भारताचे तुकडे करणे सहज शक्य आहे ? - लेखक झान लुई (चीन)

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
11 Aug 2009 - 8:48 am
गाभा: 

ह्या विषयी पुर्ण बातमी येथे आहे व चीनी इंटरनेशनल इंस्टिट्युट फॉर स्टट्रेजिक स्टडीज च्या वेबसाईट वर हे प्रकशीत झालेले आहे.

बाग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ व भुतान सारख्या देशाची मदत घेऊन भारताचे तुकडे करणे सहज शक्य आहे असे झान लुई (Zhong Guo Zhan Lue Gang, www.iiss.cn, Chinese) ह्यांचे मत आहे.

हे वाचून नवल वाटले, कारण हे तेव्हा प्रकाशीत झाले आहे जेव्हा भारत्-चीन सिमाविवाद भाग-१३ संपल्या नंतर.

आधीच भारत-चीन मध्ये तणाव आहे त्यात असले मुद्दे/लेख आगीमध्ये तेल मध्ये ओतण्याचा प्रकार तर नाही ?

http://news.rediff.com/special/2009/aug/10/china-should-break-up-india-s...

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 Aug 2009 - 9:08 am | मदनबाण

त्यात असले मुद्दे/लेख आगीमध्ये तेल मध्ये ओतण्याचा प्रकार तर नाही ?
हिंदुस्थानाला चीन कडुन सर्वात जास्त धोका आहे.त्यानी सुखोई विमानांचा सुसज्य ताफाच तयार केला आहे,त्यांची रेल्वे सुद्धा आता भारताच्या जवळ आली आहे.सॅटेलाईट इमेजेस मधे चीन ने चालवलेली तयारी स्पष्ट दिसुन येते.
http://www.southasiaanalysis.org/papers31/paper3016.html
http://www.dnaindia.com/india/report_chinese-nuclear-missile-base-has-no...
http://timesofindia.indiatimes.com/NEWS/India/IAF-moving-Sukhoi-base-to-...
http://shadow.foreignpolicy.com/posts/2009/03/10/could_china_and_india_g...
http://pakalert.wordpress.com/2009/03/28/india-predicts-china-war-by-2017/
http://ibnlive.in.com/news/chinapak-railway-station-makes-india-see-red/...
http://news.in.msn.com/National/article.aspx?cp-documentid=3070990

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

दशानन's picture

11 Aug 2009 - 9:09 am | दशानन

ते तर आहेच...

मंदीमुळे देशात आलेली अस्थिरता व बिघडलेली अवस्था लपवण्यासाठी चीन भारतावर आक्रमण करु शकते असे कुठे तरी वाचले होते मागील महीण्यात त्याची आठवण झाली.

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

टारझन's picture

11 Aug 2009 - 11:58 am | टारझन

वेळ जात नाहीये का राजे ?

(अखंड्/अभेद्य/अतुट भारतातील भारतिय) टारझन

निखिल देशपांडे's picture

11 Aug 2009 - 12:18 pm | निखिल देशपांडे

राजे कदाचित ह्या दुव्याबद्दल बोलत असतिल...

निखिल
================================

मदनबाण's picture

11 Aug 2009 - 9:17 am | मदनबाण

http://www.thaindian.com/newsportal/uncategorized/india-concerned-at-chi...
http://www.fas.org/blog/ssp/2008/04/new-chinese-ssbn-deploys-to-hainan-i...
http://www.zimbio.com/China/articles/57/Chinese+unveil+Hainan+base+peeri...
http://www.thaindian.com/newsportal/sports/india-to-revive-airbase-on-in...
चायनीज एयर बेस नियर इंडिया (याचे फोटो कुणाला देता येतील का?)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

विजुभाऊ's picture

11 Aug 2009 - 9:22 am | विजुभाऊ

मॉडर्न जगातील बहुतेक सगळी युद्धे आर्थीक मंदीवर मात करण्यासाठीच केली गेलेली आहेत.

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

छोटा डॉन's picture

11 Aug 2009 - 9:33 am | छोटा डॉन

>>मॉडर्न जगातील बहुतेक सगळी युद्धे आर्थीक मंदीवर मात करण्यासाठीच केली गेलेली आहेत.

म्हणजे नक्की काय ?
हा एक अंदाज / मतप्रवाह आहे की विस्तॄत विदा चाळुन केलेल्या विष्लेषणाचा अंतिम परिणाम आहे ?
"युद्धामुळे (बुडती ) अर्थव्यवस्था हळुहळु मार्गावर येते " असे काही विद्वानांचे मत आहे, काही उदाहरणे पाहता ते खरे ही आहे असे भासते पण ह्याला एक सर्वसाधारण नियम किंवा प्रमेय कसे म्हणता येईल ?

भारताने लढलेले कोणते युद्ध हे आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी होते ?

------
छोटा डॉन

दशानन's picture

11 Aug 2009 - 9:36 am | दशानन

>>भारताने लढलेले कोणते युद्ध हे आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी होते ?

