"सप्तपदी १,२,३" तात्पर्य/सारांश

बामनाचं पोर's picture
बामनाचं पोर in काथ्याकूट
5 Aug 2009 - 9:36 am
गाभा: 

"सप्तपदी १,२,३" मधे युयुत्सु यांचा द्रुष्टिकोन हा पुरुषवादी होता , कदाचीत तसे अनुभव , केसेस त्यांनी पाहिल्या असतील. म्हणुन त्याचे मत टोकाचे आहे.. सगळ्य चर्चेतले तात्पर्य/सारांश मांडण्याचा प्रयत्न... गडबडीत खरडले आहे. शुद्धलेखनाच्या चुकांबद्द्ल दिलगीर .

====

भारताची समाज व्यवस्था तसेच विवाह व्यवस्था ही पुरुषप्रधान आहे.. कायदे ६० वर्षांचे आहेत पण ही पुरुषप्रधान रचना तर शेकडो वर्षांची आहे. इथे पुरुषांना जसे अधिकार दिले आहेत तसेच जबाबदरया देखिल दिल्या आहेत. लग्नाचाच विचार केला तर सप्तपदी बरोबरच होते ते कन्यादान .. " ही माझी कन्या आता तुला दान करीत आहे , तिची काळजी हे ".. तेव्हा पालन/पोषणाची/रक्षणाची तसेच पत्नी म्हणुन तिच्या शारिरीक / मानसीक/ कौटुंबिक गरजा पुर्ण करण्याची नवरयाची जबाबदारी ठरते.. पण तरीहि स्त्रियांना कुटुंब/समाजव्यवस्थेत दुय्यम स्थान होते ( आजही आहे. ) , कौटुंबिक/ शारिरीक छ्ळाला सामोरे जावे , सती सारख्या भयंकर प्रथा , हुंडाबळी या सगळ्या पार्श्वभूमीवर १९५० सालचे कायदे जर स्त्रीयांच्या बाजुचे / स्त्रीयांना न्याय मिळवून देण्याच्या हेतुने केले असतील तर त्यात काहीही चुकीचे नाही आहे.

धार्मिक / सांस्कॄतिक चौकट, सामाजीक/घरच्यांचे दडपण , घराण्याचे/घराचे समाजातील स्थान , नावलौलीक , अपरिहार्यता अशा अनेक कारणांमुळे का होइना पण भारतात एखादे वैवाहीक संबंध चांगले नसले तरी ते घटस्फोटापर्यंत जात नाहीत. अशी उदाहरणे अनेक पहायला मिळतात . १०००:११ असा घटस्फोटाचा दर भारतात आहे . आता शहरी भागात 'जग जवळ आले आहे , पण माणसे लांब गेली आहेत’ , इथे घटस्फोटाचे प्रमाण दर वर्षी ३-४ पट वाढते आहे. शहरात / आधुनिक , पुढारलेल्या कुटुंबात म्हणू हवे तर , स्त्रीयाचा सामाजीक स्तर उच्च आहे, आपल्या हक्कांबद्द्ल जागरुकता आहे , वैवाहीक आयुष्य हे फक्त "तो व ती" इतकेच आहे अशा परिस्थित याला पुरुषप्रधान न म्हणता ज 'सम-समान' कुटुंबव्यवस्था म्हणायला काही हरकत नसावी. ( आपण मुद्दा समजावा म्हणुन शहरी जीवनप्रणालीचा विचार करतोय.. याचा अर्थ ग्रामीण भागात स्त्रीया जागरुक नाहीत असे न्हवे. तसेच शहरातील स्त्रीयांना 'सासुरवास' नसतो असेही न्हवे )

