नवा वाद नवा तमाशा राज्य सरकारचा

mamuvinod's picture
mamuvinod in काथ्याकूट
8 Jul 2009 - 1:53 pm
गाभा: 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देऊन व सागरी सेतुला राजीवजीचे नाव देउन राज्य सरकारने नवा घोळ घातला आहे, मिपाकराना हे मान्य आहे का कि महत्त्वाच्या प्रकल्पाना फक्त काँग्रेसच्याच नेत्याचे नाव दिले जात आहे.

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

8 Jul 2009 - 3:40 pm | अमोल केळकर

यशवंतराव चव्हाण यांचे नाव पुणे - मुंबई हायवेला देणे हे समजून घेता येईल. ( पु. लं देशपांडे यांच्या नावाला विरोध का असावा बरे ? :? )
मात्र सागरी सेतूला सावरकरांचेच नाव देणे योग्य ठरले असते.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विकास's picture

8 Jul 2009 - 4:51 pm | विकास

>>>यशवंतराव चव्हाण यांचे नाव पुणे - मुंबई हायवेला देणे हे समजून घेता येईल. ( पु. लं देशपांडे यांच्या नावाला विरोध का असावा बरे ? :? मात्र सागरी सेतूला सावरकरांचेच नाव देणे योग्य ठरले असते.<<<

असेच म्हणतो.

कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच पुढार्‍याचे सगळे आवडेल अशी आशा नाही. नंतरच्या काळातील काही (मोठ्या) चुका जरी लक्षात घेतल्या तरी यशवंतराव चव्हाण हे नक्कीच नेतृत्व म्हणण्याच्या लायकीचे व्यक्तिमत्व होते. शिवाय मराठी होते. भले काँग्रेसी असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला नसला तरी त्याला विरोध केल्याचे आठवत नाही आणि केले असेल तर कदाचीत नेहरूंना "गेट रिअल" असे समजावण्याचे काम राजकीय चतुरतेने केले. म्हणून (आणि अर्थातच पद्धतशीर प्रसिद्धीमुळे) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनी आणला असे म्हणले जाते.

अशा नेत्याचे नाव मुंबई-पुणे महामार्गाला दिले तर काही बिघडणार नाही. कधीनव्हे ते महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पुढार्‍यांनी नेहरू-गांधींचा लाळघोटेपणा सोडून मराठी नेत्याचे नाव दिले तर काहीच हरकत नाही.

पुलंच्या नावाला विरोध का? - राजकारण.
सावरकरांचे नाव खर्‍या अर्थाने इतिहासात वर ठेवले गेले ते - १. त्यांच्यावरची अनेक माहीतीची पुस्तके लिहून २. त्यांचे आताच्या कालाला अनुसरून संकेतस्थळ काढून ३. उत्तम चित्रपट काढून आणि ४. संसदेत तैलचित्र लावून (ज्याच्या निवडसमितीत कम्युनिस्टपक्षाचे सोमनाथ चॅटर्जीपण होते!)

सातारकर's picture

9 Jul 2009 - 9:38 am | सातारकर

भले काँग्रेसी असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला नसला तरी त्याला विरोध केल्याचे आठवत नाही आणि केले असेल तर कदाचीत नेहरूंना "गेट रिअल" असे समजावण्याचे काम राजकीय चतुरतेने केले. म्हणून (आणि अर्थातच पद्धतशीर प्रसिद्धीमुळे) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनी आणला असे म्हणले जाते.

यशवंतराव सुरवातीला संयुक्त महाराष्ट्र समितीत होते. (काँग्रेसी परंपरेप्रमाणे) हाय कमांड ने पिचक्या दिल्यावर ह्याच यशवंतरावांनी सांगितले की तुमच्या मागणीतला "च" तेवढा काढा म्हणून. ह्यावरील अत्रेंच च काढून कस जमेल? यशवंतराव चव्हाण मधील च काढा पाहू हे विधान देखील प्रसीद्ध आहे.

ह्या सगळ्या इतिहासामुळे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यात यशवंतरावच काय पण १०७ माणस (ज्यात स्त्रीया आणि मुलही आहेत) मारणार्‍या काँग्रेसच्या कोणाही पुढार्‍याचा दुरान्वयानेही संबंध नाही.

-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden

विकास's picture

9 Jul 2009 - 7:09 pm | विकास

>>यशवंतराव सुरवातीला संयुक्त महाराष्ट्र समितीत होते. <<
हे नवीनच कळले. मी कधी हे वाचले/ऐकले नव्हते.

>>ह्या सगळ्या इतिहासामुळे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यात यशवंतरावच काय पण १०७ माणस (ज्यात स्त्रीया आणि मुलही आहेत) मारणार्‍या काँग्रेसच्या कोणाही पुढार्‍याचा दुरान्वयानेही संबंध नाही.<<
म्हणूनच "राजकीय चतुराई" आणि " माध्यमांची मदत" असे म्हणले होते.

चिरोटा's picture

8 Jul 2009 - 5:35 pm | चिरोटा

मार्गाला ब्रिटिश अभियंता जॉर्ज क्लार्क ह्यांचे नाव द्यावे.मुंबई-ठाणे-पुणे रेल्वे मार्गाची कल्पना त्यांचीच.!!
नाहीतर भोर घाटासारखा कठीण मार्ग ज्यानी बनवला त्या अभियंत्याचे नाव द्यावे. मग प्रश्नच मिटेल.
स्वछ्छ पांढरे कपडे घालून पांढर्‍या अँबेसेडर गाडीत आम्हीपण बसू शकतो. =D>
(यशवंतराव आणि राजीवच्या चाहत्यांनी ह्.घ्या!)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

मैत्र's picture

9 Jul 2009 - 11:02 am | मैत्र

का काढत आहेत?
तो एक्स्प्रेस हायवे आता म्हातारा व्हायला लागला आहे.
इतकी वर्षे वापरल्यावर आता नामकरण करणे - कोणाचेही नाव असो केवळ मूर्खपणा आणि उघड गचाळ राजकारण आहे.

यशवंतराव हे थोर नेते होते पण महाराष्ट्रापे़क्षा नेहरु मोठे आहेत अशी विधाने त्यांनी केली होती असे वाचले. खरे खोटे माहीत नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

अवांतरः भोर नाही - बोर घाट

विकास's picture

9 Jul 2009 - 7:06 pm | विकास

>>>यशवंतराव हे थोर नेते होते पण महाराष्ट्रापे़क्षा नेहरु मोठे आहेत अशी विधाने त्यांनी केली होती असे वाचले. <<

यशवंतराव अशा अर्थाचे नक्कीच बोलले होते. त्यावर अत्र्यांनी तिळपापड होऊन अशा अर्थाचे लिहीले होते की, "राष्ट्रापेक्षा व्यक्तिस श्रेष्ठ मानणारा हा माणूस, कधी मोठा होणार नाही". त्यांच्या तळतळाटी लेखनाने नाही पण यशवंतरावांच्या असल्या वागण्याने त्यांच्यात बरेच चांगले गूण असुनही ते कधीच पुर्ण पुढारी होऊ शकले नाहीत.

यशवंतरावांमुळे दुसरा एक प्रसिद्ध झालेला शब्दप्रयोग म्हणजे "स्वगृही परतणे". आणिबाणीनंतर इंदिरा काँग्रेस सोडली आणि नंतर जेंव्हा इंदिरा गांधी ८० मधे परत पंतप्रधान झाल्या तेंव्हा नाकदुर्‍या ओढत ते परत काँग्रेस मधे "स्वगृही येयचे आहे" असे म्हणत परतले. हा त्यांच्या जीवनातला अत्यंत रसातळाला पोचलेला क्षण असावा...

बेभान's picture

9 Jul 2009 - 6:54 pm | बेभान

अहो नसता उपद्व्याप..जर लोक आधीच मुंबई-वांद्रे-वरळी सागरी सेतु(सी लिंक) म्हणुन ओळखत असतील तर त्यात कशाला अजुन वादाची भर. आणि किती शिवसैनिक सावरकरांचे आदर्श, उपदेश आचरणात आणतात. आता जरी उद्या तुम्ही मुंबईहुन पुण्याला गेलात तर एक्सप्रेस वे नी आलो म्हणणार की यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने आलो म्हणुन सांगणार. यावरुन आयडिया सेल्युलरची अभिषेक बच्चनची जाहीरात आठवली, सरळ द्या ना नंबर. नाहीतरी एक्स्प्रेस हायवेला आम्ही NH-09 म्हणुनच ओळखतो. असो आपण या वादात न येता सरळ जुना पुणे-मुंबई मार्ग वापरावा. नाहीतरी तुकारामांनी म्हणलेच आहे , नावांत काय आहे..?