मुंबईतले उंदीर !!

बामनाचं पोर's picture
बामनाचं पोर in काथ्याकूट
3 Aug 2009 - 7:34 am
गाभा: 

आज काल मुंबईत उंदीर फार झालेत भौ.. म्हाडा व मुंमप्रविप्रा चे कार्यालय ह्यांचे मुख्यालय झाले आहे म्हणे . बर हे साधेसुधे नाही खास प्रशिक्षण घेतलेले उंदीर आहेत. ते वर्सोवा, जुहू , बॅन्डस्टॅन्ड , मलबार हिल्स इथं राहण्यारया बड्या धेंड्याच्या अजीबात वाटेला जात नाहीत.. त्यांचे सगळे लक्ष हे मुंबईत नेट लावून अजुन तरी टिकुन राहीलेल्या मराठी माणसावर आहे...

ह्या उंदीरांचा त्रास फार वाढल्यावर वांद्रेकर जाम रागवले.. त्यांनी शेवटी २५-३० हजार सैनिकांना बरोबर हातात पिंजरे घेउन एक जोरदार मोर्चा काढला अन " शेपट्या खेचुन बाहेर काढू " असा दम दिला. उंदीरपण लई हुशार तेवढ्यापुरतं घाबरल्यासारख करुन बिळात लपत्यात.. अगदीच भ्या वाटलं तर थेट मंत्रालयात जावून खुर्चिखाली लपायचे .. एकदम शेफ जागा :)

आता वांद्रेकरांनी येव्हडा जोरदार मोर्चा काढ्ल्यावर दादरकरांना कससच झालंना राव !! बर ह्याचा अजुनशान पिंजराच तयार होइना.. उंदीर पकडायच लांबच !...
बर तयार व्हईल तरी कसा ?? हाताखालचे सगळे हवशे-नवशे-गवशे प्रत्येकजण मनाला येइल त्या बाजुची , आवडेल अन जमेल त्या मापाची जाळी घेउन आल्यावर सगळ्याचा मेळ घालून पिंजरा बनायचा कसा ?? मग आता वांद्रेकरांवरच तोंडसुख घेतल,

" मोर्चा कसला काढता , खरे उंदीर तुमच्यातच आहेत.. "
-- " आम्ही उंदीर तर तुम्ही घुशी.. "
" अस्स्स ? मग तुम्ही बिन-शेपटीच्या घुशी "

य्हे.. जोरदार ! होउन जाउद्या. !!!!

====

अरे काय चालय्य ?? १-२रीतल्या लहान पोरांसारखे भांडताय काय !! खरे उंदीर लांबुन गंमत बघत हसत असतील " बघ कसे भांडतात ते !! हे ह्यांचे असे पटत नाही म्हणुन तर आपले फावते.. त्यांना भांडूदेत आपण लागू कुरतडायच्या कामाला परत !! "
गिरण्या तर कधीच सगळ्या पोखरुन जमीनदोस्त केल्या ह्या उंदीरांनी. आता मुंबईचे 'मुंबईपण' उरले आहे ते चाळींत / वाडींत / कोळीवाड्यामधुन.... गिरगाव , लालबाग/परळांत/दादर-वरळीत टिकून राहीलेल्या मराठी माणसामुळे.. इथे पण उंदीरांनी वासे पोखरायला तर कधीच सुरवात झाली . आता घरात घुसून लेंगे-विजारी कुरतडायपर्यंत मजल गेली तरी आपण अजुन आपल्यातच भांडत बसलोय.. आता तरी सुधरा की राव !!

नाही तर ते अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक करायचे चालले आहे ना तसे ' मुंबई' चे पण स्मारक करावे लागेल " गिरणी , गिरणीकामगार , इराण्याचे दुकान , खानावळ , चाळ , मंडई , कुण्या एका दुकानाचा एक मराठी फलक.. " ह्या सगळ्याच्या एक-एक प्रतिमा ठेउन.. ह्या स्मारकाचे उद्घाटन पण कोणी वर्मा/यादव/सिंह करेल अन आपल्याला ह्याचा तरी बोर्ड मराठीत लिहा असे आंदोलन करावे लागेल..

=====

अवांतर:- ( हे दोघे का भांडतात तेच कळत नाही.. दोघांचा विठ्ठ्ल तर एकच.. मग आपलीच दोन लेकरं एकमेकाच्या जीवावर उठलेली बघून त्या विठ्ठ्लाच्या मनाला काय यातना होत असतील याचा तरी विचार केला का ?? )

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2009 - 8:23 am | प्रकाश घाटपांडे

मस्त बोध कथा. उंदीर खरे निधर्मी. कुरतडायला जात धर्म पंथ नसतो हे ते जाणतात. उंदरांचा बंदोबस्तकरण्यासाठी जर कुणी पुंगीवाले बाबा अवतरला तर त्यावेळी अंनिस चा अनेक वर्षे रेंगाळलेला "जादुटोणा विरोधी कायदा" लगेच संमत होईल असे भाकीत वर्तवतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील's picture

3 Aug 2009 - 9:32 am | सुनील

मस्त कथा - वांद्रेकर आणि दादरकर तर झकासच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नम्रता राणे's picture

4 Aug 2009 - 12:58 pm | नम्रता राणे

छान लेख!
दादरकरांनीही काढला ना काल मोर्चा..
दादरकरांनी नेहमी वांद्रेकरांची नक्कलच करावी... पण...?