गाभा:
मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत!
काही नविन सदस्यांनी आपली ओळख करुन देण्याकरिता स्वतंत्र थ्रेड टाकले आहेत.त्यापेक्षा सर्वच सदस्यांना एकमेकांची ओळख सांगण्याकरिता या एकाच थ्रेडचा वापर करता येईल.अर्थात आपल्याला स्वतंत्र थ्रेड बनवण्याची इच्छा असल्यास आपणास त्याचे स्वातंत्र्य आहे(लोकशाही आहे हो आमच्याकडे),सदस्यांच्या सोयीकरिता हा खटाटोप.
नविन सदस्यांना काही अडचणी जाणवल्यास त्या येथे टाकाव्यात,जाणकार सदस्यांकडून तत्काळ मदत होईल.
आपलाच मिपाकरी,
इनोबा
प्रतिक्रिया
16 Feb 2008 - 7:53 pm | पिवळा डांबिस
न्हायी म्हंजी, ईनोबा, तुजं डोस्कं पन काय झ्याक चालतंय रं! :)
ओळख-परेड म्हनं...
नशीब तेन्ला येक पुढनं आनी एक साईडनं मारलेला फोटू आनी बोटांचं ठसं चिकिटिवायला न्हायी सांगितलंस....:)))
तुजा,
पिवळा डांबिस
16 Feb 2008 - 8:00 pm | ऋषिकेश
नशीब तेन्ला येक पुढनं आनी एक साईडनं मारलेला फोटू आनी बोटांचं ठसं चिकिटिवायला न्हायी सांगितलंस....:)))
हा हा हा :)))))
16 Feb 2008 - 8:29 pm | इनोबा म्हणे
हा हा हा
डांबीसा,चिमटा काढायची फार सवय हो तुला!
बाकी,त्याचं संपादन करता येत नसल्यामुळे नाव बदलणे शक्य नाय,त्ये त्या तात्यांनाच सांगा.
16 Feb 2008 - 8:32 pm | पिवळा डांबिस
डांबीसा,चिमटा काढायची फार सवय हो तुला?
आता आमच्या नांवातच त्ये येत न्हायी काय? :)
निस्तं गंभीर आनी विद्वत्ताप्रचुर (आयला, दम लागला!) लिवायचं आसतं तर आमी कायतरी "डॉ. प्रा. मधुकर दंडवते" आसलं नांव घ्येतलं नसतं का?
आरं पन ह्यो मैत्रीचा रेशमी चिमटा हाय. आत्ता थोडं दुखंल, पन वळ न्हायी रहायाचा...:)
16 Feb 2008 - 8:19 pm | संजय अभ्यंकर
हा!हा!हा!हा!....
लई ब्येस.
ह. ह. पु. वा.!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
16 Feb 2008 - 9:29 pm | सृष्टीलावण्या
आमच्या ओळखीचे एक कुटुंब आहे. ते कोणी त्यांच्याशी वाईट वागले की म्हणतात, त्यांचे पाप
त्यांच्यापाशी, (वरून) महाराज (मा. कविश्वरमहाराज) बघताहेत.
तसेच सर्व नवीन सदस्यांनी लक्षात ठेवावे की स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नका. तात्या, पिवळा डांबीस, नान चेंगट, बुद्धु बैल सारखे अनेक महाराज लक्ष ठेऊन आहेत तुमच्यावर.
17 Feb 2008 - 7:33 pm | अवलिया
आम्हाला महाराज बनवुन वर पाठवले तर.... तिथे जावुन राडा करु
नाना ठाकरे
स्वर्ग नवनिर्माण सेना
(एकमेव सदस्य व संस्थापक अध्यक्ष व खजिनदार)
18 Feb 2008 - 4:43 pm | छोटा डॉन
"नाना ठाकरे
स्वर्ग नवनिर्माण सेना
(एकमेव सदस्य व संस्थापक अध्यक्ष व खजिनदार)"
एकमेव म्हणू नका , आम्ही आत्ता लगेच सदस्यत्वा साठी अर्ज करतो ....
अर्ज मंजूर न झाल्यास "होणार्या राड्यास " आम्ही जबाबदार नसल्याचे आम्ही प्रामाणिकपणे नमूद करू ईच्छितो ....
त्यानंतर जे काही होईल ती 'जनतेची ऊत्स्फूर्त रि-ऍक्शन ' समजण्यात येईल ......
"नाना ठाकरे आगे बढो .....
हम तुम्हारे साथ है ....... "
कडवा स्वर्गसैनीक ..... छोटा डॉन
16 Feb 2008 - 11:25 pm | अनिकेत
आम्ही असे दिसतो....
मूळचे ठाण्याचे.
VJTI मधून Engineer झालो. IT मध्ये २ वर्षे चाकरी केली. जरी TCS मध्ये होतो तरी कायम NCDEX मध्ये बसून त्यान्चे काम केले. त्यातून मार्केट्स मध्ये रस आला.
त्यामुळे MBA करायचे ठरवले. सध्या देवाच्या भूमीत.. IIM-कोळिकोड (कालिकत) येथे असतो. Technical analysis हा आमचा area of interest आहे.
छन्दः भटकन्ती, पार्ट्या करणे, वेळ वाया घालवणे
16 Feb 2008 - 11:41 pm | llपुण्याचे पेशवेll
मी धनंजय मिराशी.
मी कसा दिसतो ते दाखवत नाही. (उगाच सुंदर पक्ष्यांमधे कावळ्याचा फोटो कशाला. कावळ्याचा येक पुढनं आनी एक साईडनं मारलेला फोटू शेमच येतो. :) )
मी BCS नावाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन किडे शोधायला(सॉफ्टवेअर टेस्टींग ) करण्यासाठी कॉग्निझंट मधे आहे. सध्या मी अमेरीकेत आहे. लवकरच परत येईन. मिसळ चापायला. :)
पुण्याचे पेशवे
17 Feb 2008 - 1:02 am | अनिकेत
फक्त नवीन सदस्यांचीच ओळखपरेड का??
आम्ही जुन्या सदस्यांना ओळखत नाही....
सगळेच आपली माहिती टाकूया ह्या थ्रेड वर...
भविष्यातही जेव्हा नवीन सदस्य येतील तेव्हा वाचतील...
अनिकेत
17 Feb 2008 - 1:20 am | इनोबा म्हणे
फक्त नवीन सदस्यांचीच ओळखपरेड का??
मग हे घ्या,आम्ही ही आमची ओळख करुन देतो.
आम्हाला स्वतःच्या तोंडाने स्वतःची(आणि दूसर्याचीही) स्तुती करायला आवडत नाही,त्यामूळे तूर्तास एवढेच.
बास का?
आपलाच,
-इनोबा
17 Feb 2008 - 2:10 am | अनिकेत
आम्हाला स्वतःच्या तोंडाने स्वतःची(आणि दूसर्याचीही) स्तुती करायला आवडत नाही,त्यामूळे तूर्तास एवढेच.
आम्हाला मात्र माज करणे फार आवडते....आणि आपणास आम्ही आवडलो नाही असे वाटते.
हे संकेतस्थळ पहात होतो, मार्केटची चर्चा पाहून मैदानात उतरलो.
आम्ही ह्या जागेच्या संस्कृतीत बसत नसू तर उगीच येथे राहून स्वतःचा cognitive dissonance आणि इतरांची गैरसोय आम्ही करणार नाही.
अनिकेत
17 Feb 2008 - 2:42 am | इनोबा म्हणे
आम्हाला मात्र माज करणे फार आवडते....आणि आपणास आम्ही आवडलो नाही असे वाटते.
अहो,इथे येणारा प्रत्येक जण आम्हाला आवडतो. त्याशिवाय का आम्ही हा थ्रेड सुरु केला.
आम्ही ह्या जागेच्या संस्कृतीत बसत नसू तर उगीच येथे राहून स्वतःचा cognitive dissonance आणि इतरांची गैरसोय आम्ही करणार नाही
आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो,विनोद करायची आमची सवयच आहे.आपणाला विनोद करणारी व्यक्ती आवडत नाही वाटतं. अहो आयुष्य सुंदर आहे,त्याच्यात विनाकारण रडगाणी ऐकवण्यात काय अर्थ आहे,म्हणून आम्ही आमच्यापरीने प्रत्येकालाच हसते करण्याचा प्रयत्न करतो.
आमच्या बोलण्यामुळे आपल्याला खरेच वाईट वाटले असल्यास आपण मोठ्या मनाने आमच्या चूका पदरी घ्याल अशी आशा बाळगतो.
या मिपा संस्कृतीत सर्वांचेच स्वागत आहे,इथे कोणाचेही वैयक्तीक शत्रूत्व नाही.
आपलाच मिपाकरी,
-इनोबा
17 Feb 2008 - 7:54 am | केशवराव
अनिकेत,
वयाच्या मोठेपणाने सांगतो; विनोबाचे बोलणे लाईटली घे. ह्या कट्ट्यावर तू नवीन नाहीस. चेष्टा - मस्करी हा मिपाचा मुख्य मसाला आहे. माझ्यासारखे काही सदस्य केवळ ह्या मसाल्याच्या चवीसाठी इथे आहेत. तू इथेच रहा. छान छान मंडळी आहेत. एकत्र राहून भांडूया, मजा करूया. त्याने पण दिलगीरी व्यक्त केलीच आहे. छोडदो यार.
17 Feb 2008 - 1:46 am | विसोबा खेचर
फक्त नवीन सदस्यांचीच ओळखपरेड का??
आम्ही जुन्या सदस्यांना ओळखत नाही....
नमस्कार. आम्ही तात्या अभ्यंकर. आमच्या बद्दलची अधिक माहिती मिपावरील आमच्या व्यक्तिरेखेत दिली आहे, इच्छुकांनी कृपया ती वाचावी...
हल्ली मिपावर बरीच मंडळी फोटू देत आहेत, तेव्हा म्हटलं ओळखपरेडच्या निमित्ताने आपणही आपला फोटू इथे द्यावा...! :)
१) ठाण्याच्या एका कार्यक्रमात आम्ही भीमपलास रागावर लेक-डेमो देत होतो, त्यावेळचा हा फोटू आहे. प्रियांक थत्ते हा आमचा दोस्त आम्हाला सतारीवर स्वरसंगत करत आहे आणि हार्मोनियमवर आमची अतिशय चांगली मैत्रीण स्मिता मनोहर साथ करत आहे. स्मिता मनोहर ही पुलदेशपांडे डॉट नेट ची मालकीण आहे. तिने मोठ्या कष्टाने पुलदेशपांडे डॉट नेट हे संकेतस्थळ उभं केलं आहे.
२) आम्ही मनोगतावर कार्यरत असताना पुण्यात एकदा मनोगतींचा कट्टा झाला होता, तेव्हाचा हा फोटू आहे. आम्ही आमच्या आठवणीप्रमाणे बिहाग राग गात होतो तेव्हा मिपाचेच बल्लवाचार्य प्रभाकर पेठकर आमचा फोटू काढत आहेत. हा फोटू मात्र मिपाचेच सर्वसाक्षी यांनी काढलेला आहे. साक्षीशेठ, फोटू बाकी छानच काढतात! :)
असो, आम्हाला वाटतं आमची ओळख आता पुरेशी आहे! :)
आपला,
(ओळखीचा!) तात्या.
मिसळपावचा एक सदस्य.
17 Feb 2008 - 12:19 pm | सर्वसाक्षी
आमच्या सारख्या ठोंब्यांना शास्त्रिय संगीताचा आस्वाद कसा घ्यावा हे समजावायच्या प्रयत्नात तल्लिन झालेला तात्या.
ही छबी झळकल्यावर दोन साक्षात्कार घडले
मला घडलेला: वाईड अँगल लेन्स आवश्यक आहे
तात्याला घडलेला: आपले व्यक्तिमत्व अंमळ भारदस्त आहे
(यात शंकाच नाही, मनही असेच मोठे आहे)
17 Feb 2008 - 12:55 pm | विसोबा खेचर
मला घडलेला: वाईड अँगल लेन्स आवश्यक आहे
हा हा हा .. :)
18 Feb 2008 - 12:07 am | चतुरंग
आपले व्यक्तिमत्व बाकी 'गुटगुटीत' हों! मला एकदम 'मर्फी' बाळाची आठवण झाली (मी लहान असताना मर्फी रेडिओच्या जाहिरातीत एक असेच गुटगुटीत बाळ असे).
आता आपली प्रत्यक्ष भेट कधी ते माहीत नाही पण ही भेट मात्र छान झाली!
चतुरंग
17 Feb 2008 - 1:57 am | विसोबा खेचर
अर्थात आपल्याला स्वतंत्र थ्रेड बनवण्याची इच्छा असल्यास आपणास त्याचे स्वातंत्र्य आहे(लोकशाही आहे हो आमच्याकडे),सदस्यांच्या सोयीकरिता हा खटाटोप.
त्याचबरोबर,
प्रत्येक नवीन/जुन्या सदस्याने स्वत:ची ओळख करून दिलीच पाहिजे असे मात्र मुळीच बंधन नाही असे मिसळपावतर्फे आम्ही जाहीर करत आहोत..
तात्या.
17 Feb 2008 - 4:20 am | काळूराम
तसे मुळ नाव निलेश व्यवहारे परंतू घरात रंगाने उजवा असल्यामुळे आईची प्रेमळ साद 'काळूराम' . नाशिकात अभियांत्रिकी शिक्षण संपवून (पूर्ण करुन नव्हे!) स्कॉटलंड मध्ये उच्चशिक्षण घेतोय. तात्यांना एक विनंती कराविशी वाटते, तो मिसळपावचा फोटू तेवढा काढून टाका राव, ईकडे आम्हा मंडळींची चांगलीच फरपट होते. मिसळच्या तर्री सारखीच झणझणीत चर्चा इथे आईकायला मिळेल अशी अपेक्षा.
17 Feb 2008 - 6:53 am | रविराज
माझ नाव रविराज देशमुख. मी मुळचा सातारचा. सांगलीला वालचंद कॉलेज ऑंफ इंजि. मधुन मी बी.ई. केलं आणि पुण्यामधे नोकरी करतो. सध्या अमेरिकेत असतो.
- रवी.
17 Feb 2008 - 8:08 am | केशवराव
विनोबाचा उपक्रम स्तूत्य आहे.
हि माझी ओळख.
मूळ नांव केशव चांदोरकर. चोंढी - अलिबाग येथे रहातो . २८ वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा [ नोकरी ] केली. सध्या एल . आय. सी. एजंट म्हणून काम करतो. सामाजिक कार्याची आवड. एका पतसंस्थेचा अध्यक्ष , एका वाचनालयाचा संचालक, एक भजनी मंडळ चालवतो. वाचन, संगीत [ शास्त्रीय ], ऊनाडने, मित्र गोळा करणे, इ. छंद. वय वर्षे ६०.
एक फोटो टाकायचा विचार आहे. कसा टाकायचा ते माहित नाही. बघू कधितरी.
अवांतर :- आणि ते पोपटीच्या निमंत्रणाचे काय झाले ?
------- केशवराव.
17 Feb 2008 - 8:17 am | विसोबा खेचर
मूळ नांव केशव चांदोरकर. चोंढी - अलिबाग येथे रहातो .
केशवराव, किहिमच्या दादा भिडे (दिनकरराव भिडे - मानस बंगला) यांना ओळखता काय? त्यांची पत्नी सुलभा भिडे ही आमची मावस बहीण बरं का! त्यामुळे आम्ही अधनंमधनं किहिमला बहिणीकडे येत असतो. आमचे भावजी दादा भिडे अलिकडेच वारले.
असो..
आपला,
(अष्टागरातला) तात्या.
17 Feb 2008 - 8:26 am | केशवराव
तात्या ,
दिनकरराव आमचे जवळचे मित्र होते. तसे ते बर्याच जणांचे मित्र होते. आम्ही त्यांना दि.र. म्हणायचो.
त्यांच्या घरी चांदोरकर सर विचार. ते ओळख देतीलच.
आणि आता किहीमला मुद्दाम माझ्याकडे ये. जेवायलाच हं !
केशवराव.
17 Feb 2008 - 10:11 pm | विसोबा खेचर
आणि आता किहीमला मुद्दाम माझ्याकडे ये. जेवायलाच हं !
नक्की येईन केशवराव.
मला खालीलप्रमाणे जेवण केल्यास ते अतिशय आवडेल! :)
१) बटाट्याच्या काचर्या
२) गूळ-गोडामसाला-चिंच/कोकम घातलेली साधी,सुरेख अशी घरगुती ब्राह्मणी चवीची तुरीच्या डाळीची आमटी,
३) मउसूत चपात्या
४) केळ्याची शिक्रण
आणि
५) चवीपुरती हिरव्या मिरचीची दोन(च) गरमागरम भजी! (ऑप्शनल!)
धन्यवाद! :)
लागा सैपाकाला, आलोच! तात्याची आवड एकदम साधीसोप्पी असते हो. आपण यजमानाना फारसा त्रास देत नाही! :)
आपला,
(पाहुणा!) तात्या.
17 Feb 2008 - 2:55 pm | बेसनलाडू
केशवराव,
चोंढी नाक्यावर उतरून आतल्या बाजूस जाऊन असलेले (मला बरोबर आठवत असेल, तर रायगड बाजार च्या समोरच्या बाजूस आतमध्ये?) छाब्रिया बाईंचा बंगला, नायक काकांचे घर आणि घोटगाळकरांची बंगली माहीत आहे का? पैकी घोटगाळकर म्हणजे आमच्या आत्याचे यजमान. सध्या ती बंगली विकून मुंबापुरीस परतलेले. आत्याच्या घरी किहीमला कधी संक्रांतीनिमित्त, कधी कोजागिरीनिमित्त, तर कधी सहजच उन्हाळ्याच्या सुटीत जाणेयेणे व्हायचे. अलिबाग बीच, किहीम बीच, चौल, रेवस असा छान मोठा कार्यक्रम व्हायचा.
(स्मरणशील)बेसनलाडू
18 Feb 2008 - 12:00 am | केशवराव
बेसनलाडु ,
बरीच ओळख पटली. घोडगाळकर आजी आम्हाला चांगल्या ओळखतात. त्यांना चांदोरकर विचार.
सर्वांच्या ओळखीचा केशवराव.
17 Feb 2008 - 2:24 pm | सुधीर कांदळकर
एक फालतू माणूस. मालाड प. , मुंबई ला राहातो. दुर्दैवाने नोकरी करावी लागते. उलट्या खोबडीमुळे दोन नोक-या बदलाव्या लागल्या. सुदैवाने दोनच. आताची १४ वर्षे कशीतरी टिकून आहे. खाजगी ईंजिनीयरिंग कंपनीत प्रशासकीय अधिकारी. वाचन, संगीत ऐकणे. टी व्ही वर खेल पाहाणे व मित्रांच्याबरोबर भटकणे व फालतू लिखाण करणे हे आवडते छंद. वय वर्षे ५५.
