अंनिस व धर्मश्रद्धा

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
9 Aug 2009 - 3:12 pm
गाभा: 

अंनिस ही विवेकजागराची चळवळ आहे. विवेक ही काही अंनिसची मक्तेदारी नाही. समाजात विवेकाचा विचार सांगणारे संतजन होतेच की. बर्‍याच लोकांना अंनिस ही डामरट वाटते. दाभोलकर म्हणजे अंनिस हे समीकरण रुजण्याच कारण त्यांनी चळवळ प्रसारमाध्यमातुन रुजवण्याचे प्रयत्न केले. खरतर अंनिसचा विचार हा नवीन नाही. बुवाबाजीचा भंडाफोड झाल्यावर लोक बुवा बदलतात पण मानसिकता बदलत नाहीत. विवेकाधिष्ठीत समाज निर्माण करण्यासाठी नरेंद्र दाभोलकरांनी केलेले हे आवाहन- या पुर्वी याची चर्चा इथे झाली आहे
गरज विवेकी धर्मजागराची [दैनिक सकाळ ३० आक्टोंबर २००७]

(नरेंद्र दाभोलकर)
धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न जेथे झाला, त्या महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे...
कथित धर्मरूढी, प्रथा, परंपरा, पूजा, व्रतवैकल्ये, सणवार, कर्मकांडे यांना समाजजीवनात जणू उधाण आल्याचे दिसते आहे. याचा एक अर्थ यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना यश लाभते आहे. दुसरा अर्थ आपले कल्याण होईल, असे मानून भ्रमचित्त समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या वातावरणाला प्रशासकीय कठोरपणाचे उत्तर पुरे होईल, असे मानले जाते आहे. परिस्थितीच्या गांभीर्याची जाण येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

जीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली.

आपण लहानपणी भाषा शिकतो. धर्म जन्मतःच मिळतो. मायबोलीप्रमाणे व मायधर्म संस्काराने आपण स्वीकारतो. धर्मविचाराचा प्रश्‍नच उपस्थित केला जात नाही. व्यक्ती प्रौढ, विवेकी झाल्यावर तिने धर्मविचार करावा, अशी अपेक्षा असते. बहुतेकांच्या जीवनात हे घडत नाही. लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, गाडगेबाबा, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म या विषयावर मनन, चिंतन व कृती केली. धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न केला. त्याच महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मविचार व धर्माभिमान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने आपले कर्तव्यकर्म करावे; पण ते ईश्‍वराची आज्ञा म्हणून ईश्‍वरार्पण बुद्धीने करावे, अंतःकरणाच्या शुद्धीला व ईश्‍वरविषयक तळमळीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने व करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही, परंतु हा मार्ग मराठी मनाला व्यापून टाकू शकलेला दिसत नाही. कर्मकांडाचे आणि उत्सवी धर्माचे साम्राज्य अबाधित राहिलेच, पण ते वर्धिष्णूही बनते आहे.

आपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्‍न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल.

आत्मभाननिर्मितीचा दावा करणाऱ्या धर्माच्या नावाने हे घडावे हे भयचकित करणारे आहे. ही धार्मिकता विवेकही जागृत करत नाही आणि माणुसकीही जागवत नाही. ही प्रक्रिया याच तेजीने चालू राहिली तर धार्मिक राष्ट्रवादाचे रूप ती धारण करेल. राष्ट्राचे संविधान धर्मनिरपेक्ष व समाज धार्मिक राष्ट्रवादी अशा पेचात देश सापडेल. गुजरातमध्ये याची झलक आपण पाहिलीच आहे. याबरोबरच समाजातील अगतिकता, अस्थिरता, चंगळवाद, काळ्या पैशाचा प्रभाव, राजकीय सामाजिक मान्यतेसाठी धर्म सवंगपणे वापरणे हे सर्वही खरे आहे. या सर्वांतून अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्मभावना प्रभावित केली जात आहे.

न्यायालयाचे निर्णय व त्याची प्रशासकीय खंबीर अंमलबजावणी, यामुळे या परिस्थितीला फक्त मर्यादितच आळा बसू शकतो. धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे हा त्यावरचा अधिक मूलगामी उपाय आहे. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे. विचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला. विधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे.

- नरेंद्र दाभोलकर
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत.)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Aug 2009 - 3:19 pm | विसोबा खेचर

गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत.

मग सार्वजनीक झाल्या तर बिघडलं कुठं? त्या निमित्ताने बर्‍याच लोकांना रोजगार मिळतो. उद्या हा रोजगार काय दाभोळकर देणार काय?

आपला,
(उत्सवप्रेमी) तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

प्रकाश घाटपांडे's picture

9 Aug 2009 - 3:33 pm | प्रकाश घाटपांडे

मग सार्वजनीक झाल्या तर बिघडलं कुठं?

नाही बिघडल, पण त्यामागचे राजकारण.

त्या निमित्ताने बर्‍याच लोकांना रोजगार मिळतो.

खर आहे. रोजगारा पुढे श्रद्धा/अंधश्रद्धा ही गौण आहे. लोकांच्या धार्मिकतेचे राजकारणी लोक भांडवल करतात. देवस्थानांची श्रीमंती ही लोकांच्या धार्मिक श्रद्धेवरच टिकुन आहे. त्यातुन वाईटा बरोबर काही चांगली कामेही होतात.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पुष्कर जोशी's picture

23 Aug 2013 - 6:39 pm | पुष्कर जोशी

ह्या विषयावर राजीव दीक्षित ...

विसोबा खेचर's picture

9 Aug 2009 - 3:47 pm | विसोबा खेचर

गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

अहो मग शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास या करता दाभोळकरांनीही मागावे की लोकांकडे पैसे! लोक देतील..! मी स्वत: १०१ रुपये द्यायला तयार आहे. सुरवातीला जी काही थोडीफार वर्गणी जमेल त्यातून शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास या संदर्भात दाभोळकरांनी काही ठोस नसली तरी निदान भक्कम सुरवात तरी केली आहे असे दाखवून द्यावे. ते पाहून लोक अजून मदत करतील आणि काही मोठं काम उभं राहील.

करावं की हे दाभोळकरांनी! नाही कुणी म्हटलंय??

परंतु 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!' हेच खरं!

हां, आता होतात उत्सव, लोक चार दिस मजा करतात, काही लोकांना रोजगार मिळतो, सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते!

तसेच काही अनिष्ट प्रकारही घडत असतात, ते घडले नाय पायजेल हेही कबूल. अहो पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे दाभोळकरांच्या लक्षात कसे येत नाही?

मला तर बॉ हे दाभोळकर बघावं तेव्हा सतत काहितरी तक्रार करताना, सतत चिडलेले, ग्रासलेले असेच दिसतात!

छ्या...! :)

स्वगत : बरं या प्रकाश घाटपांड्याचंही काही कळत नाही. हा मनुष्य अंधाश्रद्धावाला आहे की अंधश्रद्धा निर्मुलनवाला आहे, ज्योतिषाच्या बाजूने आहे की ज्योतिषाच्या विरोधात आहे, की नुसताच एखादा ज्वलंत धागा टाकून दोन्ही बाजूंचे प्रतिसाद मिटक्या मारत वाचत आनंद घेणारा आहे, तेच काय कळत नाय बा! लै डेजर मनुक्ष! :)

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

अवलिया's picture

9 Aug 2009 - 4:13 pm | अवलिया

मला तर बॉ हे दाभोळकर बघावं तेव्हा सतत काहितरी तक्रार करताना, सतत चिडलेले, ग्रासलेले असेच दिसतात!

दाभोळकरांना पोटाचा विकार असावा...

नेटकिडा's picture

9 Aug 2009 - 9:55 pm | नेटकिडा

माझा इथे कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही, पण मला सुद्धा अंनिस एका विशिष्ट धर्मातील अंधश्रद्धांविरोधी काम करताना दिसते. ईतर धर्मात अंधश्रद्धा नाहीत काय?

विकि's picture

10 Aug 2009 - 12:00 am | विकि

विशिष्ट म्हणजे हिंदू धर्मच ना. यासंबंधी दाभोळकर म्हणतात मी आधी माझा धर्म सुधरवणार मग दूसरीकडे वळणार.पण अंनिस चे काम खरोखरच वाखाणण्याजोग आहे हे ही तितकच खर.

विकास's picture

10 Aug 2009 - 12:07 am | विकास

यासंबंधी दाभोळकर म्हणतात मी आधी माझा धर्म सुधरवणार मग दूसरीकडे वळणार.

याचा अर्थ दाभोळकर धर्म मानतात आणि स्वतःला (गर्वसे का ते माहीत नाही पण) हिंदू आहोत असे म्हणतात तर! :-) आणि शिवाय माणसा माणसाकडे धर्माधारीत फरक करून बघतात तर... छान छान!

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2009 - 8:43 am | प्रकाश घाटपांडे

याचा अर्थ दाभोळकर धर्म मानतात आणि स्वतःला (गर्वसे का ते माहीत नाही पण) हिंदू आहोत असे म्हणतात तर

जेव्हा दाभोलकर साधना साप्ताहिकाचे संपादक झाले त्यावेळी साधनाचे संपादक अखेर 'ब्राह्मण' च का? अशी टीका झाली होती. म्हणजे तुम्ही जात, धर्म, पंथ वगैरे मानु नका पण तुम्ही हिंदु व ब्राह्मण हे आम्ही म्हणणारच. कारण तुमचे आईवडिल ब्राह्मण आहेत. [साधनाचे अंधश्रद्धा निर्मुलन केले तर खबरदार असा दम साधनाच्या जुन्या जाणत्या(?) वाचकांनी भरला होता. सुदैवाने(सुयोगायोगाने) साधना व अंधश्रद्धा निर्मुलन या बाबी वेगळ्या करुन दाभोलकर ही कसरत करीत आहेत.]
(त्यामुळेच)दुसरी गोष्ट अशी की इतर धर्मातल्या अंधश्रद्धांविषयी जेव्हा बोलल जात त्यावेळी बाकी लोक म्हणतात अगोदर तुमच्या घरातील(धर्मातील) घाण(अंधश्रद्धा) दुर करा मग इतरांच्या घरात(धर्मात) ढवळाढवळ करा. हिंमत असेल तर मुसलमानांच्यातील अंधश्रद्धा दुर करुन दाखवा बर असा बेरकी सवाल (आक्षेप) नेहमीच केला(घेतला) जातो.
धनंजय म्हणतात तस बदल म्हणजे शेवटी अधिका(उणे) असणार.
तर अशी ही गोची आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रदीप's picture

10 Aug 2009 - 2:32 pm | प्रदीप

पण तुम्ही हिंदु व ब्राह्मण हे आम्ही म्हणणारच. कारण तुमचे आईवडिल ब्राह्मण आहेत.

असे का? कुठच्याही सज्ञान माणसाने (पुरुष/ स्त्री/ तृतियपंथी) स्वतःचा धर्म स्वतः ठरवावयाचा असतो. तो जर लोकांनी मानला नाही, तरी काय बिघडते?

.

हिंमत असेल तर मुसलमानांच्यातील अंधश्रद्धा दुर करुन दाखवा बर असा बेरकी सवाल (आक्षेप) नेहमीच केला(घेतला) जातो.

ह्यात काही 'बेरकी' आहे की नाही ते माहिती नाही. तूर्तास असे मानून चालू की हा अगदी बेरकी प्रश्न आहे. तो रास्त आहे का चूक हे महत्वाचे.

ह्यासंबंधी अगोदरच उपक्रमावर माझी व प्रकाशांची थोडी जाहीर व थोडी व्य. नि. तून चर्चा झालेली आहे. ही वर सांगितलेली कारणे आता निदान मलातरी नवीन आहेत, आणि ती पटण्यासारखी नाहीत. मी प्रकाशांना लिहीले होते की एखादा प्रकल्प राबवतांना तो परिणामकारक (effective) किती हा एक मुद्दा व तो किती कमीत कमी 'खर्चात' (इथे मला नुसता पैशाचा खर्च अभिप्रेत नाही, तर सर्वच रिसोर्सेस अभिप्रेत आहेत) (efficient) करत आहात हा दुसरा.

