सकाळ वृत्तपत्राचे अनेक आभार..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
18 Jul 2009 - 7:59 am
गाभा: 

राम राम मायबाप मिपाकरहो,

आजच्या सकाळ वृत्तपत्रातील कवडसा या सदरात मेधा कुलकर्णी यांचा आपल्या मिपाबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख आला आहे.

सकाळसारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने मिपाची आवर्जून दखल घेतली, त्याकरता पत्रकार मेधा कुलकर्णींचे आणि सकाळ वृत्तपत्राचे मी व्यक्तिश: तसेच समस्त मिपा परिवारातर्फे आभार मानतो..

तात्या.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

18 Jul 2009 - 8:12 am | नितिन थत्ते

मिपाचे, तात्यांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन आणि सकाळचे आभार.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

प्राजु's picture

18 Jul 2009 - 8:12 am | प्राजु

अभिनंदन!! समस्त मिपाकरांचे आणि मालकांचे. :)
त्यातला एखादा पॅरा इथे देऊ शकाल का? इ-सकाळच्या आवृत्तीत हा लेख वाचायला मिळेल का?
=D> =D> <:P =D> =D>
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

18 Jul 2009 - 8:17 am | मदनबाण

त्रिवार अभिनंदन... :)
त्या लेखाची लिंक मिळेल काय ?

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

सुबक ठेंगणी's picture

18 Jul 2009 - 8:21 am | सुबक ठेंगणी

आपल्या मिपाचे आणि मिपाकरांचे आणि तात्यांचे!
प्राजु आणि मदनबाण म्हणतात त्याप्रमाणे कुठे वाचता येईल ते सांगा नां...

टारझन's picture

18 Jul 2009 - 8:54 am | टारझन

अभिनंदन हो तात्या , माझं नाव आलंय का हो त्या लेखात ?
प्लिज प्लिज लिंक द्या ना

(आणंदित) टारझन

टुकुल's picture

18 Jul 2009 - 9:33 am | टुकुल

>>>माझं नाव आलंय का हो त्या लेखात ?
=)) =)) =))
तुझ्या मित्राचे बरेच लेख म्हणे छापील स्वरुपात आलेले आहेत.. =))
(ह. घे रे .. नाहीतर उगाच मि बकरा व्हायचो)

--टुकुल.

छोटा डॉन's picture

18 Jul 2009 - 11:53 am | छोटा डॉन

अभिनंदन असेच म्हणतो, आनंद वाटला.
ई-आवृत्ती अख्खी चाळुन पाहिली, बहुतेक छापील आवृत्तीत बातमी असावी.
असो.

एकदा पाहुन घ्या बरं कोणाकोणाची नावे आहेत ? ;)
आमचे नसल्यास आम्ही कंपुबाजी म्हणुन बोंब मारायला रिकामे ;)
------
वरिष्ठ स्वयंघोषीत निवासी संपादक, सकाळ दुपार संध्याकाळ
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

Nile's picture

18 Jul 2009 - 1:04 pm | Nile

असेच म्हणतो.
नक्की काय माहीती आली? आमचं नाव नसेल आलं तरी आमच्या ख.व. उचपाचक मंडळाचं तरी नाव आहे का? ;)

-Intern,
ख.व. उचकपाचक मंडळ,
मिपानगरी, ड्रुपलशहर, वर्ल्ड्वेब.

टुकुल's picture

18 Jul 2009 - 8:55 am | टुकुल

मिपाचे हाबिनंदन !!
इ-सकाळ बघुन आलो पण लिंक काही मिळाली नाही.. कुणाला मिळाली तर द्या..

--मिपाकर, टुकुल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2009 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेधा कुलकर्णी यांचे आभार आणि मिसळपावचे सर्वेसर्वा तात्या यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!

बातमीची झलक कुठे वाचायला मिळेल.
(संपादक म्हणून माझं नाव आलंय का तेही बघायचे होते ?) :)

-दिलीप बिरुटे

वेताळ's picture

18 Jul 2009 - 9:45 am | वेताळ

नावात काय आहे? मिपाचे नाव आले म्हणजे आता सर्व मिपाकर प्रसिध्द नक्कीच होणार. परत एकदा मिपा,मिपाकर व मिपा म्यानेजर तात्यांचे अभिनंदन.

