दी अनटोल्ड, अनसीन ऑफ मुंबई टेरर ऍटॅक...

कळस's picture
कळस in काथ्याकूट
4 Jul 2009 - 9:15 pm
गाभा: 

बाप रे !! धक्कादायक ...हॉरीबल ...लिहायला शब्द नाहीत ...

हे सर्व वीडियो खूपच विचलित करणारे आहेत. पाहिल्यानंतर प्रचंड चीड,संताप येतो . अस्वस्थ होतो. त्रास होतो. सुन्न होतो. हे सर्व लक्षात घेऊन वीडियो पाहायचे की नाही ते ज्याचे त्याने ठरवावे .

part 1: http://www.youtube.com/watch?v=edsRBijAx_U
part 2: http://www.youtube.com/watch?v=SXq8HpH_0Kw
part 3: http://www.youtube.com/watch?v=ujjuuqQF3Zk
part 4: http://www.youtube.com/watch?v=exWd_dBLU1s
part 5: http://www.youtube.com/watch?v=R3bBk8Hc2UA

हे वीडियो पाहिल्यानंतर मलाही खूप त्रास झाला. बराच वेळ काही सुचतच नव्हते.असे समजले की इंग्लेंड मध्ये चॅनेल 4 ने ही डॉक्युमेंट्री टेलिकास्ट केली आहे. मिपाचे संपादक / मिपा वरील सदस्य यांनी धागा ठेवायचा की नाही ते ठरवावे.हे खरे आहे की जुन्या खपल्या निघाल्यामुळे भयंकर त्रास होतोय. त्याबद्दल मी व्यक्तीशा: सर्वांची माफी मागतो.

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

5 Jul 2009 - 12:53 am | श्रावण मोडक

देखील पाहणं शक्य झालं नाही. त्यामुळं आत्ता प्रतिक्रिया देत नाही. पण बहुदा हे तपासादरम्यानचे असावे. त्यातही पुन्हा जेन्युईन की नाही हा प्रश्न आहेच. पण पाहिल्या/ऐकल्यानंतरच बोलणं उत्तम.

टारझन's picture

5 Jul 2009 - 11:53 am | टारझन

संपादकांना/लेखकाला एक णम्र विणंती आहे !! हा धागा डिलीट करा !!! मेलेले मुडदे उकरण्यात काहीही हाशिल नाही ,
जे काही झाले ते सर्वांना माहीत आहे , आणि धागा काढणार्‍याने नकळत सर्वांच्या जखमेवरची धपली काढली आहे !
असो , हे वयक्तिक मत आहे. पुन्हा व्हिडिओ पाहून त्रास होतोय .

- टारझन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2009 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवट्ची व्हिडियो क्लीप मधे, लहानग्या मुलाचे अब्बू अम्मी मारल्या गेले.
त्याचे बोलणे ऐकल्यावर डोळ्याच्या कडा ओलावतात.. अतिरेक्यांचे संवाद, कसाबचा कबुलीजवाब हे सर्वच चीड आणणारे आहे,असे असले तरी वाचकांना असे धागे / दुवे उपलब्ध असले पाहिजे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

5 Jul 2009 - 7:43 pm | मदनबाण

असेच म्हणतो.

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

नंदन's picture

5 Jul 2009 - 1:13 am | नंदन

भाग पाहिले. काय प्रतिक्रिया द्यायची ते सुचत नाही.

हरकाम्या's picture

5 Jul 2009 - 1:34 am | हरकाम्या

पहिला भाग थोडाच पाहिला डोके फिरण्याची पाळी आली.त्या कसाबच्या ***** मध्ये बाँब भरुन साल्याला पाकिस्तानमध्ये नेउन
टाकले पाहिजे.
त्या कसाबला देण्यासाठि आता शिव्या सुचत नाहियेत.

विश्वजीत's picture

5 Jul 2009 - 2:05 am | विश्वजीत

हाय कमांड आणि अतिरेकी यांच्यामधले संभाषण पराकोटीचे संतापजनक आहे. अशिक्षित रेम्याडोक्यांच्या हाती कोलीत मिळाले तर ते जगाला आग लावतील.

पक्या's picture

5 Jul 2009 - 2:16 am | पक्या

खरच हॉरीबल.

Nile's picture

5 Jul 2009 - 3:30 am | Nile

भयानक आहे!

प्रचंड संताप होतोय, प्रशासन योग्य ती खबरदारी घेतंय अन कार्यवाही करेल एवढीच अपेक्षा आहे.

हे सत्य कोणी तरी त्या कसाबच्या वकीलां पर्यत पोचवा, म्हणजे तरी त्यांचे डोळे उघडतील, सरकारला , देशाला मदत करण्याची त्यांना बुध्दी होइल. ते विसरले आहेत, की कसाब ची मदत करून ते देशाचे नुकसान करत आहेत, स्वतःचे कर्तव्य विसरले आहेत, त्यांना जागे करा .

आनंदयात्री's picture

5 Jul 2009 - 11:11 am | आनंदयात्री

युट्युब दिसत नाही .. कोणी संक्षिप्तपणे सांगेल काय ?

नीलकांत's picture

5 Jul 2009 - 4:12 pm | नीलकांत

या व्हिडीओज मध्ये त्या दिवशी कसाब व त्याच्या गॅंगने मुंबईत जे थैमान घातलं आहे त्याची माहिती दिलेली आहे. माहिती तर आपल्याला वाचून आहेच की, मात्र यात त्यात्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज दाखवलेले आहेत ते कदाचीत भारतात दाखवल्या गेले नसावे. (मी टिव्ही बघत नाही म्हणून नक्की सांगू शकत नाही.)

या चित्रफितीत ३ महत्वाच्या गोष्टी आहेत. ही सिएसटी , ओबेरॉय आणि ताज मधील खरीखूरी दृष्ये. दुसरं महत्वाचं म्हणजे कसाब आणि त्याच्या साथीदारांचं पाकमधील आपल्या म्होरक्यासोबतचं फोन वरील संभाषण. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कसाबचा पकडल्यावरचा कबुली जवाब त्याच्याच तोंडून पहायला मिळतो.

एकंदरीत डॉक्युमेंट्री परिणाम कारक आहे. सिएसटी वरील पोलीस शिपायाने एकट्याने दिलेली झुंज तर खुपच थरारक आहे. तसेच तेथे असलेल्या लोकांचे अनुभव, नरीमन भवनातील जोडप्यांच्या हत्येचा प्रकार तर हादरवून टाकतो. एखाद्याला विजेचे बटन दाबून पंखा सुरू करायला सांगावा एवढ्या सहज ते कुणालाही मारण्याबाबत बोलत होते.

अभिज्ञ म्हणतात ते खरंच आहे. ही खपली काढलीच पाहीजे.

-नीलकांत

आनंदयात्री's picture

5 Jul 2009 - 4:47 pm | आनंदयात्री

बापरे !!
भयंकरच दिसतायेत एकंदरीत. हा हल्ला होउन जितके दिवस झाले आहेत तितकेच दिवस वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला होउन जेव्हा झाले होते तेव्हा अफगाणिस्थानचे काय झाले होते ?

राखरांगोळी !!

आपल्याकडे बहुदा एखादी मैत्री एक्स्प्रेस्स चालु करायचा किंवा वाघा बॉर्डरवर मिठाई वाटायच्या कार्यक्रमाचे प्लॅनिंग चालु असावे ... अहो इथे मुळात भारतिय असल्याचा अभिमानच किती लोकांना आहे ते आपण राजकिय इच्छाशक्ती नाही म्हणुन बोटे मोडावेत ?
आडातच नाही ते पोहर्‍यात कुठुन येणार ? सहिष्णुततेने आमची संस्कृती जपली , मुल्ये जपली पण आमचा कणा ??? तो कुठेय ? तो तर पार मोडलाय .. मान पार झुकलीये ..

आमच्या सोश्यालिष्ट नेत्यांनी कुठेही पाकिस्तान्यांना चेचा म्हणुन आंदोलन केले का ? नाही केले ?? हो ते तर पिंक चड्डी आंदोलनात व्यग्र होते .. समलिंगी संभोगाला मान्यता मिलवुन द्यायची होती .. दहशतवादाविरुद्ध काही मागण्या काय ?? त्या कधीही करता येतील .. हल्ला होईलच पुन्हा ..

-
(खिन्न)

आनंदयात्री

नितिन थत्ते's picture

5 Jul 2009 - 7:38 pm | नितिन थत्ते

चित्रफीती परिणामकारक आहेत यात वाद नाही.

पण प्रतिसादातील अफगाणिस्तानाशी तुलना अयोग्य वाटली. (विशेषतः त्या तथाकथित कठोर कारवाईनंतरही दहशतवादाचा खातमा होण्याच्या दृष्टीने काही प्रगती झालेली नाही ही वस्तुस्थिती ज्ञात असताना).

पुढची पिंकचड्डी वगैरे भाष्येही अनावश्यक.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

नितिन थत्ते's picture

6 Jul 2009 - 12:09 pm | नितिन थत्ते

अनेक भारतीयांची सामान्य आणि आवडती मते पुढील प्रमाणे
१. अतिरेकी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याने पाकिस्तानवर हल्ला करून अतिरेकी तळ उध्वस्त केले पाहिजेत. जमल्यास पाकिस्तान पूर्ण नष्ट करायला पाहिजे. (इस्रायल पहा कसे करते. आपण येथे अमेरिकेचे उदाहरण दिले आहे)
२. भारतीय लष्कराला हे अगदी सहज शक्य आहे.
३. भारतातल्या मुसलमानांच्या मतांच्या भीतीने आपले सरकार असे करत नाही.

पहिल्या मतानुसार इस्रायल अशा प्रकारचे प्रत्युत्तर देत असते. परंतु त्याने इस्रायलवरील दहशतवादी हल्ले थांबले आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. मग हल्ला करून फक्त काहीतरी केल्याचे स्वतःला समाधान एवढाच त्या हल्ल्यांचा उपयोग होईल.

दुसर्‍या मताबद्दल मला स्वतःला शंका आहे. त्या शंकेची कारणे मी पूर्वीही मांडली आहेत. मुख्य कारण कारगिलच्या वेळी घुसखोरांना घालवायला लागलेला वेळ आणि संसद हल्ल्याच्यावेळी राष्ट्रवादी सरकार असूनही, सीमेवर सैन्य नेऊनही आणि आर या पार लडाईची घोषणाकरूनही प्रत्यक्ष युद्ध करण्याची कृती केली गेली नाही. त्या सरकारला षंढांचे सरकार असे न म्हणता त्यांना वस्तुस्थितीची जाणीव होती असे म्हणायला मी तयार आहे.