मग अशा परीस्थितीत जेव्हा एखादे वैवाहीक संबंध घटस्फोटापर्यंत पोचतात तेव्हा ही कायदे हे स्त्रीयांच्या बाजुचेच आहेत.. आता इथे वैवाहीक संबंध बिघडण्यास जरी दोघेही सारखेच किंवा ती जास्त जबाबदार असेल , किंवा एखाद्या दुर्देवी तरुणाच्या बाबतीत जर बायको अगदी कजाग निघाली .. भांडकूदळ असेल, त्या तरुणाने, त्याच्या घरच्या व्यक्तींनी कितिही प्रयत्न केले, नमते घेतले तरी ती नांदायला तयार नसेल तरीही घटस्फोटाच्या वेळी कायदा हा तिच्याच बाजूचा आहे. पुरुषांना जास्तीत जास्त मिळतो तो 'घटस्फोट' तेही आर्थिक किंमत मोजायला लागुन.

आणी हे फक्त भारतात न्हवे तर जगातल्या प्रगत देशांमधे जीथे घटस्पोटाचे प्रमाण १०००:४८० आहे , तिथे सुदधा कायदे हे स्त्रीयांच्या बाजुचेच आहेत.

अर्थात तिलाही यातून काही फार आनंद होतो असे न्हवे. जेव्हा तो/ती घटस्फोटासाठी वकीलांची पायरी चढतात तेव्हा त्यांचे वैवाहीक संबंध कधीच संपुष्टात आलेले असतात, आपल्या वैवाहीक संबंधांचे वकीलाने कायद्याचा किस पाडत, भर न्यायालयात चीरफाड करणे कूणाला आवडेल. पण तिथे कोर्टात ते असतात फक्त वादी-प्रतीवादी , पती-पत्नी न्हवे आणि उद्दिष्ट असते ते ’ केस जिंकणे' . मग अशावेळी त्याला/ त्याच्या आई/वडिल/भाउ/बहीण यांना त्रास देण्याकरता ती ४९८ सारख्या कायद्यांचा दुरुपयोग करु शकते. अशा केसेसचे प्रमाण आज-काल वाढत आहे. आणि न्यायदेवता आंधळी आहे , तीथे चालतात ते पुरावे व कायदे त्यामुळे जरी दुरुपयोग होत आहे असे आढळले तरी कोर्ट पुरुषाच्या बाजुने निकाल देउ शकत नाही., फारतर ठेवलेल्या आरोपातून मुक्तता करेल , पण स्त्रीने दुरुपयोग केला असे असले तरी तिला काही सजा देता येत नाही..

मग याच्यावर उपाय काय ?..

युयुत्सु म्हणतात त्या प्रमाणे , सप्तपदी/शपथ घ्यायचीच नाही ??. त्याने काय होणार पण ??.. हिंदु विवाह हा सप्तपदीशीवाय होतच नाही तसेच .. एकतर्फी कायदे आहेत म्हणुन जर असा पावित्रा घेणे हे म्हणजे " भविष्यात कधीतरी भूकंपाने पडेल म्हणुन घर बांधायचेच नाही, आणि तंबुत राहायला जायचे "

मग कायदा बदलायचा ?? हेही नाही कारण ज्या स्त्रीयांना लग्नानंतरच्या जाचास सामोरे जावे लागते , शारिरीक छळ सहन करावा लागतो त्यांचा हे कायदे हा एकमेव आधार आहे . तुलनाच करायची झाली तर या कायद्याने मिळणारया न्यायाची उदाहरणे ही याच्या दुरुपयोगाच्या कित्येक पट जास्त असतील..

पारर्दशकता ?? लग्न ठरवताना दोन्ही कडच्या घरांनी पारर्दशकता ठेवणे , घरातच्या चांगल्या-वाईट परंपरा , आर्थिक स्थिती , स्वभाव यांची पारख करुन लग्न ठरवणे ?? कुणाची खात्री देता येते सांगा ? आज मी निर्व्यसनी आहे , उद्या दारुत बुडालेला असेन.. आज ती माझ्याशी एकनिष्ठ आहे , उद्या बॊस बरोबर पळुन जाईल...

मग उपाय काय , तर काहिही नाही... लग्न, संसार हा दोघांचा असतो , त्यात वाद होणारच , तेव्हा समंजसपणा दाखवणे टोकाची भुमिका न घेणे.. हे नात टिकवणे हे दोघांची जबाबदारी ती "आज" प्रामाणिकपणे पार पाडणे हाच उपाय.. बाकी सगळे "उद्या"वर सोडुन द्या... वकिलाची/कोर्टाची पायरी न चढणे हेच उत्तम

जास्तच जोरात भांडण झालेना तर ’हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेउन मस्त एखादा पुरिया-धनश्री ( http://www.esnips.com/doc/a20a76ae-1087-4c9f-9cb3-7a17b99fc9ca/01---Raag... ) ऎका.. डोक शांत होइल अन सगळे वाद संपतील .. :)

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

5 Aug 2009 - 9:43 am | युयुत्सु

सप्तपदी/शपथ घ्यायचीच नाही ??. त्याने काय होणार पण ??..

पुरुषाना कमी झळ बसते. कायदेशीर गुंता कमी निर्माण होतो.

सहज's picture

5 Aug 2009 - 9:58 am | सहज

पुर्वी लग्न ठरवताना बैठकीला आम्हाला हुंडा वरदक्षीणा नको / देणार नाही (स्वखुशीने काय ते...)इ.बोलले जायचे. तसे आता यापुढे लग्न वैदीक पद्धतीने होईल पण सप्तपदी घातल्या जाणार नाहीत. तुमच्या इच्छेने तुम्ही स्व:ताची पावले चाला पण मुलगा चालणार नाही की शपथ घेणार नाही असे होईल का?

सप्तपदीशिवाय हिंदू पद्धतीचे संस्कार सांगा म्हणजे आता कसे, रजिस्टर मॅरेज किंवा ज्ञानप्रबोधिनी स्टाईल म्हणतात तसे यापुढे युयुत्सु पद्धतीने म्हणता येईल.

चला युयुत्सुपद्धत देखील येउ दे. :-)

विशाल कुलकर्णी's picture

7 Aug 2009 - 1:24 pm | विशाल कुलकर्णी

एकदा लग्न कायदेशीररित्या पुर्ण झालय म्हणल्यावर आपोआपच सगळे कायदे लागु होतातच की, मग सप्तपदी करा अथवा नका करु काय फरक पडतो!

एकच उपाय, लग्नच करु नका! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

युयुत्सु's picture

5 Aug 2009 - 10:09 am | युयुत्सु

तेच तर मी मूळ ले़खात सांगितले. दूसरा एक अवांतर मुद्दा असा - कायदा स्त्रीच्या बाजूने एवढा खंबीरपणे उभा असताना सप्तपदीचं लोढणं पुरुषांच्या गळ्यात बांधायची आवश्यकताच काय? कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तसेच बायकोचं रक्षण करण्यास कायदे समर्थ आहेत...

नितिन थत्ते's picture

5 Aug 2009 - 8:48 pm | नितिन थत्ते

सप्तपदीचे लोढणे अजूनही कळले नाही.

स्त्री स्वतःला मुक्त तेव्हाच समजू शकते जेव्हा ती आर्थिक निर्णय स्वतःचे स्वतः घेऊ शकते. आणि ते नसेल तर तिला सारे अन्याय मुकाट्याने सहन करावे लागतातच. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यावरच ती निदान 'समान' बनण्याचा विचार करू शकते.

मला तरी माझ्या आजुबाजूच्या समाजात युयुत्सूंना ज्यांची भीती वाटत आहे अशा स्त्रिया क्वचितच दिसल्या आहेत.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

सहज's picture

5 Aug 2009 - 11:06 am | सहज

महाराज ही बातमी पहा. आनंदी आनंद गडे

Kicking-daughter-in-law-or-divorce-threat-not-cruelty-SC

नीधप's picture

5 Aug 2009 - 11:41 am | नीधप

चला आता मग युयुत्सु तुम्ही लाथा मारायला हरकत नाही..

