सप्तपदी आणि माझी भूमिका - भाग २

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
3 Aug 2009 - 11:44 am
गाभा: 

सप्तपदी वरील चर्चेचा समारोप करायचा विचार आहे. माझी भूमिका अधिक स्पष्ट व्हावी अशी काही जणानी मागणी केल्या मुळे मूळ लेखातील भूमिके संदर्भातील उतारा परत एकदा येथे देतो. प्रतिक्रिया वाचून समारोपाचा मजकूर लिहायला घेईन.

" एखादे लग्न परिचयोत्तर होत असेल तर ते पूर्ण विचारांती होत आहे असे मानून एकनिष्ठ राहण्याची पथ घेणे तर्क-सुसंगत ठरते पण जेव्हा 'स्थळे बघून' विवाह जुळवले जातात तेव्हा आपण ज्या मुलीबरोबर सात जन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणार आहोत ती मुलगी, विशेषत: कायदे एकतर्फी असताना, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण पाडेल याची कोणतीही खात्री नसताना, पुरुषाने अशी शपथ घेणे हे आत्मघातकीपणाचे निदर्शक आहे, असेच माझे स्पष्ट मत आहे."

प्रतिक्रिया वाचून समारोपाचा मजकूर लिहायला घेईन.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2009 - 1:21 pm | प्रकाश घाटपांडे

सप्तपदी बाबत येथे माहिती आहे. त्यात शपथ भानगड नाही ब्वॊ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सहज's picture

3 Aug 2009 - 1:26 pm | सहज

खरचं की. युयुत्सुराव बहुतेक सप्तपदींचा वेगळा अर्थ लावत असावेत.

टारझन's picture

4 Aug 2009 - 2:11 pm | टारझन

पन्नासच्या वर प्रतिसाद झाले की तिसरा धागा काढून तिकडे "उहापोह" चालू ठेवावा अशी मी विणंती करतो !! छाण उहापोहं चालु आहे !

- टारझन

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 2:18 pm | युयुत्सु

सप्तपदी मधले मंत्र शपथ आहेत की नाहीत यावर नेट वर असंख्य पुरावे आहेत. Hindu marriage vow या शब्दावर गुगल केल्यास ते उपल्ब्ध होतील, शिवाय कोणत्याही वकीलाला यासंदर्भात विचारावे.

सहज's picture

3 Aug 2009 - 3:04 pm | सहज

बोंबला एकतर आता सप्तपदीचा नक्की अर्थ कळायला व कुठला अर्थ मान्य केला जावा याकरता एक वेगळी समिती स्थापायला लावणार तुम्ही.

असो तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे शोध घेतला असता मिळालेल्या दुव्यावर काही एकतर्फी, अन्यायकारक वाटत नाही आहे. उलट ही शपथ दोघांनी घेतली आहे. तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते कृपया सांगा. त्यामुळे लवकरात लवकर अजुन कुठले दुवे न देता, जे काय आहे ते येथेच लिहावे व समारोप करावा. चर्चा अजुन इकडे तिकडे फाटे न फुटता संपली किंवा निदान तुमचे नक्की आक्षेप कळले तर फार बरे होईल.

विशेष सुचना - क्रिप्टीक बोलत, दुवे देत, आम्हाला इकडे तिकडे पिटाळणे, शोध घ्यायला लावणे, तुमच्या मनातले समजुन घेणे हे फक्त "आद्यगुरु" करु जाणे. ते सुद्धा एका लिमीट मधे. तो अधिकार आम्ही तुम्हाला दिला नाही नावसाधर्म्य असले तरी. कृपया चांगले ध्यानात घ्यावे.

Seven Vows In Hindu Wedding

  1. The bride and the groom take the first step of the seven vows to pledge that they would provide a prospered living for the household or the family that they would look after and avoid those that might hinder their healthy living.
  2. During the second step of the seven pheras, the bride and the groom promise that they would develop their physical, mental and spiritual powers in order to lead a lifestyle that would be healthy.
  3. During the third vow, the couple promises to earn a living and increase by righteous and proper means, so that their materialistic wealth increases manifold.
  4. While taking the fourth vow, the married couple pledges to acquire knowledge, happiness and harmony by mutual love, respect, understanding and faith.
  5. The fifth vow is taken to have expand their heredity by having children, for whom, they will be responsible. They also pray to be blessed with healthy, honest and brave children.
  6. While taking the sixth step around the sacred fire, the bride and the groom pray for self-control of the mind, body and soul and longevity of their marital relationship.
  7. When the bride and the groom take the seventh and the last vow, they promise that they would be true and loyal to each other and would remain companions and best of friends for the lifetime.
विशाल कुलकर्णी's picture

3 Aug 2009 - 1:59 pm | विशाल कुलकर्णी

खरेच की ! उलट या दुव्यावरुन तर असे लक्षात येते की इथे वधुकडुन भविष्यात अपेक्षित गोष्टींची, बंधनांची यादीच तिला ऐकवली जातेय. मला तर यात वराला काहीच धोका दिसत नाहीये. :-)