17 Feb 2008 - 3:16 pm | बेसनलाडू
सहजच आंतरजालीय पडीक. जन्मभूमी: मुंबापुरी (दादर!!!!!!!) संगणक अभियांत्रिकीची पदवी आणि नंतर संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण. पेशाने सॉफ्टवेअर अभियंता. बहुतांश शिक्षणकालादरम्यान मुंबईत नि पदव्युत्तर शिक्षणादरम्यान अमेरिकेत नॉर्थ कॅरोलायनात वास्तव्य. व्यवसायानिमित्त सध्या कॅलिफोर्नियात. आवडीनिवडी: आंतरजालीय भटकंती, इकडेतिकडे फुटकळ लेखन, जबरदस्त वाचन, नानाविध प्रकारचे संगीत, संगणक आणि सॉफ्टवेअरशी सारख्या उचापती, खाणे आणि खिलवणे; षठीसामाशी फोटो काढत बसणे, अभिनय वगैरे. वय(कॅलेन्डरनुसार) - २४ वर्षे २६२ दिवस. वय (मानसिक) - अज्ञात.
(परिचित)बेसनलाडू
17 Feb 2008 - 7:12 pm | इनोबा म्हणे
च्यामारी बेसन्या,बरा घावलास लेका!
आता कोणीतरी आमच्या वयाचे सापडले इथे. नाहीतर सगळे काका-काकू जमा झाले होते.
असो!जेष्ठांचे मार्गदर्शन ही काही कमी नाही. आता आमच्याबद्दल काय लिहायचे? च्यामारी आम्ही काहीच स्पेशल करत नाही. मरु दे तिच्यायला.
पुन्हा कधी तरी लिव्हतो.
-इनोबा
(आमच्याकडे सर्व प्रकारच्या 'शिव्या' मोफत मिळतील)
18 Feb 2008 - 2:06 am | राजघराणं
आम्ही स्वतः ची ओळ्ख देत नस्तो . (कारण आम्ही गुप्त काम करतो)
18 Feb 2008 - 1:44 pm | धमाल मुलगा
कोणास ते ठाऊक असे?
तर अस्मादिक म्हणजे भाईकाका॑च्या "पोष्ट्या जोश्याचा बे॑बट्या" ला चपखल बसणारे.
यकदम डिटेलवार म्हायती माझ्या व्यक्तिरेखेवर वाचा (कि॑वा कशाला वाचता? आहेच काय त्यात वाचण्यासारख॑? फुटकळ माणसाच्या पोलिशी रिपोर्टाला "व्यक्तिरेखा" म्हणण॑ म्हणजे..असो.)
मी कैवल्य देशमुख. तसा बारामतीचा (घड्याळ..घड्याळ..माझ्या गावाची वळख), वाणिज्य शाखेची पदवी घेऊन, व्यवसाय व्यवस्थापनात पद्व्युत्तर होऊन "सॉफ्ट्वेअर कन्सल्ट॑ट" म्हणून सध्या कार्यरत (चारचौघा॑च्या भाषेत सा॑गायच॑ तर..एक ना धड..). (म्हणजे बघा, मी कसा हुशार...स॑दर्भः भाईकाका॑चा "पुणेकर" "सार्वजनिक मराठी". ह्यावरून लक्षात आल॑ असेलच की हल्ली मी चा॑गलाच मुरलेला पुणेकर झालो आहे :))
सध्याच्या नोकरीत आल्यापासून तळपायावर बहुधा चा॑गला रुपयाच्या आकाराएव्हढा तीळ उगवला असावा, सतत वि॑चवाच॑ बिर्हाड पाठीवर..त्यामुळे पुणे, मु॑बई आणि ब॑गळूरु ही आमची विहारस्थान॑..तुर्त आम्ही देशा॑तर्गत कामकाजात व्यग्र असल्याने परदेशातील माती आमच्या पदस्पर्शाने सुवर्णमयी होणेचे शक्य नाही...(इ॑ग्रजजन हो..थोडा धीर धरा)
उर्वरित स्वस्तुती व्यक्तिरेखेवर....
आपला
- ध मा ल.
अवा॑तर : बेसन्या, म्हणजे तुझा वाढदिवस जवळच आला की रे...२९ मे का? (मी गणितात ठार कच्चा आहे...तारिख ३०-३५ दिवस आणि महिना २-४ इकडे तिकडे होऊ शकतात)
इनोबा, मीही "काका-काकु" वर्गात नाही ह॑...
18 Feb 2008 - 3:13 pm | बापु देवकर
मी राज केतुरकर (मुळ नाव दीपक देवकर )...
राहणार , कळवा-ठाणे...बेडेकर कालेजातुन वाणिज्य शाखेची पदवी घेतली (२००१ साली)....सध्या सलाल्हा-ओमान येथे Maersk Line मध्ये पाट्या टाकतोय...
अहो तात्या आपण बेडेकरचे विद्यार्थि का...? आपली मैत्रीण स्मिता मनोहर ह्या बेडेकर मध्ये होत्या म्हणुन विचारले...
मिसळ प्रेमी
राज....
19 Feb 2008 - 3:02 pm | विसोबा खेचर
अहो तात्या आपण बेडेकरचे विद्यार्थि का...? आपली मैत्रीण स्मिता मनोहर ह्या बेडेकर मध्ये होत्या म्हणुन विचारले...
नाही, मी छबिलदास ग्रुपच्या मो.ह.विद्यालयाचा विद्यार्थी!
तात्या.
18 Feb 2008 - 9:07 pm | छोटा डॉन
लई लई मस्त वाटलं बघा वरचं सगळं [ च्यायला भारीच अनूनासीक व्यायला लागलं बेट्या ] वाचून ....
चला आमच्या वयाचे कोणीतरी "जोडीदार" सापडला , नाहीतर आम्हाला पण वाटलं "सालं ही तरूण पोरं काही लिहता / वाचतात की नाही ?".
तर तात्पर्य असे की आम्ही " श्री . बेसनलाडू व ईनूभाऊ अनिवसे व धमाल मुलगा " यांच्यापेक्षा साघारणता १ वर्षाने लहान आहोत.[ असा एक साधारण अंदाज आहे ] तसा आम्ही करेक्ट 'दिवसांचा हिशोबही' करून पाहिला पण दर वेळी वेगळेच ऊत्तर आल्यामुळे नाईलाजाने प्रयत्न सोडून द्यावा लागला .[ त्यात 'लिप वर्षाने' तर लैच घोळ घातला, असो ]
आता आमच्याबद्दल काय सांगायचे ? "नावात काय आहे ?" ही ऊक्ती आम्ही लहाणपणापासून मनावर घेतल्यामुळे आम्ही नावास जास्त महत्व देत नाही.....
तसे पहायला गेलात तर आम्ही अनेक प्रचलित नावाने ओळखले जातो. पाळण्यातील नाव, घरातील लाडाचे नाव , दोस्तातील अतिच लाडाचे नाव , काही 'लाडांच्या' व्यक्तींनी ठेवलेले अतिशय 'खासगी नाव' , ऑफीसमधल्या 'ग्लोबल' वातावरणात वापरले जाणारे वेगळेच 'ग्लोबल नाव' , आता 'आंतरजालावर वापरले जाणारे नाव' ईत्यादी ईत्यादी मुळे आम्ही एक असे नाव सांगू शकत नाही . असो....
तर सांगायचा मुद्दा असा की "देशातल्या 'अतिप्रसिद्ध' शहरात असणार्या एका 'अतिपुरातन' व 'अतिप्रसिद्ध' अशा अभियांत्रीकी विद्यालयात आम्ही [ कसे बसे ] शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जनरित संभाळण्यासाठी नोकरीपण पकडली . पण 'आमच्या कामाबद्दल अपेक्षा' व 'कंपनीच्या आमच्याकडून अपेक्षा ' यांचा मेळ न बसल्याने आम्हास वारंवार कंपनीटन [ देशाटनाच्या धर्तीवर ] करावे लागले......
सध्या आम्ही 'कर्नाटकप्रांतातील बेंगरूळ प्रदेशात' एका अतिप्रसिद्ध आस्थापनात काम करत आहोत.
ही कंपनी "जगातील सगळ्यात मोठी 'गाड्या बनविणारी' कंपनी " म्हणून ओळखली जाते . तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही या "सामान्य " कंपनीतल्या "संशोधन व विकास विभागात" सध्या "गाड्यांसाठी लागणारी इंजिने डिसाईन " करण्याच्या [ नसत्या ] ऊद्योगात मग्न आहोत ....
आम्ही [ न ] केलेल्या कामावर खूष होऊन आम्हाला कंपनी आम्हाला आस्थापनाच्या 'हिटलरच्या देशातील ' "हेडक्वार्टर" मध्ये पाठवायच्या मागे लागली आहे. आम्हालाही "बोंबलत हिंडायची आवड " असल्याने आम्ही "हिरवा कंदील " दाखवला आहे .... असो . ....
वरच नमुद केल्याप्रमाणे आम्ही सध्ध्या "गध्धेपंचविशीत" असल्याने आम्हाला " ऊगाच बोंबलत हिंडणे , तासनतास आंतरजालावर कालापव्याय करणे [ यात वाचन , लेखन व अनेक नसत्या ऊचापती यांचा समवेष होतो .] , ठार मेल्यासारखे झोपणे ,तासनतास कुठल्याही 'अर्थहीन विषयावर ' गप्पा ठोकणे , 'चेंडू झोडपण्याचे' सगळे खेळ खेळणे, मनोसोक्त हादडणे त्यात बल्लवगिरीची हौस , 'सगळ्या प्रकारचे सिनेमे' अतिशय आत्मीयतेने पहाणे , कसलेही गाणे लावून बेधूंदपणे नाचणे व कधितरी आपल्या सारख्या ४ मित्रांना गोळा करून "बैठक बसवणे [म्हणजे काय ? हे सांगण्याची बहूदा गरज नाही ] " यासारखे आमचे काही छंद आहेत ....
तर आता पुराण अतिच लांबत चालल्याने पूर्णविराम देतो ....
आपला
छोटा डॉन [ आमची कोठेही शाखा नाही ..... ]
अवांतर : 'धमाल मुला ' आमचा 'वाढदिवस ' २९ मार्चला 'बेसनलाडनाच्या' आधी असल्याची नोंद घ्यावी....
18 Feb 2008 - 11:49 pm | ब्रिटिश टिंग्या
नमस्कार दोस्तहो,
मी धनंजय काळे. छोट्या डॉनच्या दिवसांच्या हिशेबावरून आम्ही त्याच्यापेक्षा १ वरीस लहान असण्याची शक्यता आहे.
आम्ही विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण करून सध्या पुण्यात 'ट्रॅक्टर ' बनवणार्या संगणक कंपनीत ' हमाल ' या पदावर कार्यरत आहोत.
हमाली करताना बरेचशे उपद्व्याप केल्याने कंटाळलेल्या प्रकल्प संचालकाने शेवटी आमची राणीच्या देशात हकालपट्टी केली.
आणि आता आम्ही ब्रेड, बटर व अत्यंत बेचव भोजन भक्षण करत स्वत:ची गुजराण करीत आहोत (किंबहूना केलेल्या पापांची फळे भोगत आहोत).
असो, माज करणे हा आमचा अत्यंत आवडता छंद असून त्याचे बाळकडू आम्हाला बालपणापासूनच म्हणजे नुसते मवाली विद्यार्थीमध्ये असतानाच मिळालेले आहे.
कंपनीतील मुफ्त आंतरजालावर ' मुक्त ' भटकंती करत उरलेल्या वेळात कंपनीच्या मार्केटमधील घसरणीबद्दल कारणमिमांसा करणे हा आमचा एकुलता एक आवडता 'उद्योग' आहे.
असो, बहुत काय लिहीणे.....तुम्ही सुज्ञ आहातच....
आपला,
धनंजय काळे (उर्फ छोटी टिंगी) ;)
19 Feb 2008 - 2:43 pm | इनोबा म्हणे
च्यामारी! टिंग्या ...इनायकभौला येड्यात काढतोस लेका.मी म्हणलं तू गेलास तरी कुठं? तू तर बारसं करुन हितंच फिरतूयास की....
बरं झालं की नाई मंडळी...या परेडमंदी बर्याच गावकर्यांची वळीख झाली....
(मिसळ'लेला) -इनोबा पुणेकर
19 Feb 2008 - 12:30 am | मुक्तसुनीत
अस्मादिक दादरास आणि ठाण्यास वाढलेले. पुण्यात "घडलेले". आणि अमेरिकेत येऊन पडलेले.
दादा रेग्यांच्या "बालमोहन"मधे चौथीपर्यंत होतो. आताचे बालमोहन म्हणजे ...जेथे फुले वेचली तेथे गवर्या वेचाव्या अशी परिस्थिती (असे ऐकतो, वाचतो.) ठाण्यास टिळकमास्तरांच्या शाळेत होतो. पुण्यास हरि सहस्त्रबुद्ध्यांच्या. मग अच्युतराव गडबोल्यांनी आपल्या पदस्पर्शाने पावन केलेल्या कुंपणीमधे होतो आणि आता संयुक्त संस्थानांच्या राजधानीत : अच्युतरावांच्याच भाषेत सांगायचे तर तिय्यम कामे करणारा एक दुय्यम दर्जाचा नागरिक :-)
थोडेबहुत जमेल तेव्ह्ढे वाचतो. मिसळपावादि ठिकाणी "महाजनो येन गता: स पंथः" या न्यायाने आलो. आता या स्थळाचा एक फ्यान बनून पडीक असतो. तात्यासाहेबानी लावलेल्या केशराच्या शेतातून नुसता चालतो. आनंदाचा स्पर्श होण्यास तेव्हढेही पुरेसे. :-)
19 Feb 2008 - 12:50 am | धनंजय
नाव : धनंजय
शहर/गांव : बॉल्टिमोर
देश : (राहाता) अमेरिकेची संयुक्त राज्ये, (मूळचा) भारत
माझ्याविषयी :वय तात्यांच्या जवळपास. शालेय मराठी शिक्षण सुमार, घरगुती वापर बर्यापैकी. ललित आणि प्रगल्भ दोन्ही प्रकारे मराठीतून लिहायला शिकायचा प्रयत्न करतो आहे. हल्लीच ड्रुपल्/गमभन वापरून मराठीतून संवाद साधणार्या संकेतस्थळांशी ओळख झाली, त्यामुळे रोजवापरातल्या लेखी भाषेशी पुन्हा संयोग होत आहे, त्यामुळे खुश आहे! (संकेतस्थळांच्या चालकांमध्ये वैमनस्ये माझ्या ओळखीपूर्वी झाली होती, म्हणून त्या बाबतीत अज्ञ, पण खरे तर त्याचे मला फारसे कुतूहलही नाही.)
आवडती पुस्तके आणि लेखक : मराठीत थोडीच पुस्तके वाचली आहेत. पैकी अर्ध्यावर पुलंची, व्यासंग वाढवायला आवडेल. इंग्रजीतली आवडीची पुस्तके सारखीसारखी बदलत असतात. स्पॅनिशमध्ये बोर्हेस.
आवडते संगीत : गीता दत्त आणि आशाताईंवर जान निछावर करीन. बाकी बारोक संगीत खूप आवडते. भारतीय (दोन्ही प्रकारचे) शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते. जाणही आली तर हवी आहे.
चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी : इंग्रजीतले "इंडिपेंडंट" चित्रपट. वर्षात एखादा(च) सुपर म्युझिकल डान्सिकल हिंदी चित्रपट बघतो. मराठी चित्रपट फार कमी बघायला मिळतात.
आवडते खाद्यपदार्थ : माणकुराद आंबा खाऊन बारा वर्षे झाली - हाय तरसलो!
शिक्षण : फारच टंगळमंगळ केली. तरी शेवटी शिक्षण सोडून नोकरी धरावीच लागली
व्यवसाय : वैज्ञानिक
व्यवसायाचे/कामाचे स्वरूप : संशोधन, थोडीफार प्राध्यापकी
19 Feb 2008 - 12:56 am | प्राजु
तात्यासाहेबानी लावलेल्या केशराच्या शेतातून नुसता चालतो. आनंदाचा स्पर्श होण्यास तेव्हढेही पुरेसे. :-)
हे बाकी एकदम खरे.. :))
मी प्राजक्ता पतवर्धन. शिकले कोल्हापूरात, सासर सांगली. जे काही काम केलं ते पुण्यात. आणि नवर्यासोबत इथे येऊन राहिले आहे अमेरिकेत. लिहिणे, खाणे, गाणे हे आवदते उद्योग. शिवाय गॉसिपिंग... मि.पा.वर वाचणे, मित्र्-मैत्रिणींशी इंटरनेटवर गप्पा ठोकणे हे छंद. तशी शिक्षणाने मी फॅशन डिझायनर आहे. पण नोकरी केली ती पुणे आकाशवाणीत निवेदिका म्हणून.
बास ...!!आता आणखी किती कौतुक करावं स्वतःच??
- प्राजु
19 Feb 2008 - 1:00 am | मुक्तसुनीत
"केशराच्या शेताच्या" रूपकाचे श्रेय माझे नव्हे ! (हे मी आधीच सांगायला हवे होते.) बाबुराव पेंढारकरानी आपल्या आत्मचरित्रात हे वाक्य लिहिले आहे. "शाहू महाराजानी करवीरनगरीत विविध कलक्षेत्रातील लोकांचे जणू केशराचे शेत लावले. त्यातून मी नुसता चाललो तर त्याच्या सुगंधात न्हाहून निघालो". मधू गानूंनी पुलंच्यावरच्या लेखात हेच वाक्य उधृत केले आहे....
20 Feb 2008 - 6:15 am | सृष्टीलावण्या
हे सारस्वताचे गोड
तुम्हीची लावले झाड
आता अवधानामृते वाढ
सिंपोनी कीजो...
19 Feb 2008 - 1:14 am | पिवळा डांबिस
मी हाय पिवळा डांबिस!
कणा-कणांनी बनलेला येक उर्जेचा लोळ!
आंतरजालावर अनिर्बंध भटकणारा आग्यावेताळ!!
मि. पा. वर चकाट्या पिटायला येतू!
मला शरीर न्हायी. शरीर न्हायी म्हणूनशान वयपन् न्हायी. फोटू कसा देनार, देवचाराचा फोटू येत न्हायी!!
आता कट्ट्यावर आमाला काका वगैरे म्हनत्यात, पन त्यो समदा प्राजुचा चावटपना हाय. तिनी पयल्यांदा काका केलंनीत आनी मंग समदे काकाच म्हनायला लागले...
बघीन बघीन नायतर येक दिवस कायतरी जाम इब्लिस आन् छचोर लिवीन नवीन धाग्यातून! मंग "आसला काका नको गं बाई!" म्हनायची येळ ईल समद्यांवर!!! :))
मी सध्या पकडलेलं "झाड" लईच झंपट हाये. त्ये दिवसभर नोकरी करतंय, बिलं भरतंय, आनी स्वतःला घरातला "कर्ता मानूस" समजतंय!
खुळं तिच्या आयला!!!
त्येला ह्ये बी म्हायती न्हायी की त्येच्या शरीरावरबी त्येचा हाक्क न्हायी. त्ये तर माझ्या ताब्यात हाये. कसला रांडिचा कर्ता आनी कसलं काय!
न्हायी म्हंजी तसं गरीब हाय बेनं. शिक्शानबिक्शान नीट क्येलं, आता रोगांवर आवशिधं शोधीत आसतंय! माणवजातीच्ये क्लेश न्हायसे करनार म्हनं!
पर झपाटन्यावर आवशिध सापडत न्हायी तंवर ह्येला कोन बरा करनार? :))
त्येचा मुक्काम सध्या यक्षनगरीत आसतोय्! (लॉस = गाव/ नगर; एंगेलेस् = देवदूत/ यक्ष). कधी यायचं ठरीवलं तर कळवा, हालिवूडमंदी फिरवूनशान आनीन! :))
आपला,
(आजच्या दिवस) नम्र,
पिवळा डांबिस
19 Feb 2008 - 3:55 am | नंदन
मी सॅन डिएगोला असतो. कधी आलात तर नक्की कळवा :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
19 Feb 2008 - 5:27 am | बेसनलाडू
असतो.
कधी आलात तर नक्की कळवा.
(स्वागतोत्सुक)बेसनलाडू
19 Feb 2008 - 8:29 pm | llपुण्याचे पेशवेll
मी न्यू यॉर्क ला आहे.. आलात तर कळवा. :)
पुण्याचे पेशवे
19 Feb 2008 - 11:15 pm | एक
सॅन होजे मधे रहातोस आणि अभिनयाची पण आवड आहे. कला च्या किंवा म. मं च्या नाटकात काम केलं होतंस का कधी?
मला असं वाटतं आहे की मी तुला ओळखतो..
-नाटकवाला.
19 Feb 2008 - 11:23 pm | बेसनलाडू
अजून संधी चालून आलेली नाही. पण कला आणि म. मं च्या जवळपास सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. मजा येते. सहभागी व्हायची संधी मिळाली तर पाहू.
(कलाकार)बेसनलाडू
20 Feb 2008 - 9:05 am | पिवळा डांबिस
नवीन धागाच सुरु करूया...
19 Feb 2008 - 1:21 am | प्राजु
आता कट्ट्यावर आमाला काका वगैरे म्हनत्यात, पन त्यो समदा प्राजुचा चावटपना हाय. तिनी पयल्यांदा काका केलंनीत आनी मंग समदे काकाच म्हनायला लागले...
आरं आरं माज्ज्या काका.. नगस रं रागावू असं. इतकं मनाला लावून घ्यू नये म्हनते मी. आता अवशद बनवतू हाइस नव्हं तर बनीव कि रं... कश्शाला उगा नसती नावं ठेवतू त्या बिच्चार्या प्राजुला.. आनि तिज्यामुळं येक चारोळी टाकलिस नव्हं का तोंडात?? मन कसं शांत झाल बघ तुझं.. आता लिव रं हितं काय तरी भारी.. वाट बघते बघ मी.
-पुतणी प्राजु
19 Feb 2008 - 11:26 am | आनंद घारे
सभासदांनी दिलेल्या ओळखी वाचून आपली काय ओळख द्यायची तेच समजेना. मी जन्मभर बिज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाट्या टाकल्या, आता मराठीत गमभन लिहायला सुरुवात केली आहे. मी कोण होणार होतो ते मी नुकतेच मा़झ्या अनुदिनीवर लिहिले आहे. शक्य असल्यास वाचावे अशी नम्र विनंती. माझ्या अनुदिनीचा पत्ता खाली दिला आहे.
http://360.yahoo.com/abghare
19 Feb 2008 - 12:25 pm | चतुरंग
मिरजेत जन्म (वाद्य निर्मितीचे माहेरघर - गाण्यातलं फारसं काही कळत नसलं तरी भैरवीने डोळ्यात पाणी येते ही तिथलीच देणगी असावी!)
वयाने काका कॅटॅगरीत गेलेलो असलो तरी मनाने नाही!
राहिलो, वाढलो - अहमदनगर
शिक्षण - अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीचे भा.फि.हायस्कूल (आमच्या वेळी एकेका वर्षी १०-१० विद्यार्थी बोर्डात येत, अजूनही माझे सगळे शिक्षक/शिक्षिका मला लख्ख आठवतात. आता शाळेच्या अवस्थेकडे पाहून पोटात तुटतं!)
इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी - सांगलीत (कृष्णेनं आणि ह्या गावानं मला भरभरुन दिलं)
नोकरी - सुरुवात पुण्यनगरी.
स्वतःचा धंदा - पुण्यनगरीत (काही वर्षांनंतर बंद करावा लागला - पण त्यातून भरपूर शिकलो - मुख्य म्हणजे माणसं ओळखायला!)
पुन्हा नोकरी निझामाच्या हैदराबादेत आणि तिथून आता अमेरिका - सध्या मॅसाच्युसेट्स मधल्या विल्मिंग्टन मधे. पहिल्यापासूनच हार्डवेअर क्षेत्रात कार्यरत (आणि कदाचित) त्यामुळे अजूनतरी पाट्या टाकण्याचे काम करावे लागलेले नाही:) (अवांतर - इकडे येणार असलात तर कळवा नक्की भेटू आणि भटकू!)
छंद - भरपूर वाचन, बुध्दिबळ (त्यावरूनच 'चतुरंग' हे टोपणनाव), पेन्सिल रेखाटने करणे, जालावरून भटकंती (आता मि.पा. वर पडीक असणे;)
आवड - नवनवीन पदार्थ भरपूर खाणे, गप्पा, गाणी ऐकणे, किंचित कविता करणे, क्रिकेट पाहणे, सायकलिंग, व्यायाम करणे.
मेव्हण्याने एक दुवा पाठवला आणि मि.पा. वर अपघातानेच आलो आणि त्या दुव्याने तिथलाच झालो! आयुष्यात फारच थोडे अपघात असे हवेहवेसे वाटणारे असतात!!
चतुरंग
19 Feb 2008 - 12:39 pm | धमाल मुलगा
यकाच टायटलाखाली समदी आपापल्या वळखी करुन द्यायला लागले हे झ्याक झाल॑.
थ्या॑कू इनोबा.
अवांतर : 'धमाल मुला ' आमचा 'वाढदिवस ' २९ मार्चला 'बेसनलाडनाच्या' आधी असल्याची नोंद घ्यावी....
फिकीर नॉट भाऊ...रिमाइ॑डर टाकला है ! कधी बसायच॑ बोल :)
डा॑बिस काका नाव बदला...खविस नायतर आग्यावेताळ करा :)
कधी यायचं ठरीवलं तर कळवा, हालिवूडमंदी फिरवूनशान आनीन! :))
खर॑ का काय? तयारीलाच लागतो आता. क॑च्या मसणात भेटायच॑?
वा प्राजुताई, अष्टपैलू का कायस॑ म्हणत्यात ते हाईस की ग.
19 Feb 2008 - 5:07 pm | छोटा डॉन
"फिकीर नॉट भाऊ...रिमाइ॑डर टाकला है ! कधी बसायच॑ बोल :)"
शेहनशाह-ए-हिंदूस्थान ...
आप फर्माईये .... कब 'मेहफिल' सजानेकी ???
आपका वफादार सिपेहसालार 'नाचीज छोटा डॉन'
अवांतर : च्यायला, हा सगळा त्या 'जोधा-अकबर' चा परिणाम. जाता येता आम्हा 'शेहजाद्यांवर ' असली 'शेहनशाही जुबान ' बोलायचा 'जूनून सवार झाला' आहे. त्या नशेतच सकाळी आम्ही आमच्या 'दरबारातील' [ म्हणजे ऑफीस ] मधल्या 'कनीज्'[म्हणजे मैत्रीणी ] ला "मलिका -ए-हिंदूस्थान " असे पुकारल्यावर तिच्या 'दिमागमध्ये वेगळाच जहम ' निर्माण होऊन सकाळपासून ती आमच्याशी 'बात तक' करत नाही .
असो .............
19 Feb 2008 - 6:23 pm | धमाल मुलगा
शेहनशाह-ए-हिंदूस्थान...आम्ही ??? :)) असो. ऐकुन गुदगुल्या झाल्या.
छोटा डॉन-ए-हि॑दोस्ता॑,
मेहफिल-ए-दोस्ताना सजाने की बात जो उठ्ठी ही है, तो हमभी आपको इत्तलाह कर दे॑, के गर हो सके तो हम आपके सालगिराह-ए-मुबारक के हसीन मौकेपे आपकी जागिर ब॑गळूरु मे॑ अपनी छावनी लगाये बैठे हो॑गे.
कोई खुबसुरतसी शाम देख के आपकी सालगिराह की खुशीया॑ जाम पर जाम छलकाके दुगनी-चौगनी करे॑गे.
च्छ्या...हे असल॑ लिहिताना विचार कर करुन मे॑दूला गाठी आल्या....
च्यामारी डॉन्या, येतोय मी तिकड॑ बहुतेक. मग जाऊ "ऑन द रॉक्स" ला...ब्रिगेड रोड वर. चालेल का नाहितर तुमचा आवडता "मैखाना" सा॑गा..तिकडे जाऊ.
आपला
- शेहनशाह-ए-हिंदूस्थान.
ध मा ल.
अवा॑तर : बाकी ते कनीज वगैरे तुमच॑ चालुद्या...बघा एखादी जोधा मिळालीच तर त्यातून. (ह.घ्या.)
19 Feb 2008 - 8:04 pm | छोटा डॉन
शेहनशाह-ए-हिंदूस्थान ,
माशाल्ला मियां आप तो काफी 'बेंगलूरू के बारे मे मालूमात ' रखते हो ....
पर आप शायद इस बात की ईत्तला होगी के 'बेंगरूळू की हिफाजत की कमाँन संभालने वाले वसीला ने' एस "शामके शराब , शबाब, मौसीकी और रक्स" पर सक्त पाबंदी का फर्मान जारी किया है . और ऊस फर्मान पर बडी सक्ती से अंमल किया जा रहा है .
पर अगर आपकी जागिर ब॑गळूरु छावनी का मनसूबा बुलंद है तो हमारी तरफ से आपकी मेहमान नवाजी मे कोई कसून बाकी नही रहेगी ऐसा हम आपको यकीन दिलाते है उसके लिये हमे यहाँके सियासतसे अगर जंग का ऐलान करना पडे तो वो भी उसकी हम काबीलियत रखते है ....
खूब "मेहफिल-ए-दोस्तान" सजायेंगे .........
वैसे 'ब्रिगेड रोड' से बेहतर और कई सारे "मैखाने " इस सियासत मे मौजूद है जहाँपर आपकी शाम जवाँ करने के कई बेहतरीन नुस्के बा-मुक्कम्मल मुय्यस्सीर है .....
नाचीज ...
छोटा डॉन-ए-हि॑दोस्ता॑,
20 Feb 2008 - 12:20 pm | धमाल मुलगा
अगाबाबो....
च्यामारी डॉनभाऊ, ब॑गळूरात हैस का हैद्राबादेत का डायरेक्ट लखनऊ?
एव्हढ॑ उर्दू त्ये पन घाऊक भावात? पार फाफललो ना मी.
असो, मुद्याच॑ तेव्हढ॑ कळल॑ की सध्या थकड॑ शीन लै टैट हाय. मामालोक फार्मात हायेत. असुद्या. आपण सेफ जागा शोधू, नाहीच सापडली तर "सुळे सर्कल" पासच॑ हाटिल वेल्लारा हैच की. आमचा अड्डा थ॑तच असतो ब॑गळूरात आल॑ की.
आपकी मेहमान नवाजी मे कोई कसून बाकी नही रहेगी ऐसा हम आपको यकीन दिलाते है उसके लिये हमे यहाँके सियासतसे अगर जंग का ऐलान करना पडे तो वो भी उसकी हम काबीलियत रखते है ....
खूब "मेहफिल-ए-दोस्तान" सजायेंगे .........
क्या बात है जनाब ! बस, आपने इतना कह दिया, दिल बाग-बाग हो गया. आपका यह दोस्ताना और बडा दिल देख के क्या कहू॑, ऑ॑ख भर आयी !
शुक्रिया जनाब, इस मुफलिस की आपने इतनी इज्जत-अफजाई जो दियी, उस के लिये हम आपके बडेही शुक्रगुजार है!
वैसे 'ब्रिगेड रोड' से बेहतर और कई सारे "मैखाने " इस सियासत मे मौजूद है जहाँपर आपकी शाम जवाँ करने के कई बेहतरीन नुस्के बा-मुक्कम्मल मुय्यस्सीर है
माशाल्लाह ! आप तो हम-शौक निकले. जैसेही हमारा ब॑गलुरू के लिये कूच करने का फर्मान जारी होगा, अपने जहा॑पनाह से कहकर एकाद दिन हम और बढा ले॑गे जिससे के किसी जुम्मेरात को अपनी मेहफिल सजा सके॑.
तबतक,
खुदा हापिसात :)
- फकिर (मस्त)मौला ध मा ल.
19 Feb 2008 - 1:50 pm | बापु देवकर
आपल्याला भेटुन आन्नद झाला...
राज....
19 Feb 2008 - 6:44 pm | विजुभाऊ
आम्हि कोण म्हणुनि काय पूसत दाताड वेगाडुनि....आम्हि असू लाड्के देवाचे दिधले जग आम्हा खेळावया
आम्च फोटो नन्तर टाकु नेट वर.......
आमच्या मुख्य उचापत्या: SAP Consultant...तसा सातारकर......पण सध्या मुम्बैकर .......
इतर उचापत्या : बक्कळ मराठित लिहिणे....नाटक लिहिणे / करणे.. मायन्दळ वाचन करणे.
आन मस्त गाणी ऐकणे.....
तस मराठी खाद्य पदार्थ पण लै आवडतात.
खास सातारि पदार्थ्....म्हाद्या..सातारी मिसळ. पोवइ नाक्यावरची पुरी भाजी.....
नुस्त्या अठवणी ने तोन्डाला पाणी सुटले बघा.........
अजून बाकी वळख तुम्ची सर्वान्चि वळख झाल्यावर मग सान्गेन.......
19 Feb 2008 - 9:42 pm | सभ्य इसम
दरबारातील इतर रत्नांप्रमाणे आम्हांस कोणते नाव सुचले नाही...(इतरांना नावं ठेवणारे स्वतःला नावं ठेवत नसतात---डोक्याला त्रास देऊ नका...कुठल्या चित्रपटातील संवाद नाही आहे...असंच आपला काहीतरी लिहायचं म्हणून...)
..त्यामुळे ते तसेच ठेवले...पण जरा येगळ्या ईश्टाइलमध्ये....नजीकच्या काळात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही...लोकांनी ठेवल्यावर...
असो..
शिक्षणः ईलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवीधारक. --> (फार कष्ट पडले हो .................
ईलेक्ट्रॉनिक्स मराठी मध्ये लिहायला....)
मागील ३ वर्षे माहिती तत्रंज्ञान क्षेत्रात घौड्दौड चालू आहे ....
धमाल मुलाला पाहिले....मिसळ्पावचा आस्वाद घेताना...म्हंट्लं, आपणही चव घ्यावी....
आपणा सर्वांस भेटून (प्रत्यक्ष नव्हे पण, इथल्या गप्पा गोष्टीतून), मुंबईमध्ये मराठी माणूस भेटल्यावर जसा आनंद होतो, तसाच आनंद झाला...
गप्पा-टप्पा चालूच राहतील...ओळख सांगण्यासारखं बरच काही आहे....पण इथेच थांबतो..
आपलाच मराठी इसम-
मोहित्यांचा केतन.
19 Feb 2008 - 10:46 pm | ब्रिटिश टिंग्या
माहिती होती....केतनसुद्धा असतो हे पहिल्यांदाच कळलं. ह. घ्या. ;)
आपला,
(काळेंचा) धनंजय
19 Feb 2008 - 11:32 pm | छोटा डॉन
आम्ही सुध्धा लगेच असा प्रतिसाद टाकणार होतो पण आमचे आजचे ग्रह अनुकूल नसल्याने 'रिस्क' घेतली नाही ........
अवांतर : काय छोटी टिंगी .... लगेच नामपरिवर्तन केलेत ?
कुठल्या गोष्टीपासून प्रेरणा मिळाली ?
20 Feb 2008 - 12:21 am | llपुण्याचे पेशवेll
छोटि टिंगी नावच छान होते. :)
पुण्याचे पेशवे
20 Feb 2008 - 4:08 pm | ब्रिटिश टिंग्या
केलं बारसं परत ;)
आपला,
छोटी टिंगी ;)
20 Feb 2008 - 3:18 am | स्वाती राजेश
नावः स्वाती कवठेकर मुळची कोल्हापूरची.
शिक्षणः बी.एस.सी . एल्.एल्.बी.
३ वर्षे बँकेत नोकरी केली
लग्नानंतर पुण्यात.
नवर्याच्या नोकरीमुळे हॅरो ऑन हिल(ग्रेटर लंडन) इथे वास्तव्य आहे.
आवड: कुकींग (वेगवेगळे पदार्थ करायला, आणि खायला घालायला आवडतात), कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकायला आवडते. घरी डि.व्ही.डी वर सिनेमा पाहायला आवडतो.
आणि वाचन (कोणतेही वर्तमान पत्र पासून आटोबायोग्राफी)
आता सध्या इथे (यु.के) मॅथ्स च्या ट्युशन घेते.
20 Feb 2008 - 11:11 am | सुमीत
सुमीत सुभाष शिंदे, जन्म मुंबईत आणि गेल्या दोन वर्षां पासून नवी मुंबईत स्थायिक.
विद्याभवन, घाटकोपर आणि रायगड सैनिक शाळेत शालेय शिक्षण नंतर रुईयात बारावी .संगणक अभियांत्रिकी मध्ये पदवीधर, माहिती आणि आंतर जाल संरक्षण प्रवीण. वय २७ वर्ष
दुर्ग आणि किल्ल्यांची भटकंती, फोटोग्राफी, कधी कधी लेखन, चित्रे काढने, वाचन,मराठी संकेतस्थळावर ची भटकंती हे माझे छंद.
" alt="" />
20 Feb 2008 - 5:22 pm | सृष्टीलावण्या
चेहर्यावर भाव यंदा कर्तव्य आहे असा आहे.. नक्की काय समजायचे?
22 Feb 2008 - 9:39 am | सुमीत
खरोखर लाजलो :)
20 Feb 2008 - 11:15 am | सुमीत
तुम्ही मला मामलेदाराची मिसळ खिलवणार होतात, कधी यायचे ठाण्याला ते सांगा लवकर.
20 Feb 2008 - 12:31 pm | विसोबा खेचर
कधी येताय बोला! उद्या येताय?
वाट पाहतो..
यायच्या आधी कृपया ९८२०४९४७२० या क्रमांकावर फोन केलात तर बरं पडेल..
तात्या.
20 Feb 2008 - 5:18 pm | सृष्टीलावण्या
तात्या झोल माणूस दिसताहेत ..
एकाच चलतध्वनि मध्ये दोनदा ४२०..
ते पण उलट सुलट...
काही खरं नाही..
मिपाचे..
20 Feb 2008 - 3:29 pm | तात्या विन्चू
नमस्कार मिसल पाव् करानो,
मी (उगाच आम्ही म्हटल कि १० वर्षानी वय वाढल्यासारखा वाटत, म्हणून एकारर्थीच सम्बोधन बर वाटत...... ) परेश (ऊर्फ: तात्या विन्चू). मुम्बईत रहात असुन एका MASTEK नावच्या सन्गणक आज्ञाप्रणाली कम्पनी मध्ये कार्यरत आहे. VESIT (विवेकानन्द, चेम्बुर) मधून B.E. केलेला आहे. हे सर्व झाल Official Introduction. आता बाकी गोष्टीकडे वळुयात.
मला आवडणारणार्या गोष्टी : सन्गीत, नविन मराठी गाणी (विशेषत: सन्दीप खरे, सलिल कुल़कर्णी) , ट्रेकीन्ग, चित्रकला व छायाचित्रकला इत्यादी इत्यादी . अगदी महाविद्यालयीन काळापासून B.B.C. (Bank Benchers Committee) चा निष्ठावान सदस्य. बाकी ओळख हळु हळू होतच राहिल.....
आपला,
तात्या विन्चू
20 Feb 2008 - 4:13 pm | सुमीत
मी २००४ साली मॅस्टेक मधून डेलॉईट ला गेलो, आपण महापे ला असता की सीप्झ मध्ये?
ट्रेकींगचा कार्यक्रम ठरविलात तर मला आवर्जून सांगा.
20 Feb 2008 - 4:20 pm | तात्या विन्चू
सुमीत ,
मी Presales Department मध्ये असल्याने सीप्झ मध्ये असतो. SDF 6 मध्ये.
आपण trekking साठी एक वेगळा चर्चा धागा मिपा वर चालू करुया. तिथेच सर्व Trekkers ना चर्चा करता येइल.
आपला,
ओम फट स्वाहा...
तात्या विन्चू
22 Feb 2008 - 11:13 am | लंबूटांग
बरेच दिवसांपासून नुसतेच येऊन प्रकाशित साहित्य वाचून जात होतो. सदस्य व्हायचा आळस आला होता. इस्ट कोस्ट कर बरेच जण दिसले आणि आज आळस झटकून करुनच टाकली नोंदणी.
मी चैतन्य काळे. सध्या बॉस्टन ला Masters in Computer Science करतो आहे University of Massachusetts Boston मधून.
लयी ब्येस हाये बाकी मि.पा.
3 Mar 2008 - 3:09 pm | विजुभाऊ
धमाल्या
तू सध्या मि पा नीट वाचत नही असे दिसते....मी एकदा माझा परिचय दिलेला आहे( परी स्वतःचा परिचय कसा करुन देत असेल?)
तरी पण भौ तुझ्या खातर परत एक डाव बोलतो....
मी एक आय टी सल्लागार्.(हो सल्ला देउन गार करणारेच) एस ए पी मधे सल्लागार् आहे.
पंचविशी कधीच सरली पण अजून मानसीक दॄष्ट्या अजून तिथेच आहे....तसेच उपद्व्याप्...तसेच वागणे....
आपली दोस्त लोकं पण तसलीच......
मी ऑफीस संपले की मग्..नाटके लिही.....पुस्तक लिही.......गप्पा टप्पा हाण्...बासरी वाजव्....पेटी वाजव ...
एकपात्रि कर कार्यक्रम कर असले उद्योग करतो...
सातारा......अजून डोक्यतुन काही जात नाही........
बरेच मुम्बैकर मला आडनाव सांगेपर्यंत उगाचच चित्पावन समजतात( मराठी भाषे मुळे....वागण्यामुळे नव्हे.... शाह असलो तरी खरा मराठी आहे.)
ही धमाल मी मस्त एन्जॉय करतो
आपला....मस्त सातारी मिसळ आणि खास सातारि पदार्थ्....म्हाद्या....... पोवइ नाक्यावरची पुरी भाजी.....ओरपणारा
आनंदी.......विजुभाऊ
13 Mar 2008 - 6:07 pm | प्रशांतकवळे
नमस्कार बन्धु भगिनींनो,
मी प्रशांत कवळे, अलिबाग मधल्या एका छोट्याश्या गावातला.. सासवने म्हणुन. पेशाने ERP (SAP) CONSULTANT. जन्मतारीख १४ फेब्रुवारी . शिक्षण अलिबागला आणि पुण्यात झाले.
आत्ता पर्यन्त ४ नोकर्या झाल्या, पाचवी चालू आहे.
प्रोजेक्ट निमित्त सध्या "अरबांच्या देशात" आहे, अजुन १ वर्ष तरी रहावे लागेल.
आवड: जुनी गाणी ऐकणे, मैदानी खेळ खेळणे, तळ्याच्या काठावर बसून गळाने मासे पकडणे आणि सासवन्याच्या समुद्रावर भटकणे.
प्रोजेक्टनिमित्त भारतभ्रमण केले ( सौजन्य : ओ.एन्.जी.सी. व ऑइल इण्डीया ), आवडलेला भारतातला भाग - आसाम ( १ वर्ष होतो). पुन्हा मोका मिळाला तर तिथे जायला आवडेल.
कोणी मि.पा.कर जर सौदी मध्ये असतील तर मला कळवा. माझा भ्रमणध्वनी +९६ ६५३१८२६८९१
आपला..
मि.पा. माध्यमातून भारतात असलेला,
प्रशांत.
13 Mar 2008 - 7:46 pm | मीनल
मी बोरीवलीच्या गो-यांची एकुलती एक मीनल .
आता मीनल संजय गद्रे.त्याला ही १८ वर्ष झाली आहेत.
एक मुलगा ११वीत शिकतो आहे.संजय आय टीत आहे.
मी Economics मधे Mumbai Univercity मधून MA केले.
नंतर B.Ed ही केले.
प्राध्यापिका म्हणून मुंबईत १३ वर्ष काम केले.
नंतर ५ वर्ष बीजिंग ,चीन येथे राहिले ,तिथे ही टिचींगचे काम केले.
ई सकाळ ,लोकसत्ता ,म.टा.मधे अनेक लेख लिहिले.
चीन जाणला ,अनुभवला.
आता अमेरिकेत आहे.
लवकरच इथे काम किंवा शिक्षण सुरू करेन.
लेखन ,वाचन,संगित्,पेंटिंग, कलेची आवड आहे.भटकायला आवडतं.
अमेरिका , इंग्लंड,स्वित्झर्लंड्,जर्मनी ,सिंगापूर ,बेंकॉक्,कंबोडिया ,चीन,जपान्,कोरिया,सिंगापूर,मलेशिया असे देश हिंडले.
भारत ही पाहून झाला आहे बराचसा.
सर्वात आशिया खंड मनाला भावला.
खूप खूप मैत्रिणी आहेत.जुने जुने संबंध जपून ठेवले आहेत.
मि.पा वर नवीन ओळखी होत आहेत.
मी शेगावच्या श्री गजानन महाराजांची भक्त आहे.
आत एवढिच ओळख पुरेशी आहे.
14 Mar 2008 - 12:09 am | उदय
नमस्कार,
मी उदय, सध्या अमेरिकेत राहतो. Codecutter म्हणून नोकरीधंधा करतो.
14 Mar 2008 - 10:11 am | यन्ना _रास्कला
कोऽहम्....
हे सध्या मिसळपावावर संस्कृतचे लोणी चढलेले आहे म्हणून.
मी दिलीप खांडेकर, व्यवसायाने अभियंता आणि इंग्रजी शिक्षक सुद्धा. वय ५८. माझा आणि मराठीत पहिलाच "इंग्रजी-मराठी क्रियापद कोश" (English to Marathi Verb Dictionary) प्रसिद्ध झाला आहे.
मी ब्रह्मचारी आहे आणि स्वत:चे घर नाही त्यामुळे वेगवेगळ्या lodge मध्ये माझा मुक्काम असतो. नक्की पत्ता सांगता येणार नाही.
Computer चे फारसे ज्ञान नाही. हे सर्व भाचीच्या सहाय्याने लिहित आहे.
14 Mar 2008 - 2:19 pm | राजे (not verified)
मी.. राज जैन..... मुळ कोल्हापुरचा, शिक्षण कोल्हापुर नुतन मराठी शाळेत, १०वी नापास.... ;( घरातून पळून गेलो होतो वयाच्या १६ व्या वर्षीच..... :))) बरोबर १४ वर्षानी घरच्यांना दर्शन दिले होते (तो पर्यंत घरी फोटोवर हार चढला होता.... )
प्रचंड प्रवास आवडतो.. त्यामुळे देशातील एक ही राज्य असे नाही जेथे आम्ही पाय ठेवला नाही..... छोटी मोठी काम करता करता संगणक दुरुस्त करण्याचे शि़क्षण मिळाले व त्याचाच उपयोग करुन मोठ मोठ्या कंपन्यामध्ये काही वर्ष काम केले व जमा पुंजी गोळा करुन स्वतःची कंपनी चालू केली तीन वर्षापुर्वी ... देवाच्या दयेने संध्या कंपनी प्रा.ली. झाली व २५ जणानां रोजगार देत आहे.. सध्या देशाच्या राजधानी मध्ये मुक्कामी असतो पण काही कार्यानिमीत्य विदश भ्रमण करत आहे, पुढील महीन्यामध्ये वापसी. जरा नेट वापरणे येथे अवघड आहे त्यामुळे फक्त वाचन चालू आहे.... (तात्रंक अडचण नसून व्यवहारीक अडचण आहे ;)))
राजे
14 Mar 2008 - 2:41 pm | विवेकवि
मी विवेक विद्वा॑स.. मुळचा केळशीचा पण आता कल्याण देशी राहत होतो..