तेव्हाच्या सरकारच्या कृतीमुळे तिसरे मतही योग्य नाही असे माझे मत आहे.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

आनंदयात्री's picture

6 Jul 2009 - 12:20 pm | आनंदयात्री

>>मग हल्ला करून फक्त काहीतरी केल्याचे स्वतःला समाधान एवढाच त्या हल्ल्यांचा उपयोग होईल.

हा तुमचा कयास आहे.

>>तेव्हाच्या सरकारच्या कृतीमुळे तिसरे मतही योग्य नाही असे माझे मत आहे.

स्वतःच्या (अगाध ?) ज्ञानावर विश्वास ठेउन मते बनवुन दुसर्‍यांच्या मतांना बालिश लेखणे हा मुर्खपणाच आहे. सर्वसामान्यपणे सगळ्यांची मते तशी असतात म्हणून आपले मत हट्टाने वेगळे बनवणे हाही मुर्खपणाच !!

नितिन थत्ते's picture

6 Jul 2009 - 12:34 pm | नितिन थत्ते

माझे भारतीय सैन्याविषयीचे मत १९९५ पर्यंत सामान्यच होते. ते हळूहळू बदलले. (काश्मीर-नेहरू-युनो या विषयावर वाचन केल्यावर ते बदलले. कारगिल घटनेनंतर ते तात्पुरते दृढ झाले)

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

माझे अगाध(?) ज्ञान चुकीचे आहे हे दाखवून द्या.

>>सर्वसामान्यपणे सगळ्यांची मते तशी असतात म्हणून आपले मत हट्टाने वेगळे बनवणे हाही मुर्खपणाच !!

मला प्रत्येक मतावर विचार करण्याची सवय आहे. माझे मत सध्याचे आहे. पुढे नवीन माहिती मिळाली तर ते बदलेलही.

हुप्प्या's picture

6 Jul 2009 - 12:27 pm | हुप्प्या

इस्रायलवरील हल्ले थांबले नसले तरी त्या देशाचा आकार, त्या देशाचे शेजारी आणि त्यांचे इस्रायलबद्दलचे विचार लक्षात घेतले तर तो देश अस्तित्त्वात आहे, तिथे अनेक भागात सुबत्ता आहे. लोक तंत्रज्ञान, शेती व अन्य क्षेत्रात प्रगती करु शकत आहेत हे सगळी एक भक्कम मिळकत आहे. इस्रायल कठोर नसता तर त्याची केव्हाच चटणी झाली असती. इजिप्त, जॉर्डन व अन्य अरबी राष्ट्रांनी इस्रायलचा खातमा करायचे अनेक मनसुबे रचले, युद्धे घडवून आणली पण त्याना माघार घ्यावी लागली. त्यामुळे इस्रायलचे जशास तसे धोरण खरे तर यशस्वी ठरले आहे. १९७२ च्या म्युनिच ऑलिम्पिकला जे झाले त्याला चोख उत्तर दिल्यामुळे पुन्हा तसे प्रकरण घडलेले नाही.
आपल्याला २००० कंदाहार अपहरणाची पुनरावृत्ती होणार नाही असे मी तरी म्हणणार नाही.
भाजपातील वाजपेयी व इतर लोकांचा एक वर्ग मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात आघाडीवर आहे. आपण (धर्मांध) मुस्लिमांचे तळवे कॉंग्रेसपेक्षा सफाईने चाटू शकतो असे त्यांना दाखवायचे असते. उदा. वाजपेयीने हाज यात्रेची सबसिडी भरघोस रकमेने वाढवली, १९९८-९९ च्या सुमारास रमजानचा पाक मौका बघून काश्मीरी अतिरेक्यांशी एकतर्फी शस्त्रसंधी घोषित केली, लाहोर बस यात्रा वगैरे. त्यामुळे मुस्लिमांच्या रोषाला घाबरून राज्यकर्ते कठोर पावले उचलायला घाबरतात असे मानायला जागा आहे. त्यात आत्ताची आघाडीही येते आणि हिंदुत्ववादाची खोटी झूल पांघरलेले भाजपही येतो.

नीलकांत's picture

6 Jul 2009 - 1:36 pm | नीलकांत

>>अनेक भारतीयांची सामान्य आणि आवडती मते पुढील प्रमाणे-
-- यात मी सुध्दा येतो...

१. अतिरेकी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याने पाकिस्तानवर हल्ला करून अतिरेकी तळ उध्वस्त केले पाहिजेत. जमल्यास पाकिस्तान पूर्ण नष्ट करायला पाहिजे. (इस्रायल पहा कसे करते. आपण येथे अमेरिकेचे उदाहरण दिले आहे)

-- माझ्या देशावर कुणी हल्ला करतंय तर मी त्याचे उत्तर यथाशक्ती दिलेच पाहीजे असं माझं स्वाभाविक आणि तेवढंच नैसर्गीक मत आहे. एखादी चुकीची गोष्ट घडत असली तर त्याचे मूळ काय हे शोधून काढणे हे सुध्दा सहाजीक आहे आणि त्यामूळ ते मूळ जर पाकिस्तानात आहे हे लक्षात येत असेल तर त्यावर उपाय केला पाहिजे असं माझ्या सारख्या सामान्य भारतीयाचं आग्रहाचं मत आहे.

आता व्यवहार्य पातळीवर ते कितपत शक्य आहे ते बघण्यासाठी आम्ही अनेक लोकांना निवडून दिलेलं आहे आणि अनेक लोकांना भरघोस पगार देऊन याच विषयावर अभ्यास करायला ठेवलं आहे. त्यांनी त्यांनी आपलं आपलं काम करावं. मी मात्र एक सामान्य नागरीक म्हणून असंच मत देईल की वारंवार भारताशी खोडी काढणार्‍या कुणाचंही थोबाड रंगवून ठेवलं पाहिजे.

येथे इस्त्रायलचं उदाहरण दिल्या जातं ते योग्यच आहे असं माझं मत आहे. जे लोक इस्त्रायलने प्रतिहल्ले करून सुध्दा इस्त्रायलवरील हल्ले थांबले नाहीत असं म्हणतात त्यांना इस्त्रायलने अशी कडवट भूमिका घेतली नसती तर त्यांच्या वर हल्ले झालेच नसते असं ठामपणे म्हणता येईल का? याच संदर्भात इस्त्रायलच्या स्वातंत्र्याचा जाहिरनामा वाचतांनाच त्यांच्यावर चहूबाजूंनी झालेलं आक्रमण इस्त्रायलने कसे झेलायला पाहिजे होते?

याच सोबत एक संदर्भ आणखी देतो. १९४८ सालचा इस्त्रायल आणि आजचा इस्त्रायल याचा नकाशा जरी पाहीला तरी लक्षात येईल की प्रत्येक युध्दात इस्त्रायलने आपल्या कक्षा वाढवलेल्याच आहे. त्यांच स्पष्ट मत आहे की आमची मानसं रक्त सांडतात ते काही वाटाघाटीत तो भाग परत देण्यासाठी नव्हे.

अनेकदा राजकारण्यांची काहि अगतीकता असते हे आम्ही समजू शकतो. मात्र देश आणि देशातील लोक काय विचार करतात हे त्यांना समजायला सामान्य मानसाची मते अशीच असायला हवी.

२) भारतीय लष्कराला हे अगदी सहज शक्य आहे.
- पाकव्याप्त काश्मिरातील आतंकवाद्यांचे तळ नष्ट करणे भारतीय सैन्याला शक्य आहे. मात्र आज गरज आहे ती कणखर नेतृत्वाची. यावेळेस इंदीराजी आठवतात. १९७१ च्या वेळी असलेलं परावलंबीत्व आणि संसाधणांची कमतरता आज नाही. आज अनेक आयमं बदललेली आहेत हे मान्य परंतु कुठल्याही परिस्थीतीत ते आले आणि चोरी करून गेले यावर घराचे दरवाजे पक्के करून बसून रहा हे उत्तर नाही. चोरांचा माग काढा. त्यांना चांगली अद्दल घडवा. उद्या दार सताड उघडं असलं तरी कुणाची तिकडे बघण्याचीही हिंमत व्हायला नको.

३. भारतातल्या मुसलमानांच्या मतांच्या भीतीने आपले सरकार असे करत नाही.

-- भारत सरकारच्या कचखाऊ धोरणाचा एक भाग हा असू शकतो का? तर शक्यता आहे. मात्र यासोबत अनेक बाबी आहेत हे माझ्यासारखे अनेक लोक जाणतात.

डिसेंबर पासून सरकारने सैन्य कार्यवाही न करता जागतीक पातळीवर कसाब आणि त्याच्या साथीदारांचे पुरावे देऊन पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. खरं तर डिसेंबर मध्ये त्याला यश सुध्दा आलं होतं. मात्र जानेवारी उलटता उलटता पाकिस्तानच्या वेळखाऊ धोरणांमूळे की आपल्या कचखाऊ धोरणांमूळे म्हणा हवं तर भारताचा हा कुटनितीक डाव सपशेल फसला.
या हल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने कसलीच पावलं उचलली नाही असं नाही म्हणता येणार. मात्र ती प्रामुख्याने या पुढे असा हल्ला झाला तर त्याला कसं तोंड द्यायचं? याप्रकारची आहेत. मात्र यापुढे असा हल्ला होऊच नये यासाठी काय केलं याची काहीच कल्पना नाही. अर्थात काही केलंही असेल परंतु भारताची भूमिका बघता त्यात किती यश येईल यात शंकाच आहे. आणि हीच बाब आम्हा सामन्य भारतीयांना खुपते व आमचं असं मत आहे की आपलं सरकार काहीच करत नाही.

- नीलकांत

आनंदयात्री's picture

6 Jul 2009 - 2:28 pm | आनंदयात्री

धन्यवाद नीलकांत.

खराटा यांच्या उत्तराची वाट पहातोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2009 - 2:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खराट्याचीच बाजू नीलकांतने लिहिली आहे, सर्वसामान्य जी मतं आहेत.
तसे झालेच पाहिजे, असे नीलकांत म्हणतो.

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

6 Jul 2009 - 3:04 pm | नितिन थत्ते

नाही हो बिरुटेसर.

नीलकांत यांनी आनंदयात्रींची मते समर्थली आहेत.

भारतीय सैन्याची खरी ताकद किती आहे हे आपल्याला कळण्याचे मार्ग नाहीत. पण सरकारमध्ये बसलेल्यांना ती माहिती मिळत असणार. त्यामुळे जेव्हा दोन्ही प्रकारची सरकारे (एक कणाहीन दुर्बळांचे दुसरे कणखर समर्थांचे) एकाच प्रकारच्या निर्णयाप्रत येतात तेव्हा ती माहिती वापरून तसा निर्णय झाला असेल असे न म्हणता (आपल्याला वाटते ते केले नाही म्हणून) दुसर्‍या सरकारलाही दुर्बळ म्हणणे योग्य वाटत नाही. आपण तळ सहज उध्वस्त करू शकतो अशी खात्रीशीर माहिती इतर स्रोतांमधून आनंदयात्री आणि नीलकांत यांना मिळाली असेल तर माहिती नाही.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2009 - 3:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसामान्य जी मतं आहेत, ज्याचा आपण उल्लेख केला. ते सहज आपल्याला प्रत्यक्षात आपल्याला उतरवता येतील, त्याबाबतीत म्हणतोय मी...!

>>आपण तळ सहज उध्वस्त करू शकतो अशी खात्रीशीर माहिती इतर स्रोतांमधून आनंदयात्री आणि नीलकांत यांना मिळाली असेल तर माहिती नाही.

पाकिस्तानला शुन्य मिनिटात संपवू शकतो, असे म्हणणारी माझी खूप मित्र मंडळी आहेत. फक्त सरकारने ते केले पाहिजे, असे त्यांचे मत असते.

-दिलीप बिरुटे

नीलकांत's picture

6 Jul 2009 - 3:30 pm | नीलकांत

मला कसलीच माहिती नाहीये. मात्र एक सहज प्रतिक्रिया अशी आहे की पाकव्याप्त काश्मिरात चालणारे आतंकवाद्यांचे तळ उडवण्याची जर आमची ताकद नाही. किंवा काहीच करण्याची आमची ताकद नाही आणि गप्प बसून उद्या काय होते याची वाट पाहत बसण्याची वेळ असेल तर ही खरोखर लाजीरवाणी बाब आहे.

माझा देश स्वतंत्र आहे. सार्वभौम आहे. मला माझ्या जीविताची आणि स्वातंत्र्याची हमी माझ्या संविधानाने दिली आहे. माझ्या देशाचा कारभार चालावा व देशाचा विकास करावा यासाठी मी सरकार निवडून देतो. त्यात अनेक हूशार लोकांना कामाला लावून त्यांनी देशाची धोरणे ठरवावी म्हणुन जवाबदारी देतो. यासर्वांसोबत परकिय आक्रमणांपासून संरक्षण करावे म्हणून सैन्याची तरतूद आहे. माझ्या देशाचं सैन्य किती उत्तम दर्जाचं आहे हे त्यांच्या अतिशय कमी संसाधनांच्या सोबतही गाजवलेल्या कारवायांवरून सिध्द होतं. अश्या वेळी जेव्हा परकीय आक्रमण माझ्या देशावर होतं तेव्हा माझी माझ्या देशाच्या या व्यवस्थेकडून अशी मागणी असावी यात गैर ते काय?

- नीलकांत

विकास's picture

6 Jul 2009 - 3:00 pm | विकास

नीलकांतच्या वरील उत्तराशी बहुतांशी सहमतच आहे. त्यामुळे केवळ जेथे थोडे वेगळे वाटते त्या संदर्भातः

इस्रायल कडून स्फुर्ती घेणे आणि इस्रायलसारखेच वागणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणजे असे की शिवाजी महाराज आमचे स्फुर्तीस्थान आहे असे म्हणणार्‍या लोकमान्यांपासून ते बाळासाहेबांपर्यंत कोणी घोडदौड केली नाही की तलवारी उपसत लढाया केल्या नाहीत. पण शिवाजीची मुत्सद्देगिरी आणि गनिमी कावा स्थलकालानुरूप बदल घडवून वापरला. हीच अपेक्षा इस्रायलचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवताना आहे.

इस्रायलच्या प्रश्नातील गुंतागुंत आणि आपल्या प्रश्नातील गुंतागुंत यात केवळ एक मुस्लीम धर्मीयांचा मुस्लीम म्हणून होणारा विरोध हा एक भाग सोडल्यास, वेगळी आहे. त्यांचा इतिहास, राजकारण हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा होईल तेंव्हा तो तुर्तास बाजूस ठेवूया. केवळ संदर्भापुरतेचः

इस्रायल हा धर्मप्रधान देश आहे - ज्युइश स्टेट आहे. धर्माच्या आधारावर सर्वांनी एकत्र येऊन ते राष्ट्र स्थापन केले आहे. आणि आजही एकदा का इस्रायलच्या सुरक्षेचा प्रश्न आला की जगभरचे ज्यू एकत्र येऊन तयार असतात. मग ते पैशाने मदत करतील, गुप्तहेर म्हणून मदत करतील अथवा "बुद्धीवादी" लेखन माध्यमांत लिहून तसेच स्थानीक राजकीयांच्या संपर्कात राहून जगभरचा पाठींबा (किमान पाश्चात्यांचा) मिळवायला मदत करतील. असे का होते? कारण या सर्वांना माहीत आहे की १९४८ च्या आधी २००० वर्षे, एक स्वतःचा देश नाही म्हणून जगभर आश्रीतासारखे फिरावे लागले. थोडक्यात, "मी तेथे राहत असू अथवा नसू पण जो पर्यंत माझे राष्ट्र आहे तो पर्यंत माझा व्यक्तिगत स्वार्थ मी कुठेही असलो तरी पाळला जाईल, पण त्या साठी राष्ट्राचा स्वार्थ पहाणे हे माझे देखील कर्तव्य आहे आणि ते मी करणार," हा भाव प्रत्येक ज्यू नुसता बाळगत नाही तर त्याप्रमाणे वागतो. जर तमाम ज्यूंचा पाठींबा नसेल तर तुम्हाला वाटते का की इस्रायली सरकार असे वागू शकले असते?

आता विचार करा. सर्वप्रथम आपण धर्मप्रधान राष्ट्र नाही (जे मला योग्य वाटते). अर्थात येथे तमाम भारतीयांनी भारतीय म्हणूनच एकत्र होणे महत्वाचे आहे - विशेष करून जेंव्हा आपल्यावर परकीय नुसत्या देशाचाच नाही, तर रानटी मनोवृत्तीचा हल्ला होऊन देशाचे आणि समाजाचे अपरीमित नुकसान होऊ शकते. पण तसे होते का? जर आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार?

आनंदयात्री's picture

6 Jul 2009 - 3:42 pm | आनंदयात्री

धन्यवाद विकासराव.

इस्त्रायली लोकांना राष्ट्रभावनेबरोबर त्यांच्या धर्माशी असलेली त्यांची निष्ठा बांधुन ठेवते हे खरे इस्त्रायलचे नशिब, बरे झाले ज्यु लोक सहिष्णु नव्हते नायतर आज इस्त्रायल बनलाच नसता.

आता विचार करा. सर्वप्रथम आपण धर्मप्रधान राष्ट्र नाही (जे मला योग्य वाटते). अर्थात येथे तमाम भारतीयांनी भारतीय म्हणूनच एकत्र होणे महत्वाचे आहे - विशेष करून जेंव्हा आपल्यावर परकीय नुसत्या देशाचाच नाही, तर रानटी मनोवृत्तीचा हल्ला होऊन देशाचे आणि समाजाचे अपरीमित नुकसान होऊ शकते. पण तसे होते का? जर आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार?

मला भारतिय असण्याचा अभिमान नाही असे म्हणतांना, दरवेळेस, तो माणुस वरचा आड किती रिकामा करतोय याची जाणिव होणे महत्वाचे.

मी जर असे म्हणत राहिलो तर मी निदान २ जणांच्या अभिमानाला बोथट करणार आहे, किती लाँग टर्म आणी मोठे नुकसान असेल ते !!

विकास's picture

6 Jul 2009 - 5:06 pm | विकास

>>>इस्त्रायली लोकांना राष्ट्रभावनेबरोबर त्यांच्या धर्माशी असलेली त्यांची निष्ठा बांधुन ठेवते हे खरे इस्त्रायलचे नशिब, बरे झाले ज्यु लोक सहिष्णु नव्हते नायतर आज इस्त्रायल बनलाच नसता.<<<

मी माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, भारताने धर्माशी निष्ठा बांधून ठेवावी असे मला वाटत नाही. आणि हे मी येथे आणि इतरत्रही स्वतःला "हिंदूत्ववादी" म्हणत असताना (किंबहुना म्हणूनच) म्हणत आहे. आपल्याकडे सर्वधर्मसमभावच हवा (सर्वधर्म-अभाव नाही!). मात्र कायद्यापुढे सर्व समान. बाकी कितीही मी येथे सरकार/राजकारण्यांवर टिका करत असलो तरी कुठेतरी परिस्थितीच्या रेट्याने का होईना, पण कायद्यापुढे हळूहळू सर्वांना समान वागववण्याचे रुजत आहे, असे वाटते. एकदा का लक्षात आले की असे वागून पाठीवर थाप पडते आणि व्होटबँकेत फरक पडत नाही, की ते रुढ होईल. पण लोकशाहीत त्याला वेळ द्यावा लागतो. कुठलीच गोष्ट एका रात्रीत होत नसते...

जे काही इस्रायलमधे आजतागायत झाले ते गेल्या अर्धशतकातील राजकीय राजकारणाचा आणि त्याच्या आधी त्या पिढीतील राज्यकर्त्यांना आलेल्या हिटलरच्या वंश/धर्मसंहाराचा परीपाक आहे. आता हळूहळू इस्त्रायली जनता आणि बाहेरील ज्यू पण या संदर्भात बदलत आहेत. असेपण बुद्धीवादी ज्यू आहेत ज्यांना आता इस्त्रायलने सेक्युलर होयला हवे आहे. अर्थात तसे म्हणत असताना ते इस्रायली स्वार्थ लांब करत नाहीत. हे शेवटचे वाक्य हा कळीचा मुद्दा आहे.

आनंदयात्री's picture

6 Jul 2009 - 5:26 pm | आनंदयात्री

असेपण बुद्धीवादी ज्यू आहेत ज्यांना आता इस्त्रायलने सेक्युलर होयला हवे आहे. अर्थात तसे म्हणत असताना ते इस्रायली स्वार्थ लांब करत नाहीत.

खुप सारे शिकण्यासारखे आहे.

नीलकांत's picture

6 Jul 2009 - 3:43 pm | नीलकांत

इस्रायल कडून स्फुर्ती घेणे आणि इस्रायलसारखेच वागणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत.