मला यातलं फारसं काही कळत नाही. मात्र माझा एका गोष्तीवर ठाम विश्वास आहे की कुठलेही नाते हे परस्परांवरील विश्वासावर अवलंबुन असते. सप्तपदीच्या वेळी जर कुठली वचने द्यावी लागत असल्यास, शपथा घ्याव्या लागत असल्यास (मला माझ्या लग्नात असे काही झाल्याचे आठवत नाही, आमचे भटजीबुवा बहुदा २१व्या शतकातील असल्याने त्यांनी अशा गोष्टींना फाटा दिला असावा ;-) ) आणि त्यांचा कायदेशीर रित्या इतका उपयोग होत असेल तर मला वाटते समाजातील घटस्फोटांचे प्रमाण कायद्याच्या भीतीने तरी कमी व्हायला हवे होते. कारण आजही प्रत्येक लग्नात सप्तपदी ही अपरिहार्यपणे केली जातेच. पण घटस्फोटांचे प्रमाण वाढतेच आहे.

असो, कुठल्याही शपथांपेक्षा परस्परांवरील विश्वास, प्रेम समोरच्या माणसाला बदलण्याचे सामर्थ्य बाळगुन असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. ज्या व्यक्तीला असा विश्वास वाटत नाही त्याने लग्नाचा विचार करु नये हे माझे वैयक्तिक मत आहे. चुभुदेघे.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

JAGOMOHANPYARE's picture

3 Aug 2009 - 2:26 pm | JAGOMOHANPYARE

माझा अंदाज खरा ठरला तर.... सप्तपदी चा एक धागा काढून अजून त्याचा गोंधळ निस्तरायच्या आत हा माणूस दुसरी सप्तपदी घालून ही मोकळा झाला !

द्वि धागा प्रतिबन्धक कायदा नाही ना आस्तित्वात , म्हणुन तर ! मग जर द्वि भार्या प्रतिबन्धक कायदा आणि नातिचरामि काढुन टाकले तर हा माणूस किती धागे उसवत बसेल !!

;;;;;;; :)
धागा धागा अखन्ड विणू या !

सहज's picture

3 Aug 2009 - 2:30 pm | सहज

५०च्या वर प्रतिसाद गेले की परत वाचायला शोधाशोध करायला त्रास होतो म्हणुन मीच त्यांना विनंती केली व म्हणून त्यांनी दुसरा धागा काढलाय, त्यावरुन उगाच वैयक्तिक टिका नको.

बाकी युयुत्सुरावांची मते जितकी लवकर व जितकी सुस्पष्ट येतील तितके चांगले.

JAGOMOHANPYARE's picture

3 Aug 2009 - 3:55 pm | JAGOMOHANPYARE

१. विवाह नोन्दणी जर व्यवस्थीत झाली असेल तर सप्तपदी झाली होती की नव्हती याला अर्थ उरत नाही... कारण हल्ली विवाह नोन्दनी साठी पुरोहिताची उपस्थिती अनिवार्य आहे... नोंदणीचा पुरावा असताना सप्तपदी झाली नाही म्हणणे म्हणजे बारावीचे सर्टीफिकेट असताना मी सातवी पास झालोच नव्हतो, त्या अधारावर माझे बारावीचे सर्टिफिकेट रद्द बातल ठरवा असे म्हणण्या सारखे आहे..

२. विवाह नोंदणीच नसेल, इतर पुरावेही नसतील, तर सप्त पदी झालीच नव्हती असे म्हणून पुरुष पळ काढु शकतो... पण कोर्ट अशा वेळी इतर पुरावेही पहाते, नुसते एकत्र राहणेही कोर्टाला पुरते...

३. धर्म ग्रन्था मध्ये पती पत्नी असे शब्द आढळतात... पण बर्‍याच वेळेला कायदे हे एनी ऑफ द स्पाउस अशा शब्दात असतात, त्यामुळे ते दोघनाही लागु होतात.. या न्यायाने पुरुष देखील पोटगीला पात्र आहे...

४. विवाह लव मॅरेज आहे का अरेन्ज हे पहाणे सरकारचे काम नाही... बाजारात उघड्यावर ठेवलेला आम्बा घेतला काय आणि पॅक करन्डी आणून नन्तर घरात फोडला काय.... आम्बा कुजका निघाला तर सरकार त्याला काय करणार ? सप्तपदीवर खापर फोडणे अशक्य झाल्यावर आता अरेन्ज मॅरेजचा नवा युक्तीवाद चालू करण्यात काय मतलब आहे ..!शिवाय हा युक्तीवाद मुलीच्या बाजूनेही लागू होतोच की... रादर मुलीची बाजू जास्त दयनीय असते.... कारण बायको चान्गली नाही निघाली तरी नवरा आपल्याच घरात असतो, बायकोला मात्र दुर्दैवाने जोडीदार चान्गला नाही निघाला तर नवरा, सासु, सासरा आणि इतर सर्वजणही दुरावू शकतात... त्यामुळे एकतर्फी नियम असणे यातही फार चुकीचे नाही... धर्म ग्रन्थ लिहिले गेले तेन्हा बायका स्वतन्त्रपणे नोकरी करत नव्हत्या... अर्थात या कायद्याची पुरुषाना झळ जास्ती पोहोचते हे मात्र निर्विवाद.... लग्न झालेल्या मुलीचा सम्पूर्ण पगार आपल्यालाच मिळावा म्हणून मुलीच्या आई बापाने मुलीला हाताशी धरून जावयाचा छळ चालवणे, हा प्रकार मी 'नको इतक्या जवळून' पाहिलेला आहे !

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 3:58 pm | युयुत्सु

धोक्यांचा विचार करू

धोके कोणते? धोके कोणते? असा धोशा बर्‍याच जणानी लावला होता. घाटपांड्यांनी सप्तपदीच्या मंत्राच्या अर्थाचा जो दुवा दिला आहे त्या अनुषंगाने धोक्यांचा विचार करू.

पहिले पाऊल - हे वधू, तुझे-माझे सख्य झाले आहे.तू अन्नदात्री व दीर्घायू संततीची माता हो.
दुसरे पाऊल - हे वधू, तू दोन पावले चालली आहेस म्हणून मला बलवर्धक हो.
तिसरे पाऊल - हे वधू, तू तीन पावले चाललीस, आता मला धन देणारी हो.
चवथे पाऊल - हे वधू, चार पावले चाललीस, आता माझी सुखवर्धिनी हो.
पाचवे पाऊल - हे वधू, तू पाच पावले चाललीस, आता संततिवर्धक हो.
सहावे पाऊल - हे वधू, तू सहा पावले चाललीस म्हणून सहाही ऋतूंत प्राप्त होणारे भोग देणारी हो.
सातवे पाऊल - हे वधू, तू सात पावले (माझ्याबरोबर) चालली आहेस. यास्तव माझी दृढ सखी हो.

यातील सर्वात महत्त्वाची अपेक्षा म्हणजे कामजीवनात योग्य ती साथ. बायकोने नवर्‍याला सेक्स नाकारला तर तो वसूल करायचा कोणताही मार्ग पुरुषाकडे उपलब्ध नाही. या उलट तसा प्रयत्न चूकून झालाच तर marital rape चे आरोप होण्याचा धोका पुरुषाला जास्त. बायकोने नवर्‍याला जेवण दिले नाही तर ते वसूल करायला कोणताही कायदा पुरूषांसाठी उपलब्ध नाही. पण याउलट स्त्रीच्या गरजा पुरुषाने पूर्ण केल्या नाहीत तर मात्र नवर्‍याचे हाल खायला कुत्रं सुद्धा पुढे येत नाही.

नवर्‍याने वर व्यक्त केलेल्या अपेक्षा वधूने जर पूर्ण केल्या नाहीत, तर वराला आपल्या बायकोला सोडून देण्याशिवाय कोणताही मार्ग नसतो. आणि जेव्हा विवाह हिंदू विवाह कायद्या खाली केलेला असतो तेव्हा पुरुषाला compensationच्या नावाखाली जास्तीत जास्त किंमत मोजावी लागते. Special Marriage Act खाली लग्न झालेले असल्यास या compensationच्या झळा कमी बसतात. बरं घटस्फोट घेउन पुरुष मोकळा होतो का तर याचं खरं उत्तर नाही असंच आहे. घट्स्फोटीत स्त्रीने दूसरे लग्न केलें नाही तर ती न्यायालयाचे दरवाजे केव्हाही ठोठावू शकते.

तेव्हा
१.आधुनिक मुक्त स्त्रीकडून या सप्तपदीतील अपेक्षा पूर्ण होतील याची कोणतीही खात्री नाही.
२. झाल्या नाहीत तर त्या वसूल करण्यासाठी कोणताही कायदेशीर मार्ग उपलब्ध नाही.
३. स्त्रीला मात्र तीच्या हक्कांची वसूली करायला कायद्याने सर्व मदत केली आहे.
४. प्रकरण विकोपाला जाउन न्यायालयात गेल्यास Man is guilty until proven innocent आणि Woman to be protected at all cost या दोन तत्वांचा पुरुषाना होणारा भयानक मनस्ताप (अगदी HIV झालेल्या बायकोला सोडण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे)

असे असताना, आधुनिक पुरुषाने सप्तपदीच्या शपथेत आणि तज्जन्य धोक्यात स्वत:ला गुंतवून घ्यावे का हा मला सतावणारा प्रश्न मी माझ्या चिंतनिकेतील लेखात चर्चिला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2009 - 4:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

केवढे हे धोके पुरुषांना! अय्या, बरंच झालं किनै मी पुरूष नाही ते!

