ठिणगी .....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in काथ्याकूट
11 Aug 2009 - 10:44 am
गाभा: 

गेली कित्येक वर्षे वसई-विरार पट्ट्याचे अनभिषीक्त सम्राट म्हणुन मिरवणारे आ. हितेंद्र ठाकुर यांना जनता जनार्दनाने आपला हिसका दाखवला. ठाकुर यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. यावर आता अनेक प्रश्न उभे राहतील. ठाकुर समर्थकांनी विरार - नालासोपारा परिसरात धुमाकूळ घालुन आपली लायकी व स्वभावगुण दाखवले आहेतच. पण कुठेतरी सुरूवात झाली हे महत्वाचे. आज लोक आ. हितेंद्र ठाकुर यांच्यावर हात उचलायचे धाडस दाखवताहेत हे अपेक्षित बदलाचे चिन्ह आहे का?

म.टा. मधील मुळ बातमी : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4879233.cms

(बदलाची अपेक्षा करणारा)

विशाल

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

11 Aug 2009 - 11:13 am | महेश हतोळकर

हे निश्चीत बदलाचे चिन्ह आहे. आक्कु यादवला भर कोर्टात मारला तेव्हाच या धगीने दृश्य रूप घेतले आहे.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

मनीषा's picture

11 Aug 2009 - 2:38 pm | मनीषा

मला तर ही घटना अतिशय दुर्दैवी वाटते ..
एका आमदारावर(म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी ना?) लोकांना हात उचलण्याची वेळ यावी ...?
मग लोकशाहीला काय अर्थ राहीला ?
कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांना नाईलाजाने का होईना बळाचा उपयोग करावा लागतोआणि ते ही आपणच निवडून दिलेल्या प्रतिनिधीवर , ही लोकशाहीसाठी लाजीरवाणी घटना आहे .

शैलेन्द्र's picture

11 Aug 2009 - 6:24 pm | शैलेन्द्र

"एका आमदारावर(म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी ना?) लोकांना हात उचलण्याची वेळ यावी ...?"

एक स्म्गलर आणि गुंड, आमदार म्हणुन निवडुन आला, मला तर ही घटना अतिशय दुर्दैवी वाटते, ही लोकशाहीसाठी लाजीरवाणी घटना आहे .

विशाल कुलकर्णी's picture

12 Aug 2009 - 9:53 am | विशाल कुलकर्णी

मनीषाताई,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
काही सत्यांबद्दल तुम्हाला सांगावेसे वाटतेय. वसई-विरार पट्ट्यामध्ये ठाकुर गृप लोकांच्या मतांमुळे नव्हे तर त्यांच्या गुंडगिरीमुळे निवडुन येतो. बुथ कॅप्चरिंग, पैसे वाटणे, मतपेट्या पळवणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकावणे हे प्रकार तर नेहेमीच होतात. गेली कित्येक वर्षे ठाकुर कंपनींच्या दहशतीमुळे इथले लोक निमुटपणे हा अत्याचार सहन करीत आले आहेत. पण काल शेवटी कुठेतरी त्यांच्या सहनशीलतेला तडा गेला आणि त्यांनी शस्त्र उपसले. माझ्या मते तर ही एक क्रांतीकारक घटना आहे. समाजाला आपल्या शक्तीची जाणीव होतेय यासारखं सुखद दुसरं काहीच नाही. कदाचित त्यांचा मार्ग चुकीचा असेल, पण ती म्हण आहे ना...
लातोंके भुत बातोंसे नही मानते. :-)

धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

विसोबा खेचर's picture

11 Aug 2009 - 11:56 pm | विसोबा खेचर

गेली कित्येक वर्षे वसई-विरार पट्ट्याचे अनभिषीक्त सम्राट म्हणुन मिरवणारे आ. हितेंद्र ठाकुर यांना जनता जनार्दनाने आपला हिसका दाखवला. ठाकुर यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत

शेवटी जनता धडा शिकवतेच!

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय?
नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

आशिष सुर्वे's picture

12 Aug 2009 - 9:46 am | आशिष सुर्वे


"एका आमदारावर(म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी ना?) लोकांना हात उचलण्याची वेळ यावी ...?"
मला तर ही घटना अतिशय दुर्दैवी वाटते ..

मला घटनेपेक्षा तिचा 'काळ'च चुकीचा वाटतो..
असा धडा खूप आधीच शिकवायला हवा होता!!

राहिली गोष्ट 'लोकनियुक्त प्रतिनिधी' ची.. तर, असले आमदार 'कसे' निवडून येतात ह्याची चर्चा करणे निरर्थक आहे..
कारण 'कसे' हे आपणा सर्वांस माहित आहेच!

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''