परत एकदा १८९७

विकास's picture
विकास in काथ्याकूट
5 Aug 2009 - 8:20 pm
गाभा: 

पुण्यात स्वाईन फ्लूचा पहीला बळी पडला आणि सरकारला खडबडून जाग आली. ११० स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत, त्यात ११ शाळांमधले ७० विद्यार्थी आहेत. आता अजून शाळा, क्लासेस वगैरे बंद ठेवणे अजूनच वाढले आहे. मात्र सरकारला जाग येण्यासाठी इतका वेळ लागावा हे दुर्दैव.

पण जाग आल्यामुळे सरकारने जो कायदा/नियम तात्काळ लागू (activate) केला आहे तो वाचून आश्चर्य वाटले. "संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा १८९७" असे त्याचे नाव आहे. तत्कालीन प्लेगच्या साथीमुळे हा कायदा तयार केला गेला होता आणि याच कायद्याचा वापर रँडच्या आज्ञेने कसाही केला गेला होता. परीणामी २२ जून १८९७ ला रँडचा "गोंद्या आला रे" झाला. हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहेच आणि आशा आहे की सरकारला पण माहीत आहे. म.टा. मधे दिलेल्या माहीतीप्रमाणे: पुण्यात प्लेगची साथ पसरल्यानंतर १८९७ चा कायदा लागू झाला होता. त्यानंतर कित्येक दशकानंतर तो आता अमलात आला आहे. त्यानुसार एखादी व्यक्ती संशयित पेशंट आढळल्यास त्याची इच्छा असो वा नसो, त्याला सरकारी हॉस्पिटलात भरती केले जाते. (इ-सकाळ मधे ही बातमी दिसलीच नाही...)

१८९७ ते २००९ या काळात हा कायदा वापरावा लागला नाही याचा अर्थ साथी आल्याच नाहीत असा नाही. पण त्या (साथी)आणि रोगग्रस्त रुग्णांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात आले असणार. आज कसलाही विचार न करता, त्या कायद्यात कसलीही सुधारणा न करता, तंत्रिक दृष्ट्या एखाद्या पोलीसाला वाटले की संशयीत स्वाईन फ्लू रूग्ण आहे तर त्याला हे हक्क मिळाले आहेत की तुम्हाला हॉस्पिटलमधे दाखल करू शकेल असे...

स्वातंतत्र्योत्तर अनेक कायदे केले गेले अनेकदा घटना बदलल्या गेल्या तरी देखील असले कायदे तसेच्या तसे विचार न करता वापरले जातात ह्याचा नक्कीच खेद वाटला.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

5 Aug 2009 - 10:04 pm | नितिन थत्ते

हम्म.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2009 - 9:08 pm | llपुण्याचे पेशवेll

काही प्रश्न..
१. स्वाईन फ्लू ची लक्षणे कोणती.
२. स्वाईन फ्लू बरा होऊ शकणारा रोग आहे का?
३. स्वाईन फ्लूच्या निदानाचा म्हणजे जंतूंची तपासणी करून ते H1N1 च आहेत या तपासण्या भारतात कुठे होतात? तपासणीचा खर्च किती?

ब्रिटीशानी जंगली अवस्थेतील नेटिवाना अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या. अनेक चांगले कायदे तयार करून दिले. त्यातलाच हा एक असावा. बघा ना! साहेब गेल्यानंतर ६१-६२ वर्षानंतरही तो अजून वापरला जातो. :)

असो आता या वेळेचे रँड कोण होतात आणि चाफेकर बंधू कोण होतात ते बघू. :P
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विकास's picture

5 Aug 2009 - 9:17 pm | विकास

स्वाईन फ्लू ची लक्षणे कोणती? स्वाईन फ्लू बरा होऊ शकणारा रोग आहे का?

The symptoms of novel H1N1 flu virus in people are similar to the symptoms of seasonal flu and include fever, cough, sore throat, runny or stuffy nose, body aches, headache, chills and fatigue. A significant number of people who have been infected with this virus also have reported diarrhea and vomiting. Also, like seasonal flu, severe illnesses and death has occurred as a result of illness associated with this virus. अधिक माहीतीसाठी येथे पहा.

भारतात त्याची तपासणी कुठे कुठे होते ते माहीत नाही पण चाचणी साठी काहीतरी पाचएक हजार रुपये मोजावे लागत आहेत असे ऐकले आहे.

शैलेन्द्र's picture

6 Aug 2009 - 1:24 pm | शैलेन्द्र

तपासणीसाठी एन आय व्ही व नाय्सेड या दोन संस्थांना आधिकार आहेत. महाराष्ट्राची जबाबदारी पुण्यातील एन आय व्ही वर आहे.

एका सम्पलचा खर्च १०००० फक्त.(RT PCR with CDC approved primer-probes)

पोलिसकाका_जयहिन्द's picture

5 Aug 2009 - 10:02 pm | पोलिसकाका_जयहिन्द

स्वाईन फ्लू बद्दल अधिक माहितीसाठी इथे पहा....

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

सुहास's picture

6 Aug 2009 - 12:42 am | सुहास

काही प्रश्न..
१. स्वाईन फ्लू ची लक्षणे कोणती.

-- साधारण फ्लू ची च लक्षणे जसे ताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी.. पण ही लक्षणे दिसताच दवाखाना गाठा..
२. स्वाईन फ्लू बरा होऊ शकणारा रोग आहे का?
-- हो, जर लवकर निदान झाले तर.. यासाठी Tamiflu च्या गोळ्या परिणामकारक आहेत ज्या सरकारी दवाखान्यात मिळतात.. त्यामुळे साधारण फ्लूची लक्षणे दिसताच दवाखाना गाठा.
३. स्वाईन फ्लूच्या निदानाचा म्हणजे जंतूंची तपासणी करून ते H1N1 च आहेत या तपासण्या भारतात कुठे होतात? तपासणीचा खर्च किती?
-- माहीत नाही, पण काही लोक म्हणतात १० हजार पर्यंत खर्च येतो म्हणे..

बाहेर गर्दीच्या ठीकाणी जाताना मास्क/हातरूमाल वापरल्यास उत्तम..!

--सुहास

दशानन's picture

6 Aug 2009 - 9:10 am | दशानन

उपयोगी माहीती.