बादवे, जेवढे धोके त्याच्या दुप्पट वेळा प्रतिसाद देण्याची नवी प्रथा आहे वाटतं हिंदू आंतरजाल कायद्यात! ;-)

सॉरी, पण हे सगळं "रामा"यण वाचून इथे काही तारतम्य असणारा प्रतिसाद द्यावा असं वाटलं नाही. अवांतर वाटल्यास संपादक प्रतिसाद अप्रकाशित/संपादित करू शकतात.

अदिती

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 4:39 pm | युयुत्सु

मी पण पुढचा जन्म मुक्त स्त्रीचा मिळावा अशी प्रार्थना करतो देवा कडे. आणि म्हणूनच मला मुलगी आहे याचा मला अभिमान आहे.

स्वाती२'s picture

3 Aug 2009 - 8:08 pm | स्वाती२

>>म्हणूनच मला मुलगी आहे याचा मला अभिमान आहे.
जन्माला येणार्‍या बाळाचे लिंग निसर्ग ठरवतो तेव्हा मुलगा/मुलगी आहे म्हणून अभिमान वाटण्यासारखे काय आहे? मूल मोठे झाल्यावर आपण एक सुजाण नागरिक/चांगली व्यक्ती घडवण्यात यशस्वी झालो म्हणून थोडा अभिमान वाटणे ठीक आहे.

घरात सून येऊन ती छळणार नाही ही कल्पना फार सुखद आहे.

अनामिक's picture

4 Aug 2009 - 7:18 am | अनामिक

हा हा हा... म्हणजे तुमची मुलगी दुसर्‍या घरी जाऊन त्यांचा छळ करणार आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? नव्हे तुमच्या म्हणन्याचा असाच अर्थ निघतो.

-अनामिक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2009 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरी कल्पना दिलीस रे अनामिक! पुढच्या वेळेस सासरी गेले की लगेच सूनवास, अर्थातच छळवाद, सुरू करेन ...

बादवे युयुत्सुमहाराज, सून लांब राहूनही छळू शकते (निरिक्षणातून विज्ञान!) ; जावईतर दशमग्रह असतो असं कुठल्याशा संस्कृत 'सु'भाषितातच लिहीलं आहे ना?

छ्या! कितीही प्रयत्न केला तरी या धाग्यावर सरळ प्रतिसाद देताच येत नाही आहे ... बहुदा मुलगी असल्याचा परिणाम असावा, त्यामुळे पुरूषाने सुरू केलेल्या धाग्यावर वाकडेच प्रतिसाद येत आहेत! ;-)

अदिती

विकास's picture

4 Aug 2009 - 9:49 am | विकास

म्हणूनच तर म्हण आहे: "जावई माझा भला, लेकी पाठी आला. :-) मुलगा माझा दिवटा, सुनेमागे गेला :-( "

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2009 - 10:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणूनच तर म्हण आहे: "जावई माझा भला, लेकी पाठी आला. Smile मुलगा माझा दिवटा, सुनेमागे गेला "

नाही पण विकासराव एक सांगा मला, संस्कृतात म्हटलं आहे 'जावई दशमग्रह असतो' म्हणून आणि मराठीत म्हणत आहात 'जावई माझा भला' म्हणून; आता आम्ही पामरांनी विश्वास कशावर ठेवायचा हो, मराठी म्हणींवर का संस्कृत सुभाषितांवर?

पण आता मात्र मी फारच गोंधळले आहे, सून घरी आली तर छळते, आणि मुलगा म्हणे दिवटा का तर सूनेबरोबर घराबाहेर पडला. त्यापेक्षा आता ३७७ चा अर्थ वेगळा लावत आहेत तर (आपल्या) मुलांना मुलांचीच आवड "लावावी" आणि (दुसर्‍याच्या) मुलांना (आपल्या) लेकीपाठी यायला सांगावं!

अदिती
("दर हजारी मुलांपाठी मुलींची संख्या कमी झाल्यामुळे पॉलीअँड्री आणि गे-जोडपी जास्त होण्याला उत्तेजन मिळेल का काय" या विचारात)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2009 - 3:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पाचवे पाऊल - हे वधू, तू पाच पावले चाललीस, आता संततिवर्धक हो.
या संदर्भातली ही एक बातमी वाचनात आली. आता वधूने तिचे वचन कसे पाळावे बरे हा प्रश्न पडला आहे.

तर या दहा हजारापेक्षा जास्त लोकांपैकी किती लोकांनी सप्तपदी केली होती आणि त्यांनी अशा मार्गाचा अवलंब का केला याची सांख्यिकीही युयुत्सुमहाराज देतील तर पुढचे अनेक प्रश्न टळतील.

अदिती
(बेसुमार लोकसंख्यावाढीवर एकच उपायः भाकड चर्चा करणे)

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 4:01 pm | युयुत्सु

धोक्यांचा विचार करू

धोके कोणते? धोके कोणते? असा धोशा बर्‍याच जणानी लावला होता. घाटपांड्यांनी सप्तपदीच्या मंत्राच्या अर्थाचा जो दुवा दिला आहे त्या अनुषंगाने धोक्यांचा विचार करू.