वेताळ

सचीन जी's picture

18 Jul 2009 - 10:29 am | सचीन जी

अहो,
सोलापुरच्या सकाळमधे काहीच नाही!
तरीहि अभिनंदन!!

तात्या, बातमी आवर्जून सांगितल्याबद्दल तुझे आभार रे! :)

(आनंदित)चतुरंग

अवलिया's picture

19 Jul 2009 - 11:43 am | अवलिया

हेच बोल्तो :)

--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)

अनामिक's picture

18 Jul 2009 - 10:52 am | अनामिक

अरे वा! तात्याचे आणि मिपाकरांचे अभिनंदन!

-अनामिक

आशिष सुर्वे's picture

18 Jul 2009 - 10:54 am | आशिष सुर्वे

झकास... ह्याच बातमीवर, एक फक्कड 'मिसळ-पाव' होऊन जाऊदे!

तात्या.. तुमचे आणि आपण सर्व 'मिपा'करांचे अभिनंदन!!

ई-सकाळ मध्ये ह बातमी शोधली.. नाही मिळाली.
बातमीचा दुवा ईथे प्रसिध्द केलात तर आनंद होईल.
-
कोकणी फणस

नीलकांत's picture

18 Jul 2009 - 11:31 am | नीलकांत

सकाळचे आभार आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन.

- नीलकांत

जागु's picture

18 Jul 2009 - 11:34 am | जागु

अरे वा वा आनंद झाला वाचुन. अभिनंदन तात्या.

सोनम's picture

18 Jul 2009 - 11:45 am | सोनम

सकाळचे आणि तात्याचे, मिपाकराचे अभिनंदन :) :) :)
ह्या लेखाची लिंक कुठे मिळेल हो. :? :?

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2009 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

तात्यानु पुणे सकाळ मध्ये काय दिसले नाही हो :(

जमल्यास तो कवडसा स्कॅन करुन टाकाल काय ?

२४ x ७ मिपाकट्टा पडीक
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

ठकू's picture

18 Jul 2009 - 12:31 pm | ठकू

अभिनंदन तात्या,

मी लिंक शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही मिळाली. :S
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

जागु's picture

18 Jul 2009 - 12:34 pm | जागु

सकाळ पेपर www.esakal.com वर आहे. पण मिपाचा लेख कुठे सापडत नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Jul 2009 - 12:51 pm | बिपिन कार्यकर्ते

लेख वाचला. आनंद झाला. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

18 Jul 2009 - 1:21 pm | सहज

छानच बातमी...
लेख वाचला. आनंद झाला.
तात्या, नीलकांत, संपादक मंडळाचे अभिनंदन!
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

लेख इथे डकवल्याबद्दल कोतवालसाहेब धन्यु.

लिखाळ's picture

20 Jul 2009 - 9:07 pm | लिखाळ

सहमत.
बातमी वाचून आनंद झाला. तात्या आणि निलकांतचे अभिनंदन.
-- लिखाळ.

बेसनलाडू's picture

21 Jul 2009 - 3:32 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

निखिल देशपांडे's picture

18 Jul 2009 - 1:18 pm | निखिल देशपांडे

अभिनंदन तात्या...
लेख वाचला मस्तच माहीती दिली आहे मि पा ची.
==निखिल

ऍडीजोशी's picture

18 Jul 2009 - 1:30 pm | ऍडीजोशी (not verified)

झक्कास :)

प्रमोद देव's picture

18 Jul 2009 - 1:42 pm | प्रमोद देव

तात्या आणि नीलकांतचे अभिनंदन.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

दिपक's picture

18 Jul 2009 - 1:52 pm | दिपक

जय हो मिपाकरहो :)

नाटक्या's picture

18 Jul 2009 - 2:12 pm | नाटक्या

तात्यानू,

लेख वाचला. खूप छान वाटले.
तुमच्या बरोबरच नीलकांत आणि संपादक मंडळाचे अभिनंदन!
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

अमोल केळकर's picture

18 Jul 2009 - 2:23 pm | अमोल केळकर

सर्वांचे अभिनंदन

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

स्वाती दिनेश's picture

18 Jul 2009 - 2:28 pm | स्वाती दिनेश

अभिनंदन तात्या,
स्वाती

योगी९००'s picture

18 Jul 2009 - 2:36 pm | योगी९००

सर्वप्रथम तात्यांचे अभिनंदन..त्यांचा मिपा सुरू करण्यामागचा उद्देश समजला..

