गाभा:
काही म्हणी अथवा वाक्प्रचारांमधले वापरल्या जात असणार्या शब्दांबद्दल मला फार दिवसांपासुन प्रश्न पडलेले होते.विजुभाऊंच्या धाग्यापासुन प्रेरणा घेवुन हे प्रश्न विचारत आहेत.
(कृपया त्या धाग्याचे हे विडंबन आहे असे कोणी समजु नये.)
१.हातावर तुरी देवुन निसटणे ह्या वाक्र्पचारातील तुरीचे प्रयोजन काय?
२.तोंडात मूग गिळुन गप्प बसणे... मूगाचा आणि गप्प बसण्याचा संबंध काय?
३.कानामागुन आली आणि तिखट झाली... कोण कानामागुन आले आणि तिखट झाले.?.
४.दत्त म्हणुन हजर होणे ... ह्यामागे काय कथा आहे?
५.लंकेची पार्वती.. हा संदर्भ कसा आला असावा.पार्वती लंकेत कधी गेली होती का?
६.कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी... ह्यातील शामभट हे कोण होते?
७.एखाद्याच्या कनपटीला बसणे ह्या वाक्र्पचाराची व्युत्पत्ती कशी झाली असावी.
प्रतिक्रिया
29 Jul 2009 - 3:35 pm | सूहास (not verified)
खतरनाक पाककृती,वेगवान कथा,पुढचा भाग कधी,वैचारिक कौल,राजकारणावर आणी ज्योतीष्यशात्रावर असा लेखच नव्हता वाचला..
जबरा !! :T
(सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...)
सुहास
चा॑दण्यांतर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला...
29 Jul 2009 - 3:57 pm | JAGOMOHANPYARE
कानामागून आली , ही मूळ म्हण होती, पानामागून आली आणि तिखट झाली... म्हणजे मिरची... ती नन्तर येऊन तिखट होते.... पानाचे कान कसे झाले, ते माहीत नाही...
29 Jul 2009 - 4:00 pm | कानडाऊ योगेशु
बरोबर असावे.कारण मिरचीची पानेही तिखट असतात असे ऐकले/वाचले होते.
पुराणातल्या वानग्यांची जिथे पुराणातील वांगी होतात तिथे वरील बदल होणेही साहजिकच म्हणा...
30 Jul 2009 - 7:43 pm | विकास
पानाचे कान कसे झाले, ते माहीत नाही...
महाराष्ट्रात "ध" चा "मा" होवू शकतो तर "पा" चा "का" करणे काहीच अवघड नाही :-)
29 Jul 2009 - 7:19 pm | llपुण्याचे पेशवेll
दत्त, परशुराम ह्या देवता स्मर्तृगामी मानल्या गेल्या आहेत. स्मर्तृगामी म्हणजे स्मरण केल्या केल्या लगेच उभ्या ठाकणार्या. म्हणून एखाद्या गोष्टीचा नुसता विचार केला किंवा पुसटशी शंका आली आणि ते संकट समोर उभे ठाकले तर 'दत्त म्हणून उभे ठाकले' असे म्हणत असावेत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
29 Jul 2009 - 7:25 pm | सूहास (not verified)
पुसटशी =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
(सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...)
सुहास
चा॑दण्यांतर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला...
29 Jul 2009 - 7:35 pm | सुनील
१.हातावर तुरी देवुन निसटणे ह्या वाक्र्पचारातील तुरीचे प्रयोजन काय?
हातावर तुरी देऊन निसटणे याचा अर्थ काहीतरी मौल्यवान वस्तू देण्याचे अमिष दाखवून नंतर एखादी स्वस्त वस्तू देऊन सटकणे.
हा वाकप्रचार जेव्हा प्रथम उपयोगात आला तेव्हा तूर स्वस्त असावी. सध्या ही अव्वच्या सव्वा महाग झाली आहे (संदर्भासाठी अन्य धागे पहा)
त्यामुळे आमची शासनास अशी विनंती आहे की, एक समिती नेमावी. ही समिती दरवर्षी सर्व धान्याच्या भावाचा आढावा घेईल आणि एखाद्या स्वस्त धान्याची शिफारस करील. सर्व लेखकूंनी त्या वर्षी त्या विशिष्ठ धान्याचाच उपयोग ह्या वाकप्रचारात करावा अशी शासनाची अपेक्षा राहील. जे लेखकू हे मानणार नाहीत त्यांचे लेख्/कविता क्रमिक पुस्तकात घेतले जाणार नाहीत याची दक्षता शासन घेईल.
(उरलेल्या शंकांच्या उत्तरासाठी जागा राखून ठेवत आहे)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Jul 2009 - 7:50 pm | ऋषिकेश
हा हा हा
अगदी बरोबर.. आता हातावर तुर(डाळ) दिली तर ती व्यक्ती नाचू लागेल ;)
(घरातली तूरडाळ लॉकरमधे ठेवणारा)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
29 Jul 2009 - 8:30 pm | ज्ञानेश...
'पार्वती' हा शब्द सीतेसाठी वापरला जातो. (सीतेची अनेक नावे आहेत.)
रावणाकडून आकाशमार्गे अपहरणाच्या वेळी सीतेने आपला माग श्रीरामांना काढता यावा म्हणून एक- एक करत सर्व दागिने जमिनीवर फेकले होते. त्यामुळे लंकेत गेल्यावर सीतेच्या अंगावर एकही दागिना नव्हता.
त्यामुळे गरीब स्त्री (जिच्या अंगावर एकही दागिना नाही) 'लंकेची पार्वती' आहे असे म्हणत असावेत.
"Great Power Comes With Great Responsibilities"
30 Jul 2009 - 7:38 pm | क्रान्ति
डॉ. सरोजिनी बाबर, शांता शेळके वगैरेंनी संपादित केलेला हा ग्रंथ कुठे मिळाला, तर वाचा. त्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. म्हणींची उत्पती, त्यामागच्या कथा, कोडी [उखाणे], वाक्प्रचारांचे अर्थ अशी बरीच अनमोल माहिती त्यात दिलेली आहे.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी