आजचा सकाळ

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in काथ्याकूट
28 Jun 2009 - 5:50 am
गाभा: 

आज सकाळीसकाळी ई-सकाळ उघडला आणि काही विचित्र फुटकळ चुका लक्षात आल्या.
सकाळ सारख्या मोठ्या नावाजलेल्या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर अशा चुका पाहुन आश्चर्य वाटले.
१.अंबरनाथ येथे रेल्वे पोलिसांची गांधीगिरी ही बातमी देशपातळीवरील बातम्यांमध्ये दिलेली आहे. अंबरनाथने राष्ट्रीय पातळीवर मजल मारल्याबद्दल अंबरनाथकरांचे अभिनंदन.
२.सामोपचाराने तंटे मिटविण्यात लातूर जिल्हा आघाडीवरया बातमीने पण दे्शपातळीवरील बातम्यांमध्ये स्थान मिळवले आहे. लातुरकरांचेपण अभिनंदन.
३. मुख्य पानावर 'ऑनलाइन'चे थोतांड बंद करा; अन्यथा हातात धोंडा घेऊह्या बातमीवर टिचकी मारली की 'ऑनलाईन पुन्हा 'ऑफ' 57 हजार 69 अर्ज सादर' ही बातमी दिसते. आणि शिवाय शेजारी संबधित बातम्यांमध्ये परत 'मुख्य पानावर 'ऑनलाइन'चे थोतांड बंद करा; अन्यथा हातात धोंडा घेऊ' हा मथळा दिसतो.
४. नवे ईस़काळ संस्थळ किती हळु चालते ते तुम्हाला माहित असेलच.

आमच्या आवडत्या वर्तमानपत्रातील बातम्यांचा दर्जा, संपादन कौशल्य आणि तांत्रिक दर्जा खालावत चालला आहे.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jun 2009 - 8:24 am | प्रकाश घाटपांडे

आमच्या आवडत्या वर्तमानपत्रातील बातम्यांचा दर्जा, संपादन कौशल्य आणि तांत्रिक दर्जा खालावत चालला आहे.

सहमत आहे मास्तर. सकाळला हे कळवितो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

टारझन's picture

28 Jun 2009 - 9:53 am | टारझन

गणा मास्तर !!! ण्यूज वाचायला मिळाल्याशी मतलब !! कोणाला कोणत्या कॉलम मधे ठेवलंय ह्याचा कशापायी इचार करतायसा ? संध्यानंदछाप बातम्या तर नाही ना देत पेपर अजुन ?
आता चविष्ट कालवान थाळीत दिलं काय न वाटीत दिलं काय ? चव तीच आसंल तर दर्जा खालावला असं कसं म्हणाल ?
होत असेल आवो... रकाने भरायला थोडं कॅस्कॅडिंग केलं असेल

आपण चिंतित दिसता ... आजिबात चिंता करू नका .. खेकड्याचं कालवाण हाणा मस्त पैकी .. रैवार साजरा करा .. हॅपी संडे

- टार्‍या मास्तर

विसोबा खेचर's picture

28 Jun 2009 - 10:59 am | विसोबा खेचर

संध्यानंदछाप बातम्या तर नाही ना देत पेपर अजुन ?

वा! संध्यानंद हा आमचा अत्यंत आवडता पेपर आहे..! :)

आपला,
तात्यानंद.

टारझन's picture

28 Jun 2009 - 12:12 pm | टारझन

वा! संध्यानंद हा आमचा अत्यंत आवडता पेपर आहे..!

वा वा वा !! आमचाही !! मस्त करमणूक करणारा पेपर आहे ;)

संध्यानंद मधल्या हमखास आवडणार्‍या बातम्यांच एक उदाहरण :
पन्नाशीनंतर कामजिवनाचा उपभोग घ्या !! रामबाण उपाय विना साईडईफेक्ट्स !!
जुन २८, पुणे : अमेरिकेतील एका जगप्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञांना आता चिरतारूण्याचा फॉर्मुला सापडला आहे. ह्याच्या वापराने आता आपण कोणत्याही वयात कामजिवनाचा तासंतास अनुभव घेऊ शकता. न्यू जर्सीतील वर्ल्ड फेमस ड्यूरेक्स फार्मासुटिकल्स ह्या कंपनीतील अ‍ॅमिलिया ह्या शास्त्रज्ञांचं असं म्हणनं आहे की ह्या कॅप्सूल्स च्या वापराने आपल्याला दिवसात कितीही विरोधकांना अंगाखांद्यावर खेळवून किंवा मॉडरेटिंग करून किंवा दिवसाला १० लेख पाडून जरी थकवा आला असेल तरी हरकत नाही. .. फक्त एक कॅप्सूल खा आणि पुनर्संजिवनी प्राप्त करा.. ह्या प्रॉड्क्ट्चं नाव "चाटा स्काय" असं ठेवलं असून "इसको लगा डाला .. तो लाईफ झिंगालाला " असा मोटो ही फिक्स करण्यात आला आहे , असं कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर विलियम प्रॅबो ह्यांनी सांगितलं. कोणत्याही साईड इफेक्ट्स विना हे शक्य करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. भारतात ही कॅप्सूल्स लवकरंच उपलब्ध होईल असं कंपनीचे भारतातील सी.ई.ओ. निल्सन स्लेटर यांनी सांगितलं आहे.
तेंव्हा वाट पहा ..

