गाभा:
नमस्कार!
मी "अतिउत्साही" ! नवीन सदस्य !
बर्याच दिवसांपासून मि.पा. वाचत होतो. म्हटलं काहीतरी लिहावं.
मी बरंच काही लिहीत असतो. ते लिखाण आंतरजालावर टाकण्याची ही माझी पहिलीच वेळ.
बरंच काही मनात आहे, ते लिहून काढायचं आहे.
तर हा श्रीगणेशा!
प्रतिक्रिया
16 Feb 2008 - 8:06 pm | ऋषिकेश
स्वागत.. तुमचा उत्साह टिको आणि आम्हाला छान लेखन वाचायला मिळो हि सदिच्छा!
-ऋषिकेश
16 Feb 2008 - 8:56 pm | स्वाती राजेश
मि.पा. वर स्वागत.
नावाप्रमाणे उत्साहाने लेखन करा.
वाट पाहात आहे.
तुम्ही कोणत्या प्रकारचे लेखन करता? ते सांगितलेच नाही.:)
16 Feb 2008 - 11:44 pm | llपुण्याचे पेशवेll
आलाच आहात तर 'ओळखपरेड'वर पण 'हजेरी' देऊन जा. स्वागतच आहे आपले.
पुण्याचे पेशवे
17 Feb 2008 - 10:29 am | विसोबा खेचर
मी बरंच काही लिहीत असतो. ते लिखाण आंतरजालावर टाकण्याची ही माझी पहिलीच वेळ.
बरंच काही मनात आहे, ते लिहून काढायचं आहे.
तर हा श्रीगणेशा!
आपण लवकरच मिपावर आपल्या लेखनाचा श्रीगणेशा करावा ही विनंती.. आम्ही वाचायला उत्सुक आहोत..
मिपावर मनापासून स्वागत..
तात्या.
17 Feb 2008 - 2:42 pm | सुधीर कांदळकर
ओळखपरेडवर सविस्तर ओळख टाका.
18 Feb 2008 - 10:48 am | धमाल मुलगा
वा, नाव तर लय भारी आहे.
मिपावर आपले स्वागत.
आपण बर॑च काही लिहिता म्हणजे ललित, कथा, कविता, चारोळ्या, इ.इ. ( हा प्रश्न तसा उगाच॑च्..अगाऊपणा दुसर॑ काय? आम्हाला एक ओळही धड लिहिण॑ जमत नाही, पण फुकटच्या चा॑भारचौकश्या करायला मात्र सगळ्यात पुढे)
असो, उत्साहीराव, बर॑च काही लिहिता म्हणताय, मग मिपावर पण होऊन जाऊद्या की एक "ज॑क्शन लेखान"
आपला,
-ध मा ल.