लोकसंख्येवर नियंत्रण

शाहरुख's picture
शाहरुख in काथ्याकूट
12 Jul 2009 - 10:02 am
गाभा: 

खेड्यात वीज आल्यास लोकसंख्येवर नियंत्रण!

प्रभू मास्तरांचा विदा काय म्हणतोय या बद्दल ??

प्रतिक्रिया

आता ह्याला मास्तर काय करणार? :D

वेताळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2009 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचे हे वक्तव्य वाचून गंभीर विचार करावा की, कैच्या कै विचार आहे, असे वाटले. वीज गेल्यामुळे,दुरसंचावरील कार्यक्रम बंद होतात आणि 'इतर'कार्यक्रमांना उत्साह येतो, हा विचार थोडा पटण्यासारखा असला तरी सर्वच ऋतूत तो विचार शक्य नाही. उन्हाळ्यात उकाड्याचा फार त्रास होतो. तेव्हा बिचारी ग्रामीण जनता अंगणात येते. तेव्हा लोकसंखेचा विचार इथे अनावश्यक आहे, असे वाटते. नियमित वीज असलेले गाव आणि वीज अनियमित किंवा वीज नसलेले गाव यांची एक वर्षातील लोकसंख्या याची काही आकडेवारी असती तर, काही ठोस विचार करता आला असता असे वाटते.

अवांतर : एकओळीचा धाग्याला शेवटची माफी. बातमीचा दुवा देऊन आपल्याला काय वाटते, ते लिहिले पाहिजे असे वाटते.

-दिलीप बिरुटे
(चावट)

विनायक प्रभू's picture

12 Jul 2009 - 10:39 am | विनायक प्रभू

गुन गुना रे गुन गुना.

शाहरुख's picture

12 Jul 2009 - 11:24 am | शाहरुख

बाउंसर..

शाहरुख's picture

12 Jul 2009 - 11:21 am | शाहरुख

जिथे वीज नाही तिथे टीव्ही सारखे प्रभावी माध्यम उपलब्ध नाही ही गोष्ट पटण्यासारखी आहेच, पण..

जर "लोकसंख्या वाढीचे प्रमाण ऐंशी टक्के कमी करता येऊ शकते. म्हणूनच केंद्र सरकार ग्रामीण विद्युतीकरणावर भर देत आहे.'' हे शब्द आझाद साहेबांच्या तोंडचे असतील तर खरोखरीच कमाल आहे.....उद्या सरकार असे म्हणणार आहे का "दिली आहे ना तुझ्या घरात वीज..याद राख दोन पेक्षा जास्त मुले होऊ दिलीस तर !! तसे झाल्यास कापून टाकीन विजेची तार, मग आयुष्यभर आंधारात रहावे लागेल" ????

बाकी जिथे वीज पोचली आहे तेथील जनतेचे प्रबोधन पूर्णपणे झाले आहे काय ? पण साहेब माझा हा प्रश्न इथे येउन वाचायची शक्यता जरा कमीच आहे :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2009 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उद्या सरकार असे म्हणणार आहे का "दिली आहे ना तुझ्या घरात वीज..याद राख दोन पेक्षा जास्त मुले होऊ दिलीस तर !! तसे झाल्यास कापून टाकीन विजेची तार, मग आयुष्यभर आंधारात रहावे लागेल" ????

वीजेची तार..हा शब्द खूप उशिरा वाचला...!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jul 2009 - 1:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण दोन मुलांच्यापुढे कुणाची 'प्रगती' होऊ नये म्हणून आयडीया चांगली आहे; दोनावर मुले झाल्यास वीजचे मीटर मिळणार नाही.

(हरकत नाही, आम्ही भारतीय 'आकडे'बाज आहोत.)

(सदर प्रतिसादही सहजरावांना सादर समर्पण)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2009 - 1:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकसंखेची वाढ झाल्यास काय परिणाम होतात सामान्यातल्या सामान्याचे प्रबोधनाबरोबर, दोन पेक्षा अधिक मुले असल्यास...वीज, बँकाचे कर्ज, राशनवरील धान्य, कपडे,नौकरी, दवाखाण्यातील सुविधा (स्वस्तात), शिक्षण, नौकरी, खाजगी उद्योगांना परवानगी, खते, बी -बियाणे, आणि शासकीय नौकरी मिळणार नाही. अशी अट घातली पाहिजे.

आबादी ज्यांची वाढलेली आहे किंवा वाढत आहे, अशांचा धर्म आणि संस्कृती आडवी येईल तो भाग पुन्हा वेगळा ! :(

(सदर प्रतिसादही पुरोगामी सहजरावांना सादर समर्पण)

-दिलीप बिरुटे
(हम दो, हमारे दो वाला)

रेवती's picture

13 Jul 2009 - 12:57 am | रेवती

वीज, बँकाचे कर्ज, राशनवरील धान्य, कपडे,नौकरी, दवाखाण्यातील सुविधा (स्वस्तात), शिक्षण, नौकरी, खाजगी उद्योगांना परवानगी, खते, बी -बियाणे, आणि शासकीय नौकरी मिळणार नाही. अशी अट घातली पाहिजे.
सर, काहीतरीच काय बोलता? अट कश्याला?
दोनपेक्षा जास्त मुलं झाली तर यातलं काही तसंही परवडणार नाहीये. शासकीय नोकरीपेक्षा मग राजकारण करणं परवडलं म्हणायचं. कितीही मुलं झाली रेल्वेच्या डब्यांसारखी तरी खपून जातयं.:)

रेवती

शाहरुख's picture

13 Jul 2009 - 1:59 am | शाहरुख

>>लोकसंखेची वाढ झाल्यास काय परिणाम होतात सामान्यातल्या सामान्याचे प्रबोधनाबरोबर, दोन पेक्षा अधिक मुले असल्यास...वीज, बँकाचे कर्ज, राशनवरील धान्य, कपडे,नौकरी, दवाखाण्यातील सुविधा (स्वस्तात), शिक्षण, नौकरी, खाजगी उद्योगांना परवानगी, खते, बी -बियाणे, आणि शासकीय नौकरी मिळणार नाही. अशी अट घातली पाहिजे.

इथे नाही का व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येत ??

(एक मुल पोटचं आणि एक दत्तक अशा विचारांचा) शाहरूख

विनायक प्रभू's picture

12 Jul 2009 - 11:50 am | विनायक प्रभू

ह्या करंट ला तार लागत नाही.

मदनबाण's picture

12 Jul 2009 - 1:16 pm | मदनबाण

चला या निमित्त्याने का होईना सरकार विज निर्मितीवर "भर" देईल !!! ;)

अवांतर :-- लोक कुठल्या पिल च्या जाहिराती पाहितील बरं !!! ;)
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

विकास's picture

12 Jul 2009 - 5:31 pm | विकास

मंत्रीमहोदयांना काहीतरी द्व्यर्थी तर म्हणायचे नाही ना असे वाटले. (अरे गुलामा...)

टिव्हीमुळे लोकशिक्षण वाढेल का वी़ज नाही म्हणून टिव्ही नाही, टिव्ही नाही म्हणून (जणू काही बाकी) काही करायला नाही... असे म्हणायचे आहे असे वाटले.

आता बघितले पाहीजे या महोदयांच्या जावई, मुलगा अजून कोणी कुठल्या टिव्हीउत्पादकाबरोबर काम करतात ते.

----

अवांतरः येथे अनेक विद्यापिठात पर्यावरण बदल थांबवण्यासाठी अनेक शिक्षण म्हणूनअ‍ॅक्टीव्हीटीज चालतात. त्यात वी़ज कमी वापरली तर एका अर्थी आपण हवेत जाणारा कार्बन डाय ऑक्साईड कमी करू शकतो हे तत्व लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेस डॉर्म्स (हॉस्टेल्स) मधे वीज कपात करून कामे करा अशी चळवळ चालू केली त्याला नाव दिले आहे "डू इट इन डार्क"! :-)

टारझन's picture

12 Jul 2009 - 8:53 pm | टारझन

जगदंब जगदंब !! येक लायनीचे धागे ... बाबा रे बाबा !!

आपल्या घरी आहे ना लाईट ? मग आपण आगिनगाडीचे डब्बे नका जोडू .. जेवढं "हातात" आहे तेवढं करा !! असो ...

"आपले भविष्य आपल्या हातात असते" हे वाक्य डिक्रिप्ट करून दाखवा आणि मास्तरच्या क्लासला आमच्या तर्फे फुकाट अ‍ॅडमिशण मिळवा !!

काही लोकांच्या हाताच्या रेषाच मिटत चाल्ल्यात हो .. भिविष्यच आंधारात आहे .. लायटी काय देता ?

दशानन's picture

12 Jul 2009 - 10:53 pm | दशानन

हि & हि प्रतिसाद.
समक्ष्व.

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

मिसळभोक्ता's picture

13 Jul 2009 - 7:44 am | मिसळभोक्ता

फक्त वीजच उपयोगाची नाही. टीव्ही हवा. वीज कधीही बंद करता येते. पण "चार दिवस सासू के" अशा सिरीयल्स मुळे कुटुंबनियोजन होते.

(ता. क. सदर विषयावर मास्तरांचे काय मत आहे, हे विचारणे, म्हणजे, भौतिकशास्त्रातल्या नोबेल प्राईज विनरला, सफरचंदाच्या झाडाखाली बसल्यास मला ग्र्याव्हिटी झ*ल का, असे विचारणे आहे.)

-- मिसळभोक्ता