आता अनिस ह्यातील केवळ दुसरा मुद्दा बघत आहे. कुठलीही एकवाक्यता नसलेल्या हिंदू धर्मातील गटांना वेगवेगळे घेऊन झोडपणे हे कमी 'खर्चाचे' (quite efficient) आणि म्हणून तुललेने बरेच कमी जिकीरीचे आहे. ह्याउलट इतर एकसंध व नियनंत्रित धर्मांतील अंधश्रद्धा दूर करण्याचा केवळ प्रयत्न करणे हे पहाडावर डोके फुटून घेण्यासारखे महाकर्म. खरे तर कुटुंबनियोजनास धर्माच्या नावाखाली विरोध करणे हे सामाजिक वे देशाच्या स्वाथ्यासाठी अत्यंत घातक आहे. तेव्हा त्या दिशेने अंनिसने काही कार्य चालवावे? तसे त्यांनी केले तर ते कार्य कुठल्यातरी ज्योतिषी, कुठलेतरी संभावित महाराज ह्यांच्यावरील लढ्यांपेक्षा कितीतरी परिणामकारक (effective) होईल, हे मलातरी लख्ख दिसते. महाराज, साधू ह्यांच्यावरील लढे चालवू नयेत असे नाही. पण चळवळीची सर्वच शक्ति इथेच गुंतवली आहे, ते आक्षेपार्ह नक्कीच आहे.

विसोबा खेचर's picture

10 Aug 2009 - 12:10 am | विसोबा खेचर

अंनिस चे काम खरोखरच वाखाणण्याजोग आहे हे ही तितकच खर.

वाखाणण्यासारखं आहे ना? मग झालं तर!

तरीही मग बघावं तेव्हा हे दाभोळकर गळे का काढत असतात?
काम करत रहा, यश मिळेल...

साला जागृतीच्या नावाखाली समाजाची सतत उणीदुणी काढत रहायची म्हणजे काय?

समाज आहे हा असा आहे. तो बदलायची ताकद असेल तर बदला पण सतत दुर्मुखलेले राहून समाजाची उणीदुणी काढू नका!

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

विकास's picture

10 Aug 2009 - 12:54 am | विकास

तो बदलायची ताकद असेल तर बदला पण सतत दुर्मुखलेले राहून समाजाची उणीदुणी काढू नका!

अगदी चपखल शब्दात जे म्हणायचे ते म्हणले आहे! पुर्ण सहमत!

उणेदुणे काही न म्हणता "बदल हवा" असे कसे म्हणायचा बुवा? जे उणेदुणे वाटते, त्याच ठिकाणी बदल हवा म्हणता येतो.

काही उणेच नसेल तर बदल कसला? उणे आहे, असे वाटते, म्हणूनच बदल जरुरीचा आहे. बदल जरुरीचा आहे, असे कोणाला पटवण्यापूर्वी काही उणे आहे हे पटवणे प्राथमिक आहे.

फुले-आगरकर-आंबेडकर-रानडे- आणि होय हिंगण्याचे कर्वेसुद्धा समाजातील चालीरीतींविषयी उणेदुणे बोलत. धोंकेंपेक्षा रधों तर खूपच अधिक उणेदुणे बोलत. समाज बदलू इच्छिणारी व्यक्ती उणेदुणे बोलणार नाही ते कशी हेच माझ्या लक्षात येत नाही आहे.

समाज बदलणे फार कठिण आहे. त्यात अपयश येणारे फार असतात. (आयुष्य जाईस्तोवर अपयशाचे बोलके उदाहरण र.धों.कर्वे.) यश येईपर्यंत बोलू नये म्हटले तर ज्या थोड्या लोकांना यश मिळते तेही मिळणार नाही.

उणे असे काहीही न म्हणता समाज बदलल्याचे ऐतिहासिक (किंवा हल्लीचे) उदाहरण देऊन तात्या/विकास यांना आपले म्हणणे सुस्पष्ट करता येईल, असे वाटते.

विसोबा खेचर's picture

10 Aug 2009 - 9:02 am | विसोबा खेचर

फुले-आगरकर-आंबेडकर-रानडे- आणि होय हिंगण्याचे कर्वेसुद्धा समाजातील चालीरीतींविषयी उणेदुणे बोलत.

अहो पण त्यांनी कामही केलेलं आहे. दाभोळकरांनी काय असं ठोस काम केलं आजपर्यंत सांगा पाहू!

आणि कुठे वरील मंडळी, कुठे दाभोळकर!

छ्य्या...!

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

सहज's picture

10 Aug 2009 - 9:15 am | सहज

दाभोळकर यांचे ठोस कार्य प्रकाशकाका सांगतीलच. तरीही फुले-आगरकर-आंबेडकर-रानडे व दाभोळकर यांचे कार्य पहीले तपासुन पहायचा/ (अथवा एकाच मापात तोलायचा) अट्टहास समजला नाही.

अजुनही नरबळी, गुप्तधनाच्या लालसेने वाट्टेल ते विधी, चमत्कार करुन लुबाडणारे बाबा असताना, अंनिसची / दाभोळकर यांच्या कार्याची दखल न घेणे अनाकलनीय आहे.

फुले-आगरकर-आंबेडकर-रानडे यांनी देखील काही सुरवात केली तेव्हा तुम्ही म्हणाला तश्याच प्रतिक्रिया उमटल्या असणारच.

उणे असे काहीही न म्हणता समाज बदलल्याचे ऐतिहासिक (किंवा हल्लीचे) उदाहरण देऊन तात्या/विकास यांना आपले म्हणणे सुस्पष्ट करता येईल, असे वाटते.

उत्तराला बगल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2009 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहजराव, अनिस किंवा दाभोळकरांच्या कार्याची दखल कोणी घेतली असेल,नसेल घेतली ते क्षणभर विसरु, पण, अंधश्रद्धा, बुवाबाजी,चमत्कार भोंदूगिरी, तांत्रिक-मांत्रिक यांच्या जोखडापासून सामान्य माणसाला मूक्त करण्याचे काम अनिस आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत तेव्हा या चळवळीचे आपण नुसते स्वागत नव्हे तर अशा चळवळीत सहभागी होऊन त्यांना पाठबळ दिले पाहिजे असे मला वाटते.

-दिलीप बिरुटे

सहज's picture

10 Aug 2009 - 9:46 am | सहज

चांगल्या कामात पाठबळ दिले पाहीजे म्हणायचे होते सर!

विकास's picture

10 Aug 2009 - 9:42 am | विकास

सर्व प्रथम येथे अनिसला विरोध करणारे हे अंधश्रद्धेच्या बाजूचे आहेत असे मला वाटत नाही. मी नाही इतकी मी खात्री देऊ शकेन. श्रावणात शिमगा करणारे, अंधश्रद्धा कसली पाळणार? ;)

मी अनिसला शत्रू मानत नाही. पण त्यांची वाट चुकली आहे अथवा तसे नसेल तर ते समाजाची दिशाभूल करत आहेत असे समजतो. तेंव्हा मग अनिसला विरोध का व्हावा याचा विचार केला तर काय जाणवते - संवाद करण्यात काही तरी बिघडतं आहे...तुमच्या वरील प्रतिसादात, तुम्ही म्हणालात की, "आयुष्य जाईस्तोवर अपयशाचे बोलके उदाहरण र.धों.कर्वे.." आणि त्याच्याशी सहमत आहे. त्या संदर्भात अजून एक तितकेच दुर्दैवी नाव, (उल्लेख केला असला तरी) आहे ते आगरकरांचे, ज्यांच्या प्रतिमेच्या प्रेतयात्रा तत्कालीन विरोधकांनी, त्यांच्या जिवंतपणी काढल्या आणि मरेपर्यंत वाळीत टाकून मनस्ताप दिला.

मात्र असे का व्हावे? फुले, आंबेडकर, म. कर्वे, यांना इतके टोकाचे अनुभव का आले नाहीत? (रानड्यांबद्दल वेगळे खाली लिहीत आहे). कारण साधे आहे, यातील फुले-आंबेडकरांनी समाजावर कोरडे ओढले असले तरी, समाजात राहूनच (समाजाचा भाग म्हणून) काम केले. म कर्व्यांनी कोरडे ओढले का ते माहीत नाही, पण त्यांनी "आधी केले मग सांगितले" या उक्तीप्रमाणे, स्वतः विधवेशी विवाह केला. त्यांना विरोध केला तो केवळ धर्ममार्तंडांनी ज्यांनी टिळकांना पण पाद्र्याच्या हातचा चहा प्यायला म्हणून वाळीत टाकले अशांनी... पण ते (म. कर्वे) समाजाबद्दल कडवट बोलत वेळ घालवत बसले नाहीत. किंबहूना स्वतःचे ध्येय ठरवले आणि ते अत्यंत संयमाने मिळवण्याचा प्रयत्न केला.

पण आगरकर आणि रं.धो कर्व्यांनी काय केले? वाट्टेल तसे समाजावर कोरडे तरी ओढले अथवा ज्या गोष्टींसाठी समाजाची तयारीच झाली नव्हती अशा गोष्टीं समाजाने लगेच आत्मसात कराव्यात म्हणून कडवट हट्ट धरला. अशा पद्धतीने समाजसुधारणा करता येत नसते...काही अंशी असा प्रकार सावरकरांबरोबरही झाला.

टिळकांना प्रच्छन्न सुधारक म्हणायचे, पण वरकरणी जसे टिळक जसे सुधारणांच्या बाजूने नसायचे तसे त्यांच्या स्वातंत्र्याच्या आणि स्वातंत्र्ययुद्धाच्या बाबतीतही भ्रामक कल्पना नव्हत्या. त्यामुळे ते कायम म्हणत राहीले की आज मी जे काही काम करतो आहे त्याने समाजाची नुसती मानसिकता तयार होत आहे. उद्या त्यातून पुढची पिढी स्वातंत्र्य मागायला उठेल आणि मिळवेल, जरी ते पहायला मी हयात नसलो तरी... त्या एका गोष्टी वरून (हळू हळू बदल घडवणे आणि समाजाला तयार करणे) त्यांचे त्यांच्या तरूणपणी वासुदेव बळवंत फडक्यांबरोबरचे संबंध दुरावले होते...

तात्पर्य समाज एकदम बदलता येत नाही, तो संयमाने बदलताना पण विरोध होतो, पण त्याच वेळेस कुठेतरी ऐकून घेयची तयारीपण होत असते. मात्र जेंव्हा तेच कडवट टिकेतून (याला नुसतीच उणीदुणी काढणे म्हणतात) होते तेंव्हा मात्र त्याचा परीणाम हा इप्सित ध्येयाच्या विरोधातच होतो...

(वाचनाच्या आठवणीतून) आता रानड्यांबद्दलः रानड्यांनी विधवा विवाह आणि एकंदरीत स्त्रीयांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. मात्र या रानड्यांची पत्नी जेंव्हा गेली, तेंव्हा वडीलांच्या हट्टामुळे असे म्हणत का होईना पण एका कुमारिकेशी "जरठबाला" मधे मोडेल असाच विवाह केला... जेंव्हा एका वक्त्या मुलाने, रानडे वादविवाद स्पर्धेत, "सुधारणा का होत नाहीत" ह्याचा उहापोह करताना, सुधारणावादीच इतरांना ब्रम्हज्ञान सांगत असताना, स्वतःच्या आयुष्यात मात्र सुधारणा करून घेत नाहीत, असे म्हणत रानड्यांचेच उदाहरण देऊ लागला, तेंव्हा ह्याच रानड्यांनी ताबडतोब उठून त्याला खाली बसवले...

विकास's picture

10 Aug 2009 - 4:56 pm | विकास

उणे असे काहीही न म्हणता समाज बदलल्याचे ऐतिहासिक (किंवा हल्लीचे) उदाहरण देऊन तात्या/विकास यांना आपले म्हणणे सुस्पष्ट करता येईल, असे वाटते.

आत्ताच एक उदाहरण वाचनात आले, त्यामुळे ते नंतर जरी ऐतिहासिक ठरू शकले तरी ते आत्ता "हल्लीचे" मधे मोडेलः

Big 92.7 FM presents City's very own Green Ganesha

या बातमी प्रमाणे, हे रेडीओ स्टेशन (मला माहीत नाही कोण वगैरे ते) सात ठिकाणी आहे आणि ते सर्वत्र लोकांना आवाहन करून घरटी एक वृत्तपत्र मागत आहेत. त्यांची थोडक्यात कल्पना अशी आहे की या वेळेस पेपर्सच्या लगद्याचा उपयोग करून गणपतीची मुर्ती तयार करायची आणि शहरातील प्रमुख ठिकाणी (prominent location) तिची स्थापना करायची. गणेशोत्सवाच्या प्रत्येक दिवशी कोणी तरी लोकप्रिय व्यक्ती (celebrity) आणून तीच्याकडून आरती/पुजा वगैरे करायची आणि हे सर्व करत असताना पर्यावरण, प्रदुषण आणि एकंदरीत eco-friendliness चा संदेश पोचवायचा.