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2009 - 12:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नी, पण त्यांना मुलगी आहे! ते सुनेला कसे लाथा मारतील?? पुन्हा ३७७ का? ;-)

अदिती

नीधप's picture

5 Aug 2009 - 1:31 pm | नीधप

ह्म्म्म मग एकतर ३७७ नाहीतर लाथा मारण्यासाठी सून यावी म्हणून मुलासाठी प्रयत्न?
नाहीतर बायकोला लाथ.. सासूने मारली कीच केवळ ४९८ नाही असं नाही बहुतेक... सासरच्या कोणीही मारली तरी चालत असावी.. :)

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

युयुत्सु's picture

5 Aug 2009 - 5:09 pm | युयुत्सु

पुढचा जन्म मुकत स्त्रीचा मिळावा म्हणून देवाला सा़कडं घातलं आहेच. तेव्हा लत्ताप्रदानाचा आनंद फकत पुढील जन्मीच मिळू शकतो. तोही मुलगा होउन सून घरात आली तर... या जन्मी मात्र मुलगा नाही या सुखद कल्पनेतच मी जग विसरलो आहे.

सूहास's picture

5 Aug 2009 - 2:20 pm | सूहास (not verified)

सू हा स...

JAGOMOHANPYARE's picture

5 Aug 2009 - 2:30 pm | JAGOMOHANPYARE

हो.

JAGOMOHANPYARE's picture

5 Aug 2009 - 2:31 pm | JAGOMOHANPYARE

हो.

JAGOMOHANPYARE's picture

5 Aug 2009 - 2:40 pm | JAGOMOHANPYARE

वकीली चर्चेतून मिळालेली माहिती :

१. बायको शिकलेली असेल, स्वताच्या पायावर उभी राहू शकत असेल, तर तिला पोटगीची गरज नसते.
२. अशिक्षित, न कमावणार्या बायकोला फक्त उदर निर्वाहा एतकी रक्कम द्यावी लागते... तिच्या वरील इतर जबाबदार्‍या, तिचे आई बाप, त्यान्ची कर्जे... अशान्ची जबाब्दारी नवर्‍यावर येत नाही.
३. बायको सतत वेगळी रहात असल्याण्याची धमकी देत असल्यास तिला खुशाल तसे करू द्यावे... तिला संसारात इन्टरेस्ट नाही आणि आपल्याशिवाय ती जगू शकते, हे आपल्याला सिद्ध करणे सोपे जाते..
४. आपल्याला नोकरीची ठिकाण बदलण्याची संधी असेल, तर आनन्दाने आपण तिला सोडून जावे... तिची मुळची नोकरी सोडून आपल्याजवळ येण्यास तिला विनम्रपणे सुचवावे.. ( आपल्याला आई असल्यास ती सुनेला लाथ घालू शकते... :) तिची मदत आपण घेऊ शकतोच..)

विशाल कुलकर्णी's picture

7 Aug 2009 - 1:28 pm | विशाल कुलकर्णी

<<१. बायको शिकलेली असेल, स्वताच्या पायावर उभी राहू शकत असेल, तर तिला पोटगीची गरज नसते.>>>

हे हॉलीवुडवाल्यांना सांगा, डोक्यावर घेवुन नाचतील तिथले पुरूष तुम्हाला ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

सखाराम_गटणे™'s picture

7 Aug 2009 - 6:32 pm | सखाराम_गटणे™

आमचीही अशीच चर्चा झाली होती,
बायको जर नोकरीला असेल आणि नवरा बेकार असेल तर तो बायकोला पोटगी मागु शकतो.

JAGOMOHANPYARE's picture

5 Aug 2009 - 3:05 pm | JAGOMOHANPYARE

वकिलाची पायरी चढणे भाग पडले एका मित्रामुळे (!?).. त्याची कहाणी..