मिपाचे, मिपाकरांचेही अभिनंदन आणि सकाळचे विषेश आभार...

खादाडमाऊ

चित्रा's picture

19 Jul 2009 - 9:57 pm | चित्रा

असेच म्हणते. सर्वाचे अभिनंदन.
लेख इथे टाकल्याबद्दल धन्यवाद. मुंबईच्या आवृत्तीत आली आहे का बातमी? पुण्याच्या सकाळमध्ये दिसली नाही.

आनंदयात्री's picture

18 Jul 2009 - 2:38 pm | आनंदयात्री

अभिनंदन :)

-
(मिपाचा आद्य कट्टेकरी)

आंद्या मिपाकर

वाटाड्या...'s picture

18 Jul 2009 - 2:46 pm | वाटाड्या...

तात्या...
नीलकांत..
संपादक मंडळ...
समस्त मिपाकर या सगळ्यांचे हाबीणंदण...

तात्या...
मिसळीची पार्टी ह्यायला पायजे...

- वाटाड्या...

सँडी's picture

18 Jul 2009 - 3:16 pm | सँडी

मिपाचे, तात्यांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन!

प्राची's picture

18 Jul 2009 - 3:59 pm | प्राची

तात्या,मिपाकर सर्वांचे अभिनंदन !!! :) :) :)

mamuvinod's picture

18 Jul 2009 - 4:31 pm | mamuvinod

छान छान वाटले

तात्या अभिनंदन

आता तरी सकाळ पेपरला आजच्यापुरते चागला म्हणा मिपाकरानो

सुनील's picture

18 Jul 2009 - 4:40 pm | सुनील

लेख वाचून बरे वाटले. तात्या, नीलकांत आणि सर्व मिपाकरांचे अभिनंदन!

अरेच्चा, वानगीदाखल म्हणून दिलेल्या पाहुण्या संपादकीयांत आमच्या संपादकीयाचे नाव आले आहे की!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नितिन थत्ते's picture

18 Jul 2009 - 4:42 pm | नितिन थत्ते

>>आता तरी सकाळ पेपरला आजच्यापुरते चागला म्हणा मिपाकरानो
मागील वेळी क्लिंटनच्या लेखावरून जे रामायण झाले ते बहुधा गैरसमजावर आधारित होते.

'पवारांच्या ताटाखालचे मांजर' विषयी म्हणत असाल तर चालू द्या. :)

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

लवंगी's picture

18 Jul 2009 - 4:53 pm | लवंगी

कशी छान झकास बातमी. तात्यांच आणि सगळ्या मिपाकरांच अभिनंदन.

यन्ना _रास्कला's picture

18 Jul 2009 - 5:43 pm | यन्ना _रास्कला

आबिनन्दन. त्ये आचन्रसुर्य का काय म्हंतात तशी मिपाची किरत र्‍हावो.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!

धनंजय's picture

18 Jul 2009 - 6:02 pm | धनंजय

तात्या, मिसळपावाचे तंत्रसंचालक, आणि संपादकमंडळ, सर्वांचे अभिनंदन.

रामदास's picture

18 Jul 2009 - 6:42 pm | रामदास

अभिनंदन.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Jul 2009 - 6:44 pm | प्रकाश घाटपांडे

सकाळ व मेधा कुलकर्णी यांचे मनापासुन आभार. मुंबई आवृत्तीत हे दिसतय. मिपा या कुटुंबातील सदस्यांना याचा मनापासुन आनंद झाला असेल.
(आनंदित)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

घाटावरचे भट's picture

18 Jul 2009 - 6:44 pm | घाटावरचे भट

बेष्ट!

बाकरवडी's picture

18 Jul 2009 - 7:23 pm | बाकरवडी

मिपाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो.
अभिनंदन!! =D> =D> =D> =D> =D>

:B :B :B बाकरवडी :B :B :B

विकास's picture

18 Jul 2009 - 7:30 pm | विकास

तात्या, नीलकांत आणि समस्त मिपा परीवाराचे मनःपुर्वक अभिनंदन! ही बातमी वाचून खूप आनंद झाला!

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Jul 2009 - 7:37 pm | llपुण्याचे पेशवेll

तात्या, नीलकांत आणि समस्त मिपा परीवाराचे मनःपुर्वक अभिनंदन! ही बातमी वाचून खूप आनंद झाला!
असेच म्हणतो.....