वास्तवीक हे सर्व करायच्या ऐवजी ते रेडीओ वरून जाहीर करू शकले असते, गणेशमुर्तींमुळे किती प्रदुषण होते, असल्या मुर्ती पर्यावरणाला कशा घातक आहेत. असा वापर बंद करा, वगैरे. पण ते काही न करता हा साधा उपाय योजला आहे. पुण्यात तसे सांगून झाले आहे, काही लोकांनी जरी त्यामुळे बदल केला असला तरी एकंदरीत काय त्याला विरोधच जास्त झाला आणि परीणामी अजूनच विरुद्ध कृती झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2009 - 12:43 am | बिपिन कार्यकर्ते

विकिभौ, तुमच्या तीन वाक्यांच्या प्रतिसादात बरेच विरोधाभास भरलेले आहेत. असो. चालुद्या.

बिपिन कार्यकर्ते

बुद्धीप्रामाण्यावादाची एक गोची आहे.
त्यांची एक गोची होते. माझ्या बुद्धीला जे पटते तेच सत्य असे मी मानतो. हे म्हणणे योग्य आहे. अनीस चे कार्यकर्ते हे कसोशीने पाळतात पण त्याच वेळेस ते हे विसरतात की त्यांच्या बुद्धीला न कळणारेही बरेच काही आहे त्या गोष्टी ते समजून घ्यायचा प्रयत्नाच करत नाहीत.
मला समजत नाही ते आस्तित्वातच नाही ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. त्या अंधश्रद्धेची जपणूक अनीसचे कार्यकर्ते मात्र कसोशीने करतात
शिवाय ते कार्यकर्ते प्रत्येक गोष्ट एकाच मोजपट्टीवर मोजायचा आग्रह धरतात.
उदा: पृथ्वीपासून उर्टचा ढग १५कोटी पेक्षाजास्त किमी वर आहे हे ते लगेच मान्य करतात / मोबाईलमुळे मानवी कानावर परिणाम होतो हेही मान्य करतात. पण मंत्रोच्चारामुळे मनःशान्ती मिळते हे मान्य करत नाहीत

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

दादा कोंडके's picture

9 Aug 2009 - 10:34 pm | दादा कोंडके

मला वाटतं बुद्धीप्रामाण्यवादाबरोबरच ढोंगीपणाविरुद्ध अंनिस चा लढा आहे. मंत्रोच्चाराचे महत्व पटवून एखादा पाखंडी लोकांना लुबाडत असेल किंवा भारीत पिचू :) कानात ठेवल्यामुळे मोबाईलमुळे परिणाम होणार नाही असं म्हणणारा एकच.

"I always win, except when I loose. But then I just don't count" :D

विसोबा खेचर's picture

10 Aug 2009 - 12:21 am | विसोबा खेचर

पण त्याच वेळेस ते हे विसरतात की त्यांच्या बुद्धीला न कळणारेही बरेच काही आहे त्या गोष्टी ते समजून घ्यायचा प्रयत्नाच करत नाहीत.
मला समजत नाही ते आस्तित्वातच नाही ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. त्या अंधश्रद्धेची जपणूक अनीसचे कार्यकर्ते मात्र कसोशीने करतात

सहमत आहे..

बुद्धीप्रामाण्यवाद ही खूपच तोकडी संकल्पना आहे!

आपला,
(सौताला बुद्धीप्रामाण्यवादी अर्थात 'लै शाणा' न समजणारा) तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2009 - 9:04 am | प्रकाश घाटपांडे

पण मंत्रोच्चारामुळे मनःशान्ती मिळते हे मान्य करत नाहीत

मनःशांती मिळते ती मंत्रावरील दृढ श्रद्धे पोटी केलेल्या उच्चारणामुळे. अनेकदा मंत्रांचे उच्चारण हे केवळ 'गतानुगतिक' असते. मेकॅनिकल बाब म्हणा हव तर. सबब मनःशांती मिळते ती मंत्रातील शब्दांच्या अर्थामुळे नव्हे. कधी त्यातील गेयता, त्यावरील श्रद्धा यामुळे मिळालेले ते समाधान आहे. हा प्लासिबो इफेक्ट आहे. इफेक्ट आहे हे मान्यच. अश्रद्ध लोकांना हे समाधान नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 9:03 am | JAGOMOHANPYARE

,,,,,,,,,,,,,,,,,,,आपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरप,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

हे सण आता हिन्दुनी बन्दच करायला हवेत .... बकरी ईद, रमजान, ख्रिस्मस, हॅपी न्यू इअर, मदर्स डे, फादर्स डे आणि दाभोळ्कर जयन्ती हे एवढे सण असताना वरचे जुनाट सण कशाला साजरे करायचे ?

विसोबा खेचर's picture

10 Aug 2009 - 9:05 am | विसोबा खेचर

आणि दाभोळ्कर जयन्ती हे एवढे सण असताना वरचे जुनाट सण कशाला साजरे करायचे ?

हा हा हा! :)

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2009 - 9:31 am | प्रकाश घाटपांडे

हे सण आता हिन्दुनी बन्दच करायला हवेत .... बकरी ईद, रमजान, ख्रिस्मस, हॅपी न्यू इअर, मदर्स डे, फादर्स डे आणि दाभोळ्कर जयन्ती हे एवढे सण असताना वरचे जुनाट सण कशाला साजरे करायचे ?

सण साजरे करायला विरोध नाहीच. लोकांच्या श्रद्धा हे हत्यार करुन शोषणाचे राज/अर्थकारण हा मुद्धा आहे
अवांतर- या कलियुगात ल्वॉक यवढे धार्मिक कसे झाले ही भानगड काय कळानी ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 9:41 am | JAGOMOHANPYARE

गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती

यांच्यामध्ये शोषण होते, तर शोषण करणार्‍याना विरोध करायचा... बॅक्टेरिया शरीरातील इतर पेशीना त्रास देत असेल, तर बॅक्टेरीयाना मारायचे... का शरीर त्याना आश्रय देते म्हणून शरीर सम्पवायचे ? डॉक्टर दाभोळकरना जरा बेसिक मेडिसिन परत एकदा शिकून घ्यायला सान्गा ... प्रॅक्टीस न करता बाकी उद्योग करत बसलेत त्यामुळे बेसिक विसरलेत ते !

(.. बेसिक न विसरलेला डॉक्टर...)

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2009 - 9:51 am | प्रकाश घाटपांडे

.. बॅक्टेरिया शरीरातील इतर पेशीना त्रास देत असेल, तर बॅक्टेरीयाना मारायचे... का शरीर त्याना आश्रय देते म्हणून शरीर सम्पवायचे ?

छे छे अहो निस्त विंजेक्शन द्यायच. पन ते शरिरालाच टोचावे लागते ना. प्रबोधनाचा डोस/विंजेक्शन हे अप्रिय वाटते. अंधश्रद्धाळू लोकांची किव करता कामा नये हे तत्व त्यातुनच आले. कधी कधी कार्यकर्त्यांकडुन उत्साहाच्या भरात नकळत कीव केली जाते मग माणस दुखावतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

10 Aug 2009 - 9:50 am | विकास

खालील बातमी वाचल्यावर पटते की अर्थकारण हा मुद्दा नक्कीच आहे. मात्र दाभोळकर त्या संदर्भात अर्थकारणाबद्दल बोलतील का अशी शंका आहे. (आधी एक गोष्ट माहीतीसाठी: हिंदू धर्मीय संस्थांमधे सरकारी नेमणुकीचा अधिकारी ट्रस्टमधे असतो आणि सगळे जाहीर करावे लागते. जाहीर करावे लागते हे चांगले आहे... मुस्लीमांमधे वक्फ बोर्ड असते, पण सरकारी अधिकारी नसतो. शिख, बुद्धांबद्दल कल्पना नाही, पण सरकारी अधिकारी नसतो असे वाटते. ख्रिश्चनांबद्दल? खाली वाचा. हा ऑर्गनायझर मधील लेख नाही, तर संघावर टिका करणार्‍या डेक्कन हेराल्ड मधील लेख आहे!):

Church funds equal Indian Navy’s annual budget
Panaji:

Christians are a mere 2.5 per cent of the country’s population. But, the Church in India suffers from a case of plenty, says Remy Denis, All India Catholic Union President.

Church authorities control funds equivalent to the Indian Navy’s annual budget. The Church is also the second largest employer after the government, he said.

Eduardo Faleiro, a former Union minister and Goa NRI Commissioner, is among the growing number of Catholics like Prof Denis, who support a law to govern Church properties and a far greater degree of transparency in the way the Church manages its earthly assets.

“The Church is not a symbol of power but service, and democratic laws must apply to it equally. All religions must be kept on the same footing,” Faleiro said at a conference called to debate the matter of bringing Church properties under state laws.

The laws that govern Church properties in Goa were enacted during the Portuguese regime. The same laws have long since been repealed in Portugal, Faleiro said.

Almost all other religions in India have laws enacted to administer their properties, K T Thomas, former Supreme Court judge, said. Hindu temples are governed by laws specifically enacted for each trust and their accounts are subject to judicial review. The Sikhs, one of the smallest religious groups in the country, have the Sikh Gurudwara Act. Muslim trust properties comes under the Wakf Act.

“I feel the opposition from the Christians is on account of a fear that a provision for judicial scrutiny is likely to expose the expenses and magnitude of wealth of the denomination,” Thomas said. The head of the Believers Church had recently acquired a huge plantation in Kerala for Rs 123 crore. This was apart from the vast assets already held by the denomination, he said. The Church in Kerala also runs its own media network.

Thomas said there was a misplaced apprehension that the Parliament, through legislation, would grab the properties of the churches. No such law could be passed by Parliament or State legislatures, he said. All religious denominations have the right to own and acquire properties, establish and maintain religious institutions. “But, in matters of administration of your properties you have to abide by the law,” he said.

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 9:51 am | JAGOMOHANPYARE

अवांतर- या कलियुगात ल्वॉक यवढे धार्मिक कसे झाले ही भानगड काय कळानी ब्वॉ!

का म्हणजे.. ? लोक सन्ख्या वाढली... रस्ते, गाव त्याप्रमाणात वाढली नाहीत... मग आता रस्त्यावरती, देवळात त्यापटीने त्याचे प्रदर्शन वाढले... कलि युगात दोन नवीन धर्म निघालेत महाराजा ! तिथे लोक धार्मिक झालेत याचे आश्चर्य कशाला करत बसायचे ?

अनिस च्या भाकर्‍या भाजण्यापेक्शा डॉक्टर दाभोळ्कर सरकारी दवाखान्यात फॅमिली प्लॅनिन्गच्या सर्जरी करत बसले असते, तर कदाचित यावर थोडे तरी नियन्त्रण आणू शकले असते ! ....

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 9:10 am | JAGOMOHANPYARE

................................दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनि................................................................................

मग त्यात काय चुकीचे आहे ? एक सिवाजी न होता तो सुन्नत सबकी होती... हे दाभोळ्कर विसरला काय ? अन्धश्रद्धेच्या नावाने दाभोळकर टोळी काढू शकतो..... धर्माच्या नावाने काढली तर बिघडले कुठे ?

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 9:26 am | JAGOMOHANPYARE

>>>>>>>>>>>>>>> मनःशांती मिळते ती मंत्रावरील दृढ श्रद्धे पोटी केलेल्या उच्चारणामुळे. अनेकदा मंत्रांचे उच्चारण हे केवळ 'गतानुगतिक' असते. मेकॅनिकल बाब म्हणा हव तर. सबब मनःशांती मिळते ती मंत्रातील शब्दांच्या अर्थामुळे नव्हे. कधी त्यातील गेयता, त्यावरील श्रद्धा यामुळे मिळालेले ते समाधान आहे. हा प्लासिबो इफेक्ट आहे. इफेक्ट आहे हे मान्यच. अश्रद्ध लोकांना हे समाधान नाही>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

१. मनःशांती मिळते ती मंत्रावरील दृढ श्रद्धे पोटी केलेल्या उच्चारणामुळे... म्हणजे श्रद्धा अनिस ला मान्य आहे तर... मग धर्माला विरोध करायचे नाटक कशाला ?

२. सबब मनःशांती मिळते ती मंत्रातील शब्दांच्या अर्थामुळे नव्हे.................. दाभोळकराच्या नावाने दहा मिनिटे जप करून बघा... मनशान्ति मिळते काय ते सान्गा... मिळाली तर इतर धर्मियाना जाऊन सान्गा.. उद्यापासून बान्ग देताना दाभोळकराच्याच नावाने द्या.. अन्धश्रद्धा निर्मूलन गाडगे महाराज पण करत होते... पण ते देखील गोपाला गोपाला हा जप करत होतेच की...

३. अन्धष्रद्धा निर्मुलन कायदा हा धर्म मार्तन्डामुळे अडकला आहे, अशी बोम्ब अनिस मारत असते... प्रत्यक्षात हा कायदा अनिस मुळेच अडकला आहे... कारण श्रद्धा आणि अन्धश्रद्धाच मुळात अनिसला डिफाइन करता आलेली नाही.... नरबळी देणे , पशु बळी देणे इ इ इ अशी उदाहरणे म्हणजे व्याख्या ठरू शकत नाही.... दाभोळकरला या कायद्यात श्रद्धेची व्याख्याच ठरव्ता आलेली नाही... मग त्याच्या पली कडे जे आहे, ती अन्धश्रद्धा ही व्याख्या तरी तो काय कपाळ करणार ?

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 12:49 pm | JAGOMOHANPYARE

धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

आणि हा पैसा जर लोकानी सरकारला दिला तर सरकार त्यातून किती मदरसे आणि चर्च ना सहाय्य करणार ? धर्मावर खर्च झालेला पैसा हा जर तुम्हाला व्यर्थ वाटतो, तर सगळ्या धर्माचे असे एकत्रित टेबल अनिस च्या मासिकात दर वर्षी का जाहीर नाही करत ?

दुसर्‍या देशात असणारे तीर्थ स्थ्ळ बघण्यासाठी सरकार त्या धर्मियाना विमान खर्च देखील पुरवते.. दाभोळ्कराना तो दिसतो का ? मग आपल्या खर्चाने आम्ही उत्सव केले तर बिघडले कुठे ?

नरबळी देण्यासाठी कर्ज काढणारा एखादा माणूस आणि नियमितपणे आपले सण साजरे करणारे सामन्य जन हे सगळे एकाच अन्ध श्रधेचे बळी म्हणायचे का ? दोन ओळीचा कायदा करून सगळ्याना एकाच फटक्यात उडवायचे का ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2009 - 12:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

छ्या, हा लेख 'अंनिस'बद्दल आहे का दाभोलकरांबद्दल! प्रकाशकाका, तुम्ही दाभोलकरांना हा लेख आणि आनुषंगिक चर्चा दाखवाच. अंनिस म्हणजे दाभोलकर ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी किती कष्ट दाभोलकरांच्या वारसाला करावे लागतील याची कल्पना येईल!! ;-)

बाकी कर्क आणि नील यांच्याशी सहमत.

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2009 - 1:23 pm | प्रकाश घाटपांडे

हे प्रतिसाद प्रातिनिधिक असतात. FAQ सारखे हे FSO (frequently sustained objections) असतात. यातुनच विचार पुढे जाणार आहे. हे नक्की दाभोलकरांना दाखवेन. समाजात अशी देखील माणसे आहेत कि प्रकाशात न येताही अंधश्रध्दा निर्मुलनाचा विचार विज्ञानाच्या प्रसारातुन सांगत असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

10 Aug 2009 - 1:47 pm | अवलिया

>>>अंधश्रध्दा निर्मुलनाचा विचार विज्ञानाच्या प्रसारातुन सांगत असतात.

म्हणजे विज्ञानाचा प्रसार हाच अंधश्रद्धा निर्मुलनाचा विचार का?
विज्ञानाचा आधार न घेता अंधश्रद्धा निर्मुलन होवुच शकत नाही का?
की विज्ञान हेच अंतिम सत्य आहे ही नव्या युगातील अंधश्रद्धा ?
आणि हीच विज्ञानाची शोकांतिका ?
नक्की काय ?
समजावुन सांगाल काय?

(अंधश्रद्धाळु, गावंढळ म्हणुनच धार्मिक ) अवलिया

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2009 - 1:55 pm | प्रकाश घाटपांडे

विज्ञान हे चिकित्सेला सतत खुले असते. निरिक्षण, अनुमान,प्रयोग आणि निष्कर्ष या प्रमुख टप्प्यात त्याची सतत प्रक्रिया असते. एखादा सिद्धांत हा जेव्हा काही निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला असमर्थ ठरतो त्यावेळी त्याची चिकित्सा होत असते, विज्ञान हे वस्तुनिष्ठ असते व्यक्तिनिष्ठ नसते. अपौरुषेय, अपरिवर्तनिय , बाबावाक्यं प्रमाणं , अशी भानगड विज्ञानात नसते. धर्म या शब्दाला व्याख्येत पकडायला गेलात कि शब्दोच्छलपांडित्य चालू होते, वर्षानुवषे तेगुर्‍हाळ चालूच आहे. शेजारधर्म, पितृधर्म,मातृधर्म,राष्ट्र्धर्म ,आपदधर्म या अर्थाच्या धर्म या शब्दात वेगळी छटा आहे. हिंदु धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म इ. या धर्माच्या अर्थात रिलिजन या अर्थाची छटा आहे.गुणधर्म यातील छटा, अधर्म यातील छटा या वेगवेगळ्या आहे.धारये त् या शब्दाशी त्याची व्युत्पत्ती सांगितली जाते जगणे हा पण धर्मच आहे. पण व्यावहारिक पातळिवर रिलिजन या अर्थानेच तो वापरला जातो, धर्माची चिकित्सा करणे म्हणजे धर्माशी प्रतारणा करणे असे समीकरण रुजल्याने रुढी,परंपरेच्या माध्यमातून जोपासला गेलेल्या अंधानुकरणाची चिकित्सा कुणी केल्यास त्याला धर्मबुडव्या, पाखंडी अशी विषेशणे लावली जातात. जन्म ज्या धर्मात झाला तो धर्म त्याला आपोआप चिकटतो (धर्मांतर करण्याची सोय आहे पण ती नंतर) बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे गॅलिलिओ ला ती गोल आहे हे मांडल्याबद्दल झालेला छळ हा ज्ञात आहेच.(खर तर त्याच्याही अगोदर अनेकांनी ते मांडले होतेच, आपल्याकडे आर्यभट्ट्, भास्कराचार्य यांनी) प्रत्येक धर्मात विश्वाच्या व्युत्पत्ती बाबत वेगवेगळ्या कल्पना आहेत. त्याला वैज्ञानिक उदयामुळे छेद जाउ लागले. पण त्याचे तंत्रज्ञानात रुपांतर झाल्याने माणसाच्या ऐहिक जीवनात निर्माण झालेली उपयुक्तता लक्षात आल्याने औद्योगिकरणाची क्रांती युरोपात झाली. विज्ञानाची घोडदौड ही आता धर्म कालबाह्य करणार हे लक्षात आल्याने विज्ञान व धर्म (अध्यात्म) हे एकमेकांचे शत्रू नसून परस्पर पूरक आहेत अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली. जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथे अध्यात्माचा प्रांत चालू होतो ही मांडणी आता कमी होत चालली आहे. विज्ञान हे अंतिम सत्य ही देखील अंधश्रद्धाच
(छापील)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

10 Aug 2009 - 2:01 pm | अवलिया

नेहमीप्रमाणे गोलमटोल उत्तर देवुन विषयाला गुंडाळले. असो.

चालु द्या.... :)

--अवलिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2009 - 2:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'सायन्स अँड रिलिजन' नावाचे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, ते जरूर वाचा.

अदिती

विजुभाऊ's picture

10 Aug 2009 - 10:44 pm | विजुभाऊ

सायन्स अ‍ॅन्ड रिलिजन चा मराठी अनुवाद धर्म आणि विज्ञान या नावाने उपलब्ध आहे. या पुस्तकात ख्रिस्ती धर्मात असलेल्या चर्चने जोपासलेल्या श्रद्धा!यावर बराच उहापोह आहे. तरिही या पुस्तकातील उदाहरणे एकांगी वाटतात
"चार्वाक दर्शन" या आ ह साळुंख्याच्या पुस्तकात वैदीक धर्मियानी ज्ञानाचा/चिकित्सकतेचा कसा पद्धतशीर नायनाट केला त्याबद्दल उत्तम माहिती आहे

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

अवलिया's picture

10 Aug 2009 - 11:15 pm | अवलिया

आ ह साळुंखे ? बर बर
चालु द्या अगदी निवांत :)

--अवलिया

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 1:56 pm | JAGOMOHANPYARE

तुमची अनुदिनी पाहिली आणि मला चक्कर आली... अनिस पण आणि कुन्डली पण ..? तुम्हाला मल्टिपल पर्सोनॅलिटी डिसोर्डर आहे का ?

:)

ही तुमची अनुदिनी :

<<<<<<फलज्योतिष चिकित्सा मंडळ ही लग्न करु इच्छिणा-यांच्या ज्योतिष विषयक अडचणी समजून घेणारे, त्यावर व्यावहारिक तोडगे सांगणारी, संभ्रमावस्थेतील लोकांना तंत्रशुद्ध मार्ग दर्शन करणारी संस्था असल्याचे श्री प्रकाश घाटपांडे म्हणाले. विवाह समस्येने गतानुगतिक बनलेल्या समाजाच्या घटकांचे कोणत्याही पद्धतीने शोषण न होउ देता मार्गदर्शन करणे हेच या संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. >>>>>>>

अनिस ने अन्धश्रद्धा निर्मूलन कायद्याचा जो मसुदा तयार केलेला आहे, ( तोच, ज्याच्या मध्ये श्रद्धा आणि अन्ध श्रद्धा यांच्या व्याख्याच नाहीत !) त्यात ज्योतिष सांगणे/ ऐकणे/ पहाणे हेही अन्ध श्रद्देत घातले आहे, आपल्याला कल्पना आहे का ?

बाकी तुम्ही पॉलिटिक्स चान्गले खेळता हो! अनिस ची मदत घ्यायची आणि नाडी परीक्शा वाल्या ना अनिस कडून झोडपायचे .. स्वता मात्र कुन्डल्या बघायला मोकळे.... 'मोहरा' मधला नसिरुद्दीन चा रोल तुम्हाला द्यायला हवा होता ! :) ( दाभोळकर म्हणजे तुमचे सुनिल शेट्टी !!! )

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2009 - 2:05 pm | प्रकाश घाटपांडे

अनिस पण आणि कुन्डली पण ..? तुम्हाला मल्टिपल पर्सोनॅलिटी डिसोर्डर आहे का ?

हॅहॅहॅ . ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद वाचा अजुन चक्कर येईल.
(दुतोंडी)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 2:13 pm | JAGOMOHANPYARE

चक्कर आली... डोळ्यासमोर तारे ( आणि ग्रह देखील !) चमकले !!!

:)

माझ्या मित्राकडे एक सॉफ्ट वेअर आहे... त्यात माझे भविष्य मी पाहिले, त्याने सान्गितले आहे... हा माझा शेवटचा जन्म आहे आणि मग मला मोक्ष मिळणार आहे !... तेन्हा पासून मी आता भविस्ष्याची चिन्ता करायचे सोडून दिले आहे ! :)

विसोबा खेचर's picture

10 Aug 2009 - 11:31 pm | विसोबा खेचर

अनिस ची मदत घ्यायची आणि नाडी परीक्शा वाल्या ना अनिस कडून झोडपायचे .. स्वता मात्र कुन्डल्या बघायला मोकळे....

मग? मी काय बोल्लो होतो? साला हा घाटपांडे लै डेंजर मनुक्ष आहे! :)

'मोहरा' मधला नसिरुद्दीन चा रोल तुम्हाला द्यायला हवा होता ! ( दाभोळकर म्हणजे तुमचे सुनिल शेट्टी !!! )

हा हा हा! :)

आपला,
(रवीना प्रेमी) तात्या टंडन! :)

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

अभिज्ञ's picture

10 Aug 2009 - 12:38 pm | अभिज्ञ

कुठलेही कार्य तडीस नेण्यासाठी "श्रध्दा" पाहिजे.
त्या शिवाय दाभोळकरांना वा अंनिस ला त्यांनी हाती घेतलेले कार्य पुर्ण करता येणार नाही हे मात्र खरे.
;)
काय म्हणता?

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

पक्या's picture

10 Aug 2009 - 2:30 pm | पक्या

>>गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. ...त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती.

इथे अनिसला / दाबोलकरांना धर्मभावनांचे जे विकृतीकरण आणि त्यात आलेले राजकारण दिसत आहे त्याला त्यांनी विरोध करावा. बाकी सण आपण का साजरे करतो? त्याचे एक कारण म्हणजे आपल्या रटाळ जीवनातून /रहाटगाड्यातून , रोजच्या कामधंद्यातुन सुटका होऊन मौजमजा करता यावी, कुटुंबासमवेत , मित्रांसमवेत छान वेळ घालवता यावा हे तर आहेच. ह्यात अंधश्रद्धा कसली आलीय?
आणि सण तर प्रत्येक धर्मात आहेतच आणि इतर धर्मात ही सणातील काही बाबी सार्वजनिक रित्या साजर्‍या होतात. उदा. सांताक्लौजची परेड, इस्टर एग हंट.
जर सण साजरे करताना त्यात काही अनिष्ट गोष्टी घडत असतील तर त्यांना पायबंद जरुर घाला / चांगले बदल सुचवा पण त्यासाठी धर्माच्या उत्सवी पणावर टिका नको.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Aug 2013 - 9:43 am | प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा निर्मूलनाचे महाराष्ट्रातील प्रणेते डॉ नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली. या निमित्त दाभोलकरांचे विचार लोकांपर्यंत पोचावे हा धागा वर काढण्याचा हेतु.

कपिलमुनी's picture

21 Aug 2013 - 10:00 am | कपिलमुनी

तुम्ही सुद्धा ?
दाभोळकर ...
हिंदी चॅनेलवाल्यांसारखा दाभोलकर काय !

अप्रतिम's picture

21 Aug 2013 - 10:26 am | अप्रतिम

दाभोलकरच योग्य आहे.

दाभोलकर योग्य आहे. कोकणातील ब्राम्हण लोक दाभोलकर अस नाव वापरतात. व ईतर जातीतील लोक दाभोळकर अस नाव लावतात. दाभोलकर हे मुळचे दाभोली ह्या गावातले. त्यांचे वडिल सातार्‍याला जाऊन स्थायिक झाले होते.
गौड ब्राम्हण समाजातील होते.

प्रभाकर पेठकर's picture

21 Aug 2013 - 1:55 pm | प्रभाकर पेठकर

गौड ब्राम्हण समाजातील होते.

अरेरे! डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धे इतकाच जातपात पाळण्याविरुद्ध लढा दिला आहे. लोकांनी जातपात आणि धर्म विसरुन समाजाने एकोप्याने राहावे असे त्यांना वाटायचे. त्यांनी आपल्या एकुलत्याएक मुलाचे नांवही 'हमीद' असे ठेवले आहे.

पेस्तन काका's picture

21 Aug 2013 - 2:01 pm | पेस्तन काका

+१

दशानन's picture

21 Aug 2013 - 2:20 pm | दशानन

+१ असेच म्हणतो.

पेठकर सर, माफ करा पण त्यांचि जात सांगण्यामागे कारण हे की, आ़ज काल जो येतो तो ब्राम्हण समाजाला झोडपुन काढतो त्याना नाव ठेवतो. मला ऐकच सांगायच होत की ब्राम्हण समाजातील असुनही त्यानी हिंदुतील चुकीच्या प्रथांविरुद्ध लढा दिला व शेवटी आपला जींव हि देऊन ते अमर झाले.इतकच सर मला खरच जातीच राजकारण करायच नाही. खरच भावना दुखावल्या असतील तर मनापासुन माफी.

पिलीयन रायडर's picture

21 Aug 2013 - 2:20 pm | पिलीयन रायडर

सहमत..
मलाही तुमचा उद्देश गैर होता असे वाटले नाही.. तुम्हाला ल की ळ ह्यातला फरक सांगायचा होता आणि तोच मांडण्यासाठी तुम्ही तसे "सपोर्टींग स्टेटमेंट" केलेत असे मलाही वाटले..

पिलीयन रायडर जी, अतिशय खर बोललात तुम्ही. मी तुमचा आभारी आहे.

प्रभाकर पेठकर's picture

21 Aug 2013 - 2:26 pm | प्रभाकर पेठकर

नाही, नाही. भावना वगैरे कांही दुखावल्या नाहीत.

'दाभोलकर' की 'दाभोळकर' ह्याचा आंतरजालावर शोध घेत असता. डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धानिर्मुलना व्यतिरिक्त ( मला स्वतःला तेवढेच ठावूक होते.) इतर कार्याचीही माहिती मिळाली. त्यात जाती धर्माविरुद्ध त्यांच्या विचारांना त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात कृतीने जोड देताना आपल्या एकुलत्या एक मुलाचे नांव 'हमीद' असे ठेवल्याचे वाचले. ह्या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचा 'ब्राह्मण' हा उल्लेख, त्यांच्या विचारांविरोधात म्हणून, खटकला.

कोकणातील ब्राम्हण लोक दाभोलकर अस नाव वापरतात. व ईतर जातीतील लोक दाभोळकर अस नाव लावतात.

ह्या वाक्यात आलेला 'ब्राह्मण' हा शब्द खटकत नाही पण तुमच्या प्रतिसादाच्या शेवटी 'गौड ब्राम्हण समाजातील होते.' हे विधान अनावश्यक वाटले.

मलाही जातीचे राजकारण करायला आवडत नाही हे सहज नमूद असावे.

(आणि ते 'सर' कशाकरिता? नुसते 'प्रभाकर पेठकर' म्हणा किंवा मिपावर सर्वमान्य असणारे नांव, 'पेठकर काका' म्हणा.)

पेठकर काका, समजुन घेतल्या बद्दल मी खरच आभारी आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2013 - 11:14 pm | श्रीगुरुजी

हे जादूटोणा विधेयक नक्की काय आहे ते कधीच समजले नाही. जादूटोणाविरोधी, नरबळीविरोधी कलमे त्यात आहेत असे म्हणतात. पण वारकरी व अनेकांचा या विधेयकाला विरोध आहे. सरकारची सुद्धा या विधेयकाला मंजुरीसाठी विधिमंडळात हिम्मत झालेली नाही.

दाभोळकरांनी या विधेयकाचा संपूर्ण मसुदा एखाद्या मराठी वृत्तपत्रातून प्रसिद्ध करून व ते सविस्तररित्या स्पष्ट करून त्यावर वाचकांचे, संघटनांचे, वकीलांचे आक्षेप मागवून आक्षेपांवर खुलासा केला असता तर या विधेयकाचा विरोध नक्की कमी झाला असता. पण हे विधेयक नक्की काय आहे हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिले. त्याचे आधीचे नाव "अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक" होते, ते बदलून "जादूटोणा विरोधी विधेयक" असे केले गेले. या विधेयकानुसार सत्यनारायणीची पोथी वाचणे हासुद्धा गुन्हा ठरेल असे काही लेखातून वाचले होते. निदान मलातरी या विधेयकाचा नक्की मसुदा कोठेही वाचायला मिळालेला नाही. या विधेयकाचा मसुदा जाहीरपणे प्रसिद्ध करून त्यावर चर्चा झाली असल्यास मला त्याची माहिती नाही.

विकास's picture

22 Aug 2013 - 12:54 am | विकास

अनिंसच्या संस्थळावर त्यातील प्रमुख भाग ठेवला आहे. त्यातरी कुठे काही आक्षेपार्ह वाटले नाही.

प्रस्तावित कायद्याचा मसुदा माहीत नाही. पण तो न मिळण्यास पक्षी गुलदस्त्यात रहाण्यास दाभोलकर जबाबदार असण्यापेक्षा सरकार जबाबदार आहे असे वाटते.

त्या लिस्ट मधे दिलेली सगळी कलमे लागु करतो म्हटलं तर हा कायदा मुद्दलातच त्रुटी घेऊन येईल... शिवाय त्यात धार्मीक तणाव निर्माण करणारे एलिमेण्ट्स तर प्रचंड आहेत.

अर्धवटराव

विकास's picture

22 Aug 2013 - 6:30 am | विकास

मला त्या कायद्यात काही गैर वाटले नाही. त्यातील बहुतांशी कलमांचा नुसता श्रद्धा-अंधश्रद्धांशी संबंधच आहे असे नाही तर त्या शारीरीक आणि आर्थिक (+मानसीक) त्रास पण होणार्‍या गोष्टी आहेत. त्यातून माझ्या नजरेतून काही निसटले असले तर माहीत नाही. पण सर्व कायद्याच्या मसुद्यात आणि शब्दांमधे आहे... त्यामुळेच जरी सरकार वटहुकूम काढणार असे म्हणले असले तरी त्यात नक्की काय आहे हे पाहीले पाहीजे. कारण वटहुकूम तर अक्षरशः चर्चेशिवायच अधिकृत करता येऊ शकतो. (जरी त्याला नंतर विधीमंडळाची संमती लागत असली तरी..)

अर्धवटराव's picture

22 Aug 2013 - 7:26 am | अर्धवटराव

जि कलमं त्या लिस्ट मधे दिली आहेत त्यातले बरेचसे भीक नको पण कुत्रा आवर टाईपचे आहेत. शारिरीक वा मानसीक त्रास देणे, कुठल्याही बहाण्याने, तसंही बेकायदा आहे.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

22 Aug 2013 - 5:46 pm | संजय क्षीरसागर

1) to perform Karni, Bhanamati,
2) to perform magical rites in the name of supernatural power,
3) to offer ash, talisman, charms etc. for the purpose of exorcism and to drive out evil spirits or ghosts,
4) to claim possession of supernatural powers and to advertise this claim,
5) to defame, disgrace the names of erstwhile Saints/ Gods, by claiming to be there reincarnation and thus cheating the gullible and God-fearing simple folks.
6) to claim to be possessed by divine power or evil power and then perform miracles in the name of such powers.
7) to punish and to beat mentally ill patients in the belief that they are possessed by evil spirits.
to perform Aghori rites.
8.) to perform so called black magic and spread fear in society.
9) to perform "Gopal Santan Vidhi" to beget a male offspring.
10) to oppose scientific medical treatment and to coerce to adopt Aghori treatment.
11) to sell or deal in so-called magic stones, talisman, bracelets, charms.
12) to become possessed by supernatural powers and then pretend to give answers to any questions in this mental state.
13) to sacrifice innocent animals for the appeasement of gods or spirits.
14) to dispense magical remedies for curing rabies and snake bites.
15) to dispense medical remedies with claims of assured fertility.

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2013 - 6:22 pm | श्रीगुरुजी

>>> 4) to claim possession of supernatural powers and to advertise this claim,

कानात भिकबाळीसारखी एक रिंग घातली की मधुमेह बरा होतो असा एक डॉक्टरही जाहीरात देऊन प्रचार करतात. असे डॉक्टरही या कायद्यांतर्गत येऊ शकतील का? हैद्राबादमधील एक कुटुंब एक जिवंत मासा गिळायला लावून त्यामुळे दमा संपूर्ण बरा होतो. अशा लोकांना या कायद्याने प्रतिबंध करता येईल का? जर दैवी शक्तीने रोग बरा करण्याचा दावा करणे हा गुन्हा असू शकतो तर आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करून जगात कोठेही सिद्ध न झालेली उपचारपद्धती वापरून रोग बरा करण्याचा दावा करणे हे का बेकायदेशीर असणार नाही?

>>> 5) to defame, disgrace the names of erstwhile Saints/ Gods, by claiming to be there reincarnation and thus cheating the gullible and God-fearing simple folks.

पूर्वी होऊन गेलेल्या संतांचा आपण अवतार आहोत असा दावा करणारेच फक्त या कायद्याखाली येतील का अत्यंत गलिच्छ व शिवराळ भाषेत पुस्तके लिहून पूर्वीच्या संतांची लिखित बदनामी करणारे सुद्धा या कायद्याखाली येतील? संत श्री समर्थ रामदास यांच्याविरूद्ध अत्यंत खालच्या दर्जाचे लेखन करणारे ब्रिगेडी, खेडेकर, पोळके, कोकाटे इ. या कायद्याखाली अडकू शकतील का? पूर्वी होऊन गेलेल्या संतांचा आपण आधुनिक अवतार आहोत असे सांगणे ही संतांची बदनामी होऊ शकते तर पूर्वी होऊन गेलेल्या संतांविषयी अत्यंत गलिच्छ व शिवराळ लेखन असलेली पुस्तके प्रसिद्ध करणे हा का गुन्हा होऊ शकत नाही?

>>> 11) to sell or deal in so-called magic stones, talisman, bracelets, charms.

नवरत्नांचा प्रभाव सांगणारे असंख्य रत्नशास्त्री व ज्योतिषी आहेत व अशी रत्ने विकणारे असंख्य सोनार महाराष्ट्रात आहेत. या कायद्याने हे सर्वजण अडकतील का? यांच्याप्रमाणेच वास्तुशास्त्र व फेंगशुई च्या नावाखाली पिरॅमिड, प्रिझम इ. वस्तू विकणारे व आपल्या ज्ञानाची जाहिरात करणारे असंख्य जण आहेत. या कायद्यामुळे तेदेखील अडकू शकतील का?