लग्न होऊन नुकतेच ३ महिने झालेले, बायकोलाही लगेच पहिल्याच महिन्यात नोकरी मिळालेली.. आणि अचानक बायकोने बॉम्ब टाकला... माझे पालन हे तुमचे धर्म कर्तव्य आहे... पण मला शिक्षण मात्र आई बापाने दिलेले आहे, सबब माझ्या पूर्ण पगारावर त्यांचाच अधिकार आहे....

बायको मूळ एका खेड्यात नोकरी करत होती... सासरी आल्यावर मुम्बईत तिला फार चान्गल्या पगाराची नोकरी मिळाली... तिला नोकरी मिळण्यापूर्वीच मित्राने तिला सान्गितले होते की तुझ्या पगाराच्गा १/३ तू माहेरी दे... उर्लेले सगळे तुझ्याच नावाने ठेव.. तिलाही ते पटले होते..

लग्नाआधी मात्र आई, बाप, मुलगी सगळ्यानी मुलगी नोकरी करेल असे कबूल केले होते... पण अचानक हा पवित्रा नवा होता...मुलगी, तिचे आई बाप, बहीण यांचे ही पगारासाठी मित्राला फोन येऊ लागले, अन सगळा उलगडा झाला.

या विष्यावर बायको रोज भान्डण काढू लागली... शेवटी मित्राने तिला स्पष्ट्पणे सान्गितले... घरात समाधान आणि शान्ती महत्वाची आहे... तु असलीस नसलीस तरी फरक पडच नाही... तू सरळ या मुद्द्यावर घटस्फोटच घे.. मी बिन बायकोचाच राहीन आणि सुखाने करियर तरी करीन...

कायद्यानुसार मुलीवर फक्त आई बापाच्या उदर निर्वाहाची जबाबदारी असते, तीही सर्व भावन्डात मिळून... मुळात बायकोचा १/३ पगार हा देखील तिच्या मुळच्या पगारापेक्शा अधिकच होता आणि कायदेशीर जबाबदारीच्या तर किती तरी अधिक होता.... भान्डण काढण्याचा सल्ला देणारी तिची बहीण मात्र रिकाम टेकडीच आहे....

बायको भान्डून माहेरी गेली... मित्रानेही खुशाल तिला जाऊ दिले.. तुझा सगळा पगार माहेरीच द्यायचा तर तिथेच रहा असे सान्गितले... बापालाच धर्म कर्तव्य करू दे.... 'सगळ्या गरजा' बापालाच भागवायला सान्ग.. नाही तरी तो स्वताला ब्रह्म देव समजतोच !.. इति मित्र..

तिसर्‍याच दिवशी मुलगी परत आली... माहेरी एक पैसाही देणार नाही या अटी वर नान्दत आहे...

मित्राने ही तिला स्पश्टपणे सान्गितले आहे... तू घरात असली नसलीस तर फरक पडत नाही.. समाधान व शान्तता महत्वाची आहे... तू नोकरी कर न कर.. ४ वेळा अन्न, चार कपडे आणि नॅपकीनचा पुडा .. एवढ्या बेसिक गरजा मी भागवू शकतो... जेव्हा सन्सार हे आपलेही धर्म कर्तव्य आहे, याची अक्कल तुला येईल, तेन्व्हा पाहू पुढच्या संसाराचे...

माहेरी पैसे देण्यास त्याचा विरोध नव्हता..... पण बायकोने एवढे टेक्निकल बोलण्याचे कारण नव्हते... त्याने तिला स्पष्टपणे सान्गितले... तुझ्या आई बापाला कोर्टात जायला सान्ग... उदर निर्वाहाचे साधन नाही, पोरीचा पगार मिळावा म्हणून .. कोर्ट सान्गेल तेवढा हिस्सा त्याना देऊ..

प्रत्यक्षात आई बापाची शेती आहे... त्यामुळे ते तसे सान्गू शकत नाहीत... पोरीच्या बापाला कर्ज बुडवण्याची भारी हौस !... पोरीच्या पगाराचा दाखला काढून घेऊन त्यावरही कर्ज काढले तर, ही मित्राची भीती.. म्हणून स्वताचे सगळे व्यवस्थीत असूनही या फन्दात तो पडला....

आता सगळे शान्त आहे...

महेश हतोळकर's picture

5 Aug 2009 - 3:32 pm | महेश हतोळकर

लै भारी. एकदाच काय तो मनस्ताप. परत परत टेन्शन नको.

-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

मुळात सप्तविधी हा विधी झाला तरच हिंदु मॅरेज अ‍ॅक्ट नुसार लग्न होते हाच गैरसमज आहे. या कायद्यानुसार वधु किंवा वर यापैकी कोणाच्याही कुटुंबाच्या पारंपारिक पद्धतीनुसार झालेला विवाह वैध ठरतो आणि त्याच कलमाचा पुढे अर्थ लावला तर सप्तपदीशिवायही हिंदु पारंपारिक पद्धतीने विवाह होऊ शकतात असे दिसते. कायद्याचे ते कलम असे आहे:
7. Ceremonies for a Hindu marriage.- (1) A Hindu marriage may be solemnized in accordance with the customary rites and ceremonies of either party thereto.
(2) Where such rites and ceremonies include the Saptapadi (that is, the taking of seven steps by the bridegroom and the bride jointly before the sacred fire), the marriage becomes complete and binding when the seventh step is taken.

हे विचारात घेता सप्तपदीला पुढच्या घोळांबद्दल जबाबदार धरणे चुकीचे ठरेल.

दुसरा मुद्दा: मुळ धाग्यांमधे संबंध येतो तो आय पी सी कलम ४९८ (अ) व डोमेस्टिक व्हायोलन्स अ‍ॅक्ट या कायद्याचा. हे कायदे स्त्रियांना झुकते माप देतात हे मान्य तसेच या कायद्यांचा गैरवापर होतो हे ही. पण बहुतेकदा या कायद्यांचा वापर करुन पोटगी किंवा अन्य रिलीफ मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलांना प्रत्यक्षात ते फायदे कधीच मिळत नाहीत असे दिसते. अश्या महिलांना उलट समाजातुन अघोषित बहिष्काराचा सामनाच करावा लागतो. अशी अनेक उदाहरणे मला माहिती आहेत.

अन शेवटी हे सर्व कायदे असले तरी त्यांचा गैरवापर झाल्याच्या घटना खूपच कमी आहेत, अन पुरुषप्रधान संस्कृतीत ते साहजिकच आहे. उलट्पक्षी नवर्‍याने व त्याच्या कुटुंबियांनी बाईला छळणे अश्यासारख्या प्रकारांची संख्या खूपच जास्त आहे. अनेकदा असे प्रकार घडुन पण ती बाई समाजाच्या भीतीने तक्रार करणे टाळते. अन मग असे प्रकार आत्महत्या किंवा खुनासारखे गंभीर गुन्हे झाल्यावर उघडकीला येतात. शिवाय कोणतेही गंभीर प्रश्न उभे न रहाता बहुसंख्य लोकांचे संसार चालतातच. थोडक्यात म्हणजे काही लोक गैरवापर करतात म्हणुन कोणत्याही कायद्यावर टीकेची झोड उठवणे अयोग्य आहे. अन सप्तपदीला त्यासाठी जबाबदार धरणे तर पुर्णतः अयोग्य आहे. बहुतेकदा आय पी सी कलम ४९८ (अ) व डोमेस्टिक व्हायोलन्स अ‍ॅक्ट या कायद्यांच्या केसेस चालताना लग्न झाले आहे हे आरोपीच मान्य करतो अन एकदा ते मान्य केले की मग कोणते विधी झाले हा मुद्दाच गैरलागु ठरतो.