भारतावर युध्द नेहमी लादले गेले आहे... भारताने युध्दाची सुरवात कधीच केली नाही.

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

ऋषिकेश's picture

11 Aug 2009 - 1:37 pm | ऋषिकेश

छोट्या डॉनशी सहमत.
भारतावर लादली गेलेली चारही युद्धे ही आर्थिक मंदीचा परिणाम म्हणून /परिणाम कमी करण्यासाठी म्हणून होती असे वाटत नाही. तसेच हल्लीच्या युद्धांपैकी इतर महत्त्वाची युद्धे जसे रशिया-चेचन्या, पाकिस्तान-तालिबान ही युद्धेदेखील त्या दृष्टीने केलेली वाटत नाहीत.

तेव्हा हा काढलेला निष्कर्ष / अनुमान / निरिक्षण वरवरचे वाटले. तेव्हा जर असा विदा असेल तर जरूर द्यावा.

बाकी मुळ विषयाबद्द्ल असे लेख आपल्याकडेही पाकिस्तानला धडा शिकवण्याबद्दल, त्याचे तुकडे करण्याबद्दल, त्यांच्यावर हल्ला करण्याबद्दल लिहिले जातात (वाचा अनेक हिंदुत्त्ववादी पत्रिका)म्हणजे भारत लगेच तसे करते / करू इच्छिते असे नाही.

हा केवळ लेख आहे आणि त्यातील मते भारताच्या हिताला बाधक आहेत इतकाच निष्कर्ष काढता यावा

-ऋषिकेश

विजुभाऊ's picture

11 Aug 2009 - 11:43 pm | विजुभाऊ

हा एक अंदाज / मतप्रवाह आहे की विस्तॄत विदा चाळुन केलेल्या विष्लेषणाचा अंतिम परिणाम आहे ?
"युद्धामुळे (बुडती ) अर्थव्यवस्था हळुहळु मार्गावर येते " असे काही विद्वानांचे मत आहे, काही उदाहरणे पाहता ते खरे ही आहे असे भासते पण ह्याला एक सर्वसाधारण नियम किंवा प्रमेय कसे म्हणता येईल ?
हा अंदाज नाही. विदाचाळून केलेल्या विष्लेषणाचा अंतिम परिणाम आहे ?
युद्धामुळे वस्तुंची निर्मानितीची मागणी क्रुत्रीम रीत्याकाहोईना अचानक वाढते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
पण युद्ध हे नेहमी आपल्या शत्रूच्या प्रदेशात सुरु करावे.असे कौटील्यसुद्धा म्हणतो ( पहा नाटक मुद्राराक्षसम/ पुस्तक कौटील्याचे अर्थशास्त्र)
जर्मनीची दुसर्‍या महायुद्धाच्या सुरुवातीला अर्थव्यवस्था एकदम सुधारली होती.
दुसर्‍या बुश महोदयानी अमेरीकेची घसरण टाळण्यासाठीच इराकवर हल्ला केला हे उघड गुपीत आहे. अन्यथा महामंदी ही या अगोदरच आली असती. सद्दाम ने डॉलर ऐवजी यूरो मध्ये व्यवहार केले असते तर डॉलर पार रसातळाला गेला असता
भारताने लढलेले कोणते युद्ध हे आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी होते ?

भारताने स्वतःहोउन युद्ध केले नाही ते त्याच्यावर लादले गेले . पाकिस्तानमध्ये आर्थीक अपयश झाकण्यासाठी सरकार लोकांचे लक्ष्य दुसरीकडे वळवण्यासाठी युद्धाचा/कश्मीर मुद्द्याचा आधार घेते.
पाकिस्तानने हे अनेकदा केले आहे. पण ते आता त्या चक्रव्यूहात अडकले आहेत

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

चिरोटा's picture

11 Aug 2009 - 10:09 am | चिरोटा

..त्यात असले मुद्दे/लेख आगीमध्ये तेल मध्ये ओतण्याचा प्रकार तर नाही

असु शकेल. प्रत्येक देशांतले defence strategist/strategic analysts वगैरे लोक अश्या अनेक थियर्‍या मांडत असतात. त्यांचे ऐकुन तसे चिनी राज्यकर्ते वागतील असे वाटत नाही. किंबहुना सर्वाना फाट्यावर मारुन्(अमेरिकेलाही) स्वतःला पाहिजे तेच निर्णय चिनी राज्यकर्ते घेतात असे बर्‍याच वेळा दिसुन येते.
आर्थिकद्रुष्ट्या चिन भारताच्या कित्येक मैल पुढे आहे.
१) चीन जगातली चौथी आर्थिक महासत्ता तर भारत १२ व्या स्थानावर.
२) चीनकडे परकिय गंगाजळ १ ट्रिलियन डॉलर्स तर भारताकडे २६५ बिलियन डॉलर्स.
३)जागतिक व्यापारात चीनचा हिस्सा ८ टक्के तर भारताचा ०.८ टक्के. चीनच्या एक दशांश.
४)चीनमध्ये साक्षरता ९३% तर भारतात ६५% टक्के.
वरील मुद्दे लक्षात घेतले तर आकाराने तिप्पट आणि लोकसंख्येने जवळपास तेवढाच असलेल्या चीनला भारतात खुप स्वारस्य असेल असे वाटत नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