>>> 13) to sacrifice innocent animals for the appeasement of gods or spirits.

हा सर्वात जबरदस्त मुद्दा आहे. हा मुद्दा या कायद्यात असेल तर जत्रेत/नवरात्रात कोंबड्या/बकरे बळी देणारे व ईदच्या दिवशी धर्माच्या नावाखाली लाखो बोकड कापणारे सर्वजण या कायद्यांतर्गत अडकतील. विरोध करणार्‍यांचा याच कलमाला सर्वाधिक विरोध असेल. हे कलम कायद्यात असेल तर उलटा प्रश्न हा येईल की जर धर्माच्या नावाखाली प्राणी मारण्यास विरोध असेल तर जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केल्या जाणार्‍या हत्या कशा समर्थनीय आहेत?

एकंदरीत या कायद्यातील वरील काही कलमे ही संदिग्ध आहेत व त्यांचे दूरगामी परीणाम होऊ शकतील. त्यामुळेच हा कायदा विधानसभेत मंजूर होताना दिसत नाही कारण वरील कलमांना सर्वांचाच विरोध असणार आहे.

विकास's picture

22 Aug 2013 - 9:07 pm | विकास

या सगळ्याचे थोडक्यात उत्तर दोन वाक्यांमधे मोडते: (१) म्हणूनच कायद्याचा मसुदा / भाषा काय आहे ह्यावर बरेचसे अवलंबून असणार. आणि (२) कायदा कितीही केला तरी जो पर्यंत कोणी तक्रार करत नाही तो पर्यंत पोलीस आपणहून जाऊन काहीच करणार नाहीत....

आता काही तुम्ही मांडलेल्या मुद्यांबाबत विस्तृतपणे, पण त्या आधी एक स्पष्टी़करणः वर मांडलेल्या कुठल्याही गोष्टी मी स्वतः करत नाही, करणार नाही आणि माझ्या जवळच्या व्यक्तींना करून देणार नाही. तरी देखील ते कायद्यात बसवताना त्याची भाषा कशी असेल यावरच सर्व अवलंबून असल्याने आणि मला ती भाषा तुर्तास माहीत नसल्याने, ढोबळ मानाने असा कायदा येणे योग्य आहे इतकेच तुर्तास म्हणेन. थोडक्यात मी त्या कायद्याला डिफेन्ड करण्यासाठी लिहीत नाही... त्याव्यतिरीक्त अंनिसबद्दल अथवा तत्सम सुधारणांबद्दल माझे मत काय आहे हे २००९ मधील वरील अनेक प्रतिसादात दिसेल.

१. वैद्यकीय उपचार पद्धती आणि त्यातील बनावट पणा. एकंदरीत "मेडीकल मालप्रॅक्टीस" हा प्रकार सुप्रिम कोर्टाने १९८६ पासून "कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट" अंतर्गत ठेवलेला आहे. त्यामुळे असल्या भानगडी त्याच पद्धतीने हाताळल्या जातात आणि जातील. पण सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, लोकशाहीत कायदा हा स्वतःलाच हातात घेऊन काही करू शकत नाही. त्यामुळे भिकबाळी आणि तत्सम संदर्भात कोणी तक्रार केली तर त्याला कायद्याने उत्तर देणे आत्ताही शक्य होईल. वेगळे उदाहरणच देयचे झाले तर हुंड्याचे देता येईल. आज हुंडाबंदी असली तरी आपण असे म्हणू शकतो का की हुंडा कोणी घेतच नाही म्हणून? मग तो कसा चालतो? कारण पोरीचा बाप मुकाट्याने देतो, पोलीसात जाऊन तक्रार करत नाही म्हणून... माझ्या आठवणीतील माहितीप्रमाणे लग्नानंतर सात वर्षाच्या आत अथवा लग्न झालेल्या ३०च्या आतील स्त्रीचा अनैसर्गिक मृत्यू झाला तर पोलीस हुंडाबळीच्या संशयाची सुई नवरा आणि सासू-सासरे आदींवर रोखू शकतात पण तसे होतेच का? प्रत्येक वेळेस पोलीसांना करायचे नसते असेच काही नसावे इतकेच तुर्तास म्हणेन.

२. कालौघात ज्यांचे संतत्व सिद्ध झाले आहे आणि टिकून आहे त्यांच्या नावाच्या गैरवापराबद्दल : परत कायदा हा "अंधश्रद्धा निर्मूलनासाठी" आहे. त्यामुळे त्यात ब्रिगेडी मंडळी बसू शकत नाही. त्यांना खरे म्हणजे आत्ता देखील जातीयवादाखाली जो काही कायदा असेल त्यात ओढता येईल. दाभोलकर हे जातपंचायतीच्या विरोधात काम करत होते/करू लागले होते. ह्या जात पंचायतींचे म्होरके कोण?

३. नवरत्नांचा प्रभाव सांगणारे ज्योतिषी, वास्तूशास्त्रवाले वगैरे त्याबाबत कायद्याची भाषा कशी असेल यावर अवलंबून राहील.

४. पशूबळी संदर्भात देखील कायद्याची भाषा कशी असेल यावर अवलंबून राहील असेच म्हणावेसे वाटते. जर धर्माच्या नावाखाली प्राणी मारण्यास विरोध असेल तर जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केल्या जाणार्‍या हत्या कशा समर्थनीय आहेत? इंटरेस्टींगली त्या पानावर विधेयकासंदर्भात कुठेही धर्म अथवा रिलीजन हा शब्द वापरलेला नाही... त्यामुळे मी असे गृहीत धरतो की खाणे आणि सणासुदीच्या वेळा या अपवाद म्हणून धरल्या गेल्या असाव्यात.

एकंदरीत या कायद्यातील वरील काही कलमे ही संदिग्ध आहेत व त्यांचे दूरगामी परीणाम होऊ शकतील. खरे आहे. तसे होऊ शकते नाही होईलच. पण प्रत्येक विधेयकाचा कायदा झाल्यावर त्यात सुधारणा (अमेंडमेंड) पण पाठोपाठ येतात, तसे होऊ शकेल.

अर्धवटराव's picture

22 Aug 2013 - 10:14 pm | अर्धवटराव

अंधश्रद्धा म्हटलं कि "मनाची विक्षीप्त अवस्था" हा तिचा भाऊ तिच्या पाठोपाठ येतो, व त्यामुळे गुन्ह्याची तीव्रताच बोथट होते. आपल्याकडे सुतावरुन स्वर्ग गाठणारे वकील त्याचा फायदा घेऊन गुन्हेगाराच्या शिक्षा डायल्युट करवतील. चोराला सरळ सरळ चोर म्हणुन गजाआड करण्याऐवजी त्याने कुठल्या भ्रमात येऊन हे कृत्य केलं असं म्हटलं तर वाजले ना बारा. सर्वात महत्वाचं म्हणजे या असल्या पळवाटेमुळे हा कायदा गमतीचा विषय होऊन बसेल व त्याचा थेट परिणाम अंधश्रद्ध निर्मुलन कार्यावर होईल. भ्रष्टाचारी माणुस "कायद्याने सिद्ध होऊ दे" म्हणुन राजरोस फिरतो. त्याच्यावर आरोप करायला निदान काहि ना काहि कागदपत्रांचा आधार तरी असेल... पण गुन्हेगारावर त्याच्या मनाच्या संदिग्धतेवरुन आरोप करतो म्हटलं तर काय कडबोळं होईल कायद्याचं.

अर्धवटराव

अर्धवटराव

विकास's picture

22 Aug 2013 - 11:01 pm | विकास

तुमचा प्रतिसाद वाचताना अजून एक गोष्ट लक्षात आली. (परत मसुद्यात काय लिहीलयं ते माहीत नाही त्यामुळे assuming संस्थळावरील मुद्देच आहेत आणि तशीच काहीशी भाषा आहे). अंनिसच्या संस्थळावरील मुद्यांमधील काही अपवाद वगळता फक्त सकर्मक शब्द फक्त खाली लिहीत आहे... ते वाचले तर लक्षात काय येते? तर बहुतांशी वेळेस अंधश्रद्धाळू व्यक्तीस गुन्हेगार ठरवले जाणार नसून एखाद्या व्यक्तीस अंधश्रद्धेच्या मार्गास लावणार्‍या व्यक्ती-संस्थेस गुन्हेगार समजले जाऊ शकेल. फक्त # ७, आणि १० मधे तुम्ही (अर्धवटराव म्हणतात तसे) "मनाच्या विक्षिप्त अवस्थेत" समोरच्या व्यक्तीस चोप दिला अथवा वैद्यकीय उपचार केले नाहीत असे म्हणता येईल. #१० मधे जो "गोपाल संतान विधी" म्हणलेले आहे त्यात नक्की काय भानगड आहे माहीत नाही. पण जर त्यात स्त्रीस काही (मुलगा होउंदेत म्हणत) त्रास होणार असेल तर त्यास देखील तो विधी सांगणारा आणि करणारा दोन्ही दोषी ठरले तर आश्चर्य वाटत नाही.

1) to perform 2) to perform 3) to offer 4) to claim 5) to defame, disgrace 6) to claim
7) to punish and to beat mentally ill patients in the belief that they are possessed by evil spirits.
to perform Aghori rites. 8.) to perform
9) to perform "Gopal Santan Vidhi" to beget a male offspring.
10) to oppose scientific medical treatment and to coerce to adopt Aghori treatment.
11) to sell or deal 12) to become possessed by 13) to sacrifice 14) to dispense
15) to dispense

बाकी राहीली पारंपारीक सवय. त्याला या निमित्ताने हात लावायचे डोक्यात असले तरी काही उपयोग नाही... कॉ. डांगे यांचे या संदर्भात एकदा वाचल्याचे आठवते. त्यांना स्टॅलीनने भारतात (निधर्मी) कम्युनिझम आणण्याच्या भानगडीत पडू नको असे सुचवले होते. कारण अठरापगड जातींचा हा देश कधीच बदलणार नाही असे त्याचे मत होते. तसेच अजून एक रोचक उदाहरण देतो... इराण या देशाचे अधिकृत नाव देखील "इस्लामिक रिपब्लीक ऑफ इरान" असे आहे. तेथून पारश्यांना हाकलून लावल्याचे पण सगळ्यांना माहीत असते. तरी देखील आजही त्या देशात (आणि इराणी समाजात) पारशी नवरोज हेच नववर्ष मानले जाते आणि त्याची १३ दिवस अधिकृत सोहळ्यासाठी सुट्टी असते!

अर्धवटराव's picture

22 Aug 2013 - 11:43 pm | अर्धवटराव

बापु उवाचः
मला स्वप्नदृष्टांत झाला कि माझ्या देहात विष्णू भगवान प्रवेश करते झाले. आता मी हि गोष्ट जाहिर करणार. मी कायद्यानुसार काहि गुन्हा केला का? माझ्या मनाच्या विक्षीप्त अवस्थेत मी बुवाबाजी केली आहे. मी स्वतःच अंधश्रद्धेचा बळी आहे.

मला अगदी मनापासुन खात्री आहे कि कुणीतरी माझ्या कानात समोरच्या व्यक्तीचं भविष्य, रोगावर इलाज, धनप्राप्ती बद्दल सांगुन जातं. मी फक्त मॅसेज कन्व्हे करतो. मी स्वतःच व्हीक्टीम आहे अंधश्रद्धेचा.

आता या बापुला कायदा कसा पकडणार?

अर्धवटराव

विकास's picture

23 Aug 2013 - 12:03 am | विकास

जर बापू या निमित्ताने खिसेकापूचा धंदा करत असेल तर व्हिक्टीम नाही कॉन्स्पिरेटर आहे. तुम्ही म्हणता त्या संदर्भात नवरात्रात (आणि इतर काही वेळेस विशिष्ठ पुजाअर्चांना) अंगात येणार्‍या, घागर फुंकणार्‍या स्त्रीया येऊ शकतील (ज्यांच्या त्या दिवशीच्या, नवरात्रात अष्टमीच्या रात्रीच्या प्रचंड उर्जेचे मला आजही आश्चर्य वाटते). कारण त्यात त्या काही पैसे घेत नाहीत अथवा इतर वेळेस कायम स्वरूपी त्या देवत्व येण्याचा धंदा करत नाहीत.