पहिले पाऊल - हे वधू, तुझे-माझे सख्य झाले आहे.तू अन्नदात्री व दीर्घायू संततीची माता हो.
दुसरे पाऊल - हे वधू, तू दोन पावले चालली आहेस म्हणून मला बलवर्धक हो.
तिसरे पाऊल - हे वधू, तू तीन पावले चाललीस, आता मला धन देणारी हो.
चवथे पाऊल - हे वधू, चार पावले चाललीस, आता माझी सुखवर्धिनी हो.
पाचवे पाऊल - हे वधू, तू पाच पावले चाललीस, आता संततिवर्धक हो.
सहावे पाऊल - हे वधू, तू सहा पावले चाललीस म्हणून सहाही ऋतूंत प्राप्त होणारे भोग देणारी हो.
सातवे पाऊल - हे वधू, तू सात पावले (माझ्याबरोबर) चालली आहेस. यास्तव माझी दृढ सखी हो.

यातील सर्वात महत्त्वाची अपेक्षा म्हणजे कामजीवनात योग्य ती साथ. बायकोने नवर्‍याला सेक्स नाकारला तर तो वसूल करायचा कोणताही मार्ग पुरुषाकडे उपलब्ध नाही. या उलट तसा प्रयत्न चूकून झालाच तर marital rape चे आरोप होण्याचा धोका पुरुषाला जास्त. बायकोने नवर्‍याला जेवण दिले नाही तर ते वसूल करायला कोणताही कायदा पुरूषांसाठी उपलब्ध नाही. पण याउलट स्त्रीच्या गरजा पुरुषाने पूर्ण केल्या नाहीत तर मात्र नवर्‍याचे हाल खायला कुत्रं सुद्धा पुढे येत नाही.

नवर्‍याने वर व्यक्त केलेल्या अपेक्षा वधूने जर पूर्ण केल्या नाहीत, तर वराला आपल्या बायकोला सोडून देण्याशिवाय कोणताही मार्ग नसतो. आणि जेव्हा विवाह हिंदू विवाह कायद्या खाली केलेला असतो तेव्हा पुरुषाला compensationच्या नावाखाली जास्तीत जास्त किंमत मोजावी लागते. Special Marriage Act खाली लग्न झालेले असल्यास या compensationच्या झळा कमी बसतात. बरं घटस्फोट घेउन पुरुष मोकळा होतो का तर याचं खरं उत्तर नाही असंच आहे. घट्स्फोटीत स्त्रीने दूसरे लग्न केलें नाही तर ती न्यायालयाचे दरवाजे केव्हाही ठोठावू शकते.

तेव्हा
१.आधुनिक मुक्त स्त्रीकडून या सप्तपदीतील अपेक्षा पूर्ण होतील याची कोणतीही खात्री नाही.
२. झाल्या नाहीत तर त्या वसूल करण्यासाठी कोणताही कायदेशीर मार्ग उपलब्ध नाही.
३. स्त्रीला मात्र तीच्या हक्कांची वसूली करायला कायद्याने सर्व मदत केली आहे.
४. प्रकरण विकोपाला जाउन न्यायालयात गेल्यास Man is guilty until proven innocent आणि Woman to be protected at all cost या दोन तत्वांचा पुरुषाना होणारा भयानक मनस्ताप (अगदी HIV झालेल्या बायकोला सोडण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे)

असे असताना, आधुनिक पुरुषाने सप्तपदीच्या शपथेत आणि तज्जन्य धोक्यात स्वत:ला गुंतवून घ्यावे का हा मला सतावणारा प्रश्न मी माझ्या चिंतनिकेतील लेखात चर्चिला आहे.

सूहास's picture

3 Aug 2009 - 4:08 pm | सूहास (not verified)

सात वेळा लिहिल्याने सप्त-पाठा॑तराचा विषय घेतला की काय असे वाटले...

(सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...)

सुहास
चा॑दण्यांतर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला...

समंजस's picture

3 Aug 2009 - 5:36 pm | समंजस

आधुनिक पुरुषाने सप्तपदीच्या शपथेत आणि तज्जन्य धोक्यात स्वत:ला गुंतवून घ्यावे का हा मला सतावणारा प्रश्न मी माझ्या चिंतनिकेतील लेखात चर्चिला आहे.

आधुनिक पुरुष आणि विवाह करणे किंवा विवाह न करणे या दोहोंचा काय संबंध?
आधुनिक पुरुषाने विवाह करु नये असे तुम्हाला सुचवायचे आहे का?

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 5:47 pm | युयुत्सु

आपण मा़झे लिखाण नीट वाचले नाहीत. सप्तपदीच्या शपथे अगोदर इतर स्रव पर्यायांचा विचार आधुनिक पुरुषाने करावा एवधेच मला म्हणायचे आहे.

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 5:49 pm | युयुत्सु

आपण मा़झे लिखाण नीट वाचले नाहीत. सप्तपदीच्या शपथे अगोदर इतर स्रव पर्यायांचा विचार आधुनिक पुरुषाने करावा एवधेच मला म्हणायचे आहे.

