कोथिंबीर वडी

मितालि's picture
मितालि in पाककृती
1 Aug 2009 - 11:01 am

पालेभाजी कोथिंबीर चार चार रुपये ... भाजीवाला अगदी उत्साहात ओरडु लागणे हे ही पावसाळ्याचे एक लक्षण...पावसाळा आला की पालेभाज्या छान मिळतात.
त्यातही खास म्हणजे कोथिंबीर. एरवी ७-८ रुपयाना एवढीशी मिळणारी कोथिंबीरीची जुडी पावसात कशी छान जाडजुड होऊन येते. हिरवीगार आणि स्वस्त
मिळालेल्या कोथिंबीरीची मोठी जुडी घरी आणली जाते. आणि बेत बनतो कोथिंबीर वडीचा.. मग ती कोथिंबीर एक तास बसुन साफ करता करता आपण कशी
एवढ्या ढिगातुन एकदम छान आणि न फुललेली जुडी आणली या बद्द्ल चर्चा करणे आलेच...

पाककृती अगदी सोपी आहे..

कोथिंबीर नीट धुवुन निथळत ठेवा. पुर्णपणे कोरडी करुन बारीक चिरुन घ्या. त्यात जीरे, लाल तिखट (मिरची पुड), हळद, मीठ, सफेद तीळ,साखर, बेसन घालुन अलगद एकत्र करा.
पावसात कोथिंबीरीत पाणी जास्त शोषलेले असते म्हणुन जरा मिश्रण ओलसर असेल. या मिश्रणाचे रोल बनवुन मोदकपात्रात किंवा कुकरात वाफवुन घ्या . नाही रोल बनत असतील तर
थाळीत घालुन ढोकळ्या सारखे उकडा. थंड झाले की तुकडे करुन, तव्यावर थोड्या तेलात तळुन घ्या. टॉमेटो सॉस सोबत छान लागतात.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

1 Aug 2009 - 11:03 am | पर्नल नेने मराठे

मस्तच.........
चुचु

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2009 - 11:14 am | बिपिन कार्यकर्ते

@)

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

1 Aug 2009 - 11:30 am | विसोबा खेचर

ए वन...! :)

मितालि, जियो....

तात्या.

मितालि's picture

1 Aug 2009 - 12:06 pm | मितालि

धन्यवाद

दिपक's picture

1 Aug 2009 - 11:30 am | दिपक

मितालि's picture

1 Aug 2009 - 12:04 pm | मितालि

ही स्माईली छान आहे..

टारझन's picture

8 Aug 2009 - 12:00 pm | टारझन

स्मायली छाण आहे ... पण चुकीची आहे ,... कोथंबीरीच्या वड्या कोणी नाईफ-फोर्क ने खाऊ शकतो का ? जर त्या रबरासारख्या झाल्या नसतील तर ? ;)

असो .. कोथंबिर वड्या आमचा विक पॉईंट .. फोटो फारंच सुंदर आहे ...
बादलीभर लाळ गळाली फोटो पाहुनंच !!

-(वड्याप्रेमी) टारझन

दशानन's picture

1 Aug 2009 - 11:38 am | दशानन

जबरा..... फोटो पाहून ठार आडवा झालो :)
मी उपाशी पोटी असताना असले छान छान फोटो व पाककृती येथे तुम्ही देत आहात त्याचा निषेध >:)

+++++++++++++++++++++++++++++

तर्री's picture

1 Aug 2009 - 12:04 pm | तर्री

अहो कोथिंबीर पाहाणे महामुष्कील झाले आहे .....आणि तुम्ही वड्या करताय....वर झक्कास फोटो !!
का आग चेतावता आमच्या पोटामधे ?
आमेन

सहज's picture

1 Aug 2009 - 3:15 pm | सहज

मस्त मस्त, छान छान!

लवंगी's picture

1 Aug 2009 - 5:53 pm | लवंगी

खूप आवडतात.. मी थोडस तांदळाच पिठपण घालते. त्याने कुरकुरीत होतात.

मसक्कली's picture

7 Aug 2009 - 2:54 pm | मसक्कली

मस्तच =P~

:)

खादाड_बोका's picture

7 Aug 2009 - 8:20 pm | खादाड_बोका

आमच्या ईथे कोथिंबीर वर्षभर मिळते " पटेल ब्रदर्स" ला. एका डॉलरला दोन जुड्या, आजच आणतो आणी बनवतो. मिताली ताईंना एक प्रश्न "तव्यावर थोड्या तेलात तळुन घ्या" म्हणजे भज्यासारखे तळायचे या थालीपीठाला तेल सोडुन भाजतात तसे भाजायचे.:D

मला तर स्वप्नातही भुक लागते....:P

मितालि's picture

7 Aug 2009 - 11:52 pm | मितालि

मासे तळले आहेत का कधी.. अगदी तसे तळायचे.. म्हण़जे कट्लेट सारखं शॅलो फ्राय करणे..

खादाड_बोका's picture

8 Aug 2009 - 1:43 am | खादाड_बोका

सॉरी मी १००% शाकाहारी आहो X( पण कटलेट वरुन कळाले :>

मला तर स्वप्नातही भुक लागते....

JAGOMOHANPYARE's picture

8 Aug 2009 - 11:54 am | JAGOMOHANPYARE

खादाड बोका.. मासे खात नाही.. अजबच ! :)

मदनबाण's picture

8 Aug 2009 - 4:43 pm | मदनबाण

व्वा. :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa