हे पाप कुणाचं

मनस्वी's picture
मनस्वी in काथ्याकूट
19 Feb 2008 - 5:43 pm
गाभा: 

गेले काही दिवस मिसळपाववरच काय पण सगळीकडेच "मुंबई आणि मराठी माणूस" यावर प्रत्येकजण आपापले मत मांडत आहे.

त्याचसंदर्भात हा लेख वाचनात आला आणि तुमच्याबरोबर share करावासा वाटला. कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.

"काथ्याकुट" मध्ये अशासाठी की तुमच्याही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

मनस्वी

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2008 - 6:31 pm | प्रभाकर पेठकर

अतिशय स्पष्ट आणि नेमकेपणाने लिहीलेला लेख आहे.
मराठी माणसानेच, मराठी माणसाच्या विरोधात, मुंबई परप्रांतीयांना विकली आहे. आंदोलन अशा आमदार, नगरसेवक आणि प्रशासकिय अधिकार्‍यांच्या विरोधात हवे.
मराठी माणसाने मतदानातून अशा पुढार्‍यांना धडा शिकवावा. आपण मराठी माणसाच्या हिताआड आलो तर आपल्याला डच्चू मिळेल अशी दहशत पुढार्‍यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. प्रशासकिय अधिकार्‍यांना तेच वठणीवर आणतील.

मनस्वी's picture

19 Feb 2008 - 7:06 pm | मनस्वी

आता ३०% मराठी जनतेने असा लढा देणे अवघड वाटत आहे, पण अशक्य नाही.

पण ज्यांनी मुंबई विकली अशा निवृत्त अधिकारी / नगरसेवक / आमदार यांना धडा कोण आणि कसा शिकवणार!

मतदानातून काय निष्पन्न होते ते आजवर आपण पहात आलो आहोतच. ३०% मराठी जनतेच्या मतांचा निभाव विकलेल्या ७०% अमराठी मतांसमोर कसा लागणार!

त्यासाठी टॅक्सीवाले, पाणीपुरीवाले ह्यांना २ दिवसापुरता चोप न देता, एका विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक योजनेची गरज आहे.

हे काही २ दिवसांत होणारे काम नाही. आणि ह्या योजनेचा पुढारी अतिशय विचारी, कार्यक्षम आणि चतुर असणे आवश्यक आहे.

मनस्वी

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2008 - 11:01 pm | प्रभाकर पेठकर

काश्मिरात तिथल्या मुसलमानांनी हिंदू पंडीतांना मारहाण करून परागंदा केले. प्रसंगी जेवणाच्या ताटावरून उठवून हात धूण्यासही संधी न देता घरा बाहेर काढले आणि मुस्लिम टक्केवारी वाढविली.
आज न उद्या कदाचित महाराष्ट्रातही हेच घडेल. मराठी माणूस तितका अतिरेकी किंवा मूलतत्ववादी नसला तरी हाताबाहेर जाणारी परिस्थिती त्याच्या स्वभावात/वृत्तीत कांही विनाशकारी बदल घडवू शकते.
हे सर्व टाळण्यासाठी राज्यकर्त्यांनी भूमिपुत्रांचा हक्क त्यांना मिळेल ह्या कडे लक्ष द्यावे आणि भूमिपुत्रांनी स्वतःचा कस वाढवून अस्तित्त्वाची लढाई जिंकावी.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Feb 2008 - 9:02 pm | llपुण्याचे पेशवेll

पण मराठी माणसाने स्वत:चे मातेरे स्वत: करून घेतले असे वाटते.
पुण्याचे पेशवे

इस्राइलकडे बघून समजते. जगभरातून हाकलल्या गेलेल्या यहुदी माणसांच्या समोर त्यांच्या भूमीचा तुकडा इतराअंनी फेकला तेव्हा त्या वाळवंटातही ते असे काही तरारून उठले की आज जगात त्यांचं अनेक क्षेत्रात नाव आहे.
परिस्थितीने आणि इतर जागतिक राजकारणाने त्यांना कट्टर बनवले आहे, पण त्यांची जिद्द आणि देशप्रेम निर्विवाद आहे.
आकाराने पुणे+नगर+औरंगाबाद इतक्याच असणार्‍या ह्या देशाकडून आपल्या महाराष्ट्राला खूप शिकण्यासारखे आहे. आपला प्रश्न त्यांच्यामानाने अगदीच किरकोळ वाटावा अशी परिस्थिती आहे.

ह्यात मराठी माणसाला कुठेही कमी लेखण्याचा हेतू नसून डोळे उघडे ठेवून परिस्थितीचे अवलोकन करणे आणि चाकोरीबध्द विचारातून झटपट बाहेर पडणे ह्यातूनच आपण आपले भले घडवू शकतो अन्यथा आपल्या भूमीत आपणच उपरे असण्यासारखी लांछनास्पद स्थिती नाही!

चतुरंग

माझी दुनिया's picture

20 Feb 2008 - 1:53 pm | माझी दुनिया

मला विरोपाद्वारे आलेले हे वाचा

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

धमाल मुलगा's picture

20 Feb 2008 - 2:01 pm | धमाल मुलगा

दुनियाजी..

भेदक वास्तव दाखवल॑त. खर॑च ही वेळही येऊ शकते. नक्कीच.

- हताश
ध मा ल.

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 2:21 pm | राजमुद्रा

बापरे!
खरंच असं झालं तर?
मला खूप वाटतं असं होऊ नये म्हणून, पण नक्की काय करावं तेच समजत नाही.
कुणाकडे काही पर्याय असल्यास नक्की सांगा

राजमुद्रा :)

मनस्वी's picture

20 Feb 2008 - 2:53 pm | मनस्वी

हे असंच चालू राहीलं तर १५-२० वर्षातील हे जळजळीत सत्य!

सुरुवात आपल्यापासूनच करा.

आपण काही चळवळ वगैरे सुरु नाही करू शकत. पण पाणीपुरी फक्त मराठी माणसाच्या गाडीवरच खा.

पाणीपुरीचा ठेला हे त्यांचे एक साधन आहे शिरकाव करण्याचे. हळूहळू अशी एक एक साधने बंद करा.

