स्वैराचाराला मान्यता ?

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
19 Feb 2008 - 5:31 pm
गाभा: 

नुकतीच ही बातमी वाचनात आली. आधीच शासनाने लग्नाचे वय कमी करण्याचा घेतलेला निर्णय. शिवाय सध्याच्या युगात लग्नापुर्वी एड्सची चाचणी सक्तीची न करण्याचा घेतलेला निर्णय असे काही निर्णय पहाता तरूण पिढी चुकीच्या दिशेने/वाटेने चालली आहे याची काळजी वाटते. या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, जे १००० इच्छूक तरूण भाग घेणार आहेत ते किमान विवाहीत असतील याची खातरजमा कंपनी करणार आहे का ? अन्यथा तो स्वैराचाराला पाठींबाच ठरेल.

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2008 - 11:09 pm | प्रभाकर पेठकर

जे १००० इच्छूक तरूण भाग घेणार आहेत ते किमान विवाहीत असतील याची खातरजमा कंपनी करणार आहे का ?

निरोधच्या वापरासाठी पुरुष विवाहित असण्याची काय गरज?
विवाहित पुरूष स्वैराचारी नसतात असे कोणी आणि कुठे म्हंटले आहे?

पिवळा डांबिस's picture

19 Feb 2008 - 11:34 pm | पिवळा डांबिस

मला तरी त्या बातमीतलं,

"आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार बनवण्यात येणारे निरोध भारतीय माणसासाठी मोठे असतात."

हे विधान जास्त चिंताजनक (व अपमानास्पद?) वाटलं...

या विधानाचा व्यत्यास काय होतो त्याचा विचार करा...
:))

चतुरंग's picture

19 Feb 2008 - 11:56 pm | चतुरंग

हे बाकी थेट 'विषया'लाच हात घालणं आपल्याला आवडलं हां!
तसा आशियामधील माणूस एकूणच पाश्चिमात्य लोकांपेक्षा चणीने लहानच असतो आणि (तरीही!) एकूण भारतीयांचा जननदर पाहता लोकसंख्यावाढीची चिंताच जास्त वाटायला हवी;))

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Feb 2008 - 12:23 am | llपुण्याचे पेशवेll

म्हणतो मी.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 6:52 am | विसोबा खेचर

पेठकरकाका, डांबिसकाका, चतुरंग,

कसल्या रे मेल्यांनो चावट चावट चर्चा करताय? :)

आपला,
(चौपाटीवरचा फुगेवाला!) तात्या.

;)

आणि तुमच्यासारख्या 'फुगेवाल्यानं' टोकलं की आम्ही गप्प बसतो!:}

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

20 Feb 2008 - 9:01 am | पिवळा डांबिस

चतुरंगांनी मांडलेला लहान चणीचा मुद्दा अगदी मान्य आहे. मलाही हेच म्हणायचे आहे.
माझा आक्षेप बातमीत वापरलेल्या "जागतिक प्रमाण" या शब्दप्रयोगावर आहे. जपान, अवघी अतिपूर्व, आणि चीन देशांतल्या लोकांची शरीरयष्टी (चण) आपल्यापेक्षाही लहान आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानातील लोक आपल्या चणीचेच आहेत. जगातील बहुसंख्य लोकसंख्या या भागात एकवटली असतांना 'जागतीक प्रमाण' ठरवायचे ते इथल्या जनतेचे ठरवायला हवे.
त्यामुळे या बातमीतला आणि त्या संस्थेच्या पत्रकातला 'जागतिक प्रमाण' हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. फारतर "पाश्चात्य प्रमाण'" म्हणा हवं तर....
उगाच आमच्या पोरांना न्यूनगंड द्यायचा म्हणजे काय? :))
आणि पाश्चात्य प्रमाण भारतीय प्रमाणापेक्षा अधिक असेल तर त्यात आश्चर्य करण्याचे कारण नाही. एकतर त्यांची चण मोठी आहे आणि त्यांचे मेंदूही तिथेच एकवटले आहेत! म्हणून तर त्यांच्या लग्नसंस्थेची ही तर्‍हा!! :))

गोष्ट नेहमी सांगितली जाते..
खेळातलं यश तलवार चालवण्याच्या कसबावर अवलंबून असतं तलवारीच्या मोजमापावर नाही..

