माझी व्यवसाय करायची खुप इच्छा आहे.
व्वा. चांगली इच्छा आहे.
किराणा मालाचे दुकान (ग्रोसरी) सुरु करावे असे वाट्तेय.
डायरेक्ट किराणा !!!
कितपत फायदा असतो वैग्रे जरा मार्गदर्शन हवेय.
हे एखाध्या दुसर्या किराण्यावाल्यास विचारल्यास योग्य माहिती मिळु शकेल विशेषतः पटेल्,शाह इ. आडनावधारी लोकांस विचारल्या धंदो=पैसो चे गणित अगदी चौक्क्कस रित्या समजाऊन देतील.त्याने तुम्हाला घणो बद्धो फायदो होवो हीच सदिच्छा.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
हे एखाध्या दुसर्या किराण्यावाल्यास विचारल्यास योग्य माहिती मिळु शकेल विशेषतः पटेल्,शाह इ. आडनावधारी लोकांस विचारल्या धंदो=पैसो चे गणित अगदी चौक्क्कस रित्या समजाऊन देतील.त्याने तुम्हाला घणो बद्धो फायदो होवो हीच सदिच्छा
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय बघितला वाटते. कारण त्यात मराठी माणूस गैरमराठी माणसांकडे जाऊन मदत मागतो असे दा़खवलेय. काही गैर नाही त्यात. पण एखादे मराठी नाव घेतले असते तरी चालले असते.
बाकी चुचू तुमचे अभिनंदन. मराठी असून व्यवसाय करायची इछ्छा दा़खवलीत ह्यातच अर्धे यश. बाकी ओळखीच्या अनुभवी लोकांकडून तुम्हाला जरूर ती माहिती पुरवायचा प्रयत्न करतो.
जिकडे किराणा मालाचे दुकान चालु करायचे आहे तो एरिया कसा आहे हे महत्वाचा असते.त्या एरियामध्ये आधी किती दुकाने आहेत्,दुकानाची जागा,आजुबाजुच्या लोकांची खर्च करण्याची क्षंमता हे मुद्दे महत्वाचे असतात.
फायदा १५ ते २०% पर्यंत असतो असे ओळखीचे २ दुकानदार सांगतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
किराणा दुकान सुरु करायचे आहे हे उत्तम
पण सल्ला द्यायला इथे एकही सदस्याला तो अनुभव नाहिय्ये.
( रामदास काका अथवा अवलिया याना कोणकोणते अनुभव असतील ते सांगता येत नाहिय्ये. पण आंतर्जालावर हिंडत असतील तर किराणा दुकान चालवायचा अनुभव नक्कीच नसेल हे नक्की)
बाकी सांगायचे तर तुम्हाला किराणा दुकान कोठे चालवायचे आहे त्यावर बरेचसे अवलम्बून आहे.
सदाशिव पेठेत पुण्यात किराणा दुकान चालवायचे असेल तर कपाळाला आठ्या पाडून लोकांवर उगाचच खेकासायची प्रॅक्टीस करा. गिर्हाईक हे गरीन अश्राप रयत आहे आणि आपण दुकान सुरु करून त्यांच्यावर मोठेच उपकार केले आहे ही भावना मनात आणायचा प्रयत्न करा. हे एकदा जमले की मग बराचशा गोष्ती आपसूकच जमतील.
कोणी रवा चांगला आहे का असे विचारले की वाईत रवा विकायचा धन्दा अजून सुरु केला नाही हे एक नमुन्यादाखल चे उत्तर.
दुकानात लावण्यासाठी तर्हेतर्हेच्या पाट्या जमवायला सुरवात करा.
उदा:
१)कामाशिवाय उगाच चौकशी करु नये.
२)उधार मागायचा विचारही मनात आणु नये अपमान होईल
३) वस्तु नेताना स्वतःच्या जबाबदारीवर न्यावी
४)एकदा नेलेली वस्तु परत करु नये. अपमान होईल
५) इतरत्र एखादी वस्तु स्वस्त असू शकेल. वस्तुच्या आणि गिर्हाईकाच्या लायकीप्रमाणे वस्तुची किम्मत ठरते
६) तुम्ही मागितलेली वस्तु शिल्लक नसेल तर ती वस्तु कुठे मिळेल असे विचारून दुकानाचा आणि दुकानदाराचा अपमान करु नये
७) आमचे येथे काजू अमसूल आणि परकर विकत मिळतील
८) नारळ आम्ही घरी बनवत नाही. नेतानाच वाजवून नेणे
९)कश्यावर काय फ्री हे शेजारच्या फळ्यावर पहा
१०) रद्दी देताना कृपया ती वाचत बसु नये
११) दुकानासमोर लावलेल्या वाहनाचे पार्किंग स्वतःच्या जोखमीवर करावे.
१२) समोरील दुकानाबद्दल या दुकानात चौकशी करु नये अपमान होईल
अजून काही नमुने हवे असल्यास पुणे पाटी पद्मश्री टारझनषेठ आहेतच मदतीसाठी
किराणा मालाच्या व्यवसायामध्ये सर्वसाधारणपणे २५% नफा मिळतो.प्रथम किती भांडवल गुंतवणार आहात?. दुकान कोणत्या एरियात टाकणार तिथे किती दुकाने प्रथम पासुन आहेत,त्याना कितपत धंदा किती आहे, लोकांचे त्या दुकानदारांबद्दलचे मत काय आहे ते तपासुन घ्या. जागा निवडताना तिथे लोकाना येण्याजाण्यास सहज मार्ग असावा.दुकाना मांडताना व्यवस्थितपणा असावा.इतर दुकानदार उधार देत असतील तर तुम्ही प्रथम उधारीवर न देता दर कमी ठेवा.घरपोच माल देण्याचा प्रयत्न करा.
माल खरेदी कोठे स्वस्त व निवडलेला मिळतो ती ठिकाणे शोधा. घाऊक बाजार कुठे आहेत त्याची माहिती घ्या.मुंबई सोडुन इतरत्र बाजारसमित्या असतात तिथे ध्यान्ये व इतर शेती माल स्वस्त मिळतो. अडत व्यापारी कुठे आहेत त्याची माहिती मिळवा.बाकी गुटखा,सिगारेट,शाम्पु,व इतर वस्तु मध्ये नफा कमी असतो.इतर माहिती मिळेल तशी देईन तुम्हाला.सचोटीने धंदा करा.
शुध भाशेत दुकनावर पाटि लिवा, म्हंजे गिर्हायीक नक्कीच वाढेल.
असो शुभेच्छा !!!
वाचून बरे वाटले, रोज मिपा मिपा खेळण्यापेक्षा हे बरे !!
कोणी मराठी माणूस उद्योगधंदा सुरु करत असेल (तेही परदेशात)तर आम्ही नक्कीच प्रोत्साहन देउ!
आणि दुकान टाकणार कुठे ते तर सांगा ना आधी, मग बाकीच्या गोष्टी बोलता येतील ना :)
----------------------------------------------------------------------------------------
::::
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद! सच्चिदानंद!!
सर्वप्रथम आपला उद्योग यशस्वी होवोत यासाठी शुभेच्छा! पत्ता कळवा, भारतात असताना त्या भागात असलो तर नक्की तुमच्याकडून किराणा माल घेऊ.... :-)
बाकी आता थोडे अवांतर स्वगतः
ह्या मिपाकरांचे कळतच नाही: जेंव्हा वरील विषय विरंगुळा असतो तेंव्हा गंभिर प्रतिसाद देतात आणि जेंव्हा "समाज" (म्हणजे गंभिर) विषय असतो तेंव्हा विनोदी :?
>>किराणा मालाचे दुकान (ग्रोसरी) सुरु करावे असे वाट्तेय.
छान कल्पना आहे. सुरु करा !!!
>>
कितपत फायदा असतो वैग्रे जरा मार्गदर्शन हवेय.
खूप फायदा असतो. काही किराणा वस्तूचे पेट्रोल सारखं असतं. भरपूर स्टॉक ठेवायचा आणि योग्य वेळी त्याचा योग्य उपयोग करायचा. कारण नित्य व्यवहारातील (किराणा) वस्तूंचे कधी भाव वाढतात आणि कधी कमी होतात ग्राहकाला हे बिल्कूल माहिती होत नाही, उधारी खातेवाला तर विचारतही नाही.
उदा. म्हणून सांगतो. आषाढी एकादशीच्या अगोदर शाबूदाणा अठ्ठावीस रुपये किलो होता. म्हणजेच दुकानदाराने तो पंचवीस रुपये दराने खरेदी केला होता. आणि त्याने विकला चाळीस रुपये किलोने, म्हणजे त्याला एका किलो मागे बारा रुपये मिळाले. (टॅक्स वगैरे जाऊन नफा अकरा रुपये तर मिळेल) आता श्रावण येणार म्हणजे उपवासाच्या पदार्थांना लै भाव राहील नै का ? तेव्हा दुकानदार धोरणी असेल तर लै बक्कल पैसा कमाऊ शकतो. :)
>>तो एखाद्या दिवसाचा प्रश्न असतो.
कोणत्या तरी देवाचा-देवीचा प्रत्येक दिवशी कोणाचा तरी उपवास असतो. त्यामुळे साबूदाण्याला चांगला स्कोप असतो.
>>तुरीच्या डाळीचे काय चालले आहे?
फेब्रूवारीत तुरदाळ ५४ रु कि. होती. आज ती ७४ रु. कि. झाली आहे.
त्यामुळे यातही चांगला नफा झाला असेल मोठ्या व्यापार्यांबरोबर किरकोळ दुकानदारांना..!
प्रतिक्रिया
14 Jul 2009 - 12:06 pm | माधुरी दिक्षित
:O
14 Jul 2009 - 12:11 pm | mamuvinod
उधारी देऊ नका
सगळ्यात महत्त्वाचे
16 Jul 2009 - 11:13 am | विशाल कुलकर्णी
उधारी देवु नका, सप्लायरकडुन माल घेताना मात्र दोन महिन्याचे क्रेडीट मिळवण्याचा प्रयत्न करा. :)) >:)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
14 Jul 2009 - 12:15 pm | मदनबाण
माझी व्यवसाय करायची खुप इच्छा आहे.
व्वा. चांगली इच्छा आहे.
किराणा मालाचे दुकान (ग्रोसरी) सुरु करावे असे वाट्तेय.
डायरेक्ट किराणा !!!
कितपत फायदा असतो वैग्रे जरा मार्गदर्शन हवेय.
हे एखाध्या दुसर्या किराण्यावाल्यास विचारल्यास योग्य माहिती मिळु शकेल विशेषतः पटेल्,शाह इ. आडनावधारी लोकांस विचारल्या धंदो=पैसो चे गणित अगदी चौक्क्कस रित्या समजाऊन देतील.त्याने तुम्हाला घणो बद्धो फायदो होवो हीच सदिच्छा.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
14 Jul 2009 - 1:16 pm | योगी९००
हे एखाध्या दुसर्या किराण्यावाल्यास विचारल्यास योग्य माहिती मिळु शकेल विशेषतः पटेल्,शाह इ. आडनावधारी लोकांस विचारल्या धंदो=पैसो चे गणित अगदी चौक्क्कस रित्या समजाऊन देतील.त्याने तुम्हाला घणो बद्धो फायदो होवो हीच सदिच्छा
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय बघितला वाटते. कारण त्यात मराठी माणूस गैरमराठी माणसांकडे जाऊन मदत मागतो असे दा़खवलेय. काही गैर नाही त्यात. पण एखादे मराठी नाव घेतले असते तरी चालले असते.
बाकी चुचू तुमचे अभिनंदन. मराठी असून व्यवसाय करायची इछ्छा दा़खवलीत ह्यातच अर्धे यश. बाकी ओळखीच्या अनुभवी लोकांकडून तुम्हाला जरूर ती माहिती पुरवायचा प्रयत्न करतो.
खादाडमाऊ
14 Jul 2009 - 12:43 pm | परिकथेतील राजकुमार
माझी प्रतिक्रीया द्यायची खुप इच्छा आहे.
हिन आणी हिणकस (हि & हि) पासुन सुरु करावे असे वाट्तेय.
कितपत फायदा असतो वैग्रे जरा मार्गदर्शन हवेय.
विंचु
अवांतर :- चपलांचे दुकान टाक एक. सध्या खुप बोलबाला आहे त्याचा.
आणी हो "कितपत फायदा असतो वैग्रे जरा मार्गदर्शन हवेय." हि ओळ काळजाला व्याकुळ करुन गेली.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
14 Jul 2009 - 12:49 pm | पर्नल नेने मराठे
:|
चुचु
14 Jul 2009 - 12:47 pm | चिरोटा
जिकडे किराणा मालाचे दुकान चालु करायचे आहे तो एरिया कसा आहे हे महत्वाचा असते.त्या एरियामध्ये आधी किती दुकाने आहेत्,दुकानाची जागा,आजुबाजुच्या लोकांची खर्च करण्याची क्षंमता हे मुद्दे महत्वाचे असतात.
फायदा १५ ते २०% पर्यंत असतो असे ओळखीचे २ दुकानदार सांगतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
14 Jul 2009 - 12:51 pm | पर्नल नेने मराठे
ध्न्य्वाद
चुचु
14 Jul 2009 - 12:50 pm | विजुभाऊ
किराणा दुकान सुरु करायचे आहे हे उत्तम
पण सल्ला द्यायला इथे एकही सदस्याला तो अनुभव नाहिय्ये.
( रामदास काका अथवा अवलिया याना कोणकोणते अनुभव असतील ते सांगता येत नाहिय्ये. पण आंतर्जालावर हिंडत असतील तर किराणा दुकान चालवायचा अनुभव नक्कीच नसेल हे नक्की)
बाकी सांगायचे तर तुम्हाला किराणा दुकान कोठे चालवायचे आहे त्यावर बरेचसे अवलम्बून आहे.
सदाशिव पेठेत पुण्यात किराणा दुकान चालवायचे असेल तर कपाळाला आठ्या पाडून लोकांवर उगाचच खेकासायची प्रॅक्टीस करा. गिर्हाईक हे गरीन अश्राप रयत आहे आणि आपण दुकान सुरु करून त्यांच्यावर मोठेच उपकार केले आहे ही भावना मनात आणायचा प्रयत्न करा. हे एकदा जमले की मग बराचशा गोष्ती आपसूकच जमतील.
कोणी रवा चांगला आहे का असे विचारले की वाईत रवा विकायचा धन्दा अजून सुरु केला नाही हे एक नमुन्यादाखल चे उत्तर.
दुकानात लावण्यासाठी तर्हेतर्हेच्या पाट्या जमवायला सुरवात करा.
उदा:
१)कामाशिवाय उगाच चौकशी करु नये.
२)उधार मागायचा विचारही मनात आणु नये अपमान होईल
३) वस्तु नेताना स्वतःच्या जबाबदारीवर न्यावी
४)एकदा नेलेली वस्तु परत करु नये. अपमान होईल
५) इतरत्र एखादी वस्तु स्वस्त असू शकेल. वस्तुच्या आणि गिर्हाईकाच्या लायकीप्रमाणे वस्तुची किम्मत ठरते
६) तुम्ही मागितलेली वस्तु शिल्लक नसेल तर ती वस्तु कुठे मिळेल असे विचारून दुकानाचा आणि दुकानदाराचा अपमान करु नये
७) आमचे येथे काजू अमसूल आणि परकर विकत मिळतील
८) नारळ आम्ही घरी बनवत नाही. नेतानाच वाजवून नेणे
९)कश्यावर काय फ्री हे शेजारच्या फळ्यावर पहा
१०) रद्दी देताना कृपया ती वाचत बसु नये
११) दुकानासमोर लावलेल्या वाहनाचे पार्किंग स्वतःच्या जोखमीवर करावे.
१२) समोरील दुकानाबद्दल या दुकानात चौकशी करु नये अपमान होईल
अजून काही नमुने हवे असल्यास पुणे पाटी पद्मश्री टारझनषेठ आहेतच मदतीसाठी
14 Jul 2009 - 7:04 pm | राजू
=)) =)) =)) =))
14 Jul 2009 - 12:59 pm | ब्रिटिश टिंग्या
=))
14 Jul 2009 - 1:08 pm | अवलिया
=)) =))
14 Jul 2009 - 11:19 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
14 Jul 2009 - 11:27 pm | llपुण्याचे पेशवेll
=)) =)) =)) =))
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
14 Jul 2009 - 11:33 pm | चतुरंग
=)) =)) =)) =)) :D
*(स्कॉलरशिपच्या परीक्षेतला प्रश्न पुढील चिन्ह कोणते? सेरीज पूर्ण करा!)*
(स्कॉलर)चतुरंग
14 Jul 2009 - 4:09 pm | टारझन
वा चुचुजी ... काळजाला हात घातलाय .. काय लिहिलंय काय लिहीलंय ..
एकदम जबराट ... खवाट .. तुराट ... लय लय लय भारी ... एवढं अलंकारिक लिहीलंय की कुबेराकडचेही अलंकार अपुरे पडावेत ...
आणि हो,
हे वाक्य हृदयाला भिडलेच , पण ठळक केलेला शब्द भलताच आवडून गेला !!
सल्ला : किराण्या पेक्षा तुम्ही "फळांचं" दुकाण टाकलं तर ? आम्ही पण येऊ :)
- गोगो
14 Jul 2009 - 1:06 pm | विनायक प्रभू
तुम्ही कुठेही दुकान टाका.
काकु तुमच्या कडेच येईल ये मास्तर का वादा रहा.
14 Jul 2009 - 1:19 pm | पर्नल नेने मराठे
काका धन्य्वाद :D
चुचु
14 Jul 2009 - 1:33 pm | Nile
धन्यवाद नका करु. काकांच्या नसत्या उद्योगांचे पाढे वाचण्याकरता येणार आहेत काकु असे ते म्हणाले नसतील असं नक्की सांगता येणार नाही. ;)
14 Jul 2009 - 2:04 pm | वेताळ
किराणा मालाच्या व्यवसायामध्ये सर्वसाधारणपणे २५% नफा मिळतो.प्रथम किती भांडवल गुंतवणार आहात?. दुकान कोणत्या एरियात टाकणार तिथे किती दुकाने प्रथम पासुन आहेत,त्याना कितपत धंदा किती आहे, लोकांचे त्या दुकानदारांबद्दलचे मत काय आहे ते तपासुन घ्या. जागा निवडताना तिथे लोकाना येण्याजाण्यास सहज मार्ग असावा.दुकाना मांडताना व्यवस्थितपणा असावा.इतर दुकानदार उधार देत असतील तर तुम्ही प्रथम उधारीवर न देता दर कमी ठेवा.घरपोच माल देण्याचा प्रयत्न करा.
माल खरेदी कोठे स्वस्त व निवडलेला मिळतो ती ठिकाणे शोधा. घाऊक बाजार कुठे आहेत त्याची माहिती घ्या.मुंबई सोडुन इतरत्र बाजारसमित्या असतात तिथे ध्यान्ये व इतर शेती माल स्वस्त मिळतो. अडत व्यापारी कुठे आहेत त्याची माहिती मिळवा.बाकी गुटखा,सिगारेट,शाम्पु,व इतर वस्तु मध्ये नफा कमी असतो.इतर माहिती मिळेल तशी देईन तुम्हाला.सचोटीने धंदा करा.
वेताळ
14 Jul 2009 - 3:30 pm | नितिन थत्ते
चुचुताई, दुबईत किराण्याचं दुकान टाकणार का?
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
14 Jul 2009 - 4:24 pm | कुंदन
ऑनलाईण मागणी नोंदवता येईल का?
माल घरपोच देणार का?
--
14 Jul 2009 - 4:29 pm | चिरोटा
मला बेंगळुरुला franchise मिळेल का? काय अटी आहेत?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
14 Jul 2009 - 4:04 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =)) =)) =))
विनोदी धागा
सुहास
14 Jul 2009 - 5:01 pm | वेताळ
14 Jul 2009 - 5:13 pm | सूहास (not verified)
ह्या चित्रातल्या ताई कोण?
त्या॑ना म्हणा एक एरियल च पाकीट द्या,घरी रुमाल धुवायचेत..
आणी एक बुरुन द्या...चहा बरोबर...
सुहास
14 Jul 2009 - 5:17 pm | नितिन थत्ते
हे चुचुचं सध्याचं दुकान आहे का? :)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
14 Jul 2009 - 8:41 pm | रामदास
वाणी गोणपाटावर आडवा होतो तेव्हा वाणीण गल्ल्यावर बसते.
ता.क. ताईंच्या दिसण्यावरून हे पटेलचे दुकान वाटत नाही.बहुतेक गुप्ताचे दुकान असावे.
15 Jul 2009 - 2:10 am | चंबा मुतनाळ
वाण्याने हायकोडताचा निर्णय भलताच सिरियसली घेतलेला दिसतोय.
नवीन धंदा?
14 Jul 2009 - 5:34 pm | आशिष सुर्वे
येवा कोकण आपलाच आसा
चिपळूणात मोक्याची जागा हेरून ठेवू का ताय?
-
कोकणी फणस
14 Jul 2009 - 7:19 pm | परिकथेतील राजकुमार
लेखनावरील प्रतिक्रियांशिवाय अधिक अतिअवांतर (सर्वांनीच) टाळता आले तर टाळले पाहिजे, असे वाटते.
-पराच कावळा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
14 Jul 2009 - 8:51 pm | बाकरवडी
शुध भाशेत दुकनावर पाटि लिवा, म्हंजे गिर्हायीक नक्कीच वाढेल.
असो शुभेच्छा !!!
वाचून बरे वाटले, रोज मिपा मिपा खेळण्यापेक्षा हे बरे !!
कोणी मराठी माणूस उद्योगधंदा सुरु करत असेल (तेही परदेशात)तर आम्ही नक्कीच प्रोत्साहन देउ!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
14 Jul 2009 - 9:06 pm | धमाल मुलगा
काय हो वाळवंटे काकू,
पण दुकानाचं नाव काय ठेवणार?
आणि दुकान टाकणार कुठे ते तर सांगा ना आधी, मग बाकीच्या गोष्टी बोलता येतील ना :)
----------------------------------------------------------------------------------------
::::
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद! सच्चिदानंद!!
14 Jul 2009 - 9:25 pm | रामदास
किराणा घराण्याचा अभ्यास गाढा आहे.त्यांना नक्की विचारा .माहीती असेल.
15 Jul 2009 - 8:38 am | विकास
सर्वप्रथम आपला उद्योग यशस्वी होवोत यासाठी शुभेच्छा! पत्ता कळवा, भारतात असताना त्या भागात असलो तर नक्की तुमच्याकडून किराणा माल घेऊ.... :-)
बाकी आता थोडे अवांतर स्वगतः
ह्या मिपाकरांचे कळतच नाही: जेंव्हा वरील विषय विरंगुळा असतो तेंव्हा गंभिर प्रतिसाद देतात आणि जेंव्हा "समाज" (म्हणजे गंभिर) विषय असतो तेंव्हा विनोदी :?
15 Jul 2009 - 9:32 am | शैलेन्द्र
प्रथम तुम्हाला शुभेच्छा.
वयाच्या ५ व्या वर्षापासुन २७व्या वर्षापर्यंत किराणा दुकाणात बसलो-चालवले..
त्यातला थोडासा अनुभव.
किराणा दुकान हा प्रचंड अंगमेहनतीचा व किचकट धंदा आहे.
नोकरांवर अवलंबुन राहवे लागते, त्यांच्या चुका माफ करुन काम करुन घ्यावे लागते.