मला सध्यातरी येवढेच सुचते. चूक की बरोबर माहीत नाही.

त्यांनी तरी कुठे विचार केला चूक की बरोबर याचा!

पोटाची खळगी भरण्यासाठी सगळेच क्षम्य.. अरे पण उद्या तीच खळगी आपल्याला पडणार आहे! आणि तेव्हा सामान्य मराठी माणसाला शिरकाव करायला कोणतीच जागाच नसेल!

(कॉमन मॅन) मनस्वी

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2008 - 3:01 pm | प्रभाकर पेठकर

दुर्दैव असे आहे की मुंबईत पाणीपुरीचे ८० टक्के गिर्‍हाईक हे 'मराठी' नसून 'गुजराथी' आहे.

ते तर, 'ते घाटी लोगला काय समजते? ते काय म्हनते ना, गाढवाला गुलाची काय चव, तसे आहे त्याचे. तद्दन रानटी जमात हाय.' असे म्हणून मिटक्या मारत मारत पाणीपुर्‍या जास्तच चापतील. म्हणजे कणाहीन वृत्तीने आपली मुंबई तर गेलीच गेली आणि तत्त्वामुळे पाणीपुरीही गेली. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी अवस्था व्हायची.

मनस्वी's picture

20 Feb 2008 - 3:20 pm | मनस्वी

पाणीपुरी पण हवी, मुंबई पण हवी, तत्वे नकोत,
कोणीतरी ती आपल्या ऐतीच द्यावी जशी आपण दिली त्यांना.. नाही का?

(???) मनस्वी

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2008 - 3:33 pm | प्रभाकर पेठकर

मराठी माणसाने झणझणीत, चमचमीत पाणीपुरी बनवावी. भैय्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहावे. भैय्यांकडे ढुंकूनही पाहणार नाही कोणी. पाणी आणि पुर्‍या घरीच बनवून मनसोक्त हादडतो.
तसेच, पाणीपुरी बनवायला शिकवून, भैयाला परदेशी चलनात पगार देऊन, पाणी पुरी विकणारा मराठी माणूस आहे मी.

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 2:57 pm | राजमुद्रा

एकदम मान्य मनस्वी!

मी आजपासूनच भैंयाकडे पाणीपूरी खाणार नाही :)

राजमुद्रा :)

मनस्वी's picture

20 Feb 2008 - 3:08 pm | मनस्वी

अरे आमच्या कल्याण भेळ कडे काय मस्त पाणीपुरी मिळते. भेळसुद्धा.
कल्पना, पुष्करिणी, महाराणा प्रताप बागेजवळच्या मावशींची भेळ आणि पाणीपुरी, संभाजी बागेतली पूनम भेळ आणी पाणीपुरी

- आता विषयांतर नको -
पण भैंयाकडे पाणीपुरी नाही नाही म्हणजे नाही.

(ठाम) मनस्वी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Feb 2008 - 6:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी माणुस पाणीपुरीचा धंदा इतका मन लावून करेल का ? आणि केला तर इतक्या प्रेमाने खाऊ घालेल ?? :)
ABCD0001
आज आम्ही या भैय्याच्या पोराकडून पाच रुपयाच्या दहा पाणीपुरी बमकावल्या, खट्टा आणि मिठा अशा दोन स्टीलच्या पीपात त्याने बूडवून बुडवून बोटा सहीतकाढलेल्या पाणीपुरीची टेष्ट लै भारी होती. :) त्याला विचारले मनसेसे डर नही लगता क्या ? तेव्हा काही बोललं नाही......सुकीपाणीपुरीचा आग्रह केला. फोटो घेतल्यावर तर ते आणखीणच टरकलं....!!! ( पण फोटो घेण्यापुर्वी कोण काय करतं असा त्याच्या चेहर्‍यावर भाव होता भौ )

मिसळपाव बातमीसाठी औरंगाबादहून
प्रा.डॉ....:)

मनस्वी's picture

21 Feb 2008 - 6:40 pm | मनस्वी

महाराणाप्रतापच्या इथल्या आमच्या मावशी प्रेमाने, मायेने, आपुलकीने, आग्रहाने देतात - स्वच्छ आणि चविष्ट!
आणि कल्याणवालेपण देतात.

** आमच्या मावशींनी (ज्यांना लिहिता वाचता येत नाही) धडाडीने, स्वकर्तुत्वावर एका गाडीच्या चार गाड्या केल्या आहेत! सांगण्याचा उद्देश - त्या पाणीपुरीचा धंदा कमालीच्या मन लावून करतात.

((पुण्यात(महाराष्ट्रात))मराठी पाणीपुरी खाणारी) मनस्वी

राजमुद्रा's picture

21 Feb 2008 - 6:51 pm | राजमुद्रा

तू सुध्दा महाराणाप्रतापच्या इथल्या मावशीकडे खातेस का पाणीपूरी? मी सुध्दा त्यांच्याकडेच खाते नेहमी. म. फुले मंडई जवळ सुध्दा मस्त मराठी पाणीपूरी मिळते.
महत्वाच म्हणजे भैंयांकडे पाणी पूरी खाणारे लोक मला कोण वाट्तात माहित आहे? भारत पारतंत्र्यात असताना ईग्रंजांकडे गुलामी करणारे लोक. त्यांचेही विचार असेच होते. माझ पोट भरतयं ना? मला सगळं चांगलं मिळतय ना? मग देश गेला खड्ड्यात.
असो पण त्यामुळे काही देश स्वतंत्र व्हायचा राहिला नाही . तो झालाच. तसे भैय्येही जातील. आपण आपला खारीचा वाटा उचलू.

राजमुद्रा :)

मनस्वी's picture

21 Feb 2008 - 6:55 pm | मनस्वी

खारीचा वाटा - मान्य!