(समझने वालों को इशारा काफी है! ;-))
-एक एपी फेन्सर.

पिवळा डांबिस's picture

24 Feb 2008 - 10:49 pm | पिवळा डांबिस

खेळातलं यश तलवार चालवण्याच्या कसबावर अवलंबून असतं तलवारीच्या मोजमापावर नाही..
(समझने वालों को इशारा काफी है! ;-))
इशारा तो समझ गये, जनाब! :)
लेकिन माशाल्ला, तरवारकी जगह तो तरवारही चाहिये ना?  वहां 'कट्यार' तो नही चलती!! :))

बस्स, खिलाडी अक्ल्अमंद होना चाहिये! ;)
 

धनंजय's picture

25 Feb 2008 - 1:56 am | धनंजय

कट्यार. बाजी़में फतह तो हथियार हजा़र!  (बहुतेक शिकारीसाठी दोन इंचांची कुशल कट्यार पुरते. वाघनख [एक] पुरणार नाही,पण बहुतेक वाघांकडे केवळ एक वाघनख तेवढेच नसते. त्यामुळे तो विषय ९९.९९% काढायची गरज नाही.)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Feb 2008 - 1:20 am | llपुण्याचे पेशवेll

"आणि पाश्चात्य प्रमाण भारतीय प्रमाणापेक्षा अधिक असेल तर त्यात आश्चर्य करण्याचे कारण नाही. एकतर त्यांची चण मोठी आहे आणि त्यांचे मेंदूही तिथेच एकवटले आहेत! म्हणून तर त्यांच्या लग्नसंस्थेची ही तर्‍हा!! :))"
अगदी खरे आहे.... ;)

(अमेरीकेतही ब्रम्हचर्य जपलेला)
डॅनी
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 1:30 am | विसोबा खेचर

अवांतर शंका/प्रश्न!

(अमेरीकेतही ब्रम्हचर्य जपलेला)

फक्त शरीरानं ब्रह्मचर्य जपलंत की मनानेही जपलंत? कृपया प्रामाणिक उत्तर द्या. अर्थात, सक्ती नाही!

मनानेही जपलं असेल तर खरंच कौतुकास्पद आहे! नायतर फक्त शरीराने तेवढे ब्रह्मचारी आणि मनामध्ये मात्र फँटसिज सुरूच असतात म्हणून म्हटलं! :)

नाही, पुष्कळदा प्रॉपर चान्स मिळाला नाही म्हणूनदेखील शारिरिक ब्रह्मचर्य (सक्तिचं!) हे आपसुकच पदरात पडतं म्हणून विचरतो! ;)

असो..

आपला,
(अविवाहीत!) तात्या.

--
'फक्त शरीरापासून दूर गेलास की गेलास का मोहापासून दूर? जरूर मन जिंकायला शिक पण अगोदर त मन कुठं बसलंय हे तर बघशील की नाही?!'
-- इति काकाजी. (नाटक - तुझे आहे तुजपाशी)

धनंजय's picture

21 Feb 2008 - 1:53 am | धनंजय

पुष्कळदा प्रॉपर चान्स मिळाला नाही म्हणूनदेखील शारिरिक ब्रह्मचर्य (सक्तिचं!) हे आपसुकच पदरात पडतं म्हणून विचरतो! ;)
...
'फक्त शरीरापासून दूर गेलास की गेलास का मोहापासून दूर? जरूर मन जिंकायला शिक पण अगोदर त मन कुठं बसलंय हे तर बघशील की नाही?!'
-- इति काकाजी. (नाटक - तुझे आहे तुजपाशी)

हाहाहा!

माझ्या मते नैतिकतेचा लैंगिक संबंधांशी १-ला-१ संबंध (१-तु-१ कॉरस्पाँडन्स) नाही.

अगदी लग्न होऊनही पती/पत्नीला इच्छा नसताना शारिरिक संबंध ठेवणे माझ्या मते अनैतिक.
आणि आपल्या हाताला मऊ लागते आहे म्हणून काही कुस्करल्याचे भान राहू नये, हे अनैतिक. (मग तिथे लैंगिक संबंध न ठेवताही, प्रेमात फसवले तर अनैतिकच!)

आणि दोघांच्या आनंदाची जोपासना होत असेल, दूरान्वयेही नुकसान होत नसेल, तर लैंगिक संबंधांत काही अनैतिक नाही. (येथे रोगांच्या बाबतीत निष्काळजी असणे = दूरान्वये नुकसान = अनैतिक, हे उदाहरणादाखल घ्यावे.)

या बाबतीत र. धों. कर्वे यांचे असेच काही मत होते असे ऐकून आहे (म्हणजे लैंगिक संबंध आणि नैतिकता यांचा १-ला-१ संबंध नाही, असे काही.) पण त्यांचे मूळ लेखन मी वाचलेले नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Feb 2008 - 1:35 am | llपुण्याचे पेशवेll

'संदीप खरे ' याची एक उत्तम कविता आठवली.

"अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा,
अजून तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा|

कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी,
कुणी ओठांची नाजूक अस्त्रे वापरली हुकमी,
अन शब्दांचे जाम भरोनि पाजियले कोणी,
अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा
आणि अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा|"

ब्रम्हचर्य जपलेला :) म्हटले आहे पाळलेला (सक्तीने ट्रॅफिकचे नियम पाळतो ) नाहीये. :)
(ह्.घ्या.)
:) :)
पुण्याचे पेशवे

तात्या म्हणतात तसे शारीरिक ब्रम्हचर्य ही फारच वरवरची बाब आहे.
विवेकानंदांनी म्हटले आहे "माणूस सार्वजनिक ठिकाणी नैतिकतेनेच वागतो (अर्थात आजच्या काळातले महाभाग बघून स्वामींनी हे म्हणण्याचे धाडस केले नसते!) पण तो एकांतात असताना कसा वागतो त्यावरुन त्याचे वागणे नैतिक की अनैतिक हे ठरवता येते."
ह्याठिकाणी लैंगिक गोष्टींचा संबंध यायलाच हवा असे नाही. नैतिकतेमधे विचारांचा संबंध प्रथम येतो, मग मनाचा आणि त्यानंतर कृतीचा.

चतुरंग

कोलबेर's picture

21 Feb 2008 - 6:28 am | कोलबेर

विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू विवेकानंद, निदान एकांतात तरी माणसाला एकटे सोडावे! :) बाकी नैतिक अनैतिक चालू द्या!!!

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 1:58 pm | सुधीर कांदळकर

... मिळावी म्हणूनच हल्ली वार्ताहर असे शब्दप्रयोग करतात. मीडियाचे हे आता नेहमीच वापरले जाणारे सवंग तंत्र आहे. आपण लक्ष देण्याइअतकी या बातमीची लायकी नाही. अनुल्लेखाने मारावे.

धोंडोपंत's picture

24 Feb 2008 - 3:41 pm | धोंडोपंत

या बातमीतून 'स्वैराचाराला मान्यता' कशी काय मिळेल हे समजले नाही.

आपला,
(अडाणी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

अहो कसला स्वैराचाराला पाठिंबा सरकार देतोय असे वाटते आहे?
ज्याला स्वैराचार करायचाच तो करणारच...
मग सरकारला काय कायदा करायचा तो करु दे....
तसेही सरकारच्या सध्याच्या कायद्यामुळे काही  मुलींचे  पालक आपल्या मुलीची चूक असली तरी आपल्या प्रतिष्ठेसाठी मुलावर डायरेक्ट बलात्काराची खोटी केस ठोकतात.... बरे यात मुलाचीच बदनामी होते ...भोगावे मुलाच्या कुटुंबियांनाच... मुलीचे आणि घरच्यांचे नाव सुरक्षित राहते. किमान या असल्या गोष्टीला तरी या नव्या कायद्यामुळे आळा बसेल... कारण प्रेमविवाह असेल तर मुला-मुलींचे पालक पहिले वय बघतात आणि अल्पवयीन या सवलतीखाली आपली मनमानी करतात... बर्‍याच वेळा ते योग्यदेखील असतात. पण त्या योग्य बाजूचे समर्थन करण्याचा हा मार्ग नव्हे असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते....
रोखठोक प्रेमी ...
{परीच्या प्रतिक्षेत} परा ....