स्वाक्षरीचा वापर

विकास's picture
विकास in काथ्याकूट
13 Jul 2009 - 9:02 am
गाभा: 

सर्वप्रथम एक प्रामाणिक डिसक्लेमरः खाली जे काही "प्रकटन" करत आहे ते कोणा एका व्यक्तीबद्दल नाही आहे आणि कृपया कोणी व्यक्तिगत घेऊ नये अशी विनंती. तरी आक्षेपार्ह वाटल्यास खव लिहा अथवा सगळ्यांनाच वाटले तर मी हे अप्रकाशित करायला पण तयार आहे.

याहूमेल आणि जी मेल यातील एक मोठ्ठा फरक काय आहे असे विचारले तर काय सांगू शकाल (तेच हॉटमेल, एमएसएन, लाइव्ह मेल्स बद्दलही आहे)? तर जीमेल मधे इतर सर्व मोफत इमेल प्रमाणे खाली स्वाक्षरीप्रमाणे जाहीरात येत नाही. अर्थात आपण आपली एम्बेड जाहीरात, स्वाक्षरी वगैरे जीमेल मधे ठेवू शकतो पण तो आपला निवाडा (चॉईस) असतो.

तरी मला याहूमेल बद्दल विशेष आवडत नाही (हे येथील कोणा याहूसाठी व्यक्तिगत नाही ;) आणि मला वाटते आता त्यांनी ही पद्धत बहुतेक बदलेली आहे): त्याचे कारण असे आहे की कधीतरी कोणी तरी कुणाच्या निधनाची दु:खद बातमी याहू मेलचा वापर करून पाठवली. अगदी मोजक्या शब्दात भावना व्यक्त केलेल्या या बातमीत श्रद्धांजली, वगैरे म्हणले आणि लिहायचे थांबवून मेल पाठवलेली. पण वाचणार्‍याला काय दिसले? आधी निधनाची बातमी, मग पाठवणार्‍याच्या श्रद्धांजलीच्या ओळी आणि मग लगेच "do you yahoo?" असा मेसेज! अरे प्रसंग काय, लिहीलेले काय आहे आणि तू याहू म्हणून काय विचारतोस!

तर हा विषय अचानक येयचे कारण काय? एखादी मोफत इमेल सुविधा वापरताना त्यात जर अशा त्या प्रोव्ह्याडर्सच्या स्वाक्षर्‍या/तळटीपा (फूटर) आले तर आपण काही नियंत्रण करू शकत नाही पण स्वतःची स्वाक्षरी नक्कीच नियंत्रीत करू शकतो.

तीच गोष्ट मिपावर - मला स्वतःला मजेदार स्वाक्षर्‍या वाचायला आवडतात. वास्तवीक मी देखील आता एक मजेदार स्वाक्षरी तयार केली आहे पण ती विरंगुळा या सदरात मोडते हे कसे सांगायचे ते न समजल्याने गैरसमज होऊ शकतो म्हणून अजून वापरत नाही आहे इतकेच :) . पण जेंव्हा एखाद्या व्यक्तीस श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून प्रतिक्रीया लिहीलीत आणि खाली येणारी स्वाक्षरी डीलीट केली नाहीत तर त्या प्रतिसादातील भावना कितीही प्रामाणिक असल्या पण खाली (केवळ उदाहरणार्थ) "डुकराशी चिखलात कधीही कुस्ती करु नये. तुमचे कपडे घाण होतातच डुकराला मात्र त्यात मजा मिळत असते." असे पुढचे वाक्य दिसले तर सगळाच गोंधळ उडतो. तर अशा स्वाक्षर्‍या तेव्हढ्या गंभिर प्रतिसादापुरत्या (तिथल्यातिथेच करता येते) खोडल्या तर तुम्हाला योग्य वाटेल का?

सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, कृपया हे व्यक्तीगत कोणी घेऊ नये.

(थोडे अवांतरः अमेरिकेत कोणाकडे समाचाराला/वेकला जाताना फ्युनरल होम मधे जावे लागते. तेथे त्या गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास भेटताना, सवयीने प्रश्न विचारला जातो, हाऊ आर यू? आणि कधी कधी बिचारे ते नातेवाईक इथल्या मॅनर्स प्रमाणे दःख दाबून बोलत असतात, पण तरी चुकून म्हणून जातात "फाईन!" )

प्रतिक्रिया

मला स्वतःला मजेदार स्वाक्षर्‍या वाचायला आवडतात. वास्तवीक मी देखील आता एक मजेदार स्वाक्षरी तयार केली आहे पण ती विरंगुळा या सदरात मोडते हे कसे सांगायचे ते न समजल्याने गैरसमज होऊ शकतो म्हणून अजून वापरत नाही आहे इतकेच

हा हा हा! =))

तुमच्या सहीचा जन्माआधीच मृत्यु झाल्याने माझी विनम्र श्रद्धांजली.

सही- आज आनंदी आनंद झाला... ;) (आमची ही सही उडवण्यास आमचा आक्षेप आहे! :P)

मिसळभोक्ता's picture

13 Jul 2009 - 10:03 am | मिसळभोक्ता

जा फुकट्यांनो, परत फिरा ! घराकडे अपुल्या !

कुठलाही प्रोव्हायडर जेव्हा फुकट सर्विस देतो, तेव्हा ती फुकट सर्विस अ‍ॅक्सेप्ट करताना, त्यांनी टाकलेली सही, स्वतः, "आय अ‍ॅक्सेप्ट" म्हणून अ‍ॅक्सेप्ट केली, आणि मग नंतर बोंबाबोंब करायचा अधिकार गमावून बसलात, तरी ही आरडा ओरडी ???

प्रीमियम सर्विस घ्या की !

फुकटे साले.

(फ्युनरल होम विषयी: ज्याचा बाप मेला त्याला "हाऊ आर यू" म्हणणे जर बरोबर असेल, तर त्याने "फाईन" म्हणणे काय चूक आहे ? त्याने "नॉट फाईन" म्हणून, जर त्याच्या मेलेल्या बापाचे सगळे गुण सांगायला सुरुवात केली, तर मग त्याविषयी बोंबाबोंब करणार आहत का ? अर्थात, फुकट लिहायला मिळते, म्हटल्यावर बोंबाबोंब करायला काहीही हरकत नाही म्हणा.)

तात्या, चपला उधार देरे जरा. ह्या सर्व फुकट्यांना चपला घालून पाठवतो बाहेर.

-- मिसळभोक्ता

वाटाड्या...'s picture

13 Jul 2009 - 10:04 am | वाटाड्या...

मॅनर्सचा (सभ्यतेचा ?) विषय काय घेऊन बसलात...जरा इथे तिथे डोकवा म्हणजे कळेल गेलेल्या माणसाच्या श्रद्धांजली धाग्यावर लोक त्या माणसाला एखादी भाषा येते का नाही ह्यावर काथ्याकुट करत बसतात..कदाचित अलिकडे जन ह्यालाच काथ्याकुट म्हणत असावेत ...

- वाटाड्या...

विसोबा खेचर's picture

13 Jul 2009 - 10:39 am | विसोबा खेचर

पण जेंव्हा एखाद्या व्यक्तीस श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून प्रतिक्रीया लिहीलीत आणि खाली येणारी स्वाक्षरी डीलीट केली नाहीत तर त्या प्रतिसादातील भावना कितीही प्रामाणिक असल्या पण खाली (केवळ उदाहरणार्थ) "डुकराशी चिखलात कधीही कुस्ती करु नये. तुमचे कपडे घाण होतातच डुकराला मात्र त्यात मजा मिळत असते." असे पुढचे वाक्य दिसले तर सगळाच गोंधळ उडतो. तर अशा स्वाक्षर्‍या तेव्हढ्या गंभिर प्रतिसादापुरत्या (तिथल्यातिथेच करता येते) खोडल्या तर तुम्हाला योग्य वाटेल का?

विकासरावांनी अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. परंतु हा सेन्स सर्व सभासदांना असायला हवा ना?!

तात्या.

विशाल कुलकर्णी's picture

13 Jul 2009 - 10:51 am | विशाल कुलकर्णी

सहमत. हा मुद्दा कधी ध्यानातच घेतला नव्हता किंवा आला नव्हता.
तात्यांचाही आणि विकासभाऊंचाही! धन्स!! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

सहज's picture

13 Jul 2009 - 11:07 am | सहज

याहूमेल बाबत मिभोभौंशी सहमत.

गांभिर्याबाबत मुद्दा बरोबरच आहे. उत्तर सही मधे आहे

--------------------------------------
१०० सुशिक्षीत मेले की १ सुसंस्कृत बनतो.

अवलिया's picture

13 Jul 2009 - 11:34 am | अवलिया

सहजरावांशी सहमत आहे.

--अवलिया
================
१०० सुसंस्कृत मेले की १ सहज बनतो.

विजुभाऊ's picture

13 Jul 2009 - 11:47 am | विजुभाऊ

इथे एकाने एकदा "तुझा पगार किती तू बोलतो किती " अशी स्वाक्षरी ठेवली होती" ........ ती स्वाक्षरी आहे हे माहीत नसेल तर हे वाक्य भलतेच इन्सल्टींग वाटते

प्राक्तनास अर्थ असतो म्हणून ते जगणे व्यर्थ जात नाही

लिखाळ's picture

13 Jul 2009 - 3:26 pm | लिखाळ

विकासराव,
तुमचे म्हणणे खरे आहे. प्रतिसाद देताना त्या खालची स्वाक्षरी समयोचित आहे की नाही हे आठवण ठेऊन पाहावे.

तसेही व्यासपीठावर कुणी आपल्या दिवंगत आप्तस्वकीयाच्या आठवणीने हळवे झाले असेल किंवा एखाद्या दिवंगत प्रसिद्ध कलाकाराचे गाणे रंगमंचावर सादर झाल्याने परिक्षकांच्या डोळ्यात आसवे जमली असतील तर अश्या प्रसंगी आम्ही प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवण्याचे आवाहन मुळीच करत नाही. प्रसंग निवळू देतो. आणि मग मात्र 'दिवंगत कलाकारच्या स्मृतीला अभिवादन म्हणून' जोरदार टाळ्यांचे आवाहन करतो. आम्हाला आमच्या या समयोचित वागण्याचे फार म्हणजे फार कौतुक वाटते.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

कित्येक स्वाक्षर्‍या गमतीदार असतात.

परंतु प्रतिसादातील मजकुराला विसंगत असल्यास स्वाक्षरी तात्पुरती तरी काढणे योग्य.

(मिसळपावाने प्रत्येक प्रतिसादाखाली "तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :) " असे जोडले, तर मिसळभोक्ता यांचा प्रतिसाद लागू होतो. मला वाटते विकास यांचा मुद्दा वेगळा, स्वतः निवडलेल्या स्वाक्षरीबाबत, आहे.)