(झुपकेदार शेपटीची) खारस्वी

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 7:08 pm | विसोबा खेचर

भैय्या मंडळी पुन्हा कामाला लागल्याचं पाहून कौतुक वाटलं! आपण मराठी मंडळी मात्र अजून हाच विषय चघळतो आहोत! :)

मलाही पाणीपुरी अतिशय आवडते आणि एखाद्या मराठी माणसाची उत्तम पाणीपुरीची गाडी निदान ठाण्या-मुंबईत तरी कुठे असल्याचं मला माहीत नाही! कुणाला माहीत असल्यास त्याचा पत्ता मला जरूर सांगावा. मी एक मराठी माणूस म्हणून अगदी जरूर त्याच्याकडे जाईन आणि पाणीपुरी खाईन!

परंतु तोपर्यंत जर मला पाणीपुरी खावीशी वाटली तर मी ती भैय्याकडचीच खाणार! आणि मी म्हणतो का खाऊ नये? माझे मराठी बांधव जर रस्त्यावर उभं राहून, अपार कष्ट करून, न लाजता पाणीपुरीची गाडी चालवत नसतील तर तो काय माझा दोष? आणि मग आम्ही पाणीपुरी खायची तरी कुठे? की खायचीच नाही?

तात्या.

मनस्वी's picture

21 Feb 2008 - 7:42 pm | मनस्वी

पेठकर साहेबांनी उपाय दिला आहे!
(उपाय: पाणीपुरी घरच्या घरी बनवून मजा करा.)

अजून १ उपायः
मराठी संघटनेने बेकारांना चविष्ट पाणीपुरी बनवायचे धडे देउन गाड्या उभ्या कराव्यात.
लय पैसा अस्तो या धंद्यात!
बेकारी पण मिटेल, आपल्याला पाणीपुरी पण मिळेल, आंणि आपले उद्दिष्ट साध्य पण होइल - कसें..??

मनस्वी

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 11:04 pm | विसोबा खेचर

पेठकर साहेबांनी उपाय दिला आहे!
(उपाय: पाणीपुरी घरच्या घरी बनवून मजा करा.)

मला तरी व्यक्तिश: नाही जमणार हा उपाय! कारणे दोन. एक तर घरी पाणीपुरी करून खायला जमणार नाही आणि दुसरं म्हणजे आज वर्षानुवर्ष भैय्याकडची पाणीपुरी खाण्यात जी मजा आहे, जी चव आहे ती घरच्या पाणीपुरीला नाही!

आणि मुख्य म्हणजे माझ्या मते पाणीपुरी हा घरी बनवून खायचा पदार्थच नाही! त्याची चव रस्त्यावरच आणि चौपाटीवर किंवा बागेतच! तिथेच ती अधिक छान लागते!

शिवाय जी गोष्ट बाहेर सहजासहजी अगदी उत्तम मिळते, चवीलाही छान असते, खिशालाही परवडते, ती घरी करून खायचा उपद्व्याप कोण करणार? आणि तेवढा वेळ नको का जवळ? आणि का? तर पाणीपुरी करणारा केवळ एक भैय्या आहे म्हणून?

मग नुसतं बोलत आणि हक्कांकरता भांडत बसण्यापेक्षा टाकावी की एखाद्या मराठी माणसाने गाडी! आम्ही तिकडे जाऊ!

मराठी संघटनेने बेकारांना चविष्ट पाणीपुरी बनवायचे धडे देउन गाड्या उभ्या कराव्यात.

अगदी जरूर कराव्यात! आम्हीही त्याच गाडीवर पाणीपुरी खायला जाऊ!

बेकारी पण मिटेल, आपल्याला पाणीपुरी पण मिळेल, आंणि आपले उद्दिष्ट साध्य पण होइल - कसें..??

अगदी बरोबर!

तात्या.

--
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!

राजमुद्रा's picture

22 Feb 2008 - 11:39 am | राजमुद्रा

तात्या, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारावासा वाटतो, सध्या पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी झालेली गर्दी आणि ओसाड पडलेली खेडी हे चित्र तुम्हाला दिसत नाहीए की तुम्हाला बघायच नाहीए? हे तुम्हाला योग्य वाटते का?
परप्रातीयांशी आमचे कुठलेही वैर नाही, त्यांना आम्हाला हाकलायचेही नाही. मला हेही दिसतय की जेवढा त्रास त्यांचा आपल्याल होतो, त्यापेक्षा कित्येक पट त्रास त्यांना स्वता:ला होतो. त्यांना नसेल वाटत आपण आपल्या माणसात राहावं?आपण त्यांची पाणीपूरी मिटक्या मारत खातो पण ते कुठे राहतात? काय खातात? हे माहित आहे तुम्हाला? जर माहित असेल तर ते तुम्हाला योग्य वाटते का? यासगळ्याला कारणीभूत आपण आहोत आणि आपल्यापेक्षा आपले राजकिय नेते. अशीच शहरात गर्दी वाढत राहिली आणि खेडी ओसाड पडत राहिली तर त्यांच्या आणि आपल्या पुढ्च्या पिढीचे काय होईल सांगू शकाल?
प्रत्येक गोष्ट आपापल्या जागी असेल तर तिचा निरोगी विकास होतो. आपल्या जागेवरून सरकलेल्या गोष्टी सगळ्याच घटकांना त्रासदायक ठरतात.
आत्ता प्रश्न आहे ही गर्दी कमी करायची कशी? ठिक आहे आपण मान्य करू भैय्याना येथे राहण्याचा हक्क आहे. मग हाकलायचे कुणाला?
भूमीपुत्रांना? आणि मराठी माणसांना हाकललं तर परप्रांतिय आपल्याला स्वीकारतील? तुम्ही म्हणाल अगोदरच कितीतरी मराठी माणसे
परप्रांतात आहेत. हो पण ती त्रासदायक नाहीत. नाहीतर तिथेही भूमीपुत्र पेटून उठले असते.
दुसरं म्हणजे आज तुम्ही जर (मूळ मुद्दा पाहता ) पाणीपूरीसारख्या छोट्याश्या गोष्टीचा त्याग नाही करू शकत, तर उद्या तुम्हाला तुमच्या जन्मभूमीत गर्दीमुळे चिरडून श्वास नाही घेता आला तर तुम्हाला तक्रार करण्याचाही हक्क राहणार नाही. आपणच आपले आणि त्यांचे मारक असू. मला माहित आहे, 'ज्याचं जळतं त्यालाच कळतं' पण तो दिवस लांब नाही जेव्हा सगळ्यांचच जळेल. आपण मध्यमवर्गीय सेफ आहोत्,म्हणून आपल्याला या विषयात काहीच सिरीयस वाटत नाही. आपल्याला पाणीपूरीची चव महत्वाची वाटते. महाराष्ट्राचं स्वास्थ नाही.

राजमुद्रा :)

मनस्वी's picture

22 Feb 2008 - 11:47 am | मनस्वी

माझ्या मते चांगल्या जम बसलेल्या भैय्याचे गावाकडे व्यवस्थित घर, गाडी असते.
अहो दिवसाचाच धंदा केवढा होतो.. आणि त्यावरून महिन्याचा (मराठी फौजदाराला हप्ते वगैरे वजा करून!) ह्याचा हिशोब बोटांवर करण्यासारखा आहे.

मनस्वी

विसोबा खेचर's picture

22 Feb 2008 - 12:18 pm | विसोबा खेचर

अहो दिवसाचाच धंदा केवढा होतो.. आणि त्यावरून महिन्याचा (मराठी फौजदाराला हप्ते वगैरे वजा करून!) ह्याचा हिशोब बोटांवर करण्यासारखा आहे.

अगदी खरं! माझ्या माहितीप्रमाणे त्या भैय्यासारखे पैसे कमवायला मराठी माणसाला कुणीही मनाई केलेली नाही! त्यानेही कमवावेत की पैसे लोकांना आवडणार्‍या वस्तू विकून! फक्त प्रश्न आहे तो काहीतरी झडझडून कष्ट करण्याचा आहे, मेहनत करण्याचा आहे! १० ते ५ वृत्तीतून आणि नुसत्याच गप्पा मारून हे शक्य होईलसं वाटत नाही!

तात्या.

विसोबा खेचर's picture

22 Feb 2008 - 12:14 pm | विसोबा खेचर

तुमच्याच भाषेत सांगायचं तर तुमच्या लेखाचं पोस्टमॉर्टेम करून उत्तर देतो.. :)

सध्या पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी झालेली गर्दी आणि ओसाड पडलेली खेडी हे चित्र तुम्हाला दिसत नाहीए की तुम्हाला बघायच नाहीए?

दिसतंय की!

हे तुम्हाला योग्य वाटते का?

नाही वाटत.

आपण त्यांची पाणीपूरी मिटक्या मारत खातो पण ते कुठे राहतात? काय खातात? हे माहित आहे तुम्हाला?

हो माहीत आहे की!

जर माहित असेल तर ते तुम्हाला योग्य वाटते का?

इथे मला योग्य किंवा अयोग्य वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? इथे येण्याचा निर्णय त्यांचा आहे, रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी विकण्याचा निर्णय त्यांचा आहे, ते कुठे राहतात हा देखील त्यांनी घेतलेला निर्णय आहे, तेव्हा यात मला योग्य किंवा अयोग्य वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? मला एवढंच माहित्ये की त्यांनी केलेली पाणीपुरी मला आवडते. ती मी माझ्या कष्टाच्या पैशाने खातो. ती खाऊन मला शारिरीक आणि मानसिक समाधान मिळतं आणि त्या विक्रेत्यालाही चार पैसे मिळतात! ते जर मिळत नसते तर कुणाला हौस आहे दुपारपासून कष्ट करून तयारी करायची आणि संध्याकाळचे चार-पाच तास रस्त्यावर उभं रहायची??

अशीच शहरात गर्दी वाढत राहिली आणि खेडी ओसाड पडत राहिली तर त्यांच्या आणि आपल्या पुढ्च्या पिढीचे काय होईल सांगू शकाल?

प्रामाणिकपणे सांगायचं तर नक्की काय होईल ते मी नाही सांगू शकणार! मी कुणी द्रष्टा मनुष्य नाही!

मग हाकलायचे कुणाला?
भूमीपुत्रांना?

माझ्या आठवणीप्रमाणे निदान मी तरी भूमिपुत्रांना हाकलायची भाषा कुठेही केलेली नाही. मी स्वत:देखील इथला भूमिपूत्रच आहे आणि मला आवडणारे पदार्थ, वस्तू जर मला भूमिपुत्रांकडून उपलब्ध होणार असतील तर त्या मी त्यांच्याकडूनच घेईन असंच मी म्हटलं आहे! आपण कृपया माझे प्रतिसाद नीट वाचून पाहा!

दुसरं म्हणजे आज तुम्ही जर (मूळ मुद्दा पाहता ) पाणीपूरीसारख्या छोट्याश्या गोष्टीचा त्याग नाही करू शकत,

का करावा? मला असं मुळीच वाटत नाही की मी भैय्याकडून पाणीपुरी खातो म्हणजे काही भयंकर पाप करतो, गुन्हा करतो किंवा राष्ट्रद्रोह करतो!

आणि अहो तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे एक वेळ मी पाणीपुरीचा त्याग करीनही, पण मला सांगा, आज जर मुंबईत मला कुठे टॅक्सीने जायचं म्हटलं तर रस्त्यावर अर्धा-अर्धा तास उभं राहूनही** मला मराठी टॅक्सिवाला भेटत नाही मग म्हणून काय मी टॅक्सीचाही त्याग करायचा का??

आपल्याला पाणीपूरीची चव महत्वाची वाटते. महाराष्ट्राचं स्वास्थ नाही.

मला दोन्हीही गोष्टी महत्वाच्या वाटतात! मराठी माणसाने पाणीपुरी विकावी, ती मला भैय्याच्या पाणीपुरी इतकीच किंवा त्यापेक्षा अधिक चवदार लागेल एवढे निश्चित!

तात्या.

**गेल्या मंगळवारीच मी हा प्रयोग केला. मुद्दाम चांगला पाऊण तास थांबून कुठे मराठी टॅक्सिवाला मिळतो का ते बघत होतो. परंतु मला तो कुठेच दिसला नाही आणि शेवटी एका भैय्याच्याच टॅक्सीतून मला प्रवास करावा लागला! आता ही काय माझी चूक? की मला मीटरप्रमाणे पैसे घेऊन योग्य स्थळी सोडणार्‍या भैय्याची? मी तर तयार होतो मराठी माणसाच्या टॅक्सीने जायला!