धन्यवाद.

+++++++++++++++++++++++++++++

ज्ञानेश...'s picture

6 Aug 2009 - 12:55 pm | ज्ञानेश...

तपासणी पुण्याच्या इन्स्टीट्युट ऑफ व्हायरॉलोजी मधे(च) होते.

"Great Power Comes With Great Responsibilities"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 10:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आजच पालिकेच्या आरोग्य खात्याच्या अधिकार्‍याची (नाव आणि पद विसरले) मुलाखत रेडीओवर ऐकली. त्यात त्यांचं एक वाक्य रँडची आठवण करून देणारं वाटलं. एखाद्या रूग्णाने स्वखर्चाने खासगी इस्पितळात उपचार करून घेण्याचं ठरलं तर ते चालणार नाही. सगळ्या स्वाईन फ्लुच्या रुग्णांनी सरकारी इस्पितळातच उपचार करून घेणं, या कायद्यामुळे, सक्तीचं आहे.

अदिती

प्रसन्न केसकर's picture

6 Aug 2009 - 1:12 pm | प्रसन्न केसकर

आदितीताई म्हणतात तोच आज खरा प्रश्न आहे. खरेतर या रोगाबाबत अजुनही अर्धवट माहिती लोकांपर्यंत पोहोचली आहे. अनेक प्रश्न जसे - १) या विषाणुची सांसर्गिकता किती प्रभावी आहे? २) हा विषाणु वाहकाच्या (कॅरीयर) शरीराबाहेर किती काळ जगु शकतो? ३) जर एखाद्याला आधीच फ्लु किंवा तत्सम आजाराने या रोगाप्रमाणे लक्षणे दिसत असतील आणि तो तपासणीस गेला तर तिथे वेटींग पिरीयड्मधे त्याला हा विषाणु ग्रासु शकतो काय? ४) खाजगी दवाखाने वगळले तर भारतातली सरकारी आरोग्य यंत्रणा अश्या साथीशी मुकाबला करण्यास समर्थ आहे काय? अद्याप लोकांसाठी अनुत्तरीतच राहिले आहेत आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ आहे. सध्या वेळ नसल्यामुळे नाईलाज आहे पण कदाचित लवकरच याबाबत पसरलेल्या घबराटीवरही मी लिहेन.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

Chennai King Institute of Preventive Medicine (24/7 Service) Guindy, Chennai – 32 (044) 22501520, 22501521 & 22501522
Communicable Diseases Hospital Thondiarpet, Chennai (044) 25912686/87/88, 9444459543
Government General Hospital Opp. Central Railway Station, Chennai – 03 (044) 25305000, 25305723, 25305721, 25330300
Pune Naidu Hospital Nr Le'Meridian, Raja Bahadur Mill, GPO, Pune - 01 (020) 26058243
National Institute of Virology 20A Ambedkar Road, Pune - 11 (020) 26006290
Kolkata ID Hospital 57,Beliaghata, Beliaghata Road, Kolkata - 10‎ (033) 23701252
Coimbatore Government General Hospital Near Railway Station,
Trichy Road, Coimbatore - 18 (0422) 2301393, 2301394, 2301395, 2301396
Hyderabad Govt. General and Chest Diseases Hospital, Erragadda, Hyderabad (040) 23814939
Mumbai Kasturba Gandhi Hospital Arthur Road, N M Joshi Marg, Jacob Circle, Mumbai - 11 (022) 23083901, 23092458, 23004512
Sir J J Hospital J J Marg, Byculla, Mumbai - 08 (022) 23735555, 23739031, 23760943, 23768400 / 23731144 / 5555 / 23701393 / 1366
Haffkine Institute Acharya Donde Marg, Parel, Mumbai - 12 (022) 24160947, 24160961, 24160962
Kochi Government Medical College Gandhi Nagar P O, Kottayam - 08 (0481) 2597311,2597312
Government Medical College Vandanam P O, Allapuzha - 05 (0477) 2282015
Taluk Hospital Railway Station Road, Alwaye, Ernakulam (0484) 2624040 Sathyajit - 09847840051
Taluk Hospital Perumbavoor PO, Ernakulam 542 (0484) 2523138 Vipin - 09447305200
Gurgaon &
Delhi All India Institute of Medical Sciences (AIIMS) Ansari Nagar, Aurobindo Marg Ring Road, New Delhi - 29 (011) 26594404, 26861698 Prof. R C Deka - 9868397464
National Institute for Communicable Diseases 22, Sham Nath Marg,
New Delhi - 54 (011) 23971272/060/344/524/449/326
Dr. Ram Manohar Lohia Hospital Kharak Singh Marg,
New Delhi - 01 (011) 23741640, 23741649, 23741639
Dr. N K Chaturvedi – 9811101704
Vallabhai Patel Chest Institute University Enclave, New Delhi- 07 (011) 27667102, 27667441, 27667667, 27666182
Bangalore Victoria Hospital K R Market, Kalasipalayam, Bangalore - 02 (080) 26703294 Dr. Gangadhar - 94480-49863
SDS Tuberculosis & Rajiv Gandhi Institute of Chest Diseases Hosur Road, Hombegowda Nagar, Bangalore - 29 (080) 26631923 Dr. Shivaraj - 99801-48780

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 1:15 pm | मिसळभोक्ता

अख्खा भारत (म्हणजे बिहार, यूपी वगैरे) सोडून स्वाईन फ्लू पुण्यातच का व्हावा, ह्याबद्दल विचार मंथन व्हावे.

-- मिसळभोक्ता

विकास's picture

6 Aug 2009 - 4:49 pm | विकास

त्याला कारण कदाचीत बाहेरून जर कोणी स्वाईन फ्ल्यू असलेले आले असेल तर ते पसरू शकते. बाहेरून जा-ये असलेल्या शहरांमधे मुंबई-बेंगलोर बरोबर पुणेही आहे. पुढचा भाग आहे (पसरण्याचा) त्याला सरकारीपातळीवरील निष्काळजीपणा कारण आहे.

डस्टीन हॉपमनचा "आउटब्रेक" बघितला आहे का? थोड्याशा लाचेसाठी कस्टम अधिकारी बाहेरून आणलेल्या एका माकडाकडे दुर्लक्ष करतो आणि काय होते ते? अतिरंजीत असले तरी त्यात वास्तव नक्कीच होते.

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 10:04 pm | मिसळभोक्ता

मग मनसे गप्प का आहे ? की त्यांनाही हा सूकरज्वर झाला आहे ?

-- मिसळभोक्ता

सूहास's picture

7 Aug 2009 - 1:56 pm | सूहास (not verified)

जरा नीट बोलत जा रे भाऊ !!!

मनसे म्हणजे काय सरकार आहे का ??

अर्धवट राव्...आम्ही स्वत : पाच तास काढलेत रुबीत ...आणी आज सकाळपासुन ..शात्रीनगरमध्ये पोर बसुन आहेत....

सू हा स...

ऋषिकेश's picture

6 Aug 2009 - 6:52 pm | ऋषिकेश

स्वातंतत्र्योत्तर अनेक कायदे केले गेले अनेकदा घटना बदलल्या गेल्या तरी देखील असले कायदे तसेच्या तसे विचार न करता वापरले जातात ह्याचा नक्कीच खेद वाटला.

माझ्या माहितीनूसार हा कायदा १९८९ किंवा १९८२ मधे अद्ययावत केला आहे.
नक्की साल आठवत नाहि.. संदर्भ जवळ नाही.. एक दोन दिवसांत संदर्भ मिळाल्यास साल ससंदर्भ इथेच देतो... उपप्रतिसाद देऊ नये

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ६ वाजून ५० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "भय इथले संपत नाही...."

विकास's picture

6 Aug 2009 - 6:59 pm | विकास

ऋषिकेशच्या म्हणण्याप्रमाणे :माझ्या माहितीनूसार हा कायदा १९८९ किंवा १९८२ मधे अद्ययावत केला आहे.

तसे असेल तर उत्तम आणि माहीती नक्कीच मिळाली तर दे. (नाही मिळाली तरी विश्वास आहे). पण मग त्याला एकतर १८९७च्या कायदा म्हणू नका आणि दुसरे म्हणजे वर अदितीने सांगितल्याप्रमाणे , "एखाद्या रूग्णाने स्वखर्चाने खासगी इस्पितळात उपचार करून घेण्याचं ठरलं तर ते चालणार नाही...," असले काहीतरी म्हणू नका (हे मी शासकीय अधिकार्‍यांसंदर्भात म्हणत आहे). तसेच नक्की काय बदल केले ते देखील कळणे महत्वाचे वाटते.

प्रसन्न केसकर's picture

6 Aug 2009 - 7:26 pm | प्रसन्न केसकर

प्रथम ४ फेब्रुवारी १८९७ ला मंजुर झाला आणि त्यात नंतर तीन वेळा सुधारणा झाल्या. १९४४ मधे पंजाबमधे सुधारणा होऊन Epidemic Diseases (Punjab Amendment) Act, 1944 झाला तर नंतर १९४७ मधे पुर्व पंजाबमधे सुधारणा होऊन East Punjab by East Punjab by East Punjab Act 1 of 1947 मंजुर झाला. १९४५ मधे तत्कालिन सीपी & बेरार ने अजुन एक सुधारणा विधेयक करुन C.P.and Berar Epidemic Diseases (Amendment) Act, 1945 तयार केला. जालावर तो कायदा येथे आहे: http://www.vakilno1.com/bareacts/Laws/The-Epidemic-Diseases-Act-1897.htm

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

विकास's picture

6 Aug 2009 - 7:48 pm | विकास

फारच छान माहीती! धन्यवाद!

नितिन थत्ते's picture

6 Aug 2009 - 8:48 pm | नितिन थत्ते

रँड आणि चाफेकर यांचा उल्लेख झाला आहे तेव्हा आता थोडा खराटा चालवतो. ;)

माझ्याकडे श्री ज जोशी यांचे पुणेरी नावाचे एक पुस्तक आहे. (त्यांच्या १९६०-७० काळात वर्तमानपत्रांत लिहिलेल्या विविध लेखांचे संकलन)
त्यात गेले ते प्लेगचे दिवस असा एक लेख आहे. त्या लेखात त्यांच्या शालेय जीवनात आलेल्या प्लेगच्या साथीने काहीच घडले नाही (कारण प्लेगच्या लशीचा शोध तोपर्यंत लागला होता) असे सांगून त्यांच्या आधीच्या पिढीने सांगितलेल्या प्लेगच्या आठवणी आणि गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात त्या आठवणींचे मुख्य सूत्र सरकारी अधिकार्‍यांना आपल्या घरात प्लेगने मेलेला रुग्ण आहे हे कळू नये म्हणून केल्या जाणार्‍या लटपटी हे आहे. त्या लटपटींचे कारण त्या घरातल्यांना नगरपालिकेचे अधिकारी क्वारंटाईनमध्ये टाकीत आणि संपूर्ण घर जंतुनाशक मारून धुवून काढीत. या मुळे त्यांचे सोवळे बिघडत असे. त्यातील अनेक कथा काल्पनीक किंवा अतिरंजित असणार हे उघड आहे. पण शासकीय उपाययोजनांना सोवळे बिघडण्याच्या कल्पनेने सहकार्य न करण्याची वृत्ती स्पष्ट दिसते.

या अनुभवामुळेच रँडला निर्दयपणे उपाययोजना करावी लागली नसेल? ज्यातून पुढे त्याचा खून झाला.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

इनोबा म्हणे's picture

6 Aug 2009 - 9:04 pm | इनोबा म्हणे

त्यातील अनेक कथा काल्पनीक किंवा अतिरंजित असणार हे उघड आहे.
असे असेल तर सोवळ्याची कथा हि काल्पनीक किंवा अतिरंजीत असणार हे ही उघड आहे.

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

नितिन थत्ते's picture

6 Aug 2009 - 9:06 pm | नितिन थत्ते

कथा काल्पनिक/अतिरंजित म्हणजे त्यातले डिटेल अतिरंजित असणार

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 9:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बदल बाहेरच्याने सांगितला तर पचत नाही; तो आतल्यांनाच घडवून आणावा लागतो. बाहेरच्यांनी बदल घडवून आणायचा प्रयत्न केला की काय होतं माहित आहे, इराक!