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

उपास's picture

18 Jul 2009 - 8:43 pm | उपास

तात्या अभिनंदन रे! दिल्ली दरबारात जाफरभाईकडे पार्टी पायजे आता ;)
शिर्षकात थोडा बदल करता येईल का.. म्हणजे 'सकाळ वृत्तपत्राचे अनेक आभार...' बरं पण कशासाठी ते तिथेच कळू द्या.. म्हणजे "सकाळ वृत्तपत्राचे अनेक आभार.. 'मिसळपावची चव चाखू' बद्दल!"
आणि हो पत्रकारबाईंना धन्यवाद!

पक्या's picture

18 Jul 2009 - 10:45 pm | पक्या

तात्या, मनःपूर्वक अभिनंदन. मिपाची अशीच भरभराट होवो.

अश्विनीका's picture

18 Jul 2009 - 11:18 pm | अश्विनीका

बातमी वाचून छान वाटले. तात्या आणि नीलकांत यांचे अभिनंदन.
मिपाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
- अश्विनी

अनिल हटेला's picture

18 Jul 2009 - 11:21 pm | अनिल हटेला

मिपा आणी तुम्हा -आम्हा मिपाकरांचे अभिनंदन ......

सकाळ वॄत्तपत्रसमुहाचे आभार......

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

क्रान्ति's picture

18 Jul 2009 - 11:31 pm | क्रान्ति

मिपाकर असल्याचा खूप आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय. समस्त मिपाकरांचे, संपादक मंडळाचे, तात्या, नीलकांत यांचे हार्दिक अभिनंदन! आणि मिपाच्या पुढील प्रवासाला अनेकानेक शुभेच्छा.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

नंदन's picture

19 Jul 2009 - 12:05 am | नंदन

मस्त बातमी. तात्या आणि नीलकांत यांचे हार्दिक अभिनंदन!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आपला अभिजित's picture

19 Jul 2009 - 12:37 am | आपला अभिजित

मिसळपावची चव चाखू
मेधा कुळकर्णी
या सदरात मागे आपण मराठी वेबसाइटसचा आणि ब्लॉगविश्‍वाचा एक फेरफटका मारला होता. Druple नावाचं तंत्रज्ञान आणि युनिकोड हा फॉन्ट यांनी जादू केली आणि भारतीय भाषा संगणकावर, वेबसाइटस्‌वर उपलब्ध झाल्या. मायबोली, मनोगत, उपक्रम, लोकायत, मिसळपाव या गेल्या पाच-सात वर्षांत सुरू झालेल्या वेबसाइट्‌स नेटवरचं मराठी विश्‍व समृद्ध करत आहेत आशय आणि भाषा या दोन्ही अंगांनी. पैकी मराठीतली पहिली वेबसाइट ठरण्याचा मान "मायबोली'चा. त्यानंतर मनोगत, उपक्रम, लोकायत आणि मिसळपाव अशा क्रमाक्रमाने मराठी वेबसाइटस्‌ आंतरजालात अस्तित्वात आल्या.
परवा निळू फुले गेले तेव्हा या मराठी वेबदुनियेचा कानोसा घेतला. एका थोर मराठी कलावंताच्या निधनाची नोंद इथे कशी घेतली आहे ते बघण्यासाठी; तर "मिसळपाव'ने लक्ष वेधून घेतलं. मिसळपावच्या स्वगृहावर म्हणजे होमपेजवर निळू फुले यांचा छानसा फोटो आणि "मिसळपाव' परिवाराच्या वतीने त्यांना वाहिलेली आदरांजली. त्यानंतर पन्नासहून जास्त प्रतिक्रिया प्रकाशित केलेल्या दिसल्या. निळूभाऊंच्या अभिनयाबद्दल, चित्रपटांबद्दल, कुणी निळूभाऊंना भेटल्याची आठवण लिहिलेली. अशी अद्ययावत वेबसाइट पाहून बरं वाटलं.
"मिसळपाव'च्या जन्मदात्याचं नाव तात्या अभ्यंकर. तात्या या नावावरून हे कोणी साठीच्या आसपासचे गृहस्थ आहेत, असा समज होतो; पण या तात्यांना साठीपर्यंत पोचायला अजून 20 वर्षं बाकी आहेत. अभ्यंकरांचं नाव चंद्रशेखर. पण तात्या हीच त्यांची खरी ओळख. तर तात्या अभ्यंकरांनी "मिसळपाव' का सुरू केली? ते सांगतात - "मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी आणि आंतरजालात मराठीचा अधिकाधिक वापर आणि प्रसार व्हावा, यासाठी मी ही वेबसाइट सुरू केली. लोकांचं लक्ष वेधून घेणारं आकर्षक नाव हवं होतं आणि मिसळपाव हा खास मराठी पदार्थ. म्हणून मिसळपाव हे नाव दिलं.' मिपा हे मिसळपावचं लघुरूप. मिपा उघडल्या उघडल्या मिसळपावची, तोंडाला पाणी सुटेल अशी डिश दिसतेच. मिपाची उद्दिष्टं होमपेजवर स्पष्ट केली आहेत - "अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी सहज-सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. इथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं स्वागत आहे.'
2007 च्या गणेश चतुर्थीच्या दिवशी मिपा सुरू झाली. आज साडेपाच हजार मराठीजन मिपाचे सदस्य आहेत आणि हजार जण सदस्यत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रतीक्षा करणाऱ्यांना लवकरच मिपाचं सदस्यत्व मिळेल.
अभ्यंकर ठाण्याचे. त्यांच्या लिहाय-वाचायच्या, संगीताच्या आवडीतून ते या उपक्रमाकडे वळले. आधी ते "मनोगत' या संकेतस्थळावर नियमितपणे लिहीत असत. नंतर त्यांना आपलं स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करावं, असं वाटू लागलं. त्यांचा मित्र निलकांत धुमारे हा तंत्रज्ञानातला जाणकार. त्याने मदत देऊ केली आणि मिपा सुरू झाली.
संकेतस्थळ चालवणं म्हणजे नेमकं काय? अभ्यंकर सांगतात - "पैसे भरून डोमेन नाव (मिसळपाव) विकत घेतलं. सर्व्हर, मेन्टेनन्स या तांत्रिक बाबींपोटी दर महिन्याला पाच हजार खर्च येतो.' हा खर्च कोण करतं? अर्थात अभ्यंकर स्वतःच. ते सांगतात - "संकेतस्थळ चालवण्याची हौस ज्याची त्याला पदरमोड करावीच लागते; पण मी आनंदाने ती करतो. मिपामधून पुढच्या काळात उत्पन्न मिळू शकतं; पण या संकेतस्थळातून कमाई करण्याची माझी इच्छा नाही. माझ्या उदरनिर्वाहाचं साधन माझा व्यवसाय आहे. मिपातून उत्पन्न मिळू लागलं, तर ते मी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, इंडियन कॅन्सर सोसायटी, आनंदवन अशा सामाजिक कामांना देईन.'
वेबसाइट चालवायला कन्टेन्ट - मजकूर तयार करणारे लागतात. तसंच लोकांनी पोस्ट केलेला मजकूर आपल्या धोरणाशी सुसंगत आहे की नाही, हे तपासणारे संपादक लागतात. उदा. मिपा धर्म-पंथ-जातपात हे काहीही मानत नाही. माणूस ही एकच जात. विविध विषयांवर लिहिणारे लेखकही हवेतच. मिपाची अशी सगळी टीम आहे. त्यातले कोणी भारतात आहेत, कोणी अमेरिकेत, कोणी जर्मनीत; तर कोणी ब्रिटनमध्ये. हे सर्व जण एकही पैसा न घेता काम करतात. त्यांना आपापल्या नोकऱ्या वगैरे असतातच. ही एक प्रकारची पत्रकारिताच आहे.
पदरमोड करून मिसळपाव चालवण्याची हौस करावीशी का वाटते? अभ्यंकरांचं उत्तर - "मराठीजनांचं सोशल नेटवर्किंग व्हावं म्हणून. समाजात अनेक घटना घडत असतात. या घटनांबद्दल चर्चा व्हाव्यात, लोकांनी प्रतिक्रिया द्याव्यात, माहितीचं आदान-प्रदान व्हावं, मराठीजनांत कोल्हापूरपासून कॅलिफोर्नियापर्यंत संवाद घडावा म्हणून.' मग दोन वर्षांत मिपावर काय काय घडलं? भरपूर काही घडलं. मुख्य म्हणजे जगभरच्या मिपा सभासदांनी अनेकानेक विषयांवर नुसती चर्चाच नाही तर अगदी काथ्याकूट केला. या सभासदांचं सरासरी वय तीस. मिपावर कविता आणि अन्य लेखन करणारे खूप जण आहेत. काहींच्या प्रतिभेला बहर आलेला दिसतो. नवे लेखन, पाककृती, खरडण्याचा फळा, कलादालन, कौल असे दुवे मिपावर आहेत. वाविप्र असाही एक दुवा आहेच. वाविप्र म्हणजे FAQ - Frequently Asked Questions - वारंवार विचारले जाणारे प्रश्‍न.
मिपाचे संपादकीय लेखही आहेत. वानगीदाखल ही शीर्षकं पाहा - समाजाची प्रातिनिधिक प्रतिमा - बहुजनांची की अभिजनांची? आधुनिक वैद्यकातील नीतिमत्ता, पूल, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण. प्रत्येक लेखावर भरपूर चर्चाही झाली आहे. सेवा देणारे आणि घेणारे यांच्या ओळखी होणं आणि त्यातून दोघांनाही फायदा होणं हेही घडलं आहे. मिपावर भेटणाऱ्यांनी परस्परांशी ओळखीही करून घेतल्या आहेत आणि अमेरिकेतल्या काही शहरात, लंडनमध्ये, जर्मनीत आणि भारतातही महाराष्ट्राबाहेर या मिपावासीयांनी प्रत्यक्ष भेटून "मिपा कट्टे' भरवायलाही सुरुवात केली आहे. अभ्यंकरांचं म्हणणं अशा वेबसाइटद्वारे आणखी कोणत्या गोष्टी घडू शकतात, त्याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही.
मिसळपाव हे संकेतस्थळ पाहून आणि तात्या अभ्यंकर यांच्याशी बोलल्यावर जाणवलं की सुरुवात तर खूप चांगली आहे. इथे समान विषयात रस असणाऱ्यांचे गट सुरू होऊ शकतात, हे एखाद्या विषयावर परिपूर्ण माहिती मिळण्याचं ठिकाण होऊ शकतं. तंत्रज्ञानाची झेप आणखी मोठीच असणार आहे आणि त्याचा लाभ आपल्या मराठी भाषेला होणारच आहे. काही आव्हानंही आहेत. कन्टेन्ट- मजकूर तयार करणं हे सर्वात मोठं काम आहे. मराठी विकिपेडिया चांगल्या मजकुराच्या प्रतीक्षेत आहे. दुसरी अडचण अशी दिसते की मराठी संकेतस्थळं आता हिरिरीने वापरणाऱ्या सरासरी तीस वयोगटातल्या मराठी तरुणांच्या पुढच्या पिढीला यात कितपत रस वाटेल; मुळात मराठी भाषेशी ही पिढी कितपत जोडलेली राहील वगैरे...
असो आपण सध्या तरी मिसळपावची चव चाखू.

पिवळा डांबिस's picture

19 Jul 2009 - 1:12 am | पिवळा डांबिस

तात्या अभ्यंकर आणि मिसळपाव चे हार्दिक अभिनंदन!

इवलेसे रोप लावियले दारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी

खूप खूप आनंद झाला!

आपला,
डॉ. शैलेश कुळकर्णी
(इथे पिवळा डांबिस सही करणं योग्य नाही वाटत!!)

एकलव्य's picture

19 Jul 2009 - 2:44 am | एकलव्य

मनापासून अ भि नं द न!

- एकलव्य

श्रीयुत संतोष जोशी's picture

19 Jul 2009 - 10:21 am | श्रीयुत संतोष जोशी

अभिनंदन तात्या.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

ॐकार's picture

19 Jul 2009 - 11:34 am | ॐकार

सर्वांचे!

शाल्मली's picture

19 Jul 2009 - 1:43 pm | शाल्मली

तात्या,
लेख वाचला.
तुमचे, नीलकांत तसेच समस्त मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन!

--शाल्मली.

बबलु's picture

19 Jul 2009 - 2:02 pm | बबलु

तात्या अभ्यंकर आणिनीलकांत यांचं हार्दिक अभिनंदन !!!

....बबलु

कपिल काळे's picture

19 Jul 2009 - 8:34 pm | कपिल काळे

तात्या
अभिनंदन!!
नीलकांत
अभिनंदन!!

समस्त मिपाकरांचे अभिनंदन!!

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Jul 2009 - 9:00 pm | डॉ.प्रसाद दाढे

हार्दीक अभिनंदन!
मिपाधर्म वाढीस लागो.. शुभेच्छा!