असो...

राजमुद्रा's picture

22 Feb 2008 - 12:39 pm | राजमुद्रा

गेल्या मंगळवारीच मी हा प्रयोग केला. मुद्दाम चांगला पाऊण तास थांबून कुठे मराठी टॅक्सिवाला मिळतो का ते बघत होतो. परंतु मला तो कुठेच दिसला नाही आणि शेवटी एका भैय्याच्याच टॅक्सीतून मला प्रवास करावा लागला! आता ही काय माझी चूक? की मला मीटरप्रमाणे पैसे घेऊन योग्य स्थळी सोडणार्‍या भैय्याची? मी तर तयार होतो मराठी माणसाच्या टॅक्सीने जायला!

सहमत तात्या!
पण यावर काहीच पर्याय नाही का? जो आपण कृतीत आणू शकू?जसं चाललय ते चालू द्याव का?
केवळ यावर उपाय शोधण्यासाठीच मी चर्चेत भाग घेतला होता. मला वाटलं होतं आपण सगळे मिळून काहीतरी उपाय शोधू. छोटी का होईना काहीतरी कृतीतून सुरूवात करू.पण त्याचा उपाय सापडण्याऍवजी आपल्यातच गैरसमज व्हायला लागले आहेत. ठिक आहे, जे सगळ्याच होईल तेच माझंही होईल. गर्दिमुळे जीव गुदमरून किड्यामुंग्यांसारखे सगळेच मरून जातील. यात काळजीचे काहीच कारण नाही.

राजमुद्रा :)

माझी दुनिया's picture

22 Feb 2008 - 11:16 am | माझी दुनिया

पेठकर काका, तुम्हीच टाकलीत पाणीपुरीची गाडी तरी चालेल. "लई डीमांड दिसतेय मराठी मान्साच्या पानीपुरीच्या गाडीची". सुगरण तर तुम्ही आहातच. हवं तरं महाराष्ट्रातल्या इतर शहरातही शाखा काढू. म्हणजे सगळ्या पाणीपुरी खवय्यांची सोय होऊन जाईल. याच धर्तीवर दूध, लॉंड्री आणि इतर उद्योगही मराठी माणसांनी आपल्या ताब्यात घ्यायला सुरूवात करावी.

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

मनस्वी's picture

22 Feb 2008 - 11:25 am | मनस्वी

पेठकर काकांना पूर्ण पाठींबा.
काका, जर तुम्ही मनावर घेतले (तुम्ही यात अनुभवी आहात म्हणून तुमच्याकडून अपेक्षा बाळगून आहोत) तर खरच एक छान संधी आहे - तुम्हाला आणि मराठी बेकारांना.
बघा विचार करून.
तुमची जाहिरात करण्याची जबाबदारी आम्ही मिसळपावकर पेलायला तयार आहोत.. बोला मंडळी......

(ताई माई अक्का
विचार करा पक्का
मराठी पाणीपुरीवर
मारा शिक्का).............. मनस्वी

प्रभाकर पेठकर's picture

22 Feb 2008 - 1:50 pm | प्रभाकर पेठकर

माझी दुनिया आणि मनस्वी....

मराठी माणसांना 'तयार' करून हॉटेलचा व्यवसाय करणं मलाही अभिमानास्पद वाटेल.

दुर्दैवाने मराठी माणसांचा माझाही अनुभव अजिबात चांगला नाही. गृहसजावटीच्या वेळी अस्खलीत मराठी बोलणारा भय्या मला भेटला. अतिशय कुशल, मेहनती आणि वक्तशीर. त्याच संदर्भात दोन मराठी व्यावसायिक भेटले. एक होता लाकूड सप्लायर. भेट झाल्यापासून वर्षभरात त्याने बाजारात मोठमोठी कर्जे घेऊन त्याची परतफेड करू न शकल्याने शेवटी धंदाच बंद केला. दूसरा व्यावसायिक सिव्हील काँट्रॅक्टर. त्याने तर माझ्या नाकी दम आणला. काम आणि दाम एक ठरवायचं आणि दाम आधी वसूल करून कामाची टाळाटाळ करायची. ३ दिवसांचे काम ३ महिने चालले. असो.
माझ्या मस्कत मधील कॅफेटेरीयासाठी मी २९ कुक्सच्या हातची पावभाजी खाल्ली. ५ शॉर्टलिस्ट केले. ४ मराठी १ मल्याळी. चारही मराठी कुक्सनी टांग दिली. मल्याळी त्वरीत तयार झाला, आला आणि आज गेली १८ वर्षे माझ्याजवळ इमानदारीत काम करतो आहे. माझ्या अर्ध्या व्यावसायिक यशाचा वाटेकरी तो आहे.
दुसरा एक मराठी (ख्रिश्चन) माझ्या जवळ काम करतो. पण तो अकुशल आणि विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. तिसरा मराठी एक आहे तो प्रामाणिक आहे. पण त्याचे इतर स्टाफ बरोबर अजिबात पटत नाही. त्याला मी सांगितले की 'बाबारे! इथे (मस्कत मधे) काही आपल्याला जन्मभर राहायचे नाही. तू मटण छान बनवतोस. इतर ८-१० आयटम्स मी तुला शिकवतो. वरून भांडवलही पुरवतो पण तू गावाकडे स्वतःचे, छोटेसे का होईना, हॉटेल किंवा फास्ट्फुड जॉइंट सुरू कर.' पण रामा-शिवा-गोविंदा. मेहनत करण्यास तयार नाही.

