत असेही वाटते. त्यामुळे मी काही फार मोठे असे सांगत असल्याचा आव मुळीच आणत नाही.

प्रतिक्रिया

विकास's picture

11 Aug 2009 - 11:36 pm | विकास

ही कल्पना चांगली आहे. तसे करता येऊ शकेल. असा इंटरअ‍ॅक्टिव्ह नकाशा गुगल मॅप्स वापरून चांगला करता येऊ शकेल असे वाटते.

http://swinemap.org/ हा जागतिक नकाशा पहा. येथे पण माहीती घालता येऊ शकेल...

अमृतांजन's picture

12 Aug 2009 - 7:39 am | अमृतांजन

खरे म्हणजे मिडीयाला अशा विष्लेषणाची खूप गरज आहे. भडकपणे बातम्या देण्यापेक्षा काही साधार बातम्या दिल्यातर बरे.

एकीकडे म्हणायचे की, "घाबरु नका, हा संसर्ग बरा होतो.." आणि लगेच दुसरी वाईट बातमी असे प्रकार एका लोकप्रिय मराठी वाहीनीवर काल होत होते. त्यावरुन मला वरील सुचले.

इलेक्षनच्या काळात त्यांना विष्लेशणावर खर्च करण्यासाठे बजेट मिळत असेल व आत्ता ते नसेल, तयारी नसेल, प्रणाली नसेल, तज्ञ नसतील तर ते अशा उथळ बातम्या न देता भीती पसरवू नये म्हणून अधिक जागरुकपणे काय करता येईल म्हणजे योग्य परीणाम होईल ते पहावे असे वाटते.

अभिज्ञ's picture

11 Aug 2009 - 11:45 pm | अभिज्ञ

कल्पना स्तुत्य आहे.
अजून एक मुद्दा ह्यात राहतोय तो म्हणजे अशा संशयित रुग्णांच्या इतर व्याधींचा इतिहास.

स्वाईन फ्लु प्रकार इतर रोगांपेक्षा भिन्न असल्यामुळे व एकंदरीतच प्रकाराची क्लिष्टता ध्यानात घेता हे सर्व विश्लेषण करून देखील निश्चित वा सरासरी निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल.

अभिज्ञ.

अमृतांजन's picture

12 Aug 2009 - 6:33 am | अमृतांजन

स्वाईन फ्लु प्रकार इतर रोगांपेक्षा भिन्न असल्यामुळे व एकंदरीतच प्रकाराची क्लिष्टता ध्यानात घेता हे सर्व विश्लेषण करून देखील निश्चित वा सरासरी निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल.

मान्य. परंतू कोणत्याही आधाराशिवाय आता जर निर्णय घेतले जात असतील तर ते अधिक धाडसाचे ठरतील.

अमृतांजन's picture

12 Aug 2009 - 7:33 am | अमृतांजन

चांगला माहीतीस्रोत आहे. धन्यु.

अमृतांजन's picture

12 Aug 2009 - 12:50 pm | अमृतांजन

अशा स्टाटेस्टीकचा उपयोग कोणत्या शहरात कधी आणी किती प्रमाणात उद्रेक होईल (होऊ शकेल) हे ही बरेच कळेल. औषधे/ टेस्टींग किट त्याप्रमाणे पाठवता येतील.

रीसोर्स मोबीलीटीची सुसंगताही ह्यातून साधता येऊ शकते.

विसुनाना's picture

12 Aug 2009 - 6:05 pm | विसुनाना

पण हा गूगलचा नकाशा जम्मू आणि काश्मिर व अरुणाचल प्रदेशच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा तुटक दाखवतो आहे त्याबद्दल गूगलचा निषेध!!!

विकास's picture

13 Aug 2009 - 3:46 am | विकास

पण हा गूगलचा नकाशा जम्मू आणि काश्मिर व अरुणाचल प्रदेशच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा तुटक दाखवतो आहे त्याबद्दल गूगलचा निषेध!!!

तुमचा मुद्दा मान्य आहे आणि बरोबरही आहे फक्त हा नकाशा गुगलचा नसून टेली अ‍ॅटलास कंपनीचा आहे :-) अर्थात गुगलचा पाहीला तरी वेगळा दिसणार नाही. डॉटेड लाईन्स हा वादग्रस्त भाग म्हणून दाखवतात... चीन आजही अरूणाचल प्रदेशला त्यांचा भाग समजतो.. अरूणाचलींना चीनमधे जाताना व्हिसा लागत नाही ~X(

बहुतेक वेळेस सर्व आंतर्राष्ट्रीय उद्योग हे युनोमान्य आंतर्राष्ट्रीय नकाशे वापरतात. (हे समर्थन म्हणून सांगत नसून, केवळ त्यांचे व्यवहार कसे चालतात हे सांगण्यासाठी लिहीत आहे).

विकास's picture

13 Aug 2009 - 3:47 am | विकास

उदाहरण म्हणून सीडीसीने त्यांचा प्रकाशीत केलेला अभ्यास पहा:

http://www.cdc.gov/mmwr/preview/mmwrhtml/mm5819a6.htm

अमृतांजन's picture

13 Aug 2009 - 7:04 am | अमृतांजन

ग्रेट. अतिशय चपखल असा दुवा दिलात. अगदी अशीच आकडेवारी भारताबाबत करुन त्याचा वापर केल्यास डोळस निर्णय घेता येतील.

निखिलराव's picture

13 Aug 2009 - 11:57 am | निखिलराव

पुण्यात PMT बंद केल्या.