श्रावण मोडक's picture

11 Aug 2009 - 1:42 pm | श्रावण मोडक

भेंडीबाजार,
हे आकडे आत्ताच्या घडीचे आहेत. सामरिक मामल्यात आणखी काही आकडे महत्त्वाचे असतात. ते असतात प्रोजेक्शनविषयीचे. प्रोजेक्शन नजिकच्या काळाचे, सात वर्षांचे, दहा वर्षांचे... वगैरे. म्हणजे तेव्हा क्षमता काय आणि कशा असतील याविषयीचे आकडे. चीनला भारतात स्वारस्य असेल की नाही हे केवळ सध्याच्या आकड्यांवर नव्हे तर त्या भावी आकड्यांवर अवलंबून असेल. परिस्थितीनुसार या दोन्ही आकड्यांचे वजन एकूण हिशेबात अगदी २० टक्क्यांपासून ते ८० टक्क्यांपर्यंत असतं असं म्हणतात. ते आकडे या दोन्ही देशांबाबत काय सांगतात? माहितीसाठी विचारतोय.

अवलिया's picture

11 Aug 2009 - 10:06 am | अवलिया

हॅ हॅ हॅ चिनी लोक लै हुशार असतात म्हणे...
तसे भारतीय सोडुन बाहेरचे सगळे हुशारच असतात असे काही जण म्हणतात.

चालु द्या .... :)

--अवलिया

आशिष सुर्वे's picture

11 Aug 2009 - 12:14 pm | आशिष सुर्वे

हिमंत आहे??
ही भाषा करणार्‍या चीन्यांचे सहस्र तुकडे करू..
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

छोटा डॉन's picture

11 Aug 2009 - 12:20 pm | छोटा डॉन

>>ही भाषा करणार्‍या चीन्यांचे सहस्र तुकडे करू..
खल्लास, आनंद वाटला आपले साहसपुर्ण विधान वाचुन.
अभिमान तर आहेच ...

------
( भारत व चीनच्या मिलीटरी, स्टॅटेजिक आणि पॉलिटिकल ताकदीच्या तुलनेच्या ऑथेंटिक डेटाच्या शोधातला ) छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2009 - 1:26 pm | बिपिन कार्यकर्ते

तसे आम्ही डान्रावांशी बाय डिफॉल्ट सहमत असतोच. पण मराठासाहेबांचा इतका ज्वलंत आणि जाज्वल्य प्रतिसाद पाहून मुद्दाम सहमती दर्शवल्यावाचून राहवले नाही.

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

11 Aug 2009 - 3:46 pm | दशानन

असेच म्हणतो !

मराठा साहेबांशी सहमत.

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

chipatakhdumdum's picture

11 Aug 2009 - 10:14 pm | chipatakhdumdum

९६ मराठा, फारच छान,
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
१९६२ च्या चीनच्या युध्दाच्या वेळीसुध्दा अनेक कवी असच काहीतरी लिहायचे.
तुम्ही त्या वेळचे कवी की हल्लीचे कवी ?

प्रेषक : विकास, मंगळ, 08/11/2009 - 06:49

आपण अभिनंदन करतोय आणि तिकडे नौदल प्रमुख काय बोलताहेत ते पहा...

Should war break out between India and China, we are doomed.

Navy chief Admiral Sureesh Mehta publicly admitted on Monday that India was no match for China and there was no way New Delhi could bridge the yawning gap in its capabilities against China.

संपुर्ण बातमी येथे पहा: http://bit.ly/N9hTu
स्पष्टीकरण - मूळ खरडीचा संदर्भ वेगळा, खरडीतील बातमीचा संदर्भ मात्र येथे पक्का लागू ठरतो.

आशिष सुर्वे's picture

11 Aug 2009 - 4:51 pm | आशिष सुर्वे

माझी प्रतिक्रिया ही थेट माझ्या रक्तातून आली आहे..
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. अगांत अजून स्फूर्ती आली!

राहिला भाग आपल्या नौदल प्रमुखांच्या प्रतिक्रियेचा.
माझे याबाबतचे विश्लेषण (मत) असे:

१) नौदल प्रमुखांबद्दल मला आत्यंतिक आदर आहे. परंतु, जर हि प्रतिक्रिया भूदल नौदल प्रमुखांकडून आली असती तर त्याचे गांर्भीय अधिक वाढले असते.
नौदल प्रमुखांच्या च्या व्यक्तव्याबद्दल ताबडतोब खुलासा होणे गरजेचे आहे.
(तसे पाहता, भौगोलिक दृष्ट्या पहायचे झाले तर मला असे नमूद करावेसे वाटते की, भारत आणि चीन दरम्यान कोणताही मोठा समुद्र नाही!)