नीधप's picture

3 Aug 2009 - 4:04 pm | नीधप

७ वेळा लिहिलंत म्हणजे तुम्ही म्हणता तेच बरोबर असं काही होत नाही बरंका...

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

JAGOMOHANPYARE's picture

3 Aug 2009 - 4:10 pm | JAGOMOHANPYARE

पहिले पाऊल - हे वधू, तुझे-माझे सख्य झाले आहे.तू अन्नदात्री व दीर्घायू संततीची माता हो.
दुसरे पाऊल - हे वधू, तू दोन पावले चालली आहेस म्हणून मला बलवर्धक हो.
तिसरे पाऊल - हे वधू, तू तीन पावले चाललीस, आता मला धन देणारी हो.
चवथे पाऊल - हे वधू, चार पावले चाललीस, आता माझी सुखवर्धिनी हो.
पाचवे पाऊल - हे वधू, तू पाच पावले चाललीस, आता संततिवर्धक हो.
सहावे पाऊल - हे वधू, तू सहा पावले चाललीस म्हणून सहाही ऋतूंत प्राप्त होणारे भोग देणारी हो.
सातवे पाऊल - हे वधू, तू सात पावले (माझ्याबरोबर) चालली आहेस. यास्तव माझी दृढ सखी हो.>>>>>>>>>>>>>>>>>>>>

यात तर सगळ्या अपेक्शा बायको कडूनच आहेत की, मला हे माहीत नव्हते... आताच्या आता बायकोला इ मेल करतो.... :)

बायको सेक्स आणि अन्न नाकारू शकते.. ? पण पहिले पाऊल तर त्यासाठीच आहे की !

बायकोला बाळंतपणा पैकी काहीही झाले असेल ( अ‍ॅबॉर्शन/ प्रेग्नसी, डिलिव्हरी.. ) तर त्याचे कागदपत्रे साम्भालून ठेवणे... नवराच नपुन्सक आहे, या मुद्द्यावरच अशा बायका घटस्फोट घेण्याची शक्यता जास्त असते.

पक्या's picture

3 Aug 2009 - 4:16 pm | पक्या

काहो युयुत्सुराव , तुमचं लग्न झालयं का?
नसेल झालं तर करायच्या भानगडीत पण पडू नका.
सप्तपदीमुळे तर धोका आहेच तुम्हाला . शिवाय आजची स्त्री मुक्त आहे . तुमचं आणि मुक्त स्त्रीचं वावडं आहे ना.

JAGOMOHANPYARE's picture

3 Aug 2009 - 4:21 pm | JAGOMOHANPYARE

(अगदी HIV झालेल्या बायकोला सोडण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे)

एच आय व्ही बायको पासून नवर्‍याला झाला की नवर्‍यापासून बायकोला झाला, हे सिद्ध करण्याचा मार्ग उपलब्ध नाही... मग कोर्टाने कशाच्या आधारावर अशी बायको सोडायला परवानगी द्यायची ? ती बाहेर ख्याली होती हे तरी कसे सिद्ध करणार ? एच आय व्ही इतर मार्गानीही होतो की.... कोर्टापुढे आपण घेतलेला स्टॅन्ड योग्य असावा लागतो.. तोही सबळ पुराव्यासह..

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 4:26 pm | युयुत्सु

मी वर सांगितलेल्या केस मध्ये नवरा निगेटिव्ह आणि बायको पोझीटिव्ह होती.

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 4:36 pm | युयुत्सु

मी वर सांगितलेल्या केस मध्ये नवरा निगेटिव्ह आणि बायको पोझीटिव्ह होती.

स्वाती२'s picture

3 Aug 2009 - 4:31 pm | स्वाती२

हिंदू विवाह कायदा माहीती http://www.sudhirlaw.com/HMA55.htm
Special Marriage Act माहीती
http://www.legalserviceindia.com/helpline/marriage.htm
शेवटी लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे तेव्हा लग्नाचा निर्णय पूर्ण विचार करून घ्यावा. ज्या व्यक्तीबद्दल विश्वास वाटत नाही त्या व्यक्तीबरोबर कुठल्याही पद्धतीने विवाह करणे धोक्याचेच. तसेच परिचयोत्तर लग्न झाले काय किंवा ठरवून झाले काय विसंवाद निर्माण होणार नाही याची शाश्वती कुणीच देवू शकत नाही.

JAGOMOHANPYARE's picture

3 Aug 2009 - 5:06 pm | JAGOMOHANPYARE

<<<<<<<< मी वर सांगितलेल्या केस मध्ये नवरा निगेटिव्ह आणि बायको पोझीटिव्ह होती.>>>>>>>>>

मला देखील हीच सिचुएशन अपेक्षित होती...

१. बायको लग्नाआधीच एच आय व्ही पॉजितिव्ह होती का हे पहायला हवे, तसे रिपोर्ट उपलब्ध असल्यास नवर्‍याच्या बाजूने निकाल लागू शकेल कदाचित.. या केस मध्ये हे बायकोला आधी माहीत होते व तिने नवर्‍याला जाणीव पूर्व्क फसवले हेही सिद्ध करावे लागेल..