इथे पुण्यात इडली-डोसे बनवायला एक मराठी मुलगा शोधून काढला. सुरुवातीला बरा होता. पण लवकरच त्याचे डोके कोणीतरी फिरवले. जास्त पगाराची, सुट्यांची आणि असिस्टंटची मागणी करू लागला. ताबडतोब मी दूसरा कारगिर पाहिला. ओरिसाचा आहे. आपला जॉब जातो आहे असे पाहिल्यावर मराठी जरा वठणीवर आला. असो.
भय्यांच्या पाणीपुरीवर बहिष्कार घाला अथवा नका घालू. त्या मागणी मागील भावना समजून घ्या. त्या भावनेचा आदर करा. जमेल तितका स्वाभिमान, अस्मिता आणि मराठी बांधवांप्रती प्रेम जोपासा.
आपल्या सानिध्यातील, माहितीतील एखाद्या मराठी बेरोजगाराचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करा. श्रम संस्कृती वाढीस लागेल असे उपदेश संकुचित मनोवृत्तीच्या बांधवांना करा. एकूण काय तर मराठी माणूस पुढे येईल ह्या साठी प्रयत्नशील राहा.

दूसरा उपाय नसेल तर भय्याकडची पाणीपुरी अवश्य खा पण स्वत्व विसरू नका.

भय्यांच्या विषयावरून मराठी माणसं आपापसात किती भांडणार? जमेल तशी कृती करा.

धन्यवाद.

राजमुद्रा's picture

22 Feb 2008 - 1:59 pm | राजमुद्रा

धन्यवाद पेठकर साहेब!
जमेल तशी कृती करा. (आणि इतरांना स्वता:ची कृती करू द्या) हे माझे म्हणणे आहे.

राजमुद्रा :)

माझी दुनिया's picture

25 Feb 2008 - 2:09 pm | माझी दुनिया

जमेल तशी कृती करा.आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी काल घरी पाणीपुरी करून यथेच्छ हादडली.(ता.क. : मी पाणीपुरी ब-याचदा घरीच करून खाते.)शिवाय आपली ही चर्चा आणि पाणीपुरीवाचून सुकलेले मिसळपावकर पाहून(वाचून) आता मनसे ने मराठी / भूमिपुत्रांचा सोडून पाणीपुरीचा प्रश्न धसास  लावायचा ठरवलेले दिसते.माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

विसोबा खेचर's picture

25 Feb 2008 - 2:09 pm | विसोबा खेचर

शिवाय आपली ही चर्चा आणि पाणीपुरीवाचून सुकलेले मिसळपावकर पाहून(वाचून)
माझ्या मते प्रश्न पाणीपुरीवाचून सुकण्याचा अथवा ओलं होण्याचा नाही! प्रश्न आहे तो ठाण्या-मुंबईत मराठी माणूस पाणीपुरी विकणार किंवा नाही याचा!
असो..
(आपला वस्तुस्थिती सांगणारा!) तात्या.

मनस्वी's picture

25 Feb 2008 - 3:41 pm | मनस्वी

मादुताईंनी दिलेल्या link वरील बातमी वाचली.
मनसेने फक्त भाषण झोडून हात झटकले नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या प्रयत्नांत आहे हे वाचून अत्यानंद झाला.
आता ही कृती नव्याचे नऊ दिवस न रहाता आपले भाऊ लवकरच सर्वत्र दिसावेत हीच इच्छा, म्हणजे परमानंद होइल.
(भाऊंची पाणीपुरी खाण्यास आतुर) मनस्वी

मुळात हा प्रश्न ज्यान्च्यामुळे तयार झाल त्या बिहारी नेत्याना कोणी बोलताना दिसत नाहि.
मुलायम सिन्ग किन्वा अबु आझ्मि यानि युपी बिहार सठी काय केले याचा जाब त्यान कोणिच विचारत नाहि?

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 4:16 pm | राजमुद्रा

पाणी पुरी खाल्लि नाहि म्हनुन भैय्या जाणर नाहि

अहो विजयशाह,
तेच विचारते आहे, मग कसे जातील?

राजमुद्रा :)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Feb 2008 - 1:11 am | llपुण्याचे पेशवेll

नुसते पाणीपुरी बंद करून काय होणार आहे. आख्खी मुंबई भैय्याचे(म्हणजे त्याच्या म्हशीचे) दूध पिते. मग तुम्ही दूध पिणे पण बंद करणार का? त्या ऐवजी काढा एखादी डेअरी....
पुण्याचे पेशवे

राजमुद्रा's picture

21 Feb 2008 - 12:49 pm | राजमुद्रा

तुम्हाला नक्की म्हणायचय काय?
मला खरच कळलं नाही, मी प्रामाणिकपणे एक मराठी माणूस म्हणून योग्य ते सर्व प्रयत्न करायला तयार आहे. मान्य आहे पाणीपूरी भैय्याकडे खाणे बंद करून भैंय्या जाणार नाही, पण सुरूवात कुठून तरी केलीच पाहीजे ना? आणि तुमच्या सल्ल्याप्रमाणे डेअरी काढून तरी जातील का? खरंच जाणार असतील तर मी तेही करायला तयार आहे.
हाच तर मूळ मुद्दा आहे, मराठी माणसाकडे सर्व आहे. सगळे म्हणतात तेवढा (माझ्या मते) मराठी माणूस आळशीही नाही.
एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे -
यश मिळेपर्यंत वाट पाहण्याची तयारी किंवा पेशंन्स
आपल्याला आकाशात उडणार्‍या कल्पना आवडतात, पण त्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात म्हणून आपण धड्पड्तोही. पण जेव्हा आपल्या लक्ष्यात येतं की त्यासाठी आपल्याला खूप वाट पाहावी लागणार आहे, तेव्हा आपले पेशंन्स संपतात. आपल्याला सगळ्या गोष्टी एका मिनिटात व्हाव्यात असं वाटत असत. समाजात बदल व्हावा असं मनापासून आपल्याला वाटतं पण फक्त एका मिनिटात.
विचार केल्यानंतर मला वाटलं पाणीपूरी बंद करून मी कुठुनतरी सुरूवात तर करत आहे ना?मला माहित आहे, अगदी काहीही केलं तरी भैंय्या एका मिनिटात जाणार नाहीत आणि गेले तरी ते सर्वांसाठीच घातक आहे (विचार करा आपल्याला काय काय मिळ्णार नाही?)
त्यासाठी वाट पाहावी लागेल. पण हातावर हात ठेवून नाही. छोटी का होईना पण सुरूवात करावी लागेल. कदाचित उद्या यातूनच समाजात बदल घडेल. ही अतिशयोक्ति नाही. आठवून बघा आपला देश काही एका मिनिटात स्वतंत्र झाला नाही. पण सुरूवात एका छोट्याश्या उठावाने झाली होती.
दुसरा मुद्दा म्हणजे राजकारणाचा, बिहार किंवा इतर प्रांतातल्या नेत्यानी स्वच्छ कारभार चालवला तर बर्‍याच तरूणाना रोजगार मिळेल आणि शहरातली बरीच गर्दी कमी होईल असे बर्‍याच जणांचे मत आहे. पण माफ करा मी सद्ध्या तरी याबाबतीत काहीच करू शकत नाही.
अगदी छोटीशी सुरूवात सुद्धा ! कारण राजकिय नेत्यांमध्ये परीवर्तन घडवून आणण्याची ताकद सद्ध्यातरी माझ्याकडे नाही.
माझा भैंयाकडे पाणीपूरी न खाण्याचा निर्णय छोटा जरी असला तरी माझी वाट पाहण्याची तयारी आहे. कदाचित आपल्या पुढच्या पिढीला मराठी महाराष्ट्रात राहायला मिळेल. समाजात बदल योग्य त्या वेगाने झाला तर ते समाजासाठी घातक ठरत नाही असे माझे मत आहे.