- १००% सहमत. मला इस्त्रायल जेवढं आपल्या देशासाठी इतरांशी लढाऊ बाणा ठेवण्यासाठी आवडतं तेवढं मला इस्त्रायलच्या मृदा व जलसंधारणाबाबत आकर्षण आहे. हजारो वर्षांपासून शेत करणारे आपण आज उण्यापुर्‍या ६० वर्षांचे आयुष्य असलेल्या देशाकडून शेती तंत्रज्ञान घेतो. ही झेप दुर्लक्ष करण्याजोगी नाही.

इस्त्रायल एक देश म्हणून मुस्लीम द्वेश करू शकतो. माझ्या देशाबाबत अशी परिस्थिती नाही. माझा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि याचा मला रास्त अभिमान आहे. भारतात कुणीही गैरहिंदू आहे असं म्हणून कधीच दूय्यम झालेला नाही.
इस्त्रायल आणि भारत यांच्याच तसे पहायला गेले तर काहीच साम्य नाही. मात्र देश म्हणून त्यांची जी कणखर वाटचाल आहे, त्यांची जी प्रगतीकडे वाटचाल आहे तशीच माझ्या देशाची सुद्धा असावी असं मला वाटतं. यामध्ये केवळ भावना समान आहे. मुस्लीमद्वेश किंवा कुणाचाही द्वेश भारत कधीच करणार नाही. तो प्रगतीचा मार्ग नाही.

विकास सर,
तुम्ही म्हणताय ते १००% पटतंय. इस्त्रायलचं उदाहरण ठेवणं वेगळं आणि इस्त्रायल सारखं वागणं वेगळं.

मला सुध्दा मी भारतीय आहे त्यामूळे जगात मी कुठेही असेन तरी माझा देश माझी काळजी वाहण्यास समर्थ आहे अशी जाणीव या जन्मात होण्याची वेळ यावी असं वाटतं.

- (भारतीय ) नीलकांत

आनंदयात्री's picture

6 Jul 2009 - 4:18 pm | आनंदयात्री

मस्त रे कांता ..

मला सुध्दा मी भारतीय आहे त्यामूळे जगात मी कुठेही असेन तरी माझा देश माझी काळजी वाहण्यास समर्थ आहे अशी जाणीव या जन्मात होण्याची वेळ यावी असं वाटतं.

टाळ्या !!!

-
(अभिमानी भारतिय)

आनंदयात्री

विकास's picture

6 Jul 2009 - 5:17 pm | विकास

प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद, (फक्त मी "सर" नाही आहे :-) )

>>>मला सुध्दा मी भारतीय आहे त्यामूळे जगात मी कुठेही असेन तरी माझा देश माझी काळजी वाहण्यास समर्थ आहे अशी जाणीव या जन्मात होण्याची वेळ यावी असं वाटतं.<<<

धर्मोरक्षती रक्षितः - तुम्ही धर्म सांभाळाल तर धर्म तुम्हाला सांभाळेल. तेच देशाबद्दल म्हणता येईल.

बाकी ऑन पॉझिटीव्ह नोट, आपल्या देशाने भारतीय म्हणूनच नाही तर भारतीय वंशाचे म्हणून पण अनेकांची वेळोवेळी काळजी वाहीली आहे: फिजीमधील बंडाच्या वेळेस, दक्षिण अफ्रिकेतील सत्ताबदलाच्यावेळेस (सावधनता ठेवून), इराकच्या पहील्या (कुवेत) युद्धाच्या वेळेस. मला वाटते हाँककाँग सत्तांतरणाच्या वेळेस पण भारतसरकार तयारीत होते. पण म्हणूनच अनिवासी भारतीयांचे हे कर्तव्य आहे की ते पण हा जेथे राहत असतील आणि उपभोग घेत असतील त्या देशाशी/माणसांशी कृतघ्न न राहता, भारताचा राष्ट्रीय स्वार्थ सांभाळायला मदत करतील...

अभिज्ञ's picture

6 Jul 2009 - 12:02 pm | अभिज्ञ

आनंदयात्रींशी पुर्णपणे सहमत.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

विजुभाऊ's picture

6 Jul 2009 - 2:08 pm | विजुभाऊ

खराटाने असा कोणता अगम्य मुद्दा मांडला आहे की आनन्दयात्रीने त्यावर आगपाखड करावी?
आनन्दयात्रीनी बहुतेक संघप्रवर्तकांचे वस्तुस्थितीचा चुकीचा अर्थ लावणारे एकतर्फी विचार ऐकले असावेत.
पाकीस्तानचा बीमोड केल्याने दहशवाद थांबेल असे त्याना वाटत असले तरी ते तेवढे सोपे नाही.
पाकीस्तानचा बीमोड करणे म्हणजे तेथील नागरीक नष्ट करुन तो देश पादाक्रांत करणे असे शक्य आहे का?
कसाब्/दहशतवाद या बद्दल कितीही क्रोध येत असला तरी तो देश नष्त करण्यासाठी अमेरीका आणि अफगानिस्थानचा संदर्भ देणे सयुक्तीक नाही.
अफगाणीस्थानपासून अमेरीका कित्येक हजार मैल दूर आहे. तेथे प्रतीहल्ला करणे अफगानिस्थानच काय पण अशियातल्या कोनत्याच देशाला ते शक्य नाही.अमेरेकेचे तेथे असणारे आर्थीक हितसंबन्ध अमेरीकेने हल्ला केला. उत्तर कोरीयाने कित्येक चिथावण्या धमक्या अमेरीकेने गपगुमान सहन केल्या. दहा वर्शाहुनही अधीक कालावधीनन्तर ज्या देशात औषधेही मिळणे दुरापास्त होते त्या जेरीस आलेल्या इराकवर बुश प्रशासनाने केवळ आर्थीक हितसंबन्ध सांभळण्यासाठी युद्ध लादले. हे सर्वज्ञात आहे.
आपला देश शांतता प्रिय आहे. यूद्ध झाले तर त्याचे परीणाम काय होतील हेही सर्वज्ञात आहे.
इस्राईलचे आस्तीत्व टिकवण्यासाठी त्याला युद्ध करावे लागते.
आपले राजकीय नेतृत्व नबळे आहे हे खरेच. पण ते सर्वच पक्षांचे आहे.
तूलनाच करायाची झाल्यास इस्राईलच्या सैनिकानी एन्टेबी विमानतळावरून सोडवुन आणलेले अपहृत विमान आणि आपण सर्वंकश शरणागती पत्करलेले कंदहार प्रकरण.
तेंव्हा एन डी ए सरकार सत्तारुढ होते. पण त्यांच्या निर्णयावर विरोधकानी टीका केली नाही हा त्यांचा मोठेपणा.
असो: बाबरी मशीद पाडून नक्की काय मिळवले हे अडवाणीनातरी कधीतरी नीट मुद्देसूद सांगता येईल?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2009 - 2:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौऊशी (अशुद्ध शब्द सोडले तर) शब्दाशब्दाशी सहमत आहे...!!! :)

-दिलीप बिरुटे

नीलकांत's picture

6 Jul 2009 - 3:20 pm | नीलकांत

आनन्दयात्रीनी बहुतेक संघप्रवर्तकांचे वस्तुस्थितीचा चुकीचा अर्थ लावणारे एकतर्फी विचार ऐकले असावेत.

- संघप्रवर्तकांचा येथे दुरान्वये संबंध नाही असे मला वाटते. विषय आहे सामान्य नागरीकांच्या प्रतिक्रियांचा. वरील वाक्यावरून विजूभाऊंचा संघप्रवर्तकांचा अभ्यास आहे असे मी गृहीत धरतो. ( मला असंही वाटतं की विजू भाऊंना संघ नेतृत्व असं म्हणायचं असेल. संघप्रवर्तक म्हणजे माझ्या मते डॉ. हेडगेवार.)

पाकीस्तानचा बीमोड केल्याने दहशवाद थांबेल असे त्याना वाटत असले तरी ते तेवढे सोपे नाही.
पाकीस्तानचा बीमोड करणे म्हणजे तेथील नागरीक नष्ट करुन तो देश पादाक्रांत करणे असे शक्य आहे का?

-- अहो मग काय आणि कसे शक्य आहे ते तरी सांगा .

कसाब्/दहशतवाद या बद्दल कितीही क्रोध येत असला तरी तो देश नष्त करण्यासाठी अमेरीका आणि अफगानिस्थानचा संदर्भ देणे सयुक्तीक नाही.
-- मान्य आहे की अनेक अर्थाने हे उदाहरण चपखल बसत नाही. मात्र आमच्या देशातील इमारती पाडून लोकांना मारले तर तुम्ही जगात कुठेही असा आम्ही त्याला उत्तर देऊ हा पावित्रा उत्तमच आहे ना? आणि तेवढ्यासाठी हे उदाहरण दिले असावे. याच वेळी इराक बाबत अर्थकारण आहे असं म्हणतांना अफगाणीस्तानातील हल्यामागील अर्थकारण ते कोणते? असा प्रश्न नक्की पडतो.
अमेरिका आणि युध्द हा काही नवीन विषय नाही. यावर आधीच चर्चा झालेली आहे. वरच्या प्रतिसादात प्रतिक्रिया चुकीची आहे असं नाही वाटत कारण अमेरिकेचे उदाहरण तेवढे चुकीचे आहेत असं विजूभाऊ म्हणताहेत. कारण खाली ते इस्त्रायलचं उदाहरण देऊन आनंदयात्रीचं म्हणनं अगदी बरोबर आहे असं म्हणताहेत. ( मी गोंधळलो आहे कदाचीत :) )

सरकार कॉग्रेसचं पक्षाचं असो अथवा भाजपचं. देश म्हणून जी कार्यवाही व्हायला हवी ती देशातील लोकांना आत्मविश्वास देणारी असावी. माझा देश म्हणतांना अभिमान वाटायला हवा. ह्या अभिमानावरच आम्ही सामान्य लोक जगतो. खुप जूना संदर्भ नाहीये मात्र १९६५ च्या काळात अमेरीकेच्या दबावापुढे न झुकता देशाने आठवड्यातील एक दिवस उपवास केल्याचे आठवते. यातून केवळ अन्नच वाचलं असं नाही तर माझ्या देशासाठी मी हे करतोय ही जाणीव आणि देशासोबतची वीण घट्टं झाली असं माझं मत आहे.

मला असं मुळीच वाटत नाही की अमूक एका पक्षाचं सरकार आल्यानेच देशाचे प्रश्न सुटतील. असं जरूर वाटतं की व्यवसाईक राजकारण्यांऐवजी त्या त्या विषयातील तज्ज्ञ राजकारणात आले तर बराच फरक पडेल. यासंदर्भात शशी थरूरांचं उदाहरण बोलकं आहे.

- नीलकांत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2009 - 3:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजूभौ, जे बोललेत ते बरोबर बोललेत. सामान्य नागरिकात अनेक विचारांचे लोक असतात, आणि आपापल्या विचाराने ते जगाकडे पाहत असतात. त्यांनी केलेला अंदाज पटण्यासारखा आहे.

>>-- अहो मग काय आणि कसे शक्य आहे ते तरी सांगा .
पाकिस्तानचा बिमोड केला म्हणजे दहशतवाद संपेल, हे आपण म्हणावे याचे वाईट वाटते आहे. कारण की, आज कोणत्याही देशाला संपवणे इतके सोपे नाही. युद्ध आणि दहशतवाद त्याच्या परिणामाच्या दृष्टीने सारखेच असतात. अण्वस्त्रांचा प्रसार थांबविणे, शिक्षणाचा प्रसार करुन लोकांची धर्मांधता कमी करणे, कायदा आणि सुव्यवस्थता मजबूत करुन दहशतवादी संघटनाचा उदय होणार नाही, याची काळजी घेणे. देशातील दहशतवादी संघटनांना सहकार्य न करणे( पाकिस्तानासाठी) आणि कडक कायदे, कदाचित असे काही उपाय सांगता येतील.

>>देश म्हणून जी कार्यवाही व्हायला हवी ती देशातील लोकांना आत्मविश्वास देणारी असावी. माझा देश म्हणतांना अभिमान वाटायला हवा.
आपल्या प्रतिसादातील इतक्याच ओळी खूप आनंद देणार्‍या वाटल्या..! :)

-दिलीप बिरुटे

नीलकांत's picture

6 Jul 2009 - 3:52 pm | नीलकांत

पाकिस्तानचा बिमोड केला म्हणजे दहशतवाद संपेल, हे आपण म्हणावे याचे वाईट वाटते आहे.

-- माझा विजूभाऊंना असा प्रश्न होता की असं केल्यानं प्रश्न सुटनार नाही असं जर तुमचं मत आहे तर निदान काय केल्याने तो सुटेल असं तुम्हाला वाटतं ते तरी कळू द्या. मला असं कधीच म्हणायचं नाहीये की पाकिस्तान संपला पाहीजे किंवा पाकिस्तान संपेल असं दिवास्वप्न मी कधीच बघत नाहीये.

पाकिस्तान काय तो आग्नेयेकडचा पिटूकला इस्ट तिमोर नावाचा देश सुध्दा जगात कुणालाच संपवता येणार नाहीय. पाकिस्तान संपणे हा आमच्या त्रासावर उपाय नाहीये. मला तर पुढे जाऊन असं म्हणायचंय की पाकिस्तान हा आमचा त्रासच नाहीये. आम्ही राष्ट्र म्हणून जे करायला हवं ते करायला कमी पडतोय असं माझं मत. मला हा एवढा संदर्भ दिल्यापेक्षा मला जगात कुठेतरी जे घडलंय ते सांगणं अधीक सोपं आणि समर्पक वाटतं. ह्या एवढ्यासाठी इस्त्रायल/ अमेरीकाचं उदाहरण.

तुम्ही खाली ज्या दोन ओळी लिहील्या आहेत त्याच जरा सविस्तर विस्ताराने किंवा निदान तेवढ्यातरी विजूभाऊंनी लिहायला हव्या होत्या. असं माझं मत.

- नीलकांत

नितिन थत्ते's picture

6 Jul 2009 - 4:22 pm | नितिन थत्ते

जगात/इस्रायलबाबत घडत असलेल्याच गोष्टी मी सांगितल्या.

अमुक केले पाहिजे असे वाटण्यात गैर काहीच नाही.

एखाद्या मुलाला ५०% मार्क मिळतात तेव्हा त्याचे पालक 'तसा तो हुषार आहे हो, पण अभ्यास करायला नको'. तो असायला हवा तितका हुषार नाही हेही कारण मार्क कमी मिळण्यामागे असेल हे उघड मान्य करायला ते पालक तयार नसतात. 'आम्ही सहज पाकिस्तानला संपवू हो पण आमचे सरकार मतांसाठी बोटचेपेपणा करते' हेही तसेच काहीसे आहे . जेव्हा आर या पार लडाईची भाषा केली गेली तेव्हाही अशाच समजूतीने ती घोषणा केली गेली असू शकते. आणि नंतर लष्करी अधिकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चांमधून युद्ध करणे व्यवहार्य नाही असा निष्कर्ष झाला असू शकेल.

माझ्याकडे आतल्या गोटातील बातमी नसल्याने मी सरकारच्या धोरणाचा असा अर्थ काढतो. कोणाकडे वेगळी माहिती असेल तर वेगळा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

अतिरेकी तळ उध्वस्त व्हावेत असे मला पण वाटते पण ते होत नसतील तर त्याचे कारण बोटचेपेपणा/मतांचे राजकारण हेच आहे हे (माझ्याकडे माहिती नसल्याने) मी परस्पर ठरवून मोकळा होत नाही.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

आनंदयात्री's picture

6 Jul 2009 - 4:34 pm | आनंदयात्री

>>अतिरेकी तळ उध्वस्त व्हावेत असे मला पण वाटते पण ते होत नसतील तर त्याचे कारण बोटचेपेपणा/मतांचे राजकारण हेच आहे हे (माझ्याकडे माहिती नसल्याने) मी परस्पर ठरवून मोकळा होत नाही.

अरे व्वा !! मग परस्पर इतरांच्या मतांना बालिश ठरवुन मोकळे होता तर !! म्हणा बापुडे !!

नितिन थत्ते's picture

6 Jul 2009 - 4:56 pm | नितिन थत्ते

तुम्हाला माझे मत पटत नाहीये की बालिश म्हटल्याचा राग आलाय? :?

बालिश शब्द बिनशर्त मागे घेत आहे.
माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद दिल्याने मला प्रतिसाद संपादित करता येत नाही. म्हणून संपादकांना विनंती की त्यांनी माझ्या मूळ प्रतिसादातील बालिश शब्द काढून टाकावा.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

विजुभाऊ's picture

6 Jul 2009 - 3:54 pm | विजुभाऊ

खरे आहे नीलकान्ता. संघप्रवर्तक ऐवजी मी संघीष्ठ हा शब्द वापरणार होतो. आसेतू हिमाचल आणि ब्रम्हदेशापासून कंदहार पर्यन्त अखन्ड भारताची दिवास्वप्ने पहाणारे हे विसरतात की आपण ज्या भूमीला भारताला जोडणार आहोत त्या भूभागावर इतर लोक रहातात. आपन तो भूभाग पादाक्रान्त केला तरी तेथे रहाणार्‍या स्थानीकांचे काय करणार आहोत त्याबद्दल ते बोलतच नाहीत.
निष्पाप नागरीकांच्या हत्या वाईटच.
मागे एका चर्चेत भारताचा शान्ततेसाठी पाकिस्तानात आर्थीक आणि राजकीय स्थैर्य आवश्यक आहे असा एम मुद्दा मांडला होता.
बाबरी मशीदी पाडा /राममन्दीर बान्धा/ राखीव जागा वाढवा असल्या क्षुद्र गोष्टींमध्ये जनतेला लढवत ठेवून भारतेचे कोणतेच साध्य होणार नाही .
धर्ममार्तान्डाना लोकांना मुक्ती देण्यापेक्षा स्वतःचे आश्रम श्रीमन्त करण्यामध्येच रस असतो. तद्वत राजकारण्यांचेही आहे.लोकाना शिक्षीत करणे हे त्या कोणालाच परवडणारे नाही.
कसाब काय ; कर्नल मुतालीक काय किंवा साध्वी ऋतंभरा काय फार वेगळे नाहीत. लहानपणीच त्यांचे कोण्या व्यवस्थेने ब्रेनवॉशिंग केले आणि त्यांचे यंत्रमानव बनवले.
जे त्यांच्या डोक्यात भिनवले गेले त्याप्रमाणे ते वागले.
आपण आपले डोके गहाण ठेवतो आहोत याचे त्याना भानच नव्हते.
कुरुक्षेत्रातही अर्जूनाचे उत्तम प्रकार ब्रेनवॉशिंग झाल्यानन्तर तो युद्धास तयार झाला होता.
खरी गरज आहे ती सुयोग्य ब्रेनवॉशिंग करणाराची.
गरीबी/ अशिक्षण हेच या समस्यांचे मूळ आहे. अर्थात प्रत्येक धर्माने हेच मुद्दे उगाळुन लोकांचे ब्रेनवॉशिंग करत धर्मप्रसार केला आहे . लोकाना उल्लु बनवले तरच आपले आस्तित्व टिकेल या बाबतीत मात्र जगातील सर्व धर्मांचे एकमत आहे.

विकास's picture

6 Jul 2009 - 7:15 pm | विकास

>>>आसेतू हिमाचल आणि ब्रम्हदेशापासून कंदहार पर्यन्त अखन्ड भारताची दिवास्वप्ने पहाणारे हे विसरतात की आपण ज्या भूमीला भारताला जोडणार आहोत त्या भूभागावर इतर लोक रहातात. आपन तो भूभाग पादाक्रान्त केला तरी तेथे रहाणार्‍या स्थानीकांचे काय करणार आहोत त्याबद्दल ते बोलतच नाहीत.<<<

कोण म्हणतयं तसे सध्याच्या काळात? जर डॉ. हेडगेवार अथवा गुरूजी म्हणाले असले तरी तो काळ आणि संदर्भ वेगळा होता. आणि तसा संदर्भ असल्यास सांगा नाहीतर आपले लिहीणे संदर्भहीन ठरते. गांधीजी म्हणाले होते की देहाची फाळणी करेन पण देशाची नाही. पण त्यांचा संदर्भ, तसेच उक्ती आणि कृतीतील काळ वेगळा होता...

>>>निष्पाप नागरीकांच्या हत्या वाईटच.<<<
खरे आहे. मुंबई हल्याच्या आधी दिडदोन वर्षात हैद्राबाद, अजमेर, जयपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, इम्फाल येथे सर्वत्रच निष्पाप लोकं मरत होते. त्यांना आपण लक्षात ठेवून बुडं हलवली असती तर मुंबईची अवस्था आली नसती.

>>>बाबरी मशीदी पाडा /राममन्दीर बान्धा/ राखीव जागा वाढवा असल्या क्षुद्र गोष्टींमध्ये जनतेला लढवत ठेवून भारतेचे कोणतेच साध्य होणार नाही . धर्ममार्तान्डाना लोकांना मुक्ती देण्यापेक्षा स्वतःचे आश्रम श्रीमन्त करण्यामध्येच रस असतो. तद्वत राजकारण्यांचेही आहे.लोकाना शिक्षीत करणे हे त्या कोणालाच परवडणारे नाही.<<<

अगदी खरे आहे. मात्र येथे मुद्दा येतो की जे स्वत:ला शिक्षित समजतात त्यांच्या हातून काही का घडत नाही? किंबहूना त्यांच्यामुळेच आज जास्त बिघडले आहे असे वाटते. त्याचं कारण परत असेच आहे, की दोष फक्त रामजन्मभुमी/बाबरीला आणि कदाचीत स्वतःला अनुभव आल्याने राखीव जागांना... पण मुळावर घाव घालायचा असेल तर जेंव्हा कायद्याने सर्वांना समान वागणूक दिली जात नाही तेंव्हा मात्र बोलायचे नाही. शहाबानोच्या विरोधात धर्ममार्तंडांसाठी घटना बदलली तेंव्हा बोलायचे नाही...

>>कुरुक्षेत्रातही अर्जूनाचे उत्तम प्रकार ब्रेनवॉशिंग झाल्यानन्तर तो युद्धास तयार झाला होता.<<
उगाच जाताजाता गीतेवरील असंबंद्ध केलेली ही तिरकस टिपण्णी आहे. युद्धप्रसंगी युद्धास तयार होयला शिकवायचे का पंचा कसा गुंडाळावा आणि बकरीचे दुध प्यायला शिकवायचे? बरं मग त्याच पद्धतीने तुम्हाला आत्तापण भारताने सैन्यदल ठेवायला नको असे म्हणायचे आहे का? ते तुमच्या दृष्टीने सुयोग्य ब्रेनवीशिंग आहे? शांततेच्या काळातपण सैन्यदलाकडून लढण्याचीच तयारी केली जाते. तशी तयारी जेंव्हा केली जात नाही, त्यांना (सैन्यदलाला) जेंव्हा "सारं कसं शांत शांत" म्हणत नीट मदत केली जात नाही तेंव्हा चीनयुद्धासारखा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागते. अथवा मुंबई हल्ल्यात नीट बुलेटप्रुफ जॅकेट्स आणि अत्याधुनीक पोलीसी साधने नसल्याने, तयारी नसल्याने चांगल्या पोलीसांना मुकावे लागते आणि तासनतास कमांडोंची वाट पहायला बसत जगाच्या वेशीवर स्वतःची लक्तरे टांगलेली बघावी लागतात. तेंव्हा उगाच "गीता" मधे आणू नका.

>>गरीबी/ अशिक्षण हेच या समस्यांचे मूळ आहे. अर्थात प्रत्येक धर्माने हेच मुद्दे उगाळुन लोकांचे ब्रेनवॉशिंग करत धर्मप्रसार केला आहे <<
अहो धर्मानेच कशाला? सुडोसेक्युलर्स आणि कम्युनिस्ट काय वेगळे करतात? बरं गरीबी आणि अशिक्षण म्हणावे तर बीन लादेन पासून अफझलगुरू पर्यंत कोणी नाधड गरीब आहेत ना धड अशिक्षित. बीन लादेन तर काय सिव्हील इंजिनियर आणि स्वतःच्या पैशाने कोट्याधीश आहे/होता.

विजुभाऊ's picture

7 Jul 2009 - 10:23 am | विजुभाऊ

रामजन्मभुमी/बाबरीला आणि कदाचीत स्वतःला अनुभव आल्याने राखीव जागांना
राखीव जागांना दोश देत नाही. त्या बाबतीत माझी मते वेगळी आहेत.मी स्वतः कधी जात लावली नाही. धर्मही लावत नाही. पण हे मुद्दे पुढे करून समाजात दुफळी निर्माण केली जाते या बद्दल माझ्या मनात अजिबात शन्का नाही. रामजन्मभुमी/बाबरी मुद्द्यावरुन नन्तर भारतीय उपखन्डात किती दुफळी निर्मान झालेली आहे याची जाण तुम्हाला कधी भेन्डीबाजार्/बेहेरामपाडा / अगदी लालबाग परळच्या एखाद्या चाळीत किंवा दिल्लीतल्या चांदणी चौक भागात फिरुन पहा पदोपदी जाणीव होईल की ते आणि आम्ही ही विभागणी किती प्रबळ आहे ते.
उगाच जाताजाता गीतेवरील असंबंद्ध केलेली ही तिरकस टिपण्णी आहे. युद्धप्रसंगी युद्धास तयार होयला शिकवायचे का पंचा कसा गुंडाळावा आणि बकरीचे दुध प्यायला शिकवायचे
मी गीतेवर टीका अजिबात केली नाही. एखाद्या गलीतगात्र माणसाला सुद्धा लढायला उद्युक्त करणारी गीता हा जगातला सर्वोत्तम मोटिव्हेटिंग पेप टॉक आहे. ब्रेनवॉशिंग केल्या शिवाय दोलायमान असलेला अर्जून( ऋज ह्या संस्क्रूत शब्दापासून बनलेला शब्द) मानसीक दृष्ट्या स्थिर झालाच नसता.
बरं गरीबी आणि अशिक्षण म्हणावे तर बीन लादेन पासून अफझलगुरू पर्यंत कोणी नाधड गरीब आहेत ना धड अशिक्षित. बीन लादेन तर काय सिव्हील इंजिनियर आणि स्वतःच्या पैशाने कोट्याधीश आहे/होता.

माझे म्हणणे तेच आहे .
बीन लादेन वा अफजलगुरु यानी पैसा व धर्म यांची अफलातून सांगड घालत एक मोठी फौज उभी केली. तालीबान बीन लादेन अमेरीकेच्या हवाली केले असते तर त्यांचे आत्ता झाले तेवढे हाल झाले नसते. देश बेचिराख झाला तरी चालेल पण लादेनला संरक्षण पुरवु असे करणारे इतके कट्टर अनुयायी बीन लादेन ने निर्मान केले
वहाबी पंथावर श्रद्धा ठेवणारा श्रीमन्त सौदी राजघराण्याच्या देशाने कट्टरवाद्याना प्रोत्साहन द्यायचे आणिराजसत्ता अबाधीत ठेवण्यासाठी गरीब अफ्रिकी आणिआशियायी देशातील तरुणांचा बळी द्यायचा. अमेरीकेला हे मा॑हीत असूनही सौदी वर साधे नुसते बोट दाखवण्याचाही त्यानी कधी प्रयत्न केला नाही.
बीन लादेनला एखाद्या प्रॉक्सी सारखे वापरून दहशतवाद धगधगत ठेवणे आणि त्याद्वारे शस्त्रे विकणे/ युद्धासाठी आवश्यक तैनाती फौजा व सैन्य सेवा विकणे हा अमेरीका आणि कम्पनीचा व्ययसाय आहे.
मात्र येथे मुद्दा येतो की जे स्वत:ला शिक्षित समजतात त्यांच्या हातून काही का घडत नाही?
खरे आहे. शिक्षीत समाज एखादा मुद्दा सोडला तर संगठीत होउ शकत नाही. त्यासाठी पुन्हा धर्माचा/ वंशाचा आधार घ्यावा लागतो.
शिक्षीत समाज हा त्याची लढण्याचे झगडण्याची प्रज्ञा हरवुन बसतो.
गांधी /टिळक्/सुभाश बोस शिक्षीत होते. त्यानी लोकाना स्वातन्त्र्यासाठी उद्युक्त केले तसे कोणीतरी आपल्यातुनच निर्माण होईल. पुन्हा एकसम्ध समाज निर्माण करेल.
उत्तम शिक्षीत लोक राज्यकर्ते झाले तर ते नवी दिशा देउ शकतात.
असे बरेच लोक आहेत की जे थोडेसे का होईना प्रयत्न करत आहेत.
एखादे आण्णा हजारे , एखादे डॉ गणेश देवी, एखादे बाबा आमटे असे लोक तुमच्या आमच्यातच आहेत त्याना ओळखून प्रोत्साहन देणे हे तर आपल्या हातात आहे ना. काहीच नसल्याचा गाजावाज करण्या पेक्षा आपण किमान हे काम तरी करु या. निदान त्याबाबत तरी शक्य आहे तेथे लोकमत तयार करु यात

विकास's picture

6 Jul 2009 - 7:35 pm | विकास

>>तूलनाच करायाची झाल्यास इस्राईलच्या सैनिकानी एन्टेबी विमानतळावरून सोडवुन आणलेले अपहृत विमान आणि आपण सर्वंकश शरणागती पत्करलेले कंदहार प्रकरण.<<
खरे आहे. तेंव्हा असे वाटले होते की आपणही तसे करू शकलो तर...

>>>तेंव्हा एन डी ए सरकार सत्तारुढ होते. पण त्यांच्या निर्णयावर विरोधकानी टीका केली नाही हा त्यांचा मोठेपणा.<<
हे अर्धसत्य आहे. जे काही वाचले त्यावरून आठवते त्याप्रमाणे, हा निर्णय घेण्याआधी विरोधकांबरोबर बैठक झालेली होती. मुळ कळीचा (आणि घोडचुकीचा) मुद्दा आहे तो जसवंतसिंगनी त्यांच्याबरोबर जाण्यासंदर्भात. तेथे विरोधकांनाच नाही तर रालोआच्या घटकपक्षांनापण अंधारात ठेवले होते. अडवाणींच्या मते त्यांना देखील माहीत नव्हते. खरे खोटे भारतीय राजकारणात कळने कठीण कारण डॉक्युमेंटेशनच नसते.

बाकी विरोधकांनी टिका केली नाही हा त्यांचा मोठेपणा ठरत नाही तर चालूपणा ठरतो. वास्तवीक हा मुद्दा पक्षातित होता आणि तो निर्णय चुकीचाच होता. त्यावर टिका करणेच योग्य होते, त्यातच मोठेपणा होता. अर्थात तसे न होण्यास, आधीचे कारण होते ते रुबीया सईद अपहरण आणि ६ अतिरेक्यांची सुटका, जे त्यावेळच्या सत्ताधार्‍यांनी आणि रालोआच्या विरोधकांनी केले होते.

थोडक्यात, तेरी भी चूप और मेरी भी चूप...

अभिज्ञ's picture

5 Jul 2009 - 3:02 pm | अभिज्ञ

हे विडीयो इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
ह्या जखमेची खपलि काढलेलीच बरी.
अशानेच तर आपल्या बोथट मनांना जरा जखमेची जाणीव होईल.
नाहीतर अफजल गुरु/संसद हल्ला प्रमाणे कसाब/मुंबई हल्ला हा देखील काहि दिवसांनी विस्मृतीत जाईल व लोकांना ह्या प्रकारांची तीव्रता देखील लक्षात राहणार नाही.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2009 - 3:03 pm | बिपिन कार्यकर्ते

पाहवत नव्हते... पण अगदी हट्टाने पूर्ण पाहिले. हैवान, राक्षस इत्यादी शब्दसुद्धा मला अगदी बुळबुळीत वाटत आहेत. सर्वांनी हे जरूर पहावे, काही बोध घेतला तर ठीकच आहे.

@ टारझन - प्रा. डॉ. शी सहमत. हा धागा राहू दे. लोकांनी जरूर बघावे हे सगळे. खपली निघाली तर त्यावर जखम कशी झाली हे विसरण्यापेक्षा जखम कशी झाली याचा विचार करून परत तसे न होऊ देणे हा विचार करणे उत्तम.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

5 Jul 2009 - 4:27 pm | टारझन

मी माझं वैयक्तिक मत सांगितलं होतं !! बाकी संपादकांची लेखकांची मर्जी !!
बोथट मनांना धार आली तर उत्तमच आहे !
बाकी चालू द्या!
लेखकाने डिस्क्लेमर्स अ‍ॅड केल्याबद्दल धन्यवाद !

- टारझन

विकास's picture

5 Jul 2009 - 8:12 pm | विकास

काल पहायला घेतले आणि बंद केले. मात्र आज परत प्रतिक्रीया वाचत असताना (विशेष करून नीलकांतची पोलीसाबद्दलची) परत पहायचे धैर्य केले. पहीले दोनच भाग बघितले. उरलेले पण पाहीन. काही निरीक्षणे:

  1. ट्रूथट्यूब.टिव्ही हा प्रकार मला वाटते इस्रायल समर्थकांनी चालू केला असावा. त्या संकेतस्थळावर इस्लामविरोधात सर्व चित्रफिती आहेत. अर्थात जे दाखवले आहे त्यात सहभागी असलेल्यांची बाजू कुठ्ल्याही धर्माचा अथवा निधर्मी "माणूस" घेऊ शकेल असे वाटत नाही. अर्थात जे दाखवले आहे ती वस्तुस्थिती आहे.
  2. अर्थात त्याचा तोटा सामान्य मुस्लीमांवर होऊन न देणे हे जसे इतरांचे कर्तव्य आहे तसेच सामान्यांपासून असामान्य मुस्लीमांचे पण ते जास्त कर्तव्य आहे. देश आधी मग धर्म जो ज्याचा त्याचा, ज्याच्यात्याच्यापाशी...
  3. कसाबला अ‍ॅंब्युलन्समधून नेत असताना झालेले भाषण तसेच इतर सीसीटिव्हीच्या फिती बघत असताना त्या कशा मिळवल्या याची उत्सुकता अनुत्तरीत रहाणार असली तरी आहे. कसाबचे चित्रफितीकरण (अँब्युलन्समधे) कोण करत होते?
  4. ट्रूथट्यूब.टिव्ही संकेतस्थळावर अजून एक छोटीशी (२ मिनीटांची वगैरे) चित्रफित पाहीली. (ज्याने/जीने पोस्ट केली आहे त्या व्यक्तीचे नाव आहे "ख्रिश्चनरेझिस्टन्स" :-) )
  5. ही चित्रफित पहात असताना तसेच २७/२८ नोव्हेंबरला सीएनएनवर सतत पहात असताना एक सतत जाणवणारी गोष्ट म्हणजे - बेशिस्त, प्रसंगाच्या गांभिर्याची जाणिव नसणे आणि कुठल्याच प्रकारचे नागरी शिक्षण नसलेला समाज. मला माहीती आहे की हे जरा कडवट बोलणे आहे. पण जेंव्हा पोलीस, सैन्यदल भारतावरील (नुसत्या मुंबईवरीलच नाही) हल्ल्याला तोंड देत आहे. ते पण सीमेवर नाही तर नागरी भागात तेंव्हा त्यांना सहकार्य करण्यासाठी आणि स्वतःच्या सेफ्टीसाठी मुकाट्याने लपून बसणे आणि नको तिथे गर्दी करून दहशतवाद्यांना स्वतःच्या नकळत मदत न करणे हे आपण करू शकलो नाही.
  6. अमेरिका/ब्रिटन/युरोप आणि भारतातील दहशतवादी हल्ले यातील त्याला तोंड देतानाचा प्रमुख फरक असा आहे की, भारतात सर्व एकाच वंशाचे असल्याने त्या गर्दीत अजून कोणी कसाब असला तर तो कसा कळणार?
  7. ९/११ च्या हल्ल्यानंतर सर्व विमाने तात्काळ जमिनीवर ठेवण्यात आली. असे म्हणतात की बॉस्टन (आणि कदाचीत इतरत्रही) काही विमानात असेच दहशतवादी अजूनही होते. मात्र ते काही करू शकले नाहीत आणि अर्थातच त्यांना तात्काळ (नंतरचे माहीत नाही/बाहेर आले नाही) कोणी अटकही करू शकले नाही तरी.

बाकी एक प्रश्न पडतो की आता (भारतकुमार राउतांनी पण म.टा. मधे विचारल्याप्रमाणे) ते मेणबत्तीवाले कुठे गेले? याला "जन पळभर म्हणतील..." म्हणायचे, रेझिलियन्ट मुंबईकर म्हणायचे की नुसताच (तमाम भारतीयांचा) निगरगट्टपणा?

सुनील's picture

5 Jul 2009 - 4:33 pm | सुनील

भयानक आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मला अजुन नीट बघता आले नाहीत.

वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jul 2009 - 8:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सकाळी हे व्हीडीओज पाहिले आणि तेव्हा आलेली खिन्नता आणि असहाय्यपणाची जाणीव अजूनही त्रास देत आहे. अजून किती दिवस ती छळत राहिल माहित नाही.

हुप्प्या's picture

5 Jul 2009 - 10:50 pm | हुप्प्या

असल्या हल्ल्यावर उत्तर म्हणजे आपले गुप्तहेरखात्याने आपले कौशल्य पणाला लावून पाकिस्तानातील ह्या कृत्याचे कर्ते करविते शोधून काढणे आणि त्यांना वेचून ठेचून मारणे. पण आपल्या षंढ राज्यकर्त्यांकडून असे होईल असे वाटत नाही. मागे २००० साली विमान अपहरण, अतिरेकी मुक्ती वगैरे नाचक्की झाल्यावर त्यावेळच्या "पोलादी" "कणखर" "राष्ट्रभक्त" सरकारने काही केल्याचे ऐकिवात नाही तर हे "निधर्मी" सरकार काही करेल असे मला वाटत नाही. पुढच्या हल्ल्याची वाट बघणे एवढेच आपल्या हाती! आणि हो, कसाबला फाशी देणे हा भाजपसमर्थक विरुद्ध "पुरोगामी" ह्यातल्या संघर्षाचा तद्दन राजकीय मुद्दा कधी बनतो हे ही बघू या.

मराठी_माणूस's picture

6 Jul 2009 - 8:53 am | मराठी_माणूस

काय आहे ह्या दुव्या मधे, इथे ते दिसत नाही, कृपया कोणि सांगेल का?

चिरोटा's picture

6 Jul 2009 - 5:46 pm | चिरोटा

असल्या हल्ल्यावर उत्तर म्हणजे आपले गुप्तहेरखात्याने आपले कौशल्य पणाला लावून पाकिस्तानातील ह्या कृत्याचे कर्ते करविते शोधून काढणे आणि त्यांना वेचून ठेचून मारणे.

२६/११ खालील कारणांमुळे घडले आहे:
१)गुप्तचर संघटनांकडे असलेली अपुरी माहिती.
२)गुप्तचर संघटना आणि पोलिस ह्यांमधले मतभेद.
३)नविन तंत्रज्ञानाचा अभाव.
४)पोलिस आणि गुप्तचर संघटनांमध्ये असलेला भ्रष्टाचार
ह्यात 'षंढ' राजकारणी लोकांचा तेवढा संबंध नाही.
ऐकीव माहितीनुसार ईंटिलिजन्स ब्युरो,रॉ ह्या भारताच्या गुप्तहेर संघटना आहेत. ईंटिलिजन्स ब्युरो भारताचे अंतर्गत संरक्षण तर रॉ भारताबाहेरील ईंटिलिजन्स गोळा करते. ह्या दोन्ही संघटनांमध्ये आणि स्थानिक पोलिसांमध्य हेवेदावे/मतभेद असतात. एका संघटनेने मिळवलेली माहिती दुसर्‍या संघटनेला मुद्दामून न देणे असे प्रकार व्यक्तिगत फायद्यासाठी घडतात्.रॉ संघटनेमध्ये तर मोठ्या प्रमाणावर वशिलेबाजी चालते.(काही महिन्यांपुर्वीच एका स्त्री अधिकार्‍याने होणार्‍या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.)
शिवाय ईंटिलिजन्स ब्युरो मध्ये होणारे पोस्टिंग म्हणजे बर्‍याचवेळा शिक्षा समजली जाते कारण तिकडे 'खायला' खूप कमी वाव असतो.
तेव्हा केवळ 'षंढ' राजकारणी लोकाना दोष देण्यात अर्थ नाही. ते काय ,येतात आणि जातात.ठराविक धर्माच्या लोकाना खूष करण्यासाठी देशाच्या सुरक्षेकडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करतील हे पटत नाही.
२६/११ नंतर ह्या संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची घोषणा झाली होती.त्याचे काय झाले माहित नाही.

क्ष्^न + य्^न = झ्^न

कुठलाही धोरणात्मक बदल मग तो युद्ध करायचा असो, छुपे युद्ध सुरु करायचा असो वा कुठले न्यायप्रविष्ट प्रकरण लवकर निकालात काढण्याचा असो. सत्ताधारी नेतेच हा निर्णय घेऊ शकतात. सरकारी संस्था कितीही ताकदवान असली तरी असला मूलगामी निर्णय ती परस्पर घेऊ शकतच नाही.
रॉची स्थिती दयनीय असली तर ते ओळखून आणि आजची गरज ओळखून सत्ताधारी पक्षाने पावले उचलली पाहिजेत. पण त्यातून फार मते मिळत नसल्यामुळे कुणी ते करू इच्छित नाही हे उघड आहे. उलट ह्या नेत्यांच्या मनात एक छुपी भीती आहे की पाकविरुद्ध काही कारवाई केली तर मी मुस्लिम व्होटबॅंक तर गमावणार नाही ना?
आपले मत की राजकीय नेते अगदी निष्पाप आणि ही विविध सरकारी खाती तीच काय ती कलंकित हे अत्यंत भाबडेपणाचे वाटते. नको तिथे पदोपदी राजकीय हस्तक्षेप करून बदल्या, बढत्यांचे खेळ करणारे सत्ताधारी इथे तो खेळ करून हवे ते इप्सित मनात आणले तर साध्य करु शकतील पण त्यांचे षंढत्व आड येते. षंढत्व अशासाठी की मामुली स्वार्थाकरता देशाच्या हिताकडे काणाडोळा करायला ह्यांना काही लाज वाटत नाही. मात्र यंव करू आणि त्यंव करु अशा बाता मारायला ते कमी करत नाहीत. आणि ह्या बाबतीत भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष तेवढेच आघाडीवर आहेत जेवढे कॉंग्रेस.
अशाने जागरुक मतदारांत निरुत्साह पसरला नाही तरच नवल.

संताजी धनाजी's picture

6 Jul 2009 - 3:58 pm | संताजी धनाजी

एकही व्हीडिओ दिसत नाही आहे.

- संताजी धनाजी

अभिज्ञ's picture

6 Jul 2009 - 5:08 pm | अभिज्ञ

ह्या चित्रफिती पाहून व नंतर इथल्या काही "सभासदांच्या" बाष्कळ चर्चा वाचून अजूनच उबग आलाय.
मेणबत्तीवाले काय, अफगाणिस्तान काय, इराक काय,इस्त्राईल काय कारगिल युध्द काय,संघ परिवार काय..
अग्गागा काही विचारू नका.
एकानेही ह्या चित्रफितीबद्दल व ह्या भीषण प्रकाराबद्द्ल न बोलता फुक्या प्रतिसादांची मंडई इथे जी मांडली आहे त्याबद्दल तीव्र उद्वेग वाटतो.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

विकास's picture

6 Jul 2009 - 7:39 pm | विकास

>>एकानेही ह्या चित्रफितीबद्दल व ह्या भीषण प्रकाराबद्द्ल न बोलता फुक्या प्रतिसादांची मंडई इथे जी मांडली आहे त्याबद्दल तीव्र उद्वेग वाटतो.<<

आपले सविस्तर विचार समजून घेयला नक्कीच आवडतील.

हुप्प्या's picture

6 Jul 2009 - 9:33 pm | हुप्प्या

चर्चा समजावून न घेता निव्वळ एक मताची पिंक टाकणे मग ती कुणाच्या अंगावर पडते का काय त्याची पर्वा न करणे ह्यातून आपण काय सिद्ध करत आहात?
ज्याला आपण "विचारांची मंडई" म्हणता त्याला उहापोह, चर्चा, वाद असे आम्ही म्हणतो. त्यातून अनेक गोष्टी कळतात. नवे विचार कळतात. आपले विचार दुसर्‍याला पटवता येतात.
अन्य देशांचा उल्लेख व्हायचे साधे सोपे कारण हे की असे हल्ले अन्य देशांवर झाले तेव्हा त्यांनी काय केले आणि त्यातून आपण काही शिकू शकतो का?
अर्थात हे सगळे समजायची कुवत नसेल वा त्यात काही स्वारस्य नसेल तर अशी एक निव्व्ळ पिंक टाकण्यात काय अर्थ आहे? तुम्ही आपले आवडीचे विषय निवडा की.

अभिज्ञ's picture

7 Jul 2009 - 11:13 am | अभिज्ञ

चर्चा समजावून न घेता निव्वळ एक मताची पिंक टाकणे मग ती कुणाच्या अंगावर पडते का काय त्याची पर्वा न करणे ह्यातून आपण काय सिद्ध करत आहात?

हि चर्चा अतिशय दिशाहिन आहे असे माझे स्प्ष्ट मत आहे.
ज्याला आपण "विचारांची मंडई" म्हणता त्याला उहापोह, चर्चा, वाद असे आम्ही म्हणतो. त्यातून अनेक गोष्टी कळतात. नवे विचार कळतात. आपले विचार दुसर्‍याला पटवता येतात.

वा. क्या बात है. लगे रहो.

अन्य देशांचा उल्लेख व्हायचे साधे सोपे कारण हे की असे हल्ले अन्य देशांवर झाले तेव्हा त्यांनी काय केले आणि त्यातून आपण काही शिकू शकतो का?

सगळ्यात विनोदी वाक्य.

इतर देश जेंव्हा अशा प्रसंगाला सामोरे जातात तेंव्हा ते त्यांच्या कुवतीनुसार यथायोग्य कणखर निर्णय घेतात. त्यांना नाही हो असले प्रश्न पडत? की भारताने अशा परिस्थितीत काय केले होते, किंवा भारत काय करत होता ?. थेट कृती करून ते मोकळे होतात.परिणामांची फिकीर दहशत निर्माण करणा-यांना पडते. हे असले प्रश्न फक्त आपल्याला पडतात. आपल्या देशाकरीता ,आपल्या देशाच्या व समाजाच्या सुरक्षेकरीता जे जे योग्य आहे व आवश्यक आहे ते ते सर्व ती राष्ट्रे कुठल्याही आंतर्राष्ट्रीय दबावाला बळी न पडता करतात. अशावेळी तिथला समाजही एकसंघ रित्या त्या सरकारच्या पाठीमागे उभे राहतो.
इथल्या प्रतिक्रिया वाचून आपण अजूनही "कणाहीन व राष्ट्राभिमान नसलेल्या " समाजात वावरत आहोत ह्याचेच प्रत्यंतर येतेय.
"कारगिल काय,कंदहार काय, भारतात दरवर्षी घडणारे बाँबस्फोट काय अन अलीकडचा हा मुंबई अतिरेकी हला काय ?" आपल्याला अशाने काय फरक पडतोय? तेवढ्यापुरता निषेध नोंदवायचा झाले.
मग थोड्याच दिवसात ते सर्व विसरून जायचे. मग पुन्हा आपल्याला जाग येणार ती पुढच्या घटनेला. नाही का?
लोकशाही असूनही इथली जनता आपले इप्सित सरकारच्या माध्यमातून साकार करू शकत नाही, आपल्या सुरक्षेबाबत सरकारवर कुठलाही दबाव टाकु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.
कारवाईची वेळ असताना "काही लोकांना" मग मोदी आठवतात,ऋतंभरा आठवतात,बाबरी आठवते पण स्फोटात मृत्युमुखी पडलेले लोक आठवत नाहीत, अनेकांचे उध्वस्त झालेले संसार आठवत नाहीत, अपंग झालेले आयुष्यातून उठलेले कारण का तर आपण एका "सेक्युलर" देशाचे नागरीक आहोत.
मोदी नसते,बाबरि पडली नसती तर हे अतिरेकी हल्ले झाले नसते हा सर्वात मोठा गैरसमज समाजात पसरवायचे काम पध्दतशीर पणे चालु आहे.
तेंव्हा असल्या बाष्कळ व निरुपयोगी चर्चा तावातावाने करून फार काही हशील होईल असे मला तरि वाटत नाही.
त्याकरीताच ही मताची पिंक.
तुमचे चालु द्यात.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

आशिष सुर्वे's picture

7 Jul 2009 - 12:22 pm | आशिष सुर्वे

नमस्कार मित्रानो,

सध्या ह्या चित्रफीती मुख्य संकेतस्थळावर उपलब्ध नाहीत..
पण अधूनमधून मी २६/११ च्या इतर चित्रफीती पहात असतो.
मन अस्वस्थ होते.

मला अजून ती काळरात्र आठवते..
रात्रीचे १०.३० वाजले होते आणि मी नुकताच जेवून निवान्त पुस्तक चाळत पहुडलो होतो.
आई तेवढयात स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि मला दूरदर्शन वर बातम्याची वाहिनी सुरु करण्यास सान्गून परत अद्रुश्य झाली.
मी तटस्थपणे बातम्या सुरु करून परत माझ्या पुस्तकात घुसलो.

कानावर शब्द पडू लागले...
'सी. एस. टी. ' स्थानकाबाहेर गोळीबार.. हातातले पुस्तक केव्हा गळून पडले, कळालेच नाही..

मग ए़कांमागून एक बातमी येत गेली..

कामा इस्पितळ..
ताज..

मी फक्त ऐकत होतो..
रात्र वाढत होती आणि नेहमीप्रमाणे डोळ्यावर येणारी झोप आज मात्र नाहिशी झाली होती.

दूरदर्शन सन्चावर 'ए. टी. स.' चे प्रमुख 'हेंमन्त करकरे' दिसत होते.
शरीरावर चिलखत, उजव्या हातात बन्दूक, निर्भिड चेहरा.. एकन्दर एक प्रातिनिधीक पोलिस अधिकारी..

एवढयात भ्रमणध्वनीवर एक दोनदा बोलून झाले.. काय बोललो ते आठवत नाही.. पण मी सुखरुप आहे, माझे निकटवर्तीय सुखरुप आहेत हे कळल्यावर टाकलेला एक 'मध्यमवर्गीय निश्वास' आठवला.

तेवढयात ती बातमी आली..
'ए. टी. स.' प्रमुख 'हेंमन्त करकरे' गोळीबारात जखमी.
मनात चलबिचल झाली.

डोळे सताड उघडे होते.
मधून मधून 'ताज' च्या बातम्या येत होत्या.
मी त्या पहात होतो, वाचत होतो, ऐकत होतो..

वाचता वाचता अचानक एकामागून एक बातम्या धडकू लागल्या..
'ए. टी. स.' प्रमुख 'हेंमन्त करकरे' शहीद..

वरिश्ट पोलिस अधिकारी 'विजय साळ्सकर' शहीद..

वरिश्ट पोलिस अधिकारी 'अशोक कामते' शहीद..

मन सुन्न झाले..
आजूबाजूला काय चालू आहे ते कळेनासे झाले..

दूरदर्शन सन्च धूसर दिसू लागला..
पुढचे २-३ दिवस असेच गेले..

त्यानन्तर काही दिवस बर्‍याच चर्चा झडल्या.. मोर्चे निघाले.. मेणबत्या लावण्याचे प्रकार झाले..

पुरावे देऊन झाले..
कडक समजही दिली..

पण निश्पन्न काय झाले?
काही नाही..

२६/११ वर चर्चा होतेय हे योग्यच आहे..
ह्या जखमा भरता कामा नये..

कारण आपण अजूनही 'इशारे'च देत आहोत.. आणि मेणबत्या पेटवत आहोत..

मला मात्र अजूनही माझ्या 'मध्यमवर्गीय निश्वासा'ची लाज वाटते आहे..
लाज वाटते आहे..

'शहिदाना माझे दन्डवत्'

आशिष सुर्वे's picture

7 Jul 2009 - 12:43 pm | आशिष सुर्वे

त्यान्च्या भावना मेल्या असतील..
माझ्या अजुनही जिवन्त आहेत