-प्रतिनिधी

-(पार्ट टाईम न्यूज रिपोर्टर) टारानंद
आज का आणंद , पुणे

घाटावरचे भट's picture

28 Jun 2009 - 12:17 pm | घाटावरचे भट

=))

अवलिया's picture

28 Jun 2009 - 12:45 pm | अवलिया

पन्नाशीनंतर कामजिवनाचा उपभोग घ्या !! रामबाण उपाय विना साईडईफेक्ट्स !!

अरे लिहिण्यात चुक आहे रे थोडी... खरे तर ते चाळीशीनंतर असे हवे होते असे सहजरावांनी आताच व्यनीतुन सांगितले.
हे मराठी पत्रकार ना ? बिनडोक भाषांतरे करतात... असो.

बाकी बातमी लै भारी !

=)) =)) =))

--अवलिया

=)) =)) =))

(पार्ट टाईम न्यूज रिपोर्टर) हवाई चप्पल आणल्यास ना रे??

मला बहुतेक अल्लाउद्दीनचे कारपेट आणावे लागतेय.

टारझन's picture

28 Jun 2009 - 1:00 pm | टारझन

चाळीशी नव्हे ,,, पंण्णाशीच !! शोध नविन आहे मालक !! चाळीशी वाल्या कॅप्सूल लै वार्षांपुर्वी निघाल्यात

- द ण्यू टारझन

विनायक प्रभू's picture

28 Jun 2009 - 1:03 pm | विनायक प्रभू

अस्णार्‍याना सुद्धा उपयोगात येता.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Jun 2009 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार

फार्मासुटिकल्स ह्या कंपनीतील अ‍ॅमिलिया ह्या शास्त्रज्ञांचं असं म्हणनं...

हॅ हॅ हॅ मी आधी शास्त्रज्ञाचे नाव अवलिया वाचले.

असो, एकदाच मागच्या वर्षी 'लडाख मध्ये बाईने दिला जुळ्या बरोबरच माकडाच्या पिल्लाल जन्म' ही बातमी फोटुसकट वाचली आणी आम्ही संध्यानंदचे फॅन झालो ते कायमचे.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

गणा मास्तर's picture

28 Jun 2009 - 10:40 am | गणा मास्तर

आता चविष्ट कालवान थाळीत दिलं काय न वाटीत दिलं काय ? चव तीच आसंल तर दर्जा खालावला असं कसं म्हणाल ?

ह्ये आक्षी खर हाये पघा. पण धाकली पाती आल्यापासुन चव खालावलीया वं.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

अवलिया's picture

28 Jun 2009 - 10:47 am | अवलिया

"सकाळ" संध्याकाळी वाचत चला... म्हणजे तोवर चुका दुरुस्त झाल्या असतील :)

--अवलिया

विजुभाऊ's picture

29 Jun 2009 - 5:01 pm | विजुभाऊ

सकाळ हे खरेतर पुण्याचे स्थानीक दैनिक.
पुण्याबाहेर जग आहे हा एक नवाच शोध आहे. त्यामुळे अंबरनाथ ची बातमी ही जागतीक किंवा वैष्वीक सदरात आली पहिजे

चिरोटा's picture

29 Jun 2009 - 5:21 pm | चिरोटा

१९९३ साली संजय दत्तला अटक झाली होती. 'व्ही.आय्.पी.' असल्याने त्याला खास वागणूक दिली जात होती. त्यावेळी अग्रलेखांचा स्वयंघोषित बादशहा नवाकाळची पहिल्या पानावर हेडलाईन वाचलेली आठवते-
संजय दत्तसाठी तुरुंगात परदेशी बनावटीचा संडास.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सूहास's picture

29 Jun 2009 - 5:28 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) <<<संजय दत्तसाठी तुरुंगात परदेशी बनावटीचा संडास.!>>>

सुहास