---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2009 - 5:18 pm | प्रकाश घाटपांडे

अ‍ॅड अभिजित सरवटे यांनी सेमिनार मध्ये मांडलेल्या मतानुसार जेव्हा कायदेशीर पळवाटांचा वापर करुन एखादा विवाह हा वैध नाही/आहे असे सिद्ध/असिद्ध करण्याचा आटापिटा होतो त्यावेळी सप्तपदी हा कळीचा मुद्दा ठरतो. पण अशा बाबी कमीच.
(पेशल म्यारेज एक्टनुसार साद म्यारेज केलेला)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2009 - 5:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण विवाह नोंदणी सक्तीची आहे ना? सप्तपदीचा संबंध येईलच कशाला??

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2009 - 5:35 pm | प्रकाश घाटपांडे

जन्म- मृत्यु ची नोंद देखील सक्तीची असते. पण अजुनहि एक वर्ग असा आहे तिथ या गोष्टी पोचत नाहीत. ज्यांच्या विवाहाच्या/जन्मतारखेच्या नोंदीच नाहीत असा पण वर्ग भारतात आहेच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2009 - 5:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असा वर्ग सप्तपदी केली का नाही यावरून न्यायालयात वकिलांमार्फत वाद घालतो? माझा काहीतरी गैरसमज होत आहे, नक्कीच!!

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2009 - 6:04 pm | प्रकाश घाटपांडे

वाद वकील घालतात. अशील अडाणी देखील असतात. वैधता हा मुख्य मुद्दा आहे. वाटा/पळवाटा तुन सिद्ध /असिद्ध करण्यासाठी सप्तपदीला तांत्रिक दृष्ट्या वेठीस धरतात. अशा केसेस सरसकट नसतात. अनेक परित्यक्तांची घटस्फोटित म्हणुन नोंद असत नाही. न्यायालयातील किश्श्यांवर कुणीतरी एक पुस्तक लिहिल्याचे पुसटस आठवतय.
अवांतर- मतदारयादीतील प्रत्येकाकडे जन्माची नोंद केल्याचा दाखला असतो काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मुळात सप्तविधी हा विधी झाला तरच हिंदु मॅरेज अ‍ॅक्ट नुसार लग्न होते हाच गैरसमज आहे.

परत अज्ञान दा़खवत आहात...कलम ७(२) परत वाचा.

पण बहुतेकदा या कायद्यांचा वापर करुन पोटगी किंवा अन्य रिलीफ मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलांना प्रत्यक्षात ते फायदे कधीच मिळत नाहीत असे दिसते. अश्या महिलांना उलट समाजातुन अघोषित बहिष्काराचा सामनाच करावा लागतो. अशी अनेक उदाहरणे मला माहिती आहेत.

४९८-अ खाली भरडल्या गेलेल्या पुरुषांचा मदत गट याहू वर कार्यरत आहे. तीथे रोज मदतीसाठी किती requests येतात ते बघा आणि मग प्रमाण कमी की जास्त ते ठरवा.

शिवाय माझ्या मूळ विधानाकडे आपण दूर्लक्ष केले आहे. "महिलांना प्रत्यक्षात ते फायदे कधीच मिळत नाहीत असे दिसते" हे विधान सत्य ठरायला कोर्टात कमीतकमी ४-५ वर्षे पुरूषाला झगडावे लागते. त्या महिलांना समाज नाकरताना मी तरी बघितले नाही.

माझ्या माहितीत असेही वकील आहेत की जे घरातील वृद्धाना लवकर स्वर्गवास घडावा म्हणून खच्चीकरण्यासाठी सुनांना छ्ळ कायद्याखाली केस लावायला लावतात (हे मी माझ्या डोळ्यानी बघितले आहे). अशी केस जिंकली की हरली हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसतो. कारण केस हरली तरी स्त्रीचे फारसे नुकसान होत नाही.