२) अजून वेगळ्या अंगाने विचार केला तर असे व्यक्तव्य हे 'गनिमी काव्या'चा भाग असू शकतो. जेणेकरून शत्रूला अंधारात ठेवून आपण आपल्या चाली खेळू शकतो.
असे असेल तर चांगलेच आहे.. पण सध्याच्या आधुनिक युगात, हेरगिरी एवढया प्रमाणात विकसित झाली आहे की शत्रूला अश्या प्रकारच्या विधानांनी अंधारात ठेवणे अवघडच आहे!

असो.
शेवटी मला एकच सांगावेसे वाटते..

"आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही.
पण कोणी आमच्या वाटेला गेले तर त्याला 'सोडणार' नाही!"

- इति.. आमचे 'पिताश्री'!

हर्र हर्र महादेव!!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

श्रावण मोडक's picture

11 Aug 2009 - 6:07 pm | श्रावण मोडक

१. भूदल नौदल प्रमुख म्हणजे कोण म्हणायचे आहे तुम्हाला हे जरा स्पष्ट करावे.
२. अंदमानच्या खाली (कोको आयलंड्स?) चीनने सागरी तळ उभारण्यास सुरवात केली १९९० च्या दशकात, तेव्हा हादरला होता तो भारतच. त्याच संदर्भात तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीनला शत्रू क्रमांक एक ठरवले होते.
३. 'गनिमी कावा' वगैरे ठीक, बोलण्यापुरतेच. कारण तुमचेच पुढचे वाक्य आहे की, "पण सध्याच्या आधुनिक युगात, हेरगिरी एवढया प्रमाणात विकसित झाली आहे की शत्रूला अश्या प्रकारच्या विधानांनी अंधारात ठेवणे अवघडच आहे!" हे अॅडमिरल मेहतांनाही कळत असेलच. त्यामुळे तो प्रश्न शिल्लक रहात नसावा.
४. आम्ही कोणाच्या वाटेला वगैरेही बोलण्यात उत्तम. तसं असतं तर १९६२ पासूनच्या जखमा कधीच भरून निघाल्या असत्या.

विकास's picture

11 Aug 2009 - 7:54 pm | विकास

मला कायद्याने अथवा नियमाने नक्की बरोबर झाले का चूक ते माहीत नाही पण, कुठल्याही सैन्य अधिकार्‍याने (ते ही प्रमुखाने) जनतेच्या पैशावर राष्ट्रपतींसाठी काम करत असताना, प्रसार माध्यमांमधे जाऊन वाटेल ते (बाजूने-विरुद्ध कसेही) बोलणे हे सैन्यदलाच्या शिस्तीत बसते असे वाटत नाही...

एका मित्राने म्हणल्याप्रमाणे, अशा नौदल प्रमुखाला तात्काळ बडतर्फ करून त्याची चौकशी करून, पेन्शनपण थांबवली पाहीजे. म्हणजे त्याला आणि इतरांना योग्य तो संदेश मिळेल.

श्रावण मोडक's picture

11 Aug 2009 - 8:14 pm | श्रावण मोडक

नियम, कायदा याविषयी मीही खात्री देऊ शकणार नाही. पण एक आहे - मेहता यांनी प्रसार माध्यमांमध्ये काहीही भाष्य केलेले नाही. ते एक व्याख्यान देत होते, असे त्या बातमीवरून स्पष्ट होतेय. दुसरा मुद्दा - मेहता यांनी केलेले भाष्य ताकदीच्या संदर्भात आहे आणि त्याविषयीचे "वास्तव" चित्र देणे ही त्यांची जबाबदारी असते. तसे सार्वजनिक करावे की नाही हा भाग वेगळा. पण सरकारच्या राजकीय धोरणाच्या बाजूनेच ते केले गेले तर त्याविषयी शिस्तीचा प्रश्नही येतो असे नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा - लष्करी अधिकाऱ्यांनी काय आणि कसे बोलावे (खरे तर, बहुदा, बोलूच नये) याविषयीच्या नियमांच्या चौकटी वगैरे आता खरंच खूप जुन्या झाल्या आहेत. माहितीच्या स्फोटाबरोबर इतकी माहिती जनतेसमोरही येत असते की त्यांच्या बोलण्या-न बोलण्याला कितपत अर्थ राहतो हा प्रश्नच असतो. अशावेळी अधिकृतपणे काही भाष्य होणे हेच कामाचे असते. तसे झाल्यानंतर जनता अनेकदा पॅनिक होते वगैरे धोका आहे, पण अंधारात राहण्याचाही धोका असतोच. तेव्हा दोनापैकी आधीचा धोका पत्करला, कारण पॅनिक आवरणं तुलनेनं सोपं जातं.

सूहास's picture

11 Aug 2009 - 6:05 pm | सूहास (not verified)

मैदानात आल्यावर बघु...कोण कोणाचे तुकडे करत ते..

सू हा स...