"पडतल पाडणे" हा एकच नफा नुकसान समजण्याचा मार्ग आहे. रोजचा-आठ्वड्याचा स्टॉक घेत बसणे हा वेळ वाया घालवायचा प्रकार आहे.(आधिक माहितीसाठी व्य नी)
हा धंदा "व्हॉल्युम" चा आहे, त्यामुळे, लवकरात लवकर एकाची दोन दुकान करा किंवा कमित कमि, परगावातील तिन-चार दुकानदारांबरोबर मिळुन खरेदि करा.
ऊधारिला पर्याय नाही.
पैसे थकवायची कला शिकुन घ्या, खास करुन, नविन कंपन्या आणि न चालणार्या मालाचे.
माल ठेवताना कंजुशी करु नका, फर्निचरवर कमित कमी खर्च करा. साध्या मांडन्या वापरा.
बोर्ड लावायचा आळ्स नको.
जिवनावश्यक वस्तु- तेल, साखर, तुप लॉटमध्ये साठवा. नो प्रोफिट नो लॉस वर विका. त्या वस्तु खरेदी करनारे गिराइक इतर चार वस्तु घेते, तिथे त्याला कापा.
दुकानातला "फुट फॉल" काहिही करुन वाढवा.
अजुन बरेच आहे... सुरु तर करा...
15 Jul 2009 - 9:35 am | शैलेन्द्र
दुकाण कुठे टाकणार?
15 Jul 2009 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>किराणा मालाचे दुकान (ग्रोसरी) सुरु करावे असे वाट्तेय.
छान कल्पना आहे. सुरु करा !!!
>>
कितपत फायदा असतो वैग्रे जरा मार्गदर्शन हवेय.
खूप फायदा असतो. काही किराणा वस्तूचे पेट्रोल सारखं असतं. भरपूर स्टॉक ठेवायचा आणि योग्य वेळी त्याचा योग्य उपयोग करायचा. कारण नित्य व्यवहारातील (किराणा) वस्तूंचे कधी भाव वाढतात आणि कधी कमी होतात ग्राहकाला हे बिल्कूल माहिती होत नाही, उधारी खातेवाला तर विचारतही नाही.
उदा. म्हणून सांगतो. आषाढी एकादशीच्या अगोदर शाबूदाणा अठ्ठावीस रुपये किलो होता. म्हणजेच दुकानदाराने तो पंचवीस रुपये दराने खरेदी केला होता. आणि त्याने विकला चाळीस रुपये किलोने, म्हणजे त्याला एका किलो मागे बारा रुपये मिळाले. (टॅक्स वगैरे जाऊन नफा अकरा रुपये तर मिळेल) आता श्रावण येणार म्हणजे उपवासाच्या पदार्थांना लै भाव राहील नै का ? तेव्हा दुकानदार धोरणी असेल तर लै बक्कल पैसा कमाऊ शकतो. :)
अजून टीप्स देईन तुमचे दुकान सुरु झाल्यावर......!
बिरुटेसेठ औरंगाबादवाला !
(आपलाच )
16 Jul 2009 - 9:17 am | विकास
साबुदाणा काय घेऊन बसता? तो एखाद्या दिवसाचा प्रश्न असतो. तुरीच्या डाळीचे काय चालले आहे?
16 Jul 2009 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>तो एखाद्या दिवसाचा प्रश्न असतो.
कोणत्या तरी देवाचा-देवीचा प्रत्येक दिवशी कोणाचा तरी उपवास असतो. त्यामुळे साबूदाण्याला चांगला स्कोप असतो.
>>तुरीच्या डाळीचे काय चालले आहे?
फेब्रूवारीत तुरदाळ ५४ रु कि. होती. आज ती ७४ रु. कि. झाली आहे.
त्यामुळे यातही चांगला नफा झाला असेल मोठ्या व्यापार्यांबरोबर किरकोळ दुकानदारांना..!
-दिलीप बिरुटे
16 Jul 2009 - 1:02 pm | Nile
भुईमुग काय म्हणतोय हो? तेल खुपच महागलं आहे असं ऐकतोय!?