आता पुण्यात असतो...
सध्या तेलाच्या (Indian Oil Corpoation Ltd)दुकानात कामाला आहे .
सध्या इतका परीचय पुरेसा आहे..
आपला
विवेक विद्वा॑स.
14 Mar 2008 - 3:20 pm | स्वयम्भू (not verified)
मी जन्मापासून मुंबइकर, अट्टल मुंबइकर.
सुक्श्म बालपण गिरगावात नी त्या नन्तर १९८४ पासून मु. पो. बोरिवली. गिरगावातील आर्यन एज्युकेशन ही पहिली शाळा. त्या नन्तर बोरिवली मधली विद्या विकास सभा. ह्यातल्या विद्या च्या इन्ग्रजी स्पेल्लिन्ग चा उच्चार आमचे काही मित्र विड्या असा करायचे (मी त्यांचं बोलणं मागाहून मनावर घेतलं)
वयाची २८ वर्षे मुंबइत घालवल्यावर, सद्ध्या आत बंगळूर ला आलोय. पोटा पाण्या साठी एका जाहिरात कंपनी मधे जाहिरात लेखक म्हणून पाट्या टाकतो.
आपल्या पैकी कुणी बंगळूर मधे असाल तर अवश्य सम्पर्क सधावा. मि. पा. ची एक भेट इथेही घडवू. कालच आपला छोटा डॉन ह्याच्याशी बोलणं झालं. ह्या नंबर वर माझ्याशी संपर्क साधू शकाल ९८४५६५५५५८
आपला,
स्वयंभू
14 Mar 2008 - 3:29 pm | बन्ड्या
मी अभिजीत, मुळचा कोल्हपुरचा. सद्या पुण्यात असतो . घरात प्रेमाने मला बन्ड्या म्हनतात, इथे आल्यावर कसे घरी आल्यासारखे वाटते म्हणून हे घरचेच नाव निवडले . इथे पुण्यात डालड्याच्या (सुर्यफुल) कंपनीत कामाला आहे. चाणाक्ष लोकांनी डालड्याची कंपनी ओळखली असेलच......
कोल्हापुरचा असल्याने मिसळ, मिर्ची,मटण यांचा by default चाहता आहेच. फुटबॉल ,कुस्ती यान्चि हि आवड आहे. खाणे, गाणे , फिरणे हे आणखी काही आवडते उद्योग.... आमच्या कलांपेक्ष
अवकलाचं जास्त आहेत त्यामुळे इथे त्या सांगत नाही.
................... आपला बन्ड्या
1 Jul 2008 - 3:56 pm | विजुभाऊ
इथे बरेच नवे सदस्य आहेत....
त्यानी या धाग्यावर परिचय द्यावा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
1 Jul 2008 - 4:35 pm | ऋचा
मी क्षितिजा.
मुळची खालापूर.
शिक्षण खोपोली.
आता पुण्यात नोकरी करत आहे. (software eng.) म्हणुन.
वय वर्ष २४ पुर्ण.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
1 Jul 2008 - 6:47 pm | वैशाली हसमनीस
मी, वैशाली हसमनीस.ठाण्याच्या न्यू गर्ल्स स्कूल मध्ये३७ वर्षे शिक्षक म्हणून सेवारत होते.२वर्षापूर्वी सेवामुक्ति.मूळची राहणार डोंबिवली पण सध्या वास्तव्य मलेशिया येथे.मुलगा व सून येथील मेडिकल महाविद्यालयात अधिव्याख्याते म्हसणून सेवारत.गेले बरेच दिवस इंग्लिश व संस्क्रुत यांचे अध्यापन,त्यामुळे त्या विषयांची जास्त गोडी.वाचन,लेखन,कविता करणे ही आवड.व्यवसायामुळे अनेक शैक्षणिक ,सामाजिक संस्थाशी बांधिलकी.मि.पा.वर नुकतीच ओळख.तात्या,आपला वर्गमित्र मुकुल पालवणकर माझा भाचा.तो हल्ली आपल्याच गावात राहतो,हीच ओळख पुरे.
1 Jul 2008 - 9:39 pm | सुचेल तसं
नमस्कार,
मी ह्रषिकेश थिटे. मुळ गावः अहमदनगर.
(चतुरंग=> मी पण भा.फि.हा मधेच होतो. )
सध्या पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो.
http://sucheltas.blogspot.com
2 Jul 2008 - 7:17 am | वैशाली हसमनीस
,मी वैशाली हसमनीस,मि.पा.वर नव्यानेच दाखल.राहणार मूळची डोंबिवलीची पण सध्या वास्तव्य मलेशिया येथे.ठाण्याच्या न्यू गर्ल्स स्कूलमध्ये ३७ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत होते.२ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त.संस्कृत व इंग्लिश या विषयात एम्.ए.(१९७० साली ) तेव्हांपासून १२वी पर्यंत ह्याच विषयांचे अध्यापन.वाचन,लेखन,कविता करणे ही आवड.नाटक हा प्राण्.निवृत्तीमुळे मोकळा वेळ भरपूर.त्यामुळे हे सर्व काही करण्यास वेळ मिळेल ही आशा.मुलगा व सून येथील वैद्यकिय विद्यापीठात प्राध्यापक.त्यांच्याबरोबर मलेशियात दाखल.तात्या,आपला वर्गमित्र मुकुल पालवणकर आठ्वतो का? तो माझा भाचा.एवढी ओळख पुरे.मि.पा.ला कोणतीही मदत करण्यास तयार आहे.
2 Jul 2008 - 8:10 am | अनिल हटेला
राम राम मन्डळी !!!
अनिल हुले.....
पिम्परी पुने...जन्मठिकाण.......
सध्या (निन्ग्बो) चायना मध्ये...
क्यु सी मॅनेजर म्हणुन पाट्या टाकायच काम करतोये....
बाकी ब-याच आवडी -निवडी आहेत...
आणी सध्या मिपा वर पडीक राहणे ,हा आवडता छन्द.......
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
2 Jul 2008 - 10:03 am | वैशाली हसमनीस
मी,वैशाली हसमनीस,मि.पा. वर नव्याने दाखल.ठाणे येथील न्यू गर्ल्स स्कूल मध्ये ३८ वर्षे शिक्षक म्हणून सेवारत होते.२००७ मध्ये निवृत्त.मूळ राहणारी डोंबिवलीची पण सध्या वास्तव्य मलेशिया येथे.संस्कृत व इंग्लिश हे विषय घेउन एम्.ए.बी,एड.(१९७० साली) तेव्हापासून ह्याच विषयांचे अध्यापन.वाचन,लेखन,कविता करणे ही आवड.मुलगा व सून हे दोघेही येथील वैद्यकीय विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत,त्यामुळे मलेशियात आले.येथील लोकजीवनाचा अभ्यास करण्याचा मानस.सध्या भरपूर मोकळा वेळ त्यामुळे मि.पा.ला कोणतीही मदत करण्यास तयार.तात्या,आपला शाळासोबती मुकुल पालवणकर आठवतो कां? तो माझा भाचा.एवढी ओळख पुरे.
2 Jul 2008 - 12:12 pm | वैशाली हसमनीस
:H मी,वैशाली हसमनीस,मि.पा.वर नव्यानेच दाखल.मूळ राहणारी डोंबिवलीची पण सध्या वास्तव्य मलेशिया येथे.ठाणे येथील न्यू गर्ल्स स्कूलमध्ये ३८ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करून २००७ मध्ये सेवानिवृत्त.संस्कृत व इंग्लिश हे विषय घेऊन १९७० मध्ये एम्.ए.बी.एड. तेव्हांपासून ह्याच विषयांचे अध्यापन.क.डों.म.पा.च्या शिक्षण मंडळावर युती सरकारच्या काळात नियुक्ति,५वर्षे ते काम केले.वाचन,लेखन,कविता करणे ही आवड.सध्या भरपूर मोकळा वेळ.त्यामुळे आवड जोपासता येइल असे वाटते.मुलगा व सून येथील वैद्यकिय विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत.त्यांच्याबरोबर मलेशियात दाखल.मि.पा,ला मदत करण्याची तयारी.तात्या,आपला शाळासोबती मुकुल पालवणकर आठवतो कां? तो माझा भाचा.एवढी ओळख पुरे झाली की!
2 Jul 2008 - 3:06 pm | अन्जलि
मि अन्जलि रहानार भान्डूप एका प्रसि ध्द construction company मधे Leagal Manager म्हनुन काम करते. मिपा वर येण खुप आवड्ते.
2 Jul 2008 - 7:12 pm | शैलेन्द्र
मी शैलेंद्र, डोंबिवलीचा...
शिक्षण- जैव्-तंत्रज्ञानात पद्व्युत्तर पदवी..
एका बहुराष्ट्रिय संस्थेत पणन आधिकारी.
पण खरी ओढ ईतिहासाची....
भटकायला, गाडी चालवायला, डोंगर तुडवायला आवड्तं.
2 Jul 2008 - 10:42 pm | सरपंच
या लेखाला प्रतिसादांची संख्या खुप झालीये कृपया नवीन चर्चा सुरू करावी.
धन्यवाद.