विकास's picture

11 Aug 2009 - 7:30 pm | विकास

सर्वप्रथम, ऋषिकेशने म्हणल्याप्रमाणे तथाकथीत हिंदूत्ववाद्यांचे लेख ह्या लेखात एक मुलभूत फरक आहे. तसले लेख हे कदाचीत सनातन प्रभात पर्यंतच मर्यादीत रहात असतील. हा लेख चीनच्या लष्करी संकेतस्थळापासून ते चीनच्या स्ट्रॅटेजीक स्टडीज पर्यंतच्या सर्व ठिकाणी आला आहे. तरी देखील, "हा केवळ लेख आहे आणि त्यातील मते भारताच्या हिताला बाधक आहेत इतकाच निष्कर्ष काढता यावा," या संदर्भात, रिडीफ मधील मला शेवटचे वाक्य रुचले, व्यावहारीक वाटले: In any case, an approach of panic towards such outbursts will be a mistake, but also ignoring them will prove to be costly for India.

वर मोडकसाहेबांनी लिहीले तसेच मला देखील जॉर्ज फर्नांडीसच्या बोलण्याची तसेच पुर्वीच्या राजीव श्रीनिवासनच्या चीन वरून काळजी करणार्‍या आणि वाटणार्‍या रिडीफ मधील अनेक माहितीपुर्ण लेखांची आठवण झाली. खाली जे काही चीनच्या बाबतीत लिहीत आहे ते वाचताना, याचा अर्थ भारतात आलबेल आहे असा कृपया घेऊ नये!

हे वाचून नवल वाटले, कारण हे तेव्हा प्रकाशीत झाले आहे जेव्हा भारत्-चीन सिमाविवाद भाग-१३ संपल्या नंतर.
यात आश्चर्य काहीच नाही. चीनची ही पुर्वीपासूनची प्रथा आहे. किमान कम्युनिस्ट चीनची तर नक्कीच आहे. तिबेटच्या बाबतीतही ते तसे वागले आणि हिंदीचिनी भाईभाई म्हणत नंतर लगेच काय केले ते माहीत आहेच!

आज चीन वरकरणी कितीही चांगला दिसत असला तरी काही प्रमाणात त्यामधे फोफसे बाळसे आहे. कारण अत्यंत कमी किंमतीतील मोलमजुरीचा फायदा घेत त्यांनी प्रामुख्याने अमेरिकेतील धंदा मिळवला त्या पाठोपाठ युरोपातील. मात्र हे देखील लक्षात असुंदेत की त्यांच्या कडे रिसर्च, डेव्हलपमेंट, धंदा मिळवताना आणि तो वाढवताना लागणारी व्यावसायीक वृत्ती (professionalism) खूप आहे. जो आपण अजूनही आत्मसात करत आहोत...

आता अमेरिकेतील आर्थिक मंदीमुळे निर्यातीच्या धंद्याला फटका बसला आहे. परीणामी तिथे न खपला गेलेला माल भारतात येत आहे. एक साधे माझे उदाहरण परीस्थिती काय आहे हे सांगायला सांगतो. आमच्याकडे रिसायक्लिंग हे प्रत्येकाच्या घराजवळून आठवड्यातून एकदा उचलले जाते. तेच उद्योगांचे पण घेतले जाते. त्यामुळे कचरा कमी होतो, पर्यावरणाला चांगले वगैरे गोष्टी आहेतच. पण कागद, काच, प्लॅस्टीक आदी रिसाय्क्लेबल्स ना बाजारात मागणी खूप होती. विशेष करून कागदाला. ते घेणारा (importer) अर्थातच चीन जिथे याचे बॉक्सेस तयार केले जातात, अजून विविध गोष्टींमधे परत कच्चा माल म्हणून हे सर्व वापरले जाते. परीणामी बाजारभाव (शेअर मार्केटप्रमाणे चढ उतार असते) वाढतच चालला होता. ८०हजाराच्या छोट्याशा गावाला काही न करता देखील यातून लाखांच्या आकडयात डॉलर्स परत मिळायचे. मोठ्ठी "रद्दी आणि डबा-बाटली वाला" (multinational company) ते घेऊन पैसे देयचा, पण ह्यात त्यांना मग किती फायदा होत असेल ते पहा. मात्र गेल्या वर्षी चीन मधील अमेरिकन ऑर्डस कमी झाल्या. परीणामी बॉक्सेस आणि इतर मालाची गरज कमी झाली. परीणामी चीनकडून कच्च्या मालाची गरज कमी झाली... गेल्या वर्षी लाखो मिळवणारे आमचे छोटेसे गाव या वर्षी लाखो द्यावे लागणार म्हणून पैसे बाजूस ठेवत आहे. हीच अवस्था इतर आजूबाजूंच्या गावाची आणि इतरत्र... विचार करा एका फक्त "रेसिडेन्शियल रिसायक्लींग" सारख्या अगदी छोट्या प्रोसेस मधे इतका फरक तर अजून पुढे काय?...