२. बायको नेमकी कधी एच आय व्ही पॉसिटिव्ह झाली हे उपलब्ध नसेल ( म्हनजे पहिल्यान्दा डायग्नोसिस कधी झाले त्याचे पेपर्स) तर सगळेच मुश्किल आहे...

३. बायको लग्ना आधी + असो किन्वा लग्नानतर झालेली असो, दोन्ही केस मध्ये ती बाहेर ख्याली होती असा निश्कर्श नुसत्या या एका बाबी वरून काढता येत नाही... नवरा निगेटिव असेल तरीही नाही....

फक्त १ नम्बर मध्ये सान्गितलेली सिचुएशन मध्येच नवरा केस जिन्कण्याचे काही होप्स आहेत... त्यातही जाणीव पूर्वक फसवणूक हाच मुद्दा महत्वाचा ठरतो.. एच आय व्ही नाही... बाहेर ख्याली पणा हा तर नाहीच नाही... कारण सेक्स हा काय एच आय व्हीचा एकमेव मार्ग नाही...

ऋषिकेश's picture

3 Aug 2009 - 5:08 pm | ऋषिकेश

कालच कोर्टाने दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयानूसार जर दोन व्यक्ती अनेक वर्षे एकमेकांसोबत लग्नाविना (लाँग टर्म लिव्ह इन) रहात असतील व समाजाचाही त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन नवरा-बायकोचा असेल तर त्यांना नवरा-बायको समजण्यात प्रत्यवाय नाही

भारतीय कायदा इतका पुढारलेला असताना सप्तपदी वगैरेसारख्या शुल्लक गोष्टीवरून लोकांच्या मनांत (अनाठायी?) भिती पसरवताय असेच वाटले

(बातमीचा दुवा हवा असल्यास घरी गेल्यावर देता येईल. ऑफीसात अ‍ॅक्सेस नाहि)

ऋषिकेश
------------------
दूपारचे ५ वाजून ६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "असा कसा असा कसा मी वेगळा......"

कशिद's picture

3 Aug 2009 - 5:13 pm | कशिद

मला समजत नाही तुम्ही का ईतका नको त्या विषयावर विचार का करता? ...

मला हिन्दू विवाह कायदा अणि बाकि विवाह विषयक कायदे व सगळे नियम माहित आहेत ..

मी तुम्हाला एवढच संगाथो की लग्न हे प्रेमा ने तिकत अणि सामाजिक बन्धना मुले कोणत्या ही कायद्या मुले नाही.

बायको ने जेवायला वाडला नाही म्हणुन सप्तपदी शोदु नका स्वताच वाढून घ्या . अणि दुसर्या दिवशी बाहेरून जेवून या..बाकी बदल हे सारखाच नीयम .

(कायदे पंडित ) अक्षय

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Aug 2009 - 5:56 pm | ब्रिटिश टिंग्या

लै भारी!

बाय द वे, हे वरचे उदाहरण जेवण वाढण्या व्यतिरीक्त बर्‍याच ठिकाणी लागु पडते :)

सखाराम_गटणे™'s picture

4 Aug 2009 - 3:35 pm | सखाराम_गटणे™

आणि बाहेर बर्‍याच गोष्टी ही मिळतात वेगवेवळ्या वरायटीच्या.

यशोधरा's picture

3 Aug 2009 - 7:15 pm | यशोधरा

युयुत्सुजी, ज्या लग्नांमध्ये नवरा आपल्या बायकोचा छळ करतो, अथवा बाहेर संबंध ठेवतो किंवा नवरा व कुटुंबीय मिळून विवाहितेचा खून करतात (मंजूश्री सारडा केस वाचलेली आठवली एकदम, आणि कोर्टाने तिच्या नवर्‍याला पुराव्याअभावी सोडलेही होते ना? चू भू दे. घे. कृपया) अश्या बाबतीत तुमचं काय म्हणण आहे? हे सप्तपदीचे धोके उद्भवण्याची कटकट नको, म्हणून स्वतःच पुढाकार घेऊन नवरा व त्याचे कुटुंबिय असे वागतात का अश्या केसेस मध्ये? की हे नियमाचे अपवाद म्हणावेत? आणि अश्या मुली जन्माला येऊ नयेत आणि मग हे सप्तपदीचे धोके उदभवू नयेत म्हणूनच भ्रूण हत्त्या किंवा मुलगी जन्माला आली की तिचा जीव घेत असतील नाही, भारतात बर्‍याच ठिकाणी? (उदा: गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र )

अजूनही काही उदाहरणे देता येतील, पण सद्ध्या एवढेच पुरेसे आहे.
माफ करा, लेख अतिशय एकांगी वाटतो.