अदिती

विकास's picture

6 Aug 2009 - 9:49 pm | विकास

बदल बाहेरच्याने सांगितला तर पचत नाही; तो आतल्यांनाच घडवून आणावा लागतो. बाहेरच्यांनी बदल घडवून आणायचा प्रयत्न केला की काय होतं माहित आहे, इराक!

एकदम मान्य!

नितिन थत्ते's picture

6 Aug 2009 - 10:06 pm | नितिन थत्ते

बाहेरच्याने बदल म्हणजे काय ते कळले नाही.
प्लेगची साथ आटोक्यात आणणे हे रँडचे कर्तव्यच होते. कदाचित मृदूपणे वागल्यावर साथ आटोक्यात आली नसती तर त्याला अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर म्हणून सरकारी शिक्षा (शारिरिक नाही पण गोपनीय अहवालात शेरा वगैरे) भोगावी लागली असती.

(अतिअवांतरः जनरल वैद्यांचा खूनही अशाच काहीशा कारणाने घडला होता असे आठवते)
चला पळा आता. ;)

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 10:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रँड आणि जनरल वैद्यांची तुलना पटली नाही. रँड अर्थातच बाहेरचा (यवन का म्लेंछ?) होता आणि जनरल वैद्य आतले!

बघा ना, तुमच्याही प्रतिसादात रँड एकेरीत आला आणि जनरल वैद्यांचा आदरार्थी उल्लेख झाला! ;-)

अदिती

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 10:15 pm | मिसळभोक्ता

रँड आणि वैद्यांची तुलना करणे, म्हणजे चाफेकर बंधू आणि शीख अतिरेक्यांची तुलना करणे.

निषेध !

-- मिसळभोक्ता

नितिन थत्ते's picture

6 Aug 2009 - 10:29 pm | नितिन थत्ते

हो तुलना केलीच आहे.
तुमचा निषेध असू द्या.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

इनोबा म्हणे's picture

6 Aug 2009 - 10:33 pm | इनोबा म्हणे

रँड आणि वैद्यांची तुलना करणे, म्हणजे चाफेकर बंधू आणि शीख अतिरेक्यांची तुलना करणे.
सहमत आहे.

तसे हि 'वैद्य' म्हटल्यावर आम्ही थोडे दबूनच असतो. :)

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

नितिन थत्ते's picture

6 Aug 2009 - 10:27 pm | नितिन थत्ते

पाहणार्‍याच्या दृष्टीकोनावर बरेच अवलंबून.
रँडने (म्हणजे त्याच्या सोजिरांनी) सोवळे बिघडवले म्हणून त्याला मारले.
वैद्यांनी (म्हणजे त्यांच्या सैनिकांनी) सुवर्णमंदिराचे पावित्र्य नष्ट केले म्हणून त्यांना मारले.
कृत्य करणार्‍या दोघांच्याही भावना एकच.
रँड जसा बाहेरचा तसे शीख अतिरेकी हिंदूंना (त्याकाळी तरी) बाहेरचेच समजत होते.

>>तुमच्याही प्रतिसादात रँड एकेरीत आला आणि जनरल वैद्यांचा आदरार्थी उल्लेख झाला!
हॅ हॅ. मला चपला घालून जायचं नाहिये. :D

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Aug 2009 - 9:33 pm | llपुण्याचे पेशवेll

>>असे असेल तर सोवळ्याची कथा हि काल्पनीक किंवा अतिरंजीत असणार हे ही उघड आहे.
+१ असेच म्हणतो..
आणि कदाचित स्वतःच्या घरातल्या बायकांच्या निर्‍याना हात घालू देण्याइतके ओवळे झाले नसतील..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

नितिन थत्ते's picture

6 Aug 2009 - 9:59 pm | नितिन थत्ते

>>स्वतःच्या घरातल्या बायकांच्या निर्‍याना हात घालू देण्याइतके

हे काल्पनिक की सत्य हे माहिती नाही. 'बायकांच्या निर्‍याना हात' असले शब्द वापरले की आपल्या कृतीला सहानुभूती मिळणे सोपे जाते.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Aug 2009 - 11:32 pm | llपुण्याचे पेशवेll

हो खरे आहे.. आणि 'सरकारचे डोके ठीकाणावर आहे का?' सारखे लेख लिहून प्रसिध्दी मिळवणेही.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रसन्न केसकर's picture

7 Aug 2009 - 8:40 pm | प्रसन्न केसकर

हे काल्पनिक नसावे. कॅम्प भागात पुर्वी एक इमारत होती. ती इंग्रज सोजिरांनी पळवलेल्या बायका ठेवण्यासाठी वापरली होती असे स्थानिक लोक सांगत असत. शिवाय अश्या बायकांना सोजिरांमुळे होणार्‍या गुप्तरोगासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी दवाखाना स्टेशनजवळ कुठेतरी सुरु केला होता असेही ऐकल्याचे आठवते.

अन क्वारंटाईनला सर्वच ठिकाणी लोकांचा विरोध होतो कारण त्यात अनेक बंधने येतात. शिवाय इंग्रजांचा धर्म वेगळा असल्याने त्यातील काही लोक हिंदुधर्माबाबत आकसाने वागवत असल्याची शक्यता नाकारताही येत नाही. शेवटी मुलतत्ववाद सर्वच धर्मांमधे असु शकतो अन असतोही.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

विकास's picture

7 Aug 2009 - 1:45 am | विकास

मूळ विषयात रँडचे नाव आले आहे म्हणून नितीनरावांनी आपला कोपर्‍यातील खराटा हातात घेऊन एक उपविषय चालू केला आहे (त्याला मी अवांतर म्हणलेले नाही), जो वास्तवीक माझ्या मूळ लेखाचे कारण होते. आता त्या संदर्भात आणि ओघात इतर सर्व वरील मुद्यांवर:

माझीच मूळ वाक्ये: तत्कालीन प्लेगच्या साथीमुळे हा कायदा तयार केला गेला होता आणि याच कायद्याचा वापर रँडच्या आज्ञेने कसाही केला गेला होता. परीणामी २२ जून १८९७ ला रँडचा "गोंद्या आला रे" झाला. हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहेच...स्वातंतत्र्योत्तर अनेक कायदे केले गेले अनेकदा घटना बदलल्या गेल्या तरी देखील असले कायदे तसेच्या तसे विचार न करता वापरले जातात ह्याचा नक्कीच खेद वाटला.

सर्वप्रथम म.टा. मधील बातमीत ज्या पद्धतीने लिहीले होते अथवा जे या कायद्याचे नाव होते त्याप्रमाणे हा कायदा आजही तसाच (१८९७ सारखा) आहे असा माझा (गैर)समज झाला होता. अर्थात तो पुनेरी यांनी तसाच ऋषिकेशने दूर केला. तरी माझा मुद्दा अजून लागू आहे हे अदितीच्या प्रतिसादातील सरकारी अधिकार्‍याच्या वक्तव्यावरून दिसते.

प्लेग हा फक्त भारतातच जन्माला आलेला नव्हता. (मला वाटते त्याचे मूळ चीन मधे आहे) किंबहूना तो आधी ब्रिटनसह युरोपात काही शतके तरी होता असे पटकन शोधल्यास वाटते. तत्कालीन प्लेग हा १८९६ मधे मुंबईत आला आणि सर्व उपाय योजना करून सरकार थांबवू शकले नाही. नंतर तो पुण्यात पसरला. पुण्यात जे काही झाले ते केवळ पुणेरी असल्याने झाले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. रँडने त्याच्या कमिटीत एकाही "नेटीव्हाला" (अगदी म्युन्सिपॅलीटीतील सरकारनियुक्त सदस्यांना देखील) न घेता फक्त डॉक्टर आणि सैन्यदलातील अधिकारी यांना घेतले. घेतले ते घेतले ज्या पद्धतीने क्वारंटाईन केले गेले ती पद्धत अतिशय अपमानास्पद होतीच आणि त्यात परत धार्मिक कारणे पण आली. शिवाय बायकांना वेगळे करण्यात आले - अर्थात तेही पोलीस पुरूषांकडून. त्यात काही असभ्यपणा केला नाही असे म्हणले तरी हात लावला अथवा ढकलले वगैरे असे मग्रुरीतून नक्की झाले असेल. ते कसे मान्य होणार? उद्या आपल्यापैकी कुणाच्याही ओळखीच्या स्त्रीची साधी कस्टम्समधे झडती घेताना पुरूष पोलीस अधिकारी चालेल का? अर्थातच नाही. तसे कुठेही होत देखील नाही. भारत असो अथवा अमेरिका अथवा युरोप वगैरे..विचार करा मतदाराचे ओळखपत्र तपासणार्‍या पुरूषाने एखाद्या बुरखा घातलेल्या स्त्रीला बुरखा काढून चेहरा दाखव म्हणले तर काय होईल ते...तसे कोणी वागले तर ती त्या अधिकार्‍यांची चूक आणि अधिकाराचा चुकीचा वापर आहे. मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावर पण त्यावेळेस नियंत्रण चालू केले.

बरं जे काही चालले होते ते प्लेग नियंत्रणासाठी होते. मग तेच उपाय तसेच लंडन मधे वापरले जायचे का? अर्थातच नाही. मग ते पुण्यात का? कारण नेटीव्हांना काही कळत नाही, त्यांना काही चालू शकते, ते रानटी आहेत, कारण आम्ही सत्ताधीश आहोत, आणि एकंदरीत माज. अजून एक कारण होते. भारतातून कच्चा माल घेण्यावर जगातील बाजारपेठांनी बंदी घातली. हे धंदेवाल्या ब्रिटीशांना कसे चालेल बरे?

या गोष्टींची चीड येऊन त्याला प्रत्युत्तर देण्याची हिंमत कोण कशी दाखवेल हे सांगता येत नाही. रँडच्या बाबतीतही तेच झाले. त्याने दाखवलेल्या माजाला चाफेकर बंधूंनी उत्तर दिले. राणीचे सरकार स्थिरावल्या नंतरचा अनेक वर्षांनी बसलेला हा पहीला हादरा होता ज्यात सरकारी अधिकार्‍याला मारले आणि एका अर्थी परक्या सत्तेला आव्हान दिले. जे शिवाजीनेपण अफझलखानाला मारून दिले होते.

जे त्याकाळात परक्या शक्तींबरोबर झाले ते या काळात स्वकीय सरकारबरोबर झाले तर आश्चर्य वाटायला नको हा एक भाग झाला पण एका अर्थी anarchy येऊ शकते अशी काळजी पण वाटते. स्वाईन फ्लू आणि क्वारंटाईन (जे केले जात आहे असे मी ऐकले) हे केवळ तात्कालीक कारण ठरेल कारण डाळी पासून पाण्यापर्यंत आणि घरापासून दारापर्यंत अनेक प्रश्न प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रुपाने भेडसावत आहेत. आता हवी आहे ती फक्त शासकीय ऑफिशियल मग्रुरी...हा माझ्या चर्चेचा मूळ विषय होता. पण तुम्ही आपले डोळ्यावर विविध चष्मे आणि हातात खराटा घेऊन हवेतल्या हवेत धूळ झाडत आहात...

आता प्रश्न जनरल अरूणकुमार वैद्यांच्या हत्येबाबत:
वास्तवीक मिपा संस्कृतीप्रमाणे याला फाट्यावर मारले पाहीजे, पण तरी देखील उत्तर देतो:

रँडच्या संदर्भात काय झाले ते लिहीले आहेच. तत्कालीन जीवनपद्धतीत अमानुषपद्धतीने ढवळाढवळ केली तर ते अयोग्यच होते. (ते ही राणीच्या आधी कंपनी सरकारला काडतुसांमुळे पण आगीत तेल कसे ओतले जाऊ शकते हे माहीत असले तरी) त्यात रँड हा परकीय सत्तेचा प्रतिक होता. त्यामुळे त्याला मारले. तरी देखील त्याला मारताना केवळ तोच मरावा अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. (मदनलाल धिंग्राने पण तसेच केले होते). शिख अतिरेक्यांचे तसे नव्हते. मुंबई-दिल्ली रेल्वे स्टेशन वर अनेक रेडीओ बाँब फोडून अनेक निरपराध व्यक्तींना मारले गेले होते. तीच कथा इतरत्र अनेक ठिकाणी अगदी पंजाबातपण.

वैद्यांनी (म्हणजे त्यांच्या सैनिकांनी) सुवर्णमंदिराचे पावित्र्य नष्ट केले म्हणून त्यांना मारले.

  1. जिथे आधी असा हल्ला करून अतिरेक्यांना हाकलून काढू असे अतिरेक्यांना सांगितले गेले होते (हा पण एक अतिरेकच होता).
  2. आत्ता संदर्भ नाही, आठवणीतून वाचलेले: पहीली तुकडी जेंव्हा आवारात गेली तेंव्हा त्यांनी बंदुका बाजूस ठेवून कर्ण्यावरून जाहीर विनंती केली की शस्त्रे बाजूला ठेवा आणि लष्कराच्या हवाली व्हा (शिक्षा कमी होईल वगैरे). परीणामी पहीली तुकडी तशीच्या तशी (नुसती समोरून नाही तर अतिरेक्यांनी खणलेल्या भुयारतून जमिनीखलून वर केलेल्या)गोळीबारात धारातिर्थी पडली.
  3. इतके होऊन जेंव्हा प्रथम सैन्य भिंद्रनवालेंना मारून आत शिरले तेंव्हा नुसतेच बाँब आणि बंदुका मिळाल्या नाहीत तर दारू, अमली पदार्थ, आणि स्त्रीया (अजून वर्णने आहेत पण संदर्भ मिळाला तरच देईन).
  4. हे सगळे झाले आणि कोणी पावित्र्य नष्ट केले म्हणता? आणि असल्या अतिरेक्यांची आणि चाफेकरांची तुलना करता? नक्की चाफेकरांनी यातील कुठले धंदे केल्याचे तुम्ही ऐकले आहेत?

तरी देखील जनतेला (विशेष करून शिख समाजाला) माहीती देताना, सरकारच्या चुका झाल्या. सगळ्यात मोठी चूक होती ती राजकारणाची ज्याची किंमत इंदिरा गांधींना आणि त्यांच्या बरोबरीने हकनाक जनरल अरूणकुमार वैद्यांसहीत इतर अनेकांना मोजायला लागली...

त्यातून पुढे राजीव गांधी शहाणे झाले. (फक्त पंजाबपुरते, तेच शहाणपण श्रीलंकेच्या संदर्भात वापरायचे लक्षात आले नाही). म्हणून मग जेंव्हा "ऑपरेशन ब्लॅक थंडर" जे परत सुवर्णमंदीरावर हल्ला करून झाले तेंव्हा समाजाशी संवाद आणि त्यांच्या सांस्कृतिक/धार्मिक भावनांची अधिक काळजी घेतली गेली परीणामी नंतर पंजाबमधील दहशतवादाच प्रश्न पूर्ण सुटायला जरी वेळ लागला तरी सुवर्णमंदीर परत अतिरेक्यांचे भक्ष झाले नाही. (या संदर्भात मार्क टली यांच्या "डीफीट ऑफ अ काँग्रेसमन" मधे चांगले वर्णन आहे).

एक चांगले वाक्य आहे: Stupidity means repeating the same thing (mistake) and expecting different results.

लोक पुढच्याला ठेच लागून स्वतः शहाणी होतात, आपण स्वतःला ठेच लागली तरी वेडेपणा सोडणार नाही की काय असे वाटते.

मिसळभोक्ता's picture

7 Aug 2009 - 3:55 am | मिसळभोक्ता

आणखी एकः सुवर्णमंदिरात प्रवेश करताना लष्कराने स्वतःची पादत्राणे काढून ठेवली होती.

खराट्याला रँडची तुलनाच करायची असेल, तर आणिबाणीतल्या संजय गांधीशी करावी.

तसेच कुणीतरी "आता रँड कोण होतो, आणि चाफेकर कोण हे बघायचे" असे लिहिले आहे. त्या प्रतिसादातून सध्या पुण्यात कायद्याचा अंमल बजावणार्‍या अधिकार्‍यांची हत्या करावी असे सुचवले जाते. त्यामुळे त्याचा मी निषेध करतो.

-- मिसळभोक्ता

मिसळभोक्ता's picture

7 Aug 2009 - 4:29 am | मिसळभोक्ता

रँडने त्याच्या कमिटीत एकाही "नेटीव्हाला" (अगदी म्युन्सिपॅलीटीतील सरकारनियुक्त सदस्यांना देखील) न घेता फक्त डॉक्टर आणि सैन्यदलातील अधिकारी यांना घेतले.

विकास,

माझ्या माहितीप्रमाणे कुणी कुमठेकर, आणि फडके नावाचे दोन "नेटिव्ह" ह्या कमिटीत होते. कुठल्या पोझिशन वर होते हे माहिती नाही.

-- मिसळभोक्ता

विकास's picture

7 Aug 2009 - 7:49 am | विकास

मी या दुव्यात वाचून असे मत केले की निर्णय शक्ती असलेले तीन जण होते. (गुगल बुक्सचा दुवा आहे. कॉपिराईट अजून असल्याने येथे चिकटवू शकत नाही. पान ६६ खाली आणि ६७ ची सुरवात)

मिसळभोक्ता's picture

7 Aug 2009 - 4:48 am | मिसळभोक्ता

धनंजय ने दिलेल्या दुव्यावर रँडचा ओरिजिनल रिपोर्ट आहे. त्यात, एकूण ५१ नेटिव्ह स्वयंसेवकांनी घराघरातून प्लेगचा रोगी शोधण्यासाठी सहभाग घेतला. मात्र बरेचसे लोक नेहमी येत नव्हते. फक्त ५ बायका, आणि १२ भारतीय पुरुषांनी ह्या कामात मदत केली, त्यांची नावे आहेत. बळवंतराव हरी चिपळूणकर हे एकमेव ब्राह्मण नाव आहे. गंगाराम म्हस्के हे दुसरे मराठी नाव आहे.

एम के कुमठेकर हे म्युनिसिपालिटीचे नेटिव्ह सदस्य कमिटीत होते, आणि गोपाळ फडके नावाचे क्लर्क होते, असा उल्लेख आहे.

म्युनिसिपालिटीचा हेल्थ ऑफिसर हा एक तरुण ब्राह्मण होता, असा उल्लेख आहे. लकडी पुलाच्या हिंदू हास्पिटलात ह्या ऑफिसरने, रुग्णालयात वापरलेल्या घाणेरड्या चादरी नदीच्या काठी (अपस्ट्रीम) धुतल्याची तक्रार आहे.

मुसलमान स्त्रियांच्या पर्द्याचा आणि हिंदु स्त्रियांच्या लाजेची काळजी घेण्यासाठी म्हणून स्त्री डॉक्टरांची योजना होती, परंतु संख्येने स्त्री डॉक्टर कमी असल्याने दर वेळी ते शक्य झाले नाही, हा कबुली जबाब आहे. झडतीच्या वेळी सुरक्षेची जबाबदारी नेटिव्हांच्या बॉम्बे रेजिमेंटने घेतली होती. (हा रिपोर्ट रँड नेच मृत्यू आधी, म्हणजे ३१ मे १८९७ ला लिहिलेला आहे. फडक्यांनी टंकलेला आहे, आणि कुमठेकरांनी त्यात मामुली सुधारणा केलेल्या आहेत.)

-- मिसळभोक्ता

मागे मी दुसरीकडे एक प्रतिसाद लिहिला होता (दुवा) तो आठवला.

त्यातील काही भाग असा (पुन्हा नेमका या लेखासाठी प्रतिसाद टंकण्याचा कंटाळा करतो आहे, क्षमस्व) :
कॉलेराच्या साथींमध्ये मेलेल्यांचे आकडे कॉलेराच्या विकी पानावर दिसले (दुवा). १८९९-१९२३ काळात भारतात ८ लाख मेले असे सांगतात.
ब्रिटिश सरकारची स्वास्थ्यविभागाची कित्येक कागदपत्रे महाजालावर उपलब्ध असल्याचे हल्लीच मला शोधून समजले. त्यात प्लेगविषयी मूळ अहवाल सापडले. पुण्यातील प्लेग साथीविषयी हा आलेख सापडला (येथे ग्राफ होता तो दिसत नाही):
पुण्यात त्या काळात दर पाच दिवसांत साधारणपणे १० लोक मरत, मार्च ३-७ या काळात साठावर माणसे मेली. मार्च १६-१७ तारखेला प्लेगविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू झाली, साधारण त्याच काळापासून प्लेग मृत्यू कमी होऊ लागले. चाफेकर बंधूंनी २२ जूनला रँडला मारले, तोवर (वरील आलेखाप्रमाणे) पुण्यातला कॉलेरा आटोक्यात आलेला होता.

ब्रिटिश सरकार लोकशाहीचे नव्हते. पण लोकशाही शासनापुढे पडलेला हा कूटप्रश्न असतो : सामाजिक स्वास्थ्यासाठी बळजबरीपेक्षा लोकशिक्षण अधिक उजवे असते, पण अकस्मात आलेल्या साथीमध्ये लोकांत जी घबराट पसरते, तेव्हा तडकाफडकी लोकशिक्षण कसे करावे? मला वाटते याला अल्पकालिक उत्तर नाही. आपत्कालात सरकार जे काही करेल ते जाचक असेल, किंवा अकार्यक्षम असेल (किंवा दोन्ही असेल!) प्रभावी लोकशिक्षण हे आपत्काल नसताना, म्हणजे नेहमीच चालू ठेवायचे असते. म्हणजे आपत्कालातला जाच त्यातल्या त्यात कमी भासेल, आणि अकार्यक्षमतेचे तोटे त्या मानाने कमी असतील.

- - -

वर ठळक ठशात दिला आहे, तो मला अजून न सुटलेला प्रश्न आहे, असे वाटते. पण या चर्चाविषयाशी संबंधित आहे.

मिसळभोक्ता's picture

7 Aug 2009 - 4:52 am | मिसळभोक्ता

कारवाई सुरू झाल्या वर २ महिन्यात फक्त १२ लोकांचा मृत्यू झाला, त्यातील फक्त ९ लोकांचा प्लेगने मृत्यू झाला, असे रिपोर्टात लिहिले आहे (पृष्ठ २५.) डिसेंबर पासूनचा तक्ता पृष्ठ २७ वर आहे. त्यावरून रँडची उपाययोजना कामी आली, असे म्हणावे लागेल.

-- मिसळभोक्ता

विकास's picture

7 Aug 2009 - 9:26 am | विकास

Medical History of British India चा दुवा एकदम छान आहे. धन्यवाद!

बाकी माझ्या लेखाचा मूळ मुद्दा समजला असेल अशी आशा करतो.

सामाजिक स्वास्थ्यासाठी बळजबरीपेक्षा लोकशिक्षण अधिक उजवे असते, पण अकस्मात आलेल्या साथीमध्ये लोकांत जी घबराट पसरते, तेव्हा तडकाफडकी लोकशिक्षण कसे करावे?

माझ्या कामाच्या अनुभवावरून पण सांगेन की लोकशिक्षण खूप महत्वाचे असते. ९/११ च्या हल्ल्यानंतर लगोलग अँथ्रॅक्सचे बळी गेले, त्याच्या आधी वर्षभर (२००० च्या उन्हाळ्यामधे) वेस्ट नाईल व्हायरस हा अफ्रिकेतील व्हायरस अचानक न्यू इंग्लंड आणि एकूणच शीतकटीबंधातील प्रदेशात वाढू लागला. काही बळी देखील गेले. त्य सुमारास मी स्वतः पब्लीक हेल्थचा नसलो तरी शहराचे काही कारणामुळे बॉस्टन आणि इतर शहरांबरोबरच्या बैठकीत प्रतिनिधीत्व करत होतो. त्यात सगळेच एकतर डॉक्टर्स अथवा पब्लीक हेल्थ प्रोफेशनल्स (एमपीएच किंवा पीएचडी) असायचे. त्यात अनेक मुद्दे (कंटाळा येई पर्यंत) बोलले जायचे. पण मुळ मुद्दा हा लोकशिक्षण आणि मग वर्स्ट केस मधे करायचे प्लॅनिंग असाच असायचा. मग अनेक प्रकारची माहीती पत्रके ती पण पाच भाषात केली गेली. लोकांना सातत्याने सांगितले गेले, कधी काळजी घेयची तर कधी काळजी करायची नाही ते. हॉस्पिटल्सबरोबर लुटूपुटीचे प्रसंग करून सर्व आपत्कालीन व्यवस्था कशी चालू शकते याची तयारी बघितली गेली आणि त्यातल्या तॄटी समजून घेतल्या गेल्या... वगैरे.

सुदैवाने "पाणी पिण्याचा" प्रसंग उद्भवला नाही, पण थोडक्यात "तहान लागल्यावर" विहीर खणायला घेतली नाही. मला खात्री आहे आपल्याला याहून जास्त सीडीसी कशी तयारी करते यावरून कल्पना असेल.

मुख्य भाग असतो तो संवादाचा. साधी गोष्ट सांगतो, जसा अमेरिकेत ९११ हा दूरध्वनी क्रमांक पोलीस-फायर-अँब्युलन्सला एकदम फोन करायला वापरता येतो तसाच राष्ट्रीय पातळीवर नाही पण बर्‍याच ठिकाणी स्थानीक पातळीवर रीव्हर्स ९११ हा आपत्कालीन प्रकार करता येतो जेंव्हा जनतेला त्यांच्या फोनवर अशी माहीती लगेच सांगता येते.

विचार करा २००४ च्या निवडणूकात, (ऐकीव माहीतीप्रमाणे), "मै अटलबिहारी वाजपेयी बोल रहा हूँ..." असे म्हणत त्यांच्या आवाजातील फोन मेसेज येई. तेच एस एम एस ने होऊ शकते. आज आपल्याकडे संवाद साधता येऊ शकतो ज्याने आपत्कालात घबराट कमी होऊ शकते आणि योग्य मार्गदर्शन मिळू शकते.

माझा मुद्दा हा रँड चांगला होता का वाईट याच्याशी नव्हता आणि नाही आहे. पण त्याने एक नक्की चूक केली ती म्हणजे कुठलाही संवाद न साधता एकाधिकारशाहीने लोकांवर सक्ती केली. भले ती चांगल्यासाठी असोत पण तुम्हा-आम्हाला साधी आई-वडीलांनी (त्यांच्या दृष्टीने) आपल्या भल्यासाठी सक्ती केली तर चालत नाही, येथे तर काय सरळ सरळ जीवनमानावर परकीय हल्ला होता ते ही तुच्छ लेखत.

आजही तेच होत आहे. कुठलीही माहीती नीट दिली जात नाही. मग साधे गोम्यासोम्या कोचिंग क्लासेसच्या बाहेर, जीमच्या बाहेर पाट्या दिसत आहेत की "अमुक तमुक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सध्या येथे येऊन दिले जात नाही. (म्हणजे त्यांच्या शेजारी रहाणार्‍या पण दुसर्‍या शाळेतील विद्यार्थी आला तर चालू शकेल)." त्यात परत सरकारी अधिकार्‍याने संशय वाटला म्हणून सांगितले तर क्वारंटाईन करणार...पुण्याअ अनेकांच्या बाबतीत एकदा पॉझिटीव्ह एकदा निगेटीव्ह अशा चाचण्या होत आहेत. त्यांना जर असे वेगळे ठेवले, हेतू कितीही उदात्त असला तरी त्याचा परीणाम ही दडपशाही आहे असे वाटण्यातच होणार.

असो.

नीधप's picture

7 Aug 2009 - 9:09 am | नीधप

तो कायदा लागू करण्यात आलाय पण त्या आधीच लक्षणे असो नसो लोकांनी टेस्टींगसाठी गर्दी केलीये. म्हणजे संशयित रूग्णाला बळजबरीने घरातून नेण्याचा प्रकार करायची गरजच उरली नाहीये असं आजच्या पेप्रात वाचलं.

बाकी चालू द्या...

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2009 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुणे पालिका आयुक्त आज रेडीओवर बोलत होते. काल आणि परवा एवढ्या प्रचंड प्रमाणात लोकं फक्त सरकारी इस्पितळांकडेच पळाल्यामुळे तिकडे प्रचंड गर्दी झाली (जिथे निरोगी लोकांना जंतूसंसर्ग होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.) त्यामुळे पालिका आयुक्त श्री झगडे सांगत होते, तुमच्या नेहेमीच्या डॉक्टरकडे आधी जा, त्याला तुमच्या तब्येतीबद्दल जास्त कळतं. फॅमिली डॉक्टरने सांगितलं तरच सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी या.

आता बोला!!

अदिती

विकास's picture

7 Aug 2009 - 10:20 am | विकास

उत्तम बातमी. आता कोणी रँड होयला नको तर कोणी चाफेकर बंधू! :-)

मात्र अशा उलटसुलट गोष्टींमुळे आधीच असलेला सरकार बद्दलचा अविश्वास अजून वाढतो. शिवाय नक्की काय तयारी सरकारने या प्रसंगाला तोंड देण्याची केली आहे हे समजत नाही ते वेगळेच!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2009 - 5:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अविश्वास वाढतो हे खरंच!

पण रेडीओच्या माध्यमातून बर्‍यापैकी जागृती करण्याचा प्रयत्न होत आहे आणि हे कौतुकास्पद आहे. मी या दोन्ही बातम्या रेडीओ मिर्चीवर ऐकल्या. त्यांची लोकप्रियता बर्‍यापैकी असावी असं मानायला हरकत नाही (कारण खिडकीच्या शेजारी रेडीओ ठेवला तरी हेच एकमेव स्टेशन नीट ट्यून होतं आणि हा प्रयोग तीन रेडीओंवर करून झाला. असो.). सकाळी असणारी आर.जे. अगदी दर वीस मिनीटांनी या बद्दल बोलत होती. आणि हे सगळं पुणे महापालिकेतर्फे जनजागर सुरू आहे असं तिच्याकडूनच समजलं. हे ही नसे थोडके!

अदिती

विकास's picture

7 Aug 2009 - 6:47 pm | विकास

या माहीतीबद्दल धन्यवाद!

पुणे महापालिकेतर्फे जनजागर सुरू आहे

हाच माझा बालहट्ट आहे :-) अर्थात "दिल्ली अजून बरीच लांब आहे." (हा वाक्प्रचार आहे, हे येथील वाचकांना सांगतो, नाहीतर चर्चा दिल्लीच काय अटकेपार जाईल ;) )