चीनने निर्यातीतून मिळालेले पैसे परत अमेरिकन वित्तसंस्थांमधे गुंतवले ज्यांनी ते पैसे हे गृहकर्जात विशेष करून गुंतवले. आता त्यांचे धंदे आणि चीनचे पैसे बुडायची वेळ आली आहे.

त्यात अनेक ठिकाणी चीनमधे ही अनेक ठिकाणी असंतोष धुमसत आहे. एकीकडे शांतताप्रिय तिबेटने मागच्या वर्षी दाखवला तर काही महीन्यांपुर्वी खोतान गावात झालेले उइघुरचा निषेध असेच काही सांगून जात आहे. त्यामुळे अर्थकारणाने का होईना ज्याला जगाची गरज भासू लागली आहे त्या चीनला वर काही बोलत असला तरी मानवी हक्कांवरून स्वतःची प्रतिमा जपण्याची वेळ येऊ लागली आहे. तसेच "चोरों को सारे नजर आते है चोर" या ओळींप्रमाणे शेवटी जनतेच्या उठावाला,ज्यांनी तसा उठाव करून सत्ता काबीज केले असे कम्युनिस्टच जास्त घाबरणार आणि तो होवू नये म्हणून वाट्टेल ते करायला तयार रहाणार...

हे पुरेसे नाही म्हणून की काय नैसर्गिक आपत्ती आणि त्याहूनही पर्यावरणीय आपत्तींनी या देशाची नैसर्गिक संपत्ती धोक्यात आली आहे. देशातील ७०% नद्या आणि तलाव जे जनतेला उपयुक्त होते ते आता कुठल्याही वापरासाठी योग्य राहीलेले नाहीत. उद्या एक काय अनेक ट्रीलीयन्स $ मिळाले तरी पाणी नसेल तर काय होईल याचा विचार करा. खालील आलेख २००७ चा आहे: (दुवा)

पुढच्या ५ ते १० वर्षांचा जर विचार करायचा झाला (जो भारतात पण वेगळ्या गोष्टींसाठी करावा लागेल) तर चीनला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. अशा वेळेस काय होते? अर्थातच युद्ध...फार कमी युद्धे ही अलेक्झांडर सारखी केवळ सत्ताविस्तारासाठी होतात. आणि त्याचे ध्येय पण भारताला मिळवायचे होतेच, कारण मसाले! बर्‍याचदा होणारी युद्धे, परक्या देशांवरील आक्रमण (इन्व्हेजन - ब्रिटीशांचे भारतावरीलपण), हे बाजारपेठ, स्वतःच्या देशातील अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी तसेच ते नसेल तर स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी (पाकीस्तानची भारतावरील युद्धे) होतात. बुशचे इराक युद्ध पण तेलासाठी झाले हे सगळ्यांनाच माहीत आहे...

थोडक्यात चीन युद्ध करेल तर का? - अर्थात स्वत:च्या अर्थव्यवस्थेसाठी, नैसर्गिक साधनसंपत्ती मिळवण्यासाठी (जे ते अफ्रिकेत जाऊनही करत आहेत), धंद्यांसाठी आणि स्वतःची (कम्युनिस्ट) सत्ता टिकवण्यासाठी अशा सर्वच कारणाने करू शकेल असे वाटते.

ते युद्ध रणांगणावरच होईल का? - आपण जर देश म्हणून एकच राहत असलो आणि बाहेरच्या दबावापेक्षा अंतर्गत मुर्खपणामुळे फुटलो नाही तर मग चीन युद्ध करेल. तो पर्यंत एक शस्त्र न उचलता ते देश फोडायचाच प्रयत्न करतील. आणि आपले कम्युनिस्ट विचारवंत आहेतच त्याला खतपाणी घालायला....

दशानन's picture

11 Aug 2009 - 7:37 pm | दशानन

उत्तम प्रतिसाद !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

अवलिया's picture

11 Aug 2009 - 7:40 pm | अवलिया

हेच म्हणतो.. अतिशय उत्तम प्रतिसाद.

--अवलिया

मदनबाण's picture

11 Aug 2009 - 8:19 pm | मदनबाण

विकासराव आपला प्रतिसाद फार आवडला.
According to Union Home Ministry reports, there were about 270 violations by China on India's western, middle and eastern sectors in 2008, while there were 60 such incidents reported so far in 2009.
http://ibnlive.in.com/news/iaf-moving-sukhoi--to-ne-to-thwart-chinese-th...

(लांडगा आला रे आला म्हणण्या ऐवजी, लांडगा टिपुन बसला आहे हेच म्हणावे लागेल !!!)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

ऋषिकेश's picture

12 Aug 2009 - 2:33 pm | ऋषिकेश

वरील अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला. व प्रतिसादातील मुद्द्यांशी बव्हंशी सहमत

In any case, an approach of panic towards such outbursts will be a mistake, but also ignoring them will prove to be costly for India

याच्याशी सहमत

काही मुद्द्यांवर थेट असहमती नसली तरी वेगळ्या मतांची छटा आहे. आता वेळ कमी आहे घरी जाऊन जमल्यास सविस्तर
लिहितो

आपण जर देश म्हणून एकच राहत असलो आणि बाहेरच्या दबावापेक्षा अंतर्गत मुर्खपणामुळे फुटलो नाही तर मग चीन युद्ध करेल. तो पर्यंत एक शस्त्र न उचलता ते देश फोडायचाच प्रयत्न करतील.

वरील प्रतिसादात अथवा इतर चर्चेत चीन हा भारताचा शत्रु आहे, आणि तो कायमचा शत्रु असेल हे गृहितक असल्यासारखे वाटते. "राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु / मित्र नसतो"हे प्रसिद्ध वचन आहेच. चीन हा जगातील अनेक देशांप्रमाणे (फक्त) स्वतःचा फायदा बघणारा देश आहे. तरीही तो स्वतःच्या फायद्यासाठी देखील आज नाहितर उद्या भारताविरुद्ध वागेलच हे वरील चर्चेमागचे गृहितक काहिसे चुकिचे वाटते.

तसेही, आतापर्यंतचा भारताचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा भारताने स्वतःची जागा दाखवून दिली आहे (दोन्ही अणुस्फोट, बांगलादेश निर्मिती वगैरे) तेव्हा तेव्हा जग भारताविरूद्ध जाईल या भीतीच्या विपरीत जग (लगेच नाही पण थोड्याशा कालखंडात) भारताला मान देऊ लागले आहे. तेव्हा भारताची जर सतत प्रगती झाली व भारत अभेद्यच राहिला तर/तरी चीन भारताशी युद्धच करेल हा तर्क काहिसा एकांगी वाटाला.

आता प्रश्न राहतो तो भारत भेदण्याचा. एकतर हा धोका जितका भारताला आहे तितकाच चीन ला आहे. दुसरे असे की भारत जेव्हा जेव्हा दुभंगण्याच्या टोकाला पोचला आहे तितक्याच जोमाने एकत्रित झाला आहे.

म्हणूनच मी म्हटले होते की चेचाप्रस्तावत दिलेल्या दुव्यावर केवळ एक लेख आहे, लेखक चीनी आहे आणि लेखकाची मते भारत विरोधी आहेत इतकेच लक्षात ठेवावे/ठेवता यावे (म्हणजे चीनमधे असा विचार करणारी मंडळी आहेत हे माहित असावे - सजग असावे) मात्र त्याचा अर्थ लावताना एक तर आपण फुटणार अथवा चीन आपल्या विरुद्ध जाणार अथवा आपल्यावर आक्रमण करणार इतक्याच शक्यतांवरच थांबु नये.

-ऋषिकेश

श्रावण मोडक's picture

11 Aug 2009 - 8:01 pm | श्रावण मोडक

एक वेगळा अर्थ निघतोय. तुम्ही म्हणता, "ते युद्ध रणांगणावरच होईल का? - आपण जर देश म्हणून एकच राहत असलो आणि बाहेरच्या दबावापेक्षा अंतर्गत मुर्खपणामुळे फुटलो नाही तर मग चीन युद्ध करेल. तो पर्यंत एक शस्त्र न उचलता ते देश फोडायचाच प्रयत्न करतील. आणि आपले कम्युनिस्ट विचारवंत आहेतच त्याला खतपाणी घालायला...."
अर्थ असा की, भारतीय एकत्र राहिले, फुटले नाहीत तर रणांगणावर युद्ध होईल. याचाच अर्थ ते फुटले तर रणांगणीय युद्ध नाही (तेही स्वाभाविकच, कारण फुटलो तर भारत हा विचारांचा संदर्भच खालसा होतो). म्हणजे हा एकीचा फायदा की तोटा? तेही जाऊ द्या. त्यापलीकडे एक मुद्दा आहे. तुमच्या प्रतिसादात नैसर्गिक समस्यांचा उल्लेख आहे. त्या संदर्भात आजपासून पंधरा-वीस वर्षांनी चीन आणि भारत यांच्या ताकदीसंदर्भातील प्रोजेक्शन कसे असेल?

विकास's picture

11 Aug 2009 - 8:12 pm | विकास

अर्थ असा की, भारतीय एकत्र राहिले, फुटले नाहीत तर रणांगणावर युद्ध होईल. याचाच अर्थ ते फुटले तर रणांगणीय युद्ध नाही

तसेच म्हणायचे आहे. याचा अर्थ युद्ध अटळ आहे असाही नाही. मी काही त्या अर्थाने भविष्यवेत्ता नाही की उगाच भयग्रस्त होणे पण योग्य वाटत नाही. म्हणूनच जॉर्ज फर्नांडीस आणि राजीव श्रीनिवासनची आठवण झाली. सगळ्यात जास्त धोका आपल्याला चीनकडूनच आहे. तो का आहे, कशा मुळे आहे हे समजून आपण आपले आराखडे बांधायचे, मजबूत करायचे इतकेच काय ते आपले काम. जसे ते काम नौदलप्रमुखापासून राज्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे तसेच आपापल्या पातळीवर जनसामान्यांकडूनही अपेक्षित आहे...