फक्त एकच ईच्छा, माझा निर्णय कसा चूक आहे हे सांगण्यापेक्षा जर प्रत्यक्ष क्रुतीत उतरवता येण्यासारखा योग्य उपाय सांगितलात तर मी त्याचे स्वागतच करेन. शेवटी महाराष्ट्राच हित महत्वाच!

राजमुद्रा :)

प्रभाकर पेठकर's picture

21 Feb 2008 - 1:06 pm | प्रभाकर पेठकर

माझा निर्णय कसा चूक आहे हे सांगण्यापेक्षा .....

निर्णय अजिबात चूक नाही. आदर्शवादी आहे आणि तो शक्यतो सर्वांनी पाळावा. माझ्या प्रतिसादात मी आपल्या निर्णयाला चूक म्हंटलेले नाही पण मराठी माणसाची व्यथा आणि असहाय्यता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
भय्याकडच्या पाणीपुरीवर बहिष्कार घालणं हे एक छोटसं असल तरी परंप्रांतीयांच्या मुंबई आकर्षणाला ठेचून काढण्याच्या प्रयत्नातील पहिलं पाऊल असेल. (उपाय: पाणीपुरी घरच्या घरी बनवून मजा करा.)
पाणीपुरी वरील बहिष्कार हे प्रातिनिधीक उदहरण झाले. त्याच प्रमाणे भय्याकडून मासे नघेणे, पान न खाणे इत्यादी अनेक मार्ग आहेत. मुळ उद्देश हा की भय्यांवर सर्वतोपरी बहिष्कार घातला पाहिजे. त्याशी मी सहमत आहे.
इतर भाषिक (गुजराथी, बंगाली, कानडी, मारवाडी...इ.) ह्या बहिष्कारात सामिल होणार नाहीत हे दुर्दैव आहे. थोडीफार हाणामारी करावीच लागणार. असो.

राजमुद्रा's picture

21 Feb 2008 - 2:22 pm | राजमुद्रा

माफ करा पेठकर साहेब, माझा प्रतिसाद आपल्या प्रतिसादाला उद्देशून नव्हता.
भैंयाकड्चे दूध बंद करून तुम्ही डेअरी चालू करा, असा सल्ला मिळाला म्हणून मला वरील अभिप्राय द्यावा लागला.
त्याऍवजी मी दूध डेअरी चालू करतो. असा अभिप्राय आला असता तर अश्या वैयक्तिक निर्णयाला माझी हरकत नाही.

एकदम मान्य !
आजपासून् पाणीपूरीबरोबरच भय्याकडून मासे घेणे, पान खाणे बंद!

राजमुद्रा :)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Feb 2008 - 10:38 pm | llपुण्याचे पेशवेll

भैंयाकड्चे दूध बंद करून तुम्ही डेअरी चालू करा, असा सल्ला मिळाला म्हणून मला वरील अभिप्राय द्यावा लागला.
आता बघा सगळ्या मुंबईमधल्या मराठी लोकांनी भैयाकडचे दूध घेणे बंद केले तर त्याना दूधाचा मराठी पर्याय उपलब्ध आहे? 'गोकुळ','कृष्णा','वारणा' इ. मराठी ब्रँडची दुधे वितरण करणारे मोठे व्यापारीपण सर्वत्र मराठी नाहीत.
तुम्ही मुंबई मधे समजा भैयाकडची पाणिपुरी बंद केलीत तर मुंबईत सर्वत्र मराठी पाणिपुरीचे पर्याय उपलब्ध आहेत?
मध्यंतरी आनंद दिघे हयात असताना त्यानी मंडईमधले भैये सर्व हाकलून बाहेर काढले होते. मग ते परत कसे आले? मराठी माणसाने भाजी विकण्याऐवजी गाळा भाड्याने देऊन फुकट खाणे पसंत केले ना? मूळ मुद्दा हा आहे. हाच मुद्दा मी मागे एका चर्चेमधे व्यक्त केला होता. दुखण्यावर वर वर चे ईलाज करण्यापेक्षा जखमेच्या मूळाशी जाऊन उपाय करणार कोण?
मध्यंतरी देवगडमधे आंबा उत्पादकांनी दलालांची नफेखोरी आणि त्यामुळे आंबा उत्पादकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी 'सोसायटी' स्थापन करून आंबा वितरण चालू केले होते.(याला चांगला उपाय म्हणता येईल)
पुण्याचे पेशवे

मनस्वी's picture

22 Feb 2008 - 10:04 am | मनस्वी

गाळे जरूर भाड्याने द्यावेत, पण ते फक्त मराठी माणसालाच द्यावेत.
(जसे खात्रीशीर माहित नाही पण डबेवाले फक्त मराठी माणसांनाच घेतात म्हणे धंद्यात!)

करायचे झाल्यास सगळेच शक्य आहे हळू हळू का होईना. नाहीतर मग हजार सबबी आहेत.