देवदत्त's picture

19 Jul 2009 - 10:41 pm | देवदत्त

अरे वा...
अभिनंदन तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे :)

अशीच वृद्धी वर्षानुवर्षे होत राहो ही सदिच्छा.

तात्यांचं अभिनंदन करायला ह्यावेळी मला माझ्या त्या कवितेची आठवण आली.

लाविले तात्यानी एक रोपटे
वटवृक्ष कधी झाला न कळे
किलबिल करती अनेक पक्षी
संख्या सभासदांची आहे साक्षी

गिधाडे,घुबडे अन कावळे
कोकिळा, साळूंकी अन बगळे
विश्राम करीती मिळून सगळे

बोलले तात्या त्या वडाला
पाहूनी तुला झालास मोठाला
करू का मज्जाव यापुढे गिधाडाला
दूर्गंधाने कष्ट होई तुझ्या देहाला

स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला
मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला
गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी
येतात ते क्षणभर ईथे बसायला
जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला
शोधतील मग ते दुसर्‍या वटवृक्षाला

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

स्वाती२'s picture

20 Jul 2009 - 5:51 am | स्वाती२

तात्या आणि नीलकांत हार्दीक अभिनंदन!

यशोधरा's picture

20 Jul 2009 - 12:22 pm | यशोधरा

अभिनंदन तात्या आणि नीलकांत!
छान बातमी आणि अभिजीत यांनी मूळ लेख येथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.

विंजिनेर's picture

20 Jul 2009 - 12:47 pm | विंजिनेर

मिपा स्थापक तात्या अभ्यंकरांचे आणि ते चालवण्यात हातभार लावणार्‍या संपादक/प्रशासक/तंत्रज्ञ मंडळींचे!!

हे संस्थळ उत्तरोत्तर अधिक बहरो, अधिक सुजाण होवो ही सदिच्छा :)

(मिपा प्रतिष्ठानाची उत्सुकतेने वाट पाहणारा मिपाकर) विंजिनेर

मोहन's picture

20 Jul 2009 - 3:24 pm | मोहन

तात्या,निलकांत आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन.
तात्या तुमचे आभार - स्वतःची पदरमोड करून आम्हाला मिपा उपलब्ध करुन दिल्या बद्दल.
फादर्स डे, मदर्स डे सारखा तात्याज डे सुरु करायला हवा मिपावर :)

मोहन
जाता जाता- आण्णा चिंबोर्याच्या सुचनांचा जरा विचार करा. अशा शिव्या आल्या की मिसळीत खडा आल्यासारख वाटत. #:S

ऋषिकेश's picture

20 Jul 2009 - 3:30 pm | ऋषिकेश

अरे वा!!!!! तात्या व समस्त मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन!

(आनंदीत) ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

ढ's picture

20 Jul 2009 - 5:26 pm |

श्रीयुत चंद्रशेखर अभ्यंकर आणि सर्व मिपा टीमचे अभिनंदन.

वर्षा's picture

21 Jul 2009 - 12:39 am | वर्षा

अभिनंदन तात्या आणि निलकांत आणि मिपा परिवाराचे!

खादाड_बोका's picture

21 Jul 2009 - 2:49 am | खादाड_बोका

तात्या, नीलकांत आणि समस्त मिपा परीवाराचे मनःपुर्वक अभिनंदन! ही बातमी वाचून खूप आनंद झाला!

"ऐनी वे यु डिसर्व धिस ऑलवेज"

मिसळाभिमानी.....

सागर's picture

21 Jul 2009 - 12:36 pm | सागर

तात्या, नीलकांत

तुमचे हार्दिक अभिनंदन.... :)

(मिसळपावप्रेमी)सागर

अश्विनि३३७९'s picture

21 Jul 2009 - 3:47 pm | अश्विनि३३७९

=D> तात्या ,
समस्त मिपा मंत्रिमंड्ळ आणि मिपा सदस्यांचे मनापासून
अभिनंदन

सुधीर काळे's picture

21 Jul 2009 - 3:53 pm | सुधीर काळे

व्वा तात्यासाहेब. एकदम सिक्सर मारली कीं तुम्ही!
या बातमीचे कटिंग कृपया मला स्कॅन करून पाठवाल का?
धन्यवाद,
सुधीर काळे