आंबा लस्सी

राजमुद्रा's picture
राजमुद्रा in काथ्याकूट
20 Feb 2008 - 4:47 pm
गाभा: 

साहित्य :
आंब्याचा गर ४ वाट्या,
दही १ वाटी,
दूध ४ वाट्या,
साखर ३ चचमचे,
वेलदोडे पूड १/२ चमचा.

हे सगळ मिक्सरमध्ये फिरवून फ्रिजमध्ये थंड केली की झाली आंबा लस्सी तय्यार!
उन्हाळा जवळ येत आहे, आंबेही येत आहेत. तेव्हा लागा तयारीला :)

राजमुद्रा :)

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

20 Feb 2008 - 5:11 pm | मनस्वी

मस्त आहे उन्हाळा रेसिपी

मनस्वी

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 5:19 pm | विसोबा खेचर

आपल्या पाककृतीबद्दल नक्कीच आपुलकी आहे, परंतु माझं मत विचाराल तर मला आंबा लस्सी किंवा आम्रखंड या सारखे पदार्थ आवडत नाहीत. हे पदार्थ खाताना धड आंबा खाल्ल्याचेही समाधान मिळत नाही आणि मूळ पदार्थ खाल्ल्याचेही समाधान मिळत नाही!

लस्सी किंवा श्रीखंड हे मूळ पदार्थ खातांनाच अधिक मजा येते..

अर्थात, हे माझं वैयक्तिक मत! प्रत्येकाची आवडनिवड वेगळी...!

अजूनही पा कृ येऊ द्यात..

आपला,
(फळांच्या राजाला कुणाशीही शेयर न करणारा!) तात्या.

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 5:30 pm | राजमुद्रा

अहो तात्या!
थोडासा बदल म्हणून काय हरकत आहे?
एकदा करून तर बघा, खाल्ल्यावर कदाचित(नक्की) आवडेल तुम्हाला :)

राजमुद्रा :)

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 5:33 pm | विसोबा खेचर

एकदा करून तर बघा, खाल्ल्यावर कदाचित(नक्की) आवडेल तुम्हाला :)

चलो, कोई बात नही! एकदा नक्की करून पाहीन...

आपला,
(समजूतदार) तात्या.