>>मुक्त स्त्रीचा मिळावा अशी प्रार्थना करतो देवा कडे. आणि म्हणूनच मला मुलगी आहे याचा मला अभिमान आहे.
ह्याहून अधिक संयुक्तिक कारणं नाहीयेत का आपल्यापाशी स्वतःच्या मुलीचा अभिमान बाळगण्यासाठी? :(

युयुत्सु's picture

4 Aug 2009 - 5:27 am | युयुत्सु

तसे वाटण्याबद्दल मा़झी काहीच हरकत नाही. काहीसा अप्रिय, unfashionable असा विषय मी चर्चेला घेतला होता. त्यामुळे अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. आपल्या इतर मुद्द्यावरही बोलता येण्यासारखे बरेच आहे पण चर्चा भरकटेल.

जाता जाता स्त्रीभ्रूण हत्येविषयी - थोडे 'आत्मविरोधी कुतूहल' धरून स्त्रीवाद्यानी आणी परखड आत्मपरिक्षण करून या प्रश्नाची उत्तरे शोधावीत. संस्कृत साहित्यामध्ये आढळून येणारी स्त्रीनिंदा या साठी अवश्य विचारात घ्यावी.

यशोधरा's picture

4 Aug 2009 - 8:58 am | यशोधरा

सोयीस्कररीत्या मूळ प्रश्नांना बगल उत्तम दिलीत.
कोणते संस्कृत साहित्य वाचू स्त्रीनिंदा जाणून घ्यायला?

स्वाती२'s picture

3 Aug 2009 - 8:25 pm | स्वाती२

>>सर्वात महत्त्वाची अपेक्षा म्हणजे कामजीवनात योग्य ती साथ.
यापेक्षा
>>सातवे पाऊल - हे वधू, तू सात पावले (माझ्याबरोबर) चालली आहेस. यास्तव माझी दृढ सखी हो
ही एकच गोष्ट महत्वाची मानली तर बाकी सर्व न मागताच मिळेल की.

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 9:05 am | JAGOMOHANPYARE

नवर्‍याची ( किन्वा बायकोची) नजर अष्टावक्र होऊन नव्याचे नऊ दिवस संपले की संसाराचे दशावतार होऊ नयेत म्हणून सप्तपदी आहे . :)

धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च नातिचरामि नातिचरामि नातिचरामि /

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2009 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली भुमिका समजून घेण्यासाठी तिस-या भागाची प्रतिक्षा करावी लागते बहूतेक ?

स्वगत : आजच्या आधुनिक स्त्रीमुळे माणसाच्या आयुष्याचं वाट्टोळं होत आहे, असा एक परिसंवाद मिपावर घ्यावा म्हणतो ?

-दिलीप बिरुटे
(खोडसाळ)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2009 - 10:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वगत : आजच्या आधुनिक स्त्रीमुळे माणसाच्या आयुष्याचं वाट्टोळं होत आहे, असा एक परिसंवाद मिपावर घ्यावा म्हणतो ?

आधुनिक स्त्रीला माणसात न मोजणार्‍या प्रा.डॉंचा जाहीर निषेध! (ओ प्राडॉ, ह. घ्या हो नाहीतर कोणालातरी चांदणी द्यायचात आणि माझ्या प्रतिसादाचं वाट्टोळ्ळं व्हायचं!)

अदिती
"लग्नात मी हुंडा का घेतला नाही" याचा विचार करून गेले दोन दिवस क्यालरीज जाळत आहे.

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2009 - 1:54 pm | JAGOMOHANPYARE

लग्नात मी हुंडा का घेतला नाही" याचा विचार करून गेले वर्षभर क्यालरीज जाळत आहे.

:)

विनायक प्रभू's picture

4 Aug 2009 - 4:04 pm | विनायक प्रभू

असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेल्या पुरुषाकरता अगदी उत्तम धागा.

" एखादे लग्न परिचयोत्तर होत असेल तर ते पूर्ण विचारांती होत आहे असे मानून एकनिष्ठ राहण्याची पथ घेणे तर्क-सुसंगत ठरते पण जेव्हा 'स्थळे बघून' विवाह जुळवले जातात तेव्हा आपण ज्या मुलीबरोबर सात जन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणार आहोत ती मुलगी, विशेषत: कायदे एकतर्फी असताना, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण पाडेल याची कोणतीही खात्री नसताना, पुरुषाने अशी शपथ घेणे हे आत्मघातकीपणाचे निदर्शक आहे, असेच माझे स्पष्ट मत आहे."

आता ह्यात ती मुलगी पण आपले सर्वस्व एका अनोळखी माणसाला देते,मग तिने किती बोंबाबोंब केली पाहिजे?अहो आता सप्तपदी न करता तुम्ही एकाद्या स्त्रीबरोबर रहात असाल तर कायद्यानुसार त्या स्त्री ला तुमच्या पत्नीचे सर्व अधिकार प्राप्त होतात. मग कशाला सप्तपदीच्या नावाने शिमगा करत आहात? सप्तपदी केल्या नाहीत तर काय लग्न कायदेशीर होणार नाही का?

वेताळ