(कासव) मनस्वी

राजमुद्रा's picture

22 Feb 2008 - 10:36 am | राजमुद्रा

मध्यंतरी देवगडमधे आंबा उत्पादकांनी दलालांची नफेखोरी आणि त्यामुळे आंबा उत्पादकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी 'सोसायटी' स्थापन करून आंबा वितरण चालू केले होते.(याला चांगला उपाय म्हणता येईल)
पुण्याचे पेशवे

मिराशीसाहेब खूप चांगला पर्याय आहे. असा पर्याय कृतीत उतरला तर सगळेच प्रश्न लवकरच मिटतील.
पण खरा प्र्श्न आहे, तो वास्तवतेचा!
आता आपण सगळे आपापले व्यवसाय सोडून केवळ भैंयांना हाकलायचे म्हणून त्यांचे व्यवसाय नाही स्वीकारू शकत.
आणि बेकार मराठी तरूण शोधून त्यांना कामधंद्याला नाही लावू शकत. कारण आपली शक्ती कमी पडेल.
यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. पण पुन्हा सुरूवात कुठुन करायची ?

राजमुद्रा :)

मदनबाण's picture

21 Feb 2008 - 10:13 am | मदनबाण

इथे येता येत नाही ,,,आता हा सन्देश सर्व मराठी जनते ने दिला पहिजे .
मुंबई ही यूपी वाल्याच्या बापाची नाही.
हमार तोहार आता बस झाले.

विजुभाऊ's picture

21 Feb 2008 - 10:18 am | विजुभाऊ

हे असले बिहरी ओझे वागवत बसण्यापेक्शा महाराश्ट्राने स्वतन्त्र व्हावे........
किन्वा महाराश्ट्रात इतराना येन्यास प्रतिबन्ध घालावा

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 12:44 pm | सुधीर कांदळकर

आहे. उरलेल्या ७३ टक्क्यातील लोक थोडेच केवळ तो मराठी म्हणून त्याचे ग्राहक होणार? जास्त चांगल्या दर्जाचा माल, जास्त चांगल्या प्रतीची सेवा आणि वाजवी किंमत ही या ७३ टक्के बाजाराची अपेक्षा आहे. या कसोटयावर मराठी माणूस श्रेष्ठ ठरला तर जरूर टिकाव धरेल. डार्विनच्या 'फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हल' या तत्त्वाला अनुसरून मराठी माणसाने या निकषावर आपली श्रेष्ठता वाढवली तरच तो टिकेल. आपण कंठशोष केल्याने नाही. स्पर्धेत टिकणे महत्त्वाचे.

मदनबाण's picture

25 Feb 2008 - 1:37 pm | मदनबाण

मला मेल मधुन आलेल्या चारोळ्या.....
चांगल्या भाषेत सांगीतले
परप्रांतियांना काही समजत नाही
दोन कानाखाली बसल्याशिवाय
त्यांना मराठी ताकद उमगत नाही
------------------------------
अमरसिंग नावाची पिडा
अमिताभला छळू लागली आहे
शहाणी वाटणारी जया देखील
नको ते बरळू लागली आहे
-----------------------------
मराठी दणका बसताच
परप्रांतियांची पळताभुई थोडी झाली
मगरुर टॅक्सीवाले,दुधवाले भैयांच्या
भाषेत देखील आता गोडी आली
------------------------------
प्रामाणिकपणा रक्तात असावा लागतो
तो मागुन मिळत नाही
बिहारच्या "चालू" यादवला
सांगुनही हे कळत नाही.
-------------------------------
हिंदी न्यूज चॅनलांचे कालच
जोरात बारसे झाले चांगले
मराठी लोक आता त्यांना
"भैय्या" न्यूजचॅनल म्हणू  लागले 
 

मदनबाण's picture

25 Feb 2008 - 2:49 pm | मदनबाण

मला मेल मधुन आलेली ही आणखीन एक कविता:-----
खूप सहन केली
मराठी माणसाची व्यथा
आता या परप्रातियांच्या
कमरेत घालणार लाथा
तुम्ही दिडदमडीचे लोक
आम्हाला शिकवता देशभक्ती
ब्रिटीशांच्या विरुद्ध लढली
सर्वात ज्यास्त मराठीशक्ती
खबरदार जर केली
नजर जरादेखील करडी
तर उगारलेल्या काठीवरच
बांधू आम्ही तुमची तिरडी
भारत देशासाठी सदैव
बलिदानास तयार मराठी
आमच्या घरात घुसुन धमकावाल
तर बसेल डोक्यात काठी
तुमची मातृभाषा कोणतीही असो
तुमचे कर्तव्य ईथली संस्कॄति जपणे
येथे तुम्ही मराठीचा आदर करा
एवढेच आहे मराठी माणसाचे म्हणणे
-------------------------------
महाराष्ट्र ..... मराठी मनांचा
जय महाराष्ट्र
(मदन-बाण)

ब्रिटीशांशीच नाही तर सर्व परकीयांशी. अहमदशहा अब्दालीशी लढणारे मराठेच होते.  'औरंग्या पाप्याला' बुडविणारे पण मराठेच होते. एक राणा प्रताप आणि सुरुवातीचे काही रजपूत राजे सोडले तर सर्व रजपूत राजांनी एक मुल़गी मुघल सम्राटाला अर्पण करायचे धोरण ठेवले होते.
शेवटी स्वाभिमान रक्तातच असावा लागतो तो बाहेरून भरता येत नाही.
 हे भय्ये कितीही चांगली पाणीपुरी बनवत असले तरी ती त्याना त्यांच्या प्रदेशात विकता येत नाही कारण एकतर तिथल्या लोकांची क्रयशक्ती नाही आणि दुसरे म्हणजे तिथले स्थानिक गुंड त्याना सुखासुखी धंदा करू देणार नाहीत. इकडचे पोलीस हफ्ता घेतल्यावर का होईना पण त्याना सुखाने धंदा करू देतात.
पुण्याचे पेशवे

माझी दुनिया's picture

25 Feb 2008 - 5:34 pm | माझी दुनिया

अ'राज'क माजवणा-या माननीय श्री. राज ठाकरे यांच्या भाषणातला काही भाग इथे एका.माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)