अर्धवटराव's picture

23 Aug 2013 - 12:20 am | अर्धवटराव

"भक्त" स्वखुशीने पैसे देतो. त्यामुळे कुठलाच कायदा बापुंचा खिसेकापुपणा सिद्ध करु शकत नाहि. फार फार तर बापुंच्या इन्कमवर टॅक्स लावल्या जाऊ शकतो.
भक्ताच्या या स्वखुषीशिवाय जर खिसेकापुपणा सिद्ध होत असेल तर त्याला अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचं काय प्रयोजन? खिसे कापणे, कुठल्याही प्रकारे, तसंही गुन्हा आहे. आणि तो तसाच शिक्षेस पात्र असायला हवा.

एक लक्षात घ्या... या कायद्याचा सर्व भार दोन बाबींवर अवलंबुन आहे:
१) बापुंना व्यवस्थीत माहित आहे कि तो खोटं बोलतोय
२) ते माहित असुनही बापु आपला खोटेपणा भक्तांना विकतोय, भक्त स्वतः ते विकत घेत नाहिए.
दोनपैकी एक जरी पॉईण्ट सिद्ध झाला नाहि तर कायदा लंगडा पडेल. तसं आपल्याकडे एखादा कायदा लंगडा पडणं नविन नाहि... पण एकदाका कायद्याने बापुला गुन्हेगार सिद्ध करता आलं नाहि तर त्याची "आमचे काम कायदामान्य आहे" अशी जाहिरात होईल, व त्याचा सरळ फटका अंधश्रद्धा निर्मुलन आंदोलनाला बसेल.

छडीने मारुन शिस्त बाणवायची असेल तर छडी मोडता कामा नये. अन्यथा बेशिस्तीला मान्यतेचं अधिष्ठान मिळतं. आज गुन्हेगारी राजकारणात ठाण मांडुन बसली आहे त्याचं हेच कारण आहे. कायदामान्य अंधश्रद्धा तर समाजाची काय वाट लावेल.

अर्धवटराव

विकास's picture

23 Aug 2013 - 12:40 am | विकास

पण एकदाका कायद्याने बापुला गुन्हेगार सिद्ध करता आलं नाहि तर त्याची "आमचे काम कायदामान्य आहे" अशी जाहिरात होईल, व त्याचा सरळ फटका अंधश्रद्धा निर्मुलन आंदोलनाला बसेल.

मुद्दा आवडला. तसे देखील कायद्यातून पळवाटा काढणारे असतातच. त्यामुळे अंनिस चळवळीस जरा फटका बसून त्यांना पण विचार करायला लागला तरी काही फरक पडत नाही.

"भक्त" स्वखुशीने पैसे देतो. त्यामुळे कुठलाच कायदा बापुंचा खिसेकापुपणा सिद्ध करु शकत नाहि. फार फार तर बापुंच्या इन्कमवर टॅक्स लावल्या जाऊ शकतो.

तुमच्या आधीच्या प्रतिसादाच्या संदर्भात जेंव्हा एखादा बापू एखादी सिस्टीम तयार करून अंगात देव, हातात ताईत घेऊन भक्ताच्या मागे जाईल तेंव्हा तांत्रिक दृष्ट्या त्याला वेडं ठरवणे अवघड जाईल. आणि तसे ठरवले गेले त॑र त्याला कायमचे अवघड जाईल. कारण खरेच वेड्यांच्या बाजारात त्याला बुवाबाजी करत बसावी लागेल आणि तिथले वेडे त्यासाठी खुळे नसावेत. ;)

अर्धवटराव's picture

22 Aug 2013 - 6:33 pm | अर्धवटराव

त्यातले बरेचस्र मुद्दे फ्रॉड, खोट्या मेडीकल प्रॅक्टीस वगैरे कायद्यात अगोदरच कव्हर झालेत. पशुबळी वगैर गोष्टी 'त्यांच्या बकरा ईद ला हात लाऊन दाखवा' अशा टाईपच्या धार्मीक टेन्शन वाढवणार्‍या आहेत, गंडे-ताईत प्रकार पण त्याच पद्धतीचा आहे.

नरबळी त्यात दिलेलं नाहि, पण नरबळीला अंधश्रद्धेचा कायदा लावणे म्हणजे कसाबला अनस्टेबल मेण्टल स्टेटचा अधार देणे झाले... नरबळी सरळ सरळ सदोष मनुष्यवध आहे व त्याकरता ३०२ लावणे हेच उत्तम.

अर्धवटराव

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2013 - 6:40 pm | श्रीगुरुजी

>>> त्यातले बरेचस्र मुद्दे फ्रॉड, खोट्या मेडीकल प्रॅक्टीस वगैरे कायद्यात अगोदरच कव्हर झालेत.

याविरूद्ध आधीच कायदे आहेत का या नवीन जादूटोणा कायद्यात या गोष्टींविरूद्ध कलमे आहेत? जर आधीचेच कायदे असतील तर त्या कायद्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

>>> पशुबळी वगैर गोष्टी 'त्यांच्या बकरा ईद ला हात लाऊन दाखवा' अशा टाईपच्या धार्मीक टेन्शन वाढवणार्‍या आहेत, गंडे-ताईत प्रकार पण त्याच पद्धतीचा आहे.

पशुबळी म्हटल्यावर जत्रेत देवीला दिलेले बळी किंवा मशिदीत मारलेले बळी याच्यात भेद करता कामा नये कारण दोन्हीमध्ये धार्मिक कारणावरून प्राणीहत्या केली जाते. पण तरी शेवटी प्रश्न राहतोच की धर्माच्या नावाखाली केलेली पशुहत्या आणि आहाराच्या नावाखाली केलेली पशुहत्या यात फरक काय? एकावर बंदी व दुसर्‍या प्रकाराला मान्यता हा विरोधाभास आहे.

>>> नरबळी त्यात दिलेलं नाहि, पण नरबळीला अंधश्रद्धेचा कायदा लावणे म्हणजे कसाबला अनस्टेबल मेण्टल स्टेटचा अधार देणे झाले... नरबळी सरळ सरळ सदोष मनुष्यवध आहे व त्याकरता ३०२ लावणे हेच उत्तम.

सहमत. नरबळी हा सहेतुक खुनाचाच गुन्हा आहे.

विकास's picture

22 Aug 2013 - 9:19 pm | विकास

नरबळी हा सहेतुक खुनाचाच गुन्हा आहे.

नरबळीस सहेतुक गुन्हा मानण्यास कोर्टाचे आधीचे निकाल ("case law") आहेत. "मानवत हत्याकांड" हा महाराष्ट्रास काळीमा लावणारा नरबळीचा प्रकार ४० एक वर्षांपूर्वी झाला होता. त्यातील एका पोलीस प्रमुखाचे भाषण नंतर अनेक वर्षांनी गणेशोत्सव अथवा नवरात्रोत्सवात ऐकल्याचे आठवते. लहान असल्याने त्यावेळेस ही पण आत्ता देखील अंगावर काटा येईल असले घॄणास्पद कृत्य त्यातील आरोपींनी केले होते. आत्ता जालावर शोधले तेंव्हा त्यावरील हा लेख मिळाला. त्यातील प्रमुख आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि सहआरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली.

सुनील's picture

23 Aug 2013 - 8:25 am | सुनील

धर्माच्या नावाखाली केलेली पशुहत्या आणि आहाराच्या नावाखाली केलेली पशुहत्या यात फरक काय?

पशुहत्या ही खाण्यासाठीच केली जाते ;)

म्हणून तर (धर्माच्या/प्रथेच्या नावाखालीदेखिल) कोंबडी, बकरे अशा पशूंचाच बळी दिला जातो. मनुष्य सहसा खात नसलेल्या पशूचा बळी दिलेला पाहिला आहे कधी? ;)

जोवर प्रत्यक्ष कायद्यात काय भाषा वापरली आहे ते समजल्याविना निष्फळ चर्चा करण्यात अर्थ नाही.

असो.

चौकटराजा's picture

22 Aug 2013 - 10:00 am | चौकटराजा

कायदा नीट समजून अंमल बजावणी होत असेल तरच कायद्याचा उपयोग असतो. शेषन यांच्या अगोदरच्या आयुक्तानी हा अर्थ कधी समजूनच घेतला नाही. शेषन यानी कोणताही नवीन कायदा आणला नाही.फक्त उपलब्ध कायद्याचा पाठपुरावा केला. म्हणूनच व तरीही शेषन आज जिवंत असूनही भारतीय मनांत अजरामर झालेले आहेत. त्याच प्रमाणे आजच्या भारतीय दंडविधानातील अनेक कलमांचा उपयोग करून अघोरी प्रथांवर मात करता येईल. पण पोलीस खात्याचा बेसच मुळी तक्रार येणे असा असल्याने आपण होऊन पोलीस समाजसुधारणेसाठी कायद्याचा उपयोग करण्यासाठी आणखी शंभर वर्षे जावी लागतील.

ऋषिकेश's picture

22 Aug 2013 - 10:23 am | ऋषिकेश

नाही पटले.
शेषन यांचे उदाहरण गैर लागू आहे. त्यांनी जे केले ते "निवडणूक आयुक्त" या 'घटनात्मक पदावरून' केले (अर्थात ते तेव्हा सरकारी 'नोकर' नव्हते). ते स्वतः इतर पदांवर तितकेसे प्रभावी नव्हते.

दुसरे असे की शेषन काय किंव इतर तत्सम कुणी काय नवे काय्दे आणू शकत नाही - आणूही नये. ते काम केवळ जनतेच्या प्रतिनिधींनीच केले पाहिजे आणि तेच योग्य आहे.

त्याच प्रमाणे आजच्या भारतीय दंडविधानातील अनेक कलमांचा उपयोग करून अघोरी प्रथांवर मात करता येईल.

कोणत्या?

पण पोलीस खात्याचा बेसच मुळी तक्रार येणे असा असल्याने आपण होऊन पोलीस समाजसुधारणेसाठी कायद्याचा उपयोग करण्यासाठी आणखी शंभर वर्षे जावी लागतील.

गैरसमज आहेत. काही गुन्हे असे आहेत जे घडल्याचे कळताच्ग तक्रारीची वाट न बघता पोलिसांना FIR देणे आवश्यक असते. प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यासाठी असे होणे शक्य नाही आणि योग्यही नाही!

राही's picture

22 Aug 2013 - 10:58 am | राही

या जुन्या धाग्याच्या निमित्ताने दोन गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे मिपावर त्यावेळी आणि आता प्रकट होणारी मते यात संख्यात्मक आणि विचारात्मक झालेला बदल. अमुक एका विचारांच्या सभासदांची संख्या वाढल्यामुळे हे झाले असावे. दुसरे म्हणजे त्या वेळी दाभोलकरांच्या सर्व कार्याविषयी नसलेली माहिती. अंधश्रद्धाविरोध या कार्यामुळे जरी त्यांना माध्यमप्रसिद्धी लाभली असली तरी त्यांची देवदासी आणि वाघ्यामुरळी प्रथानिर्मूलन तसेच एक गाव एक पाणवठा ही कामे अधिक व्यापक आणि अधिक यशस्वी होती. देवदासी प्रथा तर आज महाराष्ट्रात नष्टप्राय आहे. पुणे जिल्हा किंवा जवळपास एका दर्ग्याजवळ एक भली मोठी शिळा आहे. ती काही माणसांना केवळ एक अंगळी लावून उचलता येते या अंधश्रद्धेला आव्हान देऊन अंनिस.ने मोठाच विरोध ओढवून घेतला होता. 'साधना' चे संपादकत्व बरीच वर्षे समन्वयाने त्यांनी चालवले. (समाजवादी आणि समन्वय-- विचार करा किती कठिण!). ते आणि त्यांचे विस्तारित कुटुंब हे सर्व 'सोशल रीफॉर्मर्स होते/आहेत. १९२५ ते १९७५ या दरम्यान कर्वे-परांजपे परिवाराने महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेत जशी मोलाची भर घातली, (आणि आजही घालीत आहेत,) जवळपास तसेच कार्य हा दाभोलकर परिवार १९६०पासून आजतागायत करीत आलेला आहे. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळ्या क्षेत्रात असले तरी महत्त्वाच्या कामात सर्वांची मदत असते.स्वातंत्रानंतरच्या पहिल्या दशकात हिरीरीने समाजकार्यात उतरलेला हा गट आहे. हे भरीव कार्य सगळ्यांना माहीत असतेच असे नाही.

+१११११११११११११११११११११११११११.

दाभोळकरांचे हे कार्य नक्कीच अतिमहत्त्वाचे आहे.

चौकटराजा's picture

23 Aug 2013 - 10:03 am | चौकटराजा

आम्ही काही मित्र एकदा बोटाने दगड उचलला जाणार्‍या ठिकाणी गेलो होतो. पहिल्या प्रयत्नात मी व अपरिचित चार जण
अशा पाचांनी दगड उचलला. मग मी माझ्या बरोबरच्या पाच मित्राना बाजूल घेतले व नुसतेच बोट लावा काही करू नका असे सांगितले. दगड जागचा जाम हलेना.
यातून माझ्या वेळेस अपरिचित असलेले ते कोण असावेत? एखादी सिद्धी प्राप्त झालेले भाग्यवान की रस्त्यावर ताईत विकणार्‍याचे ताईत विकत घेणारे त्याचे साथीदार ?

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या.
--------------------------------------------------------------
सुरवातिपासुनच त्यांनी जर नि:पक्षपातीपणाचे धोरण अवलंबले असते ,
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात गफलत न करता काम केले असते,
सरसकट संपुर्ण धर्माला टार्गेट केले नसते,...
अंधश्रद्धा निर्मुलनाच्या क्षेत्रामध्ये सर्वच धर्मांसाना समाविष्ठ केले असते,
अनेक प्रकरणांमध्ये खोटेपणा केला नसता
.
.
.
तर कदाचीत आजची वेळ त्यांच्यावर आली नसती !!

तरिही,
दाभोळकर हे एक सच्चे देशभक्त होते,
अंधश्रद्धा समाजातुन नष्ट व्हावी अशी त्यांची मनापासुन तळमळ होती,
त्यांनी हिंदु धर्मातील अनेक ढोंगी आणि धर्माच्या नावावर पोटे भरणार्‍या दललांना त्यांची जागा दाखवुन दिली होती.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो , ही परमेश्वराचरनी प्रार्थना ! दाभोळकरांसारखा वैचारीक विरोधक लाभणे ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे !

बॅटमॅन's picture

22 Aug 2013 - 4:49 pm | बॅटमॅन

आँ?????

हे नक्कीच सनातन प्रभात किंवा तत्सम लोकांचं अपडेट असणार.

ज्या मित्राने हे लिहीलय तो थोडा डोक्यावर पडलेला आहे.. त्याने हे चोप्य पस्ते केलं आहे असं वाटतय.. मी त्याला थोड्या शिव्या घालुन आलेय.. पण नक्की काय खोटेपणा केलाय ते मी विचारलं नाहि.. :(

पण नक्की काय खोटेपणा केलाय ते मी विचारलं नाहि..

आणि विचारलं असतं तरी घंटा काही उत्तर मिळालं नसतं हा भाग अलाहिदा.

पिलीयन रायडर's picture

23 Aug 2013 - 10:54 am | पिलीयन रायडर

विचारलं.. चांगलं खडसावुन विचारलं.. तर उत्तराच्या ऐवजी "गीता वाचा.. शुद्ध सात्विक देव म्हणजे काय तुम्हाला कळलंच नाहिये" असं काही तरी बरळणे चालु आहे. मी मुद्द्यवरुन भरकटु न देता "दाभोळकर खोटारडे आणि पक्षपाती कसे ते सांग आधी" हा एकच प्रश्न रेटत आहे.. बघु काय उत्तर देतो ते..
आणि कायद्या विषयी तर फार घोळ चालु आहे.. म्हणे की "जर हा कायदा आला तर देव मनल्या बद्दल पण तुरुंगवास होऊ शकतो"... काय बोलणार ह्यावर?

बाळ सप्रे's picture

23 Aug 2013 - 11:31 am | बाळ सप्रे

शुद्ध सात्विक देव

म्हणजे देवात पण शुद्ध-अशुद्ध, सात्विक-तामसिक भेदभाव??
कमाल आहे!! :-)

प्रभाकर पेठकर's picture

23 Aug 2013 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर

मला वाटतं शंकर महादेव हे तामसी वृत्तीचे देव असावेत.

बाळ सप्रे's picture

23 Aug 2013 - 12:22 pm | बाळ सप्रे

म्हणजे त्या व्यक्तिसाठी शंकराचे रँकींग खूपच खाली असेल नाही!! :-)

मदनबाण's picture

23 Aug 2013 - 12:52 pm | मदनबाण

मला वाटतं शंकर महादेव हे तामसी वृत्तीचे देव असावेत.
हॅहॅहॅ मग त्यांना भोलेनाथ का बरं म्हणत असावेत ? ;)

विकास's picture

23 Aug 2013 - 5:17 pm | विकास

शंकर महादेवन वाचले आणि अंमळ गडबडलो! :)

ही डोक्यावर पडलेली लोकं अशीच असतात. त्यांना कोंडीत पकडताय ते चांगलंच आहे.

तरी हे वायझेड लोक काही सुधारणार नाहीत हेही तितकंच खरं. :(

पिलीयन रायडर's picture

23 Aug 2013 - 12:06 pm | पिलीयन रायडर

नरेन्द्र दभोलकर की हत्या कहीं खान्ग्रेस और एनसीपी के द्वारा पूर्व नियोजित षडयंत्र द्वारा की गयी है इसाई मिशनरीयो के इशारे पे। ????????????

निष्कर्ष तक पहुचने क...े कारण :-

1) हत्या के तुरंत बाद से ही सारे मराठी चैनल्स पे सिर्फ नरेन्द्र दभोलकर के प्रोग्राम ही दिखाए जा रहे हैं और हत्या के लिए सीधे सीधे बिना किसी सबूत या साक्ष्य के सनातन संस्था, हिन्दू जनजाग्रति व् अन्य सनातनी संस्थाओ को दोषी बताया जा रहा है जबकि पुलिस ने अभी तक इस मामले पे कोई आधिकारिक बयान नही दिया है।

2) हत्या के तुरंत बाद ही आनन् फानन में अंध्श्रधा उन्मूलन कानून बिना किसी चर्चा के पास करके गवर्नर के पास भेज दिया गया है। ये महाराष्ट्र चुनाव से पहले हिन्दुओ को बाटने और मुस्लिम-इसाई तुष्टिकरण का षडयंत्र है।

3) हत्या के तुरंत बाद ही दभोलकर समर्थको के भेष में खान्ग्रेस और एनसीपी के कार्यकर्ताओ ने महाराष्ट्र में उत्पात मचाना शुरू कर दिया और पुणे बंद का एलान कर दिया गया।

इस कानून का पास हो जाना भारत में सनातन धर्म पे सबसे बड़ी चोट होगी क्यूंकि महाराष्ट्र में पास होते ही अन्य राज्यों में बिल पास होने के दरवाजे खुल जायेंगे। ये कानून केवल हिन्दू रीती रिवाजों को कवर करता है, इस कानून में हाथ पे कलावा बांधना, टीका लगाना, हवन करना, सत्यनारण का पाठ करना जैसी हिन्दू रीतियो को ढोंग बताया गया है और इन सब के लिए 7 साल तक की सजा है। इस्लाम और ईसाइयत को इस कानून में पूरी छुट है।

अंध्श्रधा उन्मूलन कानून बनाने वाले नरेन्द्र दभोलकर को भाई राजीव दिक्षित ने काफी समय पहले expose किया और बताया है की किस तरह दभोलकर को विदेशो से पैसा लेकर केवल सनातन धर्म के खिलाफ कार्य करता था और इस दभोलकर के बेटे का नाम हमीद है और वो इस्लाम कबूल कर चूका है।

हम सब को मिलकर एक स्वर में इस कानून का विरोध करना होगा अन्यथा वो दिन दूर नही जब हाथ जोड़कर प्रार्थना करना भी ढोंग बता के आपको जेल में ठूस दिया जायेगा।

आपके मन मे सवाल आएगा कि आखिर ऐसा क्या है इस अंधश्र्धा निर्मूलन कानून मे जो सब हिन्दू इसका विरोध कर रहें है ????

एक बार यहाँ जरूर जरूर click कर देखें !

http://www.youtube.com/watch?v=Lw7ZNxnllGM

हर हर महादेव
---------------------------------------------------------------------------
प्लिझ कुणीतरी त्या विडिओ मध्ये काय आहे हे सांगाल काय? तुनळी बॅन आहे इथे..

पुष्कर जोशी's picture

23 Aug 2013 - 6:50 pm | पुष्कर जोशी

बापरे हा ३तास २६ मिनिटांचा विदेओ आहे ... त्या ऐवजी हा पहा

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2013 - 12:43 pm | श्रीगुरुजी

अजून एक कायदेशीर शंका

>>> 9) to perform "Gopal Santan Vidhi" to beget a male offspring.

हा "गोपाळ संतान विधी" नक्की काय आहे हे मला माहिती नाही. हा विधी नक्की कोण करतात व कोण हा विधी करून घेतात हे देखील मला माहिती नाही. बहुतेक आपल्याला "मुलगाच" व्हावा यासाठी विवाहीत जोडपी हा विधी करून घेत असावीत असे वाटते.

कायदेशीरदृष्ट्या पाहिले तर "मुलगाच" व्हावा ही इच्छा बेकायदेशीर किंवा घटनेविरूद्ध कशी ठरते? गर्भ मुलीचा असल्यास मुलगी नको या एकमेव कारणास्तव मुद्दाम कोणतेही वैद्यकीय कारण नसताना गर्भपात करणे मुलीचा गर्भ नष्ट करणे हे नक्कीच बेकायदेशीर व अत्यंत नीच कृत्य आहे. पण एखाद्या जोडप्याने आम्हाला मुलगाच हवा अशी इच्छा व्यक्त करणे व त्यासाठी गोपाल संतान विधी करणे हे कसे बेकायदेशीर ठरू शकेल? मुळात "मुलगाच हवा" ही इच्छाच घटनेनुसार बेकायदेशीर ठरते का?

सूचना - कृपया मी "मुलगाच" हवा याचे समर्थन करत आहे असा अजिबात गैरसमज करून घेऊ नये. मला दोन मुली आहेत व त्या दोघी माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत. "मुलगाच" हवा असा विचार माझ्या मनात कधीही निर्माण झाला नव्हता. फक्त या जादूटोणा कायद्यातून ज्या पळवाटा निघू शकतील असे मला वाटते ते मी लिहीत आहे.

बाळ सप्रे's picture

23 Aug 2013 - 12:57 pm | बाळ सप्रे

"गोपाळ संतान विधी" नक्की काय आहे हे मलादेखिल माहिती नाही. पण तुमच्या अंदाजाप्रमाणे असल्यास..
असा विधी करुन मुलगा होईल असा क्लेम करणारा जो यातून जोडप्यांची आर्थिक फसवणूक करतो त्याला शिक्षा करणे हा हेतु आहे.. जोडप्यांना आत टाकणे हा हेतु नाही.. यातुन जोडप्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे ही अपेक्षा आहे.. आणि असा विधी करुन असे होते असा विचार पसरवणार्‍यांवर चाप बसवणे हा हेतु आहे.

येथे हा विधी दिलेला दिसतोय. बहुदा हा उत्तरेकडील प्रकार असावा. मिपा काही १००% प्रातिनिधिक आहे असे म्हणायचे नाही. पण येथे देखील जर कोणालाच हा विधी ऐकून देखील माहीत नसला तर त्याचा अर्थ हे प्रकरण महाराष्ट्रात एकदम कमीत कमी होत असावे असे वाटते...

फक्त मुलगाच होउंदेत असे वाटणे योग्य नसले तरी, हा गुन्हा ठरू शकत नाही. बर बाकी वर दुवा दिलेल्या संस्थळावरील विधी म्हणजे कुठल्यातरी प्रकारातली पुजा आणि जपजाप्य आहे. त्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर सर्वच पुजा-अर्चांवर घ्यावा लागेल. त्यामुळे काहीतरी खरेच कारण असावे अथवा उगाच काहीतरी घुसडले असावे अशी दोनच टोके दिसतात.

अनिरुद्ध प's picture

23 Aug 2013 - 6:58 pm | अनिरुद्ध प

दुवा वाचला तसेच विधी हा सर्वसामान्य शान्ती विधी सारखा वाटला यात अघोरि असे काही आढळले नाही याचा एव्हडा बागुलबुवा का करण्यात यावा हे अनाकलनीय आहे, की अनिस ला दुसरा कुठला विधी अपेक्षीत असावा हे कळत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Apr 2015 - 8:15 pm | प्रकाश घाटपांडे

विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते कि माणस अंधश्रद्ध असतात कारण त्यांची ती गरज असते. संदर्भ- तिमिरातून तेजाकडे ले. डॉ नरेंद्र दाभोलकर
माझ्या माहिती प्रमाणे हे त्यांनी होनी अनहोनी या तेंडुलकरांच्या दूरदर्शनवरील मालिके च्या संदर्भात अंनिस ने आंदोलन केले होते त्यावेळी कुठ तरी म्हटले होते. अधिक माहिती कुणाला इथे आहे का?