गेट वे,झवेरी स्फोटःतिन्ही दोषींना फाशी

विकास's picture
विकास in काथ्याकूट
6 Aug 2009 - 6:25 pm
गाभा: 

सकाळी सकाळी इथल्या रेडीओवर पण ऐकले आणि आत्ता म.टा. मधे पण वाचले:

गेटवे ऑफ इंडिया आणि झव्हेरी बाजार येथे २००३ साली बॉम्बस्फोट घडवून ५२ जणांचे बळी घेणा-या आणि शेकडोंना जखमी करणा-या हनीफ सय्यद अनीस , त्याची पत्नी फहमिदा आणि अशरत अन्सारी यांना विशेष पोटा कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली.

आता मानवतावाद्यांनी यांचापण अफझल गुरू केला नाही म्हणजे मिळवले...

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

6 Aug 2009 - 6:37 pm | आनंदयात्री

समस्त भारतियांचे अभिनंदन.

>>आता मानवतावाद्यांनी यांचापण अफझल गुरू केला नाही म्हणजे मिळवले...

असेच म्हणतो.

राजू's picture

6 Aug 2009 - 6:39 pm | राजू

आता मानवतावाद्यांनी यांचापण अफझल गुरू केला नाही म्हणजे मिळवले...
या मानवतावाद्यांना मानवतेचा पुळका फक्त असल्या नराधमांना शिक्शा केल्यावरच का फुटतो?
यांना बाँबस्फोटात बळी गेलेल्या सर्वसामान्यांचे काहिही वाटत नाही का? X( X(

_____________________
आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.

राजू's picture

6 Aug 2009 - 6:39 pm | राजू

आता मानवतावाद्यांनी यांचापण अफझल गुरू केला नाही म्हणजे मिळवले...
या मानवतावाद्यांना मानवतेचा पुळका फक्त असल्या नराधमांना शिक्शा केल्यावरच का फुटतो?
यांना बाँबस्फोटात बळी गेलेल्या सर्वसामान्यांचे काहिही वाटत नाही का? X( X(

_____________________
आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.

निखिल देशपांडे's picture

6 Aug 2009 - 6:39 pm | निखिल देशपांडे

शिक्षा सुनावली हो पण फाशी होणार का???
२००३ च्या स्पोटाचा निकाल २००९ ला म्हणजे कसाबला शिक्षा सुनवायलाच २०१५ उजाडणार... तो पर्यंत द्या त्याला मांसाहारी आहार...

निखिल
================================

विकास's picture

6 Aug 2009 - 6:48 pm | विकास

२००३ च्या स्पोटाचा निकाल २००९ ला म्हणजे कसाबला शिक्षा सुनवायलाच २०१५ उजाडणार... तो पर्यंत द्या त्याला मांसाहारी आहार...

खरे आहे. असे होऊ शकते. तो त्रागा कुणाचाही होतो, माझा देखील होतो. मात्र लोकशाहीतील न्यायपद्धतीस अनुसरून हे होत आहे. त्याला पर्याय नाही. जर त्यात राजकारण करू लागले (जे अफझलगुरूच्या बाबतीत होत आहे) तर ते अमान्य आहे.

निखिल देशपांडे's picture

6 Aug 2009 - 7:02 pm | निखिल देशपांडे

खटल्याचा निकाल लोकशाही मार्गाने देण्यास जर वेळ लागत असेल तर ते एक वेळ मान्य होवु शकते. पण रोज जर उठुन त्या अतिरेक्याला हे पाहिजे ते पाहिजे असे झाल्यावर त्रागा हा होतोच. आता अफजल गुरुच्या बद्दल काय बोलणार त्यात तर नुसते राजकारण आहे.

निखिल
================================

प्रदीप's picture

6 Aug 2009 - 7:25 pm | प्रदीप

लोकशाहीतील न्यायपद्धतीस अनुसरून हे होत आहे. त्याला पर्याय नाही.

ब्रिटन (व मला वाटते अमेरिका) ह्यांनी दहशवादाचे आरोप असलेल्या केसेस हाताळण्यासाठी वेगळे कायदे केले व अंमलातही आणले. त्यामुळे २००५ साली झालेल्या लंडन बॉंबस्फोटाचा निकाल २००८ मधे लागलाही. आपल्यात राजकिय इच्छाशक्ति नाही हेच खरे.

तेव्हा आता ह्या निकालाविषयीही काहीही फार प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे असे वाटत नाही. फार तर फार पूर्वी रस्त्यांवर मदारी अस्वल अथवा माकडे घेऊन काही खेळ करून दाखवत, व त्या बिचार्‍या जनावराच्या प्रत्येक करामतीनंतर 'बच्चे लोग, टाली बजाव' असे सांगत. मग आम्ही सगळे बच्चे मंडळी टाळ्या वाजवत असू. आताही कुठे कुठे नव्या रूपात तेच होते, फक्त मदारी व माकडे बदलली, आणि भाषा बदलली. तेव्हा आता 'ह्याच्यावर एकदा जोरदार टाळ्या होऊन गेल्या पाहिजेत' असे असते.

थेट त्याच चालीवर, "आता ह्याच्यावर 'जोरदार' टाळ्या वाजवा (बावळट) जनता हो!" आणि त्या वाजवून झाल्या की पुढच्या खेळाकडे तितक्याच उत्सुकतेने पहात उभे रहा. टाळ्या वाजवायला हात तय्यार ठेवा बरे!!

विकास's picture

6 Aug 2009 - 7:43 pm | विकास

वाद घालायला आवडला असता पण दुर्दैवाने हा प्रतिसाद पटतो आहे...

तरी देखील इतकेच म्हणेन की आपण म्हणता तितके ब्रिटन आणि अमेरिकेतही सुलभपणे होत नाही आहे. अमेरिकेत गाँटोनामो बे क्युबा मधे (बहुतांशी) नॉन-अमेरिकन्सना अटक करून ठेवले आहे. त्यांच्यावर मिलीटरी कोर्ट आणून ठेवले आहे पण तो प्रकार अयशस्वी ठरला आहे तसेच तो अत्यंत चूकपण होता. २००१ चे अनेक पकडलेले अजूनही कुठल्याही शिक्षेविना अथवा निर्णयाविना मेनलँड युएसए मधे आणि गाँटोनामो बे मधे अडकून पडले आहेत. कुणालाच न्याय नाही अशी अवस्था. ब्रिटनमधे तर पाकीस्तानचा भस्मासूर त्यांना त्यांच्यातून आलेल्या पुढच्या पिढ्यांना पण छळत आहे आणि हवा तितका त्यावर पटकन निर्णय घेता येत नाही आहे.

प्रदीप's picture

6 Aug 2009 - 7:48 pm | प्रदीप

मध्ये कायद्यात बदल केले गेले आणि असल्या केसेसचा निकाल झटपट लावला गेला. पाकिस्तान्यांचे काय करायचे वगैरे प्रॉब्लेम्स त्यांना आहेत हे कबूल. पण म्हणून सगळे गाडे अडकून बसलेले नाही. (लंडनीस्तान व्हावयास अजून थोडा अवकाश आहे).

विशाल कुलकर्णी's picture

7 Aug 2009 - 10:52 am | विशाल कुलकर्णी

>>>ब्रिटन (व मला वाटते अमेरिका) ह्यांनी दहशवादाचे आरोप असलेल्या केसेस हाताळण्यासाठी वेगळे कायदे केले व अंमलातही आणले. त्यामुळे २००५ साली झालेल्या लंडन बॉंबस्फोटाचा निकाल २००८ मधे लागलाही. आपल्यात राजकिय इच्छाशक्ति नाही हेच खरे.<<<

प्रदीपजींशी सहमत! :-(

सनविवि's picture

6 Aug 2009 - 7:19 pm | सनविवि

ऐकून बरे वाटले. लवकरात लवकर अमलात आणा म्हणजे झालं!

मदनबाण's picture

6 Aug 2009 - 7:22 pm | मदनबाण

ऐकून फार बरे वाटले...असेच एक एक करुन सगळ्यांना लटकवले पाहिजे.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

धनंजय's picture

6 Aug 2009 - 8:57 pm | धनंजय

लेखातील पुढील वाक्यावर

आता मानवतावाद्यांनी यांचापण अफझल गुरू केला नाही म्हणजे मिळवले...

एक प्रतिक्रिया

या मानवतावाद्यांना मानवतेचा पुळका फक्त असल्या नराधमांना शिक्शा केल्यावरच का फुटतो?
यांना बाँबस्फोटात बळी गेलेल्या सर्वसामान्यांचे काहिही वाटत नाही का?

अशा लेखांना अशा धर्तीच्या प्रतिक्रिया कित्येकदा बघण्यात येतात.

चर्चाप्रस्तावक (विकास) आणि कदाचित प्रतिसादकर्त्यांनाही "फक्त नराधमांबद्दल पुळका येतो" असे नसून मानवतेबद्दल आत्मीयता असलेले लोक कदाचित माहीत असतील. (विकास यांच्याशी माझी प्रत्यक्ष चर्चा झाली असल्यामुळे त्यांना असे लोक माहीत असावेत याबद्दल मला खात्री आहे.) असे प्रतिसाद न यावे म्हणून "स्यूडो" किंवा "तथाकथित" वगैरे विशेषणे लावून तशी तरतूद करायची पद्धत होती. विकास यांच्या मनात तसाच विचार असावा.

परंतु त्यांच्या नजरचुकीमुळे एक फायदा झाला आहे. "मानवतावादी केवळ नराधमांबद्दलच पुळका दाखवतात" असे प्रामाणिकपणे वाटणारे लोक असतात, असे प्रतिसादांमधून मला कळले आहे. अशा लोकांपासून मी सावध राहिले पाहिजे.

समाजातील अशा भ्रामक पण प्रामाणिक दृष्टिकोनाच्या लोकांना कुठल्या वेगळ्याही बाबतीत पटवण्यासाठी मानवतावादी तत्त्वे वापरू नयेत, हे धोरणही शिकायला मिळते. कारण कुठल्याही बाबतीत मानवतावादी तत्त्वे वापरली तरी "तूच तो नराधमांच्या पक्षातला" असा विचार येऊन ते मुद्द्याकडे लक्ष न देता भावुकतेने उलट फिरतील.

अनीस आणि अन्सारी मला क्वचित कधी भेटतील. मानवतावादाबद्दल घृणा असलेले लोक मात्र एखाददुसरे, उजळ माथ्याने वावरणारे, रोजव्यवहारात भेटतील. त्यामुळे पहिल्या धोक्यापेक्षा दुसर्‍या धोक्याबद्दल मी दररोज सावध असले पाहिजे.

प्रतिसादांमधून मला झालेल्या या फायद्यामुळे, मूळ लेखात नजरचुकीमुळे एखाद शब्द राहिल्याबद्दल माझी काही तक्रार नाही.

विकास's picture

6 Aug 2009 - 9:28 pm | विकास

असे प्रतिसाद न यावे म्हणून "स्यूडो" किंवा "तथाकथित" वगैरे विशेषणे लावून तशी तरतूद करायची पद्धत होती.

चुकलो बाबा! विसरलो स्युडो/तथाकथीत म्हणायला. पण मला तसेच म्हणायचे होते. मग तर हरकत नाही ना? :-)

बाकी मला मानवतावादा बद्दल काय म्हणायचे असते ते एका लाइनीत येथे समजेल असे वाटते.

तर्री's picture

6 Aug 2009 - 9:33 pm | तर्री

ह्या एका मुद्यासाठी तरी भा.ज. पा. ला निवडून द्यावे .

कसे??????

तर्री's picture

6 Aug 2009 - 9:34 pm | तर्री

ह्या एका मुद्यासाठी तरी भा.ज. पा. ला निवडून द्यावे .

कसे??????