मंडळी शीर्षक वाचून चक्रावलात ना?
मीही असाच चक्रावलोय. मिपाचेच एक जेष्ठ सभासद आपल्या संस्थळावर येऊन कोणती तक्रार करुन गेलेत ते पाहा. त्यासोबत मी त्यांना दिलेले उत्तरही पाहा.
त्याचा पुरावा खाली वाचा......
____________________________________________________
प्रमोद देव म्हणाले ...
...हा कोण त्रस्त समंध आहे? ह्याचे नेमके दुखणे काय आहे?... "बाबा रे, तुला असा प्रतिसाद का द्यावासा वाटला? जरा सविस्तरपणे सांगशील काय?"
July १९, 2009 ११.२३(भारतीय प्रमाणवेळ)
आम्ही म्हणजे देवकाकांच्या चमच्यांनी विचार केला जाउ दे काय बोलायचे. कोणतरी असंतुष्ट कवि असावा ज्याच्या काव्याला अजुन चाल लावली नसावी देवकाकांनी. वेडाच दिसतोय, भल्या माणसाला त्रास देतोय. उगाच असल्या वेड्याला भाव कशाला द्यायचा अजुन काही लिहून.
तर अत्त्यानंद काका म्हणाले....
..१४८ वाचने आणि फक्त एकच प्रतिक्रिया.
ह्यावरूनच समजले की मिपाकर किती संवेदनशील आहेत ते.
संपादकसाहेब , आता ह्या धाग्याचे काम संपलंय. उडवलात तरी चालेल...
July २०, 2009 ८.३८(भारतीय प्रमाणवेळ)
मग आम्ही बिरुटेसरांना ज्यांना कुठल्या वेळी काय बोलावे एकदम मस्त कळते, त्यांना लगेच +१ झालो पण तेवढ्यात लगेच
अत्त्यानंद काका म्हणाले....
...माझा मुद्दाच न समजल्यामुळे इथे जे काही प्रतिसाद येताहेत ते निव्वळ
’सांत्वनपर’ आहेत....ज्याची मला अजिबात जरूर नाही....
July २०, 2009 ११.२२(भारतीय प्रमाणवेळ)
मंडळी, आता मात्र आम्ही खरच भंजाळलो होतो. माननीय प्राध्यापक साहेबांनादेखील कळले नव्हते हेच "इन्क्रेडिबल" झेपतेन न झेपतेय तोच प्रमोदकाका फारच उद्वीग्न झाल्याचे दिसले. मग इकडे आमची देखील, ना धड प्रतिक्रिया देता येतेय ना धड समजुन घेता येतेय म्हणून चला हे तर नेहमीचेच तर आहे की , सोमवार सुरु झाला म्हणुन खूश व्हायचे की बापरे! मिपाचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आता चाली लावणे सोडणार
(पक्षी: नवा छंद पकडणार) की काय या भितीने गाळणच उडाली की.
मर्जी तुमची अत्त्यानंद!
आम्हाला तुमचा राग काय आणि प्रेम काय,दोन्हीही सराआंखोपेच आहे. पण दूर्दैवाने तुम्हाला तसे वाटत नाही त्याला मी काय करणार!
आणि हो,माझा तुमच्या कोणत्याच कवितेच्या चालीशी अर्थाअर्थी संबंध नाहीये...अगदी प्रतिसादापुरताही. हे आपल्याला कळू शकेल...पण आमचा पाठिंबा पाहण्यासाठी दृष्टी साफ हवी.
तुम्ही जे लिहीले आहे त्यामुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या सर्व चमचे/पळ्यांचा अपमान केला आहे...हे तुमच्या लक्षात आलंय का? परुळेकरांशी
तुमचे जर काही वाजले असेलच तर त्यासाठी तुमच्या जालनिशीवर थांबुन काय ते प्रतिसाद द्या की. तो तर तुम्हाला ओळखतो(निदान हे जे नाव इथे तुम्ही लिहीले आहे त्या नावाने)आणि तुम्हीही तो परत परत जालनिशीवर उत्तर द्यायला तिथे आलात असे म्हणताय.
मग आम्हा असंवेदनाशील लोकांना समजायला गहन नको त्या संदर्भसहित क्लिष्ट गोष्टींचा उच्चार इथे करण्यामागे तुमचा काय हेतू आहे ते मला तरी समजले नाही.
असो.
आम्ही धागा उघडलाय तो बुद्धीवाद्यांनी घटकाभर शिकवणी द्यावी म्हणून. त्याचा लाभ घ्यावा की न घ्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
आम्ही कधी जबरदस्ती केलेली नाही,करत नाही आणि करणारही नाही.
आपण सगळीकडेच सुखाने राहा.
तथास्तु!
विसु:जमल्यास समजेल असा प्रतिसाद द्या.
_____________________________________________________
हा कोणता मुद्दा आहे ज्याने प्रमोदकाका त्रस्त आहेत? ह्यांचे नेमके म्हणणे काय आहे? मला तर काही कल्पना नाही. पण प्रमोदकाका खात्रीने(१००%) मिपाचे जेष्ठ सभासद आहे हे नक्की. मात्र त्यांना प्रतिसाद देताना दिसलेली अनास्था मात्र असली आहे. वैयक्तिक त्यांचे कुणाशी वैर नाही.निदान मी तरी तसे मानत नाही. कुणाचे त्यांच्याशी एकतर्फी छुपे वैर असल्यास मला माहित नाही. मला एकच प्रश्न ह्या परुळेकर व्यक्तीला जाहिररित्या विचारावासा वाटतोय की , "बाबा रे, तुला आमच्या प्रमोदकाकांना असा प्रतिसाद का द्यावासा वाटला? जरा सविस्तरपणे सांगशील काय?"
प्रतिक्रिया
20 Jul 2009 - 1:34 pm | अवलिया
हा हा हा
चला या निमित्ताने सहजकाकांनी लेखणी हातात घेतली हे नसे थोडके ;)
आता आम्ही पण एक धागा काढतो 'सहजकाका शांत व्हा !' ;)
चालु द्या .... :)
--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
20 Jul 2009 - 1:38 pm | प्रमोद देव
आता आम्ही पण एक धागा काढतो 'सहजकाका शांत व्हा !' Wink
हाहाहा!
सहमत आहे!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
20 Jul 2009 - 1:40 pm | दशानन
+१
लिहा लिहा ;)
20 Jul 2009 - 1:49 pm | अवलिया
राजे पहिले तुम्ही शांत व्हा....... ;)
--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
20 Jul 2009 - 1:41 pm | दशानन
+१
लिहा लिहा ;)
20 Jul 2009 - 2:27 pm | Nile
पण आमची पाठिंबा पाहण्यासाठी दृष्टी साफ हवी.
सहजकाका रागावले की.
सहजकाका तुम्हाला त्या सभासदाकडुन कशाची अपेक्षा होती.
हे जे कोण आहेत ते तुम्हाला समजेल असा प्रतिसाद देणारच नाहीत.
तसेही त्यांनी धागा उडवुन टाकायला सांगीतलाय ना.
सोडून द्या ना काका !!!
कुटुन पत्ते
(मेथीचा पराठा)
20 Jul 2009 - 2:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय हे सहजकाका ?
अहो हाथी चले अपनी चाल.... हे काय आता तुम्हाला नव्यानी सांगायला हवे होय ?
सहजकाकांच्या कंपुतली
©º°¨¨°º© अवजड ©º°¨¨°º©
'अजागळ' शिवीगाळ विद्यापिठातुन छिपा आणि छिपाकर 'यांछ्यावर' डी.लिट. करण्याच्या विचारात असलेली.
20 Jul 2009 - 3:01 pm | विसोबा खेचर
अहो प्रमोदशेठ, कोण कुठला तो परुळेकर!
त्याच्या मताला एवढी काय किंमत देताय आणि का त्याच्याशी वाद घालताय?
मराठी आंतरजालावर तात्याद्वेष्टे अनेक आहेत त्यापैकीच हा एक. सोडून द्या ना!
तात्या.
20 Jul 2009 - 3:05 pm | दशानन
असहमत.
असे सोडून कसे चालेल... कमीत कमी प्रभुंच्या तावडीत तर द्या...दोन चार फोकाचे वळ तर उठू देत राव ;)
20 Jul 2009 - 3:09 pm | प्रमोद देव
असे सोडून कसे चालेल... कमीत कमी प्रभुंच्या तावडीत तर द्या...दोन चार फोकाचे वळ तर उठू देत राव Wink
हे माझ्या लक्षातच नाही आले. ;)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
20 Jul 2009 - 5:07 pm | श्रावण मोडक
हाहाहाहाहा
20 Jul 2009 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मग आम्ही बिरुटेसरांना ज्यांना कुठल्या वेळी काय बोलावे एकदम मस्त कळते, त्यांना लगेच +१ झालो
हा हा हा कवतुकाबद्दल धन्यू पण, आज आपला दिवस नव्हता राव ! :)
(तिकडे यनासर मागे लागले आणि इकडे प्रतिसाद टाकून आपण दु:ख विकत घेतले.)
पण सहजा, परुळेकरवरुन आठवण झाली. तो मानस परुळेकर कोणी श्वेता परुळेकर यांचा नातेवाईक तर नसेल ना ? मनसेच्या नेत्याच्या मागे लागायचा तर चुकून अत्यानंदच्या मागे लागला असेल ! :)
>>मिपाचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आता चाली लावणे सोडणार
तुम्हाला सोडा असे म्हणायचे असेल तर ते चाली लावणे सोडणार नाही. हे आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. तसे तुम्हाला म्हणायचे नक्की नसेल !
हा प्रतिसाद आपणास सांत्वनपर वाटला, विषयाशी असंबंधीत वाटला तरी,
कृपया त्याची मला अजिबात जरुरी नाही. असे म्हणू नका ! :)
-दिलीप बिरुटे
(सहजचा मित्र)