एक मुद्दा आहे. तुमच्या प्रतिसादात नैसर्गिक समस्यांचा उल्लेख आहे. त्या संदर्भात आजपासून पंधरा-वीस वर्षांनी चीन आणि भारत यांच्या ताकदीसंदर्भातील प्रोजेक्शन कसे असेल?

पर्यावरणीय क्षेत्रात अनेकदा म्हणले जाते की पुढचे युद्ध हे (तेलापेक्षा)पाण्यावरून होणार म्हणून. कुठेतरी डोक्यातील त्या संदर्भामुळे मी पाण्याचेच उदाहरण दिले. पंधरावीस वर्षांनी ताकद काय असेल यावर जरा अभ्यास करून सविस्तर सांगायला आवडेल, त्यामुळे तुर्तास इतकेच सांगतो, जे राष्ट्र आपल्या साधनसंपत्तीचे (नैर्सर्गिक आणि मानवनिर्मित) कुशलतेने व्यवस्थापन करेल ते पुढे जाईल. त्या व्यवस्थापनाची सुरवात ही लोकसंख्यावाढीला आळा घालण्यापासून होणे महत्वाचे वाटते (तात्यांचे "चलेजाव" ला असलेले उत्तर).

राघव's picture

12 Aug 2009 - 12:54 am | राघव

विकासदादा,
अतिशय उत्तम प्रतिसाद. खूप छान विश्लेशण. :)
पुढचे युद्ध जर झाले तर, चीनमुळेच होईल असे आपण सहज गृहित धरू शकतो. तालिबान, उ.कोरिया, पाक अन यासारखे आणखी काही जण त्यास पूरक ठरतील. पण स्वत:च्या गरजांपोटी व हुकुमशाही दृष्टीकोनामुळे मूळ कारण चीनच राहील.
लष्करी बाबतीत चीन भारताच्या बराच पुढे आहे हे मान्य न करण्यात हशील नाही. ते जाणून त्यावर ठोस उपाय करणेच जास्त श्रेयस्कर ठरेल.

बाकी भारताबद्दलचे प्रेम बोलते -

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

आशिष सुर्वे's picture

11 Aug 2009 - 8:20 pm | आशिष सुर्वे

अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद!!

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

प्राजु's picture

11 Aug 2009 - 10:16 pm | प्राजु

चर्चा वाचून थोडं टेन्शन आलं .. !
विकास दादा, प्रतिसाद सगळेच आवडले आपले. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

12 Aug 2009 - 12:03 am | विसोबा खेचर

साला कोण घाबरतो त्या मिचमिचे डोळेवाल्यांना!

जय हिंद..!

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय?
नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

भिंगरि's picture

12 Aug 2009 - 7:44 am | भिंगरि

विकास आपला अभ्यासपुर्ण प्रतिसाद खुप आवडला. या विषयावर एक स्वतंत्र धागा काढुन विस्तृत लेखन करावे हि विनंति.

ऋषिकेश आपलिहि मते वाचण्याचि उत्सुकता आहे.

ऋषिकेश's picture

12 Aug 2009 - 7:53 pm | ऋषिकेश

ऋषिकेश आपलिहि मते वाचण्याचि उत्सुकता आहे.

धन्यवाद. आता वरच्या प्रतिसादातच विस्ताराने मत दिले आहे

--ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५२ मिनीटे झालेली आहेत. ही वेळ जाहिराती प्रसारीत करण्याची आहे.

मन's picture

12 Aug 2009 - 9:47 pm | मन

करणं सहज शक्य नसलं, तरी अशक्यही वाटत नाही. १९४७ ची जखम काही विसरली जात नाही.

अशांत इशान्य,धगधगता काश्मीर,अजुनही मधुनच डोके वर काढणारा खलीस्तानचा राक्षस ,टोकाची तमिळ अस्मिता(एल टी टी ई ही बृहद्-तमिळ राष्ट्र समर्थक होती.),शे-दोनशे जिल्ह्यांच्या वर अस्तित्व राखुन असलेले महाराष्ट्र्,आंध्र,एम पी,छत्तिसगढ्,झारखंड आणि बंगालमधील माओवादी/नक्षलवादी(अशे भूभाग जिथं दुर्दैवानं भारत सरकारचं थेट नियंत्रण अत्यल्प आहे. उदा:- लालगढ ) धोक्याची घंटा वाजवताना दिसताहेत.
हे प्रश्न अगदिच हाताबाहेर नसले, तरी पुर्ण नियंत्रणातही नाहित.

बाकी डॉन,ऋषिकेश,विकास ह्यांचे अभ्यासपुर्ण प्रतिसाद आवडले.
पण वरच्या प्रश्नांचं कुणी डिट्टेलवार बोललं तर बरं होइल.

बृहद तमिळ राष्ट्रः- उत्तर लंकेचा काही भाग व खुद्द भारतातील तमिळनाडु!